Monday, December 22, 2025
Home Blog Page 690

पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री राजीनामा देणार; महायुतीला मोठा धक्का

shambhuraj desai resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भाषा वापरली आहे. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील असून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. मात्र सातारा लोकसभा निवडणुकीत पाटण या आपल्या हक्काच्या मतदारसंघातून उदयनराजे भोसले याना लीड न मिळाल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) नाराज आहेत. उदयनराजे भोसले हे जरी विजयी झाले असले तरी पाटण मध्ये त्यांना मिळालेल्या कमी मतदानाबद्दल मीच जबाबदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

शनिवारी आयोजित केलेल्या शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे, असा प्रचार करुनसुध्दा उदयनराजेंना मताधिक्य मिळाले नाही. उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे माझाच पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्यांना सुस्ती आल्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहे.

उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता जनतेला व कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात मी संघटनेसाठी काम करणार आहे. लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. मी आमदार म्हणून संघटनेसाठी काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्वास होता, मात्र तो सार्थ करू शकलो नाही, अशी खंत शंभूराज देसाईंनी बोलून दाखवली.

Jambukeshwar Mandir : ‘या’ प्राचीन शिवमंदिरात स्त्री वस्त्र परिधान करून पूजा करतात पुजारी; जाणून घ्या पौराणिक कारण

Jambukeshwar Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jambukeshwar Mandir) आपल्या देशात अनेक प्राचीन तशीच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा इतिहास हा अत्यंत वेगळा आणि आश्चर्यचकित करणारा आहे. यातील बरीच मंदिरे त्यांच्या रहस्यमयी कथा तसेच आख्यायिकांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका प्राचीन शिवमंदिराविषयी माहिती घेणार आहात. भारतात हे एक असे मंदिर आहे ज्याचे स्वतःचे एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे आणि म्हणून इथले पुजारी महिलांचे वस्त्र परिधान करून महादेवाची पूजा करतात. यामागील नेमके पौराणिक कारण काय आहे? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

कुठे आहे हे मंदिर? (Jambukeshwar Mandir)

भारतातील तामिळनाडू राज्यात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तिरुचिरापल्ली येथील जंबुकेश्वर मंदिर. माहितीनुसार, हे मंदिर ७व्या शतकात बांधलेले अत्यंत प्राचीन मंदिर आहे. दक्षिण भारतातील सर्वात भव्य शिवमंदिर म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. असे मानले जाते की, हे मंदिर हिंदू चोल वंशाचा राजा कोकेनगानन याने बांधले होते. या मंदिराची स्थापना अत्यंत लक्षवेधी आणि तितकीच चित्तथरारक आहे. तसेच या मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका देखील अत्यंत वेगळी आहे. ज्याविषयी आपण माहिती घेत आहोत.

काय आहे आख्यायिका?

देशभरातील प्रत्येक शिवमंदिरात शिव- पार्वती विवाह सोहळा मोठ्या जंगी स्वरूपात केला जातो. मात्र, हे एक असे शिवमंदिर आहे जिथे शिव- पार्वती विवाह सोहळा होत नाही. यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार असे सांगितले जाते की, एके दिवशी महादेवांनी देवी पार्वतीला पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले होते. (Jambukeshwar Mandir) तेव्हा देवी पार्वतीने अकिलंडेश्वरीच्या रूपात पृथ्वीवर अवतरून जंबूच्या जंगलात महादेवाची पूजा केली. ते स्थान म्हणजे हे पावन देवस्थान. त्यावेळी देवी पार्वतीने महादेवाच्या दर्शनाने तपश्चर्या पूर्ण केली. तेव्हा देवी पार्वती शिष्या रूपात आणि महादेव गुरू रूपात असल्याने त्यांचा विवाह केला जाऊ शकत नाही. म्हणून या मंदिरात त्यांच्या मूर्ती एकमेकांसमोर बसवल्या जातात. मात्र त्यांचा विवाह केला जात नाही.

धार्मिक मान्यता

तसेच या शिवमंदिरात देवी पार्वतीची अकिलंडेश्वरी म्हणून तर महादेवाची जंबुकेश्वर म्हणून पूजा केली जाते. मात्र धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वती जेव्हा पृथ्वीवर तपश्चर्या करण्यासाठी अवतरली तेव्हा तिने कावेरी नदीच्या पाण्यातून शिव लिंगाची निर्मिती केली होती. (Jambukeshwar Mandir) त्यामुळे जंबुकेश्वर मंदिरात बसवलेल्या शिवलिंगाला ‘अप्पू लिंगम’ असे म्हटले जाते. पार्वती देवीने जांबूच्या झाडाखाली या लिंगाची स्थापना केली होती आणि त्यामुळे येथे जंबुकेश्वर अर्थात महादेवाचे स्थान निर्माण झाले.

