Saturday, December 6, 2025
Home Blog Page 6768

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट? भाजप सत्तेतून बाहेर

thumbnail 1529402213204
thumbnail 1529402213204

श्रीनगर : भाजपा जम्मु काश्मिरमधे सत्तेतून बाहेर पडली आहे. भारतीय जनता पक्षाने पी.डी.पी. ला असलेला आपला पाठींबा काढुन घेतला आहे. भाजप मुफ्ती सरकार मधून अचानक बाहेर पडल्याने जम्मु काश्मिरमधीर मुफ्ती सरकार कोसळणार आहे. आज संध्याकाळ पर्यंत मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील अशी शक्यता आहे. यामुळे जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमधे जम्मु काश्मिरच्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीमधे राज्यातील सद्यपरिस्थितीवर दिर्घ चर्चा झाली. बैठकीअंती मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला. पी.डी.पी. सोबत युती करण्यामागे जे उद्देश होते ते पुर्ण होत नसल्याने आम्ही सरकारमधून बाहेर पडत आहोत असे राम माधव यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. जम्मु काश्मिरमधे शांतता नांदावी असा आमचा नेहमी प्रयत्न राहीला आहे परंतु एकहाती सत्त नसल्यामुळे भाजपाला राज्यात काम करताना अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळेच पक्षाने हा निर्णय घेतला आहे असेही ते म्हणाले.

मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, रायझींग काश्मिर वर्तमानपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या तसेच भारतीय सेनेचा जवान औरंगजेब याची हत्या आदी कारणांवरुन मोदी सरकारवर देशभरातून टिका होत होती. यातूनच भाजपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आता जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर सक्तीच्या रजेवर

thumbnail 1529400249398
thumbnail 1529400249398

दिल्ली : व्हिडिओकाॅन समुहाला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणामधे आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. व्हिडिओकाॅन समुहाला कर्ज देताना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपले कौटुंबिक हितसंबंध सांभाळले असल्याचा अारोप त्यांच्यावर आहे. सध्या चंदा कोचर यांची अंतर्गचौत चौकशी सुरु असून चौकशी पुर्ण होईपर्यंत त्या बँकेच्या सर्व व्यवहारांपासून दुर राहतील असा निर्णय आयसीअायसीआयच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आयसीआयसीआय बँकेचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणुन संदीप बक्षी यांची नेमणुक करण्यात आली आहे. याआधी समुहातील आयुर्विमा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम पाहत असलेले संदीप बक्षी हे मंगळवारपासून बँकेचा सर्व व्यावसायीक व्यवहार पाहतील असे सांगण्यात आले आहे. बँकेची पुढील वाटचाल काय असणार यात अनिश्चितता वाटत असल्याने तीन मोठ्या परदेशी कंपन्यांनी आयसीआयसीआय बँकेतील आपला शेअय काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. चंदा कोचर नियोजित रजेवर असून त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कायम राहतील असे बँकेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.

राहुल गांधीं यांना पंतप्रधान नरेंन्द्र मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

thumbnail 1529395313868
thumbnail 1529395313868

दिल्ली : काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज ૪८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. समाजमाध्यमांमधे #HappyBirthdayRahulGandhi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंन्डींग मधे आहे. राहुल यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जुन १९७० रोजी झाला. २००૪ पासून राहुल राजकारणात सक्रीय आहेत. २०१७ मधे काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर आल्यापासून राहुल राजकारणात चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावेळी प्रथमच राहुल गांधी त्यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस मुख्यालयात साजरा करणार असल्याचे बोलले जात आहे.

काश ओ दिन फिर आये की हिंदू और मुसलमानों मे हमे फर्क ही ना पता चले – नसिरुद्दीन शाह

