Sunday, December 21, 2025
Home Blog Page 684

Maharashtra State Co operative Bank Bharati | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, दरमहा मिळेल एवढा पगार

Maharashtra State Co operative Bank Bharati

Maharashtra State Co operative Bank Bharati | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन घेऊन येत असतो. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. आज काल अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करायची असते. आणि याच नोकरीची संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. या भरतीचे नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलेले आहे. आता या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, भरली जाणारी पदे, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Maharashtra State Co operative Bank Bharati

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक के अंतर्गत असिस्टंट इंटर्न त्यांची पदे भरली जाणार आहेत.

पदसंख्या

असिस्टंट इंटर्न या पदाच्या एकूण 32 रिक्त जागा आहेत

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे काम करावे लागेल

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून अथवा शिक्षण संस्थेतून एमबीए केलेल्या असावी त्याप्रमाणे मॅनेजमेंट मध्ये दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 21 ते 30 वर्ष वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता | Maharashtra State Co operative Bank Bharati

व्यवस्थापक OSD HRD & M विभाग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड सर विठ्ठलदास ठाकरसे मेमोरियल बिल्डिंग नऊ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई 40001

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

One School One Uniform | शाळांमध्ये 15 जूनपासून असणार ‘एक राज्य एक गणवेश’; जाणून घ्या नियमावली

One School One Uniform

One School One Uniform | दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी नवीन गणवेश विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता राज्यातील पहिली ते आठवीच्या मुलांसाठी एक राज्य एक गणवेश (One School One Uniform) ही योजना लागू करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच्या आदेश देखील सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत.

पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना मोफत गणवेश योजना दिली जाते. आता शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता हे गणवेश वेगवेगळ्या इयत्तांसाठी मुलांसाठी वेगवेगळे असणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस घालायचा हे देखील ठरवण्यात आलेले आहे. आता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

इयत्ता पहिली ते चौथी मुली | One School One Uniform

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार, शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हर ऑल फ्रॉक

इयत्ता पाचवी मुली

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाश रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्राक

इयत्ता 6 वी ते 8 वी मुली आणि 1 ली ते 8वी मुली (उर्दू माध्यम)

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी निळ्या रंगाची कमिशन या गडद रंगाचा सलवार आणि गडद निळ्या रंगाची ओढणी
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद आकाशी रंगाची कमीज गळ्यात निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी

इयत्ता 1 ली ते 7 वी मुले

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
स्काऊट आणि गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गळत निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

इयत्ता 8 वी मुले | One School One Uniform

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पँट
स्काऊट गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि काळ्या निळ्या रंगाची फुल पँट

शासनाने दिलेल्या नुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी गणवेश धारण करायचा आहे. आणि स्काऊट गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी परिधान करायचा आहे. या दिवशी स्काऊट गाईड विषयाच्या तासिका देखील घेण्यात येणार आहे. राज्यातील 15 जून 2024 पासून सर्व शाळा सुरू होत आहे. त्यामुळे महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई सुरू आहे.

काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना रजत शर्मा यांच्याकडून शिवीगाळ; Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रोखठोक प्रश्न विचारण्याच्या भूमिकेमुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या जेष्ठ पत्रकार रजत शर्मा यांच्यावर काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्यात त्यांनी लाइव्ह डिबेटमध्ये रजत शर्मा (Rajat Sharma) यांनी शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच रजत शर्मा यांना सोशल मीडियावर लोकांकडून ट्रोल केले जात आहे. तसेच, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही काँग्रेसकडून आणि नेटकर्यांकडून केली जात आहे.

नेमके काय घडले??

लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये रागिणी नायक यांना लाइव्ह डिबेटमध्ये बोलवण्यात आले होते. परंतु चर्चेदरम्यानच रजत शर्मा यांनी रागिणी नायक यांच्यासोबत गैरवर्तणूक केली. तसेच, “क्या बेह….द है” अशा शब्दात त्यांना शिवीगाळ देखील केली. ही सर्व माहिती स्वतः रागिणी नायक यांनी X वर एक ट्विट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्या लाईव्ह डिबेटचा व्हिडिओ ही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप किती जागा जिंकेल याबाबत दोघेजण चर्चा करताना दिसत आहेत. परंतु, मध्येच रजत शर्मा यांनी शिवीगाळ केल्याचे व्हिडिओत कैद झाले आहे.