स्त्रियांचे कपडे घालून पुजारी करतात महादेवाची पूजा

जंबुकेश्वर मंदिराबाबत सांगायची अशी आणखी एक प्राचीन प्रथा म्हणजे, या मंदिरातील पुजारी महादेवाची पूजा करताना स्त्रीचे कपडे परिधान करतात. असे करण्यामागचे कारण अत्यंत खास आहे. (Jambukeshwar Mandir) ते असे की, या मंदिरात देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी मोठी कडक तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे देवी पार्वतीला स्मरून इथले पुजारी महिलांचे कपडे परिधान करून महादेवाची पूजा करतात. ही प्रथा अत्यंत प्राचीन असून आजही त्या प्रथेचे जसेच्या तसे पालन केले जाते.

Aloe Vera Juice | चहा, कॉफी नाहीतर एलोवेरा ज्यूसने करा दिवसाची सुरुवात, जाणून घ्या फायदे

Aloe Vera Juice

Aloe Vera Juice  | कोरफड ही विविध गुणांनी समृद्ध असलेली एक वनस्पती आहे. जवळपास प्रत्येक आजारामध्ये कोरफडीचा वापर होत असतो. अनेक लोकांच्या घरात देखील कोरफडीची लागवड करतात. कोरफडीमुळे घरातील हवा देखील शुद्ध राहते. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी देखील कोरफडीचे अनेक फायदे असतात एलोवेरा जेलचा वापर आपण त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे आरोग्यासाठी देखील करत असतो. परंतु कोरफडीच्या रस पिणे देखील तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे जीवनसत्व आणि खनिजे असतात. याचा रस पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे कोरफडीचा रस पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असते.

हा कोरफडीचा रस (Aloe Vera Juice ) तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता. यासाठी तुम्हाला कोरफडीची ताजी पाने खुडून त्यामध्ये जेल घाला आणि रस तयार करा. यावेळी तुम्ही कोरफडीच्या पानांच्या खालच्या भागातून बाहेर येणारे पिवळे में स्वच्छ करा आणि त्याचा ज्यूस तयार करा. तसेच तुम्ही बाजारातून देखील एलोवेरा ज्यूस घेऊ शकता. आता एलोवेरा ज्यूस घेऊन घेतल्याने आपल्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात? हे आपण पाहणार आहोत.

पचन सुरळीत चालते | Aloe Vera Juice 

कोरफडमध्ये रेचक गुणधर्म आहेत, म्हणजेच ते आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. त्याचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि आतडे निरोगी राहतात. हे ऍसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या इतर पाचन समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. तथापि, त्याच्या प्रमाणाबद्दल काळजी घ्या. कोरफडीचा रस जास्त प्रमाणात घेतल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तसेच, जर तुम्हाला दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर त्याबाबत सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

प्री-डायबिटीज असलेल्या लोकांसाठी कोरफडीचा रस फायदेशीर ठरू शकतो. हे प्यायल्याने उपवासातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहापासून बचाव करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. पण केवळ त्याच्या मदतीने मधुमेह टाळता येत नाही. यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच, जर तुम्ही बाजारातून कोरफडीचा रस विकत घेतला असेल तर त्यात साखर नसावी हे लक्षात ठेवा.

हिरड्यांसाठी फायदेशीर

कोरफडीचा रस हिरड्या संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतो. हे हिरड्यांना जळजळ आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. त्यामुळे कोरफडीचा रस पिणे तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हिरड्यांमधील वेदनांपासून आराम मिळतो आणि प्लेग दूर होण्यासही मदत होते.

त्वचेसाठी फायदेशीर | Aloe Vera Juice 

कोरफडीचा रस देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि पेशी निरोगी ठेवतात. याशिवाय कोरफड व्हेरा मुरुमांशी लढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एलोवेरा जेल मुरुमांची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय, कोरफडचा रस त्वचेला हायड्रेट करतो आणि तिची लवचिकता वाढवतो, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसण्यापासून प्रतिबंध होतो.

