Saturday, December 20, 2025
Home Blog Page 688

Skin Care : दिवसभर AC मध्ये बसल्याने सुरकुतला चेहरा? ‘अशी’ घ्या काळजी आणि मिळवा मुलायम त्वचा

Skin Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे सुरकुत्यांचे प्रमाण वाढते. जर तुम्हीही दिवसभर एसीमध्ये बसत असाल तर ही बातमी स्किप करू नका. कारण एसीचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी? याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला लगेच जाणून घेऊया.

टोनरची मदत घ्या (Skin Care)

जर तुम्ही एसीमध्ये बसून तासन् तास काम करत असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एसीच्या हवेने तुमची त्वचा कोरडी पडू लागते आणि यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. परिणामी आपली त्वचा कोरडी आणि रखरखीत लागते. शिवाय सुरकुत्यांचे प्रमाण वाढून अकाली वृद्धत्व येते. अशावेळी तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनरची मदत घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या टोनरचा वापर करा. म्हणजे तुमची त्वचा निस्तेज होणार नाही.

हायड्रेटिंग मिस्ट

जर तुम्हाला एसीमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळायचे असेल तर हायड्रेटिंग मिस्टचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. मुख्य म्हणजे, यासाठी खर्चात पडायची गरज नाही. घरच्या घरी हा हायड्रेटिंग फेस मिस्ट बनवा. यासाठी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, ग्लिसरीन आणि पाण्याचा वापर करा. (Skin Care) गुलाबाच्या पाकळ्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि ही बॉटल एक तृतीयांश भरेल इतके ग्लिसरीन घ्या. उरलेली बॉटल पाण्याने भरा आणि हे मिश्रण नीट ढवळून घ्या. दिवसातून ३ – ४ वेळा हे फेस मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.

रोझ ग्लिसरीन फेस मिस्टमूळे होईल ‘असा’ फायदा

ग्लिसरीनमध्ये त्वचेत ओलावा टिकवून ठेवतील असे बरेच घटक असतात. (Skin Care) त्यामुळे त्वचा मुलायम आणि तेजस्वी होण्यास मदत मिळते. तर गुलाबाच्या पाकळ्या आपल्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित करतात आणि छिद्र घट्ट करण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि आपल्या चेहऱ्याचा आकार बिघडत नाही.

Natural Fertilizer At Home | केळीच्या सालीपासून बनवा घरगुती नैसर्गिक खत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Natural Fertilizer At Home

Natural Fertilizer At Home | कडाक्याच्या उन्हामुळे मानवाबरोबरच प्राणी आणि वनस्पतींचेही मोठे नुकसान होत असते. जास्त उष्णतेमुळे केवळ माणूस आणि प्राणीच आजारी पडत आहेत असे नाही तर झाडेही सुकून जातात. अशावेळी, घरात राहूनही, उष्णतेपासून आणि उन्हापासून झाडांचे आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही घरगुती द्रव खत बनवू शकता आणि वापरू शकता. हे खत बनवण्यासाठी केळीच्या साली लागतात.

केळीच्या सालीपासून नैसर्गिक खत बनवा | Natural Fertilizer At Home

घरच्या घरी केळीच्या सालीपासून नैसर्गिक खत बनवण्यासाठी सगळ्यात आधीकेळीची साले गोळा करावी लागतील. ही साले लहान तुकडे करून पाण्यात टाकून आठवडाभर ठेवा. जर तुम्हाला सालाचे तुकडे करायचे नसतील तर तुम्ही संपूर्ण साल पाण्यात टाकू शकता. आता तुम्हाला त्याचे पाणी मधेच ढवळत राहावे लागेल. जेणेकरून पाणी आणि साल नीट मिक्स करावे. एक आठवडा पूर्ण झाल्यावर हे पाणी गाळून दुसऱ्या डब्यात टाकावे. यानंतर केळीच्या सालीचे पाणी मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे उकळावे. एक उकळी आल्यानंतर, आपल्याला पाणी थंड करावे लागेल.

वापर कसा करायचा ?

केळीच्या सालीपासून पाणी तयार केल्यानंतर हे पाणी आठवड्यातून एकदा झाडांवर आणि रोपांवर फवारावे. जर द्रव कमी असेल तर तुम्ही ते पाण्यात मिसळून झाडांवर फवारू शकता. केळीच्या सालीपासून बनवलेले हे द्रव खत रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करेल आणि ते निरोगी देखील ठेवेल. जर तुमची रोपे नियमित वाढत नसेल तर तुम्ही केळीच्या सालीपासून बनवलेले हे खत वापरू शकता.

Viral Video | तरुणाने एका चाकावर सायकल उचलून केला स्टंट; व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया एक असे ठिकाण आहे. जिथे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणावर असे थक्क करणारे व्हिडिओ शेअर करत असतात. हे व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अशा सोशल मीडियावर एक सायकल चालवणाऱ्या व्यक्तीचा स्टंट करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या तरुणाने सायकलवर पाण्याच्या पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये (Viral Video ) एक सायकलस्वार एक स्टंट करताना दिसत आहे. रस्त्याच्या मधोमध एक छोटी दरी आहे. ती छोटी तरी ओलांडताना त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जायचे होते. परंतु त्या व्यक्तीने एक वेगळा मार्ग शोधून काढला. त्याने सायकलवर ही दरी सहज ओलांडली आहे. हा धोकादायक स्टंट करण्यासाठी त्याने सगळ्यात आधी सायकल उचलली आणि ती एका चाकावर नियंत्रित केली. रस्ता ओलांडताना सायकल सहज एवढी मोठी झेप घ्यावी लागेल. तेवढी झेप घेऊन त्याने हा रस्ता पार करण्याचं प्रयत्न केलेला आहे

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video ) स्लो मोशनमध्ये सगळे ॲक्शन रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये हा स्टंट दिसत आहे. त्या व्यक्तीने अगदी बिनचूक ती दरी ओलांडलेली आहे. परंतु त्याचा जराही तोल गेला असता, तरी ती सायकल दरीत कोसळण्याची शक्यता होती. आणि मोठा अपघात देखील होऊ शकला असता. परंतु त्याने अगदी सहजपणे हा स्टंट पूर्ण केलेला आहे. जे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अनेकजण त्या तरुणाच्या कौशल्याचे कौतुक देखील करत आहे. परंतु हा स्टंट पाहताना अनेकजण जणांना भीती देखील वाटलेली आहे. अनेकजण त्याच्या बौद्धिक कौशल्यासह त्याच्या शारीरिक कौशल्याचे देखील कौतुक करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Best Time to Walk : चुकीच्या वेळी वॉक केल्यास होऊ शकतात गंभीर समस्या; पहा काय सांगतात तज्ञ?

Best Time to Walk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Time to Walk) जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तुमचा आहार उत्तम असायला हवा. यासोबत तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत व्यायामाचा समावेश हवाच. यामध्ये चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. असे असले तरीही चालण्याची वेळ चुकल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होत नाही. त्यामुळे चालण्याच्या वेळा पाळायला हव्यात. वाचून नवल वाटेल. पण आरोग्यदायी फायद्यांसाठी चालण्याच्या वेळा पाळणे आवश्यक असल्याचे तज्ञसुद्धा सांगतात.

अनेकांना वाटत की, मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळी चालणे आणि नाईट वॉक म्हणजे रात्री जेवणानंतर शतपावली करणे आरोग्यदायी असते. पण आज आम्ही तुम्हाला नेमकी कोणती वेळ चालण्याचा व्यायाम करण्यासाठी योग्य आहे? (Best Time to Walk) याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे चालण्याचा व्यायाम काही निश्चित वेळी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

चालण्यासाठी कोणती वेळ चांगली? (Best Time to Walk)

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत. कारण, या वेळेत झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करत असतात. तसेच सकाळच्या वेळेत सूर्यप्रकाश आणि ताजी हवासुद्धा मिळते. मात्र, शहरामध्ये प्रदूषणाची वेळ समजणे जरा कठीण असते. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, हवेतील दूषित कण हे सकाळी आणि रात्री सर्वाधिक असतात. विशेषत: सकाळी ७ ते १० आणि रात्री ९ ते ११ या वेळेत भरपूर वायू प्रदूषण होते. तर दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रदूषण कमी होते. त्यामुळे या वेळेत वॉक घेता येईल.

(Best Time to Walk) तज्ञ सांगतात की, सकाळी आणि रात्री हवा शांत असते. त्यामुळे यावेळी प्रदूषण निर्माण करणारे दूषित कण हे हवेत अडकतात. यानुसार, संध्याकाळी सात-आठ वाजून गेल्यानंतर त्यांचे प्रमाण कमी होते आणि यावेळी हवेत श्वास घेणे सोपे होते.

