Sunday, December 21, 2025
Home Blog Page 676

भुजबळांबाबत एकदाच काय तो निर्णय घेऊन टाका; शिंदे गट संतप्त

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच राज्यसभेत सुनेत्रा पवारांना संधी दिल्याने भुजबळांची ती संधीही गमावली. यानंतर आज त्यांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली. नाशिकमधून लढवण्याची माझी इच्छा होती, परंतु जागावाटप उशिराने झाल्याने मी माघार घेतली, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अजित दादा गटाला एक मोठा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांच्याबद्दल एकदाच काय तो निर्णय घ्या.. त्यांना काय पाहिजे ते देऊन टाका असं त्यांनी म्हंटल आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी म्हंटल, छगन भुजबळ कोणत्या गोष्टींवर खुष होतात यावर संशोधन केलं पाहिजे. मतदारसंघाच्या वेळीही आणि आताही त्यांची नाराजी आहे. राष्ट्रवादी पक्षाचा हा अंतर्गत निर्णय असल्याने यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र पक्षातील नाराजी असली तरीही त्याचा पिरणाम महायुतीवर होतो. त्यामुळे महायुतीला हे परवडणारं नाहीय. छगन भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका. यामुळे वातावरण गढूळ होत जातंय. माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.”

भुजबळ आज काय म्हणाले होते?

नाशिकची लोकसभा लढवायला मी तयार झालो होतो. दिल्लीतून तिकिट फायनल केल्यामुळे मी कामाला लागलो होतो. एक महिना झालं तरी उमेदवार जाहीर होईन. त्यामुळे म्हटलं बस झालं. समोरचा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागला आहे. मी माघार घेतल्यानंतर १५ दिवासंनी उमेदवारी जाहीर झाली. आता विधानसभेसाठी लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा असं छगन भुजबळ यांनी म्हंटल.

Thane Tourist Places : गजबजाटापासून दूर तरीही शहराजवळ आहेत ‘ही’ शांत ठिकाणे; जिथे मिळते क्षणभर विश्रांती

Thane Tourist Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Thane Tourist Places) रोजची दगदग आणि गडबडीतून क्षणभर विश्रांती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र शहरात राहणाऱ्या लोकांना असं सुख मिळणे जरा कठीणच!! सतत धावपळ, गोंधळ, गोंगाट, प्रदूषण या गोष्टी तर शहरात राहणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. असे असले तरीही मनावरचा आणि मेंदूवरचा ताण कमी होण्यासाठी कधीतरी थोडी विश्रांती गरजेची वाटते. त्यामुळे एखादी वन डे ट्रिप किंवा विकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे. पण शहराजवळ एखादी शांत आणि निवांत जागा कुठे असेल? या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत. ठाणे शहरापासून काही अंतरावर अशी काही पर्यटन स्थळे आहेत जी तुम्हाला क्षणभर विश्रांती देऊ शकतात. चला तर या ठिकाणांविषयी माहिती घेऊया.

उपवन तलाव (Thane Tourist Places)

ठाणे शहरातील उपवन तलाव हे अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. या तलावाशेजारी गणपतीबाप्पाचे सुंदर मंदिर आहे. तसेच आजूबाजूची झाडे आणि शांत परिसर मनावरील ताण हलका करतो. खास करून पावसाळ्याच्या दिवसात उपवन तलावाचे सौंदर्य खुलून येते. आसपासचे पर्वत आणि तलावाच्या मध्ये असणारी महादेवाची मूर्ती तलावाच्या सौंदर्यात आणखीच भर घालते. या तलावाकाठी अनेक कपल्सची गर्दी दिसते. तुम्ही या ठिकाणी न केवळ शांतता तर बोटिंगचा सुद्धा अनुभव घेऊ शकता.

येऊर हिल्स

ठाणे शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेले येऊर अत्यंत सुंदर ठिकाण आहे. हा संपूर्ण भाग डोंगराळ असून पावसाळ्यात येथे डोंगरांनी हिरवा शालू नेसल्याचे भासते. (Thane Tourist Places) पावसाळ्यात इथे अतिशय सुंदर हिरवळ आणि टेकड्यांचे अद्भुत सौंदर्य लक्ष वेधून घेते. इथे सायकलिंग करण्याची एक वेगळीच मजा येते.

