Mutual Fund | आजकाल अनेक लोक हे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतातm कारण म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळतात. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील वाढत चाललेली आहे. म्युच्युअल फंडने 2024- 25 या वर्षांमध्ये पहिल्या दोन महिन्यातच 81 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांचे अकाउंट जोडलेले आहेत. आणि याचे मुख्य कारण म्हणजे मार्केटिंग सतत वाढत आहे. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडचे प्रमोशन होत आहेत.
त्याचप्रमाणे नेटवर्किंग देखील जास्त होत आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडचे (Mutual Fund ) ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेश डी यांनी मुदत ठेवी बद्दलची बदलती धारणा आणि वाढते उत्पन्न पातळी तसेच म्युच्युअल फंड बाजारपेठातील वाढती गुंतवणूक याबद्दलची संख्या सांगितली आहे. एफडी योजना ही म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त उत्पन्न देत नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहेत.
ते म्हणाले की, म्युच्युअल फंडाचा दृष्टीकोन मजबूत आहे, ज्याला शेअर बाजारातील चालू तेजी, ठोस जोखीम व्यवस्थापन पद्धती, गुंतवणूकदारांना सतत उपलब्ध असलेली माहिती आणि सतत मार्केटिंगचे प्रयत्न यामुळे पाठिंबा मिळतो. तसेच यात नेहमीच चांगली वाढ होत राहील कारण लोक त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संपत्ती निर्मितीसाठी पर्यायी मार्ग शोधतात, असे तज्ञांनी सांगितले.
मे अखेरीस म्युच्युअल फंड फोलिओची संख्या किती ? | Mutual Fund
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या मे अखेरीस उद्योगातील म्युच्युअल फंड फोलिओची संख्या 18.6 कोटी होती. मार्चअखेर नोंदवलेल्या १७.७८ कोटींपेक्षा हे प्रमाण ४.६ टक्के किंवा ८१ लाख अधिक आहे. फोलिओ हा वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या खात्याला दिलेला क्रमांक आहे. गुंतवणूकदाराला अनेक फोलिओ असू शकतात.
एकूण 81 लाख फोलिओपैकी, इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमध्ये एप्रिल-मे दरम्यान 61.25 लाख युनिट्सची भर पडली. यासह, अशा फोलिओची संख्या 12.89 कोटींवर पोहोचली आहे. हे एकूण फोलिओच्या ६९ टक्के आहे. मे महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगात 45 लाख फोलिओ जोडले गेले, तर एप्रिलमध्ये 36.11 लाख फोलिओ जोडले गेले. 2023 मध्ये मासिक आधारावर फोलिओमध्ये सरासरी जोडणी 22.3 लाख होती.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पापुआ न्यू गिनिआ विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने (Lockie Ferguson) ऐतिहासिक आणि कधीही न तोडता येणार रेकॉर्ड केला आहे. लॉकी फर्ग्युसनने आपल्या संपूर्ण ४ ओव्हर मेडन टाकल्या (Lockie Ferguson Maiden Spell) … एकही धाव त्याने दिली नाही…. उलट ३ विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात पापुआ न्यू गिनिआचा संघ अवघ्या ७८ धावांत गुंडाळला. यानंतर न्यूझीलंडने ३ विकेट्स गमावत या धावा चेस केल्या.
लॉकीने कोणकोणत्या ओव्हर टाकल्या- (Lockie Ferguson Maiden Spell)
या सामन्यात लॉकी फर्ग्युसनने पापुआ न्यू गिनिआच्या डावातील पाचवी , सातवी , बारावी आणि चौदावी ओव्हर टाकली. लॉकीने पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर कर्णधार असद वालाला आऊट केलं. त्यानंतर सहावी ओव्हर त्याने मेडन टाकली. नंतर 12 व्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. तसेच 14 व्या ओव्हरमध्ये त्याने एका फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लॉकीने आपल्या कोट्यातील चौथी आणि डावातील 14 व्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या, मात्र त्या बायच्या रुपात होत्या. बायच्या धावा गोलंदाजाच्या खात्यात जोडल्या जात नाहीत. त्यामुळे लॉकी फर्ग्युसनची एकूण कामगिरी बघितली तर 4 ओव्हर 4 मेडन आणि 3 विकेट्स असा विश्वविक्रम त्याने केलेला आहे जो तोडणं सध्याच्या क्रिकेटमध्ये जवळपास अशक्य आहे.