https://twitter.com/NayakRagini/status/1800220455422611730?t=BzDFldrXXzOdPx58fD-eJQ&s=19

महत्वाचे म्हणजे, या सर्व प्रकरणानंतर रागिणी नायक यांनी ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हणले आहे की, “पहिला व्हिडिओ X वर माझ्या निदर्शनास आणून देण्यात आला. ज्यात रजत शर्मा मला लाईव्ह डिबेटमध्ये शिवीगाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे मी या व्हिडिओचे तथ्य तपासले. तसेच, चॅनलवरून या व्हिडिओचे कच्चे फुटेज काढले. यापेक्षा पत्रकारितेची पातळी काय घसरणार? रजत शर्मा यांच्याकडे काही उत्तर आहे का?”

दरम्यान, सोशल मीडियावर रजत शर्मा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काही युजर्स रजत शर्मा यांची बाजू घेताना दिसत आहेत. “रजत शर्मा यांचा फेक व्हिडिओ बनवण्यात आला आहे.” असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

Mutual Funds And Shares Investment | Mutual Funds किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करताय ? SEBI ची ‘ही’ अपडेट जाणून घ्या

Mutual Funds And Shares Investment

Mutual Funds And Shares Investment | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतात. यातून त्यांना खूप चांगला फायदा देखील होत असतो. परंतु जर तुम्ही देखील म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल. तर आता ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बाजार नियमक सेबीने म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स (Mutual Funds And Shares Investment) संबंधित एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे.

ती म्हणजे आता गुंतवणूकदारांसाठी सेबी काही नियम केलेले आहेत. त्याचप्रमाणे नॉमिनेशन ऑप्शन न दिल्यास आता डिमॅट आणि म्युच्युअल फंड अकाउंट गोठवली जाणार नाहीत. सेबीने घेतलेला हा निर्णय बदल 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जा गुंतवणूकदारांनी नॉमिनेशन ऑप्शन दिलेला नाही. त्यांनी म्युच्युअल फंड अकाउंट गोठवण्याचा नियम सेबीने रद्द केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स ठेवणारे गुंतवणूक दारात लाभांश व्याज किंवा सिक्युरिटीचे इनकॅशमेंट सारखे पेमेंट देण्यास पात्र असणार आहेत.

याआधी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने सर्व विद्यमान म्युच्युअल फंड धारकांना नॉमिनी तपशील सादर करण्यासाठी किंवा नॉमिनेशन मधून बाहेर पडण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत दिलेली होती. ज्या लोकांनी या नियमाचे पालन केले नाही. त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर बंदी देखील घालण्यात येणार होती. परंतु आता सेबीने याबाबतचा परिपत्रक जाहीर केलेला आहे.

या पत्रकानुसार (Mutual Funds And Shares Investment) आता नॉमिनेशन ऑपशन न दिल्यामुळे डिमॅट आणि खात्यांबद्दल म्युच्युअल फंड खाती गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील म्हटलेले आहे. परंतु आता लेटेस्ट कंपन्या आणि आरटीएने नॉमिनेशन सादर न केल्यामुळे रखडलेली ध्येय वैद्यकीय निकाली काढली जातील असे देखील म्हटलेले आहे. परंतु आता नवे गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड युनिट्स धारकांना डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंड धारकांना फंडफोलिओसाठी नॉमिनी देणे अनिवार्य असल्याचे देखील सांगितलेले आहे

Ghee Water Benefits | रोज कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्या, शरीराला होतील अद्भुत फायदे

Ghee Water Benefits

Ghee Water Benefits | तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुपामुळे आपल्या आरोग्य देखील निरोगी राहते. प्रत्येक घरात तूप तयार केले जाते. जेवणातही तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुपामुळे जेवणाची चव वाढते. त्याचप्रमाणे आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. तुपामुळे तुमच्या आरोग्य चांगले राहतेच. परंतु त्याचबरोबर तुमची त्वचा देखील हायड्रेटेड राहते. आपण जेवणामध्ये तूप मिसळून खाल्ले आहे. परंतु पाण्यामध्ये तूप मिसळून तुम्ही कधी प्यायला आहात का? तुम्ही जर कोमट पाण्यात गाईचे तूप मिसळून पिले, तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला देखील यातून खूप फायदा होतो. आता आपण गाईचे तूप पाण्यात (Ghee Water Benefits) मिसळून पिल्यावर आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते | Ghee Water Benefits

गाईच्या तुपात ए, डी आणि ई जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि अनेक प्रकारच्या संक्रमणांशी लढण्यास मदत करते.

