Saturday, December 20, 2025
Home Blog Page 685

Thoseghar Waterfall : काय तो नजारा, अहाहा!! साताऱ्यातील ‘हा’ धबधबा करतो निसर्गाशी गुजगोष्टी; तुम्ही पाहिलाय का?

Thoseghar Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Thoseghar Waterfall) पावसाळा सुरु झाला की, आपोआपच मनाला एक वेगळा दिलासा मिळतो. कडक उन्हानंतर अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी एक वेगळाच आनंद घेऊन येतात आणि आपल्याला ताजेतवाने करून जातात. रोजरोजच्या कामातून एखादी सुट्टी काढून अशा वातावरणात फिरायला जावे प्रत्येकाला वाटते. पण शहरात अशी शांतता आणि असा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी एका सुंदर ठिकाणाची माहिती देणार आहोत. जिथे जाऊन तुम्ही निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहू शकाल. ज्याच्या तुम्ही प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही.

पावसाळ्यात अनेक लहान मोठे धबधबे निसर्गशोभा वाढवत असतात. आज आपण ज्या ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत, ते ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा. या धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य इतके अलौकिक आहे की, पाहणारा प्रेमातच पडेल. (Thoseghar Waterfall) त्यात पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य आणखीच खुलून येते आणि आजूबाजूचा परिसर.. त्याबद्दल तर बोलू तितके कमीच. चला तर या सुंदर ठिकाणाविषयी अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे? (Thoseghar Waterfall)

ठोसेघर धबधबा हा राजधानी सातारापासून २६ किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही पुण्याहून इथे येत असाल तर तुम्हाला १४१ किलोमीटर अंतर कापावे लागेल. तसेच मुंबईतून येणार असाल तर २९४ किलोमीटर अंतर कापावे लागेल. एका छोट्याशा गावातील हा धबधबा अत्यंत नयनरम्य आहे. हा धबधबा शांत वातावरण आणि अलौकिक नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत भेट देता येते. खास करून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.

पार्किंग आणि प्रवेश शुल्क किती आहे?

ठोसेघर धबधब्याजवळ तुमच्या चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. ज्यासाठी तुम्हाला ३० रुपये मोजावे लागतात. तर दुचाकीसाठी पार्किंग विनामूल्य आहे. तसेच हा धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला प्रवेश शुल्क म्हणून ५० रुपये भरावे लागतात. गेटमधून आत जाताच धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा एक नकाशा दिसतो. (Thoseghar Waterfall) तो पाहून तुम्ही आसपासचा परिसर फिरू शकता. तसेच प्रवेशावेळी या ठिकाणी बरेच फेरीवाले आणि रेस्टॉरंट दिसतात. जिथे तुम्ही अल्पोपहार घेऊ शकता.

MSHRC Bharti 2024 | महाराष्ट्र मानवाधिकार आयोग अंतर्गत मोठी भरती सुरु, असा करा अर्ज

MSHRC Bharti 2024

MSHRC Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र मानवाधिकार आयोग अंतर्गत एक भरती जाहीर झालेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर या भरतीसाठी अर्ज करा.

या भरती अंतर्गत कक्ष अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक, स्वीय सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी उमेदवाराकडूनअर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहेत. 9 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा .

पदाचे नाव | MSHRC Bharti 2024

या भरती अंतर्गत कक्ष अधिकारी, अधीक्षक सहाय्यक, स्विय सहाय्यक या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत

वयोमर्यादा

या भारती अंतर्गत 65 वर्षे वयोमर्यादा असणे गरजेचे आहे

अर्ज पद्धती

हे अर्ज तुम्हाला ऑफलाइन किंवा ऑनलाईन मेलच्या माध्यमातून भरता येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज सचिव राज्य मानवी हक्क आयोग हजारी मल सोमानी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर मुंबई 400001 या पत्त्यावर पाठवायचे आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख | MSHRC Bharti 2024

9 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्यासोबत दुजाभाव झाला!! मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेनेने केली खदखद व्यक्त

BJP And Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु राज्यात सात जागा जिंकून देखील भाजपने शिंदे गटातील फक्त एका नेत्याकडे राज्यमंत्रीपद दिले आहे. याचीच खदखद शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून बाहेर आली आहे. शिंदेसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barane) शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकत्याच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