दरम्यान, टी 20 वर्ल्ड कप इतिहासात गोलंदाजाने चारही ओव्हर्स मेडन (Lockie Ferguson Maiden Spell) टाकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी कॅनडाचा कॅप्टन शाद बिन जफर याने 2021 साली पनामा विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 1 धाव न देता 2 विकेट्स घेतल्या होत्या.मात्र लॉकी फर्ग्युसनने 3 विकेट्स घेतल्याने साद बिन जफरपेक्षा तो पुढे गेला आहे.
IBPS RRB Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे त्यांना नोकरी देखील मिळते. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता IBPS द्वारे एक मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत ऑफिसर स्केल (I, II, III) आणि ऑफिसर असिस्टंट या पदांच्या एक तब्बल 9995 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे. 7 जून 2024 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट होईल आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | IBPS RRB Bharti 2024
पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
पद संख्या – 9995 पदे
फीस –
खुला प्रवर्ग – रु. 850/-
राखीव प्रवर्ग – रु. 175/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून २०२४
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
Jio Internet Plans | भारतामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असतात. यातीलच जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आहे. जिओने त्यांच्या प्लॅनमध्ये काही बदल केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर नवीन प्लॅनिंग याचा विचार करत असाल, काही गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला जिओ फायबरच्या नवीन प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्हाला मोफत ओटीटी सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे.
जिओ 599 प्लॅन | Jio Internet Plans
Jio JioAirFiber चा हा प्लॅन सध्या ट्रेंडमध्ये आहे. हे खरेदी केल्यानंतर तुम्हाला 30 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अपलोड आणि डाउनलोड दोन्ही स्पीड 30 Mbps पर्यंत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यात अमर्यादित डेटा मिळतो. याशिवाय 800 हून अधिक टीव्ही चॅनेलही उपलब्ध आहेत.
या प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जातात. तुम्ही ते विकत घेतल्यास, Disney + Hostar, Sony Liv, Zee 5, Jio Cinema, Discovery +, ALT Balaji यासह अनेक OTT चॅनेलचे सदस्यत्व दिले जाते. फ्री व्हॉईस कॉलिंगचा पर्यायही दिला आहे. यासाठी तुम्ही बुकिंगही करू शकता.
जिओ 899 प्लॅन
हा प्लॅन अशा यूजर्ससाठी आहे जे फास्ट स्पीड इंटरनेट शोधत आहेत. हे 100 एमबीपीएस स्पीड प्रदान करते. अनलिमिटेड डेटाही दिला जातो. या प्लॅनमध्ये 800 हून अधिक टीव्ही चॅनेल देखील उपलब्ध आहेत. याशिवाय ओटीटी सबस्क्रिप्शनही दिले जाते. यामुळे देखील युजर्सना हा प्लान खूप आवडतो. यात डाउनलोड स्पीड 100 एमबीपीएस देखील उपलब्ध आहे.
हॅलो महाराष्ट्र | आजकाल जेवणामध्ये भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु जेवणामध्ये वेगवेगळे गोष्टी देखील सापडत आहेत. अशातच आता बिहारमधून एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे बिहारच्या बांका जिल्ह्यातील एका सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात मेसच्या टेबलमध्ये मृत साप आढळला. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्या विद्यार्थ्यांना रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची तक्रार होती. आता सर्वजण ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले.
या घटनेमुळे त्यांच्या वस्तीगृह संतापाची लाट उसळली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी असे सांगितलेले आहे की, या घटनेचा जेव्हा त्यांनी निषेध केला, तेव्हा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकवलेले आहेत.
या घटनेवर सनी या विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्हाला मेस मधील खाद्यपदार्थ संदर्भात समस्या येत आहेत. मात्र यावेळी त्यांनी मर्यादा ओलांडले आहेत. अन्नात साप आढळून आला आहे. हे कुणी सहन करू शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही हा मुद्दा प्राध्यापकांसमोर मांडला तेव्हा त्यांनी तो दाबण्याचा प्रयत्न केला.”
आयुषी नावाच्या विद्यार्थिनीने सांगितले की, जेवणाच्या गुणवत्तेचा मुद्दाही मुलींच्या मेसशी संबंधित आहे. आयुषी म्हणाली, “एसडीएम सर खूप आधी तपासणीसाठी आले होते आणि ९० टक्के जेवण संपले होते. आणि नियमही असे आहेत की जर एखाद्याला हॉस्टेलमध्ये राहायचे असेल तर त्याला मेसचेच जेवण खावे लागेल. जर तिथे मेस फूड नाही जर त्याने जेवण खाल्ले किंवा मेसचे पैसे दिले नाहीत तर त्याला परीक्षेला बसू दिले जात नाही.”
