Sunday, December 21, 2025
Home Blog Page 672

IRCTC Tour Package | केवळ 14 हजार रुपयांमध्ये दक्षिण भारतातील मंदिरांना द्या भेट; जाणून घ्या स्वस्त टूरची माहिती

IRCTC Tour Package

IRCTC Tour Package | भारतामध्ये अनेक लोक हे प्रवास करण्यासाठी रेल्वेचा उपयोग करतात. कारण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत आरामदायी आणि परवडणारा देखील असतो. जर आता तुम्ही देखील दक्षिण भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय रेल्वे कंपनी IRCTC चे एक नवीन पॅकेज टूर घेऊन आलेले आहे. भारतीय रेल्वे कंपनीचे IRCTC चे पॅकेजचे प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कारण ते त्यांच्या प्रवाशांना खूप चांगल्या सुविधा देतात. भारत गौरव टुरिस्ट यांच्या दक्षिण भारत टूर पॅकेज अंतर्गत दक्षिण भारतातील मंदिरांना आता भेट देण्याची एक संधी चालून आलेली आहे. हे पॅकेज तुमच्यासाठी आठ रात्री आणि नऊ दिवसांसाठी असणार आहेत. या पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील अरुणाचलम, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि तंजावर या ठिकाणी नेले जाणार आहे.

याबाबतची माहिती IRCTC यांनी स्वतः ट्विट करून दिलेली आहे. तुमचे हे पॅकेज टूर्स सिकंदराबाद येथून सुरू होणार आहे. हा संपूर्ण प्रवास तुमचा ट्रेनने होणार आहे. 22 जूनपर्यंत हा तुमचा प्रवास सुरू राहणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी करण्याची काही गरज नाही. कारण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. या स्पेशल ट्रेनमध्ये एकूण 716 सीट आहेत, त्यापैकी स्लीपर 460, थर्ड क्लास 226 सेकंड एसी 50 आहेत

किती खर्च येईल? | IRCTC Tour Package

प्रवाशाने निवडलेल्या श्रेणीनुसार टूर पॅकेजचे दर बदलतील. पॅकेज 14,250 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. जर तुम्ही इकॉनॉमी कॅटेगरीत बुक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला 14,250 रुपये द्यावे लागतील. तर लहान मुलांसाठी अर्थव्यवस्थेत 13,250 रुपये दर ठेवण्यात आला आहे. मानक श्रेणीतील एका व्यक्तीसाठी भाडे 21,900 रुपये आणि मुलांसाठी 20,700 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आराम श्रेणीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 28,750 रुपये द्यावे लागतील. या श्रेणीतील मुलांसाठी भाडे 27,010 रुपये ठेवण्यात आले आहे. IRCTC वेबसाइटला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात.

कुठे भेट देणार?

  • तिरुवन्नमलाई: अरुणाचलम मंदिर
  • रामेश्वरम: रामनाथस्वामी मंदिर
  • मदुराई: मीनाक्षी अम्मन मंदिर
  • कन्याकुमारी: रॉक मेमोरियल, कुमारी अम्मान मंदिर
  • त्रिवेंद्रम: श्री पद्मनाभस्वामी मंदिर
  • त्रिची: श्री रंगनाथस्वामी मंदिर
  • तंजावर: बृहदेश्वर मंदिर

Renault Alpine A290 : Renault ने आणली नवी Electric Car; देतेय तब्बल 380 KM रेंज

Renault Alpine A290

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचत असल्याने अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Renault ने नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात आणली आहे. Renault Alpine A290 असं या कारचे नाव असून एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल ३८०KM रेंज देण्यास सक्षम आहे. आज आपण या गाडीचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घेऊयात…..

380 KM रेंज – Renault Alpine A290

Renault Alpine A290 ही नवीन इलेक्ट्रिक कार 5 E-Tech वर आधारित आहे. ही इलेक्ट्रिक कार ४ ट्रिम ऑप्शन मध्ये सादर करण्यात आली असून कारची GT आणि GT प्रीमियम मधील फ्रंट-माउंट इलेक्ट्रिक मोटर 174 bhpपॉवर आणि 284 Nm टॉर्क जनरेट करते. तर, GTS आणि GT परफॉरमेंस मध्ये 215 bhp पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 52 kWh बॅटरी बसवण्यात आली असून कंपनीचा दावा आहे की एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि कार सुमारे 380 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकतात. कंपनीचा दावा आहे ही कार अवघ्या 6 सेकंदात 0 ते 60kmph चे स्पीड पकडेल.

