Saturday, December 20, 2025
Home Blog Page 687

Gold Price Today : सोने झाले स्वस्त, तर चांदी महागली; आजचे दर पहाच

Gold Price Today 10 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बाजारच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. खुप दिवसांनी सोनं स्वस्त झाल्याने खरेदीदार ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 70790 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.73% म्हणजेच 518 रुपयांची घट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र महाग झाली आहे. MCX वर १ किलो चांदी 89413 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा भाव 313 रुपयांनी वाढला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७१०२० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती खाली गेल्याचे पाहायला मिळाली. ९ वाजून २१ मिनिटांनी सोन्याचा दर ७०८२० रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतर हि किंमत (Gold Price Today) आणखी कमी कमी होत गेली. ११ वाजता सोन्याचा भाव ७०७१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता, यानंतर या किमतीत थोडी वाढ झाली असून सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 70790 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७१६३० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६५७०० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 65,700 रुपये
मुंबई – 65,700 रुपये
नागपूर – 65,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 71,670 रूपये
मुंबई – 71,670 रूपये
नागपूर – 71,670 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Cooking Tips : वर्किंग वुमन्ससाठी 100% फायदेशीर ठरतील ‘या’ स्मार्ट कुकिंग टिप्स; लगेच जाणून घ्या

Cooking Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cooking Tips) प्रत्येक स्त्री आपलं घर अत्यंत प्रेमाने, काळजीने आणि जबाबदारीने सांभाळत असते. आपलं घर सुंदर, नीटनेटकं असावं म्हणून ती कायम धडपडत असते. तसेच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती पोटभर खाऊन समाधानाने निजावं यासाठी तिची कायम धडपड सुरु असते. जसजसं जग आधुनिक होत गेलं. तसतशा स्त्रिया सुद्धा आधुनिकतेकडे आणि प्रगतीकडे वाटचाल करू लागल्या आहेत. त्यामुळे आजची स्त्री फक्त घर सांभाळत नाही तर बाहेर कामालासुद्धा जाते. असं असूनही ती घर आणि ऑफिस दोन्ही अत्यंत लीलया सांभाळते. अशा सगळ्या स्मार्ट गृहिणींसाठी आजची ही खास बातमी.

घर आणि नोकरी सांभाळताना प्रत्येक बाईची होणारी कसरत ही वेगवेगळी असते. दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना तिचा दिवस कधी सुरु झाला आणि कधी संपला तिलाच कळत नाही. (Cooking Tips) रोजच्या गडबडीत किचन सांभाळताना मात्र तिची मोठी दमछाक होते. घाईघाईत कितीतरी गोष्टी उलट सुलट होतात आणि असं तुमच्याही बाबतीत घडत असेल तर चिंता सोडा. कुटुंबियांसाठी स्वयंपाक करत असताना महिलांना बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि म्हणूनच आजच्या या जबरदस्त कुकिंग टिप्स प्रत्येक वर्किंग वुमनसाठी फायदेशीर ठरणार आहेत. चला लगेच जाणून घेऊया.

1. आठवड्याभराचे मिल प्लॅन करा (Cooking Tips)

आठवडाभर तुम्ही जेवणात काय बनवणार आहात? याचा एक चार्ट बनवून किचनमध्ये लावा. त्यानुसार एकदाच आठवड्याच्या भाज्यांची खरेदी आणि आवश्यक पदार्थ घेऊन या. ते फ्रिजमध्ये स्टोअर करा. विकेंडला १ – २ तास या कामासाठी दिल्याने तुमचा आठवड्याभरात बराच वेळ वाचतो.

2. भाज्या कापून सोलून फ्रिजमध्ये स्टोअर करा

सकाळी गडबडीत भाज्या कापणे किंवा सोलणे यामध्ये बराच वेळ जातो. (Cooking Tips) त्यामुळे दुसऱ्या दिवशी बनवायची भाजी आदल्या दिवशी रात्रीच स्वच्छ करून फ्रिजमध्ये स्टोअर करा. असे केल्यास सकाळी तुमचा बराच वेळ वाचेल.

3. लसूण- हिरव्या मिरचीची पेस्ट टिकवण्याचा फंडा

बरेच लोक जेवणात लसूण आणि हिरव्या मिरचीचा वापर करतात. (Cooking Tips) त्यामुळे अशा लोकांसाठी लसूण आणि हिरव्या मिरचीची घरगुती पेस्ट फायदेशीर ठरते. ही पेस्ट तुम्हाला जास्त काळ टिकवून ठेवायची असेल तर यामध्ये १ चमचा गरम तेल आणि मीठ मिक्स करून ठेवा. म्हणजे आठवड्याभराची चिंता मिटली म्हणून समजा.

