Saturday, December 20, 2025
Home Blog Page 686

Noor Malabika Death : काजोलच्या को- स्टारची आत्महत्या; कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला मृतदेह

Noor Malabika Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Noor Malabika Death) बॉलिवूड सिनेविश्वातून अत्यंत धक्कादायक असे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्री काजोल सोबत डिस्नी हॉटस्टारच्या ‘द ट्रायल’ या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे हे वृत्त आहे. अभिनेत्रीचे नाव नूर मालाबिका दास असे असून तिने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास घेत आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट (Noor Malabika Death)

एका वृत्तानुसार, अभिनेत्री लोखंडवालामध्ये राहत होती आणि तिच्या शेजाऱ्यांच्यांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. रहिवाश्यांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन ओशिवरा पोलीस सदर ठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून दुर्गंधी येत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तोडला आणि त्यांना नूरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहितीनुसार, अभिनेत्रीचा मृतदेह पोलिसांनी तिच्या फ्लॅटमधून ६ जून २०२४ रोजी ताब्यात घेतला. समोर दिसणाऱ्या दृश्यांवरून अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे समजत असले तरीही कारण अस्पष्ट असल्यामुळे पुढील तपास सुरु आहे.

पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार

अभिनेत्रीचा मृतदेह सापडल्यानंतर समोरील दृश्य पाहून हे स्पष्ट झाले की, तिने आत्महत्या केली आहे. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्यामुळे पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. या तपासादरम्यान नूरच्या घरातून त्यांना काही औषधं, तिचा मोबाईल आणि डायरी मिळाली. (Noor Malabika Death) अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला होता. दरम्यान, तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधूनही कोणी न आल्याने पोलिसांनी शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. रविवारी ९ जून २०२४ रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘द ट्रायल’ ठरली शेवटची सिरीज

नूर मालाबिका ही मूळ आसामची होती. तिच्या अभिनय कारकिर्दीत तिने बऱ्याच वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘सिसकियां’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. (Noor Malabika Death) दरम्यान, डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रायल’मध्ये तिने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि जिशू सेनगुप्ता यांच्यासोबत महत्वाची भूमिका साकारली होती. ही वेब सिरीज तिच्या कारकिर्दीतील शेवटची सिरीज ठरली.

काल घेतली मंत्रीपदाची शपथ आज लगेच मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त; या खासदारांनी दिली अनेक कारणं

Suresh Gopi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी केंद्रामध्ये पुन्हा एकदा NDA सरकार स्थापन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह 72 नेत्यांचा शपथविधीचा सोहळा कार्यक्रम पार पडला. परंतु ही शपथ घेऊन काही तास उलटले असताच एका मंत्राने मंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुरेश गोपी (Suresh Gopi) असे या मंत्र्याचे नाव असून त्यांनी मंत्रीपद सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. ज्यात त्यांनी मी पक्षश्रेष्ठींकडे मंत्रीपद मागितलच नव्हत, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मंत्रीपद सोडण्याचे सांगितले कारण..

रविवारी इतर मंत्र्यांसह केरळचे सुरेश गोपी यांनी देखील राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीचा एक दिवस उलटताच माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रीपद सोडणार असल्याचे सांगितले आहे. सुरेश गोपी म्हणाले की, मी मंत्री पद मागितले नसताना देखील मला ते देण्यात आले आहे. आता ते मला या पदावरून मोकळं करतील, अशी आशा आहे. मी अनेक चित्रपट साईन केले असून मला ते पूर्ण करायचे आहेत. तसेच खासदार म्हणून मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. त्यासाठी मला वेळ हवा आहे”

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी हे केरळ येथील त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या राज्यातून येणारे ते भाजपचे पहिले खासदार ठरले आहेत. त्यांनी या निवडणुकीमध्ये आयसीपीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 75 मतांनी पराभव केला आहे. सुरेश गोपी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना सिनेसृष्टीमध्ये काम करायचे आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आता ते राजकीय क्षेत्रात देखील चोख कामगिरी करताना दिसत आहेत.

