PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO , वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ या पदांच्या रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या पदाच्या एकूण 66 रिक्त जागा आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याचप्रमाणे 14 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. आणि 21 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे थोडाच वेळ आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव | PCMC Bharti 2024
या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी CMO, वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, ब्लड बँक बीटीओ ही पदे भरली जाणार आहेत.
पदसंख्या
त्या भरती अंतर्गत एकूण 66 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
नोकरी ठिकाण
भारतीय अंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला पिंपरी चिंचवड या ठिकाणी नोकरी करावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा. अर्ज सुरू होण्याची तारीख –14 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024
रिक्त जागा
कनिष्ठ निवासी – 56
वैद्यकीय अधिकारी CMO – 05
वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी, रक्तपेढी BTO – 03
ब्लड बँक बीटीओ – 02
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
21 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
Indian Coast Guard Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत असतो. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत नाविक म्हणजे सामान्य कर्तव्य आणि यांत्रिक या पदाच्या व्यक्त जागा भरल्या जाणार आहेत. या दोन पदांच्या एकूण 320 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. 13 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, तर 3 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्वाची माहिती | Indian Coast Guard Bharti 2024
पदाचे नाव – नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक
पदसंख्या – 320 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024
अर्ज कसा करावा ?
तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ..
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3 जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lingmala Waterfall) पावसाळ्याच्या दिवसात डोंगर, कड्या कपाऱ्यांमधून अत्यंत सुंदर असे लहान मोठे धबधबे कोसळत असतात. त्यांचे विहंगम दृश्य निसर्गाच्या सौंदर्यात विशेष भर टाकणारे असते. असे धबधबे पाहताना एक वेगळाच आनंद होतो. जो मनावरील ताण कधी कमी करतो ते कळतसुद्धा नाही. पश्चिम महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत. ज्यांचे प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. त्यात पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्यांचे सौंदर्य आणखीच खुलून येते आणि त्यामुळे पर्यटक आपोआप या धबधब्यांकडे आकर्षित होतात. यापैकी एक धबधबा म्हणजे ‘लिंगमळा’. चला तर या सुंदर धबधब्याविषयी अधिक माहिती घेऊया.
कुठे आहे?
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला की, बरेच लहान मोठे धबधबे प्रवाहित होऊ लागतात. मात्र, काही धबधबे हे विशेष आकर्षण असतात. जसे की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधला ‘लिंगमळा धबधबा’. (Lingmala Waterfall) महाबळेश्वर हे सर्वाधिक भेट दिले जाणारे एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वरचे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे इतके सुंदर आहे. तर महाबळेश्वरमध्ये स्थित असलेला ‘लिंगमळा धबधबा’ याच सुंदरतेचा एक भाग आहे. त्यामुळे प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या धबधब्यांमध्ये या धबधब्याचा समावेश आहे.
लिंगमळा धबधबा (Lingmala Waterfall)
महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधब्याचा मुख्य स्त्रोत वेण्णा व्हॅली आहे. जिथून सुमारे ६०० फूट उंचीवरून पाणी कोसळते आणि त्यानंतर या ठिकाणी पर्यटकांना एक अत्यंत सुंदर, नेत्रदीपक असे दृश्य पहायला मिळते. लिंगमळा धबधबा हा समुद्र सपाटीपासून १२७८ मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी बऱ्याचवेळा सुंदर इंद्रधनुष्य देखील पहायला मिळते. सध्या राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे, लिंगमळा धबधबा तुडुंब होऊन कोसळतो आहे. त्यामुळे हा धबधबा महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरू पाहतोय.
कसे जाल?