त्वचेचे आरोग्य सुधारते

गाईच्या तुपात आढळणारे पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास, त्वचा मुलायम, चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत करतात.

तणाव आणि चिंता दूर करण्यात मदत

गाईच्या तुपात नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे मेंदूचे कार्य चांगले राहते आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते.

पचन वाढवणे

गाईच्या तुपात ब्युटीरिक ऍसिड आढळते, ज्यामुळे आतड्यांमध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया वाढते. याव्यतिरिक्त, ते जळजळ कमी करते, ज्यामुळे पचनशक्ती निरोगी राहते.

शरीर डिटॉक्सिफिकेशन

गाईच्या तुपामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात, त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.

चयापचय गतिमान होते

गाईचे तूप शरीरातील चयापचय गतिमान करते, ज्यामुळे ऊर्जेचा योग्य वापर होतो आणि अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते. चयापचय गती वाढल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

सांधेदुखी कमी होते

गाईच्या तुपात आढळणारे व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड सांध्यांसाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे याच्या सेवनाने सांधेदुखी कमी होते आणि सूज कमी होण्यासही मदत होते.

मन शांत राहते | Ghee Water Benefits

गाईच्या तुपात असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. हे संज्ञानात्मक कार्ये सुधारते.

Jio New UPI App Launch | Jio ने केले नवीन UPI ​​ॲप लॉन्च, ऑनलाईन पेमेंटसह मिळणार हे फायदे

Jio New UPI App Launch

Jio New UPI App Launch | मुकेश अंबानी यांनी डिजिटल क्षेत्रामध्ये झपाट्याने त्यांची प्रगती केलेली आहे आणि त्यांचे स्थान देखील प्राप्त केलेले आहे. मुकेश अंबानी हे आता ऑनलाईन पेमेंट मार्केटमध्ये देखील उतरणार आहेत. यासाठी मुकेश अंबानी हे जिओ फायनान्स हे सुपर घेऊन येत आहे. त्यामुळे आता गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो. सध्या गुगल पे आणि फोन पे या दोन कंपन्या ऑनलाइन पेमेंटसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. परंतु मुकेश अंबानी यांचे नवीन ऍप आल्यावर या कंपन्यांना मात्र आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

या सुविधा उपलब्ध होणार | Jio New UPI App Launch

Jio चे नवीन JioFinance ॲप लाँच करण्यात आले आहे. हे Jio Financial Services Limited ने लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप बीटा व्हर्जनमध्ये आहे. हे एक ऑल इन वन ॲप आहे, ज्यावर वित्त आणि डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध असतील. या ॲपवर सर्व प्रकारच्या बँकिंग सेवांसोबतच UPI पेमेंट सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय बिल सेटलमेंट आणि विमा सल्लागार उपलब्ध असतील. या ॲपद्वारे कर्ज आणि गृहकर्ज घेता येते.

कधी वापरता येईल

जिओ फायनान्स ॲप सध्या बीटा चाचणीत आहे. म्हणजे काही निवडक वापरकर्तेच ते वापरू शकतील. ते गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. युजर्सच्या फीडबॅकनंतर हे ॲप शेवटी सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

गुगल पे, फोनपे टेन्शन वाढले | Jio New UPI App Launch

Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या Fintech कंपन्यांनी आधीच त्यांचे ॲप बाजारात आणले आहेत. अशा परिस्थितीत जिओ फायनान्स ॲपची थेट स्पर्धा गुगल पे, फोनपे आणि पेटीएमशी असल्याचे मानले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की Jio Finance ॲपवर एकाच ठिकाणी अनेक सेवा उपलब्ध असतील, ज्या पेटीएम, फोनपे आणि गुगल पे देत नाहीत. अशा परिस्थितीत जिओ फायनान्स ॲपच्या प्रवेशामुळे गोंधळ वाढू शकतो.

