Friday, December 12, 2025
Home Blog Page 6702

लिव्ह इन पार्टनरने पाॅर्न साईटवर अपलोड केला विवाहीत महिलेचा व्हिडीओ

Sex Tap Uploaded on Pornsite
Sex Tap Uploaded on Pornsite

पुणे | लिव्ह इन पार्टनरने विवाहीत महिलेसोबतचा प्रणयाचा व्हिडीओ पाॅर्न साईटवर अपलाॅड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे घडला आहे. यासंबंधी पुण्यात राहणाऱ्या विवाहित महिलेने माजी लिव्ह-इन पार्टनर विरोधात समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी लिव्ह इन पार्टनर यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी मुळचा गोव्याचा असून तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला असता त्याची तक्रारदार महिलेसोबत ओळख झाली होती. तक्रारदार महिला आणि आरोपी चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघे रास्ता पेठ भागात एका फ्लॅटमध्ये रहायचे. दरम्यान दोघांमध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध होते. एकत्र रहात असताना त्याने मोबाइल फोन वापरुन दोघांच्या लैंगिक संबंधांची क्लिप बनवली होती. काही महिन्यांपूर्वी या महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केले. त्यावेळी हा लिव्ह इन पार्टनर पुन्हा गोव्याला निघून गेला. त्याने काही दिवसांपूर्वी दोघांचा प्रणयाचा जुना व्हिडिओ सोशल मीडिया आणि पॉर्न साईटवर अपलोड केला. सदरील प्रकाराची माहिती महिलेला नातलगांकडून कळाली. तेव्हा तिने तडक समर्थ नगर पोलीस स्टेशन गाठून लिव्ह इन पार्टनर विरोधात तक्रार दाखल केली.

काही काळापूर्वी आरोपीने गोव्यामधून पॉर्न साईट आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आरोपीने महिलेचे बनावट अकाऊंट बनवले असल्याचेही पोलीसांनी म्हटले आहे. समर्थनगर पोलीस स्टेशन मधे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महिलेच्या हस्ते ‘ श्रीं ‘ ची आरती

Ganesh Utsav
Ganesh Utsav

पुणे | सुनिल शेवरे

गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविणाऱ्या अष्टविनायक मंडळाने श्रीं च्या आरतीचा मान महिलेला देऊन सामाजिक समानतेचा आदर्श घडवला. आंबेगाव पठार इथे असलेल्या या मंडळाने गणेशोत्सव काळातच नव्हे तर इतर सणांतही सामाजिक उपक्रम राबविले आहेत. केरळ च्या आपत्तीग्रस्त नागरिकांना धान्याची जीवनावश्यक वस्तुंची मदत केली.

पुणे महापालिकेच्या अनेक स्पर्धांच्या पारितोषिकांचे मानकरी अष्टविनायक मंडळ ठरले आहे. ‘श्रीं ‘ च्या आरतीवेळी जयश्री पवार, सुनिता रेणुसे, राधा काशिद, आशा दीक्षित, संजोनीं काप उपस्थित होते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार

क्रिडा पुरस्काराचे मानकरी
क्रिडा पुरस्काराचे मानकरी

नवी दिल्ली | क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार तर रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली. मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ६ श्रेणींमध्ये ३५ खेळाडू व प्रशिक्षक आणि ३ संस्थाना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे..

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

Sharad Pawar and Adv Prakash Pawar
Sharad Pawar and Adv Prakash Pawar

मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार भारत सिंह यांच्या तैलचित्रांच्या प्रदर्शनाला आज पवार यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पवार यांनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

संभाजी भिडेंची पिलावळ ‘राष्ट्रवादी’ मध्ये अधिक आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भिडेंची बाजू घेतात. मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसे जाणार?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. शरद पवार यांनी आज त्याला प्रत्युत्तर देत आंबेडकर यांच्यावर निशान साधला.

अकोला जिल्ह्यात दोन वेळा आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली होती, असा खुलासा पवार यांनी यावेळी केला. तसेच अकोला येथे त्यांच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो तर माझे कार्यकर्ते प्रचाराला उभे होते. मग ते धर्मनिरपेक्ष नव्हते का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर मंदिराशेजारीच बलात्कार

कामगार मुलीवर बलात्कार
कामगार मुलीवर बलात्कार

पिंपरी | सतिश शिंदे

हिंजवडीमध्ये अमानुष कृरतेचा कळस करत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऊसतोड कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला असून त्यामधील एका मुलीचा बुधवारी मृत्यू झाला. पोलिसांनी गणेश निकम यासह अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. रविवारच्या या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी सध्या हिंजवडी परिसरात पाल टाकून राहत असून, त्याशेजारीच आरोपी राहत होते. सहावीच्या इयत्तेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या या दोन मुली मंदिरापाशी गेल्या. आरोपींनी त्यांना खाऊचे आमिष दाखवले आणि झुडुपामध्ये नेले. त्या ठिकाणी गणेशने दोघींवर, तर त्याच्या साथीदाराने एकीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी एका मुलीच्या पोटात दुखू लागले म्हणून तिला औंधच्या सर्वोपचार रुग्णालयात नेले असता तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती. नंतर ती मुलगी मरण पावली. पोलिसांनी दुसऱ्या मुलीची भेट घेतल्यानंतर हे प्रकरण उघड झालेले आहे.

आरोपींवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केले आहे. आरोपी गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आंचलगाव येथील रहिवासी आहे. न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा
साथीदार अल्पवयीन आहे. सामूहिक बलात्काराच्या या घटनेचे तीव्र पडसाद परिसरामध्ये उमटले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सांगलीत सर्पदंशामुळे चिमुकल्याचा मृत्यू

Sangli News
Sangli News

सांगली | सर्पदंशामुळे सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना सांगली येथे घडली. परिसरात स्वच्छता केली जात नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप चिमुकल्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

सांगलीतील विश्रामबाग येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून वसाहतीतील केदार चव्हाण (वय ७ वर्षे) या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. वसाहतीत स्वच्छता केली जात नसल्याने परिसरातील सापांचा वावर वाढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून वरूण-अनुष्काची निवड

Anushka Sharma and Varun Dhavan
Anushka Sharma and Varun Dhavan

मुंबई | भारतीयांच्या कलेसंदर्भात स्किल इंडियाच्या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. देशात कलेला समोर नेण्यासाठी तसेच कलाकारांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी याकरिता मोहिमेच्या माध्यमातून प्रसार करण्याची जबाबदारी या दोन्ही कलाकारांवर सोपवण्यात आली आहे.

‘सुईधागा’ चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कामगार अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात हे दाखविण्यात आले आहे. त्यांच्या या कामामुळे देशातील कारागीर व कामगारांना प्रोत्साहन मिळाले असून त्यामुळेच स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून अनुष्का आणि वरुण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी सुईधागा-मेड इन इंडिया या खास चित्रपटाद्वारे आपल्या देशातील कारागीर आणि कलाकारांची शैली सर्वासमोर आणली आहे. त्यामुळे त्यांची निवड करण्यात स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर म्हणून करण्यात आल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले.

धक्कदायक ! नगरसेविकेच्या पतीचा स्वतःच्याच मुलीवर बलात्कार

Kolhapur Rape Case
Kolhapur Rape Case

कोल्हापूर | नगरसेविकेच्या पतीने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कदायक बाब समोर आली आहे. नगरसेविकेचा पती गेल्या ३ वर्षांपासून स्वतःच्याच १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे कोल्हापूर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपी वडीलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील नगरसेविकेचा आरोपी पती मोठा उद्याजक आहे. सुरुवातीला घरात कोणी नसताना आरोपी वडील आपल्या दहा वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून बलात्कार करायचा. मात्र, काही काळानंतर त्याचे धाडस वाढले आणि त्याने पत्नीच्या समोरच मुलीसोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. मात्र, या सर्व प्रकाराला कंटाळून नगरसेविकाने इचलकरंजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

गिर राष्ट्रीय उद्यानात ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू

Gir National Park Lion Died
Gir National Park Lion Died

गांधीनगर | आशियायी सिंहाचे घर समजल्या जाणार्या गिर राष्ट्रीय उद्यानात ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आधीच चिंताजनक परिस्तिती असणार्या आशियायी सिंहांचा एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमींकधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत सिंहांमधे ३ मादी, २ नर तर ६ बछड्यांचा समावेश आहे. यासंबंधी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले असून वनखाते सिंहाच्या मृत्यूचे नेमके कारण काय याचा शोध घेत आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे बहुतेक सिंहांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. जुनागढ पशुवैद्यकीय रुग्णालयातून अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे पशुवैद्यकीय अधिकारी एच. वामजा यांनी सांगितले आहे. तसेच, इतर सिंहांना संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अाशियायी सिंह ही धोक्यात असलेली वन्यजीव प्रजाती असून गिर राष्ट्रीय उद्यान हे त्यांचे अखेरचे निवासस्थान असल्याचे बोलले जाते. २०१५ साली करण्यात आलेल्या वन्यजीव गणणेनुसार गिरच्या जंगलात एकुण ५२३ सिंह अाहेत.

