Sunday, December 21, 2025
Home Blog Page 683

Lightening In Rain | तुळजापूरमध्ये वीज पडून शेतातून निघाले निळे पाणी; भूगर्भशास्त्रज्ञांना केली पाण्याची चाचणी

Lightening In Rain

Lightening In Rain | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. परंतु मराठवाड्यातील धाराशिव या जिल्ह्यातील कशी विचित्र घटना घडलेली आहे. ती म्हणजे मसला गावच्या एका शेतात वीज पडल्यानंतर(Lightening In Rain) त्या शेतातील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागलेले आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडालेली आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आणि याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होताना दिसत आहे.

वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहत आहे. हे पाणी इतके गडद निळे आहे की, ते एका कृत्रिम रंगासारखे दिसते. या ठिकाणी तुम्ही विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. आणि अचानक वीज जमिनीवर (Lightening In Rain) कोसळली. त्यांनतर त्या जमिनीतून निळे पाणी वाहू लागले. परंतु यातून निळे पाणी कसे काय आले? याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालू झालेला आहे. यावेळी भूगर्भशास्त्रज्ञांना देखील बोलवण्यात आले आणि पाण्याची चाचणी घेण्यात आली.

मराठवाड्यात जोरदार पावसाने हजारी लावलेली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सुरू झालेली आहे. पहिल्याच पावसाने धरणात पाणी साठू लागलेले आहे. या पावसामुळे संभाजीनगरला महिनाभर पुढे एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे
जायकवाडी धरणात तब्बल एक टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.

संभाजीनगरमध्ये देखील मान्सूनचे आगमन झालेले आहे सहा तासात 57.8 मीमी पाऊस झालेला आहे. त्याचप्रमाणे नांदेड, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात देखील पावसाचे हजेरी लावलेली आहे.

Onion Prices | कांद्याने शेतकरी हसणार, पण ग्राहक मात्र रडणार; दरात झाली 50 टक्क्यांनी वाढ!

Onion Prices

Onion Prices | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आता कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. कांद्याची मागणी वाढल्यामुळे त्यांच्या भावात देखील वाढ झालेली आहे. याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. परंतु ग्राहकांना मात्र याचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे.

कांद्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ | Onion Prices

सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर घसरत होते. परंतु आता कांद्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या 15 दिवसात घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात 12 रुपयांनी वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. परंतु दुसरीकडे सामान्य नागरिकांना मात्र चांगलाच अधिक फटका बसणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 30 ते 50 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. कारण कांद्याचा पुरवठा कमी होत आहे आणि दुसरीकडे बकरी ईद पूर्वी कांद्याची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे व्यापारी देखील कांद्याची साठे भाजी करत आहेत.

महाराष्ट्रातही कांद्याच्या दरात वाढ

महाराष्ट्रात देखील कांद्याचे दारात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक घाऊक बाजारामध्ये कांद्याचा भाव हा 30 रुपयांच्या पुढे गेलेला आहे. जून पासून बाजारात येणारा कांदा हा शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या साठ्यातून येणार आहे. 2023- 24 च्या रब्बी पिकाच्या संभाव्य घसरणीमुळे वाढ होण्याची अपेक्षा असल्याने शेतकरी आता त्यांचा साठा उतरवत आहे.

कांद्याच्या दरात वाढ होण्याची कारणे

कांद्याच्या 40% निर्यात शुल्कासह कांद्याची निर्यातही कमी होत आहे. त्यात 17 जून रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त कांद्याला देशांतर्गत चांगली मागणी आहे. असा व्यापारांचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. महाराष्ट्रातील कांद्याचा दक्षिणेकडून राज्यातून जोरदार मागणी आहे.