मोबाईल पाण्यात भिजला ? चिंता न करता फक्त ‘हे’ काम करा

Mobile phone soaked in water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल (Mobile) ही आजकालची अतिशय महत्वाची आणि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. कोणतेही काम मोबाईलच्या माध्यमातून अगदी चुटकीसरशी होत असल्याने प्रत्येकाच्याच हातात आजकाल मोबाईल बघायला मिळतो . मोबाईल वापरत असताना त्याची योग्य जपणूक करणेही तितकंच गरजेचं आहे. सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे असून प्रवासादरम्यान किंवा बाहेर जाताना पावसाच्या तडाख्यात अनेकदा आपला मोबाईल भिजतो.. कधी कधी स्टंट बाजी मध्ये मोबाईल पाण्यात पडतो. अशावेळी नेमकं काय करायचा असा प्रश्न नक्कीच आपल्या मनात येत असेल. पण घाबरू नका आज आम्ही तुम्हाला यावर उपाय म्हणून काही खास टिप्स सांगणार आहोत.

सर्वप्रथम, जेव्हाही तुमचा मोबाइल पाण्यात पडेल, तेव्हा तो लवकरात लवकर पाण्यातून बाहेर काढा, कारण तुमचा मोबाइल जितका जास्त वेळ पाण्यात राहील, तेवढं जास्त पाणी मोबाईलच्या वेगवेगळ्या भागात शिरण्याची शक्यता असते.

मोबाईलची बटणे सतत दाबण्याची चूक करू नका… असं केल्यास मोबाईलमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मदरबोर्ड खराब होण्य्ची शक्यता असते.

मोबाईल कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसा. मोबाईलच्या स्पीकर मध्ये किंवा इतर भागात पाणी गेलं असल्यास त्याला तांदळाच्या डब्यात कमीत कमी १० तास तरी ठेवा. कारण भातामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असते.त्यामुळे आतील सर्व पाणी आपोपाप निघून जाईल.

जर तुमच्या मोबाईलमध्ये थोडासा ओलावा असेल तर तो सुकण्यासाठी मोबाईल काही काळ उन्हात ठेवा. यानंतर १०-१५ मिनिटात मोबाईल मधील सर्व पाणी निघून जाईल.

मोबाईल भिजल्यानंतर हे सर्व उपाय तर आहेतच, परंतु पावसात आपला मोबाईल भिजूच नये यासाठी खबरदारी घेणं सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत किंवा पाऊच मध्ये ठेवा, पावसात जास्त भिजू नका. जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका.

अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातून वगळण्यात येण्याचं कारण वेगळंय

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील.. यावेळेस अगदीच एनडीच्या सहकारी पक्षांच्या जीवावर चालणाऱ्या या मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा सोडाव्या लागल्या आहेत.. महाराष्ट्रातूनही भाजपचे चार, तर रिपब्लिकनचे आठवले तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव लवकरच मंत्रीपदाची शपथ घेताना दिसतील… पण या सगळ्यात भलीमोठी रिस्क घेऊन महायुतीत मोठ्या आशेनं आलेल्या अजितदादांच्या पदरात भलामोठा भोपळा पडलाय…शरद पवारांच्या सहानुभुतीच्या लाटेत घड्याळाचे सगळेच उमेदवार वाहून गेेले… त्यातल्या त्यात सुनिल तटकरेंनी रायगडची जागा जिंकत अजितदादांची (Ajit Pawar) कशीबशी लाज राखली… पण असं असूनही रिपब्लिकनच्या आठवलेंना कोणतीही निवडणूक न लढवता मंत्रिपद मिळालं… थोडक्यात भाजपसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वापर आता संपलाय असंही राजकीय विश्लेषक बोलू लागलेत.. मग फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याचा राजकीय अर्थ नेमका कसा काढायचा? अजित पवारांच्या राजकारणाचे काटे लोकसभेच्या निकालाने कसे उलटे फिरवलेत? एवढेच नाही तर अजितदादांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात डावण्याच्या घटनेतच महायुतीच्या फुटीची बीजं रोवली गेली आहेत… अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडद्याआड काय चाललंय? याच प्रश्नांची सविस्तर उत्तर पाहूयात…

