Viral Video | ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी लाल परी म्हणजे एसटीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. अगदी खेड्यापाड्यापासून ते शहरांपर्यंत लोक एसटीने प्रवास करतात. परंतु काही महिन्यात या एसटी बाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आता देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. एसटीतील हा एक व्हिडिओ पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच समजणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Viral Video) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आहे. या ठिकाणी चालत्या एसटी बसमध्ये जेष्ठ नागरिकांनी मारहाणी केलेली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमारे दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटीमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांमध्ये मारहाणी झालेली आहे. एका प्रवाशाचे वय 75 वर्षाच्या वर होते तर दुसऱ्या व्यक्तीचे वय कमी होते. त्यांच्यामध्ये बुटाने मारहाणी झालेली आहे.
या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, चालकाच्या बाजूला असलेल्या बॉनेटवर एक जण बसलेला होता. त्यांच्या मारहाणीमुळे चालकाचे देखील लक्ष विचलित होत होते. त्यावेळी त्या चालकाने बस मध्येच थांबवली आणि त्यांचे भांडण सोडविले. केवळ धक्का लागल्यामुळे या दोघांमध्ये हाणामारी झाली होत. यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक लोक त्यांच्यावर टीका देखील करत आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हाट्सअप वरून आपण एकमेकांना फोटो, विडिओ, ऑडिओ सह अनेक गोष्टी शेअर करू शकतो. आजकाल अनेक पर्सनल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातूनच केली जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप असतंच. कंपनी सुद्धा व्हाट्सअप मध्ये सतत अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. ज्यामुळे यूजर्सना नवनवीन अनुभव मिळत असतो. आताही व्हाट्सअपमध्ये एक भन्नाट फिचर येणार आहे ज्यामध्ये Voice Message चे रूपांतर Text Message मध्ये करता येणार आहे. म्हणजे तर कोणाचा Voice Message आला आणि तुम्हाला तो ऐकायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचे Text मध्ये रूपांतर करून तो मेसेज वाचू शकाल.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांना लवकरच व्हॉईस नोट्स ट्रांसक्राइब करण्याची सुविधा मिळेल. हे फीचर सुरू केल्यानंतर, युजर्सना कोणताही व्हॉइस मेसेज ट्रांसक्राइब करण्यासाठी कोणत्या थर्ड पार्टी अँपची गरज लागणार नाही. व्हॉट्सॲपचे नवीन फीचर सध्या डेव्हलपमेन्टच्या टप्प्प्यात असून लवकरच ते यूजर्ससाठी उपलब्ध होईल. जे लोक व्हॉइस मेसेज ऐकण्याऐवजी वाचणे पसंत करतात त्यांच्यासाठी हे फीचर खूप फायदेशीर ठरेल. एवढच नव्हे तर तुम्ही प्रत्येक व्हॉइस संदेशासाठी वेगळी भाषा निवडू शकता. तुम्ही हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन यांसारख्या भाषांमध्ये त्यांचे ट्रांसक्राइब करू शकाल. भविष्यात यामध्ये आणखी काही नवीन भाषा केल्या जाऊ शकतात. मात्र हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, यूजर्सना भाषा विशिष्ट पॅकेज डाउनलोड करावा लागेल.