मोठी बातमी!! NEET परीक्षेच्या घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने NTA ला बजावली नोटीस

NEET Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नीट परीक्षेच्या घोळासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीट परीक्षेच्या वाढीव निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली आहे. या नोटीसीमध्ये एनटीएने लवकरात लवकर उत्तर दाखल करावे असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी थेट 8 जुलै रोजी होणार आहे. या सुनावणीपर्यंत NTA ला नीट परीक्षेच्या वाढीव गुणांबाबत उत्तर द्यावे लागणार आहे.

नीट परीक्षेतील गुणांच्या घोळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती याची केवळ आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, झालेल्या प्रकारामुळे नीट परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे. त्यामुळे एनटीएकडून उत्तर हवे आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाने समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देण्यास ही नकार दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी एनटीएचे उत्तर आल्यानंतर 8 रोजी होईल.

दरम्यान, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून उमेदवारांच्या एका गटाने NEET-UG 2024 परीक्षा नव्याने आयोजित यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेत NEET UG 2024 चा निकाल मागे घेऊन परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असे म्हणले आहे. याच याचिकेवर आज न्यायालयाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. यासह समुपदेशन देखील रद्द केले जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

Kalki 2898 AD : एका महान युद्धासाठी वेळ बदलणार; बिग बी आणि प्रभासच्या Kalki 2898 AD चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Kalki 2898 AD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalki 2898 AD) गेल्या अनेक महिन्यांपासून Kalki 2898 AD हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. घोषणेपासून हा सिनेमा काहीतरी हटके आणि वेगळे कथानक घेऊन येणार हे समजत होते. मुख्य म्हणजे, पहिल्या प्रोमोत महानायक अमिताभ बच्चन अश्वत्थामाची भूमिका साकारणार असल्याचे समजल्यापासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पहायला मिळाली. यानंतर आता ‘कल्की 2898 एडी’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. जो पाहून आता प्रत्येकाला प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.

Kalki 2898 AD चा ट्रेलर रिलीज (Kalki 2898 AD)

बहुप्रतीक्षित Kalki 2898 AD या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुमारे २ मिनिटे ३० सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सिनेमाची जबरदस्त स्टारकास्ट पहायला मिळते आहे. त्यानुसार चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन, अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत तर अभिनेत्री दिशा पटानीदेखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे समजत आहे. याशिवाय कमल हासन आणि शाश्वत चॅटर्जी देखील या सिनेमात झळकणार आहेत.

(Kalki 2898 AD) सध्या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक सध्या चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज लावत आहेत. या ट्रेलरची सुरुवात काशी पासून होते आहे. ज्याचा उल्लेख पृथ्वीतलावरील शेवटचे शहर असा करण्यात आला आहे. तर ओसाड झालेल्या धरतीवर नवी सुरुवात कशी होणार? ते या सिनेमात आपल्याला पाहता येणार आहे.

बिग बींसोबत बाहुबली प्रभास करणार जबरदस्त ॲक्शन

‘कल्की 2898 एडी’ या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. त्यासोबत महानायक अमिताभ बच्चनही जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. त्यामुळे ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. हा पूर्ण सिनेमा ॲक्शन आणि फिक्शनने भरलेला असून ट्रेलरनंतर प्रेक्षकांची रिलीबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. माहितीनुसार, या सिनेमात अमिताभ बच्चन, प्रभास यांच्यासोबत कमल हासनसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कधी रिलीज होणार?

माहितीनुसार, ‘कल्की 2898 एडी’ हा सिनेमा येत्या २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये तेलुगू सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा एक साय- फाय सुपरहिरोवर आधारित चित्रपट असून सुपरहिरो म्हणून प्रभास आपल्या भेटीस येत आहे.

New Serial : स्वप्नातल्या सुखांना..!! सुबोध- शिवानीच्या नव्या मालिकेचे शीर्षक गीत रिलीज; प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव

New Serial

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Serial) मराठी अभिनेता सुबोध भावे मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. ‘तू भेटशी नव्याने’ असे त्याच्या नव्या मालिकेचे नाव आहे. ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेत सुबोध भावेसोबत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवानी सोनार मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत विशेष उत्सुकता आहे. अशातच आता या मालिकेचे शीर्षक गीत रिलीज झाले आहे.