महायुतीच्या जागावाटपात पदरात पडलेल्या चारही जागा प्रतिष्ठेच्या बनवून सुनील तटकरे यांनाच कशीबशी रायगडची जागा वाचवण्यात यश आल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी जमिनीवर आलीय…बारामतीतून पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाच्या धक्क्यातून अजितदादा अजून सावरलेले नसतानाच मंत्रिमंडळातूनही वगळल्यामुळे आता दादांच्या पायाखालची वाळू सरकलेली असणार, ही वेगळ्या शब्दात सांगायला नकोच… पण घड्याळ, चिन्ह आणि भल्या मोठ्या पक्षातील दिग्गज नेते सोबत असतानाही मंत्रिमंडळातून अजितदादांना नेमकं का डावललं गेलंय? याची काही निश्चितच कारणं सांगता येतील…

त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे लोकसभेत केलेल्या निराशाजनक कामगिरीची

राष्ट्रवादीच्या फुटीत पक्षातील मातब्बर नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली…आमदार, खासदार आणि पक्षातील पहिली फळीच अजितदादांच्या सोबत आल्याने शरद पवारांना उरल्या सुरल्या नेत्यांना सोबत घेऊन नव्यानं पक्ष उभा करावा लागला… अजित दादा सोबत आल्याने महाराष्ट्र भाजपचाही विश्वास वाढला…महायुतीतील अगदी महत्वाच्या जागा त्यांनी अजित पवारांना दिल्या… स्वतः अजित पवार आणि त्यांच्या सहकारी नेत्यांनी बऱ्याच तोंडाच्या वाफा चालवल्या… मात्र फक्त सुनील तटकरे यांची सीट वगळता, इतर जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार चांगलेच आपटले… हे कमी होतं की काय म्हणून राष्ट्रवादीचा ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यावर कंट्रोल होता तिथून घड्याळाच्या काट्यांपेक्षा तुतारीचाच आवाज जोरदार चालला… या सगळ्यातून हे क्लियर झालं की नेते अजितदादांच्या सोबत असले तरी कार्यकर्त्यांची फळी आजही शरद पवारांच्या सोबतच आहे…लोकसभेच्या निकालाने अजित पवार गट राज्याच्या राजकारणात सर्वात मागे असल्यावर जणू मोहोरच उमटली… यामुळेच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नसावं…

यातलं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे विधानसभेला पॉवर पॉलिटिक्सची खेळी..

होय…अजितदादांना एकच जागा जिंकता आली असली तरी राष्ट्रवादीने केवळ चारच जागा लढवल्या होत्या हे विसरून आपल्याला चालणार नाही… त्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने लढवलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा यांच्यातही मोठा फरक असल्याने राष्ट्रवादीच्या एका जागेकडे अपयश म्हणून बघता येणार नाही… मुळात मंत्रिपद न घेण्याची अजितदादांची ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी असू शकते… फडणवीसांनी सांगितलं तसं अजित पवार गटाला भाजपकडून राज्यमंत्रीपद ऑफर करण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रीपदासाठी अडून बसल्याने अजितदादांचा खासदार या मंत्रिमंडळात शपथ घेताना दिसणार नाहीये…म्हणजेच अजित पवार गट मुद्दामहून मंत्रिपद स्वतःकडे घेत नाहीये… पण याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांची बुलिंग करण्याचा अजितदादांचा डाव असू शकतो… तसं बघितलं तर अजितदादांना दिल्लीतील राजकारणापेक्षा महाराष्ट्रातील राजकारण जास्त प्रिय आहे.. म्हणूनच सध्या केंद्रीय मंत्रीपदावर पाणी सोडून, येणाऱ्या विधानसभेला आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून पराभवाचा वचपा कसा काढता येईल, याचा अजितदादांच्या डोक्यात विचारा असावा…