जोडीदार निवडताय, मग घाबरु नका – आमच्यासोबत या, आणि समजून घ्या कशी करायची जोडीदाराची विवेकी निवड

विवेकी निवड
विवेकी निवड

लव्हगुरु | सध्याची तरूण पिढी आपल्या पार्टनर निवडीबाबत फार प्रो आहे. पटकन अापला आपणच पार्टनर निवडतात. मग त्यांच्या घरच्यांना समजतं. किंवा स्वतःहूनच सांगतात. मग तिथपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास. काहींचे पालक पटकन अॅग्री होतात (हे प्रमाण अल्प आहे). तर ‘माझ्या लग्नाचा निर्णय मीच घेणार’ हे समजावण्यासाठी काहींना पालकांसोबत झगडावं लागतं. मग अॅग्री होतात. तरी नंतर खटके उडणे वगैरे आलंच. काहींच्या घरचे इतके कर्मठ असतात की जोडप्याला टोकाचे निर्णय घ्यावे लागतात. किंवा काहींना घरच्यांना दुखवायचं नसतं, म्हणून घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या मनाविरूद्ध वागावं लागतं. ही तडजोड अशक्य वेदनादायी असते.

काही दिवसांपूर्वी तेलंगणामधल्या दुर्दैवी घटनेनं संवेदनशील मनांना हादरवून सोडलं. अमृता-प्रणय.
अमृताने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. प्रणय वेगळ्या जातीचा होता. कर्मठ पालकांना ते मान्य नव्हतं. पालक इतक्या खालच्या पातळीला उतरले की, स्वतःच्या सख्ख्या मुलीच्या प्रेमाला संपवून टाकलं. ह्यांसारख्या दुर्दैवी घटना रेअर असल्या तरी याची दहशत मुलामुलींच्या मनात बसून जाते. मला सगळ्याच पालकांना अमृताच्या पालकांसारख्यांच्या पंगतीत बसवायचं नाही. तसे कोणी नसतातच. पण काही कर्मठ पालक असतात. तो कर्मठपणा जातीय, धार्मिक, वर्गीय अहगंडातून आलेला असतो किंवा अाणखी कशातून. पालक लोक समाजातली पत, लोक काय म्हणतील वगैरे बुरसट विचार करून अापल्या मुलामुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याबाबत नकारघंटा वाजवत असतात.

आईबाप आपले जगातील सर्वश्रेष्ठ हितचिंतक असतात हे खरं असलं तरी, आपल्या मुलाचं/मुलीचं हित कशात आहे हे आपल्यापेक्षा त्यांना जास्ती कळू शकते ह्याची काही आईबापांना कल्पनाही नसते. ते त्यांना समजावून सांगणे कठीण काम. आणि म्हणुनच आम्ही घेऊन आलोय जोडीदाराची विवेक निवड ही संवादशाळा. ही संवादशाळा जात-धर्म, बाह्यरूप याच्यापलिकडे जाऊन जोडीदार निवडीबाबत विचार करायला प्रवृत्त करते. ही कार्यशाळा तरूण आणि पालक दोघांसाठी असली तरी पालकांचा प्रतिसाद अल्प असतो. पण ही कार्यशाळा पालकांसाठीपण तितकीच, किंबहुना जास्त महत्वाची आहे. अमृता-प्रणय या दुर्दैवी घटनेने पालकांचं काऊंसिलिंग किती महत्वाचं आहे हे दाखवून दिले.

अमृताच्या पालकांना असं कोणी काऊंसिलिंग करणारं भेटलं असतं तर?
मी परत सांगतो मला सगळ्याच पालकांना अमृताच्या पालकांच्या पंगतीत बसवायचं नाही. पण सगळेच आपल्या मुलामुलीचं म्हणणं सहज स्वीकारतात असंही नाही.अशा सर्व पालकांचे या संवादशाळेमुळे मतपरिवर्तन होऊ शकते. तुम्हाला असं वाटत असेल आपण आपल्या पालकांना समजावून सांगणं जमत नाहीये, कमी पडतोय तर त्यांना जोडीदाराची विवेकी निवड या संवादशाळेला अाग्रहाने घेऊन या. तुमच्या बघण्यात मित्रमैत्रिणींचे असे पालक असतील तर त्या मित्रमैत्रिणींना या संवादशाळेबद्दल माहिती द्या. तरूणांनी तर यावंच. पण पालकांसाठीपण ही संवादशाळा खूप महत्वाची आहे.

कधी? ३० सप्टेंबर २०१८
कुठे? साने गुरूजी स्मारक, दांडेकर पूलाजवळ, पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे

वेळ – सकाळी ९ ते ५
नोंदणी शुल्क – १०० रुपये.

अधिक माहिती व पूर्वनोंदणी साठी संपर्क :-

स्नेहल- 9763950450
अक्षय- 9960997579
तुषार- 7448149036