Sunday, December 21, 2025
Home Blog Page 673

Uttarakhand Mini Bus Accident : धक्कादायक!! भाविकांची बस नदीत कोसळली; 8 जणांचा मृत्यू

Uttarakhand Mini Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये भीषण अपघाताची घटना (Uttarakhand Mini Bus Accident) घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावर एक मिनी बस अलकनंदा नदीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे भाविक चारधाम तीर्थयात्रा संपवून ऋषिकेशला परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या मिनी बसमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

मिनी बस सुमारे 250 फूट घसरल्याने घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. घटनास्थळी तातडीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर अपघातग्रस्त मिनी बसमधून दिल्लीतील लोक प्रवास करत असल्याची माहिती आहे. भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केलं जात आहे.

या अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, – रुद्रप्रयागमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवंगतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं.

टाटा समूहाची मोबाईल क्षेत्रात उडी?? या कंपनीलाच खरेदी करणार

TATA Group Vivo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा समूह (Tata Group) असलेला टाटा ग्रुप अगदी सुईपासून ते विमानापर्यंत सर्व काही बनवतो. देशात टाटा समूहाला मोठा मान आणि सन्मान आहे. आता टाटा समूह मोबाईल क्षेत्रात एंट्री करणार आहे. त्यासाठी ते प्रसिद्ध चिनी ब्रँड Vivo सोबत पार्टनरशिप करण्याची शक्यता आहे. खरं तर टाटा ग्रुप यापूर्वीच हँडसेट आणि मोबाईल नेटवर्क क्षेत्रात उतरला होता, मात्र आता स्मार्टफोन बनवण्याची कंपनीची योजना आहे. जर टाटाचा विवो सोबतचा हा करार निश्चित झाला तर या चिनी कंपनीत टाटाचा 51 टक्के हिस्सा असेल, म्हणजेच त्याचे नियंत्रण टाटा ग्रुपकडे राहील.

भारत सरकारने सर्व चिनी कंपन्यांवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरु केली आहे. चीनच्या लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड विवोने आपला मोठा हिस्सा भारतीय कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि याबाबत टाटा समूहाशी चर्चा सुरू आहे. Vivo एका भारतीय कंपनीच्या मदतीने उत्पादन आणि वितरण करण्याची तयारी करत आहे. टाटा आणि विवो मध्ये याबाबत प्राथमिक स्तरावर बोलणी झाली आहे. आता वीवो कंपनीच्या मूल्यांकनावर हे प्रकरण आले आहे. टाटाने आपल्याकडून वीवी कंपनीचे मूल्यांकन केले आहे. परंतु वीवोला त्यापेक्षा अधिक मूल्यांकन हवे आहे. टाटा कंपनी या करारासाठी उत्सुक आहे. परंतु अद्याप काहीच निश्चित झाले नाही.

दरम्यान, मागील वर्षी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही देशात आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. कंपनीने तैवानच्या विस्ट्रॉनला $125 दशलक्षला विकत घेतले होते. आता कंपनी ऍपलच्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पेगाट्रॉनशी त्याच्या चेन्नईस्थित आयफोन उत्पादन कंपनीतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. त्यातच जर विवो सोबत सुद्धा टाटा ची पार्टनरशिप यशस्वी झाली तर मोबाईल क्षेत्रात टाटा समूहाचा दबदबा आगामी काळात पाहायला मिळू शकेल.

South Central Railway Bharti 2024 | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती सुरु, 10वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

South Central Railway Bharti 2024

South Central Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. त्यामुळे त्यांना नेहमीच नोकरीसाठी मदत होत असते. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांचे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत (South Central Railway Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. ही भरती सूत्रधार या पदासाठी निघालेली आहे. या पदाच्या एकूण 59 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 15 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | South Central Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – सूत्रधार
  • पदसंख्या – 59 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ऑफिस नॉर्थ ब्लॉक बीआरएम ऑफिस कंपाऊंड दक्षिण मध्य रेल्वे विजयवाडा 1
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास

अर्ज कसा करा ? | South Central Railway Bharti 2024

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • भरलेला अर्ज दिलेल्या पत्तावर सादर करा.
  • 15 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Mazagon Dock Bharti 2024 | माझगाव डॉकमध्ये 512 रिक्त जागांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुमच्याकडे मुंबईमध्ये काम करण्याची एक सुवर्णसंधी आहे. कारण आता माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई ( Mazagon Dock Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 512 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहे.

पदाचे नाव |  Mazagon Dock Bharti 2024

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 512 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 14 ते 21 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये एवढे अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.