शक्यता घरीच व्यायाम करा

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला सकाळी लवकर किंवा दिवसभर चालण्यासाठी वेळ मिळत नसेल तर घराबाहेर जाऊन व्यायाम करणे टाळा. त्यापेक्षा घरातल्या घरात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. (Best Time to Walk) यामुळे बाहेरील वायूत असणारे दूषित कण तुमच्या आरोग्याचे नुकसान देखील करणार नाहीत. तरीही तुम्हाला बाहेर जाऊन व्यायाम करायचा असेल तर विशेष काळजी म्हणून एन९५ मास्कचा वापर करा.

Roof Leak Repair : पावसात छतगळती होतेय? तर ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा

Roof Leak Repair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Roof Leak Repair) गेल्या काही दिवसांत पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरात छतगळती सुरु झाली असेल. अशा परिस्थितीत आता लोक घराला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करताना दिसतील. तर काही लोक जिथे छतातून पाणी येत असेल तिथे जमिनीवर बादल्या ठेवताना दिसतील. बहुतेक कौलारू वा पत्र्यांच्या घरात पावसाळ्यामध्ये छतगळतीची समस्या होते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर या पावसाळ्यात बादल्या नको, आम्ही सांगतोय त्या सोप्प्या ट्रिक्स वापरून बघा. चला लगेच जाणून घेऊया.

छतगळती कुठून होतेय ते आधी समजून घ्या

पावसाळ्यात छतगळती होत असेल तर आधी छताला कुठे क्रॅक आहे ते समजून घ्या. (Roof Leak Repair) तो किती मोठा क्रॅक आहे हे जाणून घ्या. म्हणजे समस्या सोडवणे थोडे सोपे होईल. क्रॅक किती आहे? हे पाहून त्याच्या आधारे सोल्युशन निवडा आणि जर छताला मोठा क्रॅक असेल तर एक्स्पर्ट मदत घ्या.

छत दुरुस्त करण्याआधी ‘ही’ गोष्ट करून घ्या

छतगळती होत असेल तर तो भाग दुरुस्त करण्याआधी त्याला कोरडे करून घ्या. (Roof Leak Repair) कारण, ओल्या छतावर क्रॅक भरण्यासाठी लावलेली कोणतीही गोष्ट नीट सेट होत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा लीकेजची समस्या उद्भवते. अशावेळी लिकेज असलेला भाग सुकवायला फॅनचा वापर करता येईल.

क्रॅक भरण्यासाठी काय वापराल? (Roof Leak Repair)

छतगळती थांबण्यासाठी तुम्हाला क्रॅक भरावा लागेल. याकरता सिमेंटचा वापर करता येईल. पण हे काम पेट्रोलने अधिक चांगले होते. म्हणून सिमेंटमध्ये पेट्रोल तसेच थर्माकोलचे तुकडे मिसळून घ्या. काही वेळाने तयार पेस्ट क्रॅक असलेल्या ठिकाणी लावून घ्या. ही पेस्ट लावल्यानंतर सुकायला २- ३ तास लागतात. जेव्हा तुम्ही ही पेस्ट क्रॅकवर लावाल तेव्हा हातात मोजे घालायला विसरू नका.

दुरुस्तीनंतर पेंटिंग करून घ्या

छोटे छोटे क्रॅक असतील तर ते तुम्ही पेट्रोल मिश्रित सिमेंटने भरू शकता. (Roof Leak Repair) तो भाग सुकल्यानंतर गळती बंद होईल. यानंतर दुरुस्तीची चिन्हे दिसू नये म्हणून पेंटिंग करा. मात्र, पेंटिंग करण्याआधी तो भाग पूर्णपणे सुकला आहे का? याची खात्री करून घ्या.

SBI Sarvottam Scheme : SBI बँकेची सर्वोत्तम योजना; ज्येष्ठांना देते सर्वाधिक व्याजदर, कसा मिळतो फायदा?

SBI Sarvottam Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Sarvottam Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची ग्राहक संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे SBI च्या मार्फत अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये अमृत कलश आणि सर्वोत्तम अशा दोन अत्यंत लोकप्रिय योजना आहेत. या दोन्ही योजना मुदत ठेव योजना असून यातील सर्वोत्तम योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत ७.९०% व्याजदर दिला जात आहे. यातून फायदा मिळवायचा असेल तर त्यासाठी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेत आहोत.