अन्य फीचर्स –

Renault च्या या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन स्पोर्टी लूकमध्ये आहे. Alpine A290 मध्ये बसवलेले स्टीयरिंग व्हील फॉर्म्युला 1 कारसारखेच आकर्षक असेल. कार मध्ये 19 इंच टायर मिळतात. 0.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, चार्जिंग पॉइंट यासारखे फीचर्स मिळतात. इंफोटेनमेंट स्क्रीन ड्रायव्हरच्या डिजिटल नेव्हिगेशन क्लस्टरशी कनेक्ट केली जाऊ शकते. याशिवाय इन्फोटेनमेंट स्क्रीनसह गुगलच्या अनेक सेवाही दिल्या जातील. यात वायरलेस मोबाइल चार्जिंग, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील असलेले कॉकपिट यांसारखे अनेक खास वैष्टिष्ट्ये मिळतात. कारच्या किमतीबाबत सांगायचं झालयास, Alpine A290 ची किंमत ३५ लाखच्या आसपास राहू शकते.

Weather Update | राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. मागील आठवड्यामध्ये पावसाने सगळीकडे जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर काही दिवस पावसामध्ये खंड पडलेला दिसून आलेला आहे. अशातच आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर पुढील काही दिवस चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

तसेच आज म्हणजेच 16 जून आणि पुढील दोन दिवस जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 20 जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रात (Weather Update) वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबई यानंतर मान्सूनने विदर्भ आणि मराठवाड्यात चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पुढील दोन दिवसात पाऊस चांगला पडणार आहे.

या ठिकाणी येल्लो अलर्ट जारी | Weather Update

आज म्हणजे 16 जून 2024 रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे काही भागांना येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. 17 आणि 18 जून रोजी कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे.

स्कॉटलंडचे स्वप्न भंगले!! कांगारूंच्या विजयाने इंग्लंडला सुपर-8 चं तिकीट

AUS Vs SCO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा ५ गडी (AUS Vs SCO) राखून पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात ट्रेव्हिस हेड आणि मार्कस स्टोइनीस यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. विजय जरी कांगारूंचा झाला असला तरी याचा थेट फायदा इंग्लंडला झाला आहे. कारण स्कॉटलंडच्या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला सुपर-८ चे तिकीट मिळालं आहे. जर आजचा सामना स्कॉटलंडचा संघ जिंकला असता तर सुपर-८ चे समीकरण बदललं असत.

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्कॉटलंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत कांगारूंच्या बॉलर्सचा फेस काढला. स्कॉटलंडने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या होत्या. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक ६० धावा केल्या, त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारत कांगारूंना बॅकफूटवर ढकललं. त्याच्याशिवाय रिची बेरिंग्टनने ३१ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर नाथन एलिस, ॲडम झाम्पा आणि एश्टन एगर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरात १८१ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अवघ्या १ धावेवर बाद झाला तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिशेल मार्श सुद्धा ८ धावांवर माघारी परतला. मात्र मार्कस स्टोइनीस आणि ट्रेव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत आणि मोठं मोठे शॉट मारत स्कॉटलंडच्या बॉलर्सची धुलाई केली. ट्रॅव्हिस हेडने ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ६८ धावा कुटल्या. तर मार्कस स्टॉयनिसने २९ चेंडूत ५९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम डेव्हिडने अखेरच्या काही ओव्हर मध्ये डावाची सूत्रे आपल्या हाती घेतले. त्याने १४ चेंडूत नाबाद २८ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे स्कॉटलंड स्पर्धेबाहेर गेला आणि इंग्लंडला सुपर-८ चे तिकीट मिळाले.खरे तर इंग्लंड आणि स्कॉटलंड दोघांचेही प्रत्येकी ५-५ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत इंग्लंड (+३.६११) पुढे असल्याने त्यांना फायदा झाला. स्कॉटलंड पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे

Ayushaman Bharat Yojana | आयुष्मान कार्डवर मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास, हा नंबर करा डायल

Ayushaman Bharat Yojana

Ayushaman Bharat Yojana | केंद्र सरकार देशातील गरीब जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक सोयी सुविधा देखील मिळत आहे. अशातच आता सरकारने गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushaman Bharat Yojana ) या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना रुग्णालयात मोफत उपचार देत आहे. यासाठी त्यांनी या योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांसाठी एक कार्ड बनवलेले आहे. या कार्डला आयुष्यमान कार्ड असे म्हणतात. या कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक हॉस्पिटल नोंदणीकृत झालेली आहे. त्यामुळे आता या योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट झालेले नागरिक कोणत्याही रुग्णालयात उपचार घेऊन शकतात.