अर्जपद्धती |  Mazagon Dock Bharti 2024

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

2 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतनश्रेणी

अप्रेंटिस या पदासाठी जर तुमची निवड झाली तर तर मला जर महिन्याला 2500 रुपये ते 8050 रुपये एवढा पगार मिळणार आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता
  • 2 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Manoj Jarange Patil : … तर मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोज जरांगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर… महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो…आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं… मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पटलावर वजीर कसे बनतील? हे तीन गट एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील, इतपत ताकद त्यांच्याजवळ आहे का? जर असं झालं तर 2024 ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? याच सगळ्याचं सविस्तर विश्लेषण पाहुयात

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येतील असं आम्ही म्हणतोय त्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे तिघांच्यातलं ट्युनिंग

आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) , बच्चू कडू (Bachhu Kadu) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात एक समान धागा पाहायला मिळाला…तो म्हणजे स्वतंत्र राजकारणाचा…मनोज जरांगे पाटील यांनी बॅकेंडला राहून निकाल कसे फिरवले? हे आपल्याला माहित आहेच…पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांनी स्वतंत्रपणे आपलं राजकारण टिकेल याची काळजी घेतली…कोणत्याही युती किंवा आघाडीला त्यांनी बांधून घेतलं नाही…अर्थात यामागचा प्लॅन होता तो विधानसभेचा…पक्ष फुटल्यामुळे विधानसभेला निवडून येण्यासाठी प्रहार, वंचित आणि जरांगे पाटलांना स्कोप आहे…म्हणूनच त्यांनी लोकसभेची तिलांजली दिली… पण यात मनोज जरांगे पाटील आणि वंचित यांच्यामध्ये ट्युनिंग पाहायला मिळालं… तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडून बच्चू कडूंनी जरांगे पाटलांना पाठिंबाच दिला आहे…त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या तीन दबाव गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तर महाराष्ट्राला तिसरा पर्याय मिळू शकतो…जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढावी…. प्रहारच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बच्चू कडू यांनी कुठल्याही आघाडी सोबत न जाता वीस जागा लढवण्याचा निर्धार केला आहे… तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी विधानसभा लढवावी…त्यांच्या ६० ते ७० जागा आरामात निवडून येतील…असं बोलून बच्चू कडूंनी मनोज जरांगेंना सोबत घेण्याचा नवा डाव टाकलाय.. आता आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यातील संवाद कायम असल्याने विधानसभेला ते एकत्र येतीलच…. त्यामुळे हे तीन चेहरे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तिसरी आघाडी निर्माण करतील, याचे 100% चान्सेस आहेत…

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येण्यासाठी आणखीन एक कारण महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे विचारसरणी आणि युत्यांचा अनुभव

प्रकाश आंबेडकरांनी 2019 ला एमआयएम तर 2024 ला महाविकास आघाडी सोबत युती करण्याचा प्रयत्न केला… पण त्यांना आलेला अनुभव वाईट होता…हीच गोष्ट बच्चू कडूंसोबत घडली… महाविकास आघाडीत असताना बच्चू भाऊंचं सगळं ठीकठाक चाललं होतं…पण नंतर फडणवीसांनी शब्द दिल्याने त्यांनी शिंदे यांच्या बंडाळीला साथ दिली… पण नंतर महायुती सरकारमध्ये मंत्रीपद तर नाहीच पण सरकारने डायरेक्ट इग्नोर मारायला सुरुवात केली…यामुळे बच्चु भाऊंचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला… त्यामुळे बच्चू भाऊंनी लोकसभा स्वतंत्र लढवली… आणि नवनीत राणा म्हणजेच महायुतीची सीट पाडून दाखवलीच… त्यामुळे बच्चुभाऊंकडे पर्याय उरतो, तो महाविकास आघाडीचा… पण आता पुन्हा फिरून आहे तिथं जाणं हे कडूंना जड जावू शकतं… त्यांच्याकडे पर्याय उरतो.. तो जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचा… या सगळ्यांचाच महाराष्ट्रातील युती आणि आघाडींचा अनुभव वाईट राहिलाय…अशा वेळेस स्वतंत्र राजकारण करतानाच दबाव गट तयार करायचा असेल तर हे तिघेजण एकमेकांना पोषक भूमिका नक्कीच घेऊ शकतात…सर्वात महत्त्वाचं म्हणजे आघाडी करण्यासाठी राजकारणात ज्या विचारसरणीचा सर्वात मोठा अडथळा ठरतो…तो मात्र या तिघांच्या बाबतीत राहत नाही…कारण बहुजन, वंचित यांच्या कल्याणासाठी राजकारण करणं…हा तिघांच्याही पॉलिटिक्सचा कोअर गाभा आहे… त्यामुळे विधानसभेला या तिघांची युती झाली ती नैसर्गिकच असेल…

