Monday, December 22, 2025
Home Blog Page 670

Chenab Railway Bridge : जगातील सर्वात उंच पुलावरून धावली भारतीय रेल्वे; Video पाहून म्हणाल, क्या बात है!!

Chenab Railway Bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वे नवनवीन इतिहास रचत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे मेट्रो, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन या नवनवीन रेल्वेगाड्यांमुळे प्रवास आणि दळणवळण सोप्प झालं आहे. आता भारतीय रेल्वे आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. काश्मीर येथे स्थित असलेला जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल चिनाब ब्रिजवरून (Chenab Railway Bridge) रेल्वे धावली आहे. रेल्वे विभागाने सांगलदान ते रियासीपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे, यामध्ये चिनाब ब्रिजचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे आता लवकरच भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या पुलावरून प्रवास करताना दिसेल.

आयफेल टॉवर पेक्षा उंच – Chenab Railway Bridge

चिनाब ब्रिज हा 359 मीटर उंच असून तो जो पॅरिसच्या आयफेल टॉवरलाही मागे टाकतोय. चिनाब नदीवर हा ब्रिज पसरलेला आहे. देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत पहिल्या यशस्वी टेस्टिंगबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, पहिली चाचणी ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे, त्यात चिनाब पूलचा सुद्धा समावेश होता. USBRL साठी सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, फक्त बोगदा क्रमांक 1 अंशतः अपूर्ण राहिला आहे.

दरम्यान, मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत असताना रेल्वे सुरक्षा आयुक्त डी सी देशवाल 46 किलोमीटर लांबीच्या सांगलदन-रियासी या दोन दिवसांत पाहणी करतील. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी 27 आणि 28 जून रोजी तपासणी नियोजित केली आहे. कुमार म्हणाले की सीआरएस तपासणीसाठी सर्व आवश्यक ऍक्टिव्हीटी वेळेत केले जातील.

चिनाब रेल्वे पूल (Chenab Railway Bridge) हा 1486 कोटी रुपये खर्च करून नदीवरती बांधण्यात आला आहे. या बांधकामात एकूण 30,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत हा पूल बांधण्यात आला असून ही ट्रेन 7 स्थानकांवरून बारामुल्लाला पोहोचेल. खोऱ्यातील लोकांना येण्याजाण्याची व्यवस्थित सुविधा मिळावी हा त्याचा उद्देश आहे.

राणेंचा विजय म्हणजे मरतुकडी म्हैस गाभण राहावी असा; सामनातून घणाघात

narayan rane sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांचा आकडा ९ वर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. तसेच मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात असेही सामनातून म्हंटल आहे. सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करनारा लेख लिहण्यात आला असून राणे कुटुंबीय आता त्यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहायला हवं.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, “लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.” नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत. काही लोकांना ‘जय’ विनम्रपणे स्वीकारता येत नाही. त्यातले हे महाशय आहेत. राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले. राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता. (‘लायकी’ हा शब्द अधिक उचित आहे.) राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले.

राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात. मोदी यांनी त्यांना आता मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला. शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळय़ांचा कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. (येथे ‘गाडले’ हा शब्द अधिक उचित आहे.) त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते.

राणे यांना 4,48,514 मते, तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,00,656 मते मिळाली. म्हणजे स्वतःस महान नेते वगैरे समजणाऱ्या राण्यांना पन्नास हजारांचीही आघाडी मिळालेली नाही. पैशांचा खेळ प्रशासन-पोलिसांच्या सहकार्याने झाला नसता तर राणे किमान दीड-दोन लाखांच्या फरकाने पराभूत झाले असते, पण पन्नास हजारांनी जिंकलेले राणे हे ‘कोकण’ दिग्विजयाच्या वल्गना करीत आहेत. राणे स्वतः कसेबसे जिंकले, पण भाजप हरला. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची महाराष्ट्रात हीच अवस्था होते, त्या पक्षाचा पराभव होतो, असे राणे यांचे सध्याचे सहकारी दीपक केसरकर यांनी सांगितले ते तंतोतंत खरे ठरले. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली. चौथ्यांदाही पराभव होईल. मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात.