अनेकवेळा आयुष्मान योजनेच्या (Ayushaman Bharat Yojana ) पॅनलमध्ये समाविष्ट झालेले रुग्णालय आयुष्मान कार्डधारक असलेल्या व्यक्तीला उपचार देण्यास नकार देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. परंतु आता या पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालय या योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांवर या कार्डद्वारे उच्चार देण्यास नकार करू शकत नाही. लोकांमध्ये माहितीच्या अभावामुळे काही रुग्णालय उपचार देण्यास नकार देतात. परंतु याबाबत पूर्ण माहीत नसल्यामुळे लोकही याबाबत तक्रार देत नाहीत.

आयुष्मान योजनेच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जाऊ शकतात. रुग्णालयाने मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास निष्क्रिय बसू नका. तुम्ही टोल फ्री नंबर आणि पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. 14555 हा आयुष्मान भारत योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील टोल फ्री क्रमांक आहे. देशातील कोणत्याही राज्यात राहणारा नागरिक यावर तक्रार करू शकतो. हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्येही तक्रारी दाखल केल्या जातात.

वेगवेगळ्या राज्यांसाठी टोल फ्री क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात राहणारे लोक 180018004444 या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. मध्य प्रदेशातील रहिवाशांसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३२०८५ आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील रहिवासी आयुष्मान योजनेशी संबंधित त्यांच्या तक्रारी 104 वर नोंदवू शकतात आणि उत्तराखंडचे नागरिक 155368 आणि 18001805368 वर त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.

बी-बियाणे अतिरिक्त भावाने विकल्यास होणार जागच्या जागी कारवाई; धनंजय मुंडेने दिले आदेश

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र | राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बी बियाणे पेरायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे या पिकांना काही दिवसात खते देखील द्यायला लागत असतात. परंतु आता या खरीप हंगामाच्या वेळी राज्यामध्ये बी बियाण्यांचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. काही कृषी दुकानदार हे त्यांच्या सोयीने बियाण्यांचे भाव वाढवत आहेत. याबाबत आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यामध्ये बी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि अतिरिक्त खताची जी मागणी होती, ती देखील येत्या आठवड्यात देखील पूर्ण होणार आहे. त्यामुळे बी बियाणे, खते, कीटकनाशके यांचे भाव वाढवणाऱ्या कृषी दुकानदारावर आता सरकारचे लक्ष असणार आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील खरीप पिके, बी बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता, त्याचप्रमाणे आतापर्यंत केलेली पेरणी बियाणांची झालेली विक्री या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. या बैठकीतून धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कृषी अहवाल समजून घेतलेला आहे.

अतिरिक्त भरारी पथके दाखल

जे दुकानदार बियाणे जास्त भावाने विकतात, त्या गोष्टी रोखण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन भरारी पथके नेमावीत आणि दररोज कमीत कमी 25 दुकानांना भेट देऊन तपासणी करावी. आणि यात जर कोणताही गैरप्रकार आढळला, तर त्यांच्यावर जागच्या जागी गुन्हा दाखल करून परवाना बंद करण्याची कारवाई करावी असे आहे देखील सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रारीचे स्वतः दखल घ्यावी आणि एक तासात चौकशी करून तक्रारीचे निरसन करावे असे धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

जागच्या जागी कारवाई होणार

त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कमीत कमी 10 डमी गिऱ्हाईके पाठवून दुकानांवरील दर त्याचप्रमाणे इतर बाबींची पडताळणी करावी. आणि कुठेही गैरप्रकार आढळला तर जागच्या जागी कारवाई करावी. असे त्यांनी सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर कोणाचाही दबावाखाली न येता काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे धनंजय मुंडे यांनी बैठकीत सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचे अधिकारी कृषी विभागासाठी या काळात नेमावेत आणि त्यांनी पूर्ण वेळ सहाय्य करावे आणि जबाबदारी सांभाळावी अशी सूचना धनंजय मुंडे यांनी केलेली आहे.

राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? काय आहेत कारणे?

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेनं किती वेळा भूमिका बदलल्या… आणि किती वेळा पलटी खाल्ली… हा वेगळ्या संशोधनाचा विषय… पण लोकसभेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र नाद पूरा करायचाच… असा जणू निर्धार केलाय… मनसे येणाऱ्या विधानसभेला 200 ते 250 जागा स्वबळावर लढवेल, असं जाहीर करून पक्षानं महायुती आणि महाविकास आघाडीचीही धाकधूक वाढवलीये… 2006 साली पक्ष स्थापन झाल्यापासून 2009 ची इलेक्शन वगळता मनसेचे इंजिन गारच राहिलं… सततच्या बदलत जाणाऱ्या भूमिका यामुळे पक्षाला मोठा फटका बसला… याचाच परिणाम म्हणून की काय 2019 च्या विधानअवघा एकच आमदार निवडून आला… मराठी अस्मिता, टोल नाका, भोंगा ते बिनशर्त पाठिंबा… हा सततच्या भूमिका बदलण्याचा काळ मागे पडल्यानंतर राज ठाकरेंना आता राजकारण कळू लागलय, हे कन्फर्मपणे सांगता येऊ शकतं… त्याचं कारण म्हणजे मनसेनं घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय… राज ठाकरेंचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घालू शकतो… राज साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्याचं जे मनसैनिकांचं कित्येक वर्षांचं स्वप्न आहे, ते ह्या एका निर्णयामुळे पूर्ण होऊ शकतं… राज ठाकरे यांना यंदाच्या विधानसभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे कसे फुल चान्सेस आहेत? राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सिएम पदाच्या रेसमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं नेमकं काय होणार? त्याचंच हे इन डेप्थ एनालिसिस…

राज ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसण्याचे चान्सेस वाढलेत असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे महायुतीचं गंडलेलं राजकारण

शिवसेना फुटली.. शिंदेंनी आमदार, खासदार पळवून भाजपसोबत सत्ता स्थापन केली.. अगदी याच क्षणापासून मनसेचा सूर आणि नूर बदलला… मनसेची भाजप आणि शिंदेंसोबत जवळीक वाढली… अनेक महत्वाच्या मुद्यावर सरकारचे कान उपटण्याचा कार्यक्रम पत्र लिहून राज ठाकरेंनी चालवला…दुसरीकडे शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतल्यानं फायदा व्हायचा सोडून गणित भाजपवरच उलटलं…शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचा आणि अजितदादांच्या पक्ष चोरीचा प्रकार जनतेला काही पटला नाही…त्यामुळे या दोघांचीही इमेज जनतेच्या मनातून ढासळली… आणि या सगळ्याचे करता करविता फडणवीस असल्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात बरीच चिड दिसली… या सगळ्याचं प्रतिबिंब लोकसभेच्या निकालात उमटलं…आणि महायुतीच्या कुठल्याच पक्षाला खासदारकीचा दोन अंकी आकडा ओलांडता आला नाही…

लोकसभेचा हा घाव ताजा असताना आता विधानसभा जड जाणार, हे तिन्ही पक्षांना कळून चुकलय…शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं, तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जाऊन शिवसैनिक नाराज होतील…अजितदादांना मुख्यमंत्री बनवावं तर बारामतीतून पडलेली सीट, तरीही दिलेली राज्यसभा…आणि वरून पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं तर दादा भाजपला जड जातील…राहता राहिला प्रश्न तो भाजपचा…तर महाराष्ट्रातील बिघडलेलं वातावरण पाहता आणि फडणवीस वगळता दुसरा कुठलाही तोडीस तोड नेता पक्षाकडे नाहीये…या सगळ्याचा विचार करता फोडाफोडीचा… आणि सहानुभूतीचा…हा सगळा इफेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणातून घालवायचा असेल तर महायुतीकडे एक पर्याय उरतो तो म्हणजे राज ठाकरे…

