हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. ते देखील लवकरच बोलणार आहे. तसेच असं म्हणत विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना एकप्रकारे इशारा दिला होता. यानंतर आता जयंत पाटील यांच्या एका कट्टर समर्थकाने रिल्सच्या माध्यमातुन विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांवर पलटवार केला आहे.
काय आहे रिल्स मध्ये –
जयंत पाटील (Jayant Patil) गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल, एवढंच सांगतो, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका भाषणात केलं होतं. याच भाषणाचा आधार घेत जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एक रील बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. एकप्रकारे विशाल पाटील आणि विश्वजित कदम याना हा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सांगलीच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.
आ. पाटील यांच्या इस्लामपूर- वाळवा मतदार संघातल्या कसबे डिग्रज येथे आयोजित सत्कार समारंभात बोलताना विश्वजित कदम म्हणाले होते, सांगली लोकसभा निवडणुकीत बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांची जागा दाखवली. अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. ते देखील लवकरच बोलणार असल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितलं होतं. यापुढे इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर देखील आपले दसपटीने लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना इशारा दिला तर दुसरीकडे तसेच ज्यांनी करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न केला, त्यांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचं विशाल पाटील यांनी म्हंटल होते.
Side Effect Of Tattoo | आजकाल तरुणाईमध्ये नवनवीन फॅशन ट्रेंड होत आहेत. त्यातच टॅटू काढणे ही एक खूप मोठी फॅशन मानली जाते. तरुण-तरुणी शरीरावर टॅटू काढतात. अगदी त्रास सहन करतात, परंतु आकर्षक आणि फॅन्सी दिसण्यासाठी हे टॅटू काढतात. परंतु जर तुम्ही देखील टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण टॅटू आपल्या आरोग्यावर त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर देखील खूप दुष्परिणाम होत असतात. तुम्ही जर आपल्या शरीरावर टॅटू काढले, तर त्याच्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि अनेक आजारांना देखील आपण आमंत्रण देतो. आता ते कोणते धोके आहेत ते आपण जाणून घेऊया.
आरोग्यासाठी हानिकारक | Side Effect Of Tattoo
टॅटू काढण्यासाठी जी इंक वापरतात त्यामध्ये कार्सिनोजेनिक हे रसायन असू शकते. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. टॅटू काढताना वापरल्या जाणाऱ्या सुयाआणि शाई रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. त्याचप्रमाणे शाईमध्ये असलेले अल्युमिनियम आणि कोबाल्ट हे त्वचेवर विपरीत परिणाम करतात.
हेपेटाइटिस बीचा धोका
शरीरावर टॅटू काढल्याने हेपेटाइटिस बी चा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर टॅटू काढायचा विचार करत असाल तर त्याआधी हे हेपेटाइटिस बीची लस घेणे गरजेचे आहे. अन्यथा एक चूक तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते.
स्नायूंना दुखापत
शरीरावर टॅटू काढल्याने स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर टॅटू काढण्यासाठी वापरण्यात आलेली सुई कधी कधी शरीरात खोलवर घुसू शकते. त्यामुळे स्नायूंवर त्याचा वाईट परिणाम होतो.
Viral Video | काही दिवसांपूर्वी आईस्क्रीममध्ये माणसाचे बोट सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. आणि त्यानंतर लोकांना बाहेरून काही ऑर्डर करताना खूपच भीती वाटायला लागलेली आहे. आता अशाच प्रकारची एक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता अमूल कंपनीच्या आईस्क्रीमच्या डब्यामध्ये चक्क गोम सापडल्याचा प्रकार समोर आलेला आहे. एका महिलेने हा दावा केला आहे आणि याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
आईस्क्रीममध्ये सापडली गोम | Viral Video
ही घटना नोएडामध्ये घडलेली आहे. आईस्क्रीमच्या डब्यामध्ये आता गोम सापडल्याची घटना आलेली आहे. सेक्टर 12 मध्ये राहणाऱ्या दीपा नावाच्या व्यक्तीने शनिवारी सकाळी ऑनलाईन डिलिव्हरी अमूलचे आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर केले होते. या महिलेने असे सांगितलेले आहे की, तिने जेव्हा आईस्क्रीमचा डबा उघडला, तेव्हा त्यात तिला एक गोम सापडली आणि या घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कंपनीवर मोठा आरोप
आईस्क्रीमच्या डब्यांमध्ये गोम सापडल्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसल्या असल्याचे तिने सांगितलेले आहे. महिलेने केलेल्या या दाव्यामुळे आता अमूलच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता लोकांना ऑनलाइन ऑर्डर करताना भीती वाटत आहे.
