Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6736

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai
Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले.

आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. जगात येणारे नवीन तंत्रज्ञान आयआयटीमध्ये आलेच पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात भारत कसा पुढे जातो आहे याचा पाढाच मोदींनी वाचला.
आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. पंतप्रधान येणार आहेत म्हणून आयआयटी मुंबईच्या चौफेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

youth politics in india
youth politics in india

दीपक चटप

“तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग

सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत आणि तिथे लोकशाही प्रस्थापित होत आहे. त्यातूनच अरब स्प्रिंगमधे लाकशाहीला सुरवात झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होऊन त्यांच्या देशातील राजकारण बदलवीत आहेत. त्यामुळेच राजकारणात युवक हा महत्वाचा घटक आहे ते पुन्हा सिद्ध होत आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडासा आॅर्डन याचं वय ३७ वर्ष आहे. टोनी ब्लेअर- डॅविड कॅमेराॅन हे ४३ व्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान झाले. बऱ्याच देशात विधिमंडळात युवकांसाठी जागा राखीव आहेत. युवकांच्या प्रत्यक्ष राजकीय सहभागाने जगाचे राजकारण आज झपाट्याने बदलत आहे. समाज हा आणखी चांगल्या व्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे.

इतर महत्वाचे लेख –

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

विद्यार्थ्यांनी राजकारण केल पाहिजे का हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तुम्हाला वाटत असेल किंवा नसेल परंतु राजकारणाचा भाग तुम्हाला व्हावच लागतं. व्हाल्टेअर म्हणतात ‘आपल्यावर कोणाचे राज्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कोणावर टीका करू शकत नाही, हे आधी जाणून घ्यावे’. आज सरकारने नोटबंदी, जी.एस.टी. असे विविध निर्णय घेतले. त्या निर्णयांचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मर्जीत असो अथवा नसो पण होत आहे. आपण सर्वच राजकीय प्रक्रियेचे आणि राजकारणाचे भाग आहोत. तेव्हा विद्यार्थ्यांनी राजकारण केल पाहिजे का ? या प्रश्नापेक्षा विद्यार्थ्यांनी राजकारण का केले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे.

राजकारण म्हणजे काय? आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान होण म्हणजे राजकारण होत का? कि सत्ता, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळविण्याचे माध्यम म्हणजे राजकारण..! तरुणानो आपल्याला शाॅर्ट कट ची सवय लागली आहे. एक लक्षात ठेवा राजकारण म्हणजे सत्ता, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा नव्हे तर राजकारण म्हणजे समाजात निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष, Civil Society दबावगट निर्माण करण्याचे माध्यम आहे. राजकारणात येण्याआधी तुम्हाला राजकारणात का यायचं आहे आणि येऊन काय करायच आहे ते ठरवा. ध्येय आणि उद्दिष्ट चांगले ठेऊन रचनात्मक राजकारण केल्यास नक्कीच राजकारणाडे बघण्याची दृष्टी बदलेल आणि हे देशकार्य युवकांना हातात घ्यावे लागेल.

आज देशातील संसदेत ३० पेक्षा कमी वय असणारे फक्त १२ खासदार आहेत. ह्या १२ खासदारांपैकी बहुतांश खासदारांच्या घरात पारंपारिक राजकारण होत. त्यामुळे युवक म्हणून किंवा त्यांच्या कर्तुत्वामुळे त्यांना निवडून दिलंय का याबद्दल शंकाच आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, नेहरू, बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या नेत्यांनी युवक असताना केलेल्या आंदोलन, संघर्ष आणि चळवळीतून देशाचे राजकारण बदलले. स्वातंत्र्यानंतर १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकारणात झपाट्याने बदल होऊ लागला. राजकारणात निवडणूक खर्च, वोट बँक, जात-धर्म-भाषा या अस्मिता टोकदार झाल्यात, मनी पाॅवर आणि मसल पाॅवर च्या राजकारणाने राजकारणाचा स्तर खालावला आणि सज्जन लोक त्यापासून दुरावले. राजकारण बरबटले आहे, हे जरी खरे असले तरी त्यापासून आपल्याला पळून जाता येणार नाही. जर आपण पळून जात असाल तर ज्या आईने लहानाच मोठ केल त्या आईशी तुम्ही प्रामाणिक नाहीत असाच त्याचा अर्थ होईल.