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचे शीर्षक गीत लॉन्च (New Serial)

सोनी मराठीवर येत्या ८ जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेचे शीर्षक गीत नुकतेच रिलीज झाले आहे. सोनी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर या गाण्याचा एक लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नव्याने तू बहरतेस, नव्याने तू उमगतेस… प्रेमाच्या या वाटेवर, तू भेटशी नव्याने…’. हे गाण्याचे बोल आहेत. अत्यंत श्रवणीय असे हे गाणे प्रसिद्ध गायक अभय जोधपूरकर आणि गायिका आनंदी जोशी यांनी गायले आहे.

प्रेक्षकांची पसंती

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेचे शीर्षक गीत काही तासांपूर्वीच लॉन्च करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे शीर्षक गीत प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत शीर्षक गीताला आपली पसंती दर्शवली आहे. (New Serial) एका युजरने म्हटलंय, ‘फार गोड चाल….. व गायलं ही छान!’ तर अन्य एकाने लिहिलंय, ‘WOW ! खुपचं मस्त ! आतुरता आतुरता आणि आतुरता’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘मस्त आवाज गाणे पण भारी आवडले बरं का’.

छोट्या पडद्यावर AI तंत्रज्ञानाचा वापर

सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेसाठी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मालिकेच्या कथानकात ऐन चाळीशीतला प्राध्यापक ज्याचं नाव अभिमन्यू आहे आणि विशीतला तरुण माही अशी दोन पात्र आपल्या भेटीस येत आहेत. या दोन्ही भूमिका सुबोध भावे साकारतो आहे. (New Serial) मालिकेत AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माही म्हणजेच तरुण सुबोध दाखवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या प्रोमोत याची झलक दिसली होती आणि तेव्हपासूनच प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Travel Tips : पावसाळ्यात कुठेही फिरायला जा!! पण ‘इथे’ चुकूनही जाऊ नका; गेलात तर होईल पश्चाताप

Travel Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Travel Tips) सध्या राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरु आहे. गरमीने हैराण झालेले सगळेच पावसाच्या सरींमुळे सुखावले आहेत. न केवळ माणसे तर निसर्गातही पावसाच्या आगमनाचा आनंद दिसून येतोय. पाऊस आला की, सगळीकडे वातावरण आल्हाददायी होऊन जातं. हवेत थंडावा राहतो आणि सगळीकडे हिरवाई होते. त्यामुळे पावसाळ्यात बरेच लोक फिरायला जायचे प्लॅनिंग करतात.

साहजिक आहे, अशा वातावरणात फिरायला जावं कूणाला वाटणार नाही? जर तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्याची आवड असेल तर नक्कीच तुम्हीही फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल. (Travel Tips) म्हणूनच आज आम्ही ही महत्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पावसाळ्यात फिरायला जा पण चुकूनही खाली दिलेल्या ठिकाणी जाऊ नका आणि तरीही गेलात तर सुट्टीची वाट लागली म्हणून समजाच. जाणून घ्या.

1. गोवा (Travel Tips)

पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे गोवा. इथले बीच कायम पर्यटकांच्या गर्दीने भरलेले दिसतात. असे असले तरीही पावसाळ्यात गोव्याला जाणे मूर्खपणा मानला जातो. कारण, या काळात समुद्रकिनाऱ्याची पातळी खूप वाढलेली असते. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा बंद असतात. शिवाय हॉटेलमधून बाहेर पडणे मुश्किल होईल असा पाऊस असतो. त्यामुळे पावसाळ्यात कुठेही जा पण गोव्याला जाऊ नका.