T20 विश्वचषकात आज भारत- पाक आमनेसामने; कसं पहाल लाईव्ह कव्हरेज

IND Vs PAK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय वोल्टेज सामना पाहायला (IND Vs PAK Match) मिळणार आहे. दोन्ही संघ 596 दिवसांनी टी-20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे. भारताने आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला होता, तर पाकिस्तानच्या संघाला मात्र मागच्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचाच या इच्छेने दोन्ही संघ मैदानात उतरतील.

भारतीय संघाबद्दल सांगायचं झाल्यास, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर संपूर्ण मदार आहे. विराट कोहली या वर्ल्डकप मध्ये सलामीला येत असल्याने त्याच्याकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पाकिस्तान विरुद्ध नेहमीच विराट आणि रोहितची बॅट तळपते. त्यामुळे आजही या दोघांकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते. याशिवाय मधल्या फ़लित सूर्यकुमार आणि रिषभ पंतची जादू पाहायला मिळेल. हार्दिक पांड्याची अष्टपैलू खेळी आणि बूम बूम बुमराहच्या भेदक माऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

तर दुसरीकडे पाकिस्तान संघाची परिस्थिती वेगळी आहे. पहिल्या सामन्यात नवख्या अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने या धक्क्यातून पाकिस्तानचा संघ अजूनही सावरलेला नाही. कर्णधार बाबर आझम, विकेटकिपर मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, आणि शादाब खानवर पाकिस्तानची संपूर्ण भिस्त आहे. आज भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. अन्यथा बलाढ्य भारताचा पराभव करणं पाकिस्तान साठी सोप्प काम नसेल.

कुठे होणार भारत vs पाक सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक 2024 सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना कधी सुरू होईल?
हा हाय वोल्टेज सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
2024 च्या T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स 1 HD/SD वर उपलब्ध असेल आणि हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स हिंदी HD/SD वर उपलब्ध असेल.

मोबाईल किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहायची?
डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील आणि सब्स्क्रिबशन घ्यावे लागेल.

Viral Video | अबब ! अजगराने महिलेला जिवंत गिळले; पोट फाडून महिलेचा मृतदेह काढला बाहेर

Viral Video

Viral Video | अनेकवेळा आपण हॉलीवुड चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराची दृश्य पाहिलेली आहेत. यांसारखे दृश्य केवळ सिनेमात पाहायला मिळतात. असे आपल्याला वाटते. परंतु आता हीच घटना खरी घडलेली आहे. इंडोनेशियामध्ये खरोखरच एका अजगराने जिवंत महिलेला गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सेंट्रल इंडोनेशियामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

अजगराने (Viral Video) एका महिलेला जिवंत गिळले आहे. त्या महिलेची आता ओळख देखील पटलेली आहे. या महिलेचे नाव फरीदा असे होते. तर तिचे वय 45 वर्षे होते. दक्षिण सुलावेसी प्रांतातील तालीमपांग या गावातील तिच्या कुटुंबासोबत राहत होती. अजगराने तिला गीळल्याची गोष्ट पहिल्यांदा तिच्या पतीच्या लक्षात आली. फरीदाला चार मुलं असून ती 6जूनच्या संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. ती घरी न आल्याने स्थानिक प्रशासनाबरोबर गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावातील अनेक नागरिक तिच्या शोधकार्यासाठी सहभागी झाले होते.

फरीदाच्या पतीला तिच्या जवळील वस्तू एका निर्जल ठिकाणी सापडल्या. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी देखील आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच भागांमध्ये एक पोट फुगलेला मोठ्या आकाराचा अजगर आढळून आला. अधिकाऱ्यांनी या अजगराचे पोट फाडण्याचा निर्णय घेतला. त्या अजगराचे पोट फाडल्यावर त्यातून फरीदाच डोकं बाहेर आले. फरिदा ज्या कपड्यांमध्ये घराबाहेर पडली होती. त्याच कपड्यांमध्ये तिचा देह अजगराच्या पोटात सापडला. तिला अजगराने जसेच्या तसे गिळले होते. हे अजगर पाच मीटरचा म्हणजेच 16 फुटाचा होता.

अजगराने (Viral Video) संपूर्ण व्यक्तीला मिळण्याचा प्रकार फार दुर्मिळ आहे. परंतु इंडोनेशियामध्ये यापूर्वी असे प्रकार घडले होते. मागील वर्षी एका आठ मीटर लांबीच्या अजगराने एका शेतकऱ्याला गिळले होते. त्याचप्रमाणे 2018 मध्ये सात मीटर लांबीच्या अजगराच्या पोटात 54 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

भाजपने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! जयंत पाटलांचा खोचक टोला

pune rain jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीने महत्वाचे असलेल्या पुणे शहराला पावसाने चांगलेच झोपडले आहे. काल आणि आजच्या सततच्या मुसळधार पावसाने पुण्यातील रस्ते तुंबले आहेत. संपूर्ण पुणे शहर जलमय झालं आहे . पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला! असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

दरम्यान, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांना मंत्रीपदासाठी फोन; पहा कोणाकोणाची वर्णी लागली??

modi phone call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला २९१ जागांसह बहुमत मिळाल असं नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची वर्णी लागली असून सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून खासदारांचे फोन खणखणत आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश असून आरपीआयचे रामदास आठवले यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल आणि रक्षा खडसे याना पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेत. गडकरी आणि पियुष गोयल यांनी यापूर्वी सुद्धा मंत्रिपद भूषवलं आहे तर रक्षा खडसे यांची पहिलीच वेळ असेल. तर शिंदे गटाकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव याना PMO कार्यालयातून फोन आला. एव्हडच नव्हे तर रामदास आठवेल यांनाही मंत्रिपदासाठी फोन आला आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु आहे मात्र अद्याप त्यांना मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.

आतापर्यंत कोणाकोणाला फोन आले?

राजनाथ सिंह (भाजप)
पियुष गोयल (भाजप)
एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
जयंत चौधरी (RLD)
जीतन राम मांझी (HAM)
डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
अर्जुन राम मेघवाल (भाजप)
अमित शहा (भाजप)
नितीन गडकरी (भाजप)
किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
सर्बानंद सोनोवाल (भाजप)
ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप)
चिराग पासवान (लोजप-आर)
अनुप्रिया पटेल (अपना दल)

मोदी शेवटी कुबड्यांवरच आले; रोखठोक मधून राऊतांचा घणाघात

raut on modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यंदा भाजपला स्पष्ट असं बहुमत मिळाल नाही. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्याने मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर टीका केली आहे. मोदी शेवटी कुबड्यांवर आले या मथळ्याखाली राऊतांनी मोदींवर चौफेर टीका केली.मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल असा टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊतांनी काय म्हंटल?

भाजपला 234 जागाच मिळाल्या व बहुमताच्या आकडय़ापासून 40 जागा दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता ‘एनडीए’चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले. मोदी हा देवाचा माणूस (असा त्यांचा दावा), पण देवाचा माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही व बहुमताचे कडबोळे बांधून मोदी सिंहासन प्राप्तीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबडय़ा घेऊन सरकार बनवीत आहेत. नितीश कुमार यांच्या ‘जदयु’ पक्षाला 12 व चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या. त्यामुळे या दोघांच्या अटी मानून मोदी सरकार बनवतील, पण चालवू शकतील काय? 5 जून रोजी मी दिल्लीत होतो. मोदींनी बोलावलेल्या बैठकीस नितीश व चंद्रा हे दोन बाबू उपस्थित होते. मोदी यांना पाठिंबा द्यायच्या बदल्यात या दोन्ही बाबूंना जे हवे ते दिले जाईल काय? चंद्राबाबू यांना लोकसभा अध्यक्षपद, गडकरींकडे असलेले बांधकाम, रस्ते उभारणी व ऊर्जा मंत्रालय हवे, तर नितीश कुमारांना गृह, संरक्षण, परिवहन अशी खाती हवीत. शिवाय रेल्वे खातेही बिहारकडे असावे व ते चिराग पासवान यांच्या पक्षाकडे असावे अशी नितीश कुमारांची भूमिका आहे. मोदी व शहा यांचा प्राणच ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. शिवाय इतर लहान पक्षांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. या सगळय़ा व्यवहाराची मोठी किंमत उद्या देशाला चुकवावी लागेल.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जी तीन प्रमुख पात्रे आहेत, त्यातील एक चिराग पासवान. त्यांचे पाच खासदार बिहारातून निवडून आले. रामविलास पासवान यांचे ते चिरंजीव. रामविलास पासवान हे अनेक वर्षे एनडीएबरोबर राहिले. त्यांचे अकाली निधन झाले. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून चिराग दिल्लीतील जनपथावरील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सीपीडब्ल्यूडी विभागाने निर्घृणपणे पासवान यांच्या बंगल्यातील सर्व सामान बाहेर काढून अक्षरशः फेकले होते. त्यात रामविलास यांच्या पुतळय़ाची मोडतोड झाली. चिराग यांनी बंगला आणखी काही काळ राहावा म्हणून भाजपच्या अनेक मंत्र्यांना फोन केले. नड्डाही त्यात होते, पण त्यांचा फोन घेण्याचे सौजन्य कोणी दाखवले नव्हते. याच चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष मोदी-शहांनी फोडला व त्यांच्या काकांच्या हाती दिला. चिराग यांचे चिन्ह, पक्ष, सर्व काही हिरावून घेतले. ते पासवान आज मोदींचे सरकार पुन्हा अवतरावे म्हणून बजरंग बलीच्या भूमिकेत दिल्लीत वावरत आहेत.

