Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6764

पुण्यातील डॉ. वसंत रामजी चंदन यांना “जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन अवाॅर्ड २०१८” जाहीर

thumbnail 1530536727484
thumbnail 1530536727484

पुणे : डॉक्टर ला नेहमी देवाचा दर्जा दिला जातो. रुग्णांची सेवा करण्यातच डाॅक्टरांचे सारे आयुष्य खर्ची जाते. रुग्नांची सेवा करणार्या डाॅक्टरांमधे असेही काही निवडक डॉक्टर असतात जे समाजाच्या आर्थिक बाजुचा विचार करून अल्पशा फी मधे आपली सेवा अविरतपणे चालु ठेवतात. अशाप्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आपले सामाजिक भान जपणार्या विशेष डाॅक्टरांना दिला जाणारा “जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन अवाॅर्ड २०१८” पुण्यातील डॉ. वसंत रामजी चंदन यांना जाहीर झाला आहे. डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रामधे विशेष काम करणार्या निवडक डॉक्टरांना ‘जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी या विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते.

‘आजचा सत्कार हा कुलवंतांचा सत्कार आहे असे मी मानतो. गेली २५ वर्ष मी जी.पी.एस सोबत आहे. श्रमाशिवाय फळ मिळत नाही हे खरेच आहे. मला या पुरस्कार रुपानर माझ्या श्रमाचे फळ मिळाले आहे. त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ कनिष्ठ सहकाऱ्यांचा आभारी आहे.’ असे म्हणत डॉ.वसंत रामजी चंदन यांनी भाषणातून सर्वांचे आभार मानले. आयुष्यात अनेक चढ़ उतार आले. त्या चढ़ उतारात मला माझ्या पत्नीची साथ मोलाची ठरली. आज मी जे काही कमावले आहे ते शिक्षणामुळे आहे असे म्हणत त्यांनी शिक्षणाचे महत्व आधोरेखीत केले. दरम्यान विज्ञान शाखेच्या विशेष विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. अध्यक्षपदी श्री. प्रवीण दरक उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कपिल बोरावके व संजय अरोरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवाजी कोल्हे यांनी केले तर समारोप डॉ हरिभाऊ सोनवणे यांनी केला.

(वृत्तांकन – सुनिल शेवरे)

जम्मु काश्मिरमधे काँग्रेसची पीडीपी सोबत युती? दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

thumbnail 1530534513708
thumbnail 1530534513708

दिल्ली : भाजपाने पीडीपीचा पाठींबा काढून घेतल्याने जम्मु काश्मिरमधे मेहमुबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. त्यानंतर राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. आता काँग्रेस पीडीपी सोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिर मधे काँग्रेस – पीडीपीची युती झाली तर त्याचा भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जम्मु काश्मिरमधे पीडीपी सोबत युती करावी काय? याविषयी चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अम्बिका सोनी, कर्ण सिंह, पी. चिदंबरम आणि गुलाम नबी आजाद आदी वरिष्ठ नेते बैठकीस उपस्थित होते. काँग्रेस – पीडीपी युतीसंदर्भात अद्याप ठोस असे काहीच हाती आलेले नसले तरी ही युती होण्यासाठी काँग्रेसने चांगलीच फिल्डींग लावली असल्याचे समजत आहे. जम्मु काश्मिरमधे सरकार स्थापन करण्यासाठी व बहुमत सिद्ध करण्यासाठी ૪૪ आमदारांची गरज आहे. सध्या पीडीपीकडे २८ तर काँग्रेसकडे १२ आमदार आहेत. बहुमतासाठी माकप १ व अपक्ष ३ असे चार आमदार लागणार आहेत. जम्मु काश्मिरमधे लवकरात लवकर निवडणुका होणे गरजेचे असल्याचे अम्बिका सोनी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणले आहे.

धुळे हत्याकांडातील मृतांचे मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार, दोषींवर कारवाईची मागणी

thumbnail 1530532681549
thumbnail 1530532681549

धुळे : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केली होती. जमावाने केलेल्या मारहानीत पाचजणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या त्या पाच जणांची आता ओळख पटली असून ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, अंगु इंगोळे आणि राजु भोसले अशी मृतांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी मृतांचे मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शवाला हात लावणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. मृत्यू झालेले पाचजण नाथगोसावी या भटक्या विमुक्त समाजाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे.

