Saturday, December 20, 2025
Home Blog Page 6735

टीम इंडीया सोबतच्या त्या फोटोवर अनुष्काचे स्पष्टीकरण

Anushka Sharma angry
Anushka Sharma angry

मुंबई | विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याचे एकत्रीत फोटोज सोशल मिडियावर चांगलेच डिमांध घातात हे आपल्याला ठावूकच आहे. टीम इंडिया सोबतचा अनुष्का शर्माचा असाच एक फोटो बीसीसीआय ने सोशल मिडियावर टाकला होता. मात्र नेटकरांनी त्यावरुन अनुष्काला ट्रोल केले होते. आता त्यावर अनुष्काने आपली बाजू मांडली आहे.

इतर महत्वाचे लेख  –

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

‘मी ट्रोल्स ला प्रत्युत्तर देत नाही. ज्यांना यावर सफाई देणे गरजेचे होते त्यांनी यावर सफाई दिली आहे’ असे उत्तर देत ‘जे काही तिथे झाले ते सगळं नियमांना धरुन होते’ असे म्हणुन अनुष्काने आपली बाजू मांडली आहे. हा जास्त मोठा मुद्दा असल्याचे मला वाटत नाही असेही तिने यावेळी म्हटले आहे.

दरम्यान बीसीसीआय ने ही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून ‘टीम इंडीयाच्या सर्व खेळाडूंना आम्ही सहकुटुंब स्नेहभोजनास बोलावले होते. तेव्हा तिथे कोणताही नियमबाह्य प्रकार घडलेला नसून सर्व काही नियमातूनच होत आहे’ असे म्हटले आहे.

इतर महत्वाचे लेख  –

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

या पाच गोष्टी केल्यावर मुली होतात इम्प्रेस

 

आपल्या अदाकारीने अनेकांची शिकार करणार्या श्रीदेवी ची आज जयंती

Shridevi biography
Shridevi biography

जिच्या अदाकारी आणि नृत्याची शिकार देशाच्या दोन पिढया झाल्या. नितळ सौंदर्याच्या नैसर्गिक प्राप्तीच बावन्न कशी सोन ज्यांनी अविरत चमकवत ठेवलं, त्या श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. या अशा बातमीची कुणी सुध्दा अपेक्षा केली नव्हती. बॉलिवूडची चांदणी हरपल्याची भावना जनमानसात तीव्र दुःखासह उमटत होती. श्रीदेवींची आज जयंती आहे त्या निमित्त त्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

इतर महत्वाचे लेख –

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

१३ ऑगस्ट १९६३ साली तामिळनाडूतील शिवकाशीत श्रीदेवी यांचा जन्म झाला. आपले मूळ नाव त्यागून लोकांना सहज तोंडवळणी पडेल असे नाव धारण करण्याचा प्रगाद भारतीय चित्रपट सृष्टीत जुना आहे. त्याप्रमाणेच अम्मा ययंगर आय्यप्पन् या मूळ नावात बदल करून श्रीदेवी हे नाव त्यांनी धारण केले. श्रीदेवी यांचे वडील पेशाने वकील होते.

बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी पहिल्यांदा थुनाईबन या तेलगू चित्रपटात काम केले (१९७४) तिथं पासून २०१७ सालच्या मॉम या चित्रपटपर्यंत त्यांनी असंख्य चित्रपटांत काम केले. मुमरू मुदीचू या तामिळ चित्रपटात सुप्रसिद्ध दिग्ददर्शक के.बालाचंदर यांनी श्रीदेवी यांना पहिल्यांदा मुख्यनायिकेची भूमिका दिली. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटातील थोर नायक सध्या जे राजकीय सुर्कीयामध्ये अधिक आले आहेत असे रजनीकांत आणि कमल हसन नायकांच्या भूमिकेत होते. हा चित्रपट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

कारकिर्दीच्या चढत्या अलेखा सोबत श्रीदेवी यांना मुंबई खुणावू लागली. त्या हिंदी चित्रपटात झळकू लागल्या त्या कायमच्याच हिंदीच्या झाल्या. सोलावा सावन या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. कर्मा, नगीना, मवाली, मिस्टर इंडिया, चालबाज, लमहें आशा असंख्य चित्रपटासोबत त्यांनी बऱ्याच अंतराने २०१२ साली इंग्लिश बिग्लिश चित्रपटात बेतोड काम केले. २०१७ साली त्यांनी मॉम या शेवटच्या ठरलेल्या चित्रपटात काम केले.

२४ फेब्रुवारी २०१८ श्रीदेवी यांचे दुबई मध्ये निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या श्रीदेवी यांना जानकी आणि खुशी या दोन मुली आहेत. तसेच अर्जुन कपूर हा त्यांचा सावत्र मुलगा आहे.

सुरज शेंडगे

जे.एन.यु. विद्यार्थी नेता उमर खलिदवर दिल्लीत जीवघेणा हल्ला

Umar Khalid Delhi gunned
Umar Khalid Delhi gunned

दिल्ली | जे.एन.यु. विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर बंदुकीने जीवघेण हल्ला झाला आहे. दिल्ली येथील कन्स्टिट्युशनल क्लब येथे अज्ञातांनी खालिद याच्यावर आज गोळीबार केला. यामधे खालिद थोडक्यात वाचले असून त्यांना तातडीने दवाखाण्यात हलवण्यात आले आहे.