4. मसाले, ग्रेव्ही बनवून ठेवा

रोज सकाळी जेवण बनवताना मसाले किंवा ग्रेव्ही बनवण्यात बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आधीच मसाले किंवा ग्रेव्ही बनवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा. असे मसाले आणि ग्रेव्ही जास्तीत जास्त २ ते ३ दिवस वापरता येतात.

5. फोडणीवेळी कांदा- टोमॅटोत मीठ घाला

गडबडीचा वेळेत कांदा टोमॅटो पटापट शिवायची एक सोप्पी ट्रिक आहे. (Cooking Tips) फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेताना त्यात चिमूटभर मीठ घाला यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यास मदत होईल.

6. बेसन वापरून ग्रेव्ही करा घट्ट

जर तुम्ही ग्रेव्हीची भाजी करत असाल आणि तुम्हाला ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर बराच वेळ आटवत बसायची गरज नाही. त्याऐवही भाजलेले बेसन वापरा किंवा पिठीसाखर घाला. यामुळे ग्रेव्हीची चवसुद्धा वाढेल आणि ग्रेव्ही लवकर घट्ट होईल.

7. टोमॅटो नसेल तर बाजारात जायची गरज नाही

बऱ्याचदा एखादी भाजी किंवा डाळ बनवताना आपल्या लक्षात येते की, घरातले टोमॅटो संपले आहेत. आता सकाळी घाईच्या एली टोमॅटो आणायला गेलात तर हमखास जादा वेळ जाईल. (Cooking Tips) त्यामुळे टोमॅटोची कमतरता भरून काढण्यासाठी टोमॅटो केचअप किंवा सॉसचा वापर करा.

8. डाळ बनवण्याआधी तासभर भिजत ठेवा

सकाळ सकाळ डाळ शिजवण्यासाठी तासभर असाच मोडतो. (Cooking Tips) हा वेळ कमी करायचा असेल तर डाळ शिजायला घालण्यापूर्वी स्वच्छ धुवून तासभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळ शिजायला फार वेळ लागत नाही. अगदी १० ते १५ मिनिटांत डाळ शिजेल.

9. कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजवा

कडधान्ये शिजायला बराच वेळ घेतात. त्यामुळे सकाळी घाईच्या वेळी एकतर कडधान्याची भाजी बनवणे टाळा आणि बनवायची असेलच तर कडधान्ये रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे सकाळी कडधान्ये शिजायला फार वेळ घेणार नाहीत. खूपच घाई असेल तर कुकरच्या सहाय्याने कडधान्ये शिजवा. म्हणजे यामध्ये तुमचा फार वेळ जाणार नाही.

10. मीठ जास्त झाले तर..

बऱ्याचदा घाईघाईत आपल्याकडून पदार्थात जादा मीठ पडू शकते. जर असे झालेच तर घाबरून जाऊ नका. (Cooking Tips) त्यापेक्षा मीठ पडलेल्या पदार्थात थोडेसे दही, नारळाची पेस्ट, बटाट्याचे तुकडे किंवा ब्रेड घाला. हे पदार्थ तुमच्या पदार्थातील मीठ शोषून घेतात आणि त्यामुळे तुमच्या पदार्थातील खारटपणा दूर होतो.

PM kissan Sanman Nidhi Yojana | तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच मोदींचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार 20 हजार कोटी

PM kissan Sanman Nidhi Yojana

PM kissan Sanman Nidhi Yojana | यावर्षी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. सलग तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घटली आहे. मोदींनी या आधी देखील सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. अशातच पंतप्रधान पदाची शपथ घेताच मोदींनी मिशन सन्मान निधीचा हप्ता जारी करण्याबाबत स्वाक्षरी केली आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीएम सन्मान निधीचा १७ वा हप्ता जमा होणार आहे. याचा फायदा 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार असून अंदाजे 20 हजार कोटी रुपये वितरित केले जातील.

काय म्हणाले पीएम मोदी? | PM kissan Sanman Nidhi Yojana

याफाइलवर सही केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, “मी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यावर सतत काम करत आहे आणि भविष्यातही ते करत राहील.” पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जातात.

