Monday, December 22, 2025
Home Blog Page 691

Vande Bharat Bullet Train : वंदे भारत बुलेट ट्रेन सुटणार सुसाsssट ! ; जाणून घ्या सर्व काही

Vande Bharat Bullet Train : भारतीयांमध्ये रेल्वेची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत यापैकी एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी या गाडीला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. मात्र आता याहून खुशखबर म्हणजे लवकरच वंदे भारत बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून भारतीय रेल्वेत बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे भारतात तयार होणाऱ्या या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 250 किलोमीटर असेल. माध्यमांच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षात 2 मानक गेज बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) तयार करण्याचे काम इंटिग्रल कोच फॅक्टरीला सोपवले आहे. ताशी 250 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या भारतात बनवण्याची ही पहिलीच वेळ असेल. या दोन्ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावतील.

250 किलोमीटर प्रति तास वेग

याबाबत माहिती देताना एका आधकाऱ्याने सांगितले की, ICF, चेन्नईला दोन स्टँडर्ड गेज ट्रेन सेट तयार करण्यास सांगितले आहे, ज्याचा वेग 220 किलोमीटर ते 250 किलोमीटर प्रति तास दरम्यान असेल. आयसीएफ चेन्नईला ही ऑर्डर काही आठवड्यांपूर्वीच लावेकडून मिळाली आहे. आता वंदे भारत बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी जपानी रोलिंग स्टॉक पुरवठादार हिताची आणि कावासाकी यांच्याशी बोलणी सुरू आहेत.2018 मध्ये 10 डब्यांची बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) तयार करण्यासाठी 389 कोटी रुपये खर्च आला होता. परंतु, 2023 मध्ये हा खर्च वाढून 460 कोटी रुपये झाला आहे. जपानी कंपनी बुलेट ट्रेनचा पुरवठा करण्यास तयार आहे पण रेल्वे या ऑफर किंमतीत खरेदी करण्यास तयार नाही.

ICF द्वारे तयार केल्या जातात ट्रेन (Vande Bharat Bullet Train)

भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. यापूर्वी हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रातील भूसंपादनामुळे त्याचे बांधकाम लांबले. दुसरीकडे, आयसीएफ निर्धारित मुदतीपर्यंत ताशी 250 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन विकसित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. वंदे भारत गाड्या चेन्नईतील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे तयार केल्या जात आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) उभारण्याची तयारी सुरू आहे.

Viral Video | कंडक्टर बनला देवदूत ! बसमधून पडता पडता वाचवले प्रवाशाचे प्राण

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहत असतो. काही व्हिडिओ हे खूप ज्ञान देणारे असतात. तर काही व्हिडिओ मधून आपल्याला समाजातील अनेक घटना समजतात. असातच आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बसमधील कंडक्टर हा एका व्यक्तीसाठी देवदूत बनलेला आहे. या कंडक्टरच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका व्यक्तीचा जीव जाता जाता वाचलेला आहे. आता नक्की काय आहे हा व्हिडिओ ते आपण पाहणार आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कंडक्टरच्या बाजूला बसच्या दारातच दोन व्यक्ती उभ्या आहेत. कंडक्टर त्याचे तिकीट काढत आहे. तेवढ्यात बसला मोठा खड्डा लागतो आणि बस उंच उडते. तेव्हा दारात उभा असलेला व्यक्ती दाराच्या दिशेने ढकलला जातो. तो व्यक्ती दारातून बाहेर पडणार असतो. तेवढ्यात एका हातात तिकीट मशीन पकडलेल्या कंडक्टरने दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीचा हात पकडला आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवले. त्या व्यक्तीला सुदैवाने काही झाले नाही. त्या व्यक्तीचा जीव वाचला.

कंडक्टरने केलेल्या या कार्यामुळे कंडक्टरच्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. हा व्हिडिओ केरळमधील आहे. तेथील बसेसमध्ये सीसीटीव्ही असल्याने हा सगळा प्रकार रेकॉर्ड झालेला आहे. त्याचप्रमाणे आता लोक केरळमधील बसेसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे देखील कौतुक करत आहे. काही लोकांनी अशी सुविधा भारतातील प्रत्येक बसमध्ये असावी अशी देखील मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेक लोकांच्या कमेंट येत आहेत. आणि त्या ड्रायव्हरचे मोठ्या प्रमाणात कौतुक देखील होत आहे.

FD Rates : ‘या’ बँकेने सुधारले FD वरील व्याजदर; ग्राहकांना होणार फायदा?

FD Rates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Rates) ॲक्सिस बँक ही एक भारतीय बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. जिच्या मालमत्तेनुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रात तिसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. तर बाजार भांडवलानुसार ही चौथी मोठी बँक आहे. नुकतेच या बँकेने एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. नव्या व्याजदरानुसार ॲक्सिस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना ३% ते ७.२०% इतका व्याजदर प्रदान करणार आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% ते ७.८५% इतका व्याजदर दिला जात आहे. शिवाय ही बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतची FD ऑफर करतेय. यासाठी Axis बँकेचे लागू केलेले हे नवे व्याजदर ७ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत. तुम्हीही ॲक्सिस बँकेचे FD धारक असाल तर नवे व्याजदर लगेच तपासा.

२ करोडपेक्षा कमी किंमतीच्या FD वरील सुधारित व्याजदर (FD Rates)

Axis बँक ७ दिवस ते १४ दिवस, १५ दिवस ते २९ दिवस कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना ३% आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% व्याजदर देत आहेत. तर ३० दिवस ते ४५ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ३.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४ टक्के व्याजदर दिला जात आहे. शिवाय ४६ दिवस ते ६० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४.७५% व्याजदर दिला जातोय. तसेच ६१ दिवस ते ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ५% व्याजदर दिला जातोय.

पुढे ३ महिने ते ४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.२५% व्याजदर दिला जात आहे. (FD Rates) तर ४ महिने ते ५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी आणि ५ महिने ते ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५% व्याजदर प्रदान केला जात आहे. याशिवाय ६ महिने ते ७ महिन्यांपेक्षा कमी, ७ महिने ते ८ महिन्यांपेक्षा कमी आणि ८ महिने ते ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहकांना ५.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.२५% इतका व्याजदर दिला जात आहे.

यामध्ये ९ महिने ते १० महिन्यांपेक्षा कमी, १० महिने ते ११ महिन्यांपेक्षा कमी, ११ महिने ते ११ महिन्यांपेक्षा कमी २५ दिवस आणि ११ महिने २५ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ही बँक सामान्य ग्राहकांना ६% आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.५०% व्याजदर देते आहे. (FD Rates) याशिवाय १ वर्ष ते १ वर्षापेक्षा कमी ४ दिवस, १ वर्ष ५ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी ११ दिवस, १ वर्ष ११ दिवस ते १ वर्ष २४ दिवसांपेक्षा कमी, १ वर्ष २५ दिवस ते १३ महिन्यांपेक्षा कमी, १३ महिने ते १४ महिन्यांपेक्षा कमी आणि १४ महिने ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ६.७०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२०% व्याजदर दिला जातोय.

Axis बँकेकडून १५ महिने ते १६ महिन्यांपेक्षा कमी आणि १६ महिने ते १७ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याजदर प्रदान केला जात आहे. (FD Rates) तसेच १७ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.२०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.८५% व्याजदर दिला जातोय. याशिवाय १८ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७०% व्याजदर मिळतोय.

पुढे २ वर्षे ते ३० महिन्यांपेक्षा कमी, ३० महिने ते ३ वर्षांपेक्षा कमी, ३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% इतका व्याजदर दिला जात आहे. (FD Rates) तर ५ वर्षे ते १० वर्षे कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना ७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% इतका व्याजदर प्रदान केला जात आहे.

राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी प्रफुल पटेलांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार पदाची शपथ

Praful Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत बहुमतांनी विजयी झाल्यानंतर NDA पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासह इतर मंत्र्यांनाही शपथ देण्यात येईल. ज्यात महाराष्ट्रतून अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांचाही समावेश असेल. कारण की, अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

दिल्लीत पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या बाजूने प्रफुल पटेल यांच्या नावाची निवड केली आहे. यासह
देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची देखील मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या राष्ट्रपती भवनात हे सर्व नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ज्यात प्रफुल पटेल देखील शपथ घेताना दिसतील. आता फक्त प्रफुल पटेल यांच्याकडे कोणते खाते देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सत्ता स्थापनेकरिता एनडीएकडून कॅबिनेट मंत्रिपदासाठी चार खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. या सत्ता स्थापनेनंतर लवकरच खाते वाटप ही करण्यात येईल. यामध्ये भाजपकडे अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय अशी खाती राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाकी राहिलेली कृषी, रेल्वे, पंचायत राज आणि इतर खाती कोणाला मिळतील, याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहे. तसेच, उद्या भाजप आणि शिंदे गटाचे नेमके कोणते खासदार शपथ घेतील? हे पाहणे ही महत्त्वाचे ठरणार आहे.

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; FD वरील व्याजदर बदलले

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) भारतात खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ICICI बँक ओळखली जाते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. शिवाय ही बँक आपल्या ग्राहकांसाठी कायम वेगवेगळ्या फायदेशीर योजना घेऊन येत असते. अशातच ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजदर सुधारल्याचे समोर आले आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे FD धारक असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण ICICI बँकेने नुकतेच काही कालावधीच्या एफडीवरील व्याजदर बदलले असून हे नवे दर ६ जून २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.

यामध्ये ICICI बँक ही ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडी ऑफर करत आहेत. ज्यावर ICICI बँक ही ४.७५% ते ६.७५% व्याजदर देत आहे. चला तर ICICI बँकेच्या बल्क एफडीवरील नवे व्याजदर पाहूया.

ICICI बँकेच्या बल्क FD वरील नवे व्याजदर (ICICI Bank)

माहितीनुसार, ICICI बँकेच्या ७ दिवस ते १४ दिवस आणि १५ दिवस ते २९ दिवस कालावधीच्या बल्क एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ४.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ४.७५% इतका व्याजदर दिला जात आहे. तसेच ३० दिवस ते ४५ दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ५.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ५.५०% इतका व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) याशिवाय ४६ दिवस ते ६० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ५.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीसुद्धा ५.७५% इतका व्याजदर दिला जातोय. पुढे ६१ दिवस ते ९० दिवस कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना ६% आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६% व्याजदर दिला जातोय.

ICICI बँककेकडून ९१ दिवस ते १२० दिवस, १२१ दिवस ते १५० दिवस आणि १५१ दिवस ते १८४ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.५०% तर ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६.५०% व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) तसेच १८५ दिवस ते २१० दिवस, २११ दिवस ते २७० दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.७५% आणि ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ६.७५% व्याजदर दिला जात आहे. याशिवाय २७१ दिवस ते २८९ दिवस कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ६.८५% आणि ज्येष्ठ नागरिकांसुद्धा ६.८५% दर दिला जातोय.

पुढे १ वर्ष ते ३८९ दिवस कालावधीसाठी ICICI बँक आपल्या सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.३०% व्याजदर दिला जातोय. तर ३९० दिवस ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५% इतका व्याजदर दिला जातोय. (ICICI Bank) शिवाय १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०५% व्याजदर दिला जात आहे. तर २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे आणि ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षे कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना व ज्येष्ठ नागरिकांना ७% व्याजदर प्रदान केला जात आहे.

Cucumber Farming | काकडीची शेती बदलेल तुमचे नशीब, खर्चाच्या चार पट होईल नफा

Cucumber Farming

Cucumber Farming | आजकाल शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रकारचे प्रयोग करायला लागले आहेत. आधुनिक पद्धतीचे पिके घेऊन आता शेतकरी शेतामध्ये चांगल्या प्रमाणात लागवड करत आहेत.आज देखील आम्ही तुम्हाला शेतातील अशाच एका पिकाबद्दल माहिती देणार आहोत. ज्यातून तुम्ही खूप चांगला व्यवसाय करू शकता. आणि तुम्हाला चांगला आर्थिक फायदा देखील होईल. तुम्ही काकडीच्या लागवडीचा व्यवसाय करून खूप चांगला पैसा कमवू शकता. कमी वेळेमध्ये यातून चांगली कमाई होते. या काकडीच्या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते. म्हणजेच वालूकामई माती, चिकन माती, काळी माती गाळाची माती या सर्व ठिकाणी तुम्ही काकडीच्या पिकाची लागवड करू शकता.

काकडीचे पीक किती दिवसात तयार होईल? | Cucumber Farming

तुम्ही तुमच्या गावापासून शहरापर्यंत कुठेही लागवड करू शकता. या दिवसात काकड्यांना चांगली मागणी असते. कोशिंबीरही काकडीशिवाय अपूर्ण राहते. आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. काकडीचे पीक ६० ते ८० दिवसांत तयार होते. काकडीचा हंगाम उन्हाळा मानला जातो. म्हणजेच या हंगामात काकड्यांना मोठी मागणी असते. 5.5 ते 6.8 दरम्यान मातीचा pH काकडीच्या लागवडीसाठी चांगला मानला जातो. हे नद्या आणि तलावांच्या काठावर देखील घेतले जाऊ शकते.

सरकारकडूनही मिळणार अनुदान

उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने काकडीच्या शेतीचा व्यवसाय सुरू केला. त्याने अवघ्या 4 महिन्यांत 8 लाख रुपये कमावले. काकडी लागवडीसाठी त्यांनी नेदरलँडमधून काकडीची पेरणी केली होती. या काकड्यांची खासियत म्हणजे त्यांना बिया नसतात. त्यामुळे मोठ्या रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये या काकड्यांना मागणी जास्त होती. या शेतकऱ्याने या काकडीची लागवड सुरू करण्यासाठी शासनाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतले आणि शेतातच सेडनेट हाऊस बांधले.

स्थानिक काकडीची किंमत 20 रुपये/किलो असल्यास, नेदरलँडची ही बिया नसलेली काकडी 40 ते 45 रुपये/किलो दराने विकली जाते. सोशल मीडियाचा वापर मार्केटिंगसाठीही करता येतो. वर्षभर सर्व प्रकारच्या काकड्यांना मागणी असते, कारण काकडीचा वापर कोशिंबीर म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो.

Mega Block Update: मुंबईकरांनो ऐका!! रविवारी मुंबई लोकलच्या या मार्गावर राहणार मेगाब्लॉक

Mega Block News

Mega Block Update| मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे हा मेगा ब्लॉक घेतला जात आहे. परिणामी अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही फेऱ्यांना विलंब होणार आहे. ज्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

मेगा ब्लॉकचा कालावधी (Mega Block Update)

रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.०० दरम्यान, अप आणि डाउन धीमा मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक राहणार आहे. यामुळे धीम्या मार्गारील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर काही फेऱ्या रद्द केल्या जातील. उद्या अप आणि डाउन मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान देखील सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय निवडावा लागेल.

दरम्यान, मध्यंतरी मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. काही तांत्रिक कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली होती. या काळातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. परिणाम या मेगाब्लॉकमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तर लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक गैरसोयीचा सामना करावा लागला होता.

Cleaning Hacks : घामाच्या कपड्यांना राहतात डाग आणि दुर्गंधी ? ‘या’ पद्धतीने न धुता करा स्वच्छ

cleaning hacks cloths

Cleaning Hacks : उन्हाळ्यात दिवसभर घाम येत असल्यामुळे कपड्यांना घामाचे विशिष्ट डाग पडतात. एवढेच नाही तर कपड्यांना दुर्गंधी सुद्धा येते. अनेकदा महागाडे डिटर्जंट वापरून देखील ही दुर्गंधी आणि डाग कमी होत नाही. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे न धुता देखील घामाचे हे हट्टी डाग आणि दुर्गंधी तुम्ही घालवू शकता. घराच्या घरी उपलब्ध (Cleaning Hacks) असलेल्या वस्तूंचा वापर करून तुम्ही हे डाग घालवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत नक्की या ट्रिक्स ?