जरांगे + प्रहार + वंचित एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेतील, इतकं त्यांचं खरंच वजन आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला लोकसभेचा निकाल पहावा लागेल…

2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात मनोज जरांगे फॅक्टर चालला…मराठ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण पेटवणाऱ्या जरांगे पाटलांनी मराठवाड्यात भाजपाचा सुपडा साफ केला…त्याची आग विदर्भातही पसरली…विदर्भात भाजपचा नागपूरची जागा वगळता बाकीच्या सर्व जागांवर दारून पराभव झाला…पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला…बजरंग बप्पा सोनवणे, डॉ. कल्याण काळे, बंडू जाधव यांसारख्या निवडून आलेल्या खासदारांनी मनोज जरांगे पाटलांमुळे आपला विजय झाल्याचं जवळपास मान्य केलंय…थोडक्यात काय तर मराठवाडा, विदर्भ आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद वापरून मनोज जरांगे पाटील येणाऱ्या विधानसभेलाही महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घालू शकतात…दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा परफॉर्मन्स खराब राहिला असला, तरी त्याला कारण ठरलं ती त्यांची सततची बदलती भूमिका…पण असं असलं तरी वंचित कसा निकाल फिरवू शकते? हे आपण 2019 च्या लोकसभेला पाहिलं आहेच…त्यात अनेक अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात वंचितची मोठी ताकद आहे…अकोला, सोलापूर, नागपूर, शिर्डी, धुळे यांसारख्या जिल्ह्यात वंचितला मानणारी मोठी व्होट बँक आहे… त्यामुळे लोकसभेला झालेल्या पराभवाची भरपाई प्रकाश आंबेडकर विधानसभेतून काढणार, हे तर कन्फर्म आहे… पण त्याचवेळेस जरांगे पाटील आणि बच्चू कडू एकत्र आल्यास नवीन सत्ता समीकरण आपण जन्माला घालू शकतो, असं कॉन्फिडन्सही आंबेडकरांना येईल…बच्चू कडू यांची प्रहारही महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचलेला पक्ष आहे…अमरावती आणि आजूबाजूच्या मतदारसंघात तर प्रहारची जोरदार हवा आहे…सध्याच्या घडीला महाराष्ट्रात त्यांचे 2 आमदार असले तरी तब्बल 20 जागांवर आपण आरामात निवडून येऊ, असा आत्मविश्वास बच्चुभाऊंना आहे…त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवून फक्त आमदार तयार करण्यापेक्षा महाराष्ट्राची सत्ताच आपल्या हातात येऊ शकते का? यासाठी हे नेते नक्कीच बैठकांच्या फेऱ्या सुरू करतील, यात शंका नाही….प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू एकत्र आल्यावर खरच महाराष्ट्रात तिसरी आघाडी सत्तेत येईल का? जर असं झालं तर यांपैकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

Viral Video | चक्क झोपलेल्या महिलेच्या केसात अडकला साप; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे आजकाल कोणत्याही गोष्टी अगदी क्षणार्धात वायरल होत असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहतो. अगदी बिनकामाचे त्याचप्रमाणे माहिती देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. आजकाल सोशल मीडियावर सापांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावात त्याचप्रमाणे जंगलाच्या आजूबाजूला साप हे पाहायला मिळतात. परंतु अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्या सापाची भीती वाटते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये साप अत्यंत भीतीदायक असा प्राणी आहे. तो अगदी छोट्याशा जागेत देखील स्वतःला बसवतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहिले की, अनेक लोक घाबरतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला झोपलेली असताना साप तिच्या केसात फिरताना दिसत आहे. आणि त्या महिलेला याची काहीच खबर नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