शिंदे- दादा गटाचे 40 आमदार महाविकास आघाडीत येणार; राज्यात पुन्हा एकदा भूकंप??

eknath shinde ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटातील ४० आमदार हे लवकरच महाविकास आघाडीत येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वारे आहे ते त्यांना समजलय असेही वडेट्टीवार यांनी म्हंटल आहे. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुनः एकदा भूकंप तर पाहायला मिळणार नाही ना? अशा चर्चा सुरु आहेत. प्रसारमाध्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. मात्र अजित पवार आणि शिंदे गटातील ४० आमदार हे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यातील अनेकांनी संपर्क साधत असल्याची माहिती आहे, चर्चा जोरात आहे कारण महाराष्ट्रातील राजकीय वार हे महाविकास आघडीच्या बाजूने उभं आहे असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर सुद्धा घणाघात केला.

दरम्यान, मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो.अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही,जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे . भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Heavy Rainfall : .. अन् पहिल्याच पावसात मुंबई झाली जलमय; दादर- हिंदमाता परिसरातील व्हिडीओ व्हायरल

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Heavy Rainfall) गेल्या अनेक दिवसांपासून गरमीने हैराण झालेला मुंबईकर चातकासारखा पावसाची वाट बघत होता. अखेर काल पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचं आगमन तर झालं, पण हे आगमन इतकं दणक्यात झालं की, सगळीकडे पाणीच पाणीच अशी परिस्थिती पहायला मिळाली. पहिल्याच पावसाने मुंबईला असं काही झोडपून काढलंय की, लालबाग- परळ, दादर- हिंदमाता परिसरात पाणी साचलं. त्यामुळे पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई झालेली पहायला मिळाली. दरम्यान, या दृश्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहुयात.

मुंबई झाली तुंबई (Heavy Rainfall)

रविवारी संध्याकाळी मुंबईत धुवाँधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक सखल भागात नद्या तयार झालेल्या दिसल्या. संध्याकाळ आणि मध्यरात्र गाजवल्यानंतर पावसाने क्षणभर विश्रांती घेतली असली तरीही मुंबईतील बऱ्याच भागात साचलेले पाणी अद्याप ओसरलेले नाही. ज्यामध्ये लालबाग- परळ, दादर- हिंदमाता परिसराचा समावेश आहे. या भागांमध्ये पाणी साचल्यामुळे बऱ्याच गाड्या बंद पडल्या, झाडं कोसळली तर गुडघ्याच्या वर पाणी साचल्यामुळे मुंबईकरांच्या जीवाचे नुसते हाल हाल झाले. जे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

दादर- हिंदमाता परिसरात जलमय परिस्थिती

दादरमधील हिंदमाता परिसरात प्रत्येक पावसात पाणी साचत हे प्रत्येक मुंबईकर जाणतो. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही पावसाच्या पहिल्याच सरीत दादरच्या हिंदमाता परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. सोशल मीडियावर हिंदमाता परिसरातील काही दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

(Heavy Rainfall) हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर dadarmumbaikar नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘हिंदमाता भरलं म्हणजे पाऊस मोक्कार पडतोय असं गृहीतच धरावे लागते ..’.

पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच राहणार

मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर पुढच्या काही दिवसात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. रविवारनंतर आज सोमवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rainfall) हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. पुण्यात तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने कहर केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Jayant Patil : लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील; सांगलीत झळकले खास बॅनर्स

jayant patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने चांगलीच बाजी मारली. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने एकूण १० जागा लढवल्या होत्या, यातील ८ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवली आणि विरोधकांना धोबीपछाड दिला. शरदचंद्र पवार गटाच्या या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील… त्याच निमित्त सांगलीत जयंत पाटील यांच्यासाठी खास बॅनरबाजी करण्यात आली आहे. लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील (Jayant Patil Banner) असा उल्लेख या बॅनर वर पाहायला मिळत आहे.

लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवत 8 खासदार निवडून आणले. त्यामुळे पक्षाचा स्ट्राईक रेट हा 80 टक्के आहे असा उल्लेख सदर बॅनर वर करण्यात आला आहे. तसेच,नवनिर्वाचित खासदारांच्या हार्दिक अभिनंदन… लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील असं म्हणण्यात आलंय. या बॅनरवर जयंत पाटील यांचा भलामोठा फोटो … त्याच्यावर शरद पवारांचा फोटो आणि खाली सर्व नवनिर्वाचित खासदारांचे फोटो झळकत आहेत. सांगली शहरात ठिकठिकाणी असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. नाद घुमला आभाळी वाजली तुतारी,जनसामान्यांच्या मनात गाजली तुतारी… असं म्हणत विरोधकांना टोलाही लगावण्यात आलाय.

शरद पवारांचे एकनिष्ठ जयंत पाटील –

जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय मोठं आणि वजनदार नाव .. स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव .. अतिशय हुशार, उच्चशिक्षित, विद्वान अशी त्यांची ओळख … राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते स्थापनेपासून जयंत पाटील शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जाते. मागच्या वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत शरद पवारांना धक्का दिला. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी शरद पवारांची साथ सोडली. मात्र जयंत पाटील खंबीरपणे शरद पवारांसोबत उभे राहिले. फक्तच उभेच राहिले नाहीत तर पुन्हा एकदा पक्षाची बांधणी केली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर पुन्हा एकदा फळी त्यांनी उभी केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पक्षासाठी कोणत्या जागा मागायच्या इथपासून ते कशा जिकवून आणायच्या हि सगळी आखणी जयंत पाटलांनी अतिशय योग्यपणे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १० पैकी ८ जागा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.

1-2 खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट, तर 7 खासदार असूनही शिंदेंची एका राज्यमंत्रिपदावर बोळवण

eknath shinde modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीतील बहुमताच्या जोरावर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणीत NDA सरकारची सत्ता आली आहे. काल नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातून सुद्धा ६ खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे य खासदारांची ताकद असूनही शिंदे गटाच्या वाट्याला केवळ एक मंत्रिपद आलं आहे.. ते सुद्धा कॅबिनेट नव्हे तर राज्यमंत्रीपद …. एकीकडे देशातील इतर प्रादेशिक पक्षांना १-२ खासदार असूनही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय तर दुसरीकडे शिंदे गटाची मात्र राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाला २ कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली. एवढच नव्हे तर एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय . अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रिपद देऊन भाजपने शिंदेंचे पंख छाटले का असा प्रश्न निर्माण झालाय. शिंदे गटाचे तर सोडाच, अजित दादा गटाला तर कोणतेच मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय केल्याची भावना जनसामान्यात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ २४५ जागा मिळाल्या असल्याने मित्रपक्षाचे महत्व वाढलेलं आहे. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पार्टी यांच्यासह इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच मोदींना सरकार चालवावं लागणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंकडे ७ खासदार असल्याने मोदींना शिंदेंची गरज सुद्धा जास्त आहे. असं असूनही एकनाथ शिंदेंना केवल १ राज्यमंत्रीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याच एकनाथ शिंदेनी महाविकास आघाडी सरकारमधून बंड केल्यानेच महाराष्ट्रात भाजपला सत्तेची चव चाखता आली याचा कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विसर पडल्याचे दिसत आहे. भाजपाने अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मित्रपक्षांवर अन्याय केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

IND Vs PAK : ‘ती’ विकेट ठरली टर्निंग पॉईंट; बुमराहने मॅच कुठे फिरवली?

IND vs PAK (1)

T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत बाप बाप होता है आणि बेटा बेटा होता है हे दाखवून दिले. पाकिस्तानच्या तोंडातला घास हिरावून भारताने अंतिम क्षणी बाजी मारली. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे बूम बूम बुमराह (Jasprit Bumrah) ….. अगदी मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण विकेट घेऊन बुमराने भारतीय संघाला सामन्यात जिवंत ठेवलं आणि रोमहर्षक विजयाचा तो मानकरी ठरला.

ती विकेट ठरली टर्निंग पॉईंट-

अवघ्या १२० धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी जोडगोळीने न्यूयॉर्कच्या खडतर खेळपट्टी वर सावध फलंदाजी केली. लक्ष्य मोठं नसल्याने आणि फलंदाजी करणं सोप्प नसल्याने पाकिस्तानची बॅटिंग निवांत चालली होती. संघाचा स्कोर २६ असताना बाबर आझम माघारी परतला. त्यानंतर संघाची धावसंख्या ५७ असताना उस्मान खान बाद झाला. एकवेळ पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत 48 धावांची गरज होती, आठ विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान आणि फखर झंमन हे अनुभवी फलंगदाज मैदानात होते. हार्दिक पांड्याने 13 व्या षटकात फखर झंमन याचा अडथळा दूर केला. त्यानंतर 15 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराह यानं मोहम्मद रिजवान याचा त्रिफाळा उडवला. रिजवानची हीच विकेट भारताच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरली.

रिझवानच्या विकेटनंतर पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला. शादाब खान, इफ्तिखार अहमद आणि इमाद वासीम यांच्यात फलंदाचीजी चांगली क्षमता असूनही भारताच्या खडूस बॉलिंग समोर ते पुरते निष्प्रभ ठरले. शादाब खानने ५, इफ्तिखार अहमद ०आणि इमाद वासीमने १५ धावा केल्या. परंतु यादरम्यान अनेक निर्धाव चेंडू गेले. परिणाणी अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजायासाठी 17 धावांची गरज होती. अर्शदीप सिंहने 11 धावा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केेल.