SBI ची सर्वोत्तम FD योजना (SBI Sarvottam Scheme)

SBI बँकेची सर्वोत्तम योजना ही नावाप्रमाणे सर्वोत्तम आहे. कारण ही योजना पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपेक्षा जास्त व्याज प्रदान करते. ही योजना केवळ १ वर्ष आणि २ वर्ष कालावधीत चांगला निधी तयार करण्यास मदत करते. या योजनेत सामान्य ग्राहकांना २ वर्षांच्या ठेवीवर ७.४% व्याजदर दिला जातो. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत ७.९०% इतका व्याजदर दिला जातो. तसेच १ वर्षाच्या ठेवीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याजदर दिला जातो.

चक्रवाढ व्याजाचा फायदा

या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ लाख रुपये ते २ कोटी रुपयांच्या वरील १ वर्षीय कालावधीच्या FD वर वार्षिक उत्पन्नासाठी ७.८२% व्याज मिळते. तर २ वर्षांच्या FD साठी ८.१४% उपलब्ध आहेत. (SBI Sarvottam Scheme) २ कोटी ते ५ कोटी रुपयांसारख्या मोठ्या ठेवींवर ज्येष्ठांना १ वर्षासाठी ७.७७% तर २ वर्षांसाठी ७.६१% व्याज उपलब्ध आहे. सर्वोत्तम योजनेत अशाप्रकारे चक्रवाढ व्याज उपलब्ध असल्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो.

किती गुंतवणूक करता येईल?

SBI बँकेच्या सर्वोत्तम योजनेत ग्राहकांना किमान १५ लाख रुपये ते कमाल २ कोटी रुपयांची गुंतवणूक करता येते. ही योजना निवृत्त झालेल्या आणि पीएफ फंडात पैसे असलेल्या ग्राहकांसाठी फायदेशीर मानली जाते. (SBI Sarvottam Scheme) या योजनेत २ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचादेखील पर्याय उपलब्ध आहे. मात्र, यासाठी दिला जाणारा व्याजदर हा ०.०५% कमी आहे.

Delhi Metro : मेट्रोत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; शिवीगाळ करत एकमेकींना धु धु धुतले

Delhi Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Delhi Metro) आजकाल कधी? कुठे? काय? घडेल याचा काहीही नेम नाही. तसंच दिल्लीच्या मेट्रोबाबत झालंय. दिल्लीत मेट्रो धावू लागल्यापासून रोज नवनवीन घटना घडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये कधी बिकिनी गर्ल दिसते तर कधी अतरंगी चाळे करणारे कपल. अलीकडच्या काळात दिल्ली मेट्रोत रिल्स बनवणाऱ्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला आहे. तर कधी कधी मेट्रोमध्ये जबरदस्त मारामाऱ्यासुद्धा पहायला मिळाल्या आहेत. अशाच एका हाणामारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओत महिला राडा घालताना दिसत आहेत.

पहा व्हिडीओ (Delhi Metro)

जगात अशा काही महिला आहेत ज्यांना भांडायला कारण लागत नाही. एक महिला बोलली की, दुसरी शब्द उचलायला तयारच असते. असे अनेक वाद लोकल रेल्वेत पहायला मिळाले आहेत. ज्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान, दिल्ली मेट्रोतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, बऱ्याच महिला मेट्रोतून प्रवास करत आहेत. यातील काही महिला सीटवर बसल्या आहेत तर काही उभ्या आहेत.

अशातच दोन महिलांमध्ये अचानक भांडण सुरु होते आणि त्या दोघी एकमेकींशी वाद घालू लागतात. त्यांच्या भांडणाचा सूर वाढतोय पाहून काहीजणी हसू लागतात तर काही जणी त्यांचं भांडण सोडवू लागतात. अशातच दोघींमधलं भांडण असं काही पेटतं की, त्यातली एक दुसरीच्या कानाखाली मारते. (Delhi Metro) मग काय? कानाखाली खाल्लेली महिला मारणारीचे केस ओढू लागते आणि दोघींमध्ये चांगलीच जुंपते. अशा प्रकारे या दोघींची मारामारी सुरु होते आणि यांच्या तुफान राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दिलवाल्यांची दिल्ली कधी सुधारणार?

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील Rahul Saini नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘दिलवाल्यांची दिल्ली कधी सुधारणार..? तिच नेहमीची चर्चित जागा दिल्ली मेट्रो, पुन्हा एकदा महिलांचा राडा! एकमेंकींना बेदम चोप, कानाखाली, नखांचे ओरखडे’. (Delhi Metro) हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Prakash Ambedkar : किंगमेकर ते झिरो; प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत न जाऊन चूक केली का?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीला घाम फोडत नव्या नवख्या वंचितनं जोरदार मुसंडी मारली.. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला हलक्यात घेणाऱ्या आघाडीला दहाहून अधिक जागा वंचितमुळे गमावाव्या लागल्या… थोडक्यात वंचित फॅक्टरनं पहिल्याच निवडणुकीत दणक्यात सुरूवात केली होती… त्यामुळे २०२४ ला वंचित पुन्हा एकदा गेमचेंजर ठरेल असा सगळ्यांचाच अंदाज होता.. निवडणुका झाल्या.. निकालही लागला पण यात आंबेडकर हिरो नाही तर झिरो झालेत.. असं एकूणच हा निकाल सांगतोय. महाराष्ट्रातल्या एकूण ३८ जागंवर वंचितनं निवडणुक लढवली पण यातल्या तब्बल ३६ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ निकालानं आणलीय.. आंबेडकरांच्या या राजकारणाचावेगानं वरती जाणारा आणि तितक्याच वेगानं जमिनीवर आदळणारा हा ग्राफ पाहता वंचितचा सूर्य महाराष्ट्राच्या राजकारणातून मावळलाय का? आंबेडकरांच्या बाजूने सगळी परिस्थिती असताना वंचित नेमकी चुकली कुठे? महाराष्ट्रातील वंचितच्या स्वतंत्र राजकारणाचा हा द एंड ठरेल का? या आणि अशाच काही इंडरेस्टिंग प्रश्नांची उकल करुन घेऊयात.

तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या वंचितनं सुळका मारत तब्बल ४१ लाख ३२ हजार ४४६ आपल्या पदरात पाडून घेतली होती.. सर्वच्या सर्व ४८ जागांवरचे वंचितचे उमेदवार पडले असले तरी वंचितनं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दहाहून जास्त उमेदवारांना घरी बसवलं होतं… कॉंग्रेसच्या हक्काचा व्होट शेअर खाल्ल्यामुळे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा ठपकाही पडला… गेल्या पाच वर्षांपासून आंबेडकरांच्या वंचितबाबत बनलेल्या या परसेप्शनचा मोठा फटका वंचितला कुठे ना कुठे बसत होता… म्हणूनच वंचितनं २०१४ च्या लोकसभेची बोलणी सुरु झाली तेव्हा महाविकास आघाडीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवला… पण चर्चा फिस्कटल्या आणि वंचितनं स्वतंत्रपणे लोकसभेच्या निवडणुकासाठी शड्डू ठोकले.. काही जागांवर कॉंग्रेस, अमरावतीत आनंदराज आंबेडकर, सांगलीत विशाल पाटील तर बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊन आंबेडकरांनी तब्बल ३८ जागा लढवल्या…

आम्ही यंदा जोरात तयारी केली असून वंचितचे किमान चार ते पाच खासदार दिल्लीत पाठवण्याची क्षमता असल्याचं कॉन्फिडन्सली सांगणाऱ्या वंचितला पुन्हा एकदा लोकसभेचच्या निकालात भोपळा मिळाला. हे कमी होतं की काय म्हणून प्रकाश आंबेडकर आणि हिंगोलीचा उमेदवार वगळता बाकीच्या सर्वच्या सर्व ३६ उमेदवारांचं डिपॉझीटही जप्त झाली…आकडेवारी नीट पाहिली तर वंचितच्या अनेक प्रभावक्षेत्रातल्या मतदारसंघात पक्षाला १० हजाराच्याही जवळपास मतदान झालं नाही… गेल्या टर्मला ४१ लाख मतदान सहज खेचून आणणाऱ्या वंचितला यंदा १५ लाख मतं मिळवण्यासाठीही मोठी धडपड करावी लागली.. २०१९ ला असणारा ६.९८ व्होट शेअर या निवडणुकीत ३.६७ वर येऊन आपटला… थोडक्यात काय तर वंचितचा महाराष्ट्रातील प्रभाव संपला असून आंबेडकर हे राजकारणाच्या सध्या काठावर उभे आहेत.. पण यंदा परिस्थिती सगळी प्लसमध्ये असताना वंचितचा गेम नेमका कुठे झाला? आंबेडकरांना नेमक्या कोणत्या चूका झाल्या?

हे थोडं उलगडून पाहीलं तर त्याचं पहिलं कारण समजतं ते म्हणजे आंबेडकरांची संभ्रावस्था…

२०१९ च आंबेडकरांचं व्हिजन क्लिअर कट होतं. ते म्हणजे महाराष्ट्राला तिसरी आघाडी देण्याचं.. यंदा मात्र आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच मविआशी मिळतंजुळतं घेण्याचा प्रयत्न केला. अनेक चर्चांच्या फेऱ्या मागे पडल्या. पण शेवटच्या क्षणी आंबेडकरांचं मविआसोबत फिस्कटलं.. यातही महाराष्ट्रातील तब्बल दहापेक्षा जास्त आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याने आंबेडकरांना नेमकं काय करायचंय? याचा अंदाजच कार्यकर्त्यांना आला नाही… देशातील मोदी सरकार उलथवण्यासाठी आपले हेवेदावे बाजूला ठेऊन विरोधक एकत्र ताकद लावताना आंबेडकरांच्या पाठिशी नेमकं कशाच्या बेसीसवर उभं राहायचं? असं लोकांचं जनमत तयार झालं होतं. कुठे महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा देऊन तर कुठे विरोधात काम करुन आंबेडकरांनी मोठी संभ्रावस्था निर्माण केली. त्याचाच त्यांनी लोकसभेला मेजर फटका बसलेला दिसतोय…

आंबेडकर चुकले त्याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे उमेदवारीच्या झालेल्या गोंधळाचा…

शिरुरमधून मंगलदास बांदल यांना वंचितनं उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मंगलदास बांदलांनी देवेंद्र फडणवीसांशी घेतलेल्या भेटी चर्चेत राहिल्याने वंचितनं त्यांची उमेदवारी मागे घेतली.. मविआसोबत चर्चा करताना वंचितनं पुण्यातून अभिजीत वैद्यांना तिकीट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र जेव्हा स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निर्णय झाला तेव्हा मनसे सोडलेल्या वसंत मोरेंना वंचितनं तिकीट देऊन सर्वांनाच धक्का दिला… परभणीतून बाबासाहेब उगलेंना जाहीर झालेली उमेदवारी आंबेडकरांनी अचानक रद्द करुन पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली.. परभणीत वंचितचे आलमगीर खान उमेदवार होते, त्यांनी दीड लाख मतं घेतली होती पण यंदा वंचितनं तिकीट न दिल्यानं त्यांनी राजीनामा देत बसपाकडून उमेदवारी मिळवली. यवतमाळमध्येही सुभाष पवार या तगड्या नेत्याला जाहीर झालेली उमेदवारीही बदलून अचानक अभिजीत राठोडांचा फॉर्म भरला. पण छाननीवेळीच तांत्रिक त्रुटींमुळे राठोडांचाही अर्ज बाद झाला… एवढंच नाही तर अमरावती, रामटेक आणि अशा अजून अनेक मतदारसंघात उमेदवारी मागे घेणे, दुसऱ्या उमेदवाराला पाठींबा देणे, असा सगळा सावळा गोंधळा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीपर्यंत बघायला मिळाला.. ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरली…

आंंबेडकरांचं राजकारण झटक्यात जमिनीवर आपटण्याचं शेवटचं कारण ठरलं ते म्हणजे नरेशन सेट न करणं…