2. लडाख

लडाख हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेल्या या ठिकाणी बरेच रायडर्स लॉन्ग ड्राइव्ह करून येतात. अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. (Travel Tips) पण, पावसाळ्यात लडाखला जाण्याची कुणी हिंमतही करत नाही. कारण, पावसामुळे लेह- मनाली महामार्ग आणि लेह- श्रीनगर महामार्ग यांसारख्य रस्त्यांवर भूस्खलनाचा धोका असतो. त्यामुळे हे रस्ते बंद केले जातात. शिवाय पर्यटन देखील बंद असते. त्यामुळे लडाखला जाण्यात काहीही पॉईंट नाही.

3. हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशात शिमला, मनाली आणि धर्मशालासारखी अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. मात्र, पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळतात. (Travel Tips) ज्यामुळे रस्ते बंद केले जातात. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये पर्यटनासाठी जाणे धोकादायक मानले जाते.

4. उत्तराखंड

भारतात उत्तराखंड हे एक अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. न केवळ देशातून तर परदेशातून सुद्धा अनेक पर्यटक इथे येत असतात. या ठिकाणी मसुरी, नैनिताल आणि हृषिकेशसारखी काही खास हिल स्टेशन्स आहेत. जी अत्यंत नयनरम्य आहेत. (Travel Tips) मात्र, या ठिकाणी पावसाळ्यात जायचा विचारही करू नका. कारण दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत इथरे पर्यटनासाठी जाणे धोकादायक ठरू शकते.

5. अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबार ही अत्यंत सुंदर बेटे आहेत. हनिमूनसाठी परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते. असे असले तरीही पावसाळ्यात या ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारे वाहतात. (Travel Tips) ज्यामुळे वाहतूक आणि जलवाहतुकीत मोठी अडचण होते. त्यामुळे या ठिकाणी भेट देणे जवळपास अशक्य होते.

PM आवास योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार; पहिल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

PM AWas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिला कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) PM आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) 3 कोटी घरे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक नवी दिल्ली येथील पीएम हाऊसमध्ये पार पडली. या बैठकीला अमित शाह, सर्बानंद सोनोवाल, राजनाथ सिंह, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह, ललन सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती.

मोदी सरकारच्या पहिल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे की, सर्वसामान्य नागरिकांसाठी PM आवास योजनेतंर्गत 3 कोटी घरे बांधली जातील. या घरांची उभारणी शहरी अनेक ग्रामीण भागात केली जाईल. बांधण्यात आलेल्या या घरांमध्ये कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन देण्यात येईल. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला आणि हक्काचे घर असावे हे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, PM आवास योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला कायमस्वरूपी घरे देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टांतर्गत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी योजनेअंतर्गत मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरे बांधली जातील, असे सांगण्यात आले होते. यातील काही घरांचे काम अजूनही शिल्लक आहे. तर 2023 पर्यंत 2.61 कोटी घरे बांधली गेली होती. आता पुन्हा एकदा सरकारने या योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधली जातील असे आश्वासन दिले आहे.

Bhambavli Vajrai Waterfall : गर्द वनराईत दडलाय देशातील सर्वांत उंच धबधबा; विहंगम दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटेल

Bhambavli Vajrai Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhambavli Vajrai Waterfall) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच फिरायला जायचे वेध लागतात. बरेच लोक मान्सून ट्रीपसाठी सुंदर लोकेशन्सच्या शोधात असतील. तुम्हीही पावसाच्या सरी मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी फिरायला जायचा प्लॅन करताय का? तर आज आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत तिथे नक्की जा.

आजपर्यंत तुम्ही पावसाळ्यात बऱ्याच ट्रिप केल्या असतील. ज्यामध्ये तुम्ही कितीतरी लहान मोठे धबधबे पाहिले असतील. पण तुम्ही आशिया खंडातील सगळ्यात उंच धबधबा पाहिला आहे का? नसेल पाहिला तर या पावसाळ्यात नक्की जा. आज आपण याच धबधब्याविषयी माहिती घेणार आहोत. (Bhambavli Vajrai Waterfall) मुख्य म्हणजे आशिया खंडातील सगळ्यात मोठा धबधबा हा महाराष्ट्रात आहे. या धबधब्याचे नाव ‘भांबवली वजराई’ असे आहे. चला तर या धबधब्याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊया.