thumbnail 1529321124233
thumbnail 1529321124233

पुणे : “काश तो दिवस पुन्हा यावा की हिंदू आणि मुसलमान यांच्यातील भिन्नपणा ओळखताच येणार नाही” असे मत सिनेअभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. “हमिद – द अनसंग ह्युमनिस्ट” या ज्योती सुभाष दिग्दर्शीत माहीतीपटाच्या प्रदर्शन कार्यमात ते बोलत होते. “हमिद” हा माहीतीपट मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक हमिद दलवाई यांच्या जीवनावर आधारीत असून त्यामधे अमृता सुभाष, क्षितिज दाते, हमिद दाभोळकर आदींनी काम केले आहे. अलीकडील काही वर्षांत भारतीय समाजात धर्मांदता मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. पूर्वी महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि बंगाल आदी राज्यांमधे हींदू – मुस्लिम यांच्यातला फरकही लक्षात येत नव्हता. लोकांना पाहून त्यांच्यातील कोण हिंदू आहे आणि कोण मुसलमान आहे हे कळणे मुश्कील जायचे. त्यांच्या बाह्यरुपावरुन त्यांचा धर्म कोणता ते समजायचे नाही. त्यांच्यातले वेगळेपण त्यांच्या चालण्या-बोलण्यातून दिसून यायचे नाही. मात्र अलीकडच्या काळात धार्मिक ओळखेला महत्व दिले जात असल्याने आणि रिलीजिअस आयडेंटीटीमुळे हिंदू – मुस्लिम यांतील फरक एकानजरेत जाणवू लागला आहे असे मत नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. “पुर्वीचे ते दिवस पुन्हा यावेत आणि हिंदू – मुस्लिम यांतील फरक ओळखताच येऊ नये..सर्वजण एक भाषा, एक पेहराव मधे गुण्यागोविंदाने रहावेत” अशी इच्छाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

कोयना – अंधारातील ५५ वर्ष

thumbnail 1529300353628
thumbnail 1529300353628

टीम HELLO महाराष्ट्र : मंदिराच्या घंटिजवळ मोबाईल अडकवून ते आजोबा मोबाईलची रिंगटोन वाजण्याची वाट पहात बसले होते. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसारातून आम्ही भटकंती करत होतो. संपूर्ण गावात रेंज फक्त या इथेच येते. एखाद्याला कोणाला पुण्या – मुंबईत कामाला असणार्या त्याच्या पोराबाळांना फोन लावायचा असेल तर या मंदिराच्या घंटेजवळ येऊन पूर्वेकडच्या बाजुला तोंड करुन उभं रहावं लागतं. तसं उभ राहील्यावर मग थोड्या वेळाने मोबाईल नेटवर्क पकडतो. वाघावळे नावाच्या गावात तर तिथल्या शाळेच्या मागच्या साइडला एक मोठ्ठा दगड पाढर्या रंगाने रंगवलेला आहे. त्या दगडावर पूरवेकडच्या बाजुला तोंड करुन उभं राहून हातातला मोबाईल उंच धरला की रेंज येते. गावात इतरत्र कोठेही नेटवर्क नाही. कोयना डॅमच्या बॅक वाॅटरचा हा परिसर अतिदुर्गम भागात मोडतो. सरकारी अनास्थेपोटी सह्यद्रिचा हा पट्टा वीज, रस्ते, दवाखाना अशा मुलभूत सुखसोईंपासून आजही कोसो दूर आहे. इथल्या गावांमधे फेरफटका मारल्यावर समजतं की गावांमधे फक्त वृद्ध लोकंच रहातात. रोजगाराच्या कसल्याच संधी उपलब्ध नसल्याने आणि डोंगराळ माळरानांवरती केलेल्या शेतीत पूरेसे पीक येत नसल्याने अर्धवट झालेल्या शिक्षणाच्या आधारावर इथल्या तरुण पोरांनी पुण्या-मुंबईची वाट धरलेली आहे. तसे करण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नसते. ९ वी – १० वी पर्यंतचेच शिक्षण झालेल्या यांच्या पदरी मात्र शहरात जावून हमाली करणे कींवा होटेलात वेटर म्हणुन काम करणे असलीच कामं पडतात. एखादा १२ वी वगैरे पास असेल तर त्याला कुण्या कंपणीत जाॅब मिळतो. पण पगार मात्र जेमतेम. त्यातनंच बचत करुन ही पोरं घराकडं पैसे पाठवतात. अन् अश्या पोस्टानं येणार्या पैस्यावरतीच इकडची गाव चालतात. सगळी तरणी पोरं कामानिमित्त बाहेर असल्याने या गावांमधे फक्त म्हातारि कोतारिच मागं उरतात.
कोयना धरणाची निर्मिती तशी १९६०-१९६२ ची.

