पुणे | मदर्शामध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर मदर्शातीलच मौलवीने लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघड झाला आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार करून मुलांनी जर कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी मौलवी देत होता. अखेर मुलांनी धाडस करून भारती विद्यापीठ पोलीस चौकीत मौलवी विरोधात फिर्याद दिली. मौलवीला पोलिसांनी अटक केले आहे. सदर प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला आहे. या मौलवीची शिकार आणखी मुले झाली आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकारा बद्दल सर्व स्तरातून निंदा केली जात आहे.
मराठा आरक्षणावर मुख्यामंत्र्यांची सर्व पक्षीय बैठक
मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर अजित पवार यांनी “कोर्टात टीकेल असे मराठा आरक्षण देण्यात यावे तसेच भाजप नेत्यांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबतची बेताल वक्तव्य थांबवावीत” असे सुचित केले.
बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, विनोद तावड़े, सुधीर मूनगंटीवार, दिवाकर रावते, रामदास कदम, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, शरद रणपिसे , अनिल परब , कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते
मराठ्यांना आरक्षण देण्यावर मुंबईत सर्व पक्षीय बैठक, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई | मराठा आरक्षणावर राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सदर बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण देण्यावर सर्व पक्षाचे एकमत झाले आहे. मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यातसाठी अध्यक्षांना विनंती करणे, मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावणे या मुद्द्यावर सर्व पक्षीयांचे एकमत झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तामिळनाडू राज्याच्या धरतीवर आरक्षण देण्यासाठी तो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावे लागते. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक दृष्टया मागास असल्याचे आयोगाला सिद्ध करायचे आहे. जेणेकरून आरक्षण कोर्टात टिकेल असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ज्या निरापराध व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी पोलिस महानिरीक्षकांना निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पाणीपुरीवर आली बंदी
बडोदा | पाणीपुरी लोकांच्या पसंतीला उतरलेला पदार्थ. रत्यावर, बागेबाहेर कोठेही फेरफटका मारायला गेले की पाणीपुरी आपल्याला भेटतेच. आपणाला ही ती खाल्ल्या वाचून राहवत नाही. परंतु याच पाणीपुरी विक्रीवर बडोद्याच्या पालिकाप्रशासनाने बंदी घातली आहे. सध्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव शहरभर पसरला आहे. यावर प्रतिबंध म्हणून हा निर्णय घेतला आहे असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आंबोली घाटात दुर्घटना ३३जण जागीच ठार.
आंबोली | कोकण कृषी विद्यापीठाची मिनी बस आंबोली घाटामध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात ३३ लोक जागीच ठार झाले असून फक्त एका व्यक्तीस जीवित वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. चालका सहित गाडीत ३४ लोक बसलेले होते. पावसाळ्यात आंबोली घाटात दुसर प्रकाश असतो त्यातून असे अपघात उदभवतात.
कोल्हापूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबोली घाट लागतो. घाट २० किमीचा असून गाडी कोसळलेली दरी तब्बल १२०० मीटरची आहे. घाट घनदाट झाडीने घेरलेला असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. मृत व्यक्ती पैकी संदीप झगडे, संदीप भोसले, प्रशांत भांबडी, सुनील कदम ही चार नावे समोर आली आहेत.
स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माध्यमांना ही बातमी कळवली आहे. आंबोली घाटात सतत आशा घटना घडत असतात असे स्थानिक लोकांनी सांगितले आहे. घाटातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
‘विधी लिखीत’ कायदे पुस्तिका प्रकाशित
नवी दिल्ली:- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. ‘एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या आणि उपाययोजना’ या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.
याप्रसंगी ‘विधि’-लिखित नावाची विविध कायद्यांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तक मालिका केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते यावेळी नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे प्रकाशित करण्यात आली. यामुळे आता महिलांना कायद्याची भाषा व ज्ञान मराठी मधून उपलब्ध झाले आहे. यामध्ये एकूण नऊ प्रकारे कायदे हे शब्दबद्ध करुन त्यांची स्वतंत्र कायदे पुस्तिका आता राज्य महिला आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा आंदोलन हिंसक झाले – शरद पवार
कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात अपयशी झाले आहे त्यांनी आंदोलनावर सकारात्मक पावले उचलली नाहीत तर राज्याची स्थिती हाताबाहेर जाईल असे शरद पवार म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार बोलत नसल्याची नेटिझममध्ये चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी आंदोलकांना दिलेली भेट ही सूचक भेट मानली जात आहे.
मराठा आरक्षणाची चर्चा बंद खोलीत नकोच – छत्रपती संभाजीराजे भोसले
कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मध्यस्ती करण्याची विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांना सर्व स्तरातून केली जात होती. त्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी शिवशाहू महाराष्ट्र दौरा काढून समजुन घेतला आहे. २०११ पासून मी आरक्षणाच्या लढाईत समाजासोबत आहे असे संभाजीराजे म्हणाले.
‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याची माझी इच्छा नाही. परंतु आपण प्रत्येक जिल्ह्यातून पाच आणि प्रत्येक तालुक्यातून दोन प्रतिनिधी म्हणून चर्चेला आलात तर ही चर्चा खऱ्या अर्थाने पार दर्शक होईल’ असे संभाजीराजे म्हणाले. ही चर्चा कोणत्याही प्रकारे बंद खोलीत केली जाऊ नये, ती सर्वोतोपरी खुली झाली पाहिजे आणि सर्वत्र प्रसारित केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मराठा समाज आक्रमक होत असताना आत्महत्या करतो आहे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे असेही संभाजी राजे म्हणाले.
नितीन गडकरींच्या मध्यस्थीने अवजड वाहनांचा संप मागे
नवी दिल्ली | मागील काही दिवसापासून सुरू असलेला अवजड वाहनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उच्चस्तर समिती नेमल्याने संप मागे घेत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेल दरवाढ, महामार्गावर पोलिसाकडून केली जाणारी पिळवणूक, आर.टी.ओ. अधिकाऱ्याकडून केली जाणारी छळनुक या मुद्द्यावर अवजड वाहन चालक संघटनांनी संप पुकारला होता. नितीन गडकरी यांनी संपकऱ्यांशी बातचीत केल्यावर संपकऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. उच्चस्तर समितीने अहवाल दिल्यावर संपाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला आहे.
एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक
चेन्नई | द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. करुणानिधी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. करुणानिधी हे यकृताच्या आजाराने त्रस्त आहेत.
मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते तेव्हा त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. करुणानिधी यांची प्रकृति अचानक बिघल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडू चे प्रमुख राजकारणी असलेले करुणानिधी हे ९४ वर्षाचे आहेत.