फुलपाखरू बाग

फुलपाखरू पाहणे मनाला शांतता देते. फुलपाखराचे विविध रंग आणि त्याच भिरभिरणं आपल्याला गुंतवून ठेवते आणि या वेळात आपण आपली इतर टेन्शन कधी विसरलो ते आपलं आपल्याला कळत नाही. (Thane Tourist Places) अशा सुंदर अनुभवासाठी ठाणे शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळेकर गार्डनला भेट द्या. इथे हजारो झाडे आणि वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरे आहेत. जी पाहून तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल.

अक्सा बीच

ठाण्याला जाताना रस्ते प्रवास करणार असाल तर मध्यावर तुम्हाला एक समुद्रकिनारा लागतो. ज्याचे नाव अक्सा बीच आहे. ठाण्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे. (Thane Tourist Places) जिथली शांतता तुमच्या मनावरील ताण कमी करण्यास मदत करू शकते. अरबी समुद्राच्या लाटा पाहणे आणि मऊशार शाळूत चालणे तुम्हाला अल्लग शांतता देईल.

Foods To Increase Platelets : डेंग्यूमूळे शरीरातील प्लेटलेट्स झाले कमी? तर आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

Foods To Increase Platelets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Foods To Increase Platelets) पावसाळ्यात जिथे तिथे पाणी साचते आणि यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी, अनेक भागात डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार हातपाय पसरतात. डास चावल्याने डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय शरीरातून प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. थकव्यामुळे काहीही काम करणे होत नाही. काम सोडा, अशा रुग्णांना साधं उठणं बसणं सुद्धा मुश्किल होऊ लागतं. अशावेळी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागतो. त्याच पदार्थांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे. जो होऊन गेल्यानंतर केसगळती, शारीरिक थकवा आणि इतर आरोग्यविषयक समस्या जाणवतात. यामागील कारण म्हणजे, शारीरियातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण मोठ्या संख्येने कमी होते आणि त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. (Foods To Increase Platelets) म्हणूनच डेंग्यू होऊन गेल्यानंतरही आपल्याला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायला हवी. यासाठी आपल्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ञ देतात. डेंग्यू झालेल्या रुग्णांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटने समृद्ध पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते आणि इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. चला या पदार्थांविषयी सविस्तर माहिती घेऊ.

1. किवी

किवी हे फळ शरीरात कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. (Foods To Increase Platelets) कारण, यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्याचा फायदा प्लेटलेट्स वाढीसाठी होतो.

2. डाळिंब

डाळिंब हे एक असे फळ आहे जे खाल्ल्याने शरीराला एकाचवेळी अँटी ऑक्सिडंट्स आणि लोह एकत्र मिळते. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

3. आवळा (Foods To Increase Platelets)

बहुगुणी आवळा हा अनेक गंभीर आजरांवर प्रभावीपणे काम करतो. यातील अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीमूळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी मदत करते.

4. दही

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवायची असेल तर रुग्णांनी आपल्या आहारात दही खाण्यास सुरुवात करावी. यातील अनेक गुणधर्म आरोग्यदायी ठरतात. दही खाल्ल्याने बोन मॅरोची प्लेटलेट निर्मिती क्षमता वाढते आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते.

5. भिजवलेले मनुके

डेंग्यूच्या रुग्णांनी आहारात भिजवलेले मनुके खाल्ल्याने देखी प्लेटलेट्सची संख्या वाढते. (Foods To Increase Platelets) कारण भिजवलेल्या मनुक्यांमध्ये आयर्नची मात्रा जास्त असते. ज्यामुळे कमी वेळात प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत होते.