अमूल ही भारतातील एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीचे अनेक उत्पादने देशभर वापरले जातात. दूध, दही, चीज, लोणी आणि आईस्क्रीम यांसारखे उत्पादनासाठी अमूल खूप लोकप्रिय आहे. परंतु या महिलेने आता दावा केल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. या महिलेने सांगितले आहे की, अमूल सारखी मोठी कंपनी त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसेल, तर आपण कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा. या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजलेली आहे.
Indian Costal Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय तटरक्षक दलाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या इंडियन कोस्टल गार्ड अंतर्गत खलाशी आणि मेकॅनिकल या 2 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज निघालेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता. 3 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यापूर्वीच सर्व उमेदवारांनी अर्ज करावे आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
रिक्त पदांची संख्या | Indian Costal Gurd Bharti 2024
या भरती अंतर्गत एकूण 320 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये खलाशी 260 पदे आणि यांत्रिकी 60 पदांचा समावेश असणार आहे
शैक्षणिक पात्रता
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून गणित आणि भौतिक शास्त्र विषयासह इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्ष असणे गरजेचे आहे.
पगार
खलाशी – 21 हजार 700 रुपये मेकॅनिकल – 29 हजार 200 रुपये
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना पत्र लिहिलं आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी शरद पवारांनी आपल्या पत्रात केली आहे.
शरद पवारांचे पत्र जसेच्या तसं –
प्रिय मुख्यमंत्री, मी दिनांक १२-१३ जून २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. अल्प पर्जन्यमान असलेल्या ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने प्रामुख्याने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र दौऱ्यावेळी शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आले. जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या करिता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना देखील सुचवल्या. सदर समस्या आणि मागण्यांबाबत प्रकल्प निहाय व गावनिहाय स्वतंत्र टिप्पणी सोबत जोडली आहे. कृपया टिप्पणीचे अवलोकन व्हावे. (Sharad Pawar Letter To Eknath Shinde)
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. pic.twitter.com/KMLTL3AB6h
पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती कि, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे. उक्त बैठकीस संबंधित विभागाचे सचिव व अधिकारी यांना हजर राहण्याच्या सूचना द्याव्यात व स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रीत करावे. सदर बैठकीवेळी दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासंदर्भात चर्चा घडून यावी तसेच कायस्वरूपी उपाययोजने संदर्भात चर्चा आणि नियोजन व्हावे अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडी विधानसभा(Maha Vikas Aghadi) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतंच मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवणर असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. यानंतर आता लवकरात लवकर जागावाटप करून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची महाविकास आघाडीची योजना आहे. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप समोर आलं आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस (Congress) मोठ्या भावाच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने (Thackeray Group) सर्वाधिक २१ जागा लढवल्या होत्या. त्या खालोखाल काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाला ९, काँग्रेसला १३ आणि राष्ट्रवादीला ( Sharad Pawar Group) ८ जागा जिंकता आल्या. म्हणजेच काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा शिवसेनेपेक्षा जास्त राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला जास्त जागा जाऊ शकतात. विधानसभेला काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर लढू शकतो. ठाकरेसेना ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. ‘लोकमत’नं आघाडीच्या संभाव्य जागावाटपाबद्दलचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, शनिवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेपूर्वी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यात जागावाटपाबद्दल प्राथमिक चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षांची ताकद आहे याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर करणार आहे. प्रत्येकी १०० जागांचे तीन गट करीत जागावाटप चर्चेला प्रारंभ करायचा अन् मग जिथे ज्याचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे प्रारंभिक सूत्र ठरले आहे.
South Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत सूत्रधार पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 18 रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. त्याचप्रमाणे 15 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | South Central Railway Bharti 2024
पदाचे नाव – सूत्रधार
पदसंख्या – 59 जागा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ऑफिस, नॉर्थ ब्लॉक, डीआरएम ऑफिस कंपाउंड, दक्षिण मध्य रेल्वे, विजयवाडा-1
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित पवार गटाची जोरदार हवा होती…याच हवेच्या जीवावर अजितदादांनी लोकसभेच्या चार जागा लढवल्या आणि त्यातली कशीबशी एक जागा जिंकत बाकीच्या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला… सर्वात जास्त प्रतिष्ठेची बनवलेली बारामतीची जागाही दीड लाख मतांनी गमवावी लागल्यानं अजितदादांच्या भोवती फुगवलेला नेतृत्वाचा फुगा अखेर फुटला…
संघानं तर भाजपच्या पराभवाचं खापरच अजित दादांवर फोडलं… हे कमी होतं की काय म्हणून राजकारणाच्या आतल्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय… ती म्हणजे राष्ट्रवादीच्या नव्या फुटीची… होय राष्ट्रवादीत एकदा फूट पडल्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक हालचाली सुरू असून लवकरच त्यात फूट पडणार असल्याची माहिती समोर येतेय…आयुष्यातली सर्वात मोठी पॉलिटिकल रिस्क ज्यांच्या भरोशावर घेतली त्याच भाजपने ही फूट घडवून आणण्याचा प्लॅन तर रचला नाहीये ना? अशीही शंका आता घेतली जातीय…अजितदादांच्या पक्षातील नेमका कोणता मोठा सहकारी फुटीच्या उंबरठ्यावर आहे? अजितदादांना भाजपने आपल्या चक्रव्ह्यूमध्ये कसं अडकवून ठेवलंय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फुटीचा पहिला सुगावा लागतो तो राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपशी वाढलेली जवळीक
लोकसभेच्या निकालात राष्ट्रवादीला केवळ रायगडची जागा वाचविण्यात यश आलं…तीही जागा सुनील तटकरे यांनी स्थानिक मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरवल्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक यश म्हणावं लागेल… प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी रायगड मधील प्रचारासाठी संघटनेचा फोर्स वापरला नाही…एक जागा वाचवता आल्यानं भाजपने राष्ट्रवादी समोर मंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला… प्रफ्फुल पटेल यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची ही ऑफर होती.. पण असं असतानाही कॅबिनेटचा हट्ट धरत अजितदादांनी हा प्रस्ताव नाकारला… वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद हवं होतं… पण त्यांची भाजपसोबत वाढलेली जवळीक पाहता अजितदादा थोडे सावध झाल्याचं बोललं जातंय… आपल्या सोबत फिरणारे अनेक नेते काळवेळ पाहून भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा असल्याने भाजप समोरून कुरवाळून मागून गेम करतंय का? असा प्रश्न आता अजितदादांना पडला असावा…आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी हे बडे नेते भाजपच्या मदतीने दिल्लीत सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगलीय… त्यामुळे राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या आणि मुरलेल्या नेत्यांना आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी आपल्या गोटात घेण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो…
राष्ट्रवादी फुटू शकते याचं आणखीन एक स्ट्रॉंग कारण देता येतं ते म्हणजे आमदार फुटण्याची धाकधूक…
राष्ट्रवादीच्या फुटीत चाळीस आमदारांनी अजितदादांना साथ दिली…आमदारांच्या बैठकीतही हा आकडा 40 च्या आसपास राहिलाय… पण लोकसभेच्या निकालानंतर यातले 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने वारंवार केला आहे…रोहित पवार तर अगदी आत्मविश्वासानं विधानसभेचं बिगुल वाजलं की त्याआधी हे नेते आमच्या सोबत येतील असं बोलून दाखवलंय…यासोबतच अजितदादांचे काही आमदार भाजपसोबतही संपर्क ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते…थोडक्यात सध्या अजितदादांच्या आमदारांपैकी सध्या तरी कुणी बंडाची भूमिका घेतली नसली..तरी जसजशी विधानसभा जवळ येईल तसतस अजित पवार गटातून मोठ्या प्रमाणावर आमदारांची गळती सुरू होण्याची शक्यता आहे…कारण लोकसभेच्या निकालाने आधीच आमदारांची धाकधूक वाढली आहे… जनतेचा कौल हा तुतारीच्या बाजूने असल्याने घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोर गेलं तर सहानुभूतीचा मोठा फटका आपल्या आमदारकीला बसण्याचा धोका या नेत्यांना वाटतोय…
