Sunday, December 21, 2025
Home Blog Page 681

हरभजनने कामरान अकमलला सुनावले!! म्हणाला, नालायका तुमच्या आया बहिणींना…

harbhajan akmal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा माजी क्रिकटपटू कामरान अकमलने भारताचा तेज गोलंदाज अर्शदीप सिंग च्या धर्माबाबत केलेल्या विधानानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अकमलला चांगलंच सुनावलं आहे. पाकिस्तान विरुद्व अर्शदीप शेवटची ओव्हर टाकत असताना सरदारला ही ओव्हर का दिली? त्यात आता १२ वाजले आहेत असं उपहासात्मक विधान अकमलने (Kamran Akmal) केलं होतं, त्यावर प्रत्युत्तर देताना हरभजनने अकमलची आई- बहीण काढली आहे.

काय म्हणाला हरभजन?

एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “हे एक अतिशय मूर्खपणाचे आणि अतिशय बालिश कृत्य आहे जे केवळ एक ‘अक्षम’ व्यक्तीच करू शकते. कामरान अकमलने हे समजून घेतले पाहिजे की एखाद्याच्या धर्माबद्दल काहीही बोलणे आणि मजा घेण्याची काहीही गरज नाही. त्याच्याबद्दल मला कामरान अकमलला विचारायचे आहे, तुला शिखांचा इतिहास माहित आहे का? शीख कोण आहेत आणि तुमच्या माता-भगिनींना वाचवण्यासाठी शिखांनी काय काम केले आहे हे तुमच्या पूर्वजांना विचारा. कारण शीख लोकांनी रात्री 12 वाजता मुघलांवर हल्ला करून तुमच्या माता-भगिनींना वाचवले होते, त्यामुळे फालतू बोलणे बंद करा.

दरम्यान, कामरान अकमलने आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. मात्र यानंतरही हरभजनने त्याला माफ केलेलं नाही. हरभजन म्हणाला, “त्याला इतक्या लवकर समजले आणि माफी मागितली हे चांगले आहे, पण अकमलने इथून पुढे कोणत्याही शीख किंवा इतर धर्माला दुखावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, मग तो इस्लाम असो, शीख असो किंवा ख्रिश्चन असो.” , एकमेकांच्या धर्माचा आदर कसा करायचा हे कळले तर कोणालाच त्रास होणार नाही असं म्हणत हरभजनने अकमलला सुनावलं.

Gold Price Today : सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या; आजचे दर इथे चेक करा

Gold Price Today 12 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने- चांदीच्या किमती (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 71420 रुपये वर व्यवहार करत असून कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.1% म्हणजेच 74 रुपयांनी किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी 88938 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत 299 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७१४२१ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती खाली गेल्याचे पाहायला मिळाले. ९ वाजून ४५ मिनिटांनी सोन्याचा दर ७०३२१ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर हि किंमत (Gold Price Today) आणखी कमी कमी होत गेली. १० वाजून ४६ मिनिटांनी वाजता सोन्याचा भाव ७०३०२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता, यानंतर या किमतीत मात्र अचानक वाढ झाली . सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ७१४४१ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७२१६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६६१५० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,150 रुपये
मुंबई – 66,150 रुपये
नागपूर – 66,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,160 रूपये
मुंबई – 72,160 रूपये
नागपूर – 72,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट; संपूर्ण परिसरात आगीचे तांडव

Dombivli MIDC Blast

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनव शाळेजवळ एमआयडीसीतील कारखान्याचा आग लागल्याची माहिती मिळतेय. या वेळी झालेल्या स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. विशेष गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एमआयडीसीमध्ये आग लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा एका कारखान्याला आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कोणत्या कंपनीत आग लागली ? Dombivli MIDC Blast

याबाबत अधिक माहिती अशी कि, डोंबिवलीतील एमआयडीत इंडो-अमाईन्स ही कंपनी आहे. या कंपनीत पेस्टीसाईड्स बनवले जातात. याच कंपनीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत कंपनीचे तीन प्लॅन्ट जळून खाक (Dombivli MIDC Blast) झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्नीशनम दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळाले नाही. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग एवढी भीषण आहे की, आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. भीतीमुळे या ठिकाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.

संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप –

या भीषण आगीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एमआयडीसीमध्ये बेकादेशीर कामे सुरू आहेत. पोलिसांपासून शिंदेंच्या लोकांपर्यंत लाखो करोडोंचे हफ्ते कसे जातात. डोंबिवलीतील कंपन्यांमधून शिंदे गटाचे लोक किती हप्ते वसूल करतात हे आधी बघा. या ज्या घटना होतायत त्यांच्याकडे लक्ष द्या असं संजय राऊतांनी म्हंटल.

Bigg Boss OTT 3 : अब सब बदलेगा!! Bigg Boss OTT 3’मध्ये AK घेणार KJo ची जागा; कधी सुरु होणार?

Bigg Boss OTT 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bigg Boss OTT 3) गेल्या बऱ्याच महिन्यांपासून ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हे तिसरं पर्व कधी येणार?, येणार आहे की नाही? अशा बऱ्याच चर्चा झाल्या. अखेर आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा सिझन एकदम हटके, वेगळा आणि बदलेला असणार आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा होस्ट सुद्धा बदलला आहे. यावेळी भाईजान नव्हे तर झक्कास अभिनेता अनिल कपूर स्पर्धकांची शाळा घेणार आहेत.

प्रोमो रिलीज (Bigg Boss OTT 3)

सोशल मीडियावर ‘जिओ सिनेमा’च्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मौसम बदलेगा, तापमान बदलेगा. एक के आने से, अब सब बदलेगा’. या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खानऐवजी अभिनेता अनिल कपूर यंदाच्या पर्वाचे होस्टिंग करणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस ओटीटी ३’मध्ये भाईजानची जागा अनिल कपूर घेणार असल्याने काहीतरी हटके पहायला मिळेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अभिनेता अनिल कपूर यांचा हटके अंदाज पहायला मिळतोय. अनिल कपूर यांची जबरदस्त एंट्री यावेळी बिग बॉस ओटीटी सीजन ३’साठी आकर्षणाची बाब ठरणार आहे. (Bigg Boss OTT 3) ‘बिग बॉस ओटीटी ३’चा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये नव्या सिजनबाबतची उत्सुकता आणखीच वाढल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या प्रोमोवर विविध प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला आहे. तिसऱ्या पर्वात अनिल कपूर यांची एंट्री एक वेगळा उत्साह घेऊन आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

कधी रिलीज होणार?

‘बिग बॉस ओटीटी’चे तिसरे पर्व येत्या २१ जून २०२४ पासून रात्री ९.०० वाजता ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत पहायला मिळाले. (Bigg Boss OTT 3) मात्र, यावेळी जर तुम्हाला बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व पहायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या सोशल मीडियावर बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो जबरदस्त व्हायरल होत आहे. जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढू लागली आहे.

Mirzapur Season 3 : भौकाल मचने वाला है! ‘मिर्झापूर 3’चा जबरदस्त टीझर रिलीज; कालीन भैय्या घेणार बदला

Mirzapur Season 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mirzapur Season 3) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘मिर्झापूर ३’ या बहुचर्चित वेब सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत. ‘मिर्झापूर’ या सीरिजचे पहिले दोन भाग चांगलेच गाजले. त्यानंतर आता तिसऱ्या भागाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच नुकताच या वेब सीरिजचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. सोबतच ही सिरीज कधी रिलीज होणार ते देखील समोर आले आहे. ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख एका पोस्टरमधून जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून ही सिरीज ५ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित होणार असे दिसत आहे. तर टिझरने कमालीची उत्सुकता वाढवली आहे

‘मिर्झापूर ३’चा टिझर रिलीज (Mirzapur Season 3)

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित वेब सिरीज ‘मिर्झापूर ३’चा एकदम जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा टिझर ‘ये है मिर्झापूर’ नावाच्या सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘जंगल में भौकाल मचने वाला है!’.

