Sunday, December 21, 2025
Home Blog Page 674

काँग्रेस विधानसभा स्वबळावर लढवणार? नाना पटोलेंच्या विधानाने ‘मविआ’त खळबळ

nana patole congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे आपण बघितलं. यामध्ये सर्वाधिक १३ जागा काँग्रेसला (Congress) मिळाल्याने त्यांचा उत्साह सुद्धा वाढला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे जाणार का असा प्रश्न असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या एका विधानाने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. काँग्रेस विधानसभेसाठी सर्वच्या सर्व २८८ जागांसाठी तयारी करत आहे असं नाना पटोले यांनी म्हंटल आहे. ते भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांनी त्यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु केल्यात. गावातील नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सुद्धा त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांना साकोलीबाबत विचारलं असता, साकोलीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.

यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे. तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी सर्वात जास्त जागा लढवेल असं म्हंटल होते. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. आज उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. वायबी चव्हाण सेंटर वर होणाऱ्या या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होते ते पाहायला हवं.

Heart Problems | ‘या’ कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना असतो हृदयविकाराचा त्रास; जाणून घ्या लक्षणे

Heart Problems

Heart Problems | भारतामध्ये आजकाल हृदयविकार होण्याची समस्या वाढत चाललेली आहे. प्रामुख्याने महिलांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका बनत चाललेले आहे. लोकांची वाईट जीवनशैली आणि आहार यामुळे हृदयाच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाल आणि आपली जीवनशैली खूप महत्त्वाची असते. शहरी भागात राहणाऱ्या महिलांनी खास करून या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये हा धोका कमी असतो. कारण त्यांची जीवनशैली तितकी निरोगी असते. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान मद्यपान, फास्ट फूड, कमी शारीरिक हालचाली, मानसिक तणाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयविकाराची लक्षणे

स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात, जसे की छातीत दुखण्यापेक्षा थकवा, श्वास घेण्यास त्रास, पाठ किंवा जबडा दुखणे. ज्याकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेक वेळा हृदयविकार वेळेत सापडत नाहीत.

हृदयविकार टाळण्यासाठी उपाय | Heart Problems

आहाराकडे लक्ष द्या

महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली जाऊ शकतात. यासाठी सर्वप्रथम आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांसह हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. यासोबतच सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट, सोडियम आणि साखरेचे पदार्थ यांचे सेवन कमी करून खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो आणि हृदयविकार टाळता येतात.

शारीरिक हालचाली

दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे नियमित शारीरिक क्रियाकलाप. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. चालणे, जॉगिंग, सायकलिंग, कार्डिओ हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाच्या समस्यांसोबतच मधुमेहाचा धोकाही कमी होतो.

धूम्रपान सोडणे

धूम्रपान आणि मद्यपानावर नियंत्रण ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. धुम्रपानाची सवय सोडून दिल्यास हृदयाशी संबंधित आजारांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. याशिवाय मद्यपान मर्यादित प्रमाणात करा, जास्त मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

तणावापासून दूर राहा | Heart Problems

महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे, कारण तणाव आणि नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित योग, ध्यान आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.

राज ठाकरेंनी बाळासाहेबांकडे काय मागणी केली होती? भुजबळांनी सगळंच काढलं

chhagan bhujbal raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकेकाळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा नाव घेतलं होते. बाळासाहेब ठाकरेंना ज्या माणसाने अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत छगन भुजबळ याना विचारल असता त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचे आणि माझे मंडल आयोगवरून मतभेद झाले पण तुमचं काय? तुम्ही बाळासाहेबांना का सोडलं? तुम्ही बाळासाहेबांकडे काय मागणी केली होती? असा सवाल छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरे लहान होते तेव्हा शाळेतून आले नाहीत की बाळासाहेब (Balasaheb Thackeray) विचारायचे राजा अजून कसा आला नाही? माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब हे पती-पत्नी दोघंही जेवत नव्हते. माझे आणि बाळासाहेबांचे तर मंडल आयोग किंवा इतर कशावरुन मतभेद झाले. पण राज ठाकरेंचं काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही बाळासाहेबांपासून वेगळं व्हायचं कारण काय? तुमची बाळासाहेबांकडे काय मागणी होती सांगा ना लोकांना. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत? बाळासाहेबांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत आलो, ज्याच्यासाठी मी जेवत सुद्धा नसतो त्याने असं करावं याच बाळासाहेबां किती वाईट वाटलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

भुजबळ पुढे म्हणाले, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूकच केली. त्यांनी मनसे पक्ष काढला तो पुढचा भाग झाला… त्यावेळी दोघांकडून एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं असतं की हे नाही तर ते काम कर. तर त्यांनी ऐकायचं होतं. मात्र ऐकलं नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलतं. दोघांनीही ऐकलं पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतला असं भुजबळ यांनी म्हणत राज ठाकरेंवर आपली तोफ डागली.

Side Effects Of Tobacco | तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी आहे धोकादायक; होतात हे आजार

Side Effects Of Tobacco

Side Effects Of Tobacco | आपल्या भारतामध्ये तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. आणि ही अगदी सामान्य गोष्ट देखील मानली जाते. तंबाखूमुक्त भारत करण्याचा सरकारकडून खूप प्रयत्न केला जातो. यासाठी वेगवेगळ्या जाहिरातींमधून किंवा समाज जागृतीसाठी अनेक गोष्टी केल्या जातात. तंबाखूचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोक्याचे आहे. कारण दरवर्षीच्या जवळपास 80 लाख पेक्षा अधिक लोक हे तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू पावतात. तंबाखूमध्ये निकोटीन असते. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. आणि त्यामुळे आपल्याला कर्करोग देखील होऊ शकतो. जे लोक तंबाखूचे सेवन करतात, त्यांना त्यांचे तोंड पूर्णपणे उघडता येत नाही. तसेच तोंडाच्या आत दोन्ही बाजूंना पांढऱ्या रेषा तयार होतात. यामुळे कर्करोग होऊ शकतो. तुम्ही तर या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतात.

आता हे तंबाखूचे सेवन दोन प्रकारचे असते. एक म्हणजे धूम्रपानाद्वारे यामध्ये बर्न करून खाल्लेल्या उत्पादनांचा समावेश असतो. त्यामुळे धूर निर्माण होतो आणि आपल्या फुफुसाला यामुळे त्रास होतो. तसेच दूर रहित उत्पादनांमध्ये जळलेल्या उत्पादनांचा समावेश असतो. हे चावून किंवा चघळून खाल्ले जाते. तिसरा म्हणजे नाकातून वास घेणे. यामुळे तोंडातून किंवा नाकातून निकोटीन थेट आपल्या शरीरात जातो. धूर रहित तंबाखूमध्ये निकोटिन आर्सेनेक शिसे यांसारखे घातक पदार्थ असतात. त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते.

या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो | Side Effects Of Tobacco

  • तोंड, घसा, फुफ्फुस, स्वरयंत्र, मूत्राशय, मूत्रपिंड, स्वादुपिंड कर्करोग.
    तंबाखूच्या सेवनामुळे ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसीमासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.
    इरेक्शनची समस्या वाढते.
    हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका.
    हिरड्यांचा रंग गडद होऊ लागतो आणि दातांवरील पकड कमी होऊ लागते, त्यामुळे दात कमकुवत होऊ लागतात.
    तोंडातून खूप दुर्गंधी येत राहते.
    तोंडात पांढरे पुरळ तयार होणे, जे गाल, हिरड्या, ओठ किंवा जिभेच्या कर्करोगात बदलू शकते.
    गर्भधारणेदरम्यान तंबाखूचा वापर केल्यास बाळाचा अकाली जन्म होऊ शकतो. शिवाय, यामुळे मुलाचा जीवही धोक्यात येतो.
  • निकोटीनमुळे रक्तदाब वाढणे, हृदयाचे अनियमित ठोके यांसारख्या समस्या दिसू शकतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
  • तंबाखूमुळे होणारे धोके टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत नियम अधिक मजबूत करण्याची गरज आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी. लोकांना तंबाखू सेवन, विशेषत: वाफ घेण्याच्या धोक्यांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती मोहिमांची गरज आहे.

T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तान बाहेर; अमेरिकेची सुपर-8 मध्ये धडक

PAK out OF t20 worldcup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. काल आयर्लंड विरुद्ध USA सामना पावसामुळे वाया गेल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला. दोन्ही संघाना १-१ गुण देण्यात आले. यामुळे पॉईंट टेबल नुसार, USA चा संघ सुपर -८ मध्ये पोचला आहे. पाकिस्तानला पाहिल्यास सामन्यात USA कडून सुपर ओव्हर मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, तोच पराभव आता निर्णायक ठरला असं म्हणावं लागेल. बाबर आझमच्या नेतृत्त्वातील पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

फ्लोरिडातील पाऊस आणि पूरस्थितीचा फटका तिथं होणाऱ्या सामन्यांना बसेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. काल सुद्धा नेमकं हेच घडलं. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील सामना पावसामुळे वेळेवर होऊ शकला नाही. अखेर पंचानी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण दिला. याचा थेट फटका पाकिस्तानला बसला. कारण अमेरिकेचे आता 5 गुण जमा झाले आहेत तर पाकिस्तानचे केवळ २ गुण आहेत. पाकिस्तानची एक मॅच शिल्लक असली तरी त्यांना या गुणांची बरोबरी करणं अशक्य आहे. त्यामुळे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचा प्रवास संपला आहे.

कसा होता वर्ल्डकप मधील पाकिस्तानचा प्रवास –

एकेकाळचा T20 वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तानच्या संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ सारखे तगडे खेळाडू पाकिस्तानकडे असल्याने पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरी गाठेलच असं वाटत होते मात्र साखळी फेरीतच पाकिस्तान गारद झाला. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानलाअमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी हातात आलेली मॅच गमावली. त्यानंतर याशिवाय पाकिस्ताननं कॅनडाला पराभूत केल्यानं त्यांच्या नावावर दोन गुण जमा झाले होते. मात्र, अमेरिका विरुद्ध आयरलँड मॅच रद्द झाल्यानं पाकिस्तानच्या सुपर 8 मधील प्रवेशाच्या आशा संपल्या आहेत.

Bij Bhandval Scheme | ‘या’ योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळणार दीड लाख रुपयांचे कर्ज; कर्जाच्या 20% मिळणार अनुदान

Bij Bhandval Scheme

Bij Bhandval Scheme | आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे समाजातील विविध घटकांसाठी, महिलांसाठी त्याचप्रमाणे तरुण वर्गासाठी वेगवेगळ्या योजना आखत असतात. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटक समान उंचीवर येईल आणि त्यांना चांगल्या गोष्टी करता येईल. अशातच आता सरकारने काही योजना आखल्या आहेत. ज्या योजनांमधून तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी देखील आर्थिक सहाय्य केले जाते.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग लोकांसाठी बीज भांडवल योजना (Bij Bhandval Scheme) सरकारमार्फत राबवली जात आहे. सरकारने आखलेल्या या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करून रोजगार निर्माण करता येणार आहे. त्यामुळे सरकारने ही एक अतिशय चांगली योजना सुरू केलेली आहे. 2024- 25 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे. यासाठी आता पात्रता असणाऱ्या व्यक्तींनी अर्ज करायचे आहे.

सरकारच्या या बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय त्याचप्रमाणे उद्योग शेती संबंधित एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते. ही मदत राष्ट्रीयकृत असलेल्या बँकेच्या माध्यमातून परतफेडीच्या रूपाने दिली जाते. सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही भाड्याने दुकान, कापड दुकान, किराणाचे दुकान, झेरॉक्स मल्टी सर्विस, मसाला उद्योग कृषी सेवा केंद्र इत्यादींसाठी भांडवल घेऊ शकता. या योजनेच्या माध्यमातून सरकार तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेच्या नियमांच्या अधीन राहून देते.

समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेल्या या एकूण कर्ज रकमेच्या 20% कमी तुम्हाला अनुदान म्हणून दिली जाते. जी व्यक्ती पात्र आहे त्या व्यक्तींनी अर्ज करताना तुमच्या आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे सादर करायचा आहे. यावर्षीचा अर्ज करण्यासाठी आठ जुलै पर्यंत ही शेवटची तारीख आहे.

काय आहेत नियम व अटी? | Bij Bhandval Scheme

  • सरकारच्या या बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्ज करणारा व्यक्ती हा अंध, कर्णबधिर अस्थिव्यंग असणे गरजेचे आहे. यामध्ये मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीला अर्ज करता येणार नाही.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय किमान 18 आणि कमाल वय 50 वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे मार्च 2025 पर्यंत वैद्य असलेला उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे तहसीलदाराचे रहिवासी प्रमाणपत्र जोडणे देखील महत्त्वाचे आहे.
  • उमेदवार हा बेरोजगार असल्यास प्रमाणपत्र आणि ठराविक व्यवसायासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे.
  • तसेच रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र 40% च्या पुढे असावे तसेच अर्ज करताना 2 पासपोर्ट साईज फोटो देखील जोडावे.
  • तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे. त्या व्यवसायाचे कोटेशन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट देखील जोडावे.
  • व्यवसायासाठी तुम्ही घेतलेली जागा ही भाड्याने घेतली तर त्यासाठी बंदीची भाडे पावती आणि करारनामा देखील जोडावा.

Viral Video | आगीशी खेळणं पडलं महागात ! व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका

Viral Video

Viral Video | आपण आपल्या आई-वडिलांकडून नेहमीच एक गोष्ट ऐकलेली आहे की आगीशी कधीही खेळ करू नये. कारण आग ही एक अशी गोष्ट आहे, जी अगदी मस्करीत सगळ्याची जळून राख करू शकते. खरंतर आग ही आपल्या दैनंदिन जीवनात खूप गरजेची आहे. अश्मयुगातच आगीचा शोध लागला आणि आगीमुळे आपले जेवण अधिक रुचकर बनते. त्यामुळे आपण आगीवर जेवण बनवून खातो. परंतु कधीकधी ही जाग राक्षसी रूप धारण करते. या आगीमध्ये संपूर्ण जगाचा नाश करण्याची देखील शक्ती आहे. त्यामुळे आगीशी खेळणे ही एक प्रकारे आपल्या जीवाशी खेळणे असे आहे. कारण आगीची एक छोटीशी ठिणगी देखील संपूर्ण जंगलाची राख करून सोडू शकते.

परंतु काही लोकांना हेच समजत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती आगीशी खेळताना दिसत आहे. आणि शेवटी आगीने त्या माणसाला धडा शिकवलेला आहे. या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.

https://twitter.com/PalsSkit/status/1801185566803087824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1801185566803087824%7Ctwgr%5E9f8f80c7f1d8613344e097d34fe279c67f6f52de%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fviral%2Fnews%2Fman-playing-with-fire-and-do-stunt-but-burnt-himself-watch-this-viral-video-2024-06-14-1052660

आगीशी खेळणे महागात पडले | Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आग लावून वेगवेगळ्या युक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या दोन्ही हातात आगीच्या दोन काठ्या दिसत आहे. तो व्यक्ती त्या काठ्या तोंडाजवळ आणते आणि तोंडात भरलेले पेट्रोल आगीत सोडते. मग त्या व्यक्तीच्या तोंडाला देखील आग लागताना दिसत आहे. तसेच त्याच्या कपड्यांना देखील आग लागते. परंतु ही इतके रौद्ररूप धारण करते की तो व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळताना दिसत आहे.

आगीशी खेळणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक्स या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 8 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत..त्याचप्रमाणे अनेक लोक या व्यक्तीवर टीका करत आहेत आणि कमेंट देखील करत आहेत

Kisan Credit Card | शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; फक्त 4% व्याजदराने मिळवा 3 लाखांपर्यंत कर्ज

Kisan Credit Card

Kisan Credit Card | आपल्या देशात बहुतांश शेतकरी आहेत. आपल्या देशातील अर्थव्यवस्था ही जवळपास 75 टक्के शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाहीत. आणि त्यांना चांगल्या प्रकारे पीक घेता येईल. अशाच आता सरकारकडून शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अल्पमुदतीसाठी कर्ज मिळते. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते.

तसेच किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना याशिवाय अनेक सुविधा देखील मिळतात. या योजनेअंतर्गत कार्डधारकांना मृत्यू किंवा कायमचे अपंगत्वासाठी 50 हजार रुपये, तर इतर जखमींसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देखील दिले जाते. या क्रेडिट कार्ड सोबत शेतकऱ्यांना बचत खाते, स्मार्ट आणि डेबिट कार्ड देखील दिले जाते. या बचतीवर त्यांना व्याज देखील मिळते. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे देखील देण्यासाठी सोपे आहे. त्यांना तीन वर्षाची मुदत मिळते.

किसान क्रेडिट कार्डचा लाभ कोणाला मिळतो? | Kisan Credit Card

सरकारच्या या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ जमीन मालक, वाटेकरी, भाडेकरू शेतकरी यांना मिळतो. हे लोक यासाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते जास्तीत जास्त 75 वर्षे असणे गरजेचे आहे.

असा ऑनलाइन अर्ज करा

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या बँकेतून लाभ घ्यायचा आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर क्रेडिट कार्ड हा पर्याय दिसेल.
  • आता तुम्हाला आपला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.
  • तुम्ही हा आजचा सविस्तर भरायचा आहे.
  • आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचे.

Property Market | घरांच्या किमतीत मुंबई जगात तिसरी; टॉपला आहे ‘हे’ शहर

Property Market

Property Market | स्वतःचं घर असाव ही एका प्रत्येक सर्वसामान्य माणसाची सगळ्यात मोठी इच्छा असते. परंतु आजकाल आपण पाहायला गेलो तर घराच्या किमती खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना एक रकमी स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. 2024 मध्ये जर आपण पाहिले तर जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. जागतिक स्तरावरील घरांच्या किमती वाढण्यावर पहिल्या 44 शहरांमध्ये मुंबई ही तिसऱ्या आणि दिल्ली पाचव्या स्थानावर आलेली आहे. रियल इस्टेटचे सल्लागार कंपनी नाईट फ्रॅंक यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. मागील वर्षी यात अहवालात मुंबई ही सहाव्या क्रमांकावर तर दिल्ली 17 व्या क्रमांकावर होती.

नाईट फ्रॅकने प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स Q1 2024 या अहवालात असे म्हटले आहे की, मुंबईतील प्रमुख निवासी विभागांच्या किमती दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 11. 5 टक्क्यांनी वाढलेले आहे. गेल्या वर्षी या यादीत दिल्ली 17 व्या स्थानावर होती. या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. परंतु आता 2024 च्या पहिल्या तिमाहीत बेंगळुरूचे रँकिंग घसरले आणि ते 17 व्या स्थानावर राहिले. गेल्या वर्षी याच कालावधीत बेंगळुरू 16 व्या क्रमांकावर होते. जानेवारी-मार्चमध्ये बेंगळुरूमध्ये घरांच्या किमती 4.8 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नाइट फ्रँक म्हणाले की, प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स (PGCI) हा मूल्यमापन-आधारित निर्देशांक आहे जो त्याच्या जागतिक संशोधन नेटवर्कमधील डेटा वापरून जगभरातील 44 शहरांमध्ये मुख्य निवासी किमतीच्या हालचालींचा मागोवा घेतो. नाइट फ्रँकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले की, निवासी मालमत्तेच्या मागणीचा कल ही जागतिक घटना आहे. ते म्हणाले की, या क्षेत्रांतील आपल्या समवयस्कांप्रमाणेच, प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्सवर मुंबई आणि नवी दिल्लीचे वरचे स्थान विक्रीतील वाढीमुळे मजबूत होते. पुढील काही तिमाहीत विक्रीची गती स्थिर राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारात लवकरच मोठी घसरण होण्याचा इशारा अमेरिकेतील एका प्रमुख अर्थतज्ज्ञाने दिला आहे. ते म्हणतात की हे संकट मोठ्या मंदीपेक्षा जास्त धोकादायक असू शकते. अर्थशास्त्रज्ञ हॅरी डेंट म्हणाले की संपूर्ण ‘बबल’ अद्याप फुटला नाही आणि तो महामंदीपेक्षा वाईट असू शकतो

Viral Video | गाजर, मुळा नाहीतर या मुलीने खाल्ला कच्चा साप; व्हिडीओ पाहून तुम्हाला फुटेल घाम

Viral Video

Viral Video | आपल्या परिसरात अनेक प्राणी आहेत. त्या प्राण्यांमुळेच आपले वन्यजीव आहे. परंतु अनेक लोक हे प्राण्यांना खूप घाबरतात. खास करून सरपटणाऱ्या प्राण्यांना तर लोक खूप घाबरतात. त्यातही जर साप डोळ्यासमोर आला तर काही विचारूच नका. सापाला पाहून लोक अगदी ओरडतच सुटतात. परंतु आपल्या जगात काही असे लोक आहेत. जे सापाला चक्क खातात. काही देशांमध्ये साप अगदी सामान्य गोष्ट म्हणून खातात. चीन आणि व्हिएतनामच्या लोकांमध्ये सापाला खाण्याची पद्धत आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साप आवडीने खाल्ला जातो.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी साप कचाकच चावताना दिसत आहे. अगदी गाजर खाल्ल्यासारखे ती हा साप चावून खात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला त्या सापाचीच क्यूव येईल, अशा पद्धतीने ती मुलगी त्या सापाला खात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक मुलगी एका प्लेटमध्ये साप घेऊन बसलेली आहे. त्या ताटामध्ये अनेक हिरव्या भाज्या असतात. ती मुलगी त्या ताटातील साप उचलते आणि कच्चा साप खाऊ लागते. अगदी गाजर खाल्ल्यासारखा ती त्या सापाचे मांस चावताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ती त्या सापाचे शेपूट देखील चावून खाताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले | Viral Video

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सापाला खाणाऱ्या या मुलीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे. आणि अनेक कमेंट देखील येत आहे. एका युजरने कमेंट केली आहे, “बरं झालं मी भारतात जन्माला आलो.”तर दुसरा एकाने लिहिलेले आहे की, “आता हे चीनी लोक दुसरं काय खाणार.” त्याचप्रमाणे तिसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेली आहे की, “या खाण्यापिण्यामुळे जगात नवीन विषाणू वाढत आहेत.” अशाप्रकारे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत दीड कोटींपेक्षाही जास्त व्युज आलेले आहेत.