भगतसिंग म्हणतात, “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” आज सर्वत्र राजकारण दुषित होत असताना आजही राजू शेट्टी, बच्चू कडू, गणपतराव देशमुख, वामनराव चटप यांच्यासारखी काही उदाहरणे आहेत जी लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांशी प्रामाणिक राहून राजकारण करीत आहेत.

आज देशात जरी लोकशाही व्यवस्था असली तरी दुर्दैवाने पक्षांतर्गत लोकशाही कमी आहे. पक्षांचा बहुतांश कारभार हुकुमशाही प्रवृत्तीनेच चालतो. त्यामुळे भारतीय लोकशाही हुकुमशाही प्रवृत्तीत गुदमरत आहे. हि अबाधित राहण्यासाठी पक्षांतर्गत लोकशाही महत्वाची आहे.

मी गेल्या आठवड्यात सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांना भेटलो. ते गेल्या ५५ वर्षांपासून आमदार आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितल कि बॅरिस्टर अन्तुलेजी यांच्या आधीचे सर्व मुख्यमंत्री राज्यात निवडून आलेले आमदार ठरवत त्यानंतर मात्र हायकमांड म्हणेल ते मुख्यमंत्री व्हायला लागले. आजही ती परंपरा कायम आहे.

आज देशात दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, बुखारी, गौरी लंकेश या विचारवंतांच्या झालेल्या हत्या, जमावाकडून होत असलेल्या हत्या (Mob Lynching) आणि एका केंद्रीय मंत्र्याकडून संविधान बदलाची होत असलेली भाषा हे सार आपल्याला कुठ घेऊन जाणार आहे..? याचा विचार केला पाहिजे. ‘केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य’ या प्रसिद्ध खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे कि, “लोकनियुक्त सरकारला संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे. मात्र संविधानाचा मुलभूत ढाचा (basic structure) मध्ये कोणतेही सरकार बदल करू शकत नाही.” आता basic structure म्हणजे काय ? हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगू अस सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये म्हटल आहे.

इतर महत्वाचे लेख –

क्रांतिसिंह नाना पाटील

कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय, दरवर्षी सव्वा कोटी युवकांची फौज बेरोजगार – प्रा.हरी नरके

घटना बदलाची भाषा, संवैधानिक मुल्यांची सरास पायमल्ली होत असतानाच कधी नव्हे ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच “सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन अस म्हणाव लागल की, “आम्ही आमचा आत्मा विकला होता अस उद्या जाऊन कोणी म्हणायला नको.” यापूर्वी गेल्या ६० वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशावर ही वेळ आली नव्हती.

संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरवात आम्ही भारताचे लोक या शब्दांपासून होते. हि सुरवात लोकशाही राज्यात राहणाऱ्या आपल्या सर्वाना जबादारीची जाणीव करून देते. उमेदवार निवडीसोबतच पाच वर्षेलोकप्रतिनिधीच्या कामाकडे लक्ष ठेवणे आणि वेळप्रसंगी स्वत: लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे हि लआपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. परिस्थिती गंभीर आहे, ही हाताबाहेर जाण्याआधी तुम्ही राजकारणात सक्रीय झालाच पाहिजे.

Deepak Chatap

 

दीपक चटप

[email protected]
(लेखक विधि महाविद्यालयातील विद्यार्थी तथा युवक राजकारणातील सक्रिय कार्यकर्ते आहेत.)