कोयना धरण होण्यापूर्वी ही गाव खाली म्हणजे आत्ता धरणाचं पाणी आहे त्या पाण्यात होती. तीन-चार नद्याचा संगम असणार्या हा भाग तेव्हा नंदनवनच होता. पण या खोर्यात भिंत टाकून जर पाणी अडवलं तर त्यातुन अख्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा होऊ शकतो अन् मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकते हे लक्षात घेऊन सरकारने इथं धरण बांधण्याचं ठरवलं. आजुबाजूच्या सगळ्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं. कोणाला सातारा जिल्ह्यातच कोरेगाव भागात टाकण्यात आलं तर कोणाला पलुस च्या परिसरामधे हलवण्यात आले. काही गावांचं पुनर्वसन ठाणे जिल्ह्यात करण्यात आलं. महाराष्ट्राला पणी भेटावं, वीज भेटावी म्हणुन इथल्या लोकांनी त्यांच्या सुपीक जमिनी, गावं अन् देवळं पाण्याखाली घातलीत अन् सारा संसार गुडाळून आणि देव पाठीवर टाकुन ही लोकं सरकार जिथं पुनर्वसन करिल तिथं तिथं स्थलातरित झालीत. ही गोष्ट १९६२ ची. पण ज्यांना नवीन भाग पचला नाही, ज्यांना ते हवामान सोसलं नाही अशी काही लोकं पुनर्वसनानंतर सहा महीण्यानीच गावाकडच्या मातीच्या ओढीने माघारि आलीत अन् पाण्याची पातळी जिथं संपतेय त्याच्या वरच्या अंगाला, डोंगर माथ्याला खोपटी बांधुन राहू लागली. माघारि आलेल्या लोकांना सरकारने पर्यायी जमिनी दिल्या. सरकारने दिलेल्या माळराण जमिनीत ढेकरं फोडून राब राब राबून पोटापूरती शेती करुन तिरि मिरि करत ही लोकं जगू लागली. पण असं जिकरिचं जिवण जगणार्या या लोकांना सरकारकडून अद्याप पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नाही. शेतीसाठी सुद्धा सिचनाची सोय नाही. सगळी शेती आभाळातनं पडणार्या बेभरवशी पाण्यावरच अवलंबून असते. कोयना धरणाच्या पश्चिमेच्या बाजुला वसलेल्या गावांची स्थिती तर फारच बिकट आहे. तिकडच्या गावांनी अजुन लाईट म्हणजे काय प्रकार असतो तेच पाहीलेले नाही. ज्याच्या जमिनी अन् गावा पाण्याखाली बुडवून कोयना धरण उभं राहिलं आज त्याच लोकांच्या खोपटांमधे त्या धरणामधुन तयार झालेली वीज पोहोचलेली नाही. धरण होऊन ५५ वर्ष झालीत पण या ५५ वर्षांत या गावांत वीज आली नाही. पलीकडच्या पश्चिमेच्या गावांमधे रस्ता नावाचा प्रकारच नाही. होडी हेच दळणवळनाचे प्रमुख साधन आहे. पूर्वेकडच्या बाजुला रस्ता आहे पण त्या रस्त्याने स्वातंत्र्यानंतरच्या या इतक्या वर्षांमधे डांबर पाहीलेले नाही. त्यामुळे पाऊसाळ्यात चिखल होऊन तो बिनकामी होतो. डांबरिकरण नसल्याकारणाने पूरवेकडच्या १-२ गावांत येणारी एस.टी. बस पावसाळ्यात ५ महिने बंदच असते. दळनवळणासाठी सरकारने काही लाॅज (मोटारिवरची बोट) ठेवल्या आहेत. पन त्या सुद्धा उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर बंद होतात अनं पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे बंद असतात. जिथं माणसाच्या डाॅक्टरची बोंबाबोंब आहे तिथे जनावरांसाठीचा डाॅक्टर असण्याचा प्रश्नच येत नाही. किरकोळ दुखापतीनेसुद्धा इकडं गुरं ढोरं मरुण जातात.