शेतामध्ये मानवी वस्ती करून राहणाऱ्या घरांमध्ये अनेक वेळा साप घुसतात. अशावेळी साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे माहीत नसल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. आणि असाच एक धोका आता या व्हिडिओमध्ये (Viral Video) आपल्याला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला दोन्ही हात डोक्याखाली ठेवून झोपलेली दिसत आहे. ही महिला गाढ झोपेत आहे. या महिलेने केस थोडेसे सैल बांधलेले आहे. यावेळी एक साप तिच्या केसात फिरताना दिसत आहे. हा साप सुरुवातीला तिच्या डोक्याच्या बाजूला सरपटत जातो. आणि नंतर हा केसांमध्ये रेंगाळत असतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जर या महिलेने थोडीशी जरी हालचाल केली असती तर तो चावण्याची दाट शक्यता होती.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दोन लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहे. या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “प्लीज एवढी घेऊ नका” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “काय वेडेपणा आहे”सध्या सापाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Essential Medicine | सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! मधुमेहासह ‘ही’ 54 औषधे होणार स्वस्त

Essential Medicine

Essential Medicine | आज-काल महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अगदी वैद्यकीय उपचारांपासून ते औषधांपर्यंतचे सगळेच खर्च व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु आता या सगळ्या महागाईमध्ये वैद्यकीय उपचार आणि औषधाच्या खर्चापासून सर्वसामान्य लोकांना आता दिलासा मिळालेला आहे. हा मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे. तो म्हणजे आता 54 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, कानाच्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टी विटामिन्स इत्यादी औषधांचा समावेश आहे. या औषधांवरील किमती कमी केलेल्या आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

काही औषधे लोकांना नियमितपणे घ्यावी लागतात. परंतु त्याच्या किमती प्रचंड असल्याने त्यांच्या आर्थिक आर्थिक भार वाढतो. परंतु आता अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicine) किमती घट करण्याचा निर्णय नॅशनल फार्मासिटिकल प्रोसेसिंग ऑथॉरिटीच्या 124 बैठकीत घेण्यात आलेला आहे. एनपीपीए ही देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक आवश्यक औषधांच्या किमती ठरवत असते. यावेळी या बैठकीत 54 औषधे आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत.

कोणत्या औषधांच्या किमतीत घट | Essential Medicine

या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 54 औषधांच्या किमतीमध्ये घट करण्यात आलेली आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, विटामिन डी, मल्टी विटामिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. मागील महिन्यात देखील सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमतीत घट केली होती. यामध्ये 41औषधांच्या आणि सहा विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टी विटामिन्स, मधुमेह, हृदय यासंबंधी औषधांचा समावेश होता. त्याचप्रमाणे यकृत्याची औषधे गॅस आणि ऍसिडिटीचे औषधे, पेन किलर, ऍलर्जीची औषधे यांचा देखील समावेश होता.

10 कोटींपेक्षा अधिक लोकांना होणार लाभ

औषधांच्या किमती कमी केल्यामुळे आता करोडो सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. सध्या देशामध्ये 10 कोटींपेक्षा अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा खूपच जास्त आहे त्यामुळे अनेक रुग्णांना या औषधावर अवलंबून राहावे लागते. परंतु आता मधुमेहाच्या औषधाच्या किमती कमी केल्यामुळे अनेक मधुमेह रुग्णांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे.

Samsung ने Airtel सोबत लाँच केला नवा मोबाईल; बंपर ऑफरचाही घ्या लाभ

_Samsung Galaxy F15 5G airtel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने आपल्या Samsung Galaxy F15 5G चे एअरटेल एडिशन लॉन्च केले आहे. Airtel सोबतच्या पार्टनरशिपमधून कंपनीने हा मोबाईल लाँच केला आहे. एअरटेल- सॅमसंगच्या या सहयोगामुळे, ग्राहक Samsung Galaxy F15 5G स्वस्तात खरेदी करू शकतात. कंपनी मोबाईल खरेदीवर अतिरिक्त सूटही देत ​​आहे.आज आपण सॅमसंगच्या या नव्या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

फीचर्स काय मिळतात?

Samsung Galaxy F15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OneUI वर काम करतो. मोबाईल मध्ये 4GB RAM, 6GB RAM आणि 8GB RAM असे पर्याय देण्यात आले असून 128GB स्टोरेज मिळतेय. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतोय. ज्यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 13MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6000mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. डिव्हाइस 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि सिंगल स्पीकरसह येतो

किंमत किती?

Samsung Galaxy F15 5G च्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे तर 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. या मोबाईल मध्ये 18 महिन्यांसाठी एअरटेल सिम मिळेल. यावर ग्राहकांना ७ टक्के अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवरून ग्राहक हा मोबाईल खरेदी करू शकता.