माध्यमांशी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले की, “शिवसेना भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. आमचे सात खासदार आहेत. त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी माफक अपेक्षा होती. पण आमची अपेक्षा पूर्ण झाली नाही. भाजप पेक्षा राज्यात शिवसेनेने कामगिरी चांगली केली. भाजपने राज्यात २८ जागा लढवल्या त्यातील फक्त ९ जागा जिंकल्या. आम्ही १५ जागांवर लढलो आणि ७ जागांवर आम्हाला यश मिळालं. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त चांगला आहे”

त्याचबरोबर, “आमच्यासोबत दुजाभाव झाला. इतरांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय देण्यात आला” अशी खदखद श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत पेटलेल्या ठिणगीचा काय परिणाम पाहायला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, भाजपने जागा वाटप करताना मित्र पक्षाचा विचार केला नसल्याचे शिवसेनेला अधिक खटकले आहे, हे आता जाहीरपणे उघड झाले आहे.

Dagdusheth Ganpati Trust : यंदा गणेशोत्सवात ‘दगडूशेठ’ साकारणार चमत्कारिक जटोली शिवमंदिराचा देखावा

Dagdusheth Ganpati Trust

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dagdusheth Ganpati Trust) मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव राज्यभरात चर्चेचा विषय ठरतात. सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून अनेक गणेश मंडळांची बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. यंदा बाप्पाची आरास काय करायची? कोणता देखावा उभा करायचा? यासाठी अनेक गणेश मंडळांच्या बैठकी सुरु झाल्या आहेत. अशातच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने यंदाच्या १३२ व्या गणेशोत्सवाबाबत एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार यंदा दगडूशेठ हिमाचलच्या जटोली शिवमंदिराचा देखावा साकारणार असल्याचे समजत आहे.

जटोली शिवमंदिरात विराजमान होणार दगडूशेठ बाप्पा

यंदा दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा १३२ वा गणेशोत्सव आहे. नुकतीच यंदाच्या उत्सवाबाबत मंडळाची बैठक पार पडली. आता गणेशोत्सवासाठी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळ सज्ज झालं आहे. (Dagdusheth Ganpati Trust) त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी गणेशोत्सवात गणेशभक्तांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती पाहण्याची संधी मिळणार आहे. या मंदिराविषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेऊया.

रहस्यमयी जटोली शिवमंदिर (Dagdusheth Ganpati Trust)

भारतात हिमाचल प्रदेशात स्थित असलेले जटोली शिवमंदिर हे महादेवाला समर्पित आहे. इथल्या मान्यतेनुसार, या मंदिरात स्वतः महादेव येऊन थांबले होते. असं म्हणतात की, या ठिकाणी महादेवाने तपश्चर्या केली होती आणि म्हणून हे मंदिर अनेक रहस्यांनी समृद्ध आहे. असेही म्हटले जाते की, हे जटोली शिवमंदिर बांधण्यासाठी सुमारे ३९ वर्षे लागली होती. त्याकाळी जेव्हा हे मंदिर बांधले गेले तेव्हा वापरण्यात आलेल्या दगडांवर आज ठोकले असते त्यातून डमरूसारखा आवाज येतो. याचा अनेक स्थानिकांना अनुभव आला आहे. काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महादेवाने आपल्या त्रिशूळाचा प्रहार करून येथे जलसाठा निर्माण केला होता. त्यांनी त्रिशूळ जमिनीवर आदळले आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु झाला, असे म्हटले जाते.

कोण साकारणार हा देखावा?

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा २०२४ च्या गणेशोत्सवासाठी हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. (Dagdusheth Ganpati Trust) या मंदिराचे हुबेहूब देखावा तयार करण्याची जबाबदारी कलादिग्दर्शक अमोल विधाते यांच्या खांद्यावर आहे. नुकताच या देखाव्याच्या सजावटीचा पूजन सोहळा देखील पार पडला आहे. त्यामुळे आता यंदाच्या गणेशोत्सवाची सगळ्यांना उत्सुकता वाटू लागली आहे.

