Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6737

राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची नियुक्ती

Rekha Sharma
Rekha Sharma

नवी दिल्ली । राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. ललिता कुमारमंगलम् बिर्ला ह्या २०१७ मध्ये पदमुक्त झाल्यात त्यानंतर प्रभारी अध्यक्षा म्हणून शर्मा काम पाहत होत्या.

महिला आयोगाच्या सदस्य असल्यापासून त्यांनी महिलांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न केले आहेत. त्या मूळच्या हरियाणा मधील पंचकुला जिल्ह्यातील आहेत. सामाजिक कार्यकर्त्ता ते बीजेपी नेत्या असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता पूर्णवेळ अध्यक्षा म्हणून त्या महिला आयोगाचे कामकाज पाहतील.

महाराष्ट्र बंद चे हे खरे लाभार्थी

Thumbnail
Thumbnail

पुणे । आजच्या महाराष्ट्र बंद चे कोणी लाभार्थी असेल तर ते हे पक्षी आहेत. एरवी गजबजलेले शहर, दुचाकींच शहर, रहदारीचं शहर अशी ओळख असलेले पुणे आजच्या महाराष्ट्र बंद मुळे पूर्णपणे शांत होते. यामुळे या संपाचा फायदा कबूतरांनी आवर्जून घेतला आहे.
नेहमी चौक म्हंटले म्हणजे ट्रैफिक कोंडी, किंचाळणारे विचित्र हॉर्न यांमुळे ह्या पक्षांचा मुक्त संचार हा दिसेनासा झाला होता. परंतु आजच्या शांततेमुळे कबूतरांनी मुक्तपणे त्याचा फायदा घेतला.

इतर महत्वाचे  –

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

बालकांमधील स्थूलपण्याच्या लढ्यासाठी जेटी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम ; मुलेच होणार ब्रेण्ड अम्बेसीडर

Thumbnail
Thumbnail

पुणे | अलीकडील काळात स्थूलपणा चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थूलपणा ही केवळ भारतीयांची समस्या नसून संपूर्ण जगाची आहे. त्यामध्ये चीन देश अग्रेसर आहे. जगभरातील स्थूलव्यक्तींमधे चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. स्थुलपणाचे मुख्य कारण जंकफ़ूड हे असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. लहान मूलांमध्ये जंकफ़ूड खाण्याचे प्रमाण वाढले असून त्याबाबत जनजागृती साठी मोठी चळवळ जेटी फाउंडेशनने हाती घेतले आहे.

जेटी फाउंडेशनच्या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ़ कोरेगाव पार्क, अपोलो हॉस्पिटल, ओ क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल व नवनीत प्रकाशन यांचं विशेष सहकार्य लाभल आहे. विविध शाळांच्या माध्यमातून ( महानगरपालिका, सेमी इंग्रजी ) सर्व मिळून जिल्ह्यातील ४५ शाळांनी नोंदणी केल्याचे डॉ जयश्री तोड़कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

सदर चळवळ डॉ तोड़कर यांनी १५ वर्षापूर्वी सुरु केली. ही चळवळ उभारणाऱ्या त्या आशियातील पहिल्या महिला आहेत. या जीवघेण्या आजाराचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी यासाठी काम करावयाचे ठरवले आहे. या पूर्वी १६ नोव्हे २०१७ रोजी उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा उपक्रम
एकूण १५,००० चित्रांपैकी १०० हुन अधिक चित्रांची निवड करून त्याचे प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे. तसेच त्या चित्रांना १२ ऑगस्ट रोजी महात्मा फुले सभागृह, फातिमानगर येथे आयोजित कार्यक्रमात बक्षिस देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. शिवाय लट्ठपणा जनजागृती दूत घोषित केले जाईल अशी माहिती जेटी फाउंडेशन चे प्रमुख डॉ जयश्री तोड़कर यांनी दिली दिली.

दोन गटात होणार ही स्पर्धा

  • इयत्ता पाचवी ते सातवी ‘ अ ‘
  • गटइयत्ता आठवी ते दहावी ‘ ब ‘ गट

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर
क्रांन्ति मोर्चा लातूर
स्थानिक प्रतिनिधी, लातूर

लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने सुरळीत चालू आहेत.