6. पपईचे पान

ज्या लोकांना डेंग्यू होऊन गेला आहे आणि त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाले आहेत त्यांनी पपईचे पान खाणे फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये फायटो केमिकल्स असतात. (Foods To Increase Platelets) जे शरीरात कमी झालेले प्लेटलेट वाढवण्यास मदत करतात.

7. इतर पदार्थ

डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन बी ९, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सीने समृद्ध पदार्थांचा समावेश करायला हवा. यामध्ये मसूर, बीन्स, अॅवोकॅडो आणि इतर धान्ये व्हिटॅमिन बी ९ देतात. (Foods To Increase Platelets) तर फळे, पालक, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, शतावरी यातून आपल्याला व्हिटॅमिन के मिळते. संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची यातून व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात मिळते.

Heart Attack Symptoms : हृदयासंबंधित समस्या दर्शवतात ‘ही’ लक्षणे; न समजल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक

Heart Attack Symptoms

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heart Attack Symptoms) गेल्या काही काळात संपूर्ण जगभरात हृदय विकाराने मरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोणतेही व्यसन नसलेले आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणाऱ्या लोकांचा देखील यात समावेश आहे. बिघडलेली जीवनशैली, चुकीच्या दैनंदिन सवयी, खाण्या- पिण्यात चुकीचे पदार्थ, दारु – तंबाखूसारख्या निकोटिनयुक्त पदार्थांचे सेवन यामुळे हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याचे समोर आले आहे.

यांपैकी कित्येक प्रकरणांमध्ये मृत्यू टाळता येऊ शकला असता. कारण हार्ट अटॅकपूर्वी काही महत्वाची लक्षणे दिसून येतात. ज्याविषयी माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांनी जीव गमावला आहे. (Heart Attack Symptoms) आज आपण हार्ट अटॅकआधी दिसणाऱ्या काही महत्वाच्या लक्षणांविषयी जाणून घेणार आहोत. जेणेकरून येत्या काळात बरेच जीव वाचवता येईल. सतर्कतेचा प्रत्येकाला याबाबत माहिती असायला हवी. चला जाणून घेऊया.

अतिशय थकल्यासारखे वाटणे

हार्ट अटॅकचे महत्वाचे लक्षण म्हणजे अचानक येणारा थकवा. (Heart Attack Symptoms) फ्रेश असता असता अचानक येणारा थकवा हा हृदयाच्या बाबतीत समस्या असल्याचे दर्शवतो. याकडे दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

छातीऐवजी खांद्यांमध्ये वेदना जाणवणे (Heart Attack Symptoms)

जगभरात हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी लक्षणे न समजल्याने बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना हार्ट अटॅकपूर्वी छातीत वेदना जाणवतात. त्यामुळे हार्ट अटॅकआधी फक्त छातीत वेदना होतात, असा अनेकांचा समज झाला आहे. तर असे नसून हार्ट अटॅकवेळी केवळ छातीतच नव्हे तर कधी कधी खांद्यामध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. सोबतच थकवादेखील जाणवू शकतो.

झोपेत घाम येणे

पंखा, एसी सुरु असूनही जर झोपेत तुम्हाला घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृदयाशी संबंधित समस्या असल्यास झोपेत घाम येतो. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Heart Attack Symptoms) शिवाय दम लागणे, श्वास लागणे हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

पोटाच्या समस्या

विविध कारणांमुळे पोटाशी संबंधित समस्या जाणवतात. मात्र, वयाच्या साठीनंतर जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता वा अतिसार जाणवत असेल तर संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्या. कारण, हे लक्षण हृदयाशी संबंधित समस्या दर्शवते. (Heart Attack Symptoms)

ॲसिडिटीचा तीव्र त्रास

एखाद्या रात्री ॲसिडिटीचा तीव्र त्रास जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. पोटात वरच्या बाजूला दुखणे, खांद्यात वेदना, पाठदुखी, जबडा वा घशात वेदना जाणवल्यास त्वरित सावध व्हा. महिलांमध्ये छातीच्या मध्यभागी वेदना जाणवण्याची समस्या होऊ शकते. (Heart Attack Symptoms) अशा ॲसिडिटीमुळे घाम येतो. ही लक्षणे हार्ट अटॅक येण्याचे संकेत ठरू शकतात.