लिंगमळा धबधब्याकडे जाण्यासाठी तुम्हाला महाबळेश्वर बसस्थानकापासून केवळ ६ किलोमीटर अंतर प्रवास करावा लागेल. इथून लिंगमळा धबधब्यापर्यंत बरेच लोक स्थानिक वाहतुकीने प्रवास करतात. (Lingmala Waterfall) त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्रवासाचा पर्याय निवडू शकता. इथे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्यांचासुद्धा वापर करू शकता.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अतरंगी पहायला मिळतं. जेव्हापासून रिल्स सुरु झाले आहेत तेव्हापासून रील मेकर्सचा सुळसुळाट पहायला मिळतोय. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी कधी कोण काय करेल? याचा काहीही नेम नाही. कुणी जीवावर खेळतं, तर कुणी विचित्र चाळे करून डोकं फिरवत. इतकंच काय तर अनेकदा असं वाटत की, जगभरातले सगळे जुगाडू सोशल मीडियावर सक्रिय झालेत. अशातच सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही महिला गव्हाच्या पिठात शाम्पू घालताना दिसतेय. पाहुयात काय आहे हा व्हिडीओ.
गव्हाच्या पिठात टाकला शाम्पू (Viral Video)
सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये हा व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला १ मोठा चमचा गव्हाचे पीठ घेते. या पिठामध्ये तिने १ छोटा चमचा मीठ टाकले. यानंतर पिठात तिने केस धुण्याचा शाम्पू टाकला. व्हिडिओत शाम्पूचे नाव स्पष्ट दिसत आहे. शाम्पू आणि गव्हाचे पीठ एकत्र करून या महिलेने एक प्रकारचा स्क्रब तयार केल्याचे दिसते. या स्क्रबच्या मदतीने ती घरातील भांडी घासून दाखवते आणि त्यानंतर बेसिन स्वच्छ करताना दिसते.
या व्हिडिओतील महिला सांगतेय की, हा शाम्पू गव्हाच्या पिठामध्ये मिसळताना त्याची पेस्ट तयार करू नका. तर याची पावडर राहील अशी काळजी घ्या. या पावडरच्या मदतीने भांडयांवरील काळपटपणा दूर करता येतो. त्यामुळे हा जुगाड एकदा तरी नक्की करून बघा. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक युजर्सने पाहीला आहे. (Viral Video)कधी विचारही केला नसेल असा हा जुगाड पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावरील प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर prajakta_salve_marathi नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘गव्हाच्या पिठामध्ये शाम्पु टाकताच कमाल झाली’. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video) यातील एकाने लिहिलं आहे की, ‘हा व्हिडिओ जर कोणी पूर्ण बघितला नाही तर तो शाम्पूच्या चपात्या खाईल’. तर आणखी एकाने लिहलं, ‘पिठापेक्षा राख वापरायची की, उगीच अन्नासोबत खेळ कशाला?’ तसे अन्य एकाने लिहिले, ‘अहो मॅडम एखादा मरल तुमचे व्हिडिओ पाहून’. तर आणखी एका युजरने लिहिलंय, ‘ताई माझ काळ पडलेलं नशिब चकचकेल का हे वापरल्यावर?’
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Local Train) लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कारण, दररोज घड्याळाच्या काट्यावर धावत सुटणाऱ्या मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे लोकल. मुंबईकरांच्या वेळापत्रकाची सगळी भिस्त लोकलवर असते. समजा सकाळी ऑफिसला जाताना पकडायची ट्रेन चुकली तर सगळं गणितचं चुकतं. अनेकदा प्लॅटफॉर्मला ट्रेन लागताना इंडिकेटरवर चुकीची वेळ लिहिलेली असते. तर कधी कधी प्लॅटफॉर्मला लागलेली लोकल वेगळी असते आणि इंडिकेटर वेगळ्याच लोकलची वेळ सांगत असतो. अशावेळी नागरिकांची नुसती भांबेरी उडते.