एखाद्याला साप वगैरे चावला तर त्याला चौघा जनांणी उचलायचा अन् पळवत ३० – ३५ की.मी. वर असलेल्या तापोळा ला न्ह्यायचा. जगला तर जगला न्हायतर मेला वाटतच. कोणी डिलिव्हरिची अडलेली बाई असली तर डालगं करायचं अन् दोघा – तिघांनी खांद्यावरनं धरणाच्या काठापर्यंत न्ह्यायाची अन् तिथनं होडीमधुन तापोळ्याच्या सरकारी इस्पितळात न्ह्यायाचं. तिथं बी काय न्हाय झालं तर सातार्याला पळवायचं.

मंदिराच्या आवारात बसलेले आजोबा

“आरं आम्ही माणसं हाय जनावरं न्हाय.” असं ते मदिराच्या आवारात बसलेले आजोबा आम्हाला सांगत होते. “ती अॅम्ब्यूलन्स राहुदे मरुदे पण निदान एस.टी. बस तरि सरकारणं नियमित सुरु करुन द्यायला पाहीजेल का न्हाय? वाहन इथवर यत असल तर माणुस मरायचा तर न्हाय. कसतर करुन त्याला दवाखाण्यात तरि नेता येईल.”

“सरकारला काय भिक लागलीय का? मला हवं तर पकडून न्ह्या मी असं म्हणतूय म्हणुन. मी कोठीत बसायला तयार हाय.” असं म्हणतानाचा त्यांचा आवाज कठोर वाटत होता. सह्याद्रीतल्या खर्या घाटी माणसासारखा.

विडियो पहाण्यासठी खालील लिंकवर क्लिक करा

कोयना – अंधारातील ५५ वर्ष..

कुत्र्याचा मृत्य झाला तर त्याला मोदी जबाबदार कसे, श्रीराम सेनेच्या मुतालिक यांचा सवाल

thumbnail 1529298781617
thumbnail 1529298781617

बेंगळूरु : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या पार्श्वभुमीवर खळबळजनक वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्यांवरुन मोदींना टार्गेट करणार्या विरोधकांवर मुतालिक यांनी हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यु झाला तर त्याला पंतप्रधान नरेंन्द्र मोदी कसे काय जबाबदार असू शकताता असा सवाल मुतालिक यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधे ज्या हत्या झाल्या त्या प्रत्येक हत्येवेळी तेथे काँग्रेसची सत्ता होती. असे असूनही कोणीही काँग्रेसला यात धारेवरती धरत नाही. मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येवरुन मोदींना विनाकारन टार्गेट केले जात आहे असेही ते म्हणाले. पत्रकार गौरी लंकेश, जेष्ठ विचारवंत कलबुर्गी, जेष्ठ समाजसेवक नरेन्द्र दाभोळकर तसेच जेष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात मुतालिक यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.

अरविंद केजरिवाल नक्षलवादी – सुब्र्हमन्यम स्वामी

thumbnail 1529239290124
thumbnail 1529239290124

दिल्ली : भाजपा नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल नक्षलवादी आहेत असे वक्तव्य केले आहे. केजरिवाल सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात उपोषणाला बसले आहेत. अधिकार्यांच्या संपामधे मोदींचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला अाहे. दरम्यान वेगवेगळ्या चार राज्यांचे मुख्यमंत्री असलेले ममता बॅनर्जी, चंन्द्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी केजरीवाल यांना भेटण्याकरता राज्यपालांच्या निवासस्थानी गेले असता त्यांना भेट नाकारण्यात आली. परिणामी त्यांनी केजरीवाल यांच्या पत्नींची भेट घेऊन केजरीवाल यांना आपला पाठींबा दर्शवला. ममता बॅनर्जी, चंन्द्राबाबू नायडू, पी. विजयन आणि एच. डी. कुमारस्वामी हे केजरिवाल यांचे समर्थन का करत आहेत? असा सवाल करत अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचे सनसनाटी वक्तव्य केले. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमधे घटनात्मक संकट उभे राहीले असल्याचा आरोप केला तसेच यामुळे दिल्लीवासीयांचे नुकसान होत असल्याचे म्हटले. गेले चार महीणे राज्यातील कामकाज ठप्प असून लोकशाहीत अशी परिस्थिती चिंताजनक आहे असेही त्या म्हणाल्या.