 

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात त्याने म्हटलं भारतीय गाणं

Atif Aslam
Atif Aslam

पी.टी.आय. वृत्तसंस्था

कराची | मुळचा पाकिस्तानचा असलेला मात्र बाॅलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणं म्हटलेला गायक अतिफ अस्लम ला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. न्युयोर्क येथील पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन परेडमधे अस्लम यांनी भारतील गाणं म्हटल्याने त्याला पाकिस्तान स्थित नेटकर्यांनी ट्रोल केले आहे. नुकत्याच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अतिफ ने “तेरा होने लगा हूँ” हे २००९ साली प्रदर्शित झालेल्या अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील गाणे गायले होते.

याबाबतीत पाकिस्तानी मिडियानेही अतिफ अस्लम यांच्यावर टीका केली अाहे. मात्र फिल्मकार ओमैर अलावी यांनी ‘बाॅलिवुड चे सर्व चित्रपट पाकिस्तान मधे जवळ जवळ सार्याच चित्रपट गृहांनधे उघड पणे दाखवले जातात. आणि चित्रपटांना, त्यातील गीतांना कोठलीच सीमारेषा लागू होत नसते’ असे विधान केले आहे.

अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत होणार तात्काळ अटक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेने ठरवला रद्दबादल

Thumbnail
Thumbnail

नवी दिल्ली | काल राज्यसभेने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ला मंजुरी दिली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील तात्काळ अटकेच्या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत तात्काळ अटक करण्याला मान्यता नाकारली होती तर अॅट्रॉसिटीकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ही जमीन मिळेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाचे खंडन करण्यासाठी मोदी सरकारने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ संसदेत मांडले. लोकसभेत पारित झालेले विधेयक काल राज्यसभेत ही पारित झाले आहे. आता राष्ट्रपतीनी स्वाक्षरी केली की दुरुस्ती कायद्यात रूपांतरित होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दलित संघटनांनी भारत बंदचे आंदोलन केले होते यात आठ आंदोलक हिंसाचारात ठार झाले होते. याची गंभीर दखल मोदी सरकारने घेत अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ मांडून ते मंजूर करून घेतले आहे.

 

इतर महत्वाचे 

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहीत पवार धारवीत जातात..

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Thumbnail
Thumbnail

भंडारा | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील निमसर गावी घडली आहे. आशिष राणे नावाच्या तरुणाने त्याच्याच गावातील एका मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचे उघड झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राणे आणि सदर मलगी यांच्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. राणे याणे मुलीला मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगून वारंवार बलात्कार केला. मात्र मुलीने लग्नाची विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी देत राणे याने लग्नाची मागणी धुडकावून लावली. सदरचा प्रकार मुलीने घरच्यांना सांगितला तेव्हा मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली.

इतर महत्वाचे  –

या पाच गोष्टी केल्यावर मुली होतात इम्प्रेस

ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या

पोलिसांनी आरोपी आशिष राणे याला अटक केली असून त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन होती आणि अनुसूचित जातीची होती. याच कारणाने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आल्याने अॅट्रॉसिटी आणि पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.

इतर महत्वाचे  –

धक्कादायक! हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवतीने दिला रेल्वे खाली जीव

Friendship Day Special | फेसबुक फ्रेंड

राहुल गांधींवरील खटल्याची आज सुनावणी

Rahul gandhi supreem court
Rahul gandhi supreem court

भिवंडी | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी भिवंडीतील प्रचार सभे दरम्यान केला होता. त्यावरुन राजेश खुंटे या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी मागील तारखे वेळी मला आरोप मान्य नाहीत असा दावा केला होता. त्यानंतर आज खटल्याची सुनावणी असून न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी आज या खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडीत येणार आहेत.