Cashew Farming | काजू शेतीतून होईल भरघोस उत्पन्न; अशाप्रकारे करा लागवड

Cashew Farming

Cashew Farming | आजकाल शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला लागलेले आहेत. पारंपरिक शेतीचा वापर सोडून आता आधुनिक पद्धतीने शेतकरी शेतात लागवड करायला लागलेले आहेत. नगदी पिकांवर देखील शेतकरी भर देत आहेत. आता तुम्ही देखील एक आधुनिक पद्धतीने शेती करून एक व्यवसाय करण्याचा विचार करत असाल? तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका शेतीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता. ती शेती म्हणजे काजूची शेती. तुम्ही काजूची शेती करून खूप चांगला नफा मिळवू शकता. आता या काजूच्या शेतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

काजूची लागवड कशी करावी? | Cashew Farming

काजू हे ड्रायफ्रूट म्हणून खूप लोकप्रिय मानले जाते. काजूच्या झाडाची उंची 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याची झाडे 3 वर्षात फळ देण्यास तयार होतात. काजूशिवाय त्याची सालेही वापरली जातात. सालेपासून पेंट आणि स्नेहक तयार केले जातात. त्यामुळे त्याची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते. काजूचे रोप उष्ण तापमानात चांगले वाढते. त्याच्या लागवडीसाठी योग्य तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. शिवाय, ते कोणत्याही प्रकारच्या मातीवर वाढू शकते. तरीही यासाठी लाल वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते.

काजूची लागवड कुठे केली जाते?

एकूण काजू उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन भारतात येते. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याची लागवड योग्य प्रमाणात केली जाते. मात्र, आता झारखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही त्याची लागवड केली जात आहे.

काजूपासून किती कमाई होईल? | Cashew Farming

एकदा काजूची लागवड केली की त्याला अनेक वर्षे फळे येतात. रोपे लावताना खर्च येतो. एक हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे लावता येतात. तज्ज्ञांच्या मते एका झाडापासून २० किलो काजू मिळू शकतात. एका हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन मिळते. यानंतर प्रक्रियेसाठी खर्च येतो. बाजारात काजू 1200 रुपये किलोने विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात झाडे लावलीत तर तुम्ही लखपतीच नव्हे तर करोडपतीही व्हाल.

स्वतःला यशवंतराव चव्हाणांचा वारसदार म्हणवणारे…; तटकरेंची पवारांवर सडकून टीका

SUNIL TATKARE SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणाऱ्या काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुंबईत वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना सुनील तटकरे यानी अनेक विषयांवरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला.

आपल्या भाषणात सुनील तटकरे म्हणाले, भुजबळ यांना जर मुख्यमंत्री केलं असत तर पक्ष फुटला असता असं सांगितल गेलं. ⁠नेतृत्वाने ही भुमिका घेतली होती. ⁠सर्वात जास्त मत त्यावेळी भुजबळ यांना पडली होती. आम्हाला त्यावेळी मुख्यमंत्रिपद घ्यायचं नव्हतं, मात्र प्रफुल भाई तुम्हाला ही घ्यायचं नव्हतं असा समज होता. दादा तुम्ही राज्यमंत्री असताना तुमची माझी भेट झाली. त्यावेळी मला जाणवल की वेगळं रसायण आहे. पवार साहेब ही 72 व्या वर्षी केंद्रात मंत्री झाले. त्यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी आली होती ती जर घेतली असती तर पक्षाला मागे वळून बघायची गरज वाटली नसती. तुम्हाला 7 वर्षांचा तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांनाही 7 वर्षांचा अनुभव असताना त्यांना मुख्यमंत्रिपद का नाकारलं? असा सवाल तटकरे यांनी केला.

तटकरे पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं शल्य जरूर आहे की, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचे वारसदार आम्हीच आहोत, असा दिंडोरा पिटणाऱ्या काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांमधून अजित पवारांबाबत क्लेषकारक विधान केली गेली. टीका टिप्पणी व्हावी ती धोरणांवर व्हावी, पण अरेतुरे करत होऊ नये, असं म्हणत तटकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. तसेच लोकसभेतील पराभव हा एकट्या अजित पवारांचा पराभव नाही तर राष्ट्रवादीच्या सर्वांचाच पराभव आहे असेही तटकरे यांनी म्हंटल.

या बँकांनी आणली आहे विशेष FD योजना; गुंतवणूक केल्यास 300 दिवसात व्हाल मालामाल

FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IDBI बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या सुविधा ऑफर करत असते. आता याच बँकेने आपल्या ग्राहकांसाठी FD योजना ऑफर केली आहे. ज्यामध्ये अल्पकाळामध्ये तब्बल 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. IDBI बँकेची ही ऑफर 30 जून 2024 पर्यंत त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू असणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करायची आहे त्यांनी त्वरित बँकेची संपर्क साधावा.