Jayant Patil : जयंत पाटील हे राष्ट्रवादीत राहून भाजपचं काम करतायत??

31 Jayant Patil Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांच्या सोबत आहेत.. पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत… होय.. असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी.. पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरुनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली.. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत सेटलमेंट करत होते.. हे ताबडतोब थांबवायला हवं.. नाहीतर विधानसभेला घात होऊ शकतो…असं जाहीरपणे ट्विट करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं… पण पवारांच्या वाईट काळातही त्यांच्या पाठीमागे ढालीसारखे उभ्या राहिलेल्या जयंत पाटलांवर इतके गंभीर आरोप का होतायत? जयंत पाटील खरंच फुटीर आहेत का? पडद्याआड राहून ते नक्की मग कुणाचं काम करतायत? यातलं खरं काय आणि खोटं काय? त्याचाच हा आढावा…

जयंत पाटलांच्या क्रेडिबिलिटी वर शंका घेतली जातेय त्याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांची…अजितदादांनी पक्षामध्ये बंड घडवून आणण्याच्या आधीपासून जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या… भाजप नेत्यांनी तर जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या अनेक तारखा डिक्लेअर करून टाकल्या…त्यांच्यावर इडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचंही बोललं गेलं…पक्ष सोडण्यासाठी ते योग्य टायमिंगच्या शोधात आहेत तसंच महायुती सरकारमध्ये जलसंपदा खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचं वाटप झालं नाही मुळात तेच खातं जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आलय, अशा चर्चा पब्लिक डोमेनमध्ये अधून मधून होत असतात… विधानसभा अधिवेशनात मिश्किलपणाने का होईना “ आमचं तुमच्यावर लक्ष पण तुमचंच नाही…” असं म्हणून जयंत पाटलांना घातलेली साद बरंच काही सांगून जाते… अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपल्यासोबत आल्यापासून भाजपची महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली… पण पश्चिम महाराष्ट्रातील जयंत पाटलांसारखं राजकारणावर पकड असणाऱ्या… सहकार आणि राजकारणाच्या खाचा खुणा माहीत असणाऱ्या नेतृत्वाची भाजपला गरज होती…म्हणूनच युती सरकार आल्यापासून जयंत पाटील आणि भाजपमध्ये चर्चांच्या बऱ्याच फेऱ्या झाल्याचं बोललं गेलं…भाजपसोबतची त्यांची वाढती जवळीक पाहता अजितदादादा यांनी जयंत पाटलांना जाब विचारल्याचं काही वृत्तपत्रांमध्येही नमूद करण्यात आलय…पण जयंत पाटलांच्या आधीच अजितदादा भाजपसोबत गेल्याने आता जयंत पाटलांचा हा निर्णय बारगळला असल्याचंही बोललं जातं…

जयंत पाटील फुटीर आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या मुद्द्याचा विचार करावा लागतो तो म्हणजे लोकसभा निवडणुकांचा निकाल…जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यामुळेच शरद पवारांच्या तुतारीला दहा पैकी तब्बल आठ जागांवर दणक्यात विजय मिळवता आला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही…जयंत पाटलांचे कष्ट, मेहनत त्यामागे होती…मात्र रावेरमध्ये भली मोठी ताकद असताना आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करूनही माजी आमदार संतोष चौधरी यांचा पत्ता कट करून त्याजागी उद्योजक मात्र नवखे राजकारणी श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली… नाथाभाऊ यांच्या सुनबाई रक्षा खडसे इथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यामुळेच राष्ट्रवादीनं इथे रक्षा खडसे यांना फ्री हिट दिल्याचंही बोललं गेलं… श्रीराम पाटील यांनी रावेरमधून कडवी टक्कर दिली पण त्यांना पक्ष संघटनेकडून म्हणावी अशी ताकद मिळाली नाही, या रोहित पवारांच्या स्टेटमेंटने यात आणखीनच आग ओतली… अर्थात या सगळ्यात त्यांच्या बोलण्याचा कल हा जयंत पाटलांकडे होता… यासोबतच सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटलांच्या उमेदवारीला विरोध करून इथून शिवसेनेनं निवडणूक लढवावी… तर हातकणंगलेत राजू शेट्टींना विरोध असल्याने कॉम्प्रमाईज न करता तिथून महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा, असा जो काही फोर्स होता तो जयंत पाटलांचाच असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणं होतं…सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत…म्हणूनच मतदानाच्या दिवशीची जयंत पाटलांच्या प्रभावाखालील मत ही संजय काकांना शिफ्ट झाल्याची चर्चा मतदार संघात होतेय…हे कमी होतं की काय म्हणून रोहित पवारांनी निवडणुकीच्या काळात आपल्यातील काही नेते रात्रीच्या अंधारात विरोधकांना मदत करत होते…विधानसभेला याचा फटका बसू शकतो… अशा बेधडकपणे केलेल्या ट्वीट वरूनही आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अंदाज लागू शकतो…

याच यादीतला तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षातूनच जयंत पाटलांवर व्यक्त केली जाणारी नाराजी ….. शरद पवारांचा अत्यंत विश्वासू नेता कोण असेल तर ते म्हणजे जयंत पाटील…अजितदादांसारखा कणखर चेहरा पक्षामध्ये असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांना नेहमीच पक्ष संघटनेतील महत्त्वाची पदं दिली… पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असताना स्वतःची दादांनी आपल्याला पक्ष संघटनेची जबाबदारी द्यावी, अशी मागणी केली होती… पण असं असतानाही शरद पवारांनी जयंत पाटलांवरच विश्वास टाकला… राष्ट्रवादी एकसंध असतानाही जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला…जयंत पाटलांवरच्या नाराजीमुळेच राष्ट्रवादीचा मातब्बरांचा एक मोठा गट अजित पवारांसोबत गेल्याची चर्चाही अनेकदा होत असते…जयंत पाटलांना मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा आहे…म्हणूनच अजितदादांचं राजकारण पुढे सरकत नव्हतं…असा आरोप होत असतो.. आता मात्र पक्ष फुटीनंतर रोहित पवारांनीही जयंत पाटलांच्या निष्ठेवर शंका उपस्थित केल्याने आता या सगळ्या वादाचं पुढे काय होणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे…

जाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल… ती म्हणजे अनेकदा ईडी, सीबीआय यांचा दबाव असतानाही जयंत पाटील हे शरद पवारांसोबतच कायम राहिले…राष्ट्रवादीत धुसपुस असतानाही जयंत पाटलांनी ती मोठ्या कष्टाने रोखून धरली… एवढंच काय तर नवं नाव आणि चिन्हं घेऊन पक्षाला शून्यातून आठ खासदारांपर्यंत पोहोचवण्यात जयंत पाटलांनी गाळलेला घाम उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय… त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स मत बनवलं तर जयंत पाटील फुटीर आहेत, असं स्पष्ट बोलणं थोडसं धाडसाचं होईल… बाकी रोहित पवारांच्या या आरोपानंतर जयंत पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,

Honor Magic V Flip : Honor ने लाँच केला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल; मिळतात भन्नाट फीचर्स

Honor Magic V Flip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Honor ने आपला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Honor Magic V Flip असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. होनरचा हा फोल्डेबल मोबाईल सध्या चिनी बाजारात लाँच झाला असून विवो आणि सॅमसंगच्या फोल्डेबल मोबाईलला तगडी फाईट देईल असं बोललं जातंय… आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….

डिस्प्ले –

Honor Magic V Flip मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आलाय. तर यासोबत बाहेरील बाजूला 4 इंचाचा OLED एक्सटर्नल डिस्प्ले उपलब्ध आहे. हे दोन्ही डिस्प्ले डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतात. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित मॅजिक OS 8 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर ड्युअल सिम 5G, 4G, वायफाय, ब्लूटूथ असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

कॅमेरा – Honor Magic V Flip

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor Magic V Flip मध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा + 12MP ड्युअल रियर कॅमेरा आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4800mAh बॅटरी बसवण्यात आली असुन ही बॅटरी 66W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

किंमत किती?