video call साठीही व्हाट्सअपचे नवीन फीचर्स –
मागील काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने विडिओ कॉलबाबत सुद्धा नव्या फीचर्सची घोषणा केली होती. त्यानुसार तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त 32 व्हिडिओ कॉलमध्ये ऍड करू शकता. तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुमची स्क्रीन शेअर करताना तुमचा आवाज शेअर करू शकता. तसेच जेव्हा व्हिडिओ कॉलवर बरेच लोक असतात, तेव्हा प्रत्यक्षात कोण बोलत आहे हे समजणे अवघड होते. यावर उपाय म्हणून WhatsApp आता बोलणाऱ्या व्यक्तीला इतर सर्वांच्या वर ठेऊन हायलाइट करून दाखवेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 पैकी तब्बल 36 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं…प्रकाश आंबेडकरही या लोकसभेला दारून पराभूत झाले…त्यामुळे वंचित इफेक्ट यंदाच्या लोकसभेला सपशेल तोंडावर आपटला…वंचितचा प्रभाव संपलाय, आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राजकारण थांबवावं…अशा चर्चे नाही पेव फुटले… पण वंचित जरी लोकसभेला हरली असली तरी त्यांना जे काही साध्य करायचं होतं, ते त्यांनी निकालात करून दाखवलय…होय आम्ही बोलतोय ते खरंय…स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचितमुळे भाजपचे उमेदवार पडले असल्याचा खळबळजनक दावा केलाय…पण खरंच फॅक्चुअल डेटा चा विचार करता वंचितनं लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला पाडलं? आणि कोणाला निवडून आणलं? निवडणूक हरूनही वंचित लोकसभा जिंकली, असं आम्ही का म्हणतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
थोडसं तपशिलात जायचं म्हटलं तर वंचितनं तब्बल 6 जागांवर विजयी उमेदवाराच्या नीट पेक्षा अधिकची मतं घेतली…अर्थात वंचितमुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीचे तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले… वंचितने महायुतीचा पाडलेला पहिला उमेदवार आहे तो नांदेडचा… भाजपच्या ताब्यात असणार नांदेडचं घोडे मैदान मारलं ते काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी…भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा चव्हाणांनी तब्बल 59 हजार 442 मतांनी पराभव केला… पण इथे इंपॉर्टन्ट ठरला तो वंचित फॅक्टर…कारण इथून वंचितच्या अविनाश भोसीकर यांनी तब्बल 92 हजार 512 मते घेतली… भोसीकर हे लिंगायत समाजातून येत असल्याने भाजपची ही पारंपारिक वोट बँक वंचितकडे शिफ्ट झाली…विजयातल्या मार्जिनची महत्त्वाची मतं आपल्याकडे घेतल्याने भाजपच्या तगड्या उमेदवाराचा इथून पराभव झाला…
वंचितनं गेम केलेला महायुतीचा दुसरा उमेदवार आहे तो हिंगोलीचा…हिंगोलीची मुख्य लढत झाली ती ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर…ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट इथून वर्कआउट झाली आणि नागेश पाटील अष्टीकर हे तब्बल एक लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाले…पण आश्चर्यचकित करायला लावणारी बाब अशी की इथून वंचितच्या बि.डी. चव्हाण यांनी तब्बल एक लाख 61 हजार 814 मतं घेतली…बि.डी. चव्हाण येतात बंजारा समाजातून…हिंगोलीत या समाजाचं मोठं वर्चस्व आहे…चव्हाण यांनी मतदारसंघात बंजारा आणि ओबीसी समाजाची चांगली मूठ बांधली होती…हा ओबीसी आणि बंजारा समाज राजकारणात नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला पण इथे वंचितने खेळी केल्यामुळे निर्णायक मतं पदरात पाडून घेतल्याने महायुतीच्या उमेदवाराचा इथून पराभव झाला…