इतर महत्वाचे लेख –

शहीदाची बायको – प्रा. हरी नरके

क्या आप इंडिया का झंडा फाड दोगे ? पाकिस्तानात अजब युट्यूब प्रैक

हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील कन्स्टिट्युशनल क्लब या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ता आणि विविध जनचळवळीचे नेते यांची बैठक भरली होती. यावेळी उमर खलिद ही या बैठकिस हजर राहण्यास गेले होते. दरम्यान सदर इमारतीबाहेर चहाच्या गाड्याजवळ एका अज्ञाताने खलिद यांना धक्का दिला आणि त्यानंतर खलिद याच्यावर गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यातून खलिद थोडक्यात वाचले. उपस्थितांनी गोळीबार करणार्यास पकडण्याचा प्रयत्न केला परंतू हवेत गोळीबार करुन अज्ञात आरोपी पळून जाण्यामधे यशस्वी झाला.

यापूर्वी उमर खालिद याला असे धमकीचे फोन आले होते. खालिद यांनी त्याबाबत त्या त्या वेळी पोलीसांना खबर करुन सुरक्षेसंदर्भात विचारले होते. रवि पुजारी नावाच्या फरार गुंडाने हे फोन केले असल्याचे त्याने फिर्यादित म्हटले होते. तसेच गुजरातेतील दलित नेता आणि आमदार जिग्नेश मेवानी यास सुद्धा रवि पुजारी नामक इसमाने फोन करुन धमकावले असल्याचे समोर येत आहे.

इतर महत्वाचे लेख  –

क्रांतिसिंह नाना पाटील

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

सदर घटना दिल्लीतील गजबजलेल्या ठिकाणी घडली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून दिल्ली पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

 

मोदींनी फेकूगिरी थांबवावी, पंतप्रधानांच्या इमेल मुलाखतीचा सामनाने घेतला खरपूस समाचार

shivsena on narendra modi
shivsena on narendra modi

मुंबई | नरेंद्र मोदी सध्या इमेल द्वारे मुलाखती देत आहेत. त्याचा खरपूस समाचार सामना वृत्तपत्रातून घेतला आहे.इमेल द्वारे मुलाखत देणे म्हणजे उपप्रश्नापासून लपणे होय. फेकूगिरी करणाऱ्या व्यक्तीला उप प्रश्न जर विचारले गेले नाहीत तर ती मुलाखत कसली. मोदी दर महिन्याला मन की बात करतात दुसऱ्या दिवशी पेपरवाले छापतात. मोदींसारख्या व्यक्तीला हे शोभणारे नाही. निवडणुकीपूर्वी मीडिया मोदींचा मित्र होता मग आता वैरी का झाला असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे मीडिया पासून पळतात ये बरे दिसत नाही. मोदींनी त्यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात एक ही पत्रकार परिषद घेतली नाही असा घणाघाती टोला सामन्यातून लगावला आहे.
मागील काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदींनी इमेल द्वारे टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक भास्कर या वृत्तपत्राला मुलाखती दिल्या आहेत. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे तसेच २०१९ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास बोलून दाखवला आहे.

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

Somnath Chaterji
Somnath Chaterji

कोलकत्ता | लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले आहे. ते ८९वर्षाचे होते. सोमनाथ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना १०ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चॅटर्जी हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. शुक्रवारी रुग्णालयात दाखल केल्या पासून त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमनाथ चॅटर्जी यांची लोकसभा सभापती म्हणून कारकीर्द वादळी ठरली होती. अमेरिकेसोबत झालेल्या अनु करारानंतर मनमोहनसींग सरकारवर आलेल्या अविश्वास ठरावात पक्षाच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व करण्यास त्यांनी विरोध केला होता. भारतीय संविधानाला आपण बांधील असून लोकसभेचा अध्यक्ष पक्षीय राजकारण आणि पक्षीय भूमिके पासून विभक्त असतो असे मत त्यांनी मांडले होते.
पश्चिम बंगालच्या राजकारणातील शालीन नेता म्हणून चॅटर्जी यांची ओळख होती. त्यांची प्रकृती मागील काही वर्षापासून चिंताजनक बनली होती. त्यांच्यावर कोलकत्ता येथेल रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शशी थरुर यांचे ‘हंगर फ्रि इंडिया’ चे आवाहन

Hunger deaths in india
Hunger deaths in india

टिम, HELLO महाराष्ट्र | स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हंगर फ्रि इंडियाचे आवाहन केले आहे. ‘या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी प्रत्तेक भारतीयाला आवाहन करतो कि आपल्या देशाला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेकाने पुढे यावे आणि आपापल्या स्तरावर काम करावे’ असे ट्विट शशी थरुर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राॅबिनहूड आर्मी या संघटनेचे कौतुक केले असून ‘मी राॅबिनहूड आर्मी च्या कामाने प्रभावी झालो आहे’ असे म्हटले आहे.

