हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला राज ठाकरेंच्या रूपाने चौथ इंजिन लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. महायुतीच्या जागावाटपात मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही तरीही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि जास्तीत जास्त खासदार निवडून आणा असं आवाहन मनसैनिकांना केलं होते. या सगळ्याच्या बदल्यात आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) मनसेने महायुतीकडे 20 जागांची मागणी केल्याची चर्चा सुरु आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.
मनसेने कोणत्या जागा मागितल्या ?
मनसेने महायुतीकडे मागितलेल्या 20 जागांमध्ये वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुणे या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे. वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर दादरमधून नितीन सरदेसाई आणि वर्सोवातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत असं बोलल जातंय. 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र आता मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात आधीच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातच जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यात रामदास आठवले यांची रिपाई सुद्धा आहे. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आहे. त्यात आता मनसेची भर पडल्याने महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपात सुद्धा घोळ पाहायला मिळतोय कि आधीच्या चुकांतून धडा घेत महायुती विधानसभेचे जागावाटप लवकरात लवकर उरकून घेते हे पाहायला हवं.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आजची बातमी अशा निसर्ग आणि पाऊस प्रेमींसाठी. आज आपण पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर अशा ५ धबधब्यांविषयी माहिती घेणार आहोत. जिथे पावसाळ्यात निसर्गाची वेगळीच शाळा भरते. ज्या शाळेत प्रत्येकाला जावेसे वाटते. चला तर जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्रातील टॉप ५ धबधबे.
1. ठोसेघर धबधबा (Satara Waterfalls)
ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.
2. धारेश्वर धबधबा
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात धारेश्वर धबधबा आहे. जो पाटणपासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर आहे. तर साताऱ्यापासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. (Satara Waterfalls) धारेश्वर डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आणि या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. हे एक अध्यात्मिक स्थळ असून अनेक पर्यटक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. इथे पावसाचे प्रमाण वाढले की, डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. त्यापैकी एक म्हणजे धारेश्वर.
3. सडावाघापूर धबधबा
सातारा जिल्ह्यातील चाफळ विभागात सडावाघापुर धबधबा आहे. तारळे पाटण रोडवर सुमारे १४ किलोमीटर अंतरावरील हा धबधबा उलटा धबधबा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली की, पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. (Satara Waterfalls) विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, थंडगार हवा आणि रिमझिम पाऊस असा सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल तर एकदा तरी या धबधब्याला जरूर भेट द्या.
4. वजराई भांबवली धबधबा
वजराई भांबवली धबधबा हा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. (Satara Waterfalls) या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी असून आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. आसपास अत्यंत घनदाट जंगल असल्याने पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटल्यासारखा दिसतो. देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो.
5. एकिव धबधबा
सातारा जिल्ह्यात कास रोडवर पारंबो फाट्यापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर एकिव धबधबा आहे. कास पठारावरून पडणारे पावसाचे पाणी या धबधब्यातून खाली पडते. (Satara Waterfalls) कास पुष्प पठाराला भेट देणारे पर्यटक या ठिकाणी हमखास जातात. अत्यंत सुंदर, नयनरम्य आणि मनमोहक दृश्यांसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे. सातारा शहरातून बामणोलीला जाणाऱ्या एसटी बसने किंवा खासगी गाड्यांनीसुद्धा या ठिकाणी जाता येते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही जर रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, मोदी सरकारने केंद्रात सत्ता स्थापित होतात शिधापत्रिकाधारकांना मोठा दिलासा दिलेला आहे. सरकारने नुकत्याच आधारकार्ड रेशन कार्डशी (Ration card) लिंक करण्याच्या तारखेमध्ये वाढ केली आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना 30 जून ऐवजी 30 सप्टेंबरपर्यंत आधार आणि रेशन कार्ड लिंक करता येणार आहे. याबाबतची माहिती अधिसूचना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.
