Saturday, December 13, 2025
Home Blog Page 6734

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Thumbnail
Thumbnail
पुणे प्रतिनिधी

पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये कष्टकरी व शोषीत वर्गाला घेऊन ठिनठिकाणी आंदोलने करण्यात आली. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यात घेरावा, ठिय्या, रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान दुपारी तीन वाजेपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी, आशा, बांधकाम, किसानसभा आणि सिटू च्या संघटनांनी ठिय्या मांडला होता.

यावेळी काँम्रेड वसंत पवार यांनी केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी काँम्रेड नाथा शिंगाडे यांनी शासनाच्या फसव्या घोषणावर टिका करत हे जनतेचे सरकार नसुन लबाडांचे सरकार आहे असे विधान केले. अंगणवाडी संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमिम यांनी अंगणवाडी शिक्षिका व मदतनिस यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी लढा तीव्र करण्याचे आवहान केले. ठिय्या आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता काही काळ रोखून धरला. काँम्रेड अजित अभ्यंकर, अमोल वाघमारे, डाँ.मंगेश मांडवे, भारती अवसरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

पुण्यात पी.एम.टी. बंद

Thumbnail
Thumbnail

पुणे । लक्ष्मी रोड जवळील शगुन चौकात पुणे म.न.पा. ची बस फोडण्यात आली. मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पीएमटी सेवा ही अंशतः महत्वाच्या मार्गावर पोलिसांच्या मदतीने चालू ठेवण्यात आली होती. परंतु या घटनेमुळे पीएमटी बस सेवा सध्या थांबवण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड पूर्णपणे बंद असून सगळी कडे शुकशुकाट पसरलेला दिसत आहे.

शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांचे ठिय्या | #MarathaReservation

Thumbnail
Thumbnail

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा मोर्चा चे आंदोलक पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार हे देखील आंदोलकांमधे सामील झाले तसेच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

मराठा क्रांन्ति मोर्चा ने १ आॅगस्ट पासून राज्यातील लोकप्रतिनीधींच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. याचाच भाग म्हणुन आज शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पवार यांनी याआधीच मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

#MarathaReservation | राज्यात एस.टी. सेवा बंद

IMG
IMG

पुणे | मराठा क्रांन्ति मोर्चा ने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पुण्यामधे सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी कसलाही हिंसाचार होवू नये याकरता पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

चाकण येथे झालेल्या आंदोलनात पी.एम.पी.एल. च्या दहा बस ची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामधे पी.एम.पी. चे लाखोंचे नुकसान झाले होते. यापार्श्वभुमीवर पुर्वखबरदारी म्हणुन एस.टी. महामंडळाने सर्व बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज खबरदारी म्हणुन पुणे शहरातील सर्व बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

Thumbnail
Thumbnail

पुणे । आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदच्या निम्मिताने पुण्यातील अनेक शाळा, महाविद्यालये व इतर संस्था यांना एक दिवस सदर संस्था बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेश दिले आहेत. काहीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली असून अनेक संस्थांना यासंन्दर्भात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले आहे.

मराठा क्रांती मोर्च्याने घेतलेल्या पवित्र्यामुळे हा बंद क्रांती दिनाच्या निम्मिताने पुकारण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने आज योग्य ती खबरदारी घेतली असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील तसेच कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची योग्य तयारी केली आहे.

मेजर कौस्तुभ राणे याच्यावर उद्या अंत्यसंस्कार

Thumbnail
Thumbnail

मीरा रोड (मुंबई) | कश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले अहेत. विशेष विमानाने पार्थिव आजच त्यांच्या घरी आणले जाणार होते परंतु खराब हवामानामुळे आज येणारे पार्थिव उद्या आणले जाणार आहे.मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर उद्या सकाळी ९वाजता मीरा रोडच्या वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मेजर कौस्तुभ राणे यांनी शौर्य पदक मिळणार होते २६जानेवारी २०१९ला याचे वितरण होणार होते त्या अगोदरच त्यांना मृत्यूने गाठले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या मीरा रोडच्या घरा भोवती शोककळा पसरली आहे.त्याच्या पाठीमागे आई वडील पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.मेजर कौस्तुभ राणे यांच्या डोळ्यात अश्रू आलेले नाहीत त्यांच्या दुःखाला वाट करून देण्याचे दिव्य त्यांच्या परिवारावर आहे. मेजर कौस्तुभ राणे यांच्या बलिदानाचा मला अभिमान वाटतो असे मेजर कौस्तुभ राणे यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

दादा कोंडकें बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Thumbnail
Thumbnail

टीम HELLO महाराष्ट्र | मराठी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी कलेमुळे आणि अडल्ट जाॅक्समुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या दादा कोंडकेंची आज जयंती. कोणासाठी सोंगाड्या तर कोणासाठी पांडू हवालदार असणार्या दादा कोंडक्यांचं हाफ बर्मुडा आणि खाली लोंबत असलेली नाडीतलं रुप आजही कित्तेकांना हसायला भाग पाडतं. अशा या दादा कोंडकेंच्या या गोष्टी तुम्हाला माहीती ऄहेत का?

१. माझी इच्छा पूर्ण करा या मराठी नाटकातून दादा कोंडकेंनी अभिनयाला सुरवात केली. १९६५ मधे सुरु झालेले हे नाटक समाजवादी विचाराचे वसंत सबनिस यांनी लिहिले होते. दादा कोंडके यांनी ‘माझी इच्छा पुर्ण करा” या नाटकाचे तब्बल १,१८५ शो केले होते. सदर नाटकात तमाशा या लोककलेच्या आधारे लोकांच्या प्रश्नांवर टिपण्णी करण्यात आली होती.

२. १९७५ साली दादा कोंडके यांचा “पांडु हवालदार” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की त्यानंतर काही वर्ष महाराष्ट्रात पोलीसांना पांडू हवालदार असेच म्हणून संबोधण्यात येऊ लागले.

३. दादा कोंडके तमाशातील कलाकार असून कलात्मक चित्रपटांमधे काम करण्याची त्यांची क्षमता नसल्याचे बोलून त्यावेळचे अभिनेते कोंडकेंवर चिडून असायचे. परंतू दादा कोंडकेंनी कलेवरील आस्थेच्या अधारावर सिनेसृष्टीत आपले वजन कायम ठेवले. जब्बार पटेल यांच्याबद्दल दादा कोंडकेंनी असेच विधान केले होते.

४. १९७१ साली प्रदर्शीत झालेला दादा कोंडकेंचा “सोंगाड्या” चित्रपट विशेष गाजला. यामधे तमाशात काम करणार्या एका नृत्यंगणाच्या प्रेमात बुडालेल्या युवकाची कहाणी सांगण्यात आली आहे.

मातोश्री नेशनल स्कूल चे बाल शोषणाविरुद्ध जनजागृती रॅली चे आयोजन

Thumbnail
Thumbnail

पुणे ‌| समाजामध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या बाल लैंगिक मानसिक शारीरिक शोषणाचे प्रमाण वाढले असून त्याविरुद्ध आवाज अभावनेच उठविले जाते, बाल वयापासून या प्रवृत्ती मुळे बालकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होते व खच्चीकरण होते, ज्याचा परिणाम त्यांच्यावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर देशावर होतो, देशाचा मुख्य घटक व उद्याचे भविष्य म्हणून आपण यांच्याकडे पाहतो, त्यांच्या शोषणा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी मातोश्री स्कूल ने दिनांक १९/८/२०१८ रोजी स्कूलपासुन ते डॉ आंबेडकर चौकापर्यंत रेलीचे आयोजन केले आहे, यात बालक सहभागी होणार नसुन पालक व सर्वसमावेशक समाजाला जागृत करण्यासाठी यात सहभागी होण्याचे आवाहन मातोश्री नेशनल स्कूल चे प्रमुख मनीषा काशिद यांनी केले,

शोषण व शोषणाचे प्रकार

‌शोषण हे भावनिक, लैंगिक, शारीरिक, मानसिक, स्वरुपात असू शकते, शोषण कौंटुंबिक व्यक्तिंकडुन सुद्धा होउ शकते, या पूर्वीही असे अनेक प्रकार उघड़ीस आले आहेत.

१‍) शरीरिक बालशोषण
‌२) लैंगिक बालशोषण
‌३) मानसिक बालशोषण
‌४) बालकामगार शोषण

म्हणून झाली संसद दिवसभर तहकूब

Thumbnail
Thumbnail

नवी दिल्ली | संसदेच्या दोन्ही सभागृहात आज एम.करुणानिधी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने आज एम.करुणानिधी यांच्या निधनामुळे एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. म्हणून संसदेची दोन्ही सदने दिवसभरा साठी तहकूब करण्यात आली आहेत. करूणानिधींचा पक्ष जरी प्रादेशिक असला तरी त्या पक्षाचा दिल्लीच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. करुणानिधी यांच्या निधनामुळे दक्षिणेच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लोकसभेत आणि राज्यसभेत करुणानिधी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला आणि संसदेचे कामकाज दिवस भरासाठी तहकूब करण्यात आले आहे आहे. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दक्षिणेचा सिने अभिनेता रजनीकांत यांनी करुणानिधी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे.

इम्रान खान यांना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी

Thumbnail
Thumbnail

पेशावर | पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेट पटू इम्रान खान याना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत खान यांनी पाच मतदान संघांतून निवडणुक लढवली होती. यामुळे निवडणुक आयोगाने त्यापैकी इस्लामाबाद आणि लाहोर मतदार संघाचे निकाल राखून ठेवले होते.

दरम्यान ५ आॅगस्ट रोजी खान यांनी ११ आॅगस्ट ला पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याचे जाहिर केले होते. परंतु आयोगाच्या निर्णयाने शपथविधीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र जाहीर झालेल्या तीन मतदार संघांच्या निकालावरुन निवडणुक आयोगाने इम्रान खान यांना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी दिली आहे.