जिल्हा प्रशासनाने ताज्या घटनेचा तपास सुरू केला आहे. याआधीही कॉलेजमध्ये जेवणाबाबत तक्रारी आल्या होत्या. लाइव्ह हिंदुस्तानने जिल्हा दंडाधिकारी अंशुल कुमारच्या हवाल्याने सांगितले की, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कॉलेजला सूचना दिल्या आहेत. असा प्रकार पुन्हा घडल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अविनाश कुमार आणि पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) विनोद कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी महाविद्यालयाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध विमान कंपनी Air India च्या जेवणात प्रवाशाला चक्क ब्लेड सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेंगळुरूहुन सॅन फ्रान्सिस्कोला प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात हा प्रकार घडला. यानंतर कंपनीने आपली चूक मान्य केली आहे. एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी याबाबत कंपनीची बाजू मांडत सांगितलं की ही वस्तू त्यांच्या केटरिंग पार्टनरने वापरलेल्या भाजीपाला प्रक्रिया मशीनमधून आली आहे.
प्रवाशाने सोशल मीडियावर शेअर केला होता ब्लेडचा फोटो
मॅथुरेस पॉल या प्रवाशाने X वर जेवणाच्या डब्यात सापडलेल्या ब्लेडचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला . त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, एअर इंडियाचे खाद्यपदार्थ आपल्याला सुद्धा कट करू शकतात. रताळे आणि अंजीर चाटमध्ये एक धातूचा तुकडा लपविला होता जो ब्लेडसारखा दिसत होता. अन्न काही सेकंद चघळल्यानंतर मला हे समजले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. अर्थात, दोष पूर्णपणे एअर इंडियाच्या केटरिंग सेवेचा आहे, परंतु या घटनेने माझ्या मनातील एअर इंडियाची प्रतिमा डागाळली आहे. एखाद्या मुलाने हे धातू खाल्ले असते तर काय झाले असते? असा सवालही या प्रवाशाने केला.
Air India food can cut like a knife. Hiding in its roasted sweet potato and fig chaat was a metal piece that looked like a blade. I got a feel of it only after chewing the grub for a few seconds. Thankfully, no harm was done. Of course, the blame squarely lies with Air India’s… pic.twitter.com/NNBN3ux28S
या एकूण घटनेनंतर एअर इंडियाचे मुख्य ग्राहक अनुभव अधिकारी, राजेश डोग्रा यांनी सांगितले की, एअर इंडिया या गोष्टीला दुजोरा देते कि आमच्या फ्लाइटपैकी एका प्रवाशाच्या जेवणात धातूची वस्तू आढळली. तपासा अंतर्गत असे आढळून आले की ते आमच्या केटरिंग पार्टनरच्या सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला प्रक्रिया मशीनमधून आले आहे. आम्ही, आमच्या खानपान पार्टनरसह अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी उपाययोजना मजबूत केल्या आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Motorola ने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि अतिशय कमी पैशात नवीन मोबाईल लाँच केला आहे. Moto E14 असे या मोबाईलचे नाव असून किंमत कमी असली तरी या स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. सध्या मोटोचा हा मोबाईल UK मध्ये लाँच झाला असून येत्या काळात तो भारतीय बाजारात सुद्धा लाँच होण्याची शक्यता आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
6.56-इंचाचा डिस्प्ले –
Moto E14 मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 267 ppi पिक्सेल डेन्सिटी मिळतेय तसेच यामध्ये हाय ब्राइटनेस मोड आणि नाईट मोड देण्यात आलाय. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन मिळतेय. या स्मार्टफोनमध्ये UNISOC T606 प्रोसेसर बसवण्यात आला असून मोटोचा हा मोबाईल Android 14 Go एडिशनवर काम करतो. मोबाईल मध्ये 2GB रॅम और 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय, मात्र हीच रॅम वर्चुअल रॅमच्या माध्यमातून 4GB पर्यंत जाते.
कॅमेरा – Moto E14
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Moto E14 मध्ये AI सपोर्टसह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतोय, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूल 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोन मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
मोटोने आपल्या या नव्यास्मार्टफोनची किंमत अतिशय कमी ठेवली आहे. Moto E14 ची किंमत £69.99 (भारतीय चलनानुसार अंदाजे 7,412 रुपये ) आहे. हा स्मार्टफोन ग्रेफाइट ग्रे, पेस्टल ग्रीन आणि पेस्टल पर्पल या रंगात उपलब्ध आहे. मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईट वरून ग्राहक हा मोबाईल खरेदी करू शकतात.