Wiper Rainy Glasses | पावसाळ्यात वापरा हा खास वायपर रेनी चष्मा; डोळ्यांना होणार नाही कसलाही त्रास

Wiper Rainy Glasses

Wiper Rainy Glasses | पावसाळा हा अनेकांचा अत्यंत आवडीचा ऋतू असतो. कारण पावसाळ्यात सुंदर असा हिरवागार निसर्ग पाहायला सगळ्यांना खूप आवडतो. अनेक लोक हे फक्त निसर्ग पाहण्यासाठी लॉंग ड्राईव्हसाठी बाईकवर जात असतात. आणि या नयनरम्य दृश्याचे दर्शन घेत असतात. परंतु मुसळधार पावसात बाईकवरून जाताना अनेकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक लोक रेनकोट घालतात. त्याचप्रमाणे डोळ्यांवर गॉगल, हेल्मेट घालतात. तरीदेखील प्रवास करताना त्यांना अनेक अडचणी येतात. ते म्हणजे प्रवास करताना त्यांच्या चष्म्यावर किंवा हेल्मेटवर पाणी पडते आणि त्यामुळे त्यांना समोरच्या गोष्टी नीट दिसत नाहीत. या सगळ्यामुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते.

परंतु आता तुम्ही या पावसाळ्यामध्ये कोणत्याही समस्याशिवाय या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेऊ शकता. कारण आता बाजारात एक विशेष चष्मे आलेले आहेत. जे पावसाळ्यासाठी ड्रायव्हिंग करताना फायदेशीर आहेत. या चष्म्यांमध्ये लहान लहान वायपर असतात. जे चष्म्यावर पडणारे पावसाचे थेंब किंवा धूळ काढून टाकतात. त्यामुळे तुम्हाला समोरील दृश्य अगदी स्पष्ट दिसू लागतात. आता आपण या चष्म्याची वैशिष्ट्य काय आहेत? ते पाहणार आहोत.

वायपर रेनी ग्लासेस वैशिष्ट्य | Wiper Rainy Glasses

  • हे वायपर बॅटरीवर चालतात. त्यामुळे डोळ्यांवर हलके आणि चांगलेच आरामदायी असतात.
  • चष्मे तुम्हाला बाजारामध्ये विविध आकारांमध्ये त्याचप्रमाणे रंगांमध्ये देखील उपलब्ध होतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे खरेदी करू शकता
  • अँटिफॉग आणि अँटी स्क्रॅच लेन्स धोक्यापासून तुमच्या डोळ्यांना वाचवतात आणि तुमचा बचाव करतात.
  • हे ग्लासेस पोर्टेबल आणि वापरण्यास अत्यंत सोपे आहे. त्यामुळे डोळ्यांवर लावणे आणि काढणे हे तुम्ही सहज करू शकता.

वायपर रेनी ग्लासेसचा वापर कसा करावा? | Wiper Rainy Glasses

वायपर चालवण्यासाठी तुम्हाला एक लहान बॅटरी दिली जाईल. ती लहान बॅटरी घाला. चष्मे डोळ्यांवर योग्यरीत्या बसतील याची खात्री करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा पावसात ड्रायव्हिंग करत असाल, त्यावेळी हे वायपर चालू करा.

खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

चांगल्या दर्जाची वायपर टिकाऊ आणि प्रभावशाली वायपर असलेले चष्मे निवडा.
जास्त वेळ डोळ्यांवर लावण्यासाठी हलक्या आणि आरामदायी फ्रेम निवडा.
विविध किमतीमध्ये हे चष्मे उपलब्ध आहेत.त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी निवड करा.

Weather Update | आज राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | मान्सूनने सर्वत्र महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर आता पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात एवढा पाऊस पडला आहे की, अनेक धरणांच्या पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. तर आज राज्यातील हवामान नेमके कशी असेल? आणि राज्यात कोणत्या ठिकाणी पाऊस (Weather Update) पडेल. याबद्दलची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे. आता तीच माहिती आपण जाणून घेऊयात. जेणेकरून तुम्हाला दिवसभरात तुमच्या इतर काही कामांचे प्लॅनिंग करता येईल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील असणार आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने हा वारा असणार आहे. या ठिकाणी विजादेखील कडकडणार आहेत. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे.

पंजाबराव डख यांचा अंदाज | Weather Update

अशातच आता हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी देखील हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा पद्धतीने पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे 15 जून पासून ते 17 जून पर्यंत राज्यात काही भागांमध्ये पावसामध्ये खंड पडणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे आता शेतकरी शेतीच्या कामांना देखील लागलेले आहेत. शेतकऱ्यांची भाताची पेरणी देखील झालेली आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात चांगली पिके येणार आहेत असे सगळ्यांचे म्हणणे आहे.