केंद्रामध्ये सत्ता स्थापित झाल्यानंतर मोदी सरकार जनतेसाठी विविध योजना आणताना दिसत आहे. आता मोदी सरकारने गोरगरिबांना दिलासा देत आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. यापूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याच्या अंतिम तारीख 30 जून होती. परंतु आता 30 सप्टेंबरपर्यंत या तारखे मध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महत्वाचे म्हणजे मोदी सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ची घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. कारण की मधल्या काळामध्ये विविध भागातील लोक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड घेऊन योजनेचा अधिक फायदा घेत असलेले निदर्शनात आले होते. यावर ठोस कारवाई व्हावी त्यामुळे सरकारने हा नियम लागू केला आहे. या नियमामुळे कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक रेशन कार्डवरून मोफत धान्य घेता येणार नाही.
रेशन कार्ड आधारशी लिंक कसे करावे??
सर्वात प्रथम सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या वेबसाईटवर जावा.
समोर दिलेल्या विंडोवर आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.
यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला मोबाईल नंबर वर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल.
हा ओटीपी एंटर करून प्रकिया पुर्ण करा. या प्रोसेसने तुमचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक होईल.
PCMC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत तांत्रिक, प्रशासकीय आणि सामान्य या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या 46 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी 18, 19, 20, 21 आणि 22 जून रोजी मुलाखतीसाठी हजर रहावे.
महत्वाची माहिती | PCMC Bharti 2024
पदाचे नाव – तांत्रिक, प्रशासकीय, सामान्य
पदसंख्या – 46 जागा
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
वयोमर्यादा – 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्रमांक ३१/१ ते ५, ३२/१बी/३ ते ६,सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18, 19, 20, 21 आणि 22 जून 2024
पद संख्या | PCMC Bharti 2024
तांत्रिक -30
प्रशासकीय – 03
सामान्य – 13
अर्ज कसा करावा ?
या भरती अंतर्गत मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीला जाण्यावेळी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे सादर करावे.
दिलेल्या पत्तावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे
IAF Agniveer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय संरक्षण दल अंतर्गत भरती निघालेली आहे या भरती अंतर्गत वायुसेना अग्निर्वायू या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागणार आहेत. 8 जुलै २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल, तर 28 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत
महत्वाची माहिती | IAF Agniveer Bharti 2024
पदाचे नाव – वायुसेना अग्निवीर वायु
वयोमर्यादा – 17.5 – 21 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024
अर्ज कसा करावा ?
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
28 जुलै 2024 खर्च करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाय व्होल्टेज साताऱ्याचा निकाल लागला… उदयनराजे जायंट किलर ठरत शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंचा गेम झाला… संपूर्ण महाराष्ट्रात तुतारीची हवा असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्लालाच भगदाड पाडत साताऱ्यात ओन्ली छत्रपती हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय… लोकसभेच्या या निकालातच विधानसभेला काय होणार? याचं पिक्चरही क्लिअर झालंय… साताऱ्याची लोकसभा जितकी घासून झाली त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त सातारा जिल्ह्यातील या आठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका रंगतदार होणार आहेत… लोकसभेच्या निकालाचा अंदाज लावता साताऱ्यात सध्या नेमके कोण 8 आमदार निवडून येतील?…पाटणपासून ते कोरेगावापर्यंत तुमच्या मतदारसंघात आमदार म्हणून कोण निवडून येईल? साताऱ्यातील जनता विधानसभेला कुणाला कौल देणारय? त्याचीच ही स्टोरी…
यातला पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो कोरेगाव विधानसभेचा…
2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीसोबत झालेल्या विधानसभेला शिवसेनेकडून महेश शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे अशी लढत झाली… तेव्हा मात्र महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत कोरेगाव ताब्यात घेतला… नंतरच्या पक्षफुटीच्या राजकारणात शशिकांत शिंदे तुतारीकडे जाऊन लोकसभा लढले आणि पडले देखील… त्यामुळे आता 2024 ला पुन्हा एकदा इथून महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशीच लढत पाहायला मिळेल… मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू आणि लोकसभेला उदयनराजेंना लीड दिल्यामुळे यंदाही महेश शिंदे यांची इथली आमदारकी फिक्स समजली जातेय…
दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे सातारा जावळीचा…
सातारा जावळीचे करंट आमदार आहेत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले… त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादीचे दीपक पवार. 2019 चं स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर इथून शिवेंद्रसिंह राजेंनी मोठ्या लीडने सातारचं मैदान मारलं होतं… खरंतर सातारा, जावळी या पट्ट्यात शिवेंद्रसिंह राजे यांची मोठी ताकद आहे… त्यात उदयनराजे प्लस शिवेंद्रसिंह राजे असं लोकसभेला बघायला मिळालेलं समीकरण विधानसभेलाही कायम राहणार असल्यानं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची ही सीट कन्फर्म समजली जातेय…
साताऱ्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे वाई – खंडाळा
वाई खंडाळ्याचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे मकरंद आबा पाटील…2019 च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव करत मकरंद आबा जायंट किलर ठरले होते…2024 च्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडे वाई खंडाळ्यातून म्हणावा असा तगडा प्रतिस्पर्धी सध्या रिंगणात नाहीये… दुसरीकडे मदनदादा भोसले यांची प्रदेश कार्यकारणीवर वर्णी लावल्यामुळे ही जागा मकरंद आबांनाच मिळेल हे निश्चित मानलं जातंय..
साताऱ्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे पाटणचा…
सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई अशी इथली पारंपारिक लढत… मात्र 2019 ला देसाईंनी पाटणकरांची गाडी मागे टाकत आमदारकी मिळवलीच… खरंतर पहिलीच टर्म असल्यामुळे शंभूराज देसाईंना म्हणावा असा स्कोप मिळाला नव्हता… पण शिवसेनेतील फुटीनंतर शंभूराज देसाईंच्या राजकारणाला उभारी आली… या सगळ्यात सत्यजित पाटणकर यांचं राजकारण मागे पडलं…याचाच परिणाम म्हणून पाटणकरांना शशिकांत शिंदेंना लीड मिळवून देता आली नाही… याचाच अर्थ येणारे विधानसभेला पाटणकरांपेक्षा शंभूराज देसाईंचं पारड जड दिसतंय…
साताऱ्यातला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे कराड दक्षिणचा…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे करंट आमदार…2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज बाबांना लढत दिली… पण पृथ्वीराज बाबा इथून आरामात निवडून आले… पण आता 2024 मध्ये इथले डायमेन्शन्स बदलले आहेत… ज्या 2019 च्या पोट निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीनिवास पाटलांच्या बाजूने 31 हजारांचं लीड टाकलं होतं त्याच कराडमध्ये उदयनराजे 616 मतांनी लीडला आहेत.. एकूणच कराडात अतुल भोसलेंचा प्रभाव वाढला असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्थापित राजकारणाला ते धक्का लावतील, अशी सध्या परिस्थिती नाहीये…
साताऱ्याचा सहावा मतदारसंघ आहे कराड उत्तरचा…
कराड उत्तर मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत… कराड दक्षिण प्रमाण यंदाच्या लोकसभेत तुतारीला इथून मताधिक्य घटलं आहे… अर्थात हा बाळासाहेब पाटलांसाठी मोठा धक्का असू शकतो… 2019 च्या विधानसभेला मनोज दादा घोरपडे तर शिवसेनेकडून धैर्यशील कदमही मैदानात होते… अर्थात महाविकास आघाडी विरोधी सूर लोकसभेला दिसला असला तरी विधानसभेला मात्र स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असल्याने बाळासाहेब पाटीलच इथून लीड घेतील असा अंदाज आहे… पण मनोज दादा घोरपडे इथून कडव आव्हान उभं करणार असल्याने उत्तरचा निकाल धक्कादायक असू शकतो…
यातला सातवा मतदारसंघ आहे तो फलटणचा…
फलटण हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारा मतदारसंघ… 2019 ला इथून राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांनी भाजपच्या दिगंबर आगवणे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली… खरं म्हणजे फलटणमध्ये कुणाला आमदार करायचा? याचा रिमोट कंट्रोल रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हातात असतो…आत्ताची समीकरणे बघितली तर दीपक चव्हाण शिंदे गटात आहेत… तर पराभूत झालेले दिगंबर आगवणे हे शरद पवार गटात… मोहिते पाटलांना फलटण मधून मिळालेलं लीड बघता ते रामराजे प्लस मोहिते पाटील प्लस शरद पवार अशी इथून चुरस झाली तर शरद पवार गटाचा आमदार इथून आरामात निवडून येईल, असं सध्या चित्र आहे… त्यामुळे दिगंबर आगवणे हे तुतारीकडून संभाव्य उमेदवार असतील तर त्यांचा फलटणमधील विजय निश्चित मानला जातोय…