शहरातील नागरीक, विद्यार्थी, नोकरदार यांनाही आजच्या बंदचा फटका बसला आहे. हजारोंच्या संख्येने लातूर शहरात विद्यार्थी आहेत. त्यांना जेवण, नाश्ता मिळालाच नाही. गल्लीबोळातील टपरीदेखील बंद होती. एखाद्या बोळात एखादी टपरी चालू असेल तर तीही कार्यकर्त्यांनी गटागटाने जाऊन बंद केली. आजच्या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे लातूर शहरात सकाळपासूनच सर्वत्र धूरच धूर दिसत होता. आंदोलनकर्त्यांनी बहुतेक ठिकाणी चौकात, रस्त्यावर जुने टायर जाळून, टेलीफोनचे खांब आडवे टाकून, रस्त्यावर दगड रचून बंद केले. एकही खासगी अथवा शासकीय चारचाकी वाहन रस्त्यावर दिसले नाही. मोटारसायकलीसाठी देखील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात भगवे ध्वज घेवून टोप्या घालून गटागटाने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करीत होते.
येथील गंजगोलाई परिसरातही कडेकोट बंद पाळण्यात आला. लातूर शहरातील गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, गुळ मार्केट, गरूड चौक, बसवेश्‍वर चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून टायर जाळत रस्ता बंद केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही वाहन जाणार नाही अशा पद्धतीने बंद पाळण्यात आला. रेणापूर फाटा येथे रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे गेले. मात्र, तिथे एक गट भिसे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक करीत होते. येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून आ. भिसे यांना तेथूनच परत लातूरला सुखरूप पाठविण्यात आले. आ. अमित देशमुख यांनी वासनगाव पाटी येथे रास्ता रोकोत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात फलक घेवून त्यांनी वासनगाव पाटी व बाभळगाव येथे भेट देवून आंदोलनात सहभाग घेतला.
सबंध जिल्हाभरात मुख्य रस्ते, मोड, चौरस्ता अशा ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले होते. त्यामुळे अक्षरशः जिल्हाभरात चक्का जाम असेच वातावरण दिसून येत होते. निलंगा येथे शिवाजी चौकात मराठा क्रांती कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनात अरविंद पाटील निलंगेकर हेही सहभागी झाले होते. दुपारी लातूरचे पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील शिवाजी चौकात जाऊन तेथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांना आपला अक्षरशः व्यक्तीशः पाठिंबा दर्शविला व पालकमंत्री या नात्याने आंदोलनकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले. आज लातूर शहर महानगरपालिका कामकाज चालू होते. याच दरम्यान काही कार्यकर्ते पालिकेच्या गेटवर चढून आवारात आले. त्यांनी तिथे उभे असलेल्या पालिका आयुक्तांची कार तसेच अन्य दोन अधिकारी, एक कारकून आणि कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. काचा फोडल्या. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पालिका आयुक्तांच्या केबीनच्या खिडक्याच्याही काचा यावेळी फोडण्यात आल्या. आजच्या या बंदला अहमदपूर शहरात देखील गालबोट लागले. तेथील अग्नीशामक दलाच्या गाडीवर तुफान दगडफेक करून गाडीचे मोठे नुकसान करण्यात आले. लातूर शहरामध्ये एका भागात रस्ता बंद असतानाही एक ऑटो मार्ग काढून जात असताना आंदोलनकर्त्यांनी त्या ऑटोस अक्षरशः पलटी केले. दुपारपर्यंत तरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता.

बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपासूनच पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला-पुरूष हे गणवेशात बंदोबस्तावर होते. त्यांची मात्र, आज अक्षरशः उपासमार झाली. पाणी पिण्यासदेखील कोठे मिळाले नाही अथवा एखाद्या सामाजिक संस्थेने, दानशुरांनी पोलिसांना खाण्यासाठी म्हणून अन्नाचे पॉकेटदेखील दिले नाही. एखाद्या हॉटेल, टपरीवर जाऊन खावे म्हटले तरी त्यांना खाता आले नाही. बंदोबस्त अत्यंत कडक स्वरूपाचा असल्याने पोलिसांना पॉईंट सोडता आला नाही. आमचा बंद हा शांततेत राहील असे मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. पण, आजच्या बंद दरम्यान काही ठिकाणी जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर येथील बार्शी रोडवरील एक हॉटेल बंद असतानाही बाजूच्या दारातून जाऊन काही कार्यकर्त्यांनी आतील टेबल व काचेची मोडतोड केल्याचे सांगण्यात येते.या संख्येने लातूर शहरात विद्यार्थी आहेत. त्यांना जेवणा, नाश्ता मिळाला नाही. गल्लीबोळातील टपरीदेखील बंद होती. एखाद्या बोळात एखादी टपरी चालू असेल तर तीही कार्यकर्त्यांनी गटागटाने जाऊन बंद केली. आजच्या बंदचे वैशिष्ट्ये म्हणजे लातूर शहरात सकाळपासूनच सर्वत्र धूरच धूर दिसत होता. आंदोलनकर्त्यांनी बहुतेक ठिकाणी चौकात, रस्त्यावर जुने टायर जाळून, टेलीफोनचे खांब आडवे टाकून, रस्त्यावर दगड रचून बंद केले. एकही खासगी अथवा शासकीय चारचाकी वाहन रस्त्यावर दिसले नाही. मोटारसायकलीसाठी देखील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात भगवे ध्वज घेवून टोप्या घालून गटागटाने शहरातून रॅली काढून बंदचे आवाहन करीत होते.
येथील गंजगोलाई परिसरातही कडेकोट बंद पाळण्यात आला. लातूर शहरातील गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, गुळ मार्केट, गरूड चौक, बसवेश्‍वर चौक, राजीव गांधी चौक, शिवाजी चौक, अशोक हॉटेल चौक, दयानंद गेट, पीव्हीआर चौक येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडून टायर जाळत रस्ता बंद केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही वाहन जाणार नाही अशा पद्धतीने बंद पाळण्यात आला. रेणापूर फाटा येथे रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे गेले. मात्र, तिथे एक गट भिसे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक करीत होते. येथे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून आ. भिसे यांना तेथूनच परत लातूरला सुखरूप पाठविण्यात आले. आ. अमित देशमुख यांनी वासनगाव पाटी येथे रास्ता रोकोत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात फलक घेवून त्यांनी वासनगाव पाटी व बाभळगाव येथे भेट देवून आंदोलनात सहभाग घेतला.
सबंध जिल्हाभरात मुख्य रस्ते, मोड, चौरस्ता अशा ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले होते. त्यामुळे अक्षरशः जिल्हाभरात चक्का जाम असेच वातावरण दिसून येत होते. निलंगा येथे शिवाजी चौकात मराठा क्रांती कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. या आंदोलनात अरविंद पाटील निलंगेकर हेही सहभागी झाले होते. दुपारी लातूरचे पालकमंत्री तथा निलंग्याचे आमदार ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथील शिवाजी चौकात जाऊन तेथील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांना आपला अक्षरशः व्यक्तीशः पाठिंबा दर्शविला व पालकमंत्री या नात्याने आंदोलनकर्त्यांकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले. आज लातूर शहर महानगरपालिका कामकाज चालू होते. याच दरम्यान काही कार्यकर्ते पालिकेच्या गेटवर चढून आवारात आले. त्यांनी तिथे उभे असलेल्या पालिका आयुक्तांची कार तसेच अन्य दोन अधिकारी, एक कारकून आणि कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकाच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. काचा फोडल्या. एवढेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पालिका आयुक्तांच्या केबीनच्या खिडक्याच्याही काचा यावेळी फोडण्यात आल्या. आजच्या या बंदला अहमदपूर शहरात देखील गालबोट लागले. तेथील अग्नीशामक दलाच्या गाडीवर तुफान दगडफेक करून गाडीचे मोठे नुकसान करण्यात आले. लातूर शहरामध्ये एका भागात रस्ता बंद असतानाही एक ऑटो मार्ग काढून जात असताना आंदोलनकर्त्यांनी त्या ऑटोस अक्षरशः पलटी केले. दुपारपर्यंत तरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता.
बंद दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्रीपासूनच पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला-पुरूष हे गणवेशात बंदोबस्तावर होते. त्यांची मात्र, आज अक्षरशः उपासमार झाली. पाणी पिण्यासदेखील कोठे मिळाले नाही अथवा एखाद्या सामाजिक संस्थेने, दानशुरांनी पोलिसांना खाण्यासाठी म्हणून अन्नाचे पॉकेटदेखील दिले नाही. एखाद्या हॉटेल, टपरीवर जाऊन खावे म्हटले तरी त्यांना खाता आले नाही. बंदोबस्त अत्यंत कडक स्वरूपाचा असल्याने पोलिसांना पॉईंट सोडता आला नाही. आमचा बंद हा शांततेत राहील असे मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. पण, आजच्या बंद दरम्यान काही ठिकाणी जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नव्हे तर येथील बार्शी रोडवरील एक हॉटेल बंद असतानाही बाजूच्या दारातून जाऊन काही कार्यकर्त्यांनी आतील टेबल व काचेची मोडतोड केल्याचे सांगण्यात येते.

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar
Kaustubh Divegaokar
स्थानिक प्रतिनिधी, लातूर

लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी तुफान दगडफेक करून त्यांना अक्षरशः पिटाळून लावले आहे. तर लातूर महापालिकेच्या आवारात घुसून पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या शासकीय गाडीसह अन्य पाच गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले आहे.

दरम्यान शहरात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. दुपारपर्यंत शहर व जिल्हाभरात विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जळत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

#MarathaReservation | लातूरमधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण

आरक्षण लातुर
आरक्षण लातुर
स्थानिक प्रतिनिधी, लातूर

लातूर | मराठा क्रांन्ति मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र शांततेत आंदोलन सुरु असताना लातूर मधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

हाती आलेल्या माहीती नुसार, लातूर शहरातील काही भागात रस्ता रोको करण्यार आला आहे. तसेच यावेळी जाळपोळीचे प्रकार झाले असल्याचे समजत आहे. रस्ता अडवून टायर जाळणे, धूर करणे असे प्रकार झाले आहेत. परंतू परिस्थिती आटोक्यात असून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास पोलीस प्रशासन मेहनत घेत आहे.

#MarathaReservation |अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद

Thumbnail
Thumbnail

पुणे । मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामधे पुणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपचालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत.

पेट्रोप पंप वगळता बँक, भाजी विक्री केंद्रे, दवाखने सुरळीत चालू आहे. बंद मुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Thumbnail
Thumbnail
पुणे प्रतिनिधी

पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये कष्टकरी व शोषीत वर्गाला घेऊन ठिनठिकाणी आंदोलने करण्यात आली. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यात घेरावा, ठिय्या, रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान दुपारी तीन वाजेपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी, आशा, बांधकाम, किसानसभा आणि सिटू च्या संघटनांनी ठिय्या मांडला होता.

यावेळी काँम्रेड वसंत पवार यांनी केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी काँम्रेड नाथा शिंगाडे यांनी शासनाच्या फसव्या घोषणावर टिका करत हे जनतेचे सरकार नसुन लबाडांचे सरकार आहे असे विधान केले. अंगणवाडी संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमिम यांनी अंगणवाडी शिक्षिका व मदतनिस यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी लढा तीव्र करण्याचे आवहान केले. ठिय्या आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता काही काळ रोखून धरला. काँम्रेड अजित अभ्यंकर, अमोल वाघमारे, डाँ.मंगेश मांडवे, भारती अवसरे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

पुण्यात पी.एम.टी. बंद

Thumbnail
Thumbnail

पुणे । लक्ष्मी रोड जवळील शगुन चौकात पुणे म.न.पा. ची बस फोडण्यात आली. मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पीएमटी सेवा ही अंशतः महत्वाच्या मार्गावर पोलिसांच्या मदतीने चालू ठेवण्यात आली होती. परंतु या घटनेमुळे पीएमटी बस सेवा सध्या थांबवण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड पूर्णपणे बंद असून सगळी कडे शुकशुकाट पसरलेला दिसत आहे.

शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांचे ठिय्या | #MarathaReservation

Thumbnail
Thumbnail

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा मोर्चा चे आंदोलक पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार हे देखील आंदोलकांमधे सामील झाले तसेच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली.

मराठा क्रांन्ति मोर्चा ने १ आॅगस्ट पासून राज्यातील लोकप्रतिनीधींच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. याचाच भाग म्हणुन आज शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पवार यांनी याआधीच मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.