Sunday, December 21, 2025
Home Blog Page 682

शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल; हसन मुश्रीफ थेटच बोलले

shaktipeeth mahamarg hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाने नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) बांधण्याचे काम हाती घेतले असून २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला कडाडून विरोध केला असून पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची मालिका सुरु झाली आहे. या एकूण सर्व प्रकरणाचा महायुतीच्या नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘हा’ महामार्ग बंद करावा लागेल असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलं आहे.

याबाबत हसन मुश्रीफ यांनी पत्रक काढून म्हंटल कि, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्या निकालाबाबत कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत पक्षाची बैठक घेतली होती. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व संतापाला सामोरे जावे लागण्याचे प्रमुख कारण आपण स्पष्ट केले. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही निदर्शनास आणून दिली. शक्तीपीठ महामार्ग कागल मधील १५, राधानगरी – भुदरगड मतदार संघातील ३० गावातून जात असताना त्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांना विरोधात घालणारी एक यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे शक्तीपीठ प्रस्ताव महामार्ग रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच आपल्याला दुसरा कोणता पर्यायी मार्ग सुद्धा नको आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्याचे जाळे आधीच पसरलं आहे . त्यामुळे या नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. तसेच हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करा, असे म्हणणेही संयुक्तिक आणि योग्य नाही. प्रसंगी कोणतीही किंमत मोजून हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे. निकालानंतर अवघ्या आठवड्याच्या आतच महायुतीच्या नेत्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा किती धसका घेतला आहे हेच यातून दिसते.

बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात झाली तब्बल 15.67% पर्यंत वाढ

Bank Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| इंडियन बँक असोसिएशन (IBA) च्या अधिसूचनेनुसार बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मे, जून आणि जुलै महिन्यांसाठी 15.67% पर्यंत वाढवण्यात आला आहे. सोमवारी IBA ने अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा आनंद दुपटीने वाढला आहे.

महत्वाचे म्हणजे, या वेतनवाढीचा लाभ तब्बल 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही वेतनवाढ मे, जून आणि जुलै 2024 साठी असेल. याबाबतची माहिती IBA ने 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत दिली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात IBA आणि इतर बँक कर्मचाऱ्यांनी 17 टक्के वार्षिक वेतन वाढीसाठी सहमती दर्शवली होती. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल 8284 बँकांवर याचा बोझा पडणार आहे.

Ayurvedic Kadha : इम्युनिटी वाढवायची आहे? तर ‘हा’ आयुर्वेदिक काढा प्या; संसर्गापासून होईल रक्षण

Ayurvedic Kadha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ayurvedic Kadha) पावसाळा सुरु झाला की, तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा दिवसांत संसर्गजन्य आजरांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. खासकरून सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास फार जाणवतो. त्यामुळे अशा काळात आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असणे फार गरजेचे असते. पण बिघडती जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत होते आणि परिणामी आपण अशा व्हायरल इन्फेक्शनला बळी पडतो. पण या पावसाळ्यात असं अजिबात होणार नाही.

कारण, आज आम्ही तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत करेल अशा आयुर्वेदिक काढ्याची (Ayurvedic Kadha) माहिती देणार आहोत. जो घरच्या घरी बनवता येतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार कष्टसुद्धा घ्यावे लागत नाहीत. चला तर हा आरोग्यवर्धक आयुर्वेदिक काढा बनवायचा कसा? ते जाणून घेऊया.

काढा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ताजे आले – एक मोठा तुकडा (किसलेले)
  • गुळ – एक छोटा खडा
  • काळीमिरी – ४ ते ५
  • दालचीनी – एक छोटा तुकडा
  • लवंग – २ ते ३
  • ओवा – चिमूटभर
  • हळद – चिमूटभर
  • हिरवी वेलची – १ किंवा २

‘असा’ बनवा आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Kadha)

हा आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात १ ग्लास पाणी घ्यायचे आहे. यामध्ये, किसलेले आले, लवंग, गूळ, काळी मिरी, वेलची आणि हळद घालून पाणी उकळायला ठेवा. (Ayurvedic Kadha) आता हे पाणी पूर्ण काळ्या रंगाचे दिसेल. त्यानंतर पाणी अर्ध्यावर आले की, गॅस बंद करा. या मिश्रणात गुळाचा खडा घाला आणि तयार काढा गाळून घ्या. हलका कोमट असताना हा काढा प्या.

फायदे

घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा हा काढा अत्यंत आरोग्यदायी आहे. या काढ्यामध्ये वापरण्यात आलेले जवळपास सगळे घटक हे स्वभावाने उष्ण असतात. यातील प्रत्येक पदार्थ त्याच्या आयुर्वेदीक गुणांमुळे तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी सहाय्यक आहे. (Ayurvedic Kadha) हा काढा प्यायल्याने सर्दी, खोकलासारख्या संसर्गांपासून तुमचा बचाव होतो. या काढ्यामुळे घशातील संसर्गापासून देखील सुटका मिळते. त्यामुळे हा काढा पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत लाभदायी ठरतो.

Hair Care : आला आला पावसाळा, केसांचे आरोग्य सांभाळा; कशी घ्याल काळजी?

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. केसगळती, केसांत कोंडा होणे, केसाला फाटे फुटणे अशा बऱ्याच समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे पावसाळा आला की, केसांची खूप काळजी घ्यावी लागते. ती कशी घ्यावी? याबाबत आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात केसांचे आरोग्य बिघडण्याचे कारण (Hair Care)

पावसाळ्यात केसांशी संबंधित अनेक समस्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील आद्रता. पावसाळ्याच्या दिवसात हवेतील आद्रता वाढते आणि यामुळे हवेत ओलावा राहतो. परिणामी, केस चिकट होणे, केसात कोंडा होणे आणि मोठ्या प्रमाणात केसगळती होणे या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी कशी घ्यावी? त्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.

1. ऑइल मसाज

बऱ्याच लोकांना केसांना तेल लावायला आवडत नाही. असे असले तरीही पावसाळ्यात केसांना तेल लावणे खूप गरजेचे आहे, हे समजून घ्या. (Hair Care) कारण ऑइल मसाजमुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केसगळतीपासून सुटका मिळते. शिवाय ऑईलिंगमुळे स्काल्पसुद्धा निरोगी राहतो. यासाठी नियमित रात्री केसाला तेलाने मसाज करा आणि सकाळी चांगल्या व तुमच्या केसांना सूट होणाऱ्या शॅम्पूने केस धुवा.

2. कंडिशनरचा वापर

पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असते. (Hair Care) त्यामुळे केस कोरडे आणि रखरखीत होतात. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा शॅम्पूनंतर आठवणीने कंडिशनर वापरा. कारण, कंडिशनरच्या वापराने केस फ्रिज होत नाही आणि त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येत नाही.

3. ओल्या केसांत कंगवा फिरवू नका

बऱ्याच लोकांना ओल्या केसांत कंगवा किंवा ब्रश फिरवण्याची सवय असते. (Hair Care) यामुळे केस तुटतात आणि केसांची मुळेदेखील कमकुवत होतात. त्यामुळे ओल्या केसांमध्ये कंगवा किंवा ब्रश फिरवून नका.

4. मायक्रो टॉवेलचा वापर

तुम्ही तुमच्या केसांसाठी कोणता टॉवेल वापरता, यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते. न केवळ पावसाळ्यात तर कोणत्याही ऋतूमध्ये ओले केस पुसण्यासाठी कॉटन टॉवेलचा वापर करू नका. तर मायक्रो टॉवेलचा करा. खास करून पावसाळ्यात सतत केस भिजत असतात. त्यामुळे वारंवार केस पुसावे लागतात. (Hair Care) यासाठी मायक्रो टॉवेल फायदेशीर ठरतो. यामुळे केसगळतीची समस्या कमी होते.

शरद पवारांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे; सकल मराठा समाजाची विनंती

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा भाग बनला आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. त्यामुळे त्यांची दिवस प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवरच आज सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी, आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी विनंती शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली.

पत्रकार परिषद घेत सकल मराठा समाजाने म्हणले की, “आपण पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे जसे नेतृत्व केले तसेच आपण मराठा आरक्षणासाठी आपण सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे. अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू.”