एवढंच नाही तर राष्ट्रवादीतील दहा ते पंधरा आमदार ऐन मोक्याच्या टायमिंगला भाजपमध्ये जाण्यासाठी फिल्डिंग लावून बसल्याचीही चर्चा आहे… त्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार खासगित आपण मनाने शरद पवारांसोबत असल्याचं मान्यही करतात…त्यामुळे अजितदादांचे आमदार फुटले…की पक्षही आपोआप फुटतोय, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… अजितदादांची राष्ट्रवादी भाजपला फोडायचीये असं म्हणण्यामागचं शेवटचं कारण सांगता येतं ते म्हणजे राष्ट्रवादीची संपलेली उपयुक्तता….. अजित पवारांना सोबत घेऊन येणाऱ्या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होईल…पण संपूर्ण वर्षभरात राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपची इमेज खराब झालीच…पण त्यासोबत लोकसभेला त्यांना मोठा फटका बसला… त्यात कशीबशी एक जागा जिंकूनही कॅबिनेट मंत्रीपदाचा धरलेला हट्ट… सुनेत्रा वहिनींना दिलेली खासदारकी…हे सगळं कळत नकळतपणे भाजपच्या अंगलट येणारं प्रकरण आहे…याआधी सुद्धा विविध प्रकरणातून अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आलेल्या क्लीनचीट आणि त्यांची मीडियामध्ये होणारी बोंब त्यामुळे भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं खापर भाजपवर फुटतय…हेच बघून येणाऱ्या विधानसभेला अजित दादांना सोबत घेऊन आमदारकी लढणं भाजपला परवडणार नाही…त्यामुळे राष्ट्रवादीला बाजूला करण्याचा कार्यक्रम आता भाजपकडून होऊ शकतो…पण मित्रपक्ष म्हणून भाजपला चिकटलेल्या राष्ट्रवादीला सहजासहजी वेगळं करणं आता काही शक्य नाहीये…त्यामुळे या सगळ्याला एकच गोष्ट तारून नेऊ शकते…ती म्हणजे पक्षांतर्गत फूट…
अजित पवार गटातील अनेक मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे…त्यांच्या नाराजीला खतपाणी घालून पक्षात काड्या लावण्याचा कार्यक्रम भाजपकडून होऊ शकतो… राष्ट्रीय स्वयंसेवक संघानही अजितदादांना सेप्रेट करण्यासाठी भाजपवर प्रेशर आणल्याने फडणवीसांना वेळीच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत…त्यामुळे भाजप अप्रत्यक्षरीत्या अजितदादा गटात फूट पाडून आमदारकीचा रस्ता आपल्यासाठी सोयीचा करून घेईल का? अशी शंकाही यानिमित्ताने उपस्थित होते…शेवटी अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हे तयार करण्यात आलेलं नरेटीव, अजित पवार गटातील आमदारांची वाढलेली धाकधूक, राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांच्या महत्त्वकांक्षा या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर अजित पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन थांबलीय, असं म्हणायला बराच स्कोप उरतो…बाकी अजित पवार गटात फूट पडेल? आणि त्यामागे भाजप मास्टरमाइंड असेल? असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,
हॅलो महाराष्ट्र | गावाकडे शाळेत किंवा महाविद्यालयात विद्यार्थी जाताना त्यांना खूप लांबून जावे लागते. अशावेळी गाडीने त्यांचा खर्च देखील खूप होतो. परंतु आता या विद्यार्थ्यांना याचे टेन्शन राहणार नाही. कारण आता यांना एसटीचे पास हे त्यांच्या शाळेमध्ये वितरित केले जाणार आहे. एसटी महामंडळाकडून या सूचना देखील देण्यात आलेला आहे. एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी आता विद्यार्थ्यांना त्यांच्या एसटीच्या पासमध्ये 66% इतके सवलत देण्यात आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ 33 टक्के रक्कम भरावी लागेल. आणि त्यातून त्यांना महिन्याभराचा पास काढून मिळेल. त्याचप्रमाणे अशीच पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वितरण देखील करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन हे पास घ्यावे लागतील.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवली
यासंदर्भात आता 18 जून पासून एसटीचे पास थेट तुमच्या शाळेत तुम्हाला देण्यात येणार आहेत. ही एक विशेष मोहीम आता शासनाकडून राबवली जात आहे. त्यासाठी आता शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करायला सांगितलेले आहे. या योजनेचा लाभ आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.
15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’
त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला आणि मुलींना मोफत गणवेश देण्यात देखील येणार आहे.आता एक राज्य एक गणवेश असणार आहे. म्हणजेच राज्यभरातील प्रत्येक इयत्तेतील मुलांचे गणवेश सारखेच असणार आहे. सरकारची ही देखील एक नवीन योजना आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षीच्या ओडिसा ट्रेन अपघातासारखाचा आज पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात (West Bengal Train Accident) झाला आहे. एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वेचे डब्बे अक्षरशा उडून बाजूला फेकले गेले. आत्तापर्यंत या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रंगपाणी ते निजाबारी दरम्यान हा अपघात झाला. कांचनजंगा एक्सप्रेसन्यू जलपाईगुडीहून किशनगंज मार्गे सियालदहला जात होती. हि पॅसेंजर ट्रेन निजबारीसमोर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या मालगाडीने भरधाव वेगात या एक्सप्रेसला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये कांचनजंगा एक्सप्रेसच्या तीन बोगींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताच्या (West Bengal Train Accident) घटनेची मिळताच पोलीस, रेल्वे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured
ममता दीदींकडून दुःख व्यक्त : West Bengal Train Accident
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केलं. दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताची माहिती कळताच धक्का बसला आहे. डिटेलस अजून समोर आले नसेल तरी कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीशी टक्कर झाल्याचे वृत्त आहे. बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.