Tax Free Income | ‘या’ गोष्टींवर भरावा लागणार नाही कर; जाणून घ्या नवे अपडेट

Tax Free Income

Tax Free Income | प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कष्टाने कमावलेल्या पैशावर कर सरकारला द्यावा लागतो. परंतु सगळ्यांनाच असे वाटते की आपण कमावलेल्या कष्टाच्या पैसावरचा कर वाचायला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे उपाय देखील करत असतात. परंतु असे काही उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. ज्यावर तुम्हाला कर भरावा लागत नाही. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज लागत नाही. परंतु या गोष्टीची माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कमाईच्या कराच्या कक्षेत येत नाही

वारसा हक्काने मिळालेली संपत्ती | Tax Free Income

तुम्हाला तुमच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची मालमत्ता, दागिने आणि रोख रक्कम मिळाली असेल, तर त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. तुमच्या नावावर इच्छापत्र असेल तर त्याद्वारे प्राप्त झालेल्या रकमेवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. तसेच त्या मालमत्तेतून तुम्ही जर कोणतीही संपत्ती कमावली, तरी देखील त्यावर तुम्हाला कर भरावा लागत नाही

लग्नाची भेट

तुमच्या लग्नात तुमच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी जर एखादी महागडी भेटवस्तू दिली, तर त्यावर देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या लग्नाची भेट ही आज किंवा सहा महिन्यांनी जरी दिली, तरी देखील त्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. परंतु भेट वस्तूची किंमत ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर कर आकारला जाईल.

भागीदारी फर्मकडून मिळालेला नफा

एखाद्या कंपनीत जर तुम्ही भागीदार असाल आणि तुम्हाला नफ्याचा वाटा म्हणून कोणतीही रक्कम मिळाली, तर त्यावर देखील तुम्हाला कर भरावा लागणार नाही. तुमच्या भागीदारी फर्म नाही या रकमेवर आधीच कर भरला आहे. जर तुम्हाला फोन करून पगार मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल

जीवन विमा दावा किंवा परिपक्वता रक्कम

तुम्ही जर जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर त्यावरील परिपक्वता पूर्णपणे करमुक्त आहे. पॉलिसीची वार्षिक प्रीमियम त्याच्या विमा रकमेच्या 10% पेक्षा जास्त नसावा. अशी देखील जास्त असल्यास जादा रकमेवर कर आकारला जाईल. ही सवलत काही गोष्टींमध्ये 15 टक्क्यांपर्यंत असू शकते.

शेअर किंवा इक्विटी MF मधून प्राप्त झालेले रिटर्न्स | Tax Free Income

जर तुम्ही शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली असेल, आणि त्याची विक्री केल्यावर तुम्हाला मिळणारे 1 लाख रुपये हे करमुक्त आहे. हा परवाना दीर्घकालीन भांडवली नफा अंतर्गत मोजला जातो. या रकमेपेक्षा जास्त परताव्यावर तुम्हाला कर लागू शकतो.

Job Requirement: RTO मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू; अर्जाची अंतिम तारीख पहा

Job Requirement

Job Requirement| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. RTO मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2024 आहे. ही भरती नियंत्रक पदांच्या रिक्त जागेसाठी होणार आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागिवले जात आहेत. त्यामुळे वेळ न दवडता इच्छुक तरुणींनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ मुंबईअंतर्गत पुढील काळात नियंत्रकच्या जागांसाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रताही आवश्यक आहे. ही पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात तपासावी. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईतील RTO ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळेल. त्यासाठी उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून 2024 आहे.

येथे करा अर्ज (Job Requirement)

महत्त्वाचे म्हणजे, ज्या उमेदवारांना या रिक्त पदासाठी काम करायचे आहे त्यांनी https://www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. यासह अर्जासोबत आवश्यक असलेले कागदपत्रे जोडून तो अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवून द्यावा. हा अर्ज इच्छूक उमेदवारांनी 26 जून 2024 याचं तारखेच्या आत पाठवावा. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Rainy Vegetables : औषधांपेक्षाही गुणकारी आहेत ‘या’ रानभाज्या; फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Rainy Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rainy Vegetables) आपल्या आहारात आपण काय खातो? याचा आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार तज्ञ सांगतात की, आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आहारात समावेश करा. यामुळे सुदृढ शरीर आणि निरोगी आरोग्य मिळेल. पण बिघडती जीवनशैली आपल्या दैनंदिन आहारावर परिणाम करते. अनेकदा आपण आपल्या शरीराला हानी पोहचेल अशा पदार्थांचे सेवन करतो. ज्यामुळे कित्येक आजारांना आपणहून आमंत्रण मिळते. मग दवाखाना मागे लागतो आणि कडू औषधे, इंजेक्शन, काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील करावी लागते. या सगळ्यांपासून आपले संरक्षण व्हावे असे वाटत असेल तर आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश करा.