त्याचबरोबर, “नाशिक जिल्हा जरांगेच्या पाठीमागे उभा आहे. आम्हीही या लढ्यात सहभागी होत आहोत. सकल मराठा समाजाची आमदार आणि खासदार यांना विनंती आहे की, नवनिर्वाचित खासदारांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांना आपल्या लेटर पॅडवर पाठिंबा द्यावा. जर पाठिंबा देणार नसाल तर तुम्ही मतदारसंघात कसे फिरणार तेच बघतो” असा इशारा देखील सकल मराठा समाजाने दिला.

दरम्यान, “पुढील 2 दिवसांत जरांगे यांचे आंदोलन सोडविले नाही तर आम्ही पुढील भूमिका घेऊ. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला तरी चालेल. सरकारने जरांगे आणि सगेसोयरेची फसवणूक झाली आहे. लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसला आहे की नाही याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या मागण्यांचा विचार करावा अजूनही वेळ गेली नाही” असे आजच्या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाने म्हटले.

HDFC Bank : HDFC बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट; ‘या’ दिवशी बंद राहणार महत्वाच्या सेवा

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (HDFC Bank) HDFC बँक ही एक भारतीय खाजगी व्यावसायिक बँक आहे. जिच्या मालमत्तेनुसार देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून HDFC बँक ओळखली जाते. शिवाय बाजार भांडवलाच्या बाबतीत HDFC बँक तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे HDFC बँकेची ग्राहक संख्या फार मोठी आहे. जर तुमचेही HDFC बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका. नुकताच एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये बँकेकडून दिल्या जाणाऱ्या महत्वाच्या सेवा बंद असणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

किती काळासाठी सेवा राहणार बंद? (HDFC Bank)

खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना E- Mail व SMS द्वारा कळविले आहे की, दिनांक ९ जून २०२४ आणि १६ जून २०२४ या दरम्यान विंडो अपग्रेडचे काम सुरु असेल आणि यामुळे बँकेकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या सेवा बंद राहतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग आणि नेटबँकिंग सेवा या काळात बंद असतील. बँकेशी संबंधित सेवांसाठी सिस्टम अपग्रेडचे काम सुरु असल्यामुळे याचा परिणाम सेवांवर होत आहे.

बँकेची सेवा कधी मिळणार नाही?

दिनांक ९ जून २०२४ रोजी पहाटे ३.३० ते ६.३० या वेळेत ग्राहकांना २४ तास बँक सेवा उपलब्ध नव्हती. (HDFC Bank) तर येत्या १६ जून २०२४ रोजी पहाटे ३:३० ते सकाळी ७:३० अशी ४ तास ग्राहकांची गैरसोय होईल.

कोणकोणत्या सेवा राहणार बंद?

HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२४ रोजी ग्राहकांसाठी काही महत्वाच्या सेवा बंद असतील. (HDFC Bank) यामध्ये पुढील सेवांचा समावेश आहे. बँक खात्याशी संबंधित सेवा, बँक खात्यात जमा करणे, निधी हस्तांतरणाशी संबंधित IMPS, NEFT, RTGS सेवा, बँक पासबुक डाउनलोड, बाह्य व्यापारी पेमेंट सेवा, झटपट खाते उघडणे, UPI पेमेंट संबंधित सेवा पूर्णपणे बंद राहतील.

भारतीय पोस्ट विभागात या रिक्त पदांसाठी भरती सुरू; 63 हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार

Indian Postal Department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. या संधीचा लाभ दहावी पास असलेले उमेदवार देखील घेऊ शकतात. तसेच पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना ही पुढील रिक्त पदांसाठी नोकरी करता येऊ शकते. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी आवश्य ही बातमी वाचावी. तसेच, अर्ज कसा करायचा?? रिक्त पदांसाठी कोठे भरली सुरू आहे?? याविषयी जाणून घ्या. (Job Requirement)

अर्जाची अंतिम तारीख

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी भारतीय पोस्ट विभागाने स्टाफ कार ड्रायव्हरच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. indiapost.gov.in याबाबतची अधिक माहिती दिलेल्या वेबसाईटवर पाहता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेअंतर्गत कार ड्रायव्हरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे. त्यामुळे वेळ न दवडता इच्छुकांनी पदासाठी अर्ज करावा.

पात्रता आणि वयोमर्यादा

लक्षात ठेवा की, मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच या व्यक्तीला वाहन यंत्रणेचे देणे आणायला हवे. यासह अर्ज करणाऱ्या उमेदवाराला होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक किंवा तीन वर्षांचा मोटार कार चालवण्याचा अनुभव असेल तर त्याला फायदा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, या रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे. या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 रुपये ते 63 हजार 200 पगार दिला जाईल.

Metro Train Accident : थरारक!! मेट्रो ट्रेनखाली अडकला तरुणाचा पाय; सहप्रवासी आले धावून अन्.. VIDEO पहाच

Metro Train Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Train Accident) आपण रोज रेल्वे अपघाताच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. यातील बऱ्याच अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कित्येक लोक स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावतात. तर, काही लोक वाढत्या गर्दीमुळे अपघातांना बळी जातात. बऱ्याचवेळा धावत्या लोकलमध्ये चढायच्या नादात बरेच लोक पडतात, ट्रेनखाली जातात. अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. तरीही घडायच्या त्या घटना रोज घडतचं आहेत. दरम्यान, अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

ट्रेनखाली अडकला तरुणाचा पाय (Metro Train Accident)

आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलच्या अपघाताचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहील. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, ऑस्ट्रेलियात मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पाय अडकतो. तो व्यक्ती सगळे प्रयत्न करून आपला पाय काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला काही यश येत नाही. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले इतर प्रवासी त्याच्याभोवती जमा होताना दिसतात. यावेळी जर ट्रेन सुरु झाली असती तर काय झाले असते याचा नुसता विचार करून अंगावर काटा येतोय.

एकीचे बळ

ज्या व्यक्तीचा ट्रेनखाली पाय अडकला आहे तो आपला पाय बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Metro Train Accident) पण, काही केल्या त्याला यश येत नाही. अशावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित इतर प्रवासी त्याच्या मदतीला धावून येतात आणि चक्क मेट्रो ट्रेन आपल्या हातांनी ढकलू लागतात. खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्या व्यक्तीचा पाय काढण्यात मेट्रो कर्मचाऱ्य़ांना यश आले नाही. तेव्हा सहप्रवाशांच्या एकीने चक्क मेट्रो ट्रेन हलवली आणि त्या व्यक्तीचा पाय सुखरूप बाहेर काढला.

ही घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ शकला आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर sachkadwahai नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Metro Train Accident) या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की. ‘याला म्हणतात एकीचे बळ’, तर आणखी एकाने लिहिलंय, ‘संघटनेत ताकद असतेच’. अन्य एका युजरने लिहिले, ‘जर हे भारतात घडले असते तर लोकांनी त्यांचे फोन काढून व्हिडिओ बनवत राहिले असते’.

Whatsapp New Feature | व्हाटसऍपवरही उपलब्ध होणार ब्ल्यू टिक सर्व्हिस, व्यावसायिकांना असा होणार फायदा

Whatsapp New Feature

Whatsapp New Feature | व्हाट्सअप हे नेहमीच नवनवीन पिक्चर लॉन्च करत असते. त्यामुळे नागरिकांना देखील त्याचा फायदा होत असतो. जगातील बहुसंख्य लोक हे व्हाट्सअपचा वापर करत असतात. त्यामुळे मेटा देखील त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन अपडेट्स देत असतात. जेणेकरून त्यांना व्हाट्सअपचा वापर अत्यंत सुलभ गतीने करता येईल. अशातच आता मेटा व्हेरिफाइड फीचर व्हाट्सअप करण्यात आलेले आहे. म्हणजेच आता whatsapp वर देखील बिजनेस अकाउंट्‍स ब्लू टिक सर्विसचा लाभ घेऊ शकणार आहेत. आता या मदतीने युजर आता बिझनेस अकाउंटला व्हेरिफाइड करू शकतील.

मेटाने हे फीचर (Whatsapp New Feature) मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च केले होते. या फिचरच्या मदतीने कोणीही त्यांचे इंडिव्हिज्युअल किंवा बिजनेस अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे वापरू शकतात. ही सुविधा भारतात नुकतीच लॉन्च करण्यात आलेली आहे. मेटाच्या या फीचरची माहिती खुद्द मार्क झुकेरबर्ग यांनी दिलेली आहे. त्यांनी आपल्या व्हाट्सअपवर ही माहिती शेअर केलेली आहे.

या फिचरचा फायदा काय ? | Whatsapp New Feature

मेटा व्हेरिफाइड (Whatsapp New Feature) ही एक प्रकारची प्रोसेस आहे. ज्यात कंपन्या अकाउंटचे सगळे डिटेल्स ठेवत असते आणि तपासत असते. त्या अकाउंटच्या अथेरिटीचा शोध घेतला जाऊ शकतो. जेव्हा कोणत्याही अकाउंट सर्व निकष पास करते. तेव्हा मेटा त्याला ब्लू टिक सर्विस पुरवते. परंतु यासाठी अकाउंट होल्डरला मंथली सबस्क्रीप्शन फी द्यावी लागेल.

मेटा व्हेरिफाइड फीचर आता बिझनेस अकाउंटला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लहान बिझनेसला यातून मोठी मदत होणार आहे. याच्यामध्ये आपली ऑथेंटीसिटी मिळू शकतील तसेच आत्तापर्यंत व्हाट्सअपचा मेटा व्हेरिफाइड प्रोग्रॅमचा हजारो लोकांना लाभ घेतला आहे आणि याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

Pune Traffic Police : हेल्मेट घालण्याची जनजागृती करायला पोलिसांनी लढवली शक्कल; चौकात झळकले बाहुबलीचे पोस्टर

Pune Traffic Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pune Traffic Police) पुण्याबद्दल बोलायचं झालं की, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन स्थळे, खाद्यसंस्कृती आणि पुणेरी पाट्यांचा उल्लेख होतोच. ‘पुणे तिथे काय उणे..’ म्हणतात ते काय उगाच नाही. आजपर्यंत तुम्ही पुणेकरांचे कितीतरी किस्से ऐकले असतील. कमी शब्दात खतरनाक अपमान करण्यासाठी पुणेकर जगप्रसिद्ध आहेत. तर पुणेरी पाट्या.. त्यांच्याबद्दल बोलताना शब्द अपुरे पडतात. विविध विषयांवर या पुणेरी पाट्या लागलेल्या दिसतात. सोशल मीडियावर त्यांचे बरेच फोटो व्हायरल होतात. अशातच आता पुणेकरांमध्ये हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करायला पोलिसांनीसुद्धा पुणेरी पाटीचा आधार घेतला आहे.

पुणे पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल (Pune Traffic Police)

वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस कायम काही ना काही युक्त्या लढवताना दिसतात. अशातच आता पुणे शहरातील वाहतूक पोलीसांनी पुणेकरांमध्ये हेल्मेटसंदर्भात जनजागृती निर्मितीसाठी एक अनोखा आणि मजेशीर फंडा वापरला आहे. पोलिसांनी हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे शहरात चौकाचौकात होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगला आपण पुणेरी होर्डिंग बोलू शकतो. कारण, या होर्डिंगच्या माध्यमातून एका अनोख्या पद्धतीने पोलिसांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

काय लिहिलंय होर्डिंगवर?

पुण्यात बरेच लोक विना हेल्मेट गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे अनेकदा पोलीस हेल्मेट न घालणाऱ्यांवर चालान कापण्याची मोहिम राबवतात. दरम्यान, बऱ्याच चालकांसोबत त्यांचे वाद होतात. (Pune Traffic Police) दंड आकारून देखील बरेच लोक अजूनही हेल्मेट घालत नाहीत.

अशा दुचाकी चालकांसाठी सध्या पोलिसांनी पुण्यात जनजागृती करणारे होर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगवर बाहुबलीचा फोटो लावण्यात आला आहे. त्याच्या बाजूला लिहिलंय, ‘बाहुबली जर हेल्मेट घालत असेल तर आपण का लाजतो..? हेल्मेट वापरा सुरक्षित राहा…’.

अपघातांचे प्रमाण

पुणे शहरात जवळपास प्रत्येकाकडे वाहने आहेत. त्यामुळे वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर अपघातांचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. मात्र असे करूनही अजून बरेच बाईकस्वार अपघाताच्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत. (Pune Traffic Police) त्यांना अद्याप हेल्मेट घालण्याचे गांभीर्य आलेले नाही. म्हणूनच पोलिसांनी सक्तीपेक्षा जनजागृतीचा पर्याय निवडला आहे. या होर्डिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर अनेकांनी ‘सही पकडे है’, ‘एकदम बरोबर’ अशा कमेंट केल्या आहेत.