या जबरदस्त टीझरमध्ये कालीन भैय्या हे गुड्डू पंडितचा बदला घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. माहितीनुसार, ‘मिर्झापूर ३’ ही वेब सीरिज येत्या ५ जुलै २०२४ रोजी ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर ३’ ही वेब सिरीज कधी प्रदर्शित होणार? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच वेब सिरीजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. (Mirzapur Season 3) जो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या टीझर व्हिडिओवर अनेक प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘अब मजा आयेगा!!’. आणखी एकाने लिहिलं, ‘भाई… रॉक ऑन’. अजून एका युजरने लिहिलं, ‘भिडू आता मजा येणार.. वाट बघतोय’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘वाह भाई.. अखेर प्रतीक्षा संपली’.

कसा असेल ‘मिर्झापूर भाग ३’?

‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर २’ या वेब सीरिजच्या शेवटी गुड्डू पंडित (अली फजल), मुन्ना भैय्याला (दिव्येंदू शर्मा) मारून मिर्झापूरच्या खुर्चीवर बसतो आणि कालीन भैय्याला सोडून देतो असे आपण पाहिले. यानंतर आता ‘मिर्झापूर ३’ सिरीजमध्ये कालीन भैय्या आपल्या खुर्ची आणि लेकाच्या मृत्यूचा बदला घ्यायला सज्ज झाला आहे. (Mirzapur Season 3) त्यामुळे हा भाग पहायला विशेष मजा येणार. यावेळी ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या भागात पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा हे कलाकार झळकणार आहेत.

Weather Update | पुढील15 तास पावसाचा हायअलर्ट; ‘या’ भागात कोसळणार अतिमुसळधार पाऊस

Weather Update

Weather Update | गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने अनेक लोकांचे नुकसान देखील झालेले आहे. राज्यातील काही भागात पुढील पंधरा तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज म्हणजेच 12 जून रोजी कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळ पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग देखील सारी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच मुंबई, पुणे या ठिकाणी देखील पावसाच्या देण्यात आलेला आहे. मान्सून मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता पाऊस मुसळधार पडणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे.

मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार | Weather Update

मराठवाड्यातील नांदेड धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 12 जून रोजी नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 13 जून रोजी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

Common Cancers in Men | पुरुषांना प्रामुख्याने होतात ‘हे’ 5 कॅन्सर, लक्षणे दिसताच व्हा सावध

 Common Cancers in Men

Common Cancers in Men | कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. आजकाल अनेक लोकांना कॅन्सर होत असतो. कॅन्सरचे नवनवीन प्रकार देखील आता आलेले आहेत. एका अवयवाला कॅन्सर होतो. परंतु त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जगभरातील अनेक लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण हे कॅन्सर आहे. यांपैकी पुरुषांना काही वेगळे कॅन्सर होतात, तर स्त्रियांना वेगळे कॅन्सल होतात. तर आज आपण पुरुषांमध्ये होणारे पाच प्रमुख कॅन्सरबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्याची लक्षणे देखील जाणून घेणार आहोत.

प्रोस्टेट कर्करोग |  Common Cancers in Men

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील सामान्य कर्करोग आहे. हा प्रोस्टेट नावाच्या ग्रंथीमध्ये होणारा कर्करोग आहे, जो टेस्टोस्टेरॉन हार्मोन आणि शुक्राणूंच्या निर्मितीसाठी जबाबदार आहे. या कर्करोगात, प्रोस्टेट पेशी असामान्यपणे वाढू लागतात, ज्याचे कालांतराने ट्यूमरमध्ये रूपांतर होते. लघवीला त्रास होणे, लघवीत रक्त येणे आणि हाडांमध्ये दुखणे ही याशी निगडित लक्षणे आहेत.

टेस्टिक्युलर कर्करोग

पुरुषांमध्ये, जेव्हा टेस्टिक्युलर पेशी असामान्यपणे वाढू लागतात तेव्हा त्याला टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणतात. पुरुषांमध्येही हे सामान्य आहे, परंतु याबद्दल जागरूकता नसल्यामुळे हा आजार जीवघेणा ठरतो. त्याची लक्षणे सुरुवातीलाच ओळखून योग्य उपचारांचा अवलंब केल्यास तो बरा होऊ शकतो. अंडकोषांमध्ये जडपणा येणे, अंडकोष वळणे, अंडकोषांमध्ये वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.

त्वचेचा कर्करोग

त्वचेचा कर्करोग हा पुरुषांमध्येही एक सामान्य कर्करोग आहे. अशा परिस्थितीत त्वचेवर तीळ किंवा चामखीळ यांच्या आकारात बदल होतो. अशा परिस्थितीत, डॉक्टर बायोप्सीची शिफारस करतात. हे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळते. जेव्हा मेलानोसाइट्स-रंगद्रव्य-उत्पादक पेशी ज्या त्वचेला रंग देतात-कर्करोगात रूपांतरित होतात तेव्हा उद्भवते.

तोंडाचा कर्करोग

जे पुरुष धूम्रपान करतात किंवा तंबाखूचे सेवन करतात त्यांनाही तोंडाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत ओठांवर पांढरे, लाल, तपकिरी किंवा पिवळे डाग दिसू शकतात. याव्यतिरिक्त, तोंडात फोड देखील तयार होतात. कालांतराने ते अल्सरसारखे दिसू लागते. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच चाचणी आणि उपचार करून तो बरा होऊ शकतो. त्वचेच्या कर्करोगाची योग्य माहिती रक्त तपासणीद्वारे कळते.

फुफ्फुसाचा कर्करोग

खोकल्यामागे अनेक कारणे असू शकतात, पण जर तो सतत होत असेल तर तो फुफ्फुसाच्या कर्करोगाकडेही निर्देश करतो. साधारणपणे ४ आठवडे सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. हे तपासण्यासाठी, डॉक्टर तुम्हाला प्रथम एक्स-रे काढण्यास सांगतात.

मोदी सरकारकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय; फक्त 8 हजार कोटींचा विकास निधी, UP -बिहारला जास्त निधी

Development Fund Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकार कडून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांमध्ये विकास निधीचा हप्ता मंजूर केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारला घसघशीत निधी वाटप करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसण्यात आली आहेत. खरं तर केंद्र सरकारला सर्वाधिक कर हा महाराष्ट्र भरत असतो, महाराष्ट्रातून मिळणाऱ्या पैसावर केंद्राची तिजोरी भरत असते. असं असूनही मोदींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे समोर आलं आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थमंत्री पदाचा पदभार पुन्हा स्वीकारल्यानंतर राज्यांना विकास निधी (Development Fund) वाटपाचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी सर्व राज्यांसाठी एकूण 1 लाख 39 हजार 750 कोटींचा निधी दिला आहे. अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, उत्तर प्रदेशला सर्वात जास्त 25 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे, तर नितीशकुमार यांच्या बिहारला 14 हजार कोटी देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्राला मात्र अवघ्या 8 हजार कोटींचा विकास निधी देत तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.

कोणत्या राज्याला किती विकास निधी ?

उत्तर प्रदेशला सर्वाधिक 25069 कोटी देण्यात आले. त्यानंतर बिहारला 14056 कोटी, भाजपशासित मध्य प्रदेशलाही 10970 कोटींचा निधी दिला. महाराष्ट्राला 8828 कोटींचा निधी देण्यात आलाय. काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटकात 5069 कोटी दिले. चंद्राबाबूंची सत्ता आलेल्या आंध्र प्रदेशला 5655 कोटींचा निधी मिळाला. ‘आम आदमी पक्षाचे सरकार असलेल्या पंजाबला 2525 कोटी, द्रमुकची सत्ता असलेल्या तामिळनाडूला 5700 कोटींचा निधी दिला. तर ओडिशात नुकतंच भाजपचे सरकार आले असून त्याठिकाणी 7327 कोटी विकास निधी देण्यात आलाय.

Fibre in Diet | शरीरासाठी फायबर आहे खूप महत्वाचे, कमतरता असल्यास होते ‘हे’ नुकसान

Fibre in Diet

Fibre in Diet | आपले आरोग्य हे आपण जे पदार्थ खातो. त्यावर अवलंबून असतो. परंतु आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी फायबर खूप जबाबदार असते. फायबरमुळे आपल्या शरीराला कोणताही प्रकारचे पोषण मिळत नसले, तरी आहारात फायबरचे प्रमाण असणे खूप गरजेचे आहे. ते आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी फायदेशीर ठरते. फायबरच्या मदतीने आपले पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. आता फायबर म्हणजे काय? ते आपल्या शरीरासाठी कसे महत्त्वाचे आहे? आणि फायबरच्या कमतरतेमुळे कोणती हानी होऊ शकते? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

फायबर महत्वाचे का आहे? | Fibre in Diet

फायबर हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. पचनाशी संबंधित प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यात ते मोठी भूमिका बजावते. हे दोन प्रकारचे असते, पहिला – विद्रव्य फायबर, दुसरा – अघुलनशील फायबर. विरघळणारे फायबर असलेले पदार्थ पाण्यात सहज विरघळतात. अशा स्थितीत कोलेस्टेरॉलचे शरीरातील द्रवपदार्थात रूपांतर करून ते नियंत्रित करण्यात मदत होते. यामुळेच मधुमेह आणि रक्तातील साखरेच्या रुग्णांना त्यांच्या आहारात अधिकाधिक विद्राव्य फायबरचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. दुसरीकडे, अघुलनशील फायबर हे वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी खूप चांगले मानले जाते, कारण ते शरीरातील कचरायुक्त अन्न स्वच्छ करण्याचे काम करते.

फायबर कोणत्या पदार्थांमध्ये आढळते?

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजार टाळता येतात. गव्हाचे पीठ, हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, टोमॅटो, कांदा, सोललेली डाळी, रताळे, रवा, बेसन, दलिया, द्राक्षे, सफरचंद आणि पपई इत्यादींमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही मधुमेह किंवा लठ्ठपणाच्या समस्येशी झुंज देत असाल तर तुम्हाला याच्या सेवनाने फायदा होऊ शकतो.

फायबरच्या कमतरतेमुळे काय नुकसान होते? | Fibre in Diet

शरीराने आवश्यकतेनुसार फायबरचे प्रमाण पुरेसे घेतले नाही तर पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो, अशा स्थितीत पोट साफ होत नाही आणि तुम्हाला मुरुम किंवा तोंडात अल्सरची समस्या होऊ शकते. याशिवाय फायबरच्या कमतरतेमुळे गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या समस्या देखील होऊ शकतात. यासोबतच हृदयाशी संबंधित आजार, आतड्यांसंबंधी कर्करोग आणि मूळव्याधची समस्या देखील त्याच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

Nokia 3210 4G मोबाईल भारतात लाँच; UPI सह मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 3210 4G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने भारतीय बाजारात एक नवा कीपॅड मोबाईल लाँच केला आहे. Nokia 3210 4G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये UPI पेमेंट आणि युट्युबसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या मोबाईलची किंमत अवघी 3,999 रुपये ठेवली असून ग्राहक प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India आणि HMD eStore वरून हा मोबाईल खरेदी करू शकतात. आज आपण या मोबाईलची खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

Nokia 3210 4G या मोबाईलचे वजन अवघे 62 ग्रॅम आहे. मोबाईलमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये UniSoC T107 प्रोसेसर बसवण्यात आला असून नोकियाचा हा मोबाईल S30+ सॉफ्टवेअरवर काम करतो. मोबाईलच्या पाठीमागील पॅनलवर 4G सपोर्ट आणि कॅमेरा सेन्सर देखील आहे. कंपनीने यामध्ये 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे, जो LED फ्लॅश लाइटसह येतो. यात 64MB रॅम आणि 128MB नेटिव्ह स्टोरेज आहे. तुम्ही हे स्टोरेज वाढवण्यासाठी यूजर्स मायक्रोएसडी कार्डची मदत घेऊ शकतात. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 32 GB पर्यंत वाढवता येते

UPI YouTube चा सपोर्ट – Nokia 3210 4G

खास बाब म्हणजे Nokia 3210 4G क्लाउड ॲप्ससह येतो ज्यात YouTube, YouTube Shorts, बातम्या आणि बऱ्याच फीचर्सचा समावेश आहे. मोबाईल मध्ये इनबिल्ट UPI वैशिष्ट्य देखील आहे ज्यामुळे तुम्ही स्कॅन करून ऑनलाईन पैसे पाठवू शकता. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये USB-C पोर्ट, ड्युअल-सिम, 4G, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फीचर्स मिळतात. नोकियाचा हा बटणाचा मोबाईल निळ्या, काळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध आहे.