आता थोडं उलट गणित पाहिलं तर वंचितचा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला ती जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची महाराष्ट्रात सर्वात घासून झालेली लोकसभा निवडणूक ही मुंबई उत्तर पश्चिमची… इथून शिंदे गटाचे रवींद्र वायकर ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात अवघ्या 48 मतांनी निवडून आले… खरं म्हणजे ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीनंतर अमोल कीर्तीकर एका मताने आघाडीवर होते… पण बॅलेट पेपरवरची मतमोजणी झाल्यावर रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं…. हा गेला बाजार घटनाक्रम सगळ्यांच्या कानावर कित्येकदा पडला असेल… पण यात एका गोष्टीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही ते म्हणजे वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवर…वंचितच्या परमेश्वर रणशूर यांनी इथून तब्बल दहा हजाराच्या आसपास मतं घेतली.. ही सर्व मतं हिंदुत्ववादी मतांच्या विरोधातील असल्याने ती अर्थातच अमोल कीर्तीकरांच्या पारड्यातील होती…त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मधून मशाल विझण्यात मशालीचा इथून मोठा वाटा राहिला…
वंचितमुळे भाजपचा विजय सोपा झाला अशी पुढची जागा म्हणजे अकोल्याची…अकोल्याची जागा चर्चेत राहिली ती प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे…स्वतः आंबेडकर वंचितचे उमेदवार असल्याने VBA ची एक सीट कन्फर्म समजली जात होती… पण इथली लढत तिरंगी झाली…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित कडून आंबेडकर… या अटीतटीच्या झालेल्या लढतीत वंचित आणि काँग्रेसने एकमेकांची मतं खाल्ल्यामुळे इथून भाजपाचा फायदा झाला…आणि निवडून येण्याची अगदीच कमी शक्यता असलेले अनुप धोत्रे निवडून आले…तसं पाहायला गेलं तर काँग्रेससाठी अगदीच सहज सोपी असणारी ही जागा वंचित फॅक्टरमुळे अनेक वर्ष भाजपच्या दावणीला बांधली गेलीय…
वंचितमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गेम झाला अशी पुढची जागा म्हणजे हातकणंगलेची…हातकणंगलेची लढत तशी चौरंगी झाली… पण मुख्य लढत होती ती शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित आबा सरुडकर… खरंतर प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत मशालच इथून निवडून येणार, यावर जणू शिक्कामोर्तब झाला होता… पण निकाल लागला आणि आश्चर्यकारकरित्या धैर्यशील माने इथून 13 हजार 426 मतांनी निवडून आले… इथेही महत्त्वाचा ठरला तो वंचित फॅक्टर…हातकणंगलेतून उभे राहिलेले वंचितचे उमेदवार डी. सी. पाटील 32 हजार 696 इतकी निर्णायक मतं घेतली… यामुळे शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला…यानंतरची सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिलेली आणि वंचितमुळे महायुतीच्या बाजूने झुकलेला मतदारसंघ तो अर्थात बुलढाण्याचा…बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर आणि वंचितकडून वसंतराव मगर मैदानात होते…या चौरंगी लढतीत 29 हजार 479 मतांनी प्रतापराव जाधवांचा आश्चर्यकारकरित्या विजय झाला…यामध्ये वंचितच्या वसंतराव मगर यांना 98 हजार 441 मते मिळाली…थोडक्यात नरेंद्र खेडेकर यांच्या विजयाच्या मार्जिनहून तिप्पट मतं ही वंचितच्या उमेदवाराला मिळाली…इथेच ठाकरेंच्या उमेदवाराची मशाल विझली…
याचा अर्थ असा की वंचित इफेक्ट संपलाय…असा जो सूर सोशल मीडियातून समोर येतोय त्यासाठी ही आकडेवारी नक्कीच डोळे उघडणारी ठरू शकते… ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेमुळे यंदा वंचितला अगदी थोडासा स्कोप मिळाला पण त्यातही अनेक महत्त्वाच्या आणि लीडिंग मतदारसंघात गेमचेंजरची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी पार पाडलीय…यामुळे कुणी कितीही नाकारलं…वंचितचा प्रभाव संपलाय…असे अर्थ काढले… तरी येणाऱ्या विधानसभेला वंचितला सिरियसलीच घ्यावं लागेल, एवढं निश्चित…बाकी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित चे किती आमदार निवडून येतील? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसारख्या चंदेरी दुनियेत घर खरेदी करणं जस सर्वसामान्य नागरिकाला परवडत नाही तसेच व्यव्यसायाला गाळा खरेदी करणंही काय सुखाचे नाही. म्हाडा (MHADA Mumbai) आणि सिडकोच्या माध्यमातून मुंबईकरांना स्वस्तात घरे खरेदी करता येतात, त्याचप्रमाणे आता मुंबईत जर तुम्ही गाळा खरेदी करणार असेल तर त्यासाठी म्हाडा पुढे सरसावली आहे. अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून ई लिलाव होणार आहे. येत्या २७ जूनला हा ई -लिलाव पार पडणार असून कमी पैशात गाळा खरेदी करण्याची हीच ती संधी आहे.
कोणत्या भागात किती गाळे – MHADA Mumbai
म्हाडाच्या मुंबई (MHADA Mumbai) गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA) अखत्यारीतील एकूण 173 अनिवासी गाळ्यांची विक्री केली जाणार आहे. यामध्ये न्यू हिंदी मील, माझगाव येथे २ , प्रतीक्षा नगर शिव 15, स्वदेशी मिल कुर्ला ५ , गव्हाणपाडा मुलुंड ८ , तुंगा पवई ३ , कोपरी – पवई ५ , मजासवाडी- जोगेश्वरी पूर्व १ , शास्त्रीनगर- गोरेगाव १ , बिंबिसार नगर – गोरेगाव पूर्व 17, चारकोप भूखंड क्रमांक एक 15, चारकोप भूखंड क्रमांक दोन 15, चारकोप भूखंड क्रमांक तीन ४ , जुने मागोठाणे बोरिवली पूर्व 12, महावीर नगर कांदिवली पश्चिम 12, मालवणी मालाड 57 असे गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे ?
27 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर 28 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता https://mhada.gov.in व www.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने (Team India) अगदी दिमाखात सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. भारताने आधी आयर्लंड, नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आणि त्यानंतर यजमान अमेरिकेचा पराभव केला, तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. आता सुपर ८ कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून भारताची खरी कसोटी इथेच पाहायला मिळेल. सुपर ८ मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील एका सोबत असेल. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला सुपर ८ मध्ये २ सामने जिंकणे तरी आवश्यक आहे.
कधी होणार सुपर-८ चे सामने
सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. हा सामना 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना २२ जून रोजी बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील एका संघाविरुद्ध होईल. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवण्यात येईल तर भारतीय संघाचा तिसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना 24 जुनला सेंट लुसिया येथे होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाचे सुपर ८ मधील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येतील त्यामुळे चाहते टीव्ही वर सुद्धा आरामात हे सर्व सामने पाहू शकतील.
ऑस्ट्रेलियाचा संघ तर मजबूत आहेच, अनेकदा भारतीय चाहत्यांचे मन ऑस्ट्रेलियामुळेच तुटलं आहे. परंतु भारतीय संघाला अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. कारण अफगाणिस्तानने साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभवाचा हादरा देत वर्ल्डकप मधूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सुपर ८ मध्ये आला तर भारताला त्यांच्यापासूनही सावध राहावं लागेल. एकूणच काय तर इथून पुढे रोहित सेनेला अतिशय चांगला खेळ दाखवत सेमी फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी अथक परिश्रम करावं लागेल.
भारताने साखळी फेरीतील सर्व सामने आरामात जिंकले असले तरी विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडिया साठी चिंतेचा विषय बनला आहे. कोहली या विश्वचषक स्पर्धेत रोहित सोबत सलामीला येत आहे. मात्र अपेक्षित धावा त्याच्या बॅट मधून निघाल्या नाहीत. पहिल्या तिन्ही सामन्यात कोहलीने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आयर्लंडविरुद्ध विराट कोहली 5 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा आणि अमेरिकेविरुद्ध तर त्याला खातं सुद्धा खोलता आलं नाही. म्हणजेच आतापर्यंत विराट कोहलीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यांत केवळ 5 धावा करता आल्या आहेत. विराट कोहलीच्या या सुमार फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. भारताने आत्तापर्यतचे सर्व सामने गोलंदाजांच्या जीवावरच जिंकले आहेत, त्यामुळे आता सुपर ८ मध्ये कोणत्याही परिस्थितीत कोहलीसह इतर भारतीय फलंदाजांना सुद्धा आपला दम दाखवावा लागणार आहे.
Viral Video | साप आपल्या निसर्गातील अत्यंत भयावह प्राणी मानला जातो. कारण सापाला सगळेच खूप घाबरतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सापाची दहशत नेहमीच कायम आहे. जगभरात या सापांच्या किमान 2 हजार प्रजाती तरी आहेत. यातील काही साप विषारी असतात तर काही साप बिनविषारी असतात. पण जर हाच विषारी साप मानवाला चावला तर त्यामुळे मानवाचा मृत्यू होतो. त्यामुळे सगळे लोक सापापासून दूर होतात. परंतु साप हे केवळ मानवावरच नाही, तर प्राण्यांवरही अनेकवेळा हल्ला करतात. असाच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या सापाने एका कुत्र्यावर हल्ला केलेला आहे.
व्हायरल झालेल्या (Viral Video) या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सापाने कुत्र्याला पकडून ठेवलेले आहे. आणि सापाच्या तावडीतून सुटका करण्याचा कुत्रा प्रयत्न करत आहे. त्या सापाने कुत्र्याला मानेपासून ते पोटापर्यंत पकडलेले आहे. कुत्रा त्या सापाच्या तावडीतून सुटण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. परंतु त्याचे प्रयत्न असफल होतात. कुत्र्याला संकटात पाहून त्या ठिकाणी एक व्यक्ती पोहोचतो आणि त्या सापाला न घाबरता तो त्या सापाला कुत्र्यापासून वेगळा करतो. आणि त्या कुत्र्याचे जीव वाचवतो. या व्यक्तीचे देखील सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ अगदी 19 सेकंदाचा आहे तरी हा व्हिडिओ आतापर्यंत 23 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलेला आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक देखील केलेला आहे. अनेक लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया करत आहे. अनेक लोक त्या व्यक्तीचे देखील कौतुक करत आहेत.
Mahavitaran Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत प्रादेशिक संचालक आणि कार्यकारी संचालक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुकाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 27 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सुरू करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | Mahavitaran Bharti 2024
पदाचे नाव – प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक
पदसंख्या – 2 जागा
वयोमर्यादा – 57 वर्ष
अर्ज शुल्क – 354 रुपये
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चौथा मजला प्रकाश गड वांद्रे पूर्व मुंबई 51
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024
अर्ज कसा करावा? | Mahavitaran Bharti 2024
या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस , अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आल्याने प्रवास सोप्पा आणि आरामदायी झाला आहे तर बुलेट ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, वंदे मेट्रो या रेल्वेगाड्यांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. 2029 पर्यंत देशात 250 वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) रुळावर धावणार असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेचं जाळं आणखी विस्तारणार असून देशवासीयांच्या प्रवास सोप्पा होणार आहे.
2 दोन महिन्यांत वंदे भारत स्लीपर ट्रेन येणार – Vande Bharat Sleeper Train
वंदे भारत स्लीपर क्लास ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) या स्व-चालित गाड्या आहेत ज्यामध्ये राजधानी एक्स्प्रेसपेक्षा चांगले फीचर्स मिळतात. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम बरेच पूर्ण झाले असून या ट्रेनचे फिनिशिंगचे काम सुरू आहे. येत्या २ दोन महिन्यांत वंदे भारतची पहिली स्लीपर ट्रेन रुळावर धावणार आहे. तर साल 2029 पर्यंत 250 ते 300 वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत असतील.
सरकारवर बोजा वाढला –
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी राष्ट्रीय वाहतूकदाराच्या कमकुवत आर्थिक स्थितीवर सुद्धा भाष्य केलं. तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे हे यामागील एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी म्हंटल. सामान्य परिस्थितीत, जर एखाद्या उत्पादनाची किंमत १०० रुपये असेल तर आम्ही ते १०५-११0 रुपयांना विकू. मात्र रेल्वे तिकिटांच्या बाबतीत सरकार 55 रुपये आपल्या खिशातून देत आहे. सरकारचा वार्षिक अनुदानाचा बोजा ५९,००० कोटी रुपये आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
रेल्वेमध्ये होत असलेल्या अभूतपूर्व कवच सिस्टीमबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेचे उपकरण म्हणून कवच सिस्टीमला पेटंट मिळाले आहे. ट्रेनमध्ये कवच सिस्टीम बसवली जात आहे. गाड्यांमध्ये कवच प्रणाली बसवण्यापूर्वी, ट्रॅक आणि स्थानकांवर डेटा सेंटर डेव्हलप केले जात आहेत. कवच प्रणाली 6,000 किमीच्या मार्गावर इंस्टाल केली जात असून या सिस्टीम मुळे रेल्वे सध्यापेक्षा जास्त गाड्या रुळांवर चालवू शकेल.
हॅलो महाराष्ट्र | आपल्या सवयी या आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. आपल्या सवयी चांगल्या असतील, तर आपल्या आरोग्य देखील चांगले राहते. परंतु आपल्याला वाईट सवयी असतील, तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. तुम्ही जर या सवयींकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आता या सवयी कोणत्या आहेत? ते आज आपण जाणून घेणार आहोत
मोबाईल लॅपटॉप या उपकरणांचा अतिवापर
मोबाईल आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांचा जर आपण जास्त प्रमाणात वापर केला, तर आपल्या डोळ्यांना समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे डोकेदुखी, तणाव देखील निर्माण होतो. त्याचप्रमाणे झोप न येण्याची समस्या देखील निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती देखील कमवत होते. त्यामुळे या उपकरणांचा मर्यादित वापर करावा.
मद्यपान करणे
तुम्ही जर जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे तुम्हाला पोट आणि यकृता संबंधीत समस्या निर्माण होतात. त्यामुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. तसेच धूम्रपणामुळे आपले रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. तसेच श्वसनाचा देखील त्रास निर्माण होते.
झोपेचा अभाव
दिवसभर थकव्यानंतर आपल्याला रात्री झोपावे लागते. त्यानंतर आपले शरीर रीफ्रेश होते. परंतु तुम्ही जर तुमची झोप पूर्ण घेतली नाही, तर तुमची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांना देखील आपण आमंत्रण देत असतो. त्यामुळे या सगळ्या सवयी आपण वेळीच बंद करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्यावर याचा खूप परिणाम होऊ शकतो.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले.. यात साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता… त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ.. खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या…त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते…पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे…बहुजन, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख… त्यांचं राजकारण टिकलं आणि वाढलं ते देखील याच पुरोगामी विचारामुळे…त्यामुळे भुजबळ अजित दादांसोबत जाऊन हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा शॉक कार्यकर्त्यांना बसणारच…बंड झाल्यानंतर सुरुवातीला भुजबळांनी सर्वात फ्रंटला येऊन अजित दादांची कढ घेऊन शरद पवारांना चांगलं सुनावलं…शरद पवारांना अंगावर घेण्याची धमक त्यांनी दाखवली…पण काळ पुढे गेला…लोकसभेच्या निवडणुका आल्या…गेल्या…मधल्या काळात बराच ड्रामाही झाला…पण या सगळ्या प्रोसेसमध्ये भुजबळ शांत झाले होते…
महायुती आणि अजितदादा अडचणीत येतील असे अनेक स्टेटमेंटही त्यांनी केले…लोकसभेच्या उमेदवारीवरून आणि आता तर राज्यसभेवरूनही त्यांची पक्षावरची नाराजी लपून राहिली नाही…त्यामुळे अजितदादा गटात सेफ राहून भुजबळांना आता ओढ मात्र साहेबांची लागलीये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे…बाकीच्यांनी परतीचे दोर कापले असताना भुजबळ दोन्ही गटात बॅलन्स ठेवून कसे आहेत? सत्तेतल्या युतीपेक्षा त्यांना शरद पवारांचा नवानवखा पक्ष आपलासा का वाटतोय? छगन भुजबळ दादांचा हात सोडून साहेबांची तुतारी हातात कधी घेतील? भुजबळ हा एक नेता जाण्यानं अजितदादांना किती मोठा लॉस सहन करावा लागेल? याचंच केलेलं हे सविस्तर विश्लेषण…
भुजबळांना साहेबांची ओढ लागलीय असं म्हणायला पहिलं कारण ठरतं ते म्हणजे मान, अपमान आणि नाराजीनाट्य … जी सांगितलं होतं…पण सगळी तयारी करूनही लवकर तिकीट जाहीर झालं नाही… यामुळे आपला अपमान झाल्याचं सांगत भुजबळ स्वतः लोकसभेतून बाहेर पडले…मात्र त्याच वेळेस आपल्याला राज्यसभेचा शब्द देण्यात आला होता…मात्र असं असूनही जेव्हा ती वेळ आली तेव्हा सुनेत्रा पवार यांना राज्यसभा जाहीर झाली…आपल्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याला इतकं हलक्यात घेतल्यामुळे सेल्फ इमेजला हा मोठा धक्का असल्याचं स्वतः भुजबळांनी बोलून दाखवलय..
यासोबत पक्षात आपण जेष्ठ असतानाही अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांच्याच शब्दाला जास्त महत्व दिलं जातं… हा पक्ष फक्त तिघांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का? असा नाराजीचा सुर भुजबळ खासगीत बोलून दाखवत असतात… थोडक्यात भुजबळ नाराज आहेत…त्यांच्या राजकारणाला कळत नकळत म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा.. पण नख लावण्याचा प्रकार अजितदादा गटाकडून होतोय, असं बोललं जातंय… यापेक्षा शरद पवार गटात नेतृत्वाची कमी आहे…पहिल्या फळीतील अनुभवी नेतेही अजित दादांसोबत आल्याने ही पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा विचार असू शकतो…अशा वेळेस छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार यासाठी होऊ शकतो…
भुजबळांना साहेबांची ओढ लागलीय असं म्हणायला दुसरं कारण ठरतं तर म्हणजे भूमिका आणि विचारसरणी
पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात भुजबळांनी अजित दादांची बाजू घेत शरद पवारांच्या विरोधात रान उठवलं होतं… मात्र काळ पुढे सरकत गेला तसे भुजबळ शांत होत गेले…त्यांनी शरद पवार गटावर वैयक्तिक टीका करणं टाळलं…पक्षाच्याही महत्त्वाच्या निर्णयात ते कधीच कॅमेरा दिसले नाही…याउलट शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे…शरद पवारांकडून मी कणखरपणा शिकलोय… यांसारखे स्टेटमेंट करून ते पक्षविरोधी भूमिका घ्यायला लागले… यातून त्यांना शरद पवार गटाची ओढ लागलीये…असं बोललं जाऊ लागलं…
यातलाच पुढचा मुद्दा येतो तो विचारसरणीचा… भुजबळांनी मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींचा मुद्दा तापवला… पण यामुळे राजकारणाच्या ऐन धामधुमीत जातीय विष पसरून मराठा समाज भुजबळांवर नाराज झाला…ओबीसींना खुश करण्याच्या नादात त्यांनी मराठ्यांचा राग ओढवून घेतला… याचा महायुतीला निकालात मोठा फटका बसल्याचंही बोललं गेलं…मराठा समाज आपल्यापासून दूर गेल्याची खंतही त्यांनी याआधीच बोलून दाखवलीय…त्यात भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्याने हिंदुत्वाचा लागणारा टॅग यामुळे भुजबळांची पुरोगामी पॉलिटिकल इमेज धोक्यात आलेली दिसतेय…त्यामुळे वेळीच सावरून शरद पवारांसोबत गेलो… तर आपल्याला राजकारण करायला बराच स्कोप मिळेल, असा भुजबळांचा थॉट असल्यामुळे ते शरद पवार गटात जाण्यासाठीची एक खिडकी अजूनही उघडी ठेवून आहेत…
मराठ्यांचा असणारा राग पाहता भुजबळ विधानसभा लढवू इच्छित नाहीत…त्यापेक्षा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न चालूय…महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा दिल्लीतल्या राजकारणात सध्या सेफ बेटिंग खेळता येईल, असा कदाचित त्यांचा विचार आहे…त्यात आपण राज्यसभेवर गेलो तर समीर भुजबळ यांना आमदारकी सोडून मुंबईच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून देण्याचा विचारही भुजबळ करत असतील…पण महायुतीत झालेली भाऊ गर्दी आणि त्यात पक्षातील वरिष्ठांकडून आपल्याला सिरियसली न घेण…हे भुजबळांच्या राजकारणाला नख लावू शकतं… त्यात आपली जुनी पुरोगामी विचाराची लाईन पुढे घेऊन जायची असेल तर सध्याच्या घडीला भुजबळांकडे शरद पवारांशिवाय दुसरा कोणता चांगला पर्याय नाही…त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून सेफ गेम खेळणारे भुजबळ लवकरच शरद पवारांसोबत जातील, असं म्हणायला बराच स्कोप आहे… बाकी त्याची तारीख, वेळ आणि मुहूर्त काय असेल? हे आत्ताच सांगता येण तसं अवघड आहे…बाकी भुजबळांचं राजकारण कुठल्या राष्ट्रवादीसोबत असल्यावर जिवंत राहील असं तुम्हाला वाटतं? शरद पवार की अजित पवार? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.