सध्या भारतात उपासमारीमूळे मरण पावणार्यांची संख्या मोठी आहे. समाजात आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने आज काही लोकांना चवीनुसार हवे ते खाद्य पदार्थ खाण्यास मिळतात तर काहींना जिवंत राहण्यापुरतेही अन्न मिळत नाही. पोटाला काहिच खायला न मिळाल्याने उपासमार होऊन मरणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा हा प्रश्न लक्षात घेऊन राॅबिनहूड आर्मी नावाची सामाजिक संस्था यावर काम करत आहे.

राॅबिनहूड आर्मी ही संस्था उपासमारी विरोधात काम करत असून मोठमोठ्या रेस्टाॅरेंट मधील शिल्लक राहीलेले अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सध्या सदर संस्थेने भारताला उपासमार मुक्त करण्यासाठी प्रत्तेक भारतीयाने काम करावे असे आवाहन केले आहे. त्यावेळी ‘हंगर फ्रि इंडिया’ या त्यांच्या चळवळीला शशि थरुर यांनी ट्विटर वरुन आपला पाठींबा दर्शवला आहे.

२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली | २०१९ची निवडणूक विक्रमी जागांनी जिंकणार आहोत कारण आम्ही केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे. जनतेला भक्कम आणि निर्णायक सरकारची गरज आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला इमेल द्वारा दिलेल्या मुलाखतीतून मोदी व्यक्त झाले आहेत.
मॉब लिंचिंग च्या मुद्द्यावर आम्ही गंभीर आहोत आणि हा प्रकार रोखण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत असे मोदी मुलाखतीत म्हणाले आहेत. आसामच्या एनआरसी मुद्द्यावर मोदींनी कॉग्रेसची चांगलीच खरडपट्टी काढली असून कॉग्रेसचे सरकार आसाम मध्ये असताना त्यांनी एनआरसी मुद्द्यावर काहीच कार्यवाही केली नाही असा आरोप ही मोदींनी केला आहे.

बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips
business tips

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे.

इतर महत्वाचे –

B.A. पास

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

स्माॅल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडिया (सीडबी) या बँकेच्या स्माईल नावाच्या योजनेअंतर्गत सदर कर्ज देण्यात येत आहे. सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्यूफॅक्चरिंग अशा दोन प्रकारच्या उद्योगांकरता कर्ज दिले जात अाहे. सर्व्हिस सेक्टर करता १५ लाख रुपये तर मॅन्यूफॅक्चरिंग करता २५ लाख रुपये कर्ज मिळत आहे.

सरकार या कर्जावर भक्कम सबसिडीही देत असल्याने युवकांसाठी हे फायद्याचे ठरत आहे. खुल्या प्रवर्ग गटातील युवकांना शहरी भागात व्यवसाय करण्याकरता १५% सबसिडी देण्यात येत आहे तर ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता २५% सबसिडी दिली जात आहे. विशेष प्रवर्गातील युवकांना २५% आणि ३५% सबसिडी अनुक्रने शहरी आणि ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता देण्यात येत आहे.

इथे करा आॅनलाईन अर्ज –
https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp

संविधान प्रत जाळणार्यांवर कडक कारवाई करा, रिब्लिकन मजदूर संघाची मागणी

Constitution burnt in delhi
Constitution burnt in delhi

पुणे | दिनांक ८ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रकार घडला होता. सदर घटना प्रसारमाध्यमांनी समोर आणताच सोशल मिडीयावर त्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संविधानाची प्रत जाळतानाची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल होत असून त्याविरोधात निषेध नोंदवला जात आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेचे पुण्यातही प्रतिसाद उमटत असून रिपब्लिकन मजदूर संघ ने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ला संबंधितांवर कारवाइची मागणी करणारे निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.

संविधानाची प्रत जाळणाऱ्या संघटनेचं नाव अजुन कळू शकलेल नसून, काही व्यक्तिंची नावे समोर आली आहेत. संजय शर्मा, अनूप दुबे, कृष्णमोहन रॉय, रोहित गुप्ता, आशुतोष झा, संतोष झा, संतोष शुक्ल, परवेश साहनी, कामिनी झा, श्रीनिवास पांडे अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन मजदूर संघाचे अध्यक्ष सुहास बनसोडे, शतायु भगळे , रिजवान शेख, सूर्यकांत जाधव यांनी केली आहे.

सरपंच बायकोचा नवऱ्याकडून खून

Thumbnail
Thumbnail

चिपळूण | सरपंच असणाऱ्या बायकोचा तिच्याच नवऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना चिपळून येथे घडली. रुपाली जाधव असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून दीपक जाधव या तिच्याच पतीने तिला मारून टाकल्याचे समोर आले आहे. सदर घटना चिपळूण तालुक्यातील कादवड गावी शनिवारी सकाळी घडली आहे.

रुपाली जाधव यांच्या खुनाने कादवड गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. दीपक जाधव पोलिसांना स्वाधीन झाला असून घटनेचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. चिपळून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.