IDBI बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा कालावधी 300 दिवसांचा आहे. 300 दिवसांच्या या विशेष FD योजनेवर ग्राहकांना 7.05 टक्के व्याज तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज दिले जात आहे. यासह 444 दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर बँक सामान्य ग्राहकांना 7.20 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.70 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे. या योजनेची अंतिम मुदत 30 जून 2024 रोजी संपत आहे. परंतु तुम्हाला जर मुदत पूर्व पैसे काढायचे असतील तर त्यासाठी दंड भरावा लागेल.

महत्वाचे म्हणजे IDBI बँकेसह इंडियन बँकेनेही आपल्या ग्राहकांसाठी 300 आणि 400 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहकांना 7.05 टक्के व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर दिले जात आहे. यासह 400 दिवसांच्या विशेष FD योजनेवर बँक सामान्य ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के, 7.75 टक्के आणि 8 टक्के व्याज देत आहे. या योजनेची ही अंतिम मुदत 30 जून आहे.

दरम्यान, पंजाब आणि सिंध बँकेने देखील 222 दिवस, 333 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष एफडी योजना आणली आहेत. या बँक ग्राहकांना 222 दिवसांच्या FD योजनेवर 7.05 टक्के व्याजदर, 333 दिवसांच्या FD योजनेवर 7.10 टक्के व्याजदर आणि 444 दिवसांच्या विशेष FD योजनेवर 7.25 टक्के व्याजदर देत आहे.

Tata Mutual Fund : TATA है तो मुमकिन है!! प्रतिमहिना 5 हजाराची SIP देणार कोट्यवधींचे रिटर्न्स; काय आहे योजना?

Tata Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Mutual Fund) जर तुम्हीही परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर, टाटा मिडकॅप ग्रोथ फंडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला हवे. गेल्या ३० वर्षांपासून ही मिडकॅप योजना सुरु आहे. जी अल्पबचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. या योजनेतील SIP रिटर्न्सविषयी ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल. यातील परताव्याची आकडेवारी पाहिली असता समजते की, या योजनेतील गुंतवणूकदारांना वार्षिक १७.६५% रिटर्न्स मिळाले आहेत. अर्थ तज्ञांचा सल्ला ऐकला तर दीर्घकालीन गुंतवणुक कधीही फायदेशीर ठरते. त्यात आपण SIP बद्दल बोलायचं म्हटलं तर, या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. काय मग? तुम्हीही टाटा मिडकॅपच्या SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय का? तर चला याविषयी जाणून घेऊया

Tata मिडकॅप ग्रोथ फंड (Tata Mutual Fund)

गेल्या ३० वर्षांपासून सुरु असलेल्या टाटा मिडकॅप ग्रोथ फंडाविषयी बऱ्याच लोकांना माहिती असेल. पण सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्या सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी जाणून घ्यायला हवी. याबद्दल बोलायचे झाले तर, या योजनेने २९ वर्षात SIP करणाऱ्यांना वार्षिक स्वरूपात एकूण १७.६५% रिटर्न दिल्याचे समजते. त्यानुसार, या योजनेत ज्यांनी प्रतिमहिना केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे त्यांनी २९ वर्षांत ५,२२,२५,७६१ रुपये अर्थात ५.२२ कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.

याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे. ज्याचा कालावधी २९ वर्षांचा आहे. (Tata Mutual Fund) या व्यक्तीने २९ वर्षांत एकूण १८, ४०, ००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न १७.६५% इतके मिळणार आहेत. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटीदरम्यान म्हणजे २९ वर्षानंतर त्याच्याकडे ५,२२,२५,७६१ रुपये निधी तयार झालेला असेल. या फंडातून तुम्हाला १ वर्षात ४३.१४%, ३ वर्षांत २२.३४%, ५ वर्षांत २२.२८%, ७ वर्षांत १७.२५% आणि १० वर्षांत १८.६९% रिटर्न्स मिळू शकतात.

सुंदरम मिड कॅप फंड

सुंदरम मिडकॅप फंडाबद्दल सांगायचे तर यात सर्वाधिक उपलब्ध परताव्याची आकडेवारी आधी जाणून घेऊया. या योजनेतून २१ वर्षांच्या कालावधीचा SIP असणाऱ्यांना २१% वार्षिक परतावा दिला आहे. (Tata Mutual Fund) या योजनेत ज्यांनी प्रतिमहिना ५ हजार रुपयांची SIP केली आहे, त्यांनी २१ वर्षांत २,२५,५१,६५७ रुपये अर्थात २.२५ कोटी रुपयांचा निधी तयार केला आहे.