Ujani Dam Water Level | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पावसाच्या सुरुवातीलाच उजनी धरणात 1 TMC पाण्याची वाढ

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level | मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे. आणि विविध ठिकाणी जोरदार पाऊस सध्या चालू झालेला आहे. काही ठिकाणी एवढा जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे की, त्यांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. त्याचप्रमाणे आता या पावसामुळे नदी, नाले आणि धरणाच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झालेली दिसत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि धरणाने निकोंची पातळी गाठलेली आहे.

धरणात जवळपास 1 टीएमसी पाण्याची वाढ | Ujani Dam Water Level

यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे उजनी धरण हे 44 वर्षांनी नीकोंची चांगली पातळीवर गेले होते. एका बाजूला शेतकऱ्यांमध्ये पावसाबाबत चिंता होती. तर गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसामुळे धरणात जवळपास एक टीएमसी पाण्याची पातळीत वाढ झालेली आह. उजनीने यावर्षी सर्वात नीचांकी म्हणजेच – 59.99 टक्के पाण्याची पातळी गाठल्याने प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते. यातच आता निकोंची पातळीमुळे उजनी वरील सर्व योजना जवळपास बंद पडल्या होत्या. परंतु आता मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन आले आणि पाण्याची पातळी देखील वाढलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या पाण्याच्या पातळीत घट होत असली, तरी गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाण्याची बातमी स्थिर आहे. उजनी धरणात पाणी जमा होणे देखील सुरुवात झालेली आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणात एक टीएमसी एवढे पाणी निर्माण झालेले आहे. यावर्षी समाधानकारक पावसाचे अंदाज हवामान खात्याकडून आल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळालेला आहे. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई सुरू होती परंतु आता झालेल्या पावसामुळे प्रशासनावरील ताण देखील कमी.

उजनी धरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे धरण आहे. कारण या धरणाच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील क्षेत्र बागायती आहे. मागील वर्षी हे धरण केवळ 64 टक्के भरले होते. परंतु उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते. त्यावेळी या धरणातील पाणीपुरवठा संपला होता.

Skin Care : दिवसभर AC मध्ये बसल्याने सुरकुतला चेहरा? ‘अशी’ घ्या काळजी आणि मिळवा मुलायम त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे सुरकुत्यांचे प्रमाण वाढते. जर तुम्हीही दिवसभर एसीमध्ये बसत असाल तर ही बातमी स्किप करू नका. कारण एसीचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी? याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला लगेच जाणून घेऊया.

टोनरची मदत घ्या (Skin Care)

जर तुम्ही एसीमध्ये बसून तासन् तास काम करत असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एसीच्या हवेने तुमची त्वचा कोरडी पडू लागते आणि यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. परिणामी आपली त्वचा कोरडी आणि रखरखीत लागते. शिवाय सुरकुत्यांचे प्रमाण वाढून अकाली वृद्धत्व येते. अशावेळी तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनरची मदत घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या टोनरचा वापर करा. म्हणजे तुमची त्वचा निस्तेज होणार नाही.

हायड्रेटिंग मिस्ट

जर तुम्हाला एसीमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळायचे असेल तर हायड्रेटिंग मिस्टचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. मुख्य म्हणजे, यासाठी खर्चात पडायची गरज नाही. घरच्या घरी हा हायड्रेटिंग फेस मिस्ट बनवा. यासाठी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, ग्लिसरीन आणि पाण्याचा वापर करा. (Skin Care) गुलाबाच्या पाकळ्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि ही बॉटल एक तृतीयांश भरेल इतके ग्लिसरीन घ्या. उरलेली बॉटल पाण्याने भरा आणि हे मिश्रण नीट ढवळून घ्या. दिवसातून ३ – ४ वेळा हे फेस मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.

रोझ ग्लिसरीन फेस मिस्टमूळे होईल ‘असा’ फायदा

ग्लिसरीनमध्ये त्वचेत ओलावा टिकवून ठेवतील असे बरेच घटक असतात. (Skin Care) त्यामुळे त्वचा मुलायम आणि तेजस्वी होण्यास मदत मिळते. तर गुलाबाच्या पाकळ्या आपल्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित करतात आणि छिद्र घट्ट करण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि आपल्या चेहऱ्याचा आकार बिघडत नाही.