नाथगोसावी समाजातील लोकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदोलन छेडले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर काँग्रेस व आदी विरोधी पक्षांनी धुळे हत्याकांड प्रकरणी भाजपाला धारेवर धरले अाहे. पोलीस घटनास्थळी उपस्थीत असूनसुद्धा ते जमावाला रोखू शकले नाहीत असे म्हणत काँग्रेसने पोलीसांच्या निष्क्रीयतेचा निषेध केला आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगल राज आहे?” असा सवाल उपस्थित करत काँग्रस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

धुळे हत्याकांडप्रकरणी २३ जण अटकेत

thumbnail 1530516011993
thumbnail 1530516011993

धुळे : जमावाकडून मारहान झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात रविवारी घडली होती. लहान मुलांना पकडून नेत असल्याच्या संशयावरुन जमावाने पाच जणांना बेदम मारहान केली होती. पोलीसांनी शीघ्र तपासप्रक्रीया राबवावी अशी मागणी सर्वत्र होत होती. हाती आलेल्या माहीतीनुसार राईनपाडा प्रकरणामधे पोलीसांनी आत्तापर्यंत २३ जणांना अटक केली असल्याचे समजत आहे. धुळे हत्याकांडामुळे अख्का महाराष्ट्र हादरला असून समाजाच्या विविध स्तरांतून त्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. धुळे दौर्यावर असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘रेनपाडा प्रकरणात काही संशयीतांना अटक करण्यात आलेली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल’ असे आश्वासन दिले आहे. सदरील प्रकार सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवांमुळे घडला असून अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही केसकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले अाहे.

जमावाने मारहान केल्यने धुळ्यात पाच जणांचा मृत्यू

thumbnail 1530512978127
thumbnail 1530512978127

धुळे : जमावाने बेदम मारहान केल्याने पाच जणांचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातील धुळे येथे घडला आहे. मृत्यु झालेले पाच लोक लहान मुलांना पळवून नेण्यासाठी आले असल्याचा गैरसमज झाल्याने जमावाने त्यांना मारहान केली असल्याचे समजत आहे. मदतीसाठी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांनाही जमावाने मारहान केली असून ६ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रेनपाडा गावात घडली आहे. मृत्यु झालेले पाचही लोक आदिवासी समाजातील असून मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहीती आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने रेनपाडा गावातील बहुतांश लोक गाव सोडून पळून गेले आहेत. रेनपाडा प्रकरणात संपुर्ण गावच आरोपीच्या पिंजर्यात उभे असल्याने पोलीसांना तपासात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

आर.एस.एस. ला पर्याय कॉग्रेस सेवा दल

thumbnail 1530425519498
thumbnail 1530425519498

दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उमदी रणनीती, त्यागी स्वयंसेवक आणि कडक शिस्त याचा वापर भाजपला विजय मिळवण्यात होतो आहे. या उलट कॉग्रेसचे संघटन क्षीण झाल्याने पराभवास सामोरे जावे लागत आहे. कॉग्रेसचे सेवा दल पुन्हा सक्रिय करून संघाच्या रणनीतीला मात देण्याची तयारी कॉग्रेस पक्षाच्या तंबूत चालली असल्याचे सुत्रांकडून समजत आहे.

जेव्हा राष्ट्र सेवा दल देशात सक्रिय होते तेव्हा आर.एस.एस. ला वाढ नव्हती परंतु जेव्हा राष्ट्र सेवा दल कंकुवत होत गेले तेव्हा आर.एस.एस. वाढत गेली. हेच सुक्ष्म सत्य हेरून कॉग्रेसने सेवा दल मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशना नंतर राहुल गांधी त्यांच्या आमेठी आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघापासून कॉग्रेस सेवा दल मजबूत करण्याचा शुभारंभ करणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. १९२३ साली कॉग्रेस पक्षाने हिंदुस्तान सेवा दल नावाने कार्यकर्ता प्रशिक्षणासाठी शाखा उघडली. आक्रमक आणि निष्ठावान कार्यकर्त्यासाठी हिंदुस्तान सेवा दल प्रसिद्ध होते.या दलावर इंग्रजांनी१९३२ते१९३७या कालखंडात बंदी घातली होती.