भाजपने ४०० पारचा नारा दिल्यानंतर हा सगळा खटाटोप संविधान बदलण्यासाठी सुरु आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने अल्पसंख्याक, दलित आणि मुस्लिम व्होटर आपल्याकडे खेचून घेतला. मात्र प्रकाश आंबेडकरांनी अशी जातीय समिकरण जुळवून घेण्यासाठी कुठलीही स्टेटर्जी आखली नाही.. आंबेडकरांचेे वंशज असताना लोकशाही, संविधान आणि अशा बऱ्याचशा मुद्द्यावर सरकारच्या विरोधात नरेशन बिल्डअप करुन त्याचा वंचितला फायदा मिळवून आणता आला असता.. याऊलट आंबेडकर यांनी संपूर्ण प्रचारात वैयक्तिक टीका आणि दुसऱ्या मुद्दयांना वेळ दिल्याने त्यांचा हक्काचा मतदारही वंचितपासून दुरावला… थोडक्यात काय, तर आंबेडकरांकडून, दलित समाजाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण एकामागून एक अनेक पातळ्यांवर , चुकीचे निर्णय घेतल्याने, या मोठ्या वर्गाचा अपेक्षाभंग झाला.. त्याचाच इम्पॅक्ट वंचितच्या मतदारांमध्ये तब्बल २३ लाखांनी घट होण्यामध्ये झालाय… लोकसभेचं हेच प्रतिबिंब थोड्याअधिक प्रमाणात विधानसभेवरही पडेल, असं बोललं जातंय.. त्यामुळे वंचितचं लोकसभेला पुरतं पानिपत झालेलं असताना विधानसभेतही गटातटाच्या राजकारणात वंचितचा प्रभाव शून्य होण्याच धोका आंबेडकरांना आहे. शेवटी आंबेडकरांचं राजकारण संपलंय? वंचितच्या करिष्म्याचा फुगा आता फुटून गेलाय? असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,

लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाचा घाम फोडणार?

MANOJ JARANGE PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरांगे खडे तो सरकारसे बडे… होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्र लोकसभेचं हे आहे जळजळीत वास्तव… जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.. मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं… बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेनी केला.. रावसाहेब दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर श्रुंगारे या मातब्बरांना पहिल्यांदाच मानहानिकारक पराभव याच जरांगे पाटलांमुळे बघायला मिळाला… लोकसभेच्या पहिल्या अंकातील किंगमेकर ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी जरांगे २.० ची आता सुरुवात झालीय… मराठा आरक्षणाच्या मुदद्यावरुन पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेचा प्लॅन एक्टिव्हेट केलाय… यात जरांगे पाटील कुणाला दणका देऊ शकतात? मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली काढतानाच मराठा मुख्यमंत्री बनवण्याइतपत त्यांची विधानसभेला ताकद लागेल का? जरांगे पाटलांचं हे २.० चं विधानसभेचं वर्जन नेमकं आहे तरी काय? तेच पाहुयात …..

मनोज जरांगे पाटील. या एकटया नावाने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं… मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी मुंबईच्या दारावर धडका मारुन सरकारच्या छातीत धडकी भरवण्याचा कार्यक्रम केला होता…मुख्यमंत्री शिंदेंनी तेव्हा प्रत्यक्ष भेटून आश्वासन दिलं.. आंदोलन शांत झालं.. पण ती पूर्ण न झाल्यानं जरांगेनी पुन्हा आंदोलनाचा बडगा उगारला… तेव्हा मात्र सरकारने जरांगेना अंगावर घ्यायला सुरुवात केली… जरांगे शरद पवारांच्या तोंडची भाषा बोलतात असं म्हणत त्यांनी जरांगेना निकालात काढायला सुरुवात केली… महायुतीचे सगळे नेते जरांगेंच्या आंदोलनावर संशय घेत त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करू लागली…मराठवाड्यातील तर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला…

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या एका स्टेटमेंटने भडका उडाला…याचाच परिणाम म्हणून मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात एकवटला…आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊन थांबला…अनेक विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज, प्रस्थापित नेत्यांचं राजकारण या जरांगे फॅक्टरने शून्यात जाऊन पोहचलं… बीडमध्ये तर मुंडे घराण्याचं प्रस्थ मोडून काढत बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारखा मराठा चेहरा खासदार झाला असेल तर त्यामागे मनोज जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं स्वतः बजरंग बाप्पांनीही मान्य केलंय…लोकसभेचा हा रिझल्ट पाहता मराठा फेक्टर हा निर्णय ठरतोय, याचीच कल्पना जरांगे पाटलांनाही आली असावी, म्हणूनच त्यांनी आता जरांगे पाटील 2.0 या वर्जनला आता सुरुवात केलीय…