त्यामुळे बरेच लोक जोपर्यंत ट्रेनची उद्घोषणा होत नाही तोपर्यंत जिना उतरून खाली प्लॅटफॉर्मवर येतच नाहीत. असे गोंधळ पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून पश्चिम रेल्वेने यावर तोडगा काढला आहे. (Mumbai Local Train) मुंबईकरांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी कायमच पश्चिम रेल्वे सक्रिय असते. अशातच आता पश्चिम रेल्वेने लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावायचे ठरवले आहे. यामुळे नेमका काय फायदा होणार? आणि हे डिजिटल डिस्प्ले कसे काम करणार? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
एक्स्प्रेस ट्रेनसारखे आता लोकल ट्रेनवर झळकणार डिजिटल डिस्प्ले
पश्चिम रेल्वने घेतलेल्या निर्णयानुसार आता एक्स्प्रेस ट्रेनप्रमाणे लोकल ट्रेनवरसुद्धा डिजीटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर याचा प्रयोग केला जाईल आणि त्यानंतर चाचणी रिपोर्ट घेऊन लोकलवर डिजिटल डिस्प्ले लावण्यात येतील. (Mumbai Local Train) यामुळे प्लॅटफॉर्मवर लागलेली लोकल कोणती आहे? आणि किती डब्ब्यांची आहे? हे समजणे सोप्पे जाईल. नुकतेच, मुंबई सेंट्रलच्या पश्चिम रेल्वे ईएमयू कारशेडमध्ये एक नवीन हेड कोड डिस्प्ले देण्यात आल्याचे समजत आहे.
डिजिटल डिस्प्लेमूळे काय फायदा होणार? (Mumbai Local Train)
लोकल ट्रेनवर डिजिटल डिस्प्ले लावल्यामुळे नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल. कारण या डिस्प्लेमूळे प्रवाशांना लोकल ट्रेन कुठे चालली आहे? तसेच समोर प्लॅटफॉर्मला लागलेली ट्रेन ही किती डब्ब्यांची आहे? आणि ती ट्रेन स्लो आहे की फास्ट? अशी सगळी माहिती या डिस्प्लेवर झळकणार आहे. याचे वैशिट्य म्हणजे गार्ड सुरुवातीच्या स्थानकात लोकलचा नंबर टाकण्यात येईल आणि यामुळे प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशांना लोकलच्या प्रवासाविषयी सर्व माहिती डब्यावरील डिस्प्लेवर साजेल.
३ भाषेत देणार माहिती
लोकल ट्रेनवर लावल्या जाणाऱ्या डिजिटील डिस्प्लेच्या माध्यमातून प्रवाशांना एकूण ३ वेगवेगळ्या भाषेत माहिती प्रदान केली जाणार आहे. (Mumbai Local Train) प्रत्येक ३ सेकंदाच्या अंतराने या डिस्प्लेच्या माध्यमातून मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लोकलची माहिती दिली जाईल.
HD डिस्प्ले
पश्चिम रेल्वेने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, लोकल ट्रेनवर लावले जाणारे हे डिजीटल डिस्प्ले एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) स्वरुपात असणार आहेत. यावर संरक्षित काच लावण्यात आली असून प्रवाशांना डिस्प्लेवरील अक्षरे देखील ठळक दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे. (Mumbai Local Train) ट्रेनपासून ५ मीटरपर्यंतच्या अंतरावरुन लोकलची माहिती प्रवाशांना दिसेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगभरात करोडो यूजर्स व्हाटसअप चा वापर करत असतात. आपल्याला भारतात सुद्धा जवळपास सर्वानाच व्हाट्सअपचे वेड आहे. कंपनी सुद्धा यूजर्सना वेगवेगळा अनुभव मिळावा म्हणून व्हाट्सअप मध्ये सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स ऍड करत असते. आताही व्हाट्सअपने असेच एक फिचर आणलं आहे त्यामाध्यमातून तुम्ही एकाच वेळी तब्बल ३२ लोकांना विडिओ कॉल (WhatsApp Video Calling) करू शकता. .
तुम्ही डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीवर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल (WhatsApp Video Calling) वापरू शकता. या फीचरचा फायदा असा होईल की आता तुम्हाला व्हिडिओ कॉलसाठी झूम, गुगल मीट सारख्या ॲप्सवर जाण्याची गरज नाही. हे फीचर्स वापरकर्त्याच्या डेस्कटॉपवर देखील काम करेल आणि व्हर्च्युअल मीटिंग आणि ऑनलाइन क्लासेस साठी सुद्धा त्याचा वापर होईल. व्हाट्सअपच्या या नव्या फीचर्समध्ये ऑडिओसह स्क्रीन शेअरिंग, स्पीकर स्पॉटलाइटचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यात ते सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.
ऑडिओसह स्क्रीन शेअरिंग– WhatsApp Video Calling
व्हिडिओ कॉलच नव्हे तर व्हॉट्सॲपमध्ये ऑडिओ फीचर्ससह स्क्रीन शेअरिंगची सुविधा जोडण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, यूजर्स कॉल सुरु असताना एकमेकांना स्क्रीन आणि ऑडिओ शेअर करू शकतात. कॉल दरम्यान ऑन-स्क्रीन कंटेंट दाखवण्यासाठी हे फीचर्स उपयुक्त ठरेल. अगदी Google Meet किंवा Zoom Call असणारे हे फीचर्स पर्सनल आणि बिझनेस अशा दोन्ही अकाउंट साठी चालेल. हे फीचर्स झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सला टक्कर देईल हे नक्की.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI Chair) निवडणुका जवळ आल्या की, नेते मंडळींना जनता दिसते. मग आश्वासनांचा अगदी पाऊस पडतो. पण निवडणूका संपल्या की, लोकप्रतिनिधींना जनताही दिसत नाही आणि त्यांना दिलेली आश्वासनंसुद्धा आठवत नाहीत. पण आता असं होणार नाही. गेल्या काही काळात विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. याच तंत्रज्ञानाच्या साथीने एका भारतीय विद्यार्थ्याने कमालीची ‘AI चेअर’ बनवली आहे. ही ‘AI चेअर’ भल्याभल्यांना विसर पडलेल्या आश्वासनांची आठवण करून देणार आहे.
कोणी बनवली ‘AI चेअर’? (AI Chair)
लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी ही ‘AI चेअर’ एका भारतीय विद्यार्थ्याने तयार केली आहे. या विद्यार्थ्याचे नाव अंशित श्रीवास्तव असे आहे. गोरखपूरमधील एका कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्याने ही कमाल ‘एआय चेअर’ बनवली आहे. जी नेतेमंडळींसाठी फायदेशीर ठरेल. कारण, या चेअरवर बसताक्षणी नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण होणार आहे. वृत्तानुसार, ही चेअर जनता खूप संतप्त झाली असेल तर त्याचीही माहिती नेत्यांना देणार आहे.
चेअरवरील सेन्सर्स सांगणार जनता खुश की नाखुश?
अंशितने AI चेअरबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, त्याने ही खुर्ची भावी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे या AI चेअरवर सेन्सर्स बसवले आहेत. ज्यांच्या सक्रियतेमुळे नेत्यांना संकेत दिले जातील. त्यांच्या कमवा जनता खुश आहे की नाराज? हे देखील या सेन्सर्समुळे समजेल. (AI Chair) या खास खुर्चीवर इंडिकेटर म्हणून लाल आणि हिरवा दिवा बसवण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. अशीही माहिती अंशितने दिली. तसेच हे मूल्यमापन लोक स्वतः करतील आणि त्यांना सोशल मीडिया हॅण्डलच्या माध्यमातून यासाठी गुणांकन दिले जाईल.