आता बोलूयात आठव्या आणि शेवटच्या मतदारसंघाबद्दल आणि तो म्हणजे माण खटावचा
भाजपचे जयकुमार गोरे इथले स्टॅंडिंग खासदार… प्रभाकर देशमुख विरुद्ध जयकुमार गोरे अशी इथली पारंपारिक लढत.. जयकुमार गोरे हे माण खटावमध्ये बरेच स्ट्रॉंग आहेत…म्हणूनच भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना ते आपल्या मतदारसंघातून लीड देऊ शकले… मुद्दा फक्त असा आहे की मोहिते पाटलांच्या विरोधात यंदा प्रचार केल्याने आता त्याचा फटका त्यांना आपल्या मतदारसंघात किती बसतो हे पाहावं लागेल…तर अशी आहे येत्या विधानसभा निवडणुकीतील आमदारकीच्या रेसमध्ये फ्रंटला असणाऱ्या उमेदवारांची संभाव्य नावं… बाकी तुम्हाला काय वाटतं? साताऱ्याच्या कुठल्या मतदारसंघातून कोण आमदार होईल? आम्ही दिलेला कौल तुम्हाला पटला का? जर तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. हा धबधबा इतर कोणत्याही धबधब्यांपेक्षा वेगळा आणि अत्यंत नयनरम्य आहे. शिवाय या धबधब्याची खासियत म्हणजे, हा धबधबा १२ ठिकाणाहून वाहतो. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
कुठे आहे? (Baradhara Waterfall)
उत्तर महाराष्ट्रात खान्देशातील नंदुरबार येथे हा धबधबा आहे. ज्याचे नाव ‘बाराधरा धबधबा’ असे आहे. या धबधब्याचे रूप अत्यंत सुंदर आणि मोहक आहे खास करून पावसाळ्यात इथे फिरायला जाण्याची मजा काही औरच आहे. या धबधब्याचे रूप डोळ्यात साठवून घ्यावे इतके मनमोहक आहे. त्यामुळे इथे फिरायला गेले असता या धबधब्यात भिजण्याचा मोह टाळता येत नाही. मात्र महत्वाची बाब अशी की, धबधब्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात इथे जाणाऱ्या पर्यटकांना अनेकदा या धबधब्याचे रौद्र रूप दिसले आहे.
बाराधारा धबधब्याचे वैशिट्य
नंदुरबारमधील ‘बाराधारा’ या धबधब्याचे वैशिट्य महाजन याच्या नावातच त्याची खासियत दडली आहे. हा धबधबा आपल्या अनोख्या रुपामुळे सर्वाना आपल्याकडे आकर्षित करतो. (Baradhara Waterfall) एकाच डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा १२ ठिकाणावरून कोसळतो. उंचावरून पडणाऱ्या या बारा पाण्याच्या धारा थेट नर्मदा नदीला जाऊन मिळतात. संपूर्ण देशात हा एकमेव धबधबा आहे जो एकाच डोंगरावरून कोसळतो, पण १२ ठिकाणावरून. त्यामुळे हा धबधबा पहायला पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते.
