Thursday, December 11, 2025
Home Blog Page 6703

महापरीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या नगरपरिषद कर निर्धारण मुख्य परीक्षेत हलगर्जीपणा

मुंबई | इंद्रजीत यादव

अपुऱ्या तांत्रिक सुविधा, परीक्षाकेंद्रावरील प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि उद्धट वर्तन यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या परीक्षेत त्रास सहन करावा लागला. मुंबईतील मीरारोड परिसरातील मॅक आऊटसोर्सिंग रोडजवळ असलेल्या परीक्षा केंद्रात सदर प्रकार घडून आला आहे. महापालिकेच्या नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. वेळेनुसार १२.३० ला सुरु होणारी परिक्षा केंद्राच्या हलगर्जीपणामुळे १ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झाली. विद्यार्थ्यांनी याबाबत केंद्रातील प्रशासकांशी बोलणं केलं असता, “तुम्ही विद्यार्थी आहात, त्याप्रमाणेच वागा. उगीच दंगा कराल तर सरकारी नोकरीला मुकाल” अशी धमकी देण्यात आली. मागे थेट भरतीद्वारे या पदांवर जागा भरल्या जात होत्या. यंदाच्या वर्षीपासून मात्र महापालिकेतील काही पदांसाठी परीक्षा निश्चित करण्यात आली होती. २ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी ही परीक्षा नंतर १९ सप्टेंबरला घेण्यात आली. तरीही हा हलगर्जीपणा सुरुच राहिला. याव्यतिरिक्त नागपूर केंद्रातील १९ तारखेची परीक्षा रद्द करुन ती २१ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

इतर महत्वाचे  –

तर मग UPSC /MPSC करू नका ???

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

या परिक्षेत विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून, त्यांना योग्य सोयीसुविधा देण्यापर्यंत अनेकदा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या परिक्षेचा बोजवारा उडल्याचं दिसून आलं आहे. तांत्रिकदृष्ट्या अनेक अडचणी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागल्या आहेत. सर्व्हर उपलब्ध नसणे, प्रश्नांची उत्तरे देऊनसुद्धा स्वीकारली न जाणे, संगणक मध्येच बंद होणे अशा त्रासदायक घटना यानिमित्ताने समोर आल्या आहेत. तक्रार कुणाकडे करावी? या द्विधा मनस्थितीत परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी तब्बल २ तास घुटमळत होते. ग्रामीण तसेच शहरी भागातून कष्टपूर्वक या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात पोहचलेल्या परीक्षार्थींना या ढिसाळ कारभाराचा फटका बसला असून या परिस्थितीत संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, महापरीक्षा, आपले सरकार व प्रधानमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर महत्वाचे  –

स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १

UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा | #भाग २

विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

unnamed
unnamed

मुंबई | बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि २१ सप्टेंबर रोजी त्याचे आगमन राज्यात होण्याचे संकेत आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोंकणात देखील या दरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील. परंतु दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. या पावसामुळे राज्यातील तापमान तात्पुरते कमी होतील परंतु आगामी आठवड्यापासून तापमानात परत वाढ होईल आणि उष्णता जाणवेल. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

Vishwas Nangre Patil
Vishwas Nangre Patil

सातारा | कोल्हापूर विभागाचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या युपीएससी च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. इतकंच नव्हे तर गणपती ज्याला अपत्या पाहीजे त्याला अपत्य देतो असे म्हणुन वाद ओढवून घेतला आहे. गणेश मंडळांच्या कर्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.

‘डीजे, डोल्बी लावण्याएवजी भावगीतं लावा, भक्तीगीतं लावा. तसं केलं तर गणपती बाप्पा प्रसन्न होईल. माझी खात्री आहे की गणपती बाप्पा प्रसन्न होतो. मी स्वत: उदाहरण आहे. कारण मी गणपतीच्या पुस्तकातून शिकून आलोय. मी एवढा अंधश्रद्धाळू आहे की माझी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्ह आणि माझी कुठल्या राज्यात पोस्टींग होणार याचे सगळे फोन सिद्धिविनायक मंदिरातूनच गेले असल्यावर माझा विश्वास आहे. मी गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे’ असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.

‘ज्या गणपती बाप्पाच्या पुजनाने प्रत्तेक कार्याची सुरवात होते, जो विद्यार्थ्याला विद्या देतो, धन पाहीजे त्याला धन देतो, अपत्य पाहीजे त्याला अपत्य देतो, मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. पोलीसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही’ असे म्हणुन नांगरे पाटील यांनी नागरिकांना पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

न्यायालयाचे निर्देश आपल्या भल्यासाठी आहेत. लोकांच्या कल्याणासाठी आहेत.’मी असं म्हणत नाही टाळ आणि चाळ ही आपली संस्कृती आहे. मला मान्य आहे की नाचलं पाहीजे, गायलं पाहिजे, धिंगाना केला पाहिजे, मस्ती केली पाहिजे. पण ती पाॅसिटीव्ह असली पाहिजे, रचनात्मक असली पाहिजे’ असे म्हणुम पाटील यांनी नागरिकांना गणेशोत्सव काळात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दंगा करायचा तर तो भगतसिंग, राजगुरु, सुखदेव सारखा करा असं पाटील यांनी म्हटले आहे.

https://youtu.be/OBPjMvn9_u4

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा

शेतकरी संघटना सोलापूर
शेतकरी संघटना सोलापूर

सोलापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेे ऊसाची थकीत एफआरपी रक्कम व्याजासकट त्वरीत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढला. परंतू मोर्चाला पोलीस परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलीसांनी मोर्चेकरांना सात रस्ता परिसरात ताब्यात घेतले होते.

ताब्यात घेतलेल्या मोर्चेकर्यांना सोलापूर पोलीसांनी रेस्ट हाऊस येथे ठेवले. दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आंदोलकांशी फोनवरुन संपर्क साधुन पुढील चार दिवसात बील देण्याचे आश्वासन दिले. तसेच थकीत एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यास गाळप परवाने रोकण्याचा शब्द दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल, सिद्राम अब्दुलपूरकर, संघटक विजय रणदिवे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, पप्पू पाटील, इकबाल मुजावर, नवनाथ माने, किसान सभेचे शिवानंद झळके, सचिव उमाशंकर पाटील आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर!

NCP Spoksperson
NCP Spoksperson

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची ३१ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या ३१ जणांच्या प्रदेश प्रवक्ता यादीमध्ये ८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या प्रवक्ता यादीमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून नवाब मलिक आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण, संजय खोडके यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

या यादीमध्ये जिल्हानिहाय प्रदेश प्रवक्ते जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई – आमदार विदया चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, क्लाईड क्रास्टो, अदिती नलावडे, महेश चव्हाण, डॉ.समीर दलवाई, पुणे – म्हणून अंकुश काकडे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, विजय कोलते, भूषण राऊत, ठाणे — आनंद परांजपे, महेश तपासे, औरंगाबाद – सुरजितसिंग खुंगर, निलेश राऊत, उमर फारुकी, अकोला – डॉ.आशाताई मिरगे, नाशिक- विश्वास ठाकूर, डॉ.भारती पवार, बीड – श्रीमती उषाताई दराडे, अमरसिंह पंडीत, उस्मानाबाद – कुमारी सक्षणा सलगर, सोलापूर – उमेश पाटील, नागपूर – प्रविण कुंटे-पाटील आदी तर प्रवक्ता समन्वयक म्हणून सुरज चव्हाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

तसेच पक्षातर्फे दोन लोकसभा जिल्हाध्यक्ष तर तीन कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या सन २०१८-२०२० पक्षांतर्गत निवडणूका पार पडल्या असून यामधील दोन लोकसभा जिल्हाध्यक्ष आणि तीन कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सर्व नवनिर्वाचित प्रवक्त्यांचे, जिल्हाध्यक्षांचे आणि कार्याध्यक्षांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

सेल्फीच्या नादात दोघांचा बुडून मृत्यू

Selfi Deaths
Selfi Deaths

यवतमाळ | सतिश शिंदे

झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदी पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, झरी जामनी तालुक्यामधील राजूर (गो) या ठिकाणी मोहरमनिमित्त आदिलाबाद येथून ५ युवक आले होते. दरम्यान बुधवारी ते पैनगंगेच्या पाण्यामध्ये स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढत होते. नदीच्या मध्यभागामध्ये जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल गेला आणि नाव उलटून हे युवक पाण्यात बुडाले. मोहरमसाठी हे पाचही जण या झरी जामनी तालुक्यामधील राजूर ( गो ) या ठिकाणी आले असताना ही दुर्देवी घटना घडली.

या अपघातामधे शेख अर्षद वय (१४), शेख सुफीर सिराज वय (१६) या दोघांचा पाण्यात असतानाच मृत्यू झाला. सय्यद उमेद वय (१८) हा गंभीर आहे. या पाच युवकांपैकी दोन युवकांनी पोहत जावून किनारा गाठल्यामुळे ते या घटनेतून बचावले आहेत.

पेट्रोल -डिझलचे दर कमी करण्यासाठी दारूच्या किमती वाढणार?

Petrol Disel Hike
Petrol Disel Hike

मुंबई | वाढत्या इंधन दरवाढीमूळे सामान्य नागरिक हतबल झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीगाठतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनतेत इंधन दरवाढी विरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परिणामी पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पेट्रोल -डिझलचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकार दारूच्या किमती महाग करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. देशी बनावटीच्या विदेशी दारूवरील (व्हिस्की, रम, जीन इ.) एक्साईज ड्युटी वाढवण्याचा प्रस्ताव शासनासमोर आला आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

२०१३ पासून देशी बनावटीच्या विदेशी दारूवरील एक्साईज डय़ुटीत कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही याकडे एक्साईजच्या या अधिकाऱ्याने लक्ष वेधले. महाराष्ट्रात या दारूची बेफाम विक्री होते हे लक्षात घेऊनच सरकार अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकते. परिणामी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करता येईल आणि ते स्वस्त होईल, असा सरकारचा विचार आहे. २०१७ मध्ये देशी दारूवरील तर २०१५ मध्ये मिलिट्री कॅण्टीनमध्ये मिळणाऱया दारूवरील एक्साईज ड्युटी वाढविण्यात आली होती.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) खात्याच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हिस्की-रमसाख्या दारूवरील कर २०१३ पासून वाढलेला नाही हे कबूल केले; पण असा करवाढीचा प्रस्ताव माझ्यापर्यंत तरी आलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

देवी रडल्याचा चमत्कार, महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश…!

Ganesh Festival
Ganesh Festival

जालना | शहाजी भोसले

सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गौरी गणपतीच्या या सणादरम्यान जालना जिल्ह्यात अजब प्रकार घडला आहे. भोकरदन येथे चक्क देवी रडल्याचा चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र महाराष्ट्र अंनिस च्या कार्यकर्त्यांनी देवी रडण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल अाहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. देवीची स्थापना केल्यानंतर देवीच्या मूर्ती रडत असल्याचे शेजारील काही व्यक्तींनी वाघमारे यांच्या लक्षात आणुन दिले. त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांनाही देवीच्या मूर्ती रडत असल्याचा चमत्काराबाबत सांगितले. या चमत्काराची बातमी बघता बघता भोकरदन व पंचक्रोशीत वार्‍यासारखी पसरली. भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेक जण मूर्तीं समोर पैसे टाकू लागले. त्यामुळे या मूर्ती एका महाराजाच्या सांगण्यावरुन विसर्जित करायच्या नाहीत असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांना काल मंगळवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी एका पत्रकाराने फोन करून कळवले. त्यावेळी शहाजी भोसले हे खुलताबाद येथील दर्ग्यातील मौलानाची तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना भेटण्यास गेले असल्याने भोकरदन येथे जाऊन याबाबतचा तपास करणे शक्य नव्हते. म्हणून भोसले यांनी महाराष्ट्र अंनिसच्या भोकरदन शाखेचे राजेंद्र दारुंटे यांच्याशी संपर्क केला. त्यांना मूर्ती रडल्याचा चमत्कार कसा असू शकतो. त्यामागील विज्ञान काय असू शकते. तसेच शहनिशा कशी करावी याबाबतची पूर्ण कल्पना दिली व तेथे जाऊन त्या चमत्काराचा छडा लावण्यासाठी सांगितले. राजेंद्र दारुंटे यांनी आपल्या सोबत महाराष्ट्र अंनिस चेकमलाकर इंगळे व त्र्यंबक पाबळे या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाघमारे यांचे निवासस्थान गाठले. तेथील प्रकरणाची पाहणी केली. कायदा व सुव्यवस्था याचे भान ठेवून तपास केला. योग्य ती शहनिशा केल्यावर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

“देवीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवलेल्या होत्या. त्या मूर्तीचे डोळे हुभेहुब मानवी डोळ्यांसारखे होते. डोळ्यांना चकाकी येण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला असल्याने मूर्तींचे डोळे पाणीदार वाटत होते. त्या मूर्तींवर मर्क्युरी लाईटचा फोकस पडल्यानंतर डोळे चमकू लागले असल्याने देवीच्या मूर्तींच्या डोळ्यांची चमक डोळ्यात पानी (अश्रु) असल्याच अभास निर्माण करत होते. त्यामुळे मूर्ती रडत आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती. खरं तर डोळ्यातून पाणी निघत नव्हते.”

सदरील प्रकाराची सत्यता महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वाघमारे यांच्या लक्षात आणून दिली. अंधश्रद्धा पसरवून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा ठरू शकतो व त्यामुळे आपल्यावर काही कायदेशीर कार्यवाही होऊ शकते अशी समज वाघमारे यांना दिली. वाघमारे यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे पटले व त्यांनी काल दिनांक १८ सप्टेंबर रोजी रात्री देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील होणारा अनर्थ टळला हे मात्र तेवढेच खरे आहे.

लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आरक्षण
आरक्षण

मुंबई | सुनिल शेवरे

लिंगायत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून समाजाच्या आरक्षणासह सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, इतर मागासवर्ग प्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, कृती समितीचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. व्ही.एस. हुडगे, सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, सरला पाटील, काका कोयटे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,संविधानाच्या अंतर्गत लिंगायत समाजाच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेतले जातील. मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक होण्यासाठी त्वरित पावले उचलली जातील. आरक्षणाच्या मागण्यांबाबत मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राला अहवाल पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले.

 

महाराष्ट्रातील लातूर आणि  हिंगोली जिल्ह्यातील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान

Latur ZP School
Latur ZP School

लातूर | सतिश शिंदे

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ शाळा स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या देशातील ५२ शाळांमध्ये राज्यातील दोन शाळांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील तीन शाळांना स्वच्छ विद्यालय या राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यामध्ये लातूर जिल्ह्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी देशातील एकूण ५२ शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शाळांपैकी ३७ शाळा या ग्रामीण भागातील तर १५ शाळा शहरी भागातील आहेत. ५२ शाळांपैकी ४५ शाळा या शासकीय व शासकीय अनुदान प्राप्त आहेत. ७ शाळा या खाजगी स्वरूपात आहेत. ज्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते त्याचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे होते, प्रमाणपत्र, ५० हजार रूपये रोख असे आहे. ५० हजार रूपये या शाळांच्या खात्यामध्ये डिजीटल सेवेंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्रामधील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या लातूर या जिल्ह्यातील दोन शाळा तसेच निलंगा तालुक्यातील जाऊ येथील मुलींची शासकीय निवासी शाळा, रेणापूर तालुक्यातील बाऊची येथील मुलींची शासकीय निवासी शाळा या सर्व शाळांनी स्वच्छतेचे सर्व निकष पूर्ण केल्याबद्दल विशेष पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय मुख्यम व सर्व विद्यार्थ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. सामाजिक न्याय विभाग आयुक्त व बाऊची शाळेचे मुख्याध्यापक श्री. जमादार व विद्यार्थी यांनी पुरस्कार स्विकारला. लातूर जिल्ह्यातील दोन शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार दिल्यामुळे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, सामाजिक कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. अरवत यांनी हा पुरस्कार स्विकारला. देशातील केवळ ९ जिल्ह्यांना हा विशेष पुरस्कार मिळालेला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील गोटीवाडी येथील पोस्ट बेसिक आश्रम शाळेला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. विशाल रोठोड, मुख्याध्यापक साहेबराव आवचर व विद्यार्थी यांनी हा पुरस्कार स्विकारला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रिय पाणी पुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, केंद्रिय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव रिना रे सहसचिव मनिष गर्ग, सीबीएससीच्या अध्यक्षा अनिता करवाल यावेळी उपस्थित होते.