‘इतक्या’ खर्चात बनवली AI चेअर
अंशितने दिलेल्या माहितीनुसार, AI चेअरला लाखो लाईक्स मिळाल्यावर ती सक्रिय केली जाणार आहे. अंशितने सांगितल्यानुसार, या चेअरवर देशभक्तीपर गाणी वाजवली जातात. यानंतर जेव्हा लोकांचा संताप वाढतो तेव्हा चेअर हलू लागते. (AI Chair) ही चेअर बनवण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोन, लाल- हिरवे इंडिकेटर, पिन केबल, फायबर चेअर, पीसीबी बोर्ड आणि बॅटरीचा वापर केला आहे. फक्त १५ दिवसात ही चेअर तयार केली असून यासाठी एकूण ३५ हजार रुपये खर्च आला आहे. ‘भविष्यात ही AI चेअर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक स्मार्ट होणार’, असे विधान अंशितचे महाविद्यालय संचालक एन.के.सिंग यांनी केले आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी विचित्र चाळे, अतरंगी करामती, जुगाड, डान्स, डायलॉगबाजी असे वेगवेगळे फंडे वापरले जातात. अशा विविध आशयाचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होतात आणि ट्रेंडिंगमध्ये येतात. अशा या सोशल मीडियावर कधी कोण कशासाठी चर्चेत येईल याबद्दल काहीही पक्कं असं सांगता येणार नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेक कपल्सचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होताना पाहिले असतील. कधी कधी प्रेमात वाट्टेल ते करायला तयार कितीतरी रोमिओ त्यांच्या कारामतींमुळे चर्चेत असतात. आताही अशाच एका तरुणाचा फोटो व्हायरल होतोय. जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.
व्हायरल फोटो (Viral Photo)
प्रेम ही अशी भावना आहे जी भल्याभल्यांना वेड लावते. प्रेमात पडलेली व्यक्ती कधीही काहीही करायला तयार असते. प्रेमात आकंठ बुडालेली एखादी व्यक्ती काय काय करू शकते याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. बरीच लोक प्रेमात जीवसुद्धा देतात. असे कितीतरी किस्से, कथा तुम्ही ऐकल्या असतील. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो व्हायरल होतो आहे. जो मुंबईतील दादर रेल्वेस्थानकावरील असून यात एक तरुण प्लॅटफॉर्मवरील शौचालयावर चढून बसलेला दिसत आहे.
हा तरुण शौचालयावर नुसता बसला नाहीये तर इथे बसून त्याने स्वतःचा फोन चार्जिंगला लावला आहे. (Viral Photo) इतकंच नाही तर फोन चार्जिंगला लावून तो फोनवर बोलताना दिसतोय. यावेळी तो नेमका कोणाशी बोलतोय हे सांगू शकत नाही. पण हा फोटो पाहून अनेकांनी हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कॉलवर बोलत असेल, असा तर्क लावला आहेत. हा फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने फोटोवर लिहिलंय, ‘एवढी काय इमर्जन्सी असेल बरं’. गंमतीत शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर marathi.viral_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा फोटो अनेकांनी पाहिला असून एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्या आहेत. या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिलंय, ‘तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असेल.. डोन्ट डिस्टर्ब’. (Viral Photo) तर आणखी एकाने लिहिलं, ‘तो त्याच्या बाबूशी बोलत असेल’. अन्य एकाने म्हटले, ‘मुलीची भानगड भावा’. तर आणखी एका युजरने लिहिलंय, ‘बहुतेक त्याच ब्रेकअप होतंय’. अशाच आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘बाईचा नाद लय बेकार’.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश आणि बिहारने नेहमीच वर्चस्व गाजवलं आहे. जेव्हा जेव्हा देशाच्या राजकारणाचा विचार होतो तेव्हा तेव्हा या दोन्ही राज्याची नावे आवर्जून घेतली जातात. आता तर अंतराळात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारचे नाव घेतलं जातंय. भारताच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने (पीआरएल) मंगळावर (Mars) तीन अज्ञात विवर शोधले आहेत. यातील २ विवरला उत्तरप्रदेश आणि बिहारमधील दोन शहरांची नावे दिली आहेत. तर तिसऱ्या विवरला भूभौतिकशास्त्रज्ञचे नाव देण्यात आलं आहे.
जेव्हाही अंतराळात एखादी गोष्ट पहिल्यांदा शोधली जाते तेव्हा त्याला नाव द्यावे लागते. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) कडे याची जबाबदारी आहे. नुकतेच भौतिक संशोधन प्रयोगशाळेने मंगळावर तीन अज्ञात विवर शोधले असून त्यांना लाल विवर, मुर्सन क्रेटर आणि हिल्सा क्रेटर अशी नावे देण्यात आली आहेत. एका विवराचे नाव उत्तरप्रदेशातील हातरस जिल्ह्यातील नगर पंचायत ‘मुरसान’ शी संबंधित आहे. दुसरे नाव बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ‘हिलसा’ या उपविभागाशी संबंधित आहे. त्याच वेळी, तिसऱ्या विवरचे नाव प्रसिद्ध भूभौतिकशास्त्रज्ञ आणि पीआरएलचे माजी संचालक, प्रोफेसर देवेंद्र लाल यांना समर्पित करण्यात आले आहे.
यातील मुर्सन विवराची रुंदी 10 किलोमीटर आहे, तर हिल्सा विवराची रुंदी 10 किलोमीटर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आपल्या भारतात इतकी मोठमोठी शहरे आणि राज्ये असताना या दोन्ही विवरला मुर्सन आणि हिल्सा अशी नावे का दिली असतील? तर याचे कारण म्हणजे मुर्सन हे नाव पीआरएलचे विद्यमान संचालक डॉ. अनिल भारद्वाज, ज्यांचे जन्मस्थान आहे तर हिल्सा हे डॉ. राजीव रंजन भारती यांचे जन्मस्थान आहे जे मंगळावर नवीन विवर शोधणाऱ्या टीमचा भाग होते. तर लाल क्रेटर हे पीआरएलचे माजी संचालक प्रोफेसर देवेंद्र लाल यांना समर्पित करण्यात आले आहे.अहवालानुसार, हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली.. अशा परखड शब्दात आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी “मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” या ऑर्गनायझरच्या लेखात आपली भूमिका मांडली.. याचाच अर्थ भाजपची महाराष्ट्रात जी काही नाचक्की झाली ती अजितदादांना सोबत घेतल्यामुळेच झाल्याचं खापर संघानं अजितदादांवर फोडलंय… पण महाराष्ट्राच्या राजकारणातला अनुभवी, प्रशासनाची जाण, विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरही छाप सोडणारा..आणि ज्यांच्या नावाला राज्याच्या राजकारणात एक दरारा होता.. त्याच दादांना महायुतीत घेऊन गेम उलटा कसा पडला? दादा सोबत आल्यावर वजन वाढायचं सोडून भाजपची इमेज खराब झालीय, असं संघाला का वाटतंय? लोकसभेच्या निकालात भाजपची राज्यात जी काही नाचक्की झाली खरंच त्याला अजितदादांना जबाबदार धरता येईल का? तेच सविस्तर समजून घेऊया..
अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला पहिल कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे सत्तेसाठी विचारधारेंची दिलेली तिलांजली
महाविकास आघाडीतील शिंदेंना साईडला करुन भाजपने युतीचं सरकार बनवलं.. तेव्हा ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडला.. भाजपसोबत निवडणुक लढवून नंतर गद्दारी केली… ही सगळी कारणं पुढं करुन भाजपने आपण केलं ते कसं योग्य केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटवून दिलं.. ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभुतीच्या फॅक्टरला बोथट केलं.. पण यानंतर सरकार बहुमतात असतानाही फडणवीसांनी राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवारांना सोबत घेतलं.. खरंतर हेच अजितदादा महाविकास आघाडी सत्तेत असताना निधीवाटपात अन्याय करायचे… हिंदुत्वाला विरोध करायचे… असा टीकेचा सूर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी केला होता.. पण त्याच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस सत्तेत बसले.. भाजप हा सगळा प्रकार सत्तेसाठी करत असून पक्षानं हिंदुत्वाच्या विचारांची केव्हाची तिलांजली दिली आहे, हे अजितदादांना सोबत घेतल्यावर जनतेचं परसेप्शन बनलं.. भाजपचे अनेक कार्यकर्तेही यामुळे भाजपवर नाराज झाले.. याचंच रिफ्लेक्शन लोकसभा निकालातही पाहायला मिळालं.. आणि भाजपला खासदारांचा दोन अंकी आकडाही गाठता आला नाही..
अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे शरद पवारांना हलक्यात घेतल्याचं
पक्षातील मातब्बर सोबत आल्यानं अजितदादांचं विमान हवेत होतं.. पण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचं कोणतंही ठोस कारण अजितदादांकडे नव्हतं.. त्यामुळे जनतेत शरद पवारांच्या बाजूने सहानुभुती तयार होऊन अजितदादांच्या विरोधात चीड निर्माण झाली.. हेच अचूक टायमिंग साधून पवारांनी दहा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले.. एवढंच नाही तर यातल्या बहुतांश मतदारसंघात भाजपने पक्षफोडी राजकारण केल्याची लाईन ठळक केली.. त्यामुळे शिंदे आणि अजितदादांबद्धल असणारा राग आणि संताप भाजपकडेही शिफ्ट झाला.. शरद पवारांच्या तुतारीच्या विरोधात बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार होते.. तिथं अजितदादांच्या विरोधी आणि शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभुतीची लाट भाजपवर उलटली आणि तुतारीच्या विरोधातील भाजपचे ७ उमेदवार तोंडावर पडले.. शरद पवारांनी प्रचाराच्या काळात सहकारी पक्षांसाठी विदर्भ – मराठवाडा पिंजून काढला.. आपल्याला जनतेचा सपोर्ट मिळतोय हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादीफुटीची सहानुभुती कॉंग्रेस आणि ठाकरे गटालाही मिळवून दिली.. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून भाजपचा नागपूर वगळता विदर्भातून पुरता सुपडासाफ झाला… पश्चिम महाराष्ट्रातीलही भाजपचा आकडा घसरला.. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीचा तोटा जितका अजितदादांना झाला नसेल त्यापेक्षा जास्त भाजपला बसला… अवघ्या ९ जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा इन्फ्लुएन्स संपलाय, असा त्याचा अर्थ निघाला… थोडक्यात भाजपने अजितदादांना सोबत घेत शरद पवारांना हलक्यात घेतल्याची मोठी किंमत आता भाजपला राज्यात मोजावी लागतेय..
अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वत:च राजकारण संपवलं असं म्हणायला शेवटचा मुद्दा सांगता येतो तो म्हणजे भाजपनं स्वत:हून वाढवलेला गुंता
शिंदे सोबत असताना भाजपचं सगळं सोर्टेड होतं. काहीही झालं तरी शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा डॉमिनन्स होता.. त्यामुळे भाजप सांगेल ती पूर्व दिशा असा एकूणच सरकारचा आणि युतीचा कार्यक्रम चालला होता.. पण अजितदादा युतीत आले आणि या सगळ्यात मीठाचा खडा पडला.. कारण अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते आले होते.. त्यात हे नेते प्रस्थापित आणि सहकाराच्या जीवावर राजकारण करत असल्याने ते बिनधास्त होते.. त्यामुळे झालं असं की जेव्हा लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु झाली तेव्हा महायुतीत चांगलीच बिघाडी पाहायला मिळाली..राष्ट्रवादीचे स्थानिक नेेते, आमदार हाताबाहेर गेले आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजपला फटका बसला.. थोडक्यात काय तर राष्ट्रवादीच्या फुटीचा बुमरँग भाजपवर होणं, विचारसरणीसाठी नाही तर सत्तेसाठी फोडाफोडी झाल्याचं परसेप्शन बिल्डअप होणं आणि अजितदादांना सोबत घेऊन जागावाटपाचा वाढवलेला गुंता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजप महाराष्ट्रात टोकापासून डायरेक्ट तळावर येऊन थांबलीय… अनेक गटतट आणि प्रेशर ग्रुप तयार झाल्याने भाजपसाठी विधानसभाही जड जाणार आहे, एवढं मात्र नक्की..