Honor Magic V Flip च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 4999 युआन (अंदाजे 57,595 रुपये ) आहे. तर त्याच्या 12GB RAM + 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5499 युआन (अंदाजे 63,350 रुपये) आहे. 12GB RAM + 1TB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5999 युआन (अंदाजे 69,110 रुपये) आणि 16GB RAM + 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6999 युआन (अंदाजे 80,630 रुपये) आहे. हा मोबाईल काळ्या, पांढऱ्या आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे.

PM Awas Yojana : PM आवास योजनेतून सरकार बांधणार 3 कोटी घरे; ‘असा’ घ्या लाभ

PM Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Awas Yojana) आपल्या हक्काचं पक्कं घर असावं म्हणून जो तो धडपडत असतो. देशातील नागरिकांची हीच धडपड पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेंर्तगत देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर आणि लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

अलीकडेच नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली NDA चे सरकार स्थापन झाले. पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोदींनी देशभरात PM आवास योजनेच्या माध्यमातून ३ कोटी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. (PM Awas Yojana) त्यामुळे आता येणाऱ्या काही वर्षात नव्याने बांधल्या जाणाऱ्या या घरांसाठी तुम्ही पीएम योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी अर्ज कसा करायचा? याविषयी आपण जाणून घेऊ.

केंद्र सरकार बांधणार ३ कोटी घरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला मंत्रिमंडळाचे सहमत मिळाल्यानंतर आता ३ कोटी घरे बांधण्यात येणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. (PM Awas Yojana) ही घरे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत बांधली जाणार असून यामध्ये कनेक्टेड शौचालय, वीज, एलपीजी गॅस कनेक्शन आणि पाण्याचे नळ जोडणी अशा आवश्यक सुविधादेखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. याची नेमकी प्रक्रिया आणि स्वरूप काय? ते जाणून घेऊ.

काय आहे पंतप्रधान आवास योजना? (PM Awas Yojana)

केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना ही लोकांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी कमाल २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते. देशातील कित्येक गरिब कुटुंबांचे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून जो निधी मिळतो त्याचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाच्या आधारावर गटविभागणी करण्यात आली आहे. या गटांनुसार घरासाठी कर्ज दिले जाते.

पूर्वी या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम ३ ते ६ लाख रुपये इतकी होती. या कर्जावर अनुदानदेखील दिले जात होते. मात्र, आता या योजनेतुन मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १८ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. या योजनेसाठी अर्ज करायची प्रक्रिया नेमकी काय आणि कशी आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पंतप्रधान आवास योजनेसाठी ‘असा’ करा अर्ज

  • पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यांनतर मुख्य मेनूतून सिटीजन असेसमेंट पर्याय निवडा.
  • यानंतर अर्जदार पर्यायाला सिलेक्ट करा. (PM Awas Yojana)
  • आता या ठिकाणी एक नवी विंडो ओपन होईल. यामध्ये तुमचा आधार नंबर टाका.
  • त्यापुढे वैयक्तिक माहिती भरावी आणि बँक खात्यासंदर्भातील संपूर्ण माहिती तसेच सध्याच्या घराचा पत्ता अशी आवश्यक माहिती भरा.
  • यानंतर कॅपचा कोड टाका आणि माहिती व्हेरिफाय करून अर्ज सबमिट करा.

‘ही’ कागदपत्रे जमा करा

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. (PM Awas Yojana) याशिवाय उत्पन्नाचे प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याचे स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न्सदेखील महत्वाचे आहेत.