200 ते 250 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मनसेनं नुकताच बोलून दाखवलाय…याचाच अर्थ राज ठाकरे विधानसभा स्वबळावर लढतील…पण असं असलं तरी मनसेनं तब्बल अडीचशे जागा लढवण्याचं सोडलेलं हे पिल्लू मुळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठीच असण्याची शक्यता दाट आहे… राज ठाकरे हे येतात ठाकरे कुटुंबातून… त्यामुळे जर त्यांना महायुतीनं मुख्यमंत्रीपद दिलं तर ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतीत शिंदे जसे कमजोर दिसतात… तसं न होता थेट ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होऊन उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार सहानुभूतीचं वारही कमी होईल…दुसरं म्हणजे शिंदे आणि अजितदादा हे सत्तेतील नेते आहेत…यांच्याकडे मातब्बर नेत्यांचा भरणा आहे…त्यामुळे त्यांना जवळ केलं तर भाजपला विविध खाते वाटपात आणि प्रत्यक्ष सरकार चालवताना आत्ता येतायत तशा बऱ्याच अडचणी येऊ शकतात…यापेक्षा राज ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून भाजप सरकारवर डॉमिनन्स ठेवू शकतो…

राज ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात असंच स्ट्रॉंगपणे सांगता येतं त्याचं पुढचं कारण म्हणजे अजितदादा आणि शिंदे यांचं डावललेलं नेतृत्व…

महायुतीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाचे तीन प्रमुख दावेदार आहेत…त्यांची नाव अर्थात आपल्याला माहित आहेच… पण यात शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला जनतेने सपशेल नाकारल्याचं दिसतय…त्यात शिंदे आणि अजितदादा यांना सोबत घेतल्यामुळे भाजपाचाही लोकसभेला मोठा लॉस झाल्याचं आपण पाहिलं आहेच… त्यामुळे शिंदेंच्या आणि अजितदादांच्या बंडखोरीचं ओझं फेकून द्यायचं असेल तर भाजपला स्वबळावर लढावं लागेल…आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना मदत होईल ती राज ठाकरेंची…शिंदेंना आणि अजित दादांना साईडलाईन करून भाजप मनसे सोबत बस्तान बंधू शकतं… त्यात ठाकरे कुटुंबातील चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन भाजपा आपली डागळलेली इमेज पुन्हा सुधारू शकतं… पक्ष फोडीचा लागलेला टॅग पुसण्यासाठी भाजपाला महाराष्ट्रात काहीतरी नवीन समीकरण जुळवाव लागेल… या सगळ्यात भाजपची आणि मनसेची वाढलेली जवळीक पाहता हे समीकरण लवकरच जन्माला येईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही…

त्यामुळे महायुतीतील झालेल्या गोंधळात राज ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्याचा फुल टू स्कोप आहे… पण आता भाजपने असा प्रस्ताव राज ठाकरेंकडे सरकवला तर ते यावर काय स्टॅन्ड घेतील? यावर पुढची गणित अवलंबून असणार आहेत…बाकी तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या विधानसभेत राज ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर दिसू शकतील का? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Bajaj Pulsar N160 चे नवीन व्हेरिएन्ट लाँच; कोणत्याही रस्त्यावर आरामात धावणार

Bajaj Pulsar N160 new variant (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाजने आपली Bajaj Pulsar N160 बाईक नव्या व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. या बाइकमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि अपसाइड डाउन (USD) फोर्क्ससह ABS राइड मोड्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. Pulsar N160 सोबतच कंपनीने पल्सर 125, 150 आणि 220F या बाईक सुद्धा नव्या फीचर्ससह अपडेट केल्यात. या सर्व गाड्यांमध्ये नेमकं काय वेगळपण आहे हेच आज आपण जाणून घेऊयात….

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय-

नवीन Bajaj Pulsar N160 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजेच काय तर तुम्ही ब्लूटूथद्वारे तुमचा मोबाइल बाइकशी कनेक्ट करू शकता. ब्लूटूथला जोडणारा एक इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. राइडिंग करताना तुम्हाला कॉल आणि एसएमएस अलर्टचीही माहिती मिळेल. या नवीन फीचर्समुळे रायडिंगचा अनुभव सुधारण्यास मदत होईल, असा दावा बजाजने केला आहे. कंपनीने पल्सर N160 च्या नव्या व्हेरियेण्टचे ग्राफिक्स स्टिकर्स देखील बदलले आहेत. नवीन Pulsar N160 बाईकमध्ये 33mm सोनेरी रंगाचे UST फॉर्क्स मिळतील. ज्याच्या मदतीने तुम्हाला उत्तम हँडलिंग आणि राइडिंगचा अनुभव मिळेल. या अपडेटेड पल्सरमध्ये रेन, रोड आणि ऑफ-रोड असे 3 वेगवेगळे ABS मोड मिळतील.