आता पाहुयात शेवटचं कारण ते म्हणजे महायुती ब्रेक होणं…

दोन पक्षांची फोडाफोडी करून महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे त्याचा शिंदे, अजितदादा आणि भाजपालाही मोठा लॉस झाला… थोडक्यात सत्तेच्या हव्यासापोटी घडवून आणलेली ही युती महाराष्ट्राच्या जनतेला फारशी काही पचनी पडली नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालय… त्यात लोकसभेला झाला तसा विधानसभेला होणारा जागा वाटपाचा तीढा आहेच… त्यामुळे या सगळ्या बाबींचा एकंदरीत विचार केला तर विधानसभेला एकत्रित लढण्यापेक्षा वेगळा निर्णय घेण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार असू शकतो… त्याचीच पायाभरणी अजित पवारांनी मंत्रीपद नाकारून केली असावी… पण समजा मंत्रीपद द्यायचं झालंच तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांपैकी नक्की कुणाला संधी द्यायची? हाही प्रश्न आहेच… त्यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यामुळे अजित पवार मंत्रिपद न घेता वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत… पण येत्या काळात अजित पवार काही मोठा निर्णय घेतील, असं चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतय… त्यामुळे राष्ट्रवादीला न मिळालेल्या मंत्रीपदाचा राजकीय अर्थ तुम्ही कसा काढाल? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा

Siddharth Jadhav : राष्ट्रीय पातळीवर ‘आपला सिद्धू’चा सन्मान; Insta पोस्ट करत अभिनेत्याने मानले आभार

Siddharth Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Siddharth Jadhav) मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव कायम आपल्या दर्जेदार अभिनय आणि कमालीच्या कलाकृतींमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थने खूप मेहनतीचे स्वतःचा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. जो त्याच्यावर अतोनात प्रेम करतो. सिद्धार्थ जाधवने ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ अशा चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. असा हा सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांसाठी आपला सिद्धू कधी झाला ते कळलंच नाही. आजपर्यंत सिद्धूने रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर केलेल्या कामासाठी नुकताच त्याचा मोठा सन्मान करण्यात आला आहे. याविषयी त्याने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ज्युरीचे आभार मानले आहेत.

सिद्धार्थ जाधवचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान (Siddharth Jadhav)

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने कायमच एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे अभिनय विश्वात सिद्धार्थ जाधव नावाचं नाणं एकदम खणखणीत वाजतंय. नुकताच सिद्धार्थचा राष्ट्रीय पातळीवर एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यासंदर्भात त्याने स्वतःच एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. माहितीनुसार, ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधवला ‘बालभारती’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा ज्युरी विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

सिद्धार्थ जाधवची Instagram पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ जाधवने(Siddharth Jadhav) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने पुरस्काराचे फोटो शेअर केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘BEST ACTOR (JURY) बालभारती.. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल २०२४’ मध्ये आमचा सिनेमा ‘बालभारती’ यासाठी मला जुरींकडून ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ हा पुरस्कार मिळाला… मनापासून आनंद होतो… ‘बालभारती’ सिनेमातल्या माझ्या कामाचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक केलं जातंय…’



पुढे लिहिलंय, ‘काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे… देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी award मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे… आमचे producer official_sphereorigins सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक nitinnandan… लव्ह यू टीम!’ (Siddharth Jadhav)सिद्धूच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया देत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ज्यामध्ये तेजस्विनी पंडित, अभिजीत खांडकेकर, सुकन्या मोने, प्रथमेश परब अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.

Bad Cholesterol | वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचे असल्यास; आहारात करा या पदार्थ्यांचा समावेश

Bad Cholesterol

Bad Cholesterol | आजकाल लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्याचप्रमाणे खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक आजार होत आहेत, त्यांच्या चुकीच्या आणि वाईट सवयीमुळे कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोलेस्ट्रॉल हा घटक आपल्या रक्तामध्ये आढळतो हा घटक दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. उच्च घनता लेपो प्रोटीन याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात तर शरीरातील उती तयार करण्यात आणि रक्त परिसंचय करण्यास साठी मदत करते.

बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) लो डेन्सिटी लेपोरेटिन हृदयाच्या धमण्यावर साचते आणि हृदयापर्यंत रक्त पोहोचण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या समस्या पडतात. आपल्याला जर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर त्यासाठी आपल्या आहारात बदल करावा लागतो. काही पदार्थांचा समावेश करावा लागतो ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या आपण टाळू शकतो. आता आपण याच पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

सुका मेवा | Bad Cholesterol

सुक्या मेव्याचे सेवन केल्याने कमी घनतेच्या लिपोप्रोटीन म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉलपासून उत्तम संरक्षण मिळते. आम्ही तुम्हाला सांगतो, यामध्ये मल्टीविटामिन आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत, अक्रोड, अंजीर आणि बदाम खाणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु बदामामध्ये जास्त कॅलरी असल्यामुळे ते कमी प्रमाणातच खावे

लापशी

बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी दलिया खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले फायबर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कमी करते. याशिवाय, संपूर्ण किंवा अंकुरलेले धान्य देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक प्रभावी आहार आहे. त्यामुळे उशीर न करता तुमच्या नाश्त्यामध्ये त्यांचा समावेश करा.

ओमेगा -3 फॅटी ऍसिड

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यामुळे रक्तदाब आणि रक्त गोठण्याच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे सॅल्मन किंवा ट्यूना माशांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय, व्हेज पर्यायांमध्ये तुम्ही मोहरी किंवा फ्लेक्स बिया, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि चिया बिया देखील घेऊ शकता.

हिरव्या भाज्या | Bad Cholesterol

हिरव्या भाज्या नेहमीच सुपरफूड मानल्या जातात. त्यांचे सेवन केल्याने अनेक आजारांचा धोका टळतो. अशा परिस्थितीत, बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. फ्लॉवर, कोबी, पालक, टोमॅटो इत्यादी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम आहेत.

काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राऊतांचा मोदींना सवाल

Raut And Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रविवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात शिवखोडी येथे भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात बस दरीत कोसळली ज्यामुळे दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या इतर जखमी झालेल्या भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. यासह जम्मू काश्मिरमधील पंडित पुन्हा घरी कधी येणार?? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडत होत्या. मोदी सरकार इतके बलवान ठरले की 370 हटवल्यानंतर जम्मू विभागात दहशतवादी हल्ले होऊ लागले जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. आजही जम्मू विभागातच एक हल्ला झाला ज्यात दहा जणांचा मृत्यू झाला. मोदी शपथ घेत होते त्यावेळी जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते. तसेच, “आजही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत. मोदीजी, पंडित घरी कधी परतणार?” असा सवाल राऊतांनी मोदींना विचारला आहे.

दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडत असतानाच दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात चालकाला गोळी लागल्यामुळे बस थेट जाऊन दरीत कोसळली. या घटनेमध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला तर जवळपास 30 पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला ठीक 6:15 वाजेच्या सुमारास केला. ज्यावेळी बस भाविकांना घेऊन माता वैष्णोदेवी मंदिराकडे निघाली होती.

Sonakshi Sinha Marriage : ठरलं हो ठरलं!! सोनाक्षी सिन्हा होणार झहीर इक्बालची बेगम; तारीख ठरली, पत्रिका छापली

Sonakshi Sinha Marriage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sonakshi Sinha Marriage) बॉलिवूड सिनेविश्वा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. बऱ्याच लोकांनी तीच नाव वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जोडलं होत. पण अखेर यातील काही अफवा खऱ्या ठरल्याचं समोर आले आहे. लवकरच सोनाक्षी खरोखर लग्नबंधनात अडकणार आहे, असं सांगितलं जातंय. मुख्य म्हणजे सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे आणि त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

सोनाक्षी- झहीर लग्नबंधनात अडकणार (Sonakshi Sinha Marriage)

अभिनेत्री सोनाक्षी सिंह लग्नबंधनात अडकणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही नुसती चर्चा नसल्याचे समोर आले आहे. अलीकडेच ‘हीरामंडी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती.

यावेळी ती म्हणाली होती की, ‘मी लग्नासाठी उत्सुक आहे….’. यानंतर आता सोनाक्षी लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न करणार असून त्यांच्या लग्नाची तारीखसुद्धा समोर आली आहे.

कधी आहे लग्न?

समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता झहीर इक्बाल याच महिन्यात लग्न करणार आहेत. (Sonakshi Sinha Marriage) येत्या १४ जून २०२४ रोजी ते एकमेकांसोबत साता जन्माची गाठ बांधून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. सध्या सर्वत्र सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

मात्र, अजूनही सोनाक्षी किंवा झहीरने याबाबत कोणतेही स्पष्ट असे अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे आता या गोष्टींबाबत खात्रीशीररित्या काहीही सांगता येणार नाही.

‘अशी’ आहे पत्रिका

काही वृत्तानुसार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची तारीख १४ जून २०२४ आहे. या दिवशी ते लग्न बंधनात अडकणार आहेत. आपल्या लग्नासाठी त्यांनी काही ठराविकच लोकांना आमंत्रण दिले आहे. कुटुंबीय, जवळचे मित्र- मैत्रीण आणि त्याशिवाय ‘हीरामंडी’ सीरिजची संपूर्ण कास्ट त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. (Sonakshi Sinha Marriage) दरम्यान, त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आली आहे, असेही सांगितले जात आहे. तसेच या पत्रिकेवर ‘अफवा खऱ्या आहेत’, असं लिहिण्यात आलं आहे. लग्नासाठी फॉर्मल कपडे घालण्याची थीम ठरवली असून हा विवाहसोहळा मुंबईतील बुस्टन येथे पार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

अमरावतीत राणांच्या पराभवाला कारणीभूत ठरली बच्चू कडू- यशोमती ठाकूर जोडगोळी

bachhu kadu navneet rana yashomati thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भात भाजपचा पुरता सुपडा साफ झाला… अनेक दिग्गज घरी बसले… पण भाजपच्या सर्वात जास्त जिव्हारी लागलेला निकाल होता तो अमरावतीचा… हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि लाईम लाईट मध्ये आलेल्या राणांना भाजपकडून तिकीट मिळालं… मोदींपासून ते महायुतीच्या अजितदादा, शिंदे यांनी फिल्डिंग लावूनही काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी जोरदार मुसंडी मारत राणांचा करेक्ट कार्यक्रम केला…

पण कुणीबी समोर येऊंद्या गुलाल आपलाच असणारय, असा कॉन्फिडन्स प्रत्यक्ष मतदानापासून ते निकालापर्यंत कायम ठेवणाऱ्या नवनीत राणांचा (Navneet Rana) तोंडावर पडण्याचा कार्यक्रम झालाच… बळवंत वानखेडे हे अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार असले तरी त्यांना या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या दोन माणसांनी अमरावतीच्या राजकारणात बरीच उलथापालथ घडवून आणली… आणि राणा दांपत्याच्या हवेत गिरक्या घेणाऱ्या राजकारणाला जमिनीवर आणलं… ती दोन नावं आहेत यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांची… भाजपच्या स्टार खासदार नवनीत राणा यांना पाडण्यासाठी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी कसं जंग जंग पछाडलं होतं? ठाकूर आणि कडू या जोडगोळीने मिळून राणा दांपत्याच्या राजकारणाचे कसे पंख छाटलेत? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

संपूर्ण महाराष्ट्रात राणांची क्रेझ असली तरी अमरावतीतील स्थानिक नेत्यांना राणा दाम्पत्य नेहमी शिंगावर घेत गेले… यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांना तर नवनीत राणा आणि रवी राणा हे अनेक डेंजर स्टेटमेंट करून निकालात काढत होते… याचाच वचपा या ठाकूर आणि कडू जोडगोळीने काढला… अमरावतीच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद तसा नवा नाही. निवडणुकीनंतर नवनीत राणा या भाजपमध्ये जातील, असा संशय यशोमती ठाकूर यांना सुरुवातीपासून होता. त्यामुळे प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्याकडून आघाडीशी प्रामाणिक राहील, अशी शपथ घेण्यास यशोमती ठाकूर यांनी भाग पाडले होते…पण निकालानंतर राणा यांनी पलटी मारली आणि त्या हिंदुत्वाची लाईन पकडत भाजपच्या जवळ गेल्या… तर दुसऱ्या बाजूला रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जिल्ह्यातील वर्चस्वाच्या लढाई हे दोन नेते अनेकदा आमनेसामने आले…

पण भाजपने भली मोठी ताकद आणि प्रचार यंत्रणा पाठीशी लावूनही नवनीत राणा यांच्या राजकारणाचं विमान जमिनीवर आदळलं त्याला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे यशोमती ठाकूर यांनी जमवून आणलेलं बेरजेचं राजकारण…. 2019 ला ज्या नवनीत राणा यांच्यासाठी यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी फिल्डिंग लावली होती…त्याच राणांनी दिलेला शब्द मोडल्यामुळे यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे यांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा लावली होती…दलित, मुस्लिम मतं काँग्रेसच्या बाजूने कशी वळतील यासाठी ठाकूरांनी प्रचाराचा धुराळा उडवून लावला होता… राणा दांपत्याच्या एककल्ली राजकारणामुळे दुखावलेल्या स्थानिक नेत्यांची मोट बांधून त्यांना राणांच्या विरोधात पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्ह करण्यात मोठा वाटा हा यशोमती ताईंचा राहिला… स्थानिक जातीय समीकरण ध्यानात घेऊन निर्णायक ठरणाऱ्या समाजांच्या नेतृत्वाला भेटून ही सगळी मतं एकगठ्ठा बळवंत वानखेडेंच्या पाठीशी कशी राहतील? यासाठी यशोमती ठाकूर यांनी बरीच ताकद लावली… या सगळ्यात काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणायचं हे टारगेट होतंच पण त्यापेक्षा जास्त नवनीत राणांचा कार्यक्रम करायचा! ही भावना जास्त असल्याचं यशोमती ठाकूरांच्या एकूणच बोडी लँग्वेजमधून दिसत होतं…

नवनीत राणा खासदारकीला जोरात आपटल्या त्याचं दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीची वज्रमूठ … तसं पाहायला गेलं तर अमरावतीच्या बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचाराची सगळी धुरा यशोमती ठाकूर यांच्या खांद्यावर होती… त्यासाठी त्यांनी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या सगळ्यांना नवनीत राणा यांच्या विरोधात अमरावतीतून प्रचारात उतरवलं आणि मोठा जनाधार उभा केला… नवनीत राणा यांची तयार झालेली हार्डकोर हिंदुत्वाची इमेज डॅमेज करण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी प्रचारात फुल प्लॅनिंगही केलं होतं…त्यात संविधान बदलवण्याचं नरेटीव, अल्पसंख्याकांना असणारा धोका आणि महागाई – बेरोजगारीचा मुद्दा ही आपल्या प्रचाराची लाईन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढे घेऊन जाण्यात यशोमती ठाकूर यांना यश आल्यानं राणा इथून मोठ्या लीडने पराभूत झाल्या…

आता येऊयात बच्चू कडू यांच्याकडे…

बच्चू कडू (Bachhu Kadu) हे अमरावतीची लोकसभा आर या पार या न्यायाने लढले.. ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते दिनेश बुब यांना प्रहारमध्ये घेत बच्चू कडूंनी अमरावती लोकसभा पिंजून काढला… यावेळेस त्यांच्या रडारवर केवळ एकच विरोधक होता तो म्हणजे नवनीत राणा…रवी राणा आणि नवनीत राणा यांनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्यावर केलेल्या आरोपांचे उट्टे काढत बच्चू कडू यांनी वातावरण तापवून दिलं… मतदारसंघातील अनेक हिंदुत्ववादी मतं बच्चू कडूंनी आपल्या पारड्यात पाडून घेत नवनीत राणा यांच्या पायाखालची वाळू सरकवली… बच्चू कडूंचा प्रचारही हटके राहिला… त्यांनी सभांचा एका मागून एक सपाटा लावलाच पण त्यासोबत सोशल मीडिया ऍक्टिव्ह ठेवून नवनीत राणा यांना जास्तीत जास्त डॅमेज कसं करता येईल? यासाठी मोर्चे बांधणी केली… निकालात राणा जिंकू नयेत म्हणून त्यांनी आपल्या संघटनेची मतं शेवटच्या काही क्षणात काँग्रेसच्या पारड्यात टाकल्याची खेळीही बच्चू कडूंनी खेळण्याचीही मतदारसंघात बरीच चर्चा सुरू आहे…

एकूणच मतांची आकडेवारी बघितली तर दिनेश बुब यांनी खाल्लेल्या मतांमुळेच आज नवनीत राणा या खासदार नाहीयेत, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… थोडक्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्थानिक समीकरण लाईटली घेऊन आपण भाजपच्या फोर्सवर आरामात निवडून येऊ, असा गैरसमज करून घेतला होता… याच गैरसमजला अमरावतीतून यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी सुरुंग लावलाय…त्यामुळे लोकसभेला झालेल्या या पराभवामुळे आता राणा दांपत्याच्या राजकारणाचा सूर्य अमरावतीच्या राजकारणातून मावळला आहे का? नवनीत राणा यांची हवा असतानाही निकालात त्यांचा फुसका बार नेमका का निघाला? या सगळ्या पाठीमागे खरंच यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांचे मजबूत हात होते का? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,

Soaked Foods | ‘हे’ पदार्थ रात्रभर भिजवून खाल्ल्यास शरीराला होईल दुप्पट फायदा, वाचा सविस्तर

Soaked Foods

Soaked Foods | आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काय जेवतो या गोष्टीचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो त्यातही तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे काही खाता त्याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत असतो. अनेक लोकही दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफी पिऊन करतात यामुळे त्यांच्या पचनास देखील मदत होते परंतु दुसरीकडे अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदे मिळतात. हे पदार्थ तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी त्याचे सेवन केले तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो आता आपण अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे रात्रभर भिजवल्याने त्याच्यातील पोषक तत्वांची वाढ होते..

भिजवलेले बदाम | Soaked Foods

बदामांचे सेवन प्रत्येक ऋतूत फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात ते भिजवून खाणे चांगले. यामुळे, त्यांच्या गरम प्रभावामुळे पचनास हानी पोहोचत नाही आणि खराब कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाब सारख्या समस्या देखील दूर होतात.

भिजवलेले हरभरे

हरभऱ्याचे सेवन आरोग्यासाठी किती चांगले आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते. अशा स्थितीत रात्रभर भिजवून खाल्ल्यास ते पचनासाठी खूप चांगले असते.

भिजवलेले मनुके

मनुकामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला खूप फायदे देतात, पण तुम्हाला माहिती आहे का की जर ते भिजवल्यानंतर खाल्ले तर त्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात? भिजवलेले मनुके केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि निरोगी केसांसाठीही खूप महत्त्वाचे आहेत. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असल्यासही याचा दुहेरी फायदा होतो.

भिजवलेले ओट्स

रात्रभर भिजवलेले ओट्स देखील अनेक आरोग्यदायी फायदे देतात. असे केल्याने त्यातील स्टार्च आणि ॲसिडचे प्रमाण कमी होते, जे पचनासाठी खूप चांगले असते

भिजवलेले मूग | Soaked Foods

अंकुरलेले मूग म्हणजेच रात्रभर भिजवलेले मूगही पचनास अनेक फायदे देतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या असेल तर तुम्ही ते भिजवून सेवन करू शकता. वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ते खूप फायदेशीर आहे.