राहुल गांधींच्या खटल्याची सुनावणी आज कोर्टात असल्याने भिवंडी कोर्टाला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सनातनच्या कार्यकर्त्यांच्या घरात पोलीसांचा छापा, स्फोटके जप्त

संस्था राऊत
संस्था राऊत

नालासोपारा | गोरक्षक असलेल्या वैभव राऊत या सनातन कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यादरम्यान पोलिसांना राऊत यांच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला असून सर्व स्फोटके पोलीसांनी जप्त केली आहेत. राऊत यांच्या घरात ८ देशी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे समान आढळले आहे. पोलिसांनी राऊत यांच्या घरा बाहेर तीन दिवसांपासून सापळा लावला होता. त्यात त्यांच्या संशयित हालचाली दिसू लागल्याने पोलिसांनी घरावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला. वैभव राऊत यांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

इतर महत्वाचे  –

डाॅ. दाभोळकरांच्या हत्येला पाच वर्ष उलटली तरी खून्यांचा पत्ता नाही, नेटीझम्स मधे संताप

सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड

वैभव हा गोरक्षक आहे. त्यामुळे त्यांच्यावर बकरी ईद च्या तोंडावर दर वर्षी कार्यवाही करण्यात येते. मागे ही त्याच्यावर अशीच कार्यवाही केली गेली होती. तेव्हा त्याने सनातनची मदत मागितली होत. ‘आम्ही तेव्हाही त्याला मदत केली होती आणि आत्ता ही त्याला लागेल ती मदत करु’ असे सनातन संस्थेच्या वकिलांनी सांगितले आहे. तर ‘वैभव आमचा कार्यकर्ता नाही. गृह खाते आणि गृहमंत्र्यांवर आमचा विश्वास नाही. ते नेहमीच आमच्या विरोधात कार्यवाही करत असतात’ असे सनातन संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

Thumbnail
Thumbnail

धारावी, युवकांची आणि असंघटीत क्षेत्राची – रोहीत पवार

मुंबईतील धारवी आणि परिसरात राहणार्या लोकांबद्दल, त्याच्याकडे असलेल्या रोजगाराच्या संधीं आणि त्याच्या एकंदर जिवणावर भाष्य करणारा रोहीत पवार यांचा खास लेख

           क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय माहित आहे का ?अर्थकारणातील एक साधी गोष्ट म्हणजे क्रेडिट सिस्टिम. यात काय असतं तर कोणताही व्यवहार करताना माणसं माणसांवर विश्वास ठेवतात. तो पैसा परत करतो हा विश्वास. या विश्वासावर व्यवहार चालतात. छोटेमोठ्ठे उद्योग उभा राहतात. हजारो लाखों कुटूंब जगतात.आत्ता एक उदाहरण सांगतो, असाच एक छोटा उद्योग होता. जास्त नाही आठ दहा जण मजुरांना घेवून करण्यात येणारा. यात क्रेडिट सिस्टिम असल्यानं उत्पादन झालेला माल हा उधारीवर पुढे गेला. अचानक नोटबंदी झाली. समोरच्या व्यक्तीबरोबर खूप वर्षांचा व्यवहार होता, पण त्याच्याकडे द्यायला पैसे नव्हते. आठ दहा मजूरांना घेवून उभा केलेल्या व्यवसायात त्याला रोजची मजूरी द्यायची होती. पण आत्ता जवळ रोख पैसा नव्हता. एका निर्णयामुळे खेळत भांडवल शुन्य झाले.परिणाम काय झाला ? आठ दहा मजुरांमुळे चालणारा उद्योग बंद झाला. आठ दहा मजूर म्हणजे किमान चाळीस जणांच पोट भरण्याचं साधन. तेच बंद झालं. परिणाम काय झाला ? आठ दहा मजुरांमुळे चालणारा उद्योग बंद झाला. आठ दहा मजूर म्हणजे किमान चाळीस जणांच पोट भरण्याचं साधन. तेच बंद झालं. Rohit Pawar

इतर महत्वाचे लेख

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार

          आत्ता सांगण्यासारखी दूसरी गोष्ट म्हणजे हे उदाहरण खरं आहे.तो छोटा उद्योग करणारा व्यक्ती खरा आहे. त्याच्याकडे काम करणारे ते मजूर खरे आहेत आणि त्यांच कुटूंब देखील खरं आहे. ते सर्वजण धारावीत राहणारे. मुंबईच्या पावसामुळे गळणाऱ्या एका खोलीत दाटीवाटीने राहणारे सर्वजण माझ्याशी बोलत होते तेव्हा एक निर्णय चुकीचा निघाला तर काय होवू शकतं याच जिवंत उदाहरण माझ्या समोर होतं.
          काही दिवसांपुर्वी धारावीत भेट दिली. कारण अस होत की, सृजन उद्यौजकता व कौशल्य विकास कार्यक्रम राबवत असताना असंघटीत क्षेत्रात निर्माण झालेले प्रश्न जाणवत होते. आपण म्हणतो असंघटीत क्षेत्र खूप मोठ्ठ आहे. असंघटीत क्षेत्राच खूप नुकसान झालं. आरोप प्रत्यारोप होतात पण नेमकं काय चाललं आहे ते पाहावं, राजकारणाच्या पलिकडे जावून या गोष्टी समजून घ्याव्यात. चुक आणि बरोबरीच्या पलिकडे एक माणूस म्हणून माणसांच्या अडचणी समजून घ्याव्यात म्हणून धारावी पुर्ण दिवस फिरून काढली. एक दिवस म्हणजे काही जणांना कमी काळ देखील वाटेल पण या एका दिवसात जे दिसलं, जे पटलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
        धारावीची लोकसंख्या अंदाजे आठ ते दहा लाख. आणि क्षेत्रफळ 2.1 चौ.किलोमीटर. म्हणजे पर चौ. किलोमीटर मागे ५ लाख लोकं. म्हणजे किती तर एका छोट्या खोलीमध्ये दहा ते पंधरा मजूर. दिवसभर व्यवसाय करुन त्याच गाड्यांवर झोपणारे मजूर. चालण्यासाठी छोटीशी वाट. या गर्दीतून या छोट्याशा वाटेवरुन चालत गेला तर समोर दिसतात दाटीवाटीनं जगत एकमेकांना आधार देत एक छोटासा व्यवसाय उभा करत सुमारे आठ ते दहा हजार कोटींची अर्थव्यवस्था चालवणारी माणसं !
Thumbnail
            मी सकाळी नऊ दहाच्या सुमारास धारावीमध्ये पोहचलो होतो.अशाच एका बोळातून वाट काढत पुढे गेलो तर एक मुलगा प्लॅस्टिकच्या बाटल्या, रिकामे ग्लास घेवून जात होता. तो काय करतो तर ते भंगारमध्ये विकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वस्तू रिसाइकल होतात. त्याच्यासारखे अनेक लोक हे काम करतात. या कामातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात महिलांचा समावेश आहे. त्या मुलाचा माग काढत पुढे गेलो तर एका चहावाला भेटला. त्याची गंमत्त अशी की त्यानं प्लॅस्टिकबंदीमुळे आपल्या गाड्यावर पाटी लावली होती. “पार्सलसाठी घरातून भांडी घेवून येणे.” गोष्ट गंमतीशीर वाटली पण या बंदीमुळे व्यवसायाची एक साखळी तुटल्याची देखील दखल आपणाला घ्यावी लागेल. आत्ता प्लस्टिकबंदी चुकीची आहे अस माझं म्हणणं नाही, पण व्यवसायाची एक साखळी आपल्या घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाने तुटणार असेल तर त्यासाठी पर्याय निर्माण करण्याची, त्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे इतकच सांगायच आहे. Rohit Pawar

           चहावाल्याच्या समोरच एक केसकर्तनालय होतं. २०० रुपयात तो केस, दाढी आणि चेहरा फेशियल करुन देतो. गेली ९ वर्ष तो हा व्यवसाय करतोय. छोट्या मोठ्या दूकानाबरोबर इथे फिरते केशकर्तन करणारी माणसं देखील होती. ती काय करतात तर जिथे गिऱ्हाईक मिळेल तिथे ठाम मांडून व्यवसाय सुरू करतात. त्याच्याशी जेव्हा बोललं तेव्हा तो म्हणाला, आत्ता लोकं फक्त केस कापतात. दाढी घरीच करतात. मला वाटत सध्या काय परस्थिती आहे हे सांगण्यासाठी अत्यंत छोट आणि महत्वाच उदाहरण हे असावं. अशाच प्रकारे कपडे धुण्याचं ते इस्त्री करण्याचं काम चालतं. छोट्याशा जागेसाठी दहा हजारांच भाडं. बाकी महिन्यांचा हिशोब वेगळा. त्यातून त्याला मिळणारा नफा म्हणजे जगण्यासाठी मिळतील तितकेच पैसै. शिल्लक अस काहीच नाही. जेवण करण्यासाठी एक कॅन्टिन होतं. कामगारांना स्वस्तात जेवण तिथेच उपलब्ध होतं. कॅन्टिनवाल्याकडे आठवड्याला पाचशे ते सातशे माणसं जेवण करतात. असे कित्येक व्यवसाय याठिकाणी निर्माण झाले आहेत. हि झाली तिथल्या लोकांच्या सोयीसाठी निर्माण झालेली अर्थव्यवस्था. भारतातल्या कोणत्याही खेड्यात किंवा कोणत्याही शहरात तुम्हा दिसते अगदी तशीच. फरक फक्त इतकाच की समोरच्याची आर्थिक परस्थिती देखील आपल्या सारखीच आहे याचा विचार करुन कमी पैशात जास्तीत जास्त चांगल देणारी हि अर्थव्यवस्था. पण ही छोटीशी अर्थव्यवस्था ज्यामुळे चालते. ज्या कारणामुळे तिथे मजूर राहू शकतात असे कोणते उद्योग या ठिकाणी आहे. व त्यांची सध्या काय अवस्था आहे हे मला पहायचं होतं.धारावीतल्या अशाच एका बोळातून मार्ग काढत मी एका लेदर व्यावसायिकाकडे गेलो. या भागात लेदरचे १०० व्यवसाय असतील. आणि त्या व्यवसायांवर अवलंबून असणारे हजारो कामगार. निर्माण करण्यात आलेली बॅग, जॅकेट , बेल्ट, पाकिट अशा वस्तू विकणारी ३०० च्या दरम्यान दूकान. उत्पादन करणारे, ब्रॅण्ड निर्माण करणारे व ते होलसेल व रिटेल भावात विकणारी अशी हजारो कुटूंब इथ राहतात.

Rohit Pawar talking With Dharavi Locals

अशाच एका लेदर व्यवसायिकांला मला भेटता आलं. हातात खेळत भांडवल नसल्याने त्याचा मित्राचा धंदा बुडाल्याचं त्यांन सांगितलं. तो सांगू लागला,” नोटबंदीनंतर एका आठवड्याभरातच लोकांच्या हातातले रोख पैसै संपले. इथले सर्व व्यवहार हे रोखीतच होतात. याचं कारण अस नाही की, लोकांना काळा पैसा कमवायचा आहे. लोकांच शिक्षण कमी, शिवाय टॅक्स सिस्टिमबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसतं. एखादा नवीन निर्णय आला तर पहिलीतल्या मुलाला दहावीची परिक्षा द्यावी लागते अस वाटतं. खूप कमी जणांना निर्णय समजतात. लोकांना टॅक्स सिस्टिम माहीत नाही. त्याची माहिती होते इतक्यात त्यात बदल केले जातात. विश्वास असल्याने अनेकदा व्यवहार उधारीवर चालतात. त्यातून खेळतं भांडवल हेच व्यवसाय जिवंत ठेवतं. नोटबंदीनंतर हातात असणारे पैसे संपले आणि लोकांना आत्ता काय करायचं याचा प्रश्न भेडसावू लागला. काही लोक कसेबसे तगले तर काही बुडाले”. मात्र या व्यावसायिकांनीच धारावी नावाचा लेदरचा स्वत:चा असा ब्रॅण्ड देखील विकसित केला आहे.

          एक मोठ्ठी इंडस्ट्री येथे उभा झाली आहे. इथले लेदरचे जॅकेट बाहेरच्या देशांमध्ये देखील जातात. मधल्या अनेक साखळ्यांमुळे उत्पादकांच्या हातात राहणारी किंमत नाममात्र असली तरी निदान उलाढाल होते. ब्रॅण्डिंग होतं व त्यातून व्यवसाय सेटल होतो. मात्र अचानकपणे शासकिय पातळीवर एखादा असा निर्णय घेतला जातो की, हातातलं काम सोडून कामगारांना पुढे काय करायचं याचाच प्रश्न पडतो. असाच दूसरा उद्योग म्हणजे कपडे डाईंग करण्याचा. कपडे डाईंग करणे म्हणजे कपड्यांना रंग देणं. कपडे शिलाई करणं, कपड्यांना रंग देणं अशा कामं देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी केली जातात. याच ठिकाणी एक तरुण मला भेटला त्याच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा तो म्हणाला अगोदर इथे वीस माणसं काम करत असतील तर आत्ता दहा जण करतात. कामगारांची संख्या निम्यावर आली. नोटबंदी करण्यात आली तेव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. पैशाला पैसे जोडून साठवले होते. काम बंद झाल्यानं पुढं काय करायची त्याची काळजी आणि त्याच बरोबर बहिणीचं लग्न अस संकट होतं. Rohit Pawar

          तो मनापासून सांगत होता आणि मला आठवलं ते नोटबंदीनंतर जपानच्या दौऱ्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं भाषण. त्यात ते “घर मैं शादीं हैं पैसे नहीं हैं” म्हणून टाळी वाजवत होते. टिव्हीवर गंमतीशीर वाटणारा प्रसंग प्रत्यक्षात एखाद्याचा जीवनमरणाचा प्रश्न बनू शकतो हे आपण कस काय विसरुन जातो? शेवटी तो पोटतिडकीने म्हणाला, “पुर्वीच सरकार बोलत नव्हतं पण काहीतरी करत तर होतं, हे सरकार बोलतं पण करत काहीच नाही आणि काही केलच तर ते आमच्यासारख्या छोट्या लोकांचं कंबरड मोडणार असतं”. असेच बॉक्स तयार करणारे कामगार, रंगाचे डब्बे केमिकलने धुवून पुन्हा वापरासाठी तयार करणारे कामगार, प्लॅस्टिंकचं रिसायकलिंग करणारे कामगार, रेक्झिनच्या पिशव्या करणारे कामगार असे अनेकजण. आणि यांच्या सोयीसाठी उभा राहिलेली दूसरी अर्थव्यवस्था. चहा दुकानदार, कॅन्टिन चालवणारा, केशकर्तन करणारा, कपडे इस्त्री करुन देणारा, भाड्याने जागा देणार असे अनेकजण..असे कित्येकजण या दोन चौरस किलोमिटरच्या भागात जगतायत. बर ते जगतात कसे तर इथेच मशिद, इथेच मंदिर इथेच बौद्धविहार. ते एकोप्याने जगतायत कारणं, ज्यांना पोटाचा प्रश्न भेडसावत असतो त्यांना जाती आणि धर्माचे प्रश्न कधीच पडत नाहीत.दिवसभर मी या माणसांबरोबर बोललो. त्यांच्यासोबत राहिलो. कदाचित हा एक दिवस तुम्हाला छोटा देखील वाटेल. पण आपली अर्थव्यवस्था कशी चालते आणि ती कुणामुळे चालते हे सांगण्यासाठी दिवसभरात समजुन घेतलेल्या गोष्टी पुष्कळ होत्या.

       धारावीत दिवसभर फिरल्यानंतर जाणवलं की, धारावी हे एक प्रातिनिधीक उदाहरण झालं. गाव असो की शहर असंघटित क्षेत्रात असणारे सगळे उद्योग असेच विश्वासावर चालतात. भारतातल्या एकुण उद्योगापैकी जवळपास ८० ते ९० टक्के उद्योग हे असंघटित क्षेत्रात आहेत. नोकरी करणाऱ्यांच प्रमाण देखील याच क्षेत्रात अधिक आहे. असंघटित क्षेत्रातील लोकांचं स्वत: कुटूंब असतं. मुलं असतात. त्यांच्या शिक्षण देखील अशा एखाद्या परस्थितीमुळे सुटूतं. कोणताही निर्णय घेत असताना त्याचा असंघटित क्षेत्रावर कोणता फरक पडेल याचा अंदाज घ्यावा लागतो. निर्णय चुकीचे अथवा बरोबर नसतात. कदाचित घेतलेले निर्णय बरोबर देखील असते, पण कधी जेव्हा लोकांशी सरकार बोललं असतं. त्यांच्या समस्या समजून घेतल्या असत्या आणि टप्याटप्याने त्याची अंमलबजावणी केली असती तरच !

 

rohit pawar

रोहित पवार

(युवा नेतृत्व आणि जि.प.सदस्य, पुणे)

किसान सभेचे राज्यभरात जेल भरो आंदोलन!

Thumbnail
Thumbnail

पालघर | ठाणे जिल्ह्यात दिनांक ८ आणि ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय यांच्या सहभागाने २१,००० हून अधिक लोकांनी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन केले. यावेळी तलासरीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास अडवून धरण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करत्यांना अटक केली. इतक्या लोकांना जेलमध्ये ठेवण्याची सोय नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांची नावे नोंदवून सायंकाळी सोडून देण्यात आले.

सर्व ठिकाणी जेल भरो आंदोलनात नेत्यांनी भाजपच्या मोदी आणि फडणवीस सरकारांवर तोफ डागली आणि या सरकारांना ‘भारत छोडो’ दिनी ‘चले जाव’चा बुलंद इशारा दिला. जेल भरो आंदोलनातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे होती: विक्रमगड – ५५००, डहाणू – ३५००, शहापूर – ३०००, वाडा – ३०००, तलासरी – २५००, जव्हार-मोखाडा – २५००, पालघर – १०००, एकूण – २१,०००. ऐन पावसाचा जोर आणि भातशेतीची कामे अपुरी राहिली असतानाही इतकी संख्या होती हे विशेष.

या आंदोलनाचे नेतृत्व ठिकठिकाणी पुढील कॉम्रेडसनी केले. डहाणू – डॉ. अशोक ढवळे, एल.बी.धनगर, एडवर्ड वरठा, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखाना, चंद्रकांत वरठा, रामदास सुतार, मेरी रावते; तलासरी – किसन गुजर, बारक्या मांगात, लक्ष्मण डोंबरे, वनशा दुमाडा, सविता डावरे, सुनीता शिंगडा, रामू पागी, नंदू हाडळ; विक्रमगड – मरियम ढवळे, किरण गहला, राजा गहला, अमृत भावर, ताई बेंदर, चिंतू कानल; शहापूर – भरत वळंबा, सुनील करबट, नितीन काकरा, कृष्णा भावर, सुनीता ओझरे, विजय पाटील, प्राची हातिवलेकर, नितीन धुळे; वाडा – किसन गुजर, सुनील धानवा, विनोद निकोले, चंदू धांगडा, लक्ष्मण काकड, रमा तारवी, प्रकाश चौधरी; जव्हार – रतन बुधर, यशवंत घाटाळ, शिवराम बुधर; पालघर – सुदाम धिंडा, सुनील सुर्वे, हीना वनगा, बबलू त्रिवेदी.

किसान सभेचे किनवट तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन

Thumbnail
Thumbnail

नांदेड | शेतकरी कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सेंटर आँफ ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने किनवट येथील तहसिलदार कर्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
किमान वेतन दरमहा रूपये १८,००० इतके मिळालेच पाहिजे, कामगार विरोधी धोरणे रद्द करा, रेल्वे, बँका,विमा, संरक्षण, बीएसएनएल, शिक्षण,आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करा, आशा, अंगणवाडी कर्मचारी सरकारी कर्मचारी दर्जा द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात नांदेत जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व कामगार सहभागी झाले होते.