पर्यटकांना घ्यावी लागते विशेष काळजी
बाराधारा धबधबा इतर कोणत्याही धबधब्यापेक्षा वेगळा आणि सुंदर असला तरीही पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पावसाच्या दिवसात हा धबधबा कधी रौद्ररूप धारण करतो ते कळत नाही. ज्यामुळे धबधब्यात पाण्याचा अंदाज लावता येत नाही. अशा काळात अनेक पर्यटकांचे मृत्यूदेखील झाले आहेत. (Baradhara Waterfall) त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी जातेवेळी पाण्याचा अंदाज घेऊन जा. अन्यथा, काय होऊ शकत याची कल्पनाही भयंकर आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारात डबल सेल्फी कॅमेरा असणारा मोबाईल लाँच केला आहे. Xiaomi 14 CIVI असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल निळ्या, काळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध कऱण्यात आलाय. आज १२ जून २०२४ ला दुपारी २ वाजल्यापासून मोबाईलचे प्री- बुकिंग सुरु झालं आहे. आज पण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.55 इंचाचा डिस्प्ले –
Xiaomi 14 CIVI मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,236×2,750 पिक्सल रिझोल्युशन आणि 3000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर वापरला असून 8GB + 256GB आणि 12GB + 512GB स्टोरेज अशा २ स्टोरेज पर्यायात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Xiaomi 14 CIVI
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Xiaomi 14 CIVI मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 32MP चे २ फ्रंट कॅमेरे देण्यात आलेत. यातील एक मुख्य कॅमेरा असेल तर दुसरा अल्ट्रा वाईड सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 4700mAh बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
Xiaomi 14 CIVI च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे तर 12GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 47,999 रुपये आहे. आजपासूनच या मोबाईलचे प्री- बुकिंग सुरु झालं आहे. तुम्ही जर ICICI क्रेडिट कार्ड्स आणि HDFC क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास 3000 रुपयांची सूट तुम्हाला मिळू शकते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rate) कॅनरा बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. जिचे १९६९ साली इतर खासगी बँकांबरोबर राष्ट्रीयीकरण करण्यात आले. कॅनरा बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. ही बँक कायम आपल्या ग्राहकांसाठी विविध फायदेशीर योजना घेऊन येत असते. आताही कॅनरा बँकेने आपल्या प्रिय ग्राहकांसाठी एक खास भेट आणली आहे. जर तुम्ही कॅनरा बँकेचे FD धारक असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. कारण, कॅनरा बँकेने नुकतेच एफडीवरील व्याजदर सुधारले आहेत.
नवे दर लागू (FD Interest Rate)
बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेकडून २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) वरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नवे दर ११ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. कॅनरा बँके ही आपल्या ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करत आहेत.
सुधारणेनंतर, कॉलेबल आणि नॉन- कॉलेबल एफडीचे दर समोर आले आहेत. त्यानुसार, कॅनरा बँक सर्वसामान्य ग्राहकांना एफडीवर ४% ते ७.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४% ते ७.७५% इतका व्याजदर देत आहे. (FD Interest Rate) तर ७ दिवस ते ४५ दिवस मुदतीच्या EPD वर ४% आणि ४६ दिवस ते ९० दिवस दरम्यानच्या ठेवींवर ५.२५% व्याजदर देत आहे. शिवाय ९१ दिवस ते १७९ दिवस कालावधी असणाऱ्या एफडीच्या मॅच्युरिटीवर ५.५०% आणि २६९ दिवस कालावधी असणाऱ्या एफडीच्या मॅच्युरिटीवर ६.१५% व्याजदर दिला जात आहे. महत्वाचे असे की, कॉलेबल FD मध्ये मुदतीपूर्वी पैसे काढता येतात. तर नॉन- कॉलेबल एफडीमध्ये वेळेपूर्वी पैसे काढू शकत नाही.
‘असे’ आहेत सुधारित व्याजदर
कॅनरा बँकेकडून १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ६.८५% व्याजदर देत आहे. तर ३ वर्षांत २ वर्षे वा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवर ६.८५% व्याजदराची हमी दिली जात आहे. (FD Interest Rate) ३ वर्षे वा त्याहून अधिक मुदतीच्या मात्र ५ वर्षांपेक्षा कमी मुदत असलेल्या एफडीवर ६.८०% आणि ५ वर्ष वा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवर ६.७०% व्याज दिले जात आहे.