आता फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या कॅबिनसमोर ठिय्या

thumbnail 1528972816098
thumbnail 1528972816098

पुणे : शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाने यावर्षीपासून काही विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद केले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इथून पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना नो एन्ट्री असणार की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुणे विद्यापिठाअंतर्गत येणार्या एफ.सी. महाविद्यालयात पदवीच्या दुसर्या वर्षापासून स्पेशलायझेशनसाठी एक विषय विद्यार्थ्यांना निवडावा लागतो. महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामधे बहुतांश विद्यार्थी ग्रामिण भागातील असून मराठी माध्यम निवडणार्यांचे प्रमाण त्यात अधिक आहे. परंतु चालू वर्षापासून समाजशास्त्र आणि इतिहास आदी विषयांमधे स्पेशलायझेशन करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ग्रामिण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शिवाय हा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने कसलीही पुर्वकल्पना न देता घेतला असल्याने आता विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनसाठी अपरिहार्यपणे वेगळे विषय निवडावे लागत आहेत. महाविद्यालयाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने सदर निर्णय मागे घ्यावा किंवा विद्यापिठाची संबधीत निर्णयासंदर्भातील अधिसुचना आम्हाला दाखवावी असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. “आजपर्यंत महाविद्यालयात सर्व विषयांकरिता मराठी माध्यमाचा पर्याय उपलब्ध होता..मग या वर्षी असं नेमकं काय झालं की महाविद्यालय प्रशासनाने समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांचे मराठी माध्यमाचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला?” असा प्रश्न उपोषणाला बसलेल्या रामेश्वर क्षिरसागर या विद्यार्थ्याने विचारला आहे. “आम्ही गेले काही दिवस महाविद्यालय प्रशासनाकडे मराठी माध्यम सुरु ठेवण्याची विनंती करत आहोत परंतु यापूर्वीही विद्यापिठाची यासाठी परवानगी नव्हती. आम्ही विद्यार्थी हितासाठी आजपर्यंत मराठी माध्यमाचे वर्ग चालवले असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे” असे कौस्तुभ पाटील याने सांगीतले. महाविद्यालयाशी संपर्क साधला असता प्रचार्य उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

प्राचार्यांच्या कॅबिनसमोर उपोषनाला बसलेले विद्यार्थी

आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांची राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

thumbnail 1528805533900
thumbnail 1528805533900

इंदौर : आध्यात्मिक गुरु भैयुजी महाराज यांनी आज त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले भैयुजी महाराज इंदौर येथे वास्तव्यास होते. काही महीण्यांपूर्वीच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला होता. भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने त्यांच्या शिष्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आत्महत्या करण्याच्या काही तास अगोदर ते ट्विटरवर अॅक्टिव होते. मग नंतरच्या तासाभरात असे काय घडले की भैयुजी महाराजांनी आत्महत्या केली असा प्रश्न पडल्याने उलट सुलट चर्चांना उधान आले होते. पंरतु त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट नुसार मानसिक तणावातून आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नये असेही त्यांनी लिहीले आहे. मागील वर्षीच ग्वालियरच्या डाॅ. आयुषी शर्मा यांच्यासोबत भैयुजी महाराजांनी दुसरा विवाह केला होता. दुसरा विवाह झाल्यापासून भैयुजी महाराजांच्या घरामधे तणावाचे वातावरण होते असे बोलले जात आहे. घरघुती ताणतणावामधूनच भैयुजी महाराजांनी आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक निरिक्षणातून दिसत आहे.

अटल बिहारी वाजपेयी उपचारासाठी AIIMS मधे, प्रकृती चिंताजनक

thumbnail 1528779206915
thumbnail 1528779206915

दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्लीतील AIIMS रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्नालय व्यवस्थापनाने रात्री उशीरा दिलेल्या माहीतीनुसार वाजपेयी यांना मुत्रसंसर्गाचा त्रास असून ते किडनीच्या विकाराने त्रस्त आहेत. एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली १२ डाॅक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून लवकरच मेडीकल बुलेटीन जारी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. वाजपेयी यांना २००९ मधे ऋदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ते पुर्णपणे बेडरेस्टवर होते. सोमवारी अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंन्द्र मोदी, अमित शहा आदींनी रुग्नालयात जाऊन वाजपेयी यांची भेट घेऊन विचारपूस केली.