सत्तेच्या जोरावर आधी जाहीर केलेला सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अडगळीत टाकला होता… मात्र लोकसभा निकालाचं हे परफेक्ट टाइमिंग साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत…काहीही झालं तरी सगेसोयारे अध्यादेश मंजूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही… असं म्हणून त्यांनी शिंदे फडणीसांना पुन्हा एकदा अडचणीत आणलय… आधीच लोकसभेच्या निकालातून तोंड बुक्क्यांचा मारा बसलेला असताना आता त्यात मनोज जरांगेंनी पुन्हा वातावरण तापवल्यानं याचे पडसाद विधानसभेवर पडतील का? हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही…विधानसभेच्या राजकारणात मात्र हे जरांगे 2.0 वर्जन मोठी उलथा पालथ घडवून आणेल…लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सक्रिय सहभाग घेतला नव्हता… मात्र विधानसभेला नाव घेऊन पाडणार, असं म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला इशाराही दिलाय…

गरज पडली तर महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 288 जागा लढवू आणि जिंकू देखील, असं म्हणून त्यांनी अगदी तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं सगळं डायमेन्शनच बदलून टाकलंय… देवेंद्र फडणवीसांबद्धल आमच्या मनात शत्रुत्व नाही… पण त्यांचं लक्ष हे फक्त फोडाफोडीत असतं…म्हणूनच त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला… असं स्टेटमेंट करून फडणवीसांना पुन्हा डॅमेज करायला सुरुवात केलीय…आमच्या उपोषणाला कोण कोण पाठिंबा देत नाही, त्या सर्व आमदारांवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे, अशा आमदारांना गरीब मराठे कायमचं घरी पाठवणार आहेत… असं म्हणून जरांगे पाटलांनी विधानसभेचं पॉवर पॉलिटिक्स आत्तापासूनच खेळायला सुरुवात केली आहे.. लोकसभेतून पराभव झालेल्या महायुतीचा सूर यंदा मात्र जरांगेंच्या बाबतीत काही प्रमाणात नरमाईचा झाल्याचा दिसतय…

त्यामुळे भल्याभल्या मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही त्या मराठा समाजाला एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न जरांगे पाटलांनी केला आहे…त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राजकारण 360 अंशात फिरवतील… हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही… मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला यावेळेस तरी यश मिळेल का? विधानसभेला जरांगे पाटलांनी काय स्टॅन्ड घ्यावा? असं तुम्हाला वाटतं. तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,

Viral Video : अर्रर्रर्रर्रर्र!! सिलेंडरवर चढून नाचत होती महिला; ठुमके लगावताना धापकन् पडली तोंडावर

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करू लागले आहेत. डान्स, स्टंट, अतरंगी चाले, डायलॉगबाजी आणि अजून बऱ्याच विविध आशयाचे व्हिडीओ सोशल मिडीआयवर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. फक्त प्रसिद्धीसाठी बरेच लोक वेळेचाळे करताना दिसतात. या माध्यमातून अनेक गाणी आणि डायलॉग ट्रेंड होताना दिसतात. ज्यावर बरेचजण रिल्स बनवताना दिसतात. हटके व्हिडीओ बनवायच्या नादात बरेच जण स्वतःच हसं करून घेताना दिसतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावरील व्हायरल होणार हा व्हिडीओ एका महिलेचा आहे. जी चक्क सिलेंडरवर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरातील सिलेंडरवर उभी राहून जबरदस्त ठुमके लगावते आहे. पण खरी मजा तर पुढे आहे. सिलेंडरवर चढून नाचणारी ही महिला नाचत नाचत जोरात खाली पडते. व्हिडिओच्या शेवटी ती पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ X हॅण्डलवर (पूर्वीचे ट्विटर) PalsSkit नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘रील्स आणि मेंढ्यांची चाल यात काही फरक नाही. (Viral Video) येथे सिलेंडरवरून पडण्याचा ट्रेंड सुरु आहे’. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://twitter.com/PalsSkit/status/1799054356890923352

या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘रील्स बनवली तर दात पुन्हा ठीक होतील’. तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘याला म्हणतात.. रीलवाला नशा’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘भारतात मेंढी चालण्याचा जणू ट्रेंडच चालू आहे’. (Viral Video) तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, ‘सिलेंडर सगळ्यांच्या घरात आहे.. पण सध्या हा ट्रेंड झालाय’. तसेच अन्य एका युजरने लिहिलंय, ‘देशात काय काय सुरु आहे.. त्यामुळे काय काय पाहावं लागतंय… अजून काय पाहायला लागेल काय माहित?’