याचे कॅल्क्युलेशन समजून घेऊया. समजा एखाद्याने मासिक स्वरूपात केवळ ५ हजार रुपयांची SIP केली आहे. ज्याचा कालावधी २१ वर्षांचा आहे. या व्यक्तीने २१ वर्षात एकूण १३, ६०, ००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. ज्यावर त्याला वार्षिक रिटर्न २१.०३% इतके मिळणार आहेत. त्यानुसार योजनेच्या मॅच्युरिटीदम्यान म्हणजे २१ वर्षांनंतर त्याच्याकडे २,२५,५१,६५७ रुपये निधी तयार झालेला असेल. (Tata Mutual Fund) या फंडातून तुम्हाला १ वर्षात ४५.३३%, ३ वर्षांत २२.८८%, ५ वर्षांत १९.२५%, ७ वर्षांत १३.५४% आणि १० वर्षांत १६.९२% रिटर्न्स मिळू शकतात.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतवा, केवळ व्याजातून कमवा 4,50,000 रुपये

Post Office Scheme

Post Office Scheme | अनेक लोक हे भविष्यासाठी काही नवीन गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु गुंतवणूक करताना आपले पैसे सुरक्षित आहेत का आणि त्यातून किती परतावा मिळेल? या सगळ्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन स्कीम उपलब्ध आहेत. परंतु पोस्ट ऑफिस ही एक विश्वासहार्य योजना आहे. यातील अनेक योजनेचा फायदा नागरिकांनी घेतलेला आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या पाच वर्षासाठी आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक देखील गुंतवणूक करत असतात. यातील पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करून सुमारे 4. 50 हजार रुपये केवळ व्याज मिळू शकता.

सरकारने देशातील सर्व घटकांसाठी ही योजना (Post Office Scheme) राबवली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ होईल यादृष्टीने या योजना आहेत. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही एक छोटी बचत योजना आहे. या योजनेमध्ये नागरिक पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याज मिळते. त्याचप्रमाणे कलम 80c अंतर्गत 1. 50 लाख रुपयांपर्यंत कर सूट देखील मिळते.

सरकारच्या या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये संपूर्ण पैसे एकाच वेळी जमा करावे लागतात. व्याज वेळोवेळी जोडले जाते. याला पोस्ट ऑफिस एफडी योजना असे देखील म्हणतात ही टाईम डिपॉझिट योजना चार वेगवेगळ्या प्रकारच्या कालावधीसाठी व्याज देते. आता या योजनेची आपण माहिती जाणून घेऊया.

कोणत्या कालावधीवर किती व्याज दिले जाईल? | Post Office Scheme

  • 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.9% दराने व्याज उपलब्ध आहे.
  • 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.0% दराने व्याज उपलब्ध आहे.
  • 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7.1% दराने व्याज उपलब्ध आहे.
  • 5 वर्षांसाठी 7.5% व्याज उपलब्ध आहे.

एक किंवा तीन लोक खाते उघडू शकतात

पोस्ट ऑफिस TD अंतर्गत, 3 लोक एकट्याने किंवा संयुक्तपणे खाते उघडू शकतात. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. गुंतवलेल्या कमाल रकमेवर मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत, आयकर कलम 80C अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट दिली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही सहा महिन्यांपूर्वी पैसे काढू शकत नाही.

व्याजातून 4.5 लाख रुपये मिळतील

या योजनेंतर्गत तुम्ही दररोज 2,778 रुपये वाचवल्यास आणि एका वर्षानंतर किमान 10 लाख रुपये एकत्र गुंतवल्यास, तुम्हाला 5 वर्षांमध्ये केवळ व्याजातून 4,49,948 रुपये मिळतील. पाच वर्षांत एकूण रक्कम 14,49,948 रुपये असेल.

MPSC Recruitment 2024 | MPSC अंतर्गत या पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

MPSC Recruitment 2024

MPSC Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहे. ज्यातून तुम्हाला चांगलाच फायदा होईल. ती म्हणजे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत संचालक संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट अ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 26 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. 27 मे 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे 10 जून 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या आज अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

महत्वाची माहिती | MPSC Recruitment 2024

  • पदाचे नाव – संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ
  • पदसंख्या – 26 जागा
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 मे 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली सविस्तर माहिती भरून आवश्यक असलेली कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे नीट वाचा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा