Saturday, December 13, 2025
Home Blog Page 6763

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन भारत दौर्यावर, आजचा दिनक्रम असा

thumbnail 15310832212471
thumbnail 15310832212471

नोएडा : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन सध्या भारत दौर्यावर आहेत. मून-जे-इन यांचा भारत दौरा काल रविवार पासून सुरू झाला असून त्यांनी काल अक्षरधाम मंदिराला भेट दिली आहे. राष्ट्रपती मून-जे-इन आज सकाळी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यासोबत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नोएडाला जाऊन सॅमसंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही त्यांची भेट पूर्व नियोजित आहे.

मोबाईलची जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात, पंतप्रधान करणार आज उद्घाटन

thumbnail 1531082709958
thumbnail 1531082709958

नोएडा : भारतात जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी बनणार आहे. भारतीयांच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ही कंपनी बनत आहे. नोएडा मध्ये सॅमसंग ची मोबाईल कंपनी उभारण्याचा सरकारचा बेत आहे. या कंपनीचा विस्तार ३५ एकरमध्ये असणार आहे. २००५ मध्ये उभारण्यात आलेल्या मोबाईल कंपनीला सॅमसंग कंपनीने ४९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून सदर कंपनी सुधारित स्वरूपात उभी केली आहे. एका वर्षात कंपनी दुपटीने उत्पादन करण्यास तयार आहे. ७० हजार लोकांना रोजगार देणारी ही कंपनी येणाऱ्या काळात १ लाख ५० हजार लोकांना रोजगार मिळवून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन या दोघांच्या उपस्थितीत आज नोएडा येथे प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

टी-20 वर भारताची मोहर, १-२ने मालिका जिंकली

thumbnail 1531072207473
thumbnail 1531072207473

दिल्ली : इंग्लन सोबत सुरू असलेली टी 20 सामना मालिका भारताने जिंकली आहे. आज मालिकेतील शेवटचा सामना होता. तिसरा सामना शेवटचा आणि निर्णायक ठरला आहे. दुसऱ्या सामन्यापर्यंत १ – १ ने लढत बरोबरीवर होती. इंग्लंड ने ठेवलेल्या १९९ धवांच्या लक्षात भारतीय संघाने १८ ओव्हर आणि चार चेंडूने भेदले. या सामन्यामध्ये भारताने तीन विकेट गमावल्या तसेच रोहित शर्माची ५६ चेंडूत शतकाची खेळी उत्कंठा वर्धक ठरली.

पनामा पेपर घोटाळ्यात मुख्यमंत्री पुत्राचा समावेश, छत्तीसगड कॉग्रेसचा दावा

thumbnail 1531050966851
thumbnail 1531050966851

रायपूर : पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी देशाला धक्का देणारा निकाल सादर केल्याची घटना ताजी असताना काहीसा तसाच प्रकार भारतातील एका राज्यात होण्याचा सध्या संभव आहे. दोन दिवसांपूर्वी पनामा पेपर लीक घोटाळ्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला अनुक्रमे दहा आणि सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या पुत्राचा पनामा पेपर घोटाळ्यात समावेश असल्याचा दावा छत्तीसगड काँग्रेसने केला आहे.
पनामा पेपर्स मध्ये इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इनवेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स ने ज्या ‘अभिषेक सिंह’ चा उल्लेख केला आहे तो म्हणजे दुसरा कुणी नसून मुख्यमंत्री रमनसिंह यांचा पुत्र अभिषेक सिंह आहे असा आरोप छत्तीसगड काँग्रेसने केला आहे. आमच्याकडे यासंदर्भातले ठोस पुरावे असल्याचा दावा छत्तीसगड कॉग्रेस कमिटीने केला आहे.

एन.डी.तिवारी रुग्णालयामध्ये दाखल

thumbnail 1531049939278
thumbnail 1531049939278

दिल्ली : कॉग्रेसचे वरिष्ठ नेते एन.डी. तिवारी यांना प्रकृतीत बिघाड झाल्याने दिल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिवारी यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे सुत्रांकडून कळत आहे. मागील वर्षी तिवारी यांना पक्षाघाताचा झटला आला होता. परंतु त्यातून ते वाचले होते.
एन.डी.तिवारी कॉग्रेसचे वरिष्ठ नेते असून त्यांनी चार वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच एकदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. एन डी तिवारी यांनी विदेश मंत्री म्हणून ही काम पाहिले आहे.
बाहेरील संबंधातून जन्मास आलेला त्यांचा मुलगा आणि एन डी तिवारी यांच्यातील संपती चा खटला सर्वोच्च न्यायालयात विशेष गाजला होता. डी एन ए ची वैद्यकीय चाचणी करण्यास तिवारी यांनी विरोध दर्शवला परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशापुढे त्यांना नमते घ्यावे लागले होते. २०१४ साली खटल्याचा निकाल लागताच मोठ्या उदार अंतकरणाने त्या मुलाच्या आईशी त्यांनी लग्न केले. त्याच मुलाचे भाजपात राजकीय वसन करण्यासाठी तिवारी सक्रिय असल्याच्या बातम्या मधल्या काळात माध्यमात झळकल्या

आम्ही भाजपच्या सोबतच राहणार पण दुर्लक्षित करण्याची चूक भाजपने करू नये-नितीशकुमार

thumbnail 1531048656788
thumbnail 1531048656788

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आज जदयुची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या सोबत राहण्याचा ठराव संमत झाला आहे. आम्ही भाजपाच्या सोबत राहू परंतु भाजपने आम्हाला दुर्लक्षित केल्यास भाजपला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल असे नितीशकुमार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत जदयु ला दोनच जागा मिळाल्या होत्या. त्याउलट भाजपला २२ जागी विजय मिळाला होता. या निकालावर आधारित जागावाटपास आम्ही तयार नाही कारण आम्ही २०१४ साली एकटे लढून सुद्धा १७% मते घेतली होती. तसेच विधान सभा निवडणुकीमधील कामगिरी लक्षात घेऊनच जागा वाटप करण्यात यावे असेही नितीशकुमार यांनी यावेळी म्हणले अाहे.
राजकीय विचारवंतांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आटोपतील आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटतील आणि नंतरच आपला निर्णय जाहीर करतील असे बोलले जात होते. परंतु या संभावतेला नितीशकुमार यांनी छेद दिला असून त्यांनी अमित शहा यांना भेटण्या अगोदरच आपला निर्णय जाहीर केला आहे. २२ राज्यांच्या जदयु प्रतिनिधीं सोबत आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांसोबत केलेल्या सल्ला मसलतीच्या सहाय्याने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले आहे. नितीशकुमारांच्या या निर्णयामुळे तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व, कॉग्रेस सोबत आघाडी इत्यादी चर्चांना मुठमाती मिळाली आहे.

उनाव बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराच्या भावा विरुद्ध सी.बी.आयचे आरोपपत्र दाखल

thumbnail 1531047854589
thumbnail 1531047854589

लखनौ : उत्तर प्रदेशातील उनाव या ठिकाणी घडलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी सी.बी.आयने आरोपपत्र दाखल केले आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या भावा सहित अन्य चार जणांवर बलात्काराचे आरोप ठेवण्यात आले असल्याचे समजत आहे. जयदीप सिंह सेंगर आणि त्याचे साथीदार विनीत मिश्रा उर्फ विनय मिश्रा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा, रामशरण सिंह उर्फ सोनू सिंह, शशि प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह यांच्या विरोधात सी.बी.आय. ने आरोप पत्र दाखल केले आहे. सदरील खटल्याची सुनावणी लवकरच करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
उनाव बलात्कार प्रकरणाने उत्तर प्रदेश हादरवून सोडले होते. विरोधक भाजप सरकार विरोधात आक्रमक झाले होते. हा खटला सी.बी.आय कडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी जनमानसातून समोर येत होती. अखेर आज आरोपींना अटक झाल्यावर उत्तर प्रदेशातील तणाव थोड्याप्रमाणात निवळला असल्याचे चित्र आहे.

अमेरिकेचे परमाणू निःशस्त्रीकरण धमकी सारखे – उत्तर कोरिया

thumbnail 1531046187759
thumbnail 1531046187759

प्याँगयांग : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात गेले दोन दिवस शांती वार्ता कार्यक्रम सुरु आहे. त्यासंदर्भात उत्तर कोरियाने आज माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. “अमेरिकेचे परमाणू निःशस्त्रीकरणाचे धोरण हे इतर देशांना धमकी देण्यासारखे आहे” असे उत्तर कोरियाने म्हणले आहे. अमेरिकेच्या परमाणू निःशस्त्रीकरणाच्या धोरणाला उत्तर कोरिया कदापि पाठींबा देणार नाही अशी भूमिका उत्तर कोरियाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूल दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू

thumbnail 1531026587305
thumbnail 1531026587305

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर या महिलेचा आज उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. मुलाला शाळेत सोडून घरी परतत असलेल्या अस्मिता काटकर अंधेरी पूल दुर्घटनेत अडकल्या आणि गंभीर जखमी झाल्या होत्या. पाच दिवस त्यांनी मृत्यू शी झुंज दिली परंतु ती झुंज अपयश ठरली. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान अस्मिता काटकर यांच्या कुटूंबियांना रेल्वे प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शाळेतून छडी होणार गायब, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचा महत्वाचा निर्णय.

thumbnail 1531018703740
thumbnail 1531018703740

मुंबई : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे गाणं आता काल बाह्य होणार आहे. कारण शाळेतील छडी आता इतिहास जमा होणार आहे. छडी गायब करण्याचा निर्णय राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने घेतला आहे. छडीची शिक्षा ही मुलांच्या शरीर आणि मनाला इजा पोहचवत असल्याचे आयोगाचे निदान झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
लहानपणी शिक्षकांची छडी बघून मुलांच्या मनात धस्स व्हायचं. मुलांच्या मध्ये शिस्त दिसून यावी आणि मुलांनी अभ्यास करावा यासाठी छडीचा धाक असायचा परंतु ही छडी बाल हक्क आयोगाने गायब केल्याने अभ्यासाच्या शिस्तीसाठी शिक्षकांची कसोटी लागणार आहे.