कॉलेबल FD वरील व्याजदर
७ दिवस ते १४ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.०६% इतका व्याजदार दिला जात आहे. तसेच ४६ दिवस ते ९० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.४५% इतका व्याजदर दिला जात आहे. (FD Interest Rate) ९१ दिवस ते १७९ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.६१% इतका व्याजदार दिला जात आहे. १८० दिवस ते २६९ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.२९% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.८२% इतका व्याजदार दिला जात आहे. २७० दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९२% व्याजदर दिला जात आहे.
१ वर्ष कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.०३% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५६% व्याजदर दिला जात आहे. ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.४५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.९८% व्याजदर मिळतोय. १ वर्षापेक्षा जास्त मात्र २ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.०३% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५६% इतका व्याजदर दिला जातोय. २ वर्षापेक्षा जास्त मात्र ३ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.०३% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५६% इतका व्याजदर दिला जातोय. (FD Interest Rate) तसेच ३ वर्षापेक्षा जास्त मात्र ५ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.९८% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५०% इतका व्याजदर दिला जात आहे. त्याचप्रमाणे ५ वर्षापेक्षा जास्त मात्र १० वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.८७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.४०% इतका व्याजदार दिला जातोय.
नॉन कॉलेबल FD वरील व्याजदर (१ करोड ते ३ करोडपर्यंत)
४६ दिवस ते ९० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.४६% इतका व्याजदर दिला जात आहे. ९१ दिवस ते १७९ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.७२% इतका व्याजदार दिला जात आहे. १८० दिवस ते २६९ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.४०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९२% इतका व्याजदार दिला जात आहे. (FD Interest Rate) २७० दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.०३% व्याजदर दिला जात आहे.
१ वर्ष कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.१९% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७१% व्याजदर दिला जात आहे. ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.६१% आणि ज्येष्ठ नागरिकांना ८.१४% व्याजदर मिळतोय. १ वर्षापेक्षा जास्त मात्र २ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.१९% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७१% इतका व्याजदर दिला जातोय. २ वर्षापेक्षा जास्त मात्र ३ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ७.१९% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७१% इतका व्याजदर दिला जातोय. (FD Interest Rate)
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता ही भ्रष्ट असते.. मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजे आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का? संघाचे प्रचारक आणि भाजपतील बडे नेते दिनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न.. त्यांनी या प्रश्वाचं उत्तर देताना होय, असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलं.. पण जेव्हा कधी असं होईल तेव्हा संघ आपली ताकद दाखवून देईल, असा इशाराही दिला होता.. कट टू २०२४. संघाच्या आशिर्वादाने भाजप २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन टर्म सत्तेवर राहीला.. पण २०२४ ला ४०० पारच्या मोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपची गाडी २४० वरच येऊन थांबली.. यानंतर भाजपच्या अपयशाची जेव्हा कारणं पडताळून पाहिली जाऊ लागली तेव्हा त्यात सर्वात जास्त हायलाईट झालेलं कारण समोर आलं ते म्हणजे याच संघाला हलक्यात घेण्याची केलेली चूक…