नितीश कुमार यांच्याविषयी न बोललेलेच बरे. त्यांचे राजकीय चारित्र्य उघडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ‘एनडीए’चे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, अशी गर्जना अमित शहा यांनी आंध्रात जाऊन केली होती. नायडू हे फसवणारे, शब्द न पाळणारे गृहस्थ असल्याचे अमित शहांचे बोलणे होते, तर 2019 साली नायडू यांनी मोदी यांना ‘लोकशाहीचे मारेकरी’ म्हटले. मोदी हे अत्यंत पद्धतशीररीत्या देशाच्या घटनात्मक संस्था मोडीत काढीत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची भीती श्री. नायडू यांनी व्यक्त केली. मोदी यांच्या हुकूमशाही कचाटय़ातून सीबीआय, रिझर्व्ह बँक आणि घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगही सुटलेला नाही असे नायडू यांचे जाहीर बोल होते. मोदी-शहांचा निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनचा घपला करून निवडणुका जिंकत असल्याचा त्यांचा आरोप खळबळजनक होता. आता तेच चंद्राबाबू हे मोदी-शहांचे सरकार बनावे यासाठी पुढाकार घेत आहेत. लोकशाहीने कायमचे डोळे मिटावेत अशा या घटना दिल्लीत घडत आहेत.

भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करू पाहणारे नेते व त्यांचे पक्ष या निवडणुकीत लोकांनी फेकून दिले. उत्तर प्रदेशात मायावतींचे राजकारणच संपले असा निकाल लोकांनी दिला. जेथे मोदी-शहांनाच लोकांनी झिडकारले तेथे इतरांचे काय? महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे ‘मी परत येईन’ नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धड घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल. या नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? याच गृहखात्याच्या गैरवापराने नरेंद्र मोदींचे नुकसान झाले व लोकांच्या दृष्टीने ते खलनायक ठरले. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे. बहुमत गेल्याने लोकांची भीती मेली आहे. बहुमत गमावलेल्या भाजपने मोदी यांना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच उठण्याची शक्यता जास्त आहे. असे घडले तर महाभारताच्या चारित्र्याला पुन्हा उभारी येईल! असं सामनातून म्हंटल.

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain Alert 9 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मान्सून दाखल झाला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. इथून पुढे २४ तास अतिशय महत्वाचे असून दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Maharashtra Rain Alert) वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

कोणकोणत्या जिल्ह्याना पावसाचा इशारा – Maharashtra Rain Alert

पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता आहे. रायगड आणि ठाण्यात सुद्धा अशाच प्रकारे पाऊस कोसळण्याची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्हयांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि तुरळक क्षेत्रात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे या भागात रेड अलर्ट देण्यात आलाय.

PM Kisan Samman Nidhi | ‘या’ दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा17 वा हप्ता! सगळ्यात मोठे अपडेट समोर

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहे. ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा देखील होत असतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षी 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत देत असते. हे 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा होत असतात. प्रत्येक हप्ता अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 2 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते जमा झालेले आहेत. आता 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? याची सगळेजण प्रतीक्षा करत आहेत.

भारत सरकारने अलीकडेच पीएम किसान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचा 16 वा हप्ता पाठवला होता. मात्र, हा हप्ता देऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी शेतकरी आता 17 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता सरकार कधी जारी करू शकते हे जाणून घेऊया.

ई-केवायसी करणे आवश्यक | PM Kisan Samman Nidhi

केंद्र सरकार जून किंवा जुलै महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी करू शकते. आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्यासाठी पैसे जारी करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेअंतर्गत जमीन अभिलेख पडताळणी आणि ई-केवायसी केलेले नाही. त्यांना पुढील 17 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे, लाभ मिळविण्यासाठी, तुम्ही तुमचे केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर या योजनेत सादर करणे महत्त्वाचे आहे.