Government Scheme : सरकारची ‘ही’ योजना ज्येष्ठांना देते मोठा फायदा; दरमहा मिळतो 20 हजारांचा परतावा

Government Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Scheme) निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य कसे असेल? याचे नियोजन आपण आताच करणे गरजचे आहे. कारण, निवृत्तीनंतर आपले उत्पन्न थांबते. पण, दैनंदिन खर्च मात्र आहेत तसेच राहतात. अशावेणी आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करून गुंतवणुकीच्या दिशेने पाऊले उचलायला हवीत. योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यातील बऱ्याच आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. ज्येष्ठांसाठी फायदेशीर ठरेल असा एका सरकारी योजनेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) असे आहे. ज्यात गुंतवणूक केल्यास म्हतारपणी आर्थिक संकटांना हसत हसत तोंड देता येईल. या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक सरकारी योजना आहे. (Government Scheme) ज्यामध्ये एकरकमी १० लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर तुम्हाला दर तिमाहीत २० हजार ५०० रुपये किंवा वार्षिक स्वरूपात ८२ हजार रुपये कमवता येतात. माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकारी योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते. जी एक छोटी बचत आणि हमी परतावा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक स्वरूपात ८.२०% व्याज दिले जाते.

कालावधी (Government Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या नॉन-मार्केट-लिंक्ड प्लॅनमध्ये एकूण ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. यामध्ये गुंतवणूकदारास एकरकमी गुंतवणूक केल्याने व्याजाच्या स्वरूपात तिमाही उत्पन्न मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यास किमान ठेव रक्कम १ हजार आणि त्याच्या पटीत कारवी लागते. तर या योजनेतील कमाल ठेव ही ३० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

(Government Scheme) या योजनेत गुंतवणूक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा सांगायचा झाला तर, गुंतवणूकदारास वर्षभरात १.५० लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर आयकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. मात्र, एका आर्थिक वर्षात मिळणारे व्याज ५० हजारापेक्षा जास्त असेल तर ते करपात्र आहे. त्यामुळे एकूण भरलेल्या व्याजातून विहित दराने TDS कापला जातो.

SCSS मध्ये कोण खाते उघडू शकतं?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS योजनेत कोणतीही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. तसेच ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त नागरी कर्मचारीदेखील या योजनेचा भाग होऊ शकतात. (Government Scheme) याशिवाय ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारीदेखील SCSS योजनेचे खाते उघडू शकतात.

वार्षिक उत्पन्न कसे मिळवाल?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूकदारांना वार्षिक उत्पन्नासाठी १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून त्यांना तिमाही २० हजार ५०० रुपये व्याज मिळेल. तर चार तिमाहीत ही रक्कम ८२ हजार रुपये इतके होईल. योजनेच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळेल.

(Government Scheme) माहितीनुसार, एखादा गुंतवणूकदार या योजनेअंतर्गत सर्वाधिक ३० लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या रकमेवर गुंतवणूकदारांना ६१ हजार ५०० रुपये इतके त्रैमासिक व्याज मिळेल. तर चार तिमाहीत ही रकम १२ लाख ३० हजार रुपये इतकी होईल. योजनेच्या मॅच्युरिटीनंतर यातून गुंतवणूकदारांना मूळ रक्कम परत मिळेल.

अफगाणिस्तानची सुपर-8 मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर

AFG Into Super 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी घडामोड घडली आहे. पापुआ न्यू गिनीला (AFG Vs PNG) हरवून अफगाणिस्तानच्या संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ७ गडी राखून अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयाने न्यूझीलंडच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरलं असून किवी स्पर्धेबाहेर गेले (NZ Out Of T20 World Cup 2024) आहेत. ग्रुप C मधून आता वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या २ संघानी सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्के केलं आहे.

ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुलनेने खूप हलक्या असलेल्या पापुआ न्यू गिनीचा अफगाणी गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही आणि अवघ्या ९५ धावांत त्यांचा संघ गुंडाळला. यानंतर ७६ धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या अफगाणिस्तानने ७ गडी राखून आरामात विजय मिळवला आणि सुपर ८ चे तिकीट मिळवलं. ग्रुप C मधून वेस्ट इंडिजने आधीच सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तान सुपर ८ मध्ये गेलाय.

अफगाणिस्तानमुळे ग्रुप C मध्ये चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता आधीपासूच वाटत होती. त्यात त्यांनी न्यूझीलंडचा दारुण पराभव केल्यानंतर तर मोठी खळबळ उडाली होती. दुसरीकडे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ सुद्धा तुफान फॉर्मात आहे. वेस्ट इंडिजने सुद्धा न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला होता, त्यामुळे पापुआ न्यू गिनीविरुद्ध विजय मिळवताच रशीद खानचा संघ सुपर ८ मध्ये आपलं स्थान पक्के करणार हे नक्की होत.. आणि झालंही अगदी तसेच .. अफगाणिस्तानने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकले तरी त्यांना सुपर-८ ची फेरी गाठता येणार नाही. अशा प्रकारे किवी संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

Gray Hair | अकाली पांढरे झालेले केस नैसर्गिक पद्धतीने करा काळे; जाणून घ्या प्रक्रिया

Gray Hair

Gray Hair | आज-काल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर या गोष्टीचा परिणाम होत असतो. त्वचेशी संबंधित त्याचप्रमाणे केसांची संबंधित अनेक समस्या या लोकांना कमी वयात चालू होतात. तसेच आजकाल पांढऱ्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही लोकांचे केस हे वयोमानानुसार पांढरे होतात, तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. केसांवर अनेक लोक ब्युटी ट्रीटमेंट्स, केलिकल्स त्याचप्रमाणे प्रॉडक्ट वापरल्याने देखील केस पांढरे होत आहेत.

अकाली काळे झालेले हे पांढरे केस (Gray Hair) लपवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी लोक केसांना मेहंदी, डाय, हेअर कलर लावतात. परंतु ही समस्या दूर होण्याऐवजी केसासंबंधित समस्या आणखीनच वाढायला लागतात.

केसांना मेहंदी, डाय किंवा हेअर कलर लावल्याने केस काळे होतात. परंतु काही दिवसांनी ते पुन्हा जास्त प्रमाणात पांढरे दिसू लागतात. या आर्टिफिशियल पर्यायांपेक्षा केसांसाठी जर तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून काळजी घेतली, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. केसांना मेहंदी लावणे हा पूर्वीपासूनचा एक नैसर्गिक उपाय मानला जातो. परंतु यासोबतच तुम्ही त्यात आणखी काही नैसर्गिक घटक टाकून एक चांगला हेअरमास तयार करू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांना फायदा होईल आता हेअर मास्क कसा तयार करायचा हे आपण जाणून घेणार आहोत

साहित्य | Gray Hair

  • कॉफी पावडर – 2 टेबलस्पून
  • मेहेंदी पावडर – 2 टेबलस्पून
  • ग्रीन टी – 1 टेबलस्पून
  • दही – 2 टेबलस्पून
  • पाणी – गरजेनुसार

कृती

  • सगळ्यात आधी एका भांड्यात कॉफी पावडर मेहंदी पावडर ग्रीन टी घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून त्या मिश्रणाची एक पेस्ट तयार करून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा.
  • या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून जाईपर्यंत हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर ठेवा.
  • या मिश्रणातील संपूर्ण पाणी सुकून गेल्यावर त्यात थोडे दही घाला.
  • दही घातल्यानंतर हे मिश्रण थोडेसे शिजवून घ्या.
  • जेव्हा या मिश्रणाला दात काळा रंग येईल आणि हे मिश्रण पातळ पेस्टसारखे दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करा.
  • त्यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून घ्या.

हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत :

ज्याप्रमाणे आपण केसांना डाय किंवा मेहंदी लावतो त्याचप्रमाणे हा हेअर मास्क केसाच्या ब्रशच्या मदतीने लावावा.
हा हेअरमास्क लावल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिट तो तसाच केसांवर राहू द्या.
त्यानंतर थोड्यावेळाने केस नॉर्मल पाण्याने धुवा आणि केस धुताना कोणत्याही प्रकारचा शाम्पू किंवा साबण चा वापर करू नका.