बेकिंग सोडा

खरंतर बेकिंग सोडा खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो पण अनेक क्लिनींग हॅकस मध्ये देखील बेकिंग सोडा वापरला जातो. कपड्यावरील घामाचे डाग घालवण्यासाठी कपड्याच्या ज्या भागावर डाग पडले आहेत त्या भागावर थोडासा बेकिंग सोडा टाका नंतर ते तसेच ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर ब्रशने हलक्या हाताने घासून (Cleaning Hacks) स्वच्छ करा.

व्हीनेगर

स्वयंपाकात वापरण्यात येणारे व्हिनेगर एका प्रकारचे आम्ल आहे. त्यामुळे अनेक क्लिनींग टेक्निक मध्ये त्याचा वापर केला जातो. कपड्यांची घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरेल. यासाठी पाणी आणि व्हिनेगर एका स्प्रे बॉटल मध्ये समप्रमाणात घेऊन ते डागांवर स्प्रे करा. त्यानंतर ते तसेच १० मिनिट राहू द्या. नंतर कोरड्या कापडाने (Cleaning Hacks) पुसून टाका.

कॉर्न स्टार्च

केवळ घामाचे नाही तर कोणत्याही प्रकारचे डाग कपड्यावर पडले असतील तर ते घालवण्यासाठी कॉर्न स्टार्च हा चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कॉर्न स्टार्च तेल शोषून घेते. त्यामुळे कपड्याच्या डागांवर कॉर्नस्टार्चचा थर लावून ठेवायचा ते रात्रभर तसेच बाजूला राहू द्या आणि सकाळी ब्रशने ते कॉर्नस्टार्च (Cleaning Hacks) काढून टाका.

लिंबाचा रस (Cleaning Hacks)

लिंबाचा रस सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे क्लिनींग साठी सुद्धा त्याचा चांगला वापर होऊ शकतो. लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंटचे काम करतो. कपड्यावर घामाचे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी लिंबचा रस डागांवर लावा. १५ मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. मात्र गडद रंगाच्या कपड्यांवर याचा वापर करू नका कारण त्यामुळे रंग जाण्याची (Cleaning Hacks) शक्यता असते.

Fertilizer Rate | शेतकऱ्यांच्या खिशाला बसणार कात्री, खतांच्या किमतीत झाली लक्षणीय वाढ

Fertilizer Rate

Fertilizer Rate | शेती करताना शेतकऱ्यांना सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बियाणे कोणते पेरावे? त्याचप्रमाणे कोणत्या खतांचा वापर करावा? या सगळ्या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते. अशातच आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण रासायनिक खतांच्या किमतीत आता मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून आलेले आहे.

कृषी केंद्र संचालक किंवा डीलर यांच्याकडे खतांचा साठा पुरेसा आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या (Fertilizer Rate) भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेती करताना रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीच्या पिकाचा रोगराईपासून तसेच कीटकांपासून बचाव करण्यासाठी रासायनिक खत गरजेचे असते. परंतु आता रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

खरीप हंगामाची पेरणी जून महिन्यात होत असली. तरी मे महिन्यापासूनच खतांची खरेदी चालू झालेली आहे. त्याशिवाय बेसल डोस देणे सुद्धा आवश्यक असल्याने खतांची मागणी ही वाढलेली आहे. परंतु आता रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मिश्र खते, सुपर पोटॅशच्या भावात ही वाढ झालेली आहे. त्यामुळे डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या अंतर मशागतीच्या खर्चातही मोठा मोठी वाढ झालेली आहे.

ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर 300 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. खोल नांगरणीचा खर्च हा 2 हजार रुपये प्रति एकरावर गेलेला आहे. त्यात आता खतांच्या किमती देखील वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

खतांच्या किमतीत होणार दीडपटीने वाढ | Fertilizer Rate

गेल्या दोन वर्षांपूर्वीच खतांच्या किमतीमध्येच सुमारे दीड पटीने वाढ करण्यात आलेली आहे. आता आणखी 250 रुपयांपर्यंत खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या शेतमालाच्या किमती सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतीत वाढ झालेली आहे.