भांबवली वजराई धबधबा (Bhambavli Vajrai Waterfall)

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. मुख्य म्हणजे, हा धबधबा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. हा संपूर्ण देशातील सर्वात उंच धबधबा असल्यामुळे तो पाहण्यासाठी कायम पर्यटकांची गर्दी दिसते.

देशातील सर्वात उंच धबधबा

सातारा जिल्ह्यातील ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी आहे. शिवाय हा धबधबा अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे. (Bhambavli Vajrai Waterfall) देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो. थेट उभ्या दगडांवरून कोसळणारा हा धबधबा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असल्याने इथे जाताक्षणी इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. हा धबधबा उभ्या दगडावरून साधारण तीन टप्प्यात कोसळतो. कोसळताना त्याच फेसाळलेलं पाणी पाहणं आणि त्याचा आवाज ऐकणं मनाला शांतता देणारं ठरतं.

नोव्हेंबरनंतर जयंत पाटील पदाचा राजीनामा देणार?? त्या सूचक वक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरी करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी “मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष राहील नोव्हेंबर नंतर पदावर नसणार” असे स्पष्टपणे सांगून दिले. त्याचबरोबर “माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवार यांना सांगा” असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले.

जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा अहमदनगर मध्ये मोठ्या थाटात वर्धापन दिन सोहळा साजरी करण्यात आला. या सोहळ्यामध्ये जयंत पाटील यांच्याकडून अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे टोमणे मारण्यात आले. याचवेळी बोलताना त्यांनी, मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असे देखील सांगितले. त्यामुळे जयंत पाटील यांनी पद सोडल्यानंतर या पदाची धुरा कोणाकडे दिली जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, वर्धापन सोहळ्यात जयंत पाटील यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. यावेळी बोलताना, “पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नसते, कारण आमच्या शाळेचे हेडमास्तर पवारसाहेब आहेत. त्याकाळी ही माझ्या सारख्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. आज पुन्हा एकदा त्याच मोडमध्ये पवारसाहेब आहेत. भाजपा सारखे 400 पार म्हणायची चूक मी करणार नाही. पण विधानसभेत प्रत्येक सीट निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे” असे जयंत पाटील यांनी म्हणले.

8th Pay Commission | आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पगारात किती वाढ होणार?; जाणून घ्या अपडेट

8th Pay Commission

8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या सातव्या वेतन आयोगानुसार काम करत आहे. आणि गेल्या अनेक काळापासून हे कर्मचारी अशा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ते सह त्यांना इतर भत्ते दिले जातात. आठवा वेतन आयोग लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मागणी केलेली आहे. सरकारकडून आता त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेले आहेत.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार | 8th Pay Commission

हाती आलेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. आणि पहिला वेतन आयोग हा 1946 मध्ये लागू झालेला. त्यामुळे आठवा वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षे वाट बघण्याची आवश्यकता आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास जवळपास 49 लाख सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे 68 लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन देखील वाढवले जाईल. त्याचप्रमाणे फिटमेंट घटक वर्तमान मूल्याच्या 3.67% केली जाईल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल, तर यामुळे मूळ वेतनात 8000 ते 26 हजार रुपयांनी वाढ होऊ शकते.

आठव्या वेतन आयोगात कोणकोणते लाभ अपेक्षित

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास अनेक फायदे देखील अपेक्षित आहे. त्यामध्ये वेतनश्रेणी सुधारणा आणि उत्तम सेवा निवृत्ती लाभांचा ही समावेश असेल. यामुळे पेन्शनधारकांना आणि लष्करी कर्मचाऱ्यांना देखील लाभ होणार आहे.