आम्ही कमकुवत होतो तेव्हा आम्हाला संघाची गरज होती पण आता भाजप स्वत:च्या जिवावर पक्ष चालवू शकतो.. असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या या स्टेटमेंटनंतर संघ आणि भाजपच्या संबंधामध्ये विस्तव पडलाय त्याची पहिली झलक पहायला मिळाली.. त्यानंतर भाजपला निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला… अशा संघाच्या भुमिकेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये फिस्कटलंय हे तर कन्फर्म होतं.. पण मग ज्या संघाच्या जीवावर आज भाजप सत्तेत आहे. त्याच भाजपला संघाचा कंट्रोल का नकोय? संघापेक्षा भाजप स्वत:ला वरचढ समजू लागलाय का? २०२४ मध्ये भाजपचं हवेतील विमान जमिनीवर आणण्यासाठीच संघानं मुद्दामहून भाजपचं काम केलं नाही ना? या आणि अशा अनेक बिहाईंड पॉलिटीक्स घडलेल्या स्टोरीचा हा इंटरेस्टिंग आढावा…
संघ आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडण्यासाठी सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं…
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून भाजप आणि आरएसएस मध्ये बराच वाद पाहायला मिळाला…संघाचं म्हणणं असं होतं की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला राजकीय रंग न देता याला राष्ट्रीय आंदोलन बनवण्यात यावं… रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा ही राजकीय नेत्याच्या हातून न होता हिंदू साधूंच्या हातून व्हावी…सोहळ्याला कोणत्याही सिनेस्टार अभिनेत्यांना बोलवू नये.. याला कोणताही ग्लॅमर न देता हा सोहळा धार्मिक विधीप्रमाणेच व्हावा… तसंच मंदिराचं उद्घाटन निवडणुकीनंतरच करावं… जर लवकर उद्घाटन झालं तर हा मुद्दा लोकांच्या लक्षातून जाईल, असे अनेक सल्ले संघाने भाजपला दिले होते… पण या संघाच्या मतांना केराची टोपली दावत भाजपने या उद्घाटन सोहळ्याला जितका जास्त राजकीय रंग देता येईल तितका देण्याचा प्रयत्न केला… अर्थात संघाचा हा सल्ला न ऐकल्यामुळे संघ आणि भाजपमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता…
संघ आणि भाजप संबंधांमध्ये बिघाड होण्याचं दुसरं कारण ठरलं ते म्हणजे स्वायत्त संस्थांच्या राजकारणावरून विरुद्ध मतं
राजकारणावर वचक ठेवण्यासाठी भाजपने इडी, सीबीआय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप होऊ लागला…इतकच काय तर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचा कार्यक्रमही एका मागून एक भाजपने चालवला.. विशेष म्हणजे यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते अशा नेत्यांचाही समावेश झाला…आरएसएसला मुळात हीच गोष्ट खटकली… स्वायत्त संस्थांचा अतिरेकी वापर होऊ नये त्यासोबतच इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली क्रेडिबिलिटी घालवू नये असं संघाचं म्हणणं होतं… पण इथेही भाजपने संघाचं काहीएक न ऐकल्यामुळे संघ आणि भाजपमध्ये फिस्कटायला सुरुवात झाली…
याच यादीतलं तिसरं कारण आहे ते म्हणजे संघाला हलक्यात घेणं…
2019 ला मोदी सरकार बहुमतात सत्तेत आलं…यानंतर आपल्या पक्षाला कुठल्या बाहेरच्या कंट्रोलची गरज नाही असा भाजपचा वावर सुरू झाला… अनेक गोष्टींमध्ये संघाने दिलेला शब्द भाजपा डावलू लागला… यावरून दोघांच्यात खटके उडायला सुरुवात झाली… आपल्याला संघाची गरज नसल्याचं जे. पी. नड्डा यांनी केलेले स्टेटमेंटवरून दोघांच्यातील संबंध किती ताणले होते याचा आपल्याला विचार करता येईल…हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेच्या प्रचारात संघाला विश्वासात घेतलं नसल्याची संघ कार्यकर्त्यांची तक्रार होती…संघ स्वयंसेवकांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भाजपने जास्त विश्वास ठेवला… हे सगळं घडत असताना आता पाणी नाकापर्यंत आलय हे लक्षात आल्यानंच भाजपाला अद्दल घडवायची म्हणून संघाने प्रचारातून अंग काढून घेतलं असावं.. याचाच परिणाम म्हणून 400 पारच्या हवेत गिरक्या मारणार भाजपचं विमान 240 वर येऊन बंद पडलं…थोडक्यात भाजपाला धडा शिकवण्यासाठीच आरएसएसची ही खेळी असल्याचं काही राजकीय विश्लेषक सांगतायेत…
जाताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑब्झर्वर या मासिकात भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला… संघाला हलक्यात घेतल्याचे हे परिणाम आहेत… अशा बेधडक कानपिचक्या मासिकातून दिल्यात… त्यामुळे संघ आणि भाजपचं फिस्कटलंय…हे तर कन्फर्म आहे… पण आता लोकसभेला बसलेला फटका पाहता संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे भाजपच्या पक्क ध्यानात आलं असावं…येत्या काळात दोघांच्यातील संबंध पुन्हा सुरळीत होतील का? की असेच ताणले जातील? तुम्हाला काय वाटतं? जर तुमचं काही वेगळं मतं असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.