Krushi Sakhi Yojana | शेतकरी शेतात वेगवेगळे पिकं घेत असतात. आजकाल शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहे अशातच. आता सरकारने देखील ग्रामीण भागातील महिलांसाठी शेतीतील कामे आणि त्यासोबत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे देशातील जवळपास 90 हजार महिलांना कृषी सखीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी ही घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे. आता महिला देखील शेतकऱ्यांना विविध कामात मदत करून वर्षाला 60- 70 हजार रुपये कमवू शकतील.
यावेळी चव्हाण म्हणाले की, “शेतकऱ्यांना शेतीकामात मदत करण्यासाठी आम्ही अनेक महिलांना प्रशिक्षण दिलं आहे. 34000 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आम्ही त्यात वाढ करून 90 हजार महिलांना प्रशिक्षण देणार आहोत यामध्ये अनेक महिला बचत गटातील आहे.”
सरकार आपल्या महिला (Krushi Sakhi Yojana) वर्गावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहावे. त्यांचे उत्पन्नाचा साधन स्वतः तयार करावं. यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. सरकारने लखपती दीदी ही योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबद्दलची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता याच योजनेअंतर्गत 12 राज्यांमध्ये कृषी सखी कार्यक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मेघालय, झारखंड, ओडीसा या राज्यांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महिला क्षेत्रांमध्ये महिलांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे महिला शिक्षित असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता महिला शेतकऱ्यांना देखील हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला शेतकरी कृषी सखींना पैसे देखील दिले जाणार आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्ष्मण हाके की मनोज जरांगे पाटील? ताकद नेमकी कुणाची जास्त आहे? मराठा की ओबीसी? वर्ष वर्षभर पत्रकारांचे कॅमेरे जिकडे फिरकतही नाहीत त्या जालन्यातील अंतरवाली सराटी आता राजकारणाचा आणि सामाजिक जातीय अस्मितांचा सेंटर पॉइंट ठरलाय… याच ठिकाणी जरांगे पाटलांनी पेटवलेल्या आगीची झळ राजकारण्यांपासून ते सरकारलाही बसली…लोकसभेच्या निवडणुकीतही हाच जरांगे इफेक्ट निर्णायक ठरला…त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रेशर पॉलिटिक्सचा वापर करून सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा, यासाठी जरांगे पाटलांनी सुरू केलेलं आमरण उपोषण एका महिन्याच्या अल्टिमेटमवर थांबवण्यात आलय… पण दुसरीकडे याच अंतरवाली सराटीच्या वेशीवर लढवय्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही…असं सरकारकडून लेखी लिहून मिळत नाही.. तोपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केलीय… एवढंच नाही तर त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेण्याचं काम केलय…
लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेतच पण सोबतच त्यांच्या संविधानाच्या समजेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत…. अंतरवाली सराटीच्या वेशीवर जरांगे वर्सेस लक्ष्मण हाके यांच्यात वादाची ठिणगी कशी पडलीय? दोघांनीही सरकारवर प्रेशर आणायला सुरुवात केल्यामुळे सरकार आता नेमकं कुणाचं एकणार? जरांगेंच्या प्रयत्नांमुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार की हाकेंच्या उपोषणामुळे ओबीसी आरक्षण जैसे थे राहणार? तेच पाहूयात,… हाके की जरांगे पाटील यांच्यापैकी ताकद नेमकी कुणाची जास्तय? ते बघायचं असेल तर आपल्याला आधी त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज घ्यावा लागतोयेणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो, जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सग्या सोयऱ्याचा आदेश काढेल त्यांचे आमदार आम्ही चून चून के गिरायेंगे…लक्ष्मण हाके यांचे उपोषणाला भेट द्यायला आलेल्या प्रकाश शेडगे यांनी दिलेला हा इशारा…आता शेडगेंनी नेम दुसरीकडे धरला असला तरी त्यांचा निशाणा कुठे होता? हे वेगळं सांगायची गरज नाही… लोकसभेला नाव घेतलं नाही…पण विधानसभेला आमदारांना नाव घेऊन पाडेन… असा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेलं हे प्रत्युत्तर…
मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेची कायद्यात रूपांतर करा, अशी मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती… त्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं… जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण विधानसभेला निवडणुका लढवू…आमदारांची नावं घेऊन सांगून पाडू…असा अल्टिमेटम जरांगेंनी दिला होता… एकट्या मनोज जरांगे फॅक्टरने लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या विरोधात घालवला…त्यामुळेच सरकारने जरांगेंना सिरीयसली घेत आपलं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पाठवलं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वत: या शिष्ठमंडळात होते….तसेच भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचादेखील या शिष्टमंडळात समावेश होता…थोडक्यात मनोज जरांगेंसाठी हायप्रोफाईल नेते मंडळींना अंतरवाली सराटीत यावं लागलं…राज्य सरकारला सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम देत मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं आणि ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले…
पण हे सगळं होताना अंतरवाली सराटीच्या वेशीवरच लक्ष्मण हाके यांनी ओबीसी एल्गार करून आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलय…ओबीसी आरक्षणाला सरकार धक्का लावणार नाही, असं लेखी जोपर्यंत सरकार देत नाही…तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, अशी कोंडी हाकेंनी सरकारची आणि अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंची देखील केली आहे…एवढंच नाही तर हाकेंनी जरांगे पाटलांच्या ताकदीलाही हलक्यात घेतलय…जरांगे हे स्टंटबाज, राजकीय मोटिवेटेड नेते आहेत… ते कुणी सोशल रिफॉर्मर नाहीत…त्यांना कायद्याचं शून्य टक्के नॉलेज आहे…अशा शब्दात त्यांनी जरांगे पाटलांना शिंगावर घेतलय…त्यामुळे लोकसभेनंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाच्या आगीचा भडका चांगलाच वाढणारय, हे स्पष्ट आहे…
जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीच्या पहिल्या दिवसापासूनच लक्ष्मण हाके त्यांना विरोध करू लागलेत…मराठा समाजाच्या भावना तीव्र असतानाही हाके यांनी हा विरोध सुरूच ठेवला होता… आता मात्र आमदारकीच्या तोंडावरच त्यांनी थेट सरकारला अल्टीमेटम दिल्यामुळे मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत…पण सरकारने हाकेंच्या, ओबिसींच्या उपोषणाकडे फारसं सिरीयसली पाहीलेलं नाहीये.. मीडियामधूनही हाकेंच्या या उपोषणाला अगदीच कमी फुटेज दिलं जातंय…त्यामुळे आता नेमकं जिंकणार कोण? हे ठरवायचंय ते सरकारला… सग्या सोयऱ्याबाबत जी अधिसूचना काढली आहे ती सरकारने मागे घ्यावी आणि कुणब्यांचे देत असलेले दाखले सरकारने थांबवावे… अशी लक्ष्मण हाकेंची मागणी… तर लवकरात लवकर सग्या सोयऱ्याबाबतचा जीआर लागू करावा, ही जरांगे पाटलांची मागणी…त्यामुळे सरकार कुणाच्या मागण्या मान्य करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे… या निर्णयावर सरकार राजकारणात मराठ्यांना की ओबीसींना सिरियसली घेतं याचा जणू निकालच लागणार आहे…
महादेव जानकर यांची रासप, शिवसेना अशा पक्षात राजकीय उभारी घेणारे आणि ओबीसींचे नेते समजले जाणारे लक्ष्मण हाके सग्यासोयऱ्यांचा जीआर रद्द करूनच थांबतात… की मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर विधानसभेला महाराष्ट्राला दाखवून देणार…हा येणारा काळच सांगेल…बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात ताकद कुणाची जास्तय? मनोज जरांगे पाटील की लक्ष्मण हाके? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा
Mansoon Update | मान्सून दरवर्षीपेक्षा लवकरच मान्सून महाराष्ट्रमध्ये दाखल झाला. आणि मध्येच त्या पावसामध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पुन्हा एकदा उन्हाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आता पासू बंद झालेला आहे. आणि आता पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतो. त्यामुळे आद्रता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे मान्सूनचा वेग देखील कमी झालेला आहे .त्यामुळे मुंबईकरांना पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूनच्या दरम्यान मान्सून (Mansoon Update) मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता होती. परंतु अजूनही मुंबईमध्ये पाऊस आलेला नाही. हाच मान्सून गुजरातमध्येच आहे. त्यामुळे आता 19 ते 20 जून दरम्यान मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान झालेले आहे. सोमवारी आणि ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे.
पाऊस कुठे पडला? | Mansoon Update
आयएमडीबीच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.
त्याचप्रमाणे आज म्हणजे 17 जून रोजी मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. याआधी काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला होता. परंतु हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे आज अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
त्याचप्रमाणे उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील मेघा गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे की, येत्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखवण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
20 जून नंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय | Mansoon Update
अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे मान्सूनचा वेग ही मंदावला असल्याची माहिती आलेली आहे. परंतु 20 जून नंतर मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रात सक्रिय होणार असून मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.