पावसाळ्याच्या दिवसात बाजारात हमखास उपलब्ध असणाऱ्या काही रानभाज्यांची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Rainy Vegetables) ज्या औषधांपेक्षा जालीम आणि गुणकारी आहेत. या भाज्यांचे सेवन केल्यास कोणतेही आजार होत नाहीत. अनेक गंभीर रोगांवर या भाज्यांचे सेवन प्रभावी ठरते. चला तर जाणून घेऊया.

1. गुळवेल

गुळवेल ही भाजी झाडांवर किंवा कुंपणावर वाढते. या भाजीला अमृतवेल किंवा अमृतवल्ली म्हणून सुद्धा ओळखतात. मधुमेह, कावीळ, सर्दी, खोकला, ताप अशा अनेक आजारांवर ही भाजी गुणकारी आहे. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते. (Rainy Vegetables)

2. कंटोळा

कंटोळा ही एक अशी रानभाजी आहे जी डोंगराळ भागात आढळते. याला काही भागात ‘कंटोळी’सुद्धा म्हणतात. ही रानभाजी दिसायला काटेरी आणि आकाराने खूप लहान असते. (Rainy Vegetables) मात्र, या भाजीचे आयुर्वेदिक गुण अनेक समस्यांवर प्रभावीपणे काम करतात. या भाजीचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळते. शिवाय या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी ववरदान ठरते.

3. टाकळा (Rainy Vegetables)

पावसाळ्याच्या दिवसात हमखास बाजारात आढळणारी भाजी म्हणजे टाकळा. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमिनीत उगवते. काहीशी गुळगुळीत अशी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये इसब, अ‍ॅलर्जी, सोरायसिस, खरूज यासारख्या त्वचा विकारांपासून सुटका देणारे घटक आहेत. शिवाय पोटात कृमी होणे, ताप येणे, हृदय विकार, श्वसन मार्गात अडथळा यांवर देखील ही भाजी प्रभावी ठरते.

4. आघाडा

आघाडा ही रानभाजी ओसाड जमिनीवर किंवा जंगलात वाढते. या भाजीची पाने, फळे आणि मुळे अत्यंत गुणकारी असतात. ही भाजी खाल्ल्याने लघवी साफ होते आणि किडनी स्टोनचा धोका टळतो. (Rainy Vegetables) शिवाय वात, हृद्यरोग, मूळव्याध या आजारांवरदेखील ही गुणकारी आहे.

5. काटेमाठ

काटेमाठ ही एक रानभाजी आहे. जी पावसाळ्यात ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला वाढते. बाळंतिणीच्या आहारात ही भाजी असल्यास अंगावर दूध वाढते. तसेच गर्भपात होण्याचा धोका टळतो आणि गर्भाचे नीट पोषण होते. (Rainy Vegetables) याशिवाय पित्त, मूळव्याध, रक्तविकार यावर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते.

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी; नाहीतर, चेहऱ्याची चमक होईल कमी

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) आता राज्यभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेला पाऊस हा कायम दिलासादायक असतो. पण पावसासोबत येणारी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण पावसाळा कितीही आल्हाददायी असला तरीही त्याच्यासोबत अनेक आजार आणि आरोग्यविषयक समस्या हजेरी लावतात.

खासकरून पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. ती कशी घ्यायची? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चिंता करू नका. (Skin Care Tips) कारण आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे पावसाळ्यातही तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदार राहील. चला जाणून घेऊया.

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी
(Skin Care Tips)

चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे

पावसाळ्यात हवामानात झालेला बदल आर्द्रता घेऊन येतो. (Skin Care Tips) ज्यामुळे आपली त्वचा चिकट होते. अशा परिस्थिती आपला चेहरा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावा. म्हणजे चेहऱ्यावर साचलेला तेलकटपणा जाण्यास मदत होते.

सनस्क्रीन लावा

कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पावसाळ्यात देखील त्वचेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.

वाफारा घ्या

पावसाळ्यात किमान २ दिवसांनी एकदा तरी आपल्या चेहऱ्याला वाफ द्या. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होतील. शिवाय पोअर्समध्ये जर मातीचे कण अडकत असतील तर ते काढण्यास देखील मदत होईल.

मेकअप टाळा

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो मेकअप करणे टाळा. कारण या दिवसात हवामानात आर्द्रता जास्त असते. (Skin Care Tips) त्यामुळे चेहऱ्यावर तेल साचते, घाम येतो. अशावेळी तुम्ही केलेला मेकअप तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतो.