Saturday, December 20, 2025
Home Blog Page 689

Viral Video : अर्रर्रर्रर्रर्र!! सिलेंडरवर चढून नाचत होती महिला; ठुमके लगावताना धापकन् पडली तोंडावर

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करू लागले आहेत. डान्स, स्टंट, अतरंगी चाले, डायलॉगबाजी आणि अजून बऱ्याच विविध आशयाचे व्हिडीओ सोशल मिडीआयवर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. फक्त प्रसिद्धीसाठी बरेच लोक वेळेचाळे करताना दिसतात. या माध्यमातून अनेक गाणी आणि डायलॉग ट्रेंड होताना दिसतात. ज्यावर बरेचजण रिल्स बनवताना दिसतात. हटके व्हिडीओ बनवायच्या नादात बरेच जण स्वतःच हसं करून घेताना दिसतात. असाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्ही डोक्यावर हात माराल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावरील व्हायरल होणार हा व्हिडीओ एका महिलेचा आहे. जी चक्क सिलेंडरवर उभी राहून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरातील सिलेंडरवर उभी राहून जबरदस्त ठुमके लगावते आहे. पण खरी मजा तर पुढे आहे. सिलेंडरवर चढून नाचणारी ही महिला नाचत नाचत जोरात खाली पडते. व्हिडिओच्या शेवटी ती पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ X हॅण्डलवर (पूर्वीचे ट्विटर) PalsSkit नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘रील्स आणि मेंढ्यांची चाल यात काही फरक नाही. (Viral Video) येथे सिलेंडरवरून पडण्याचा ट्रेंड सुरु आहे’. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://twitter.com/PalsSkit/status/1799054356890923352

या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘रील्स बनवली तर दात पुन्हा ठीक होतील’. तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘याला म्हणतात.. रीलवाला नशा’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘भारतात मेंढी चालण्याचा जणू ट्रेंडच चालू आहे’. (Viral Video) तर आणखी एका युजरने म्हटलं आहे की, ‘सिलेंडर सगळ्यांच्या घरात आहे.. पण सध्या हा ट्रेंड झालाय’. तसेच अन्य एका युजरने लिहिलंय, ‘देशात काय काय सुरु आहे.. त्यामुळे काय काय पाहावं लागतंय… अजून काय पाहायला लागेल काय माहित?’

दादा गटाकडून कोणालाच मंत्रिपद नाही? नेमकं कारण काय?

ajit pawar sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह महाराष्ट्रातील ६ खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून यामध्ये भाजपचे ४, शिंदे गटाचे १ आणि रामदास आठवले अशा ६ जणांचा समावेश आहे. मात्र अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेलं नाही. दादा गटाच्या कोणत्याही नेत्याला मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेला नाही. त्यामुळे दादांची झोळी कि रिकामीच राहणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.

अजित पवारांकडे सध्या २ खासदार आहेत. यातील सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत. प्रफुल्ल पटेल याना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. मात्र केंद्रीय मंत्रिपदासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असल्याच्या चर्चा आहेत, या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपआपला दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु दोघांपैकी कोण? यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा असं भाजपकडून सांगण्यात आल्याचे बोललं जातंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट छगन भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आग्रही असल्याने या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

हे सर्व वाद मिटवण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तब्बल दीड तास ही बैठक सुरु होती. दोन्ही नेत्यांनी वाद मिटवावा, यासाठी चर्चा झाली. परंतु शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे दीड तासाच्या बैठकीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस बैठकीतून बाहेर निघाले. आता राष्ट्रवादीत पुढे आणखी काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

Govinda : गोविंदाने लॉन्च केला स्वतःचा OTT ॲप; सब्सक्रिप्शनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Govinda

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) नव्वदीच्या काळापासून आतापर्यंत आपलं क्रेझ कायम ठेवलं आहे. त्याची डान्स करण्याची अनोखी शैली लाखो प्रेक्षकांना भुरळ घालते. बरेच कलाकार गोविंदाला फॉलो सुद्धा करतात. त्यामुळे बॉलिवूड सिनेविश्वात गोविंदा या नावाचं चांगलंच वजन आहे. गेल्या काही काळात गोविंदाने कोणतेही सिनेमे केलेले नसले तरीही त्याच फॅन फॉलोईंग काही कमी झालेलं नाही हे खरं. अशातच आता गोविंदाने डिजिटल प्लॅटफॉर्मच्या दुनियेत एंट्री केली आहे.

गोविंदाने सुरु केला स्वतःचा OTT ॲप (Govinda)

अभिनेता गोविंदाने नुकताच स्वतःचा मालकी हक्काचा डिजिटल ओटीटी ॲप सुरु केला आहे. याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर गोविंदाने त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.

गोविंदाच्या या नव्या ओटिटी ॲपचे नाव ‘फिल्मी लट्टू’ असे आहे आणि याबाबत अभिनेत्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. तसेच या ॲप्लिकेशनचे सब्स्क्रिप्शन किती रुपयाला मिळणार? याबाबत देखील त्याने माहिती दिली आहे.

गोविंदाची इंस्टाग्राम पोस्ट

अभिनेता गोविंदाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची माहिती दिली आहे.



या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘माझा ओटीटी ॲप लट्टू फिल्मी सादर करत आहे. आता डाउनलोड करा. या एंटरटेनमेंट ॲपवर तुम्हाला खूप काही मिळणार आहे. हा ॲप डाऊनलोड करा आणि माझा ”आ गया हिरो” हा सिनेमा पहा’. ही पोस्ट शेअर करताना गोविंदाने या अॅप्लिकेशनचे सब्सक्रिप्शन केवळ १४९ रुपयांना मिळणार असल्याचे सांगितले आहे.

गोविंदाची जबरदस्त कारकीर्द

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने १९८६ साली ‘इलजाम’ नावाच्या सिनेमातून बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. यानंतर त्याने एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले. त्याचे बरेच सिनेमे एव्हरग्रीन आहेत. (Govinda) यामध्ये ‘लव्ह 86’, ‘हत्या’, ‘राजा बाबू’, ‘शोला और शबनम’, ‘कुली नंबर १’, ‘हीरो नंबर १’, ‘आंटी नंबर १’, ‘दुल्हे राजा’, ‘भागम भाग’, ‘हम’, ‘बनारसी बाबू’ असे जबरदस्त सिनेमांच्या नावाचा समावेश आहे.

रेल्वेच्या जेवणात सापडलं जिवंत झुरळ; Video पाहून व्हाल हैराण

cockroach in railway food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे हे प्रवासासाठी सर्वात उत्तम साधन मानलं जात. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी आणि लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी अशी रेल्वेची ओळख असल्याने दररोज करोडो भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा करत असते. मात्र एका प्रवाशाने आयआरसीटीसीद्वारे ऑर्डर केलेल्या जेवणात झुरळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रवाशाने सोशल मीडियावर या झुरळाचा विडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, Aggravating-Wrap-266 नावाचा एका प्रवाशाने रेल्वे प्रवासादरम्यान आयआरसीटीसीकडून जेवण ऑर्डर केले. या जेवणात भात, वरण, चपाती, २ भाज्या आणि गुलाबजामचा समावेश होता, मात्र या गुलाबजाम वर जिवंत झुरळ होते, जे इकडेतिकडे फिरत होते. यानंतर संतप्त प्रवाशाने या झुरळांचा विडिओ काढून reddit वर शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली.

Cockroach in food
byu/Aggravating-Wrap-266 inindianrailways

सोशल मीडियावर हा विडिओ अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला . यंत्र त्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एक यूजर्स म्हणाला, म्हणूनच मी रेल्वे किंवा स्टेशनवर शिजवलेले काहीही खात नाही. एकतर मी माझे स्वतःचे अन्न घेतो किंवा फक्त पॅकेज केलेले स्नॅक्स घेतो. माझ्याकडे काही नसेल तर मी दिवसभर उपाशी राहीन. तर दुसरा एक यूजर म्हणाला, “म्हणूनच मी नेहमी प्रत्येकाला सल्ला देतो की तुम्ही प्रवास करत असलेल्या एसी टियरची पर्वा न करता स्वतःचे जेवण आणा. आणखी एक जण म्हणतो, IRCTC वर कधीही ऑर्डर देऊ नका त्याऐवजी उपाशी पोटी झोपा पण ऑर्डर कधीही करू नका. घरी शिजवलेले अन्न सर्वोत्तम आहे. परंतु या एकूण प्रकारामुळे रेल्वे विभागाची पुन्हा एकदा नाचक्की झाली हे मात्र नक्की…

Indian Postal Department Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; भारतीय टपाल विभागाअंतर्गत भरती सुरु

Indian Postal Department Bharti 2024

Indian Postal Department Bharti 2024 | नोकरी विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय टपाल विभागाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत पीएलआय डायरेक्ट एजंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तुम्हाला थेट मुलाखतीद्वारे या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी ही मुलाखत आयोजित केली जाणार आहे . आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Indian Postal Department Bharti 2024

  • पदाचे नाव- पीएलआय डायरेक्ट एजंट
  • वयोमर्यादा – 18 वर्ष
  • निवड प्रक्रिया g मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – मा. प्रवर अधीक्षक डाकघर रमणमळा कोल्हापूर – 416003
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त केंद्रीय राज्य सरकार बोर्ड संस्थेतून दहावी पास उत्तीर्ण

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे..
  • उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी पत्त्यावर आवश्यक असणे गरजेचे आहे.
  • मुलाखतीला हजर राहताना आवश्यक कागदपत्र जवळ ठेवावी.
  • नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

SBI Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी, 150 पदांची भरती सुरु

SBI Bharti 2024

SBI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याचे संधी मिळणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत व्यापार वित्त अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 150 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती (SBI Bharti 2024) ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 27 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार आणि या तारखेला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | SBI Bharti 2024

  • पदाचे नाव – व्यापार वित्त अधिकारी
  • पदसंख्या – 150जागा
  • वयोमर्यादा – 23 ते 32 वर्ष
  • अर्ज शुल्क
  • जनरल उमेदवार 750 रुपये
  • एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांना फी नाही
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2024
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवणे गरजेचे

अर्ज कसा करावा ? | SBI Bharti 2024

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना महत्त्वाची कागदपत्र अपलोड करायची आहे.
  • 27 जून 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Mahesh Kothare : शरद पवारांमुळे तात्या विंचूने गाठलं लंडन; महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा

Mahesh Kothare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahesh Kothare) मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला’ हा सिनेमा तुफान गाजला. एव्हरग्रीन सिनेमांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात. चित्रपटाला खरी मजा आणली ती तात्या विंचू बाहुल्याने आणि त्यामुळे आजही प्रेक्षकांमध्ये तात्या विंचू चर्चेचा विषय ठरतो. काही वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आला आणि तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरु झाले आहे. दरम्यान, महेश कोठारे यांनी पहिल्या चित्रपटाच्या प्रिमिअरची एक खास आठवण सांगितली आहे. महेश कोठारेंनी सांगितले की, ‘झपाटलेला’ हा सिनेमा लंडनमध्ये नेण्यासाठी त्यांना शरद पवारांनी मदत केली होती. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

काय म्हणाले महेश कोठारे? (Mahesh Kothare)

एका नामवंत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक- अभिनेते महेश कोठारे यांनी ‘झपाटलेला’ सिनेमाविषयी काही खास आठवणी सांगितल्या. यावेळी महेश कोठारे म्हणाले, ‘माझा झपाटलेला जेव्हा आला, तेव्हा माझी अशी इच्छा होती की मराठीतला पहिला सिनेमा आपण परदेशात रिलीज करायचा. कारण चित्रपट गाजला होता, लोकांना खूप आवडला होता. त्यात लंडनमध्ये बरीच मराठी माणसं आहेत. त्यामुळे मला आपला सिनेमा लंडनमध्ये रिलीज करायचा होता. त्यावेळी संपूर्ण फॅमिलीसोबत मी लंडनला गेलो होतो. तेव्हा तिथे या सिनेमाचा प्रमिअर करता येईल का? याचा देखील विचार केला’.

लंडनमधला तो शो हाऊसफुल्ल

पुढे म्हणाले, ‘लंडनमध्ये माझा चुलत चुलत भाऊ राहत होता. मधुकर कोठारे आणि त्याची बायको शिला कोठारे ही त्यावेळी तिथे मराठी महामंडळाची अध्यक्ष का सेक्रेटरी होती. (Mahesh Kothare) आम्ही तिकडे गेल्यावर त्यांच्या पुढ्यात मी माझी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, मस्त कल्पना आहे. आपण इथे प्रमिअर करु आणि त्यानंतर तिने मराठी लोकांमध्ये त्याची जाहिरात केली. तिने सगळ्या माध्यमातून लंडनमधील लोकांना माहिती दिली आणि पुढे काही घडण्याआधीच लंडनमधला तो शो हाऊसफुल्ल झाला होता’.

शरद पवारांच्या मदतीमुळे झालं शक्य

पुढे सांगितलं, ‘त्यावेळी १३ फेब्रुवारी १९९४ रोजी आम्ही झपाटलेला सिनेमाचा लंडनमध्ये प्रमिअर केला. त्यामुळे लंडनाला मला पुन्हा जायचं होतं. पण जायचं म्हणजे खर्च करावा लागणार होता आणि मग कसं करायचं? असा माझा विचार सुरु झाला. माझी एक चुलत बहिण आहे, तिच्या मिस्टरांचे शरद पवारांसोबत चांगले संबंध होते. माझीही होती, पण त्याची जरा जास्त ओळख होती. म्हणून तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. (Mahesh Kothare) पण त्यावेळी नुकतेच मुख्यमंत्री झाल्यामुळे ते फार व्यस्त होते. त्यावेळी बॉम्बब्लास्ट झाले होते आणि त्यामुळे त्यांना इथे मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. त्या काळात त्यांच्या बऱ्याच भेटीगाठी सुरु होत्या. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. त्यातूनही त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले तुझं काय आहे? लवकर सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये’.

‘मग मी त्यांना सांगितलं की, असं असं आहे आणि मी झपाटलेला सिनेमाचा लंडनला प्रमिअर करतोय. मी आताच जाऊन आलोय आणि त्यामुळे मला पुन्हा जाण्यासाठी तेवढे फंड्स नाहीयेत. यावर ते मला म्हणाले की, ओके मला कळालं. ही फाईल राहू दे इकडे, तू जा. मग मी गपचूप तिथून बाहेर आलो. पण मला माझं काम होईल की नाही.. याची काही श्वाश्वती नव्हती. पण २ दिवसांत मला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमचा चेक तयार आहे. या आणि तो घेऊन जा. (Mahesh Kothare) तेव्हा मी पेपरमध्ये त्याची जाहिरात देखील दिली होती. त्यात लिहिलं होतं, माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशिर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला’, असा हा किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला.

First AI Hospital | व्वा!! सुरु झालं AI हॉस्पिटल; आजारी पडण्यापूर्वीच मिळेल माहिती

First AI Hospital

First AI Hospital | देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. अशातच आता चीन राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे हॉस्पिटल सुरू झालेले आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी हे हॉस्पिटल तयार केलेले आहे. या रुग्णालयात एकूण 14 एआय डॉक्टर आणि चार नर्स आहेत. हे डॉक्टर दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी उपाय योजना तयार करण्यासाठी आणि परिचारिकांना दैनंदिन आधार देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. ही प्रणाली प्रथम वैद्यकीय विद्यापीठांना मदत करण्यासाठी वापरली जाते.

या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल | First AI Hospital

संशोधकांचे म्हणणे आहे की हे एआय डॉक्टर जगातील कोणत्याही प्रकारच्या साथीच्या रोगाचा प्रसार आणि त्यांचे उपचार इत्यादींबाबत माहिती देऊ शकतील. ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, एजंट हॉस्पिटलने अमेरिकन वैद्यकीय परवाना परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरे ९३.६ टक्के अचूकतेने दिली आहेत. एजंट हॉस्पिटलचे लिऊ यांग सांगतात की वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही या भविष्यकालीन आभासी हॉस्पिटलमधून खूप काही शिकायला मिळेल. तसेच लोकांना कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळू शकतील. त्यांच्या मदतीने अधिकाधिक लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय सुरू होणार आहे.

एआय रोबोट्स कारमध्ये इंधन भरतात

आजपर्यंत कधीच रोबोट कारमध्ये इंधन भरताना पाहिलं नाही, तुम्ही हॉलिवूड चित्रपटांमध्येही कार चालकाला इंधन भरताना पाहिलं असेल. असे अनेक देश आहेत जिथे इंधन भरण्यासाठी लोकांना कामावर ठेवले जाते. पण तुम्ही कल्पनाही करू शकता का की असे काही देश आहेत जिथे कारमध्ये इंधन भरण्यासाठी माणसांचा नव्हे तर रोबोटचा वापर केला जातो?

अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथील नॅशनल ऑइल कंपनीने वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ ​​एआयच्या मदतीने एआय रोबोट तयार केला आहे. हा एआय रोबोट इंधन स्टेशनवर अगदी सहजतेने वाहनांमध्ये इंधन भरण्यास सक्षम आहे.

Drinking Water Empty Stomach | सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने होतात गजब फायदे, जाणून घ्या सविस्तर

Drinking Water Empty Stomach

Drinking Water Empty Stomach | आपल्या शरीरासाठी पाणी खूप गरजेचे असते. आपण जेवढे चजात पाणी पिऊ, तेवढे आपले आरोग्य चांगले राहते. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात रिकाम्यापोटी पाणी पिऊन केली, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप चांगला फायदा होईल. आता या लेखांमध्ये आपण रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीराला कोणते फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला देखील सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल, तर ती सवय आजच बदलून रिकामे पोटी तुम्ही पाणी प्यायला सुरुवात करा. तुमच्यात जाणवणारे बदल हे खूप आश्चर्यकारक असतील.

वजन कमी करण्यास उपयुक्त | Drinking Water Empty Stomach

सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही लिंबाचा रस आणि मध घालून देखील ते पिऊ शकता, ज्यामुळे चरबी जलद बर्न होते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ती बदला.

पचन सुधारणे

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही अनेकदा गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर ही सवय लावून घेतल्यास बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने केवळ शरीरच नाही तर त्वचाही हायड्रेट राहते. यामुळे तुम्हाला चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते आणि ते शरीराला डिटॉक्सिफाय करते, त्यामुळे मुरुम आणि मुरुमांच्या समस्येपासूनही भरपूर आराम मिळतो.

बद्धकोष्ठता आराम

सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होतेच पण बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यामुळे मल मऊ होऊन शरीरातील कचरा लवकर साफ होतो.

Chhatrapati Sambhaji Nagar : ‘ही’ आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी; 52 दरवाजांचे शहर अशी आहे ख्याती

Chhatrapati Sambhaji Nagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Sambhaji Nagar) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी न केवळ देशातून तर विदेशातून देखील बरेच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आपल्या महाराष्ट्राला नैसर्गिक सांधनसंपत्तीसह विशेष ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा या समृद्ध महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. याचे कारणही तसेच आहे. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशी अनेक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे या ठिकाणी आहेत आणि म्हणून छत्रपती संभाजी नगरमला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटले जाते. चला तर या जिल्ह्यातील खास पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती घेऊया.

दौलताबाद किल्ला (Chhatrapati Sambhaji Nagar)

औरंगाबाद अर्थात संभाजी नगरपासून १५ किलोमीटर वेरुळजवळ असलेला दौलताबाद किल्ला हा अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दौलताबाद किल्ला हा मूळचा देवगिरी किल्ला. दौलताबाद किल्ला हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा दर्जेदार नमुना आहे. त्यामुळे हा किल्ला पहायला देश- विदेशातून बरेच लोक येत असतात.

अजिंठा – वेरूळ लेणी

औरंगाबादमधील अजिंठा- वेरूळ लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. यातील अजिंठा लेणी औरंगाबादचे प्रमुख आकर्षण असून या लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. (Chhatrapati Sambhaji Nagar) तर वेरूळ लेण्यांना १९५१ साली भारत सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत केले. या लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे.

सोनेरी महल

सोनेरी महल हा एक ऐतिहासिक राजवाडा आहे. जो बुंदेलखंडच्या सरदाराने बांधले होता. औरंगाबादच्या पहारसिंगपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हा सोनेरी महाल आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar) हा राजवाडा ठराविक राजपूत शैलीत बांधलेला असून याच्या भव्य दोन संग्रहित इमारत आहेत. एकेकाळी सोन्याने रंगवलेल्या चित्रांवरून त्याला सोनेरी महल असे नाव देण्यात आले. या महालाचे प्रवेशद्वार पूर्ण कमानींनी सजवलेले असून अत्यंत आकर्षक आहे.

५२ दरवाजे

औरंगाबादची विशेष ओळख म्हणजे हे शहर ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर हे शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या ५२ प्रवेशद्वारामुळे वेशींचे शहर म्हणून ओळखले जाते. (Chhatrapati Sambhaji Nagar) एकूण ५२ मोठ्या दरवाज्यांपैकी सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुना आणि सर्वात मोठा दरवाजा म्हणजे भडकल दरवाजा. जो मलिक अंबरने मुघलांवरील विजयाच्या स्मरणार्थ बांधला होता.

बीबी का मकबरा

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बीबी का मकबरा’ हे अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. या ऐतिहासिक वास्तूला महाराष्ट्राचा ‘ताजमहल’ म्हणून ओळखले जाते. (Chhatrapati Sambhaji Nagar) दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना असल्यामुळे हे ठिकाण आणि ही वास्तू पहायला अनेक पर्यटक आवर्जून येताना दिसतात.