Cricketer AI Photos : जर क्रिकेटर असते राजकारणी, तर कोणत्या खेळाडूला कोणतं मंत्रिपद मिळालं असत?

Cricketer Politician AI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सर्वत्र सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ पाहायला मिळत आहे. AI च्या माध्यमातून काल्पनिक फोटो व्हायरल झालेलं आपण अनेकदा बघितलं असेल. भारतात सध्या T20 विश्वचषक स्पर्धा आणि दुसरीकडे केंद्रातील मोदींचे नव्याने स्थापन झालेलं मंत्रिमंडळ दोन्हीही ट्रेंडिंगवर आहेत. क्रिकेट आणि राजकारण यात भारतातील लोकांना खूप इंटरेस्ट असतो. अशावेळी जर क्रिकेटपटू राजकारणी असते तर? कोणत्या खेळाडूला कोणतं मंत्रिपद मिळालं असत? याबाबत तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल. AI ने याबाबत वेगवेगळ्या खेळाडूंचे फोटो आणि मंत्रिमंडळातील त्यांचं पद याबाबत सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेउयात ….

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा या कॅबिनेट मंत्रिमंडळात पंतप्रधान असेल. टीम इंडियाचा कर्णधार असल्याने देशाच्या पंतप्रधान पदाची माळ ऑटोमॅटिक रोहितच्या गळ्यात पडली.

यानंतर भारताचा भरवशाचा फलंदाज विराट कोहली गृहमंत्र्यांच्या रूपात आहे. जस अमित शाह यांची मोदींना साथ असते त्याचप्रमाणे टीम इंडियात विराटची साथ नेहमीच रोहितला लाभली आहे.

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री म्हणून दिसतोय.

विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतच्या खांद्यावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे.

फिरकीपटू रवींद्र जडेजा कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं असं AI ला वाटत.

भारताचा दिग्गज गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहकडे संरक्षण आणि रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी AI ने दिली आहे.

सलामीवीर केएल राहुलने अर्थमंत्री म्हणून कारभार बघितला असता.

मोहम्मद सिराज कडे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रीपद देण्यात आलं असत

चायनामेन बॉलर कुलदीप यादव – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री झाला असता
(फोटो स्त्रोत: @sahixd/instagram)

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेला “दादा गट” इतक्या जागा लढवणार; प्रफुल्ल पटेलांनी आकडाच सांगितला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनीही जागावाटपावरून मोठं विधान केलं आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागा लढेल असं पटेल यांनी म्हंटल आहे.

आज गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत असं पटेल यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांनीही जवळपास इतक्याच जागांची मागणी केली होती. शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुती मध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. खास करून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळतेय.

मंत्रिपद मलाच मिळणार – प्रफुल्ल पटेल

दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळालेलं नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात मंत्रिपदावरून वाद आहेत अशाही बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. मात्र राज्यमंत्रीपद वाट्याला आल्याने ते नाकारण्यात आल्याचं नंतर सांगण्यात आलं. त्यातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याना राज्यसभेवर खासदार केल्याने त्यांची वर्णी मोदींच्या मंत्रिमंडळात लागणार का अशा चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार आहे, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं

Gpay App : GPay वर मिळणार 1 लाख रुपयांचं इन्स्टंट लोन; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Gpay App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gpay App) गेल्या काही काळात डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर प्रचंड वाढला आहे. जो तो UPI पेमेंट ऍपच्या माध्यमातून जिथल्या तिथे कॅशलेस व्यवहार करू लागला आहे. घरातून बाहेर पडताना चुकून पाकीट विसरलात तर आता पूर्वीसारखी टेन्शन येत नाही. कारण फोनच्या माध्यमातून UPI ऍप्सवरून सहज व्यवहार करता येतात. यांपैकी GPay हे सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय अँप आहे. जे कायम आपल्या युजर्ससाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असतं. दरम्यान आताही Google Pay एक चांगली सुविधा घेऊन आले आहे.

अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत पैश्यांची जुळवाजुळव करणे फार कठीण जाते. अशावेळी कुणाकडे पैसे उसने मागण्यापेक्षा जितक्या पैशांची गरज आहे तितके लोन काढणे जास्त योग्य वाटते. (Gpay App) पण आपत्कालीन परिस्थितीत लगेच लोन मिळेल, याची काही शाश्वती नसते. पण आता याची शाश्वती आहे. कारण Google Pay च्या माध्यमातून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अचानक पैशांची गरज भासल्यास कर्जसुविधा दिली जाणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Google Pay वरून किती कर्ज मिळणार? (Gpay App)

Google Pay या लोकप्रिय UPI ऍपच्या माध्यमातून युजर्सला आता कर्ज घेणे शक्य आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत Gpay युजर्स १ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकणार आहेत. मात्र यासाठी काही नियमांचे आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर, यासाठी काही कागदपत्रे देखील आवश्यक असणार आहेत. याबाबत जाणून घेऊया.

कर्ज कुणाला मिळणार?

Google Pay वरून कर्ज घेणारी व्यक्ती ही मूळ भारतीय असणे बंधनकारक आहे. GPay युजर भारतीय नसल्यास त्याला कर्ज मिळणार नाही. तसेच अर्जदार किमान १ वर्षाचा ग्राहक असणे आवश्यक आहे. (Gpay App) शिवाय त्या व्यक्तीचा बँक क्रेडिट स्कोअर उत्तम असावा आणि वयवर्ष २१ पेक्षा जास्त असावे. आणखी एक महत्वाचे म्हणजे, कर्ज घेण्यासाठी त्या व्यक्तीचे बँक खाते असणे देखील गरजेचे आहे.

कोणती कागदपत्रे लागणार?

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा (Gpay App)
  • ३ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो.

कसा अर्ज कराल?

Google Pay वरून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. (Gpay App) तत्पूर्वी लक्षात घ्या की, तुम्हाला कर्ज हवे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असायला हवा. असे असल्यास तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होईल. यासाठी अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो करा.

  • तुमच्या फोनवर गुगल ॲप्लिकेशन ओपन करा आणि मोबाईल नंबरवरून अर्जावर लॉगिन करा.
  • आवश्यक तितक्या रकमेची नोंद करा.
  • पुढे गुगलवर सर्व कर्ज अर्ज कंपन्या दिसतील.
  • इथे Start Pay Loan पर्याय निवड.
  • आता तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा. (Gpay App)
  • यानंतर सगळी कागदपत्रे जमा करा.
  • तुमची पात्रता निश्चित झाली की, त्वरित तुम्हाला कर्ज मिळेल.

FD Rules : FD करायची आहे? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल फायदाच फायदा

FD Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rules) गेल्या काही काळात पैसा कमावण्याइतकाच तो योग्य ठिकाणी गुंतवणेदेखील महत्वाचे आहे, हे अनेकांना पटलंय. त्यामुळे बरेच लोक आवर्जून गुंतवणूक करतात. यासाठी आपण कायम सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजनेच्या शोधात असतो. त्यामुळे बरेच लोक मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवतात. मुदत ठेव म्हणजे काय तर एफडी. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक गुंतवणूकदार डोळे बंद करून FD मध्ये गुंतवणुक करत आहेत. अनेकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये FD समाविष्ट करायला आवडते.

तुम्हालाही FD करायची आहे का? तर बिन्दास्त करा. पण त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. कारण कोणताही विचार न करता FD मध्ये गुंतवणूक करणे नुकसानदायी ठरू शकते. (FD Rules) तुम्हाला तुमचे नुकसान करून घ्यायचे नसेल तर ही बातमी स्किप करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या त्याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. म्हणजे काय होईल? तुमच्या डिक्शनरीतून नुकसान हा शब्द वगळता येईल. चला जाणून घेऊया.

FD करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (FD Rules)

1. जर तुम्ही अधिक नफ्याच्या हेतून गुंतवणूक करत असाल तर सरकारी बँकेसोबत तुम्ही खाजगी क्षेत्रातील किंवा लघु वित्त बँकांमध्ये देखील FD करू शकता. यामुळे तुम्हाला चांगल्या व्याजदराचा लाभ मिळतो.

2. जर तुम्ही FD मध्ये मोठी रक्कम गुंतवत असाल तर थांबा. कधीच मोठी रक्कम एकाच एफडीमध्ये गुंतवू नये. याउलट वेगवेगळ्या कालावधीसाठी FD तयार करा. समजा, तुमच्याकडे एकूण ५ लाख रुपये आहेत. (FD Rules) तर त्याची एकच FD करण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी ५ वेगवेगळ्या FD बनवू शकता. यातील प्रत्येक FD मध्ये तुम्ही प्रत्येकी १ लाख रुपये गुंतवू शकता. असे केल्याने तुम्हाला व्याजदरांचा अधिक चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल.

3. FD करताना तिच्या कालावधीची पूर्ण माहिती घ्या. कारण, जर तुम्ही दीर्घ मुदतीची FD करत असाल आणि आपत्कालीन समयी तुम्हाला पैशांची गरज भासली तर FD मधूनच मोडावी लागेल. (FD Rules) ज्यासाठी तुम्हाला दंड बसू शकतो. हा दंड भरायला लागू नये म्हणून आधीच एफडीचा कालावधी तपासून घ्या.

4. आयकर स्लॅब लक्षात घेता तुमच्या एफडी उत्पन्नावर कर आकारला जातो. त्यामुळे एका आर्थिक वर्षात FD वर मिळणारे व्याज हे १० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास व्याजावर TDS कापला जातो. जो एकूण व्याजाच्या 10 टक्के असतो. यासाठी ज्येष्ठांना ५० हजार रुपये इतकी मर्यादा आहे. (FD Rules) लक्षात घ्या, जर तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही FD मध्ये गुंतवणूक केल्यास TDS कपात टाळू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरून बँकेत सबमिट करावा लागेल.

5. ज्येष्ठांना एफडीवर ५०% जादा व्याज दिले जाते. तर काही विशेष एफडीवर बँकांकडून १% जास्त व्याज मिळते. त्यामुळे, नफ्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरातील ज्येष्ठांच्या नावाने एफडी काढू शकता. (FD Rules) यावर तुम्हाला अधिक व्याजाचा लाभ मिळेल.

Home Workout : घरी वर्कआउट करा पण जरा जपून; ‘या’ गोष्टी पाळा आणि दुखापत टाळा

Home Workout

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Workout) फिट आणि फाईन राहण्यासाठी उत्तम आहार व नियमित व्यायाम गरजेचा आहे. कारण, शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर चांगल्या सवयी नेहमी मदत करतात. पण घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या आयुष्यात दैनंदिन वेळापत्रक इतकं पक्कं असतं की, बऱ्याचदा बाहेर जाऊन जिममध्ये किंवा योगा क्लासमध्ये व्यायाम करायला वेळ मिळत नाही. मग अशावेळी बरेच लोक घरच्या घरी वर्कआउट करतात. खरंतर, व्यायाम हा तज्ञांच्या देखरेखीत करणे कधीही फायदेशीर. कारण अनेकदा तज्ञांच्या अनुपस्थित केला जाणारा व्यायाम नुकसानदायी ठरू शकतो.

बऱ्याचदा घरी व्यायाम करताना दुखापतदेखील होण्याची शक्यता असते. शिवाय चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास हवा तसा फायदाही मिळत नाही. उलट शारीरिक वेदना आणि दुखापतींमध्ये भर पडते. (Home Workout) पण तरीही तुम्ही जर घरच्या घरीच व्यायाम करणे पसंत करत असाल तर काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. जेणेकरून तुम्हाला दुखापत टाळता येईल. चला याविषयी जाणून घेऊया.

1. व्यायामासाठी मॅटचा वापर

घरीच व्यायाम करताना सुरक्षितता कसली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, घरात तज्ञांशिवाय व्यायाम करताना दुखापती होऊ शकतात. त्यामुळे तुम्हालाच तुमच्या सुरक्षेची काळजी घ्यायाला हवी. (Home Workout) व्यायामासाठी क्रॅश मॅट, योगा मॅट किंवा फोमचा वापर करा. आसपास खूप सामान असणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला दुखापत होणार नाही.

2. वॉर्मअप टाळू नका

घरच्या घरी व्यायाम करत असलात तरीही वॉर्मअप करणे टाळू नका. (Home Workout) कारण व्यायामाने आपल्या स्नायूंवर परिणाम होत असतो. अशावेळी वॉर्मअप न करता व्यायाम करण्यास सुरवात केल्याने आपल्या स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते. वॉर्मअपमूळे स्नायू मोकळे होतात आणि व्यायामाचा उत्तम लाभ मिळतो. त्यामुळे वॉर्मअप टाळू नका.

3. सोप्या व्यायामाची निवड (Home Workout)

जर तुम्ही घरी वर्कआउट करत असाल आणि तुम्ही नव्याने व्यायामाला सुरुवात करणार असाल तर आधी सोप्या व्यायाम प्रकारांची निवड करा. जेणेकरून शरीराला थोड्या थोड्या व्यायामाची सवय होईल आणि त्यामुळे वेदना होणार नाहीत. असे केल्यास शरीर लवचिक होण्यासदेखील मदत मिळेल.

4. सतत एकच व्यायाम नको

बऱ्याचवेळा एखादा व्यायाम करताना आपण बराच वेळ तेच तेच करत राहतो. यामुळे शरीरातील उर्वरित स्नायूंना दुर्लक्षित केले जाते. ज्यामुळे फिटनेस बॅलन्स तयार होत नाही. (Home Workout) त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करताना प्रत्येक स्नायूंसाठी व्यायाम करा.

5. ब्रेकसुद्धा घ्या

व्यायाम करताना नॉनस्टॉप व्यायाम करायला हवा असे नाही. त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने आपल्या स्नायूंना रिकव्हर होण्यासाठी वेळ द्या. सतत व्यायाम केल्याने स्नायू थकतात. ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. (Home Workout) म्हणून व्यायाम करताना अध्येमध्ये ब्रेक घ्या.

Viral Video : श्शी घाणेरडा!! तळहातावर थुंकून केला ग्राहकाचा फेस मसाज; VIDEO पाहून येईल उलटी

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडीओ चांगले तर काही चांगलेच डोक्यात जाणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच मस्तकात जाणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ एका सॅलोनमधला आहे. या व्हिडिओत आपण सॅलोन चालकाचे अत्यंत घाणेरडे आणि किळसवाणे कृत्य पाहू शकतो. हातावर थुंकी लावून त्याने ग्राहकाचा फेस मसाज केल्याचा हा संतापजनक प्रकार या व्हिडिओतून समोर आला आहे. ज्यातून स्वच्छतेचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सॅलोन चालकाचे किळसवाणे कृत्य (Viral Video)

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या लखनौमधील एका केसकर्तनालयातील आहे. या दुकानातील सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ही किलनवानी घटना कैद झाली असून आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, सॅलोन चालक ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करण्यापूर्वी हातावर थुंकला आणि त्यानंतर त्याने आपली थुंकी थेट ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करताना फासली. यावेळी ग्राहकाचे डोळे बंद असल्यामुळे सॅलोन चालकाचा हा घाणेरडा प्रकार त्याच्या लक्षात आला नाही.

मात्र, आपल्या चेहऱ्यावर थुंकी लावली असल्याची शंका आल्यामूळे ग्राहकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्याला सॅलोन चालकाने आपल्या चेहऱ्यावर मसाजच्या निमित्ताने स्वतःची थुंकी लावल्याने दिसले आणि त्याला धक्का बसला. (Viral Video) याबाबत ग्राहकाने त्वरित पोलिसांत तक्रार दाखल केली आणि यानंतर पोलिसांनी देखील तडक कारवाई करत या सॅलोन चालकाला ताब्यात घेतले आहे. या गंभीर प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर सॅलोन चालकाला अटक झाली असली तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना मनात आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

युजर्स भडकले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आरोपी केशकर्तनकाराचे नाव झैद असल्याचे समजत आहे. त्याच्या या किळसवाण्या कृत्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Viral Video) ग्राहकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी झैदला अटक केली असून याबाबत त्याची कसून चौकशी सुरू आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने या प्रकाराबाबत संताप दर्शवला आहे. अनेकांनी झैदला कडक शासन करावे, अशी मागणी केली आहे. (Viral Video) या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असाच आणखी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे व्हिडीओ पाहून सॅलोनमध्ये जायचं का नाही? असा प्रश्न पडेल.

Jio Data Booster Plan | ‘हे’ आहेत Jio डेटाचे सर्वात स्वस्त बूस्टर प्लॅन, घ्या अनलिमिटेड इंटरनेटचा आनंद

Jio Data Booster Plan

Jio Data Booster Plan | आज काल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचा आणि पर्यायाने इंटरनेटचा वापर करत आहेत. इंटरनेटचा वापर सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या देखील नवनवीन रिचार्ज प्लॅन त्यांच्या ग्राहकांसाठी ऑफर करत असतात. अनेकवेळा आपण महत्त्वाचे काम करत असतो आणि मध्येच आपला डाटा संपतो. त्यानंतर आपले काम होत नाही. अशावेळी अनेक टेलिकॉम कंपन्या अशा आहेत. ज्या त्यांना फक्त इंटरनेट प्लॅनच्या काही सुविधा देत असतात. हे प्लॅन रिचार्ज करून तुम्ही एक्स्ट्रा डाटा मिळवू शकता. आज आपण जिओच्या केवळ डाटा प्लॅनबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या तुम्हाला अत्यंत कमी पैशात उपलब्ध होतील.

जिओ 15 रुपयांचा प्लॅन | Jio Data Booster Plan

ज्या लोकांचे इंटरनेट खूप लवकर संपते. त्यांच्यासाठी हा अत्यंत उत्तम पर्याय आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 जीबी डेटा मिळतो. तुमचा आधीचा डेटा जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंत हा प्लॅन देखील सक्रिय राहतो. ज्यांना दिवसभर काम करायचे आहे. त्यांच्यासाठी हा पॅक अत्यंत उपयोगाचा आहे.

जिओ 19 रुपयांचा प्लॅन

जिओच्या 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा असतो. या प्लॅनची वैधता देखील तुमच्या आधीच्या प्लॅन जोपर्यंत आहे, तोपर्यंत असतो.

जिओ 25 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा मिळतो. ज्या लोकांना दिवसभर इंटरनेट पुरत नाही. त्या लोकांसाठी हा प्लॅन खूप चांगला प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता देखील तुमचा आधीचा प्लॅन जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंतच असतो.

जिओ 29 रुपयाचा प्लॅन

जिओचा आहे 29 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 2.5 जीबी डेटा येतो. या प्लॅन द्वारे तुम्ही नॉनस्टॉप इंटरनेटचा वापर करू शकता. या प्लॅनची वैधता देखील तुमचा आधीचा प्लॅन जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंतच असतो.

जिओ 61 रुपयांचा प्लॅन | Jio Data Booster Plan

ज्यांना जास्त डेटाची गरज असते. त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर भरपूर डेटा वापरू शकता. या प्लॅनची वैद्यता देखील तुमच्या आधीच्या प्लॅनच्या इतपतच आहे.

Reunion Island : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ‘या’ बेटाखाली दडलंय विचित्र रहस्य; भयानक हालचालींमुळे वाटते भीती

Reunion Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reunion Island) आजपर्यंत तुम्ही अनेक रहस्यमयी कथा ऐकल्या असतील. सिनेमे पाहिले असतील, पुस्तके वाचली असतील. पण, जगभरात खरोखर दडलेली रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता काही वेगळीच असते. या संपूर्ण जगात कितीतरी ठिकाणे, वास्तू, वस्तू आणि घटना अशा आहेत ज्या अत्यंत रहस्यमयी आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेताना एक विशेष कुतूहल जाणवते. तर काहींविषयी जाणून घेताना मनात भीती निर्माण होते. अशीच भीती निर्माण करणाऱ्या एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जे दिसायला अत्यंत सुंदर असले तरी त्याच्या खालील पाण्यात दडलेलं रहस्य मनात विचित्र भीती तयार करत. या बेटाचं नाव आहे ‘रियुनियन बेट’. चला या बेटाविषयी अधिक माहिती घेऊया.

रहस्यमयी ‘रियुनियन बेट’ कुठे आहे? (Reunion Island)

जगभरात अनेक रहस्य दडली आहेत. त्यापैकी एक रहस्य हिंद महासागरातील रियुनियन बेटाखाली दडलं आहे. हे बेट अतिशय सुंदर असून इथल्या नेत्रदीपक दृश्यांमुळे प्रसिद्ध आहे. या बेटाला अतिशय सुंदर निसर्ग लाभलेला आहे. असे असूनही हे बेट अत्यंत धोकादायक मानले जाते. कित्येक जलतरणपटू आणि सर्फरसुद्धा या बेटाखाली पाण्यात जायला घाबरतात. या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. मात्र, या बेटाखाली धोकादायक रहस्य दडलं आहे. ज्याविषयी आपण जाणून घेत आहोत.

काय आहे या बेटाचं धोकादायक रहस्य?

सुंदर, नयनरम्य दृश्ये आणि आकर्षक समुद्रकिनारा लाभलेले रियुनियन बेट संपूर्ण जगभरात धोकादायक बेट म्हणून ओळखले जाते. या बेटाखाली पाण्यात उतरायला कुणीही तयार होत नाही. यामागे एक धोकादायक रहस्य दडलं आहे. (Reunion Island) हिंदी महासागराच्या मध्यभागी वसलेले हे बेट त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असले तरीही इथे जीवाला धोका आहे असे मानले जाते. कारण, हे बेट शार्कने घेरलेले आहे. इतकेच नव्हे तर या बेटावर सक्रिय आणि सुप्त ज्वालामुखी आहे. जिचा कधीही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे इथे जायला लोक घाबरतात.

रियुनियन बेटाचा इतिहास

माहितीनुसार, रियुनियन बेटाचा ज्वालामुखी सक्रिय आहे. ज्याचा १६४० पासून आतापर्यंत शंभरहून अधिक वेळा अचानक उद्रेक झाला आहे. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा यातून प्रचंड काळा धूर निघतो. त्यावेळी निघणार ज्वाला या संपूर्ण बेटावरून दिसतात. याची एकूण किनारपट्टी २०७ किलोमीटर इतकी आहे. (Reunion Island) असे असूनही या ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावा विशेष नसल्याचे स्थानिक सांगतात. हा ज्वलंत लावा थेट समुद्रात वाहत असल्याने तो सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. अशा या सक्रिय ज्वालामुखीनेच या बेटाला आकार दिलाय, असेही काही लोक सांगतात.

रियुनियन बेटाची खासियत

रियुनियन बेटाबद्दल आणखी सांगायचे झाले तर, इथल्या सक्रिय ज्वालामुखीच्या लावा प्रवाहाने इथे बरेच बोगदे बनले आहेत. जे या बेटाची खासियत मानले जातात. या बोगद्यांमधून अनपेक्षित आणि नेत्रदीपक प्रवास केल्याने बेटाची भूगर्भीय रहस्ये आपल्या समोर उलगडतात. या बेटाच्या मध्यभागी अनेक लहान मोठी गावे आहेत. जी अत्यंत दुर्गम आहेत. (Reunion Island) इथे बेकरी आणि किराणा दुकानांना हेलिकॉप्टरने पुरवठा केला जातो. या ठिकाणी केवळ पायी किंवा हेलिकॉप्टरने पोहोचता येते. असे सांगितले जाते की, या ठिकाणी राहणारे लोक हे पळालेले गुलाम होते. त्यामुळे त्यांनी हे दुर्गम ठिकाण आश्रय म्हणून वास्तव्यासाठी निवडले.