“मराठा आरक्षण देणे आमच्या हातात नाही” – चंद्रकांतदादा पाटील

thumbnail 1530367057316
thumbnail 1530367057316

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण देणे आता सरकारच्या हातात राहिलेले नाही’ असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वेळ मारून नेला आहे. मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहीती दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षणा नंतर मिळणाऱ्या सवलती आम्ही आत्ताच देण्यास सुरू केल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाची फीची सवलत ५०% वर आणली असून या पुढे मराठा समाजाच्या मुलांना एकुण फी च्या निम्मी फी भरून प्रवेश दिला जाणार आहे.” असे पाटील यांनी सांगीतले आहे. सरकारने फि सवलती संदर्भात जी.आर. काढला असून यापुढे मराठा समाजातील मुलांची निम्मी परिक्षा फि सरकार्फे भरली जाणार असल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केले आहे. आठ लाखांपेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणार्या मराठा समाजातील विद्यर्थ्यांना ही सवलत मिळणार असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

वरिष्ठ अधिकार्यांना डावलून अनुपचंद्र पांडे यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी नियुक्ती

thumbnail 1530364420872
thumbnail 1530364420872

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुख्यसचिव पदी अनुपचंद्र पांडे यंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेरा वरिष्ठ आय.ए.एस. अधिकार्यांना डावलून पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पांडे औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. अनूप चंद्र पांडे १९८४ सालच्या आय.ए.एस. बॅचचे अधिकारी असून त्यांनी राज्याचे वित्त सचिव म्हणूनही जबाबदारी निभावली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी आणि काम तडीस लावणारा प्रशासक म्हणून अनुप चंद्र पांडे यांचा राज्यात लौकिक आहे. उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय म्हणून पांडे यांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सलगीतूनच त्यांची निवड झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्य सचिव पदाबरोबर औद्योगिक विकास महामंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभारही पाडे यांच्यावर सोपावण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून अनुप चंद्र पांडे उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता पदभार स्वीकारणार आहेत.

संपावर गेलेल्या त्या कर्मचार्यांची एस.टी. महामंडळाकडून वेतन कपात

thumbnail 1530271501105
thumbnail 1530271501105

मुंबई : संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे आदेश एस.टी. महामंडळाने दिले आहेत. ८ आणि ९ जून रोजी महामंडळाने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची तक्रार करत एस.टी. कर्मचारी संपावर गेले होते. आता या संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश महामंडळाने दिले असल्याने एस.टी. कर्मचार्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
कोणतीही पुर्वकल्पना न देता संपावर गेलेल्या आणि कामावर गैरजहर राहीलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या वेतनात कपात करण्याचे अादेश एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी विभागीय नियंत्रकांना दिले आहेत. एक दिवस संपावर गेलेल्या कर्मचार्यांचा नऊ दिवसांचा पगार कापण्याचा अादेश महामंडळाने दिला आहे तर दोन दिवस संपावर गेलेल्यांचा दहा दिवसांचा पगार कापण्याचा आदेश देण्यात आला आहे.
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाचा वेतन कपातीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणले आहे. निर्णय मागे घेण्यासंदर्भात आम्ही प्रशासनाला लेखी आवाहन करणार आहोत असेही शिंदे यांनी सांगीतले आहे. वेतन कपातीचा निर्णय महामंडळाने मागे न घेतल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला आहे.

मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन

thumbnail 1530268396567
thumbnail 1530268396567

पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ विकले जात असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला आहे. ५ रुपये किंमतीचे पाॅपकाॅर्न २५० रुपये किंमतीला विकले जात असून असे करणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे मनसेने म्हणले आहे. “आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल मॅनेजरला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मला मराठी समजत नाही असे तिरसट उत्तर आम्हला मिळाले. त्यामुळे आम्हाला मनसे स्टाईल आदोलन करावे लागले” असे मनसे नेते किशोर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले आहे.
मनसे कार्यकर्त्यांवर चतुर्शुंगी पोलीस ठाण्यामधे तोडफोड केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन कोणालही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.