हे पण वाचा : टाटा समूहाची मोबाईल क्षेत्रात उडी?? या कंपनीलाच खरेदी करणार

इंजिन – Bajaj Pulsar N160

Pulsar N160 च्या सर्व व्हेरिएन्टमध्ये 164.82cc ऑइल-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 8,750 rpm वर 11.7 kW ची मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. बाइकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात ड्युअल-चॅनल एबीएस देखील आहे. खास बाब म्हणजे नवीन Pulsar N160 मध्ये मल्टी राइड मोड्स देण्यात आलेत ज्यामुळे रस्ता ओला असो वा सुकलेला असो, चांगला असो वा खचलेला असो.. कोणत्या रस्त्या तुम्ही सुरक्षितपणे गाडी चालवू शकता. या अपडेटेड पल्सरमध्ये रोड मोड स्टॅंडर्ड म्हणून सेट केला आहे. शहर आणि महामार्गानुसार बाईक ट्यून करण्यात आली आहे. पावसात ही बाईक चालवत असताना आणि रस्ता कसाही असताना सुद्धा रायडींग वेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

किंमत किती?

आता राहिला आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बाईकच्या किमतीचा … तर Bajaj Pulsar N160 च्या अपडेटेड व्हेरिएन्टची किंमत 1,39,693 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर Pulsar 125 ची एक्स-शोरूम किंमत 92,883 रुपये, Pulsar 150 ची किंमत 1,13,696 रुपये आणि Pulsar 220F ची किंमत 1,41,024 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Viral Video | पठ्ठ्याने 2 टायरवर चालवला ट्रॅक्टर; शेवट पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका

Viral Video

Viral Video | आपल्या भारतात प्रयोग करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. लोक वेगवेगळे जुगाड करत असतात. आणि सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर देखील असे जुगाड्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. काही लोक वेगवेगळ्या गोष्टींवर प्रयोग करत असतात. आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता एका व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टरचे पुढचे चाक उचलून एक प्रयोग केला आहे. तो व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

रस्त्यावर आपण वेगवेगळे वाहनांचे व्हिडिओ (Viral Video) पाहत असतो. गाडी चालवणारा ड्रायव्हर देखील त्याची वेगवेगळी स्टाईल दाखवून एकदम वेगळा असा ड्रायव्हर बनत असतो. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक व्यक्ती ट्रॅक्टरशी खेळत आहे.

या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक ट्रॅक्टर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून समजते की, तो व्यक्ती ट्रॉली पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो ट्रॅक्टर पूर्ण उचलतो आणि शेवटी परिस्थिती अशी येते की त्याचा जीव धोक्यात येतो. त्यानंतर ट्रॅक्टर चालू असताना तो पुढे जातो आणि एका घराला धडकतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिलेला आहे. आणि कमेंट करून प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका व्यक्तीने हा व्हिडिओ पाहून कमेंट केली आहे की, “आमचा भारत नवशिक्यांसाठी नाही.” अशाप्रकारे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Maha Vikas Aghadi : पवार- ठाकरेंसमोरच पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा!! महाविकास आघाडी एकत्र विधानसभा लढवणार

Maha Vikas Aghadi Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक एकत्रित लढली आणि आम्हाला यश मिळालं त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी आणि अन्य छोटे- मोठे पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत अशी मोठी घोषणा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आज मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांच्याउपस्थितीत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार – Maha Vikas Aghadi

लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही ३ पक्ष जरी एकत्र असलो तरी महाराष्ट्रातील आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिष्ट पक्ष, ३० हुन अधिक संघटना आमच्या सोबत होत्या. या सर्वानी मेहनत केली, महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. यापुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही अशाच एकत्रितपणे लढवणार आहोत. पूर्ण ताकदीने एकत्रितपणे आम्ही मैदानात उतरणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल. महारष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा पाठिंबा आणि आशीर्वाद दिला, असाच किंवा यापेक्षाही जास्त आशीर्वाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

मोदींच्या सभा झाल्या तिथे महायुतीच्या जागा पडल्या – पवार

यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना खोचक टोला लावला. महाराष्ट्रात देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंमोदींना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असा टोला पवारांनी लगावला.