Monday, December 22, 2025
Home Blog Page 692

Best Dams In Pune : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर पुण्यातील ‘या’ 5 सुंदर धरणांना अवश्य भेट द्या

Best Dams In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Dams In Pune) कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाच्या मुसळधार सरींमूळे पुणेकर सुखावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने धुवाँधार बॅटिंग केली आहे. त्यामुळे सर्वत्र थंड आणि आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. अशा वातावरणात निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स आवर्जून फिरायला जायचं प्लॅनिंग करू लागतात. जर तुम्हीही मान्सून एन्जॉय करण्यासाठी फिरायला जायचं प्लॅनिंग करताय तर मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण आज आम्ही पुण्यातील टॉप ५ सुंदर धरणांची माहिती देणार आहोत. जिथे पावसाळ्यात फिरायला जाणे तुमच्यासाठी अत्यंत आनंदायी ठरेल.

1. पानशेत धरण (Best Dams In Pune)

पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुठा नदीची उपनदी आंबी नदीवर पानशेत धरण आहे. हे एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. ज्याला ‘तानाजीसागर धरण’ म्हणून देखील ओळखतात. हे धारण त्याच्या नयनरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. पावसाळ्यात इथला निसर्ग आणखीच सुंदर आणि आकर्षक ठरतो.

2. बेगडेवाडी धरण

पुण्यातील तळेगावमध्ये बेगडेवाडी धरण आहे. जे पावसाळ्यात पाहण्याजोगे अत्यंत सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे धरण त्याच्या शांततेसाठी ओळखले जाते. (Best Dams In Pune) शहरापासून जवळ असूनही या ठिकाणी एक निस्सीम शांतता अनुभवता येते. त्यामुळे आल्हाददायी अनुभवासोबत शांत निवांत वेळ घालवायचा असेल तर पर्यटकांनी येथे आवर्जून यावे.

3. खडकवासला धरण

महात्मा फुलेंनी बांधलेले हे खडकवासला धरण पुण्याजवळील सर्वात मोठ्या पिकनिक स्पॉट्सपैकी एक आहे. या धरणाला भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे पावसाळा. या मोसमात इथले वातावरण अतिशय सुंदर होते. (Best Dams In Pune) शुभ्र धुके आणि थंडगार वाऱ्यामुळे धरणाचा परिसर आल्हाददायी होतो. जो अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे आवर्जून येतात.

4. पवना धरण

पवना धरण हे पुणे जिल्ह्यात लोणावळ्यापासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील बलाढ्य पवना नदीच्या पलीकडे बांधलेले धारण आहे. (Best Dams In Pune) या धरणाच्या परिणामी, त्याला लागून एक कृत्रिम पवना तलाव देखील तयार झाला आहे. हे ठिकाण पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याने असे काही बहरते की, पाहताना मन आनंदी होते.

5. कासारसाई धरण

कासारसाई धरण हे पुणे शहरात हिंजवडी आयटी पार्कच्या अगदी जवळ आहे. कासारसाई धरणाचा परिसर अत्यंत सुंदर असून पावसाळ्यात त्याचे सौंदर्य आणखीच खुलून येते. (Best Dams In Pune) या ठिकाणी भेट देण्यासाठी पावसाळा हा सर्वात बेस्ट ऋतू मानला जातो. या ठिकाणी सनसेट पहायला कायम पर्यटकांची गर्दी असते.

रोहित शर्माला पुन्हा दुखापत; पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढलं

Rohit Sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय वोल्टेज सामना होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य या मॅच कडे लागलं आहे. मात्र तत्पूर्वी भारतीय चाहत्यांना धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकादा जखमी झाला असून आज सरावादरम्यान फलंदाजी करताना रोहितला दुखापत झाली. मात्र तरीही त्याने पुढे आपला खेळ सुरु ठेवला. परंतु पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितला दुखापत होणं टीम इंडियाला परवडणार नक्कीच नाही.

नेमकं काय घडलं?

सराव सत्रादरम्यान रोहितला स्पेशलिस्टच्या थ्रो डाऊन बॉलचा फटका बसला. फलंदाजी करताना रोहितच्या बोटाला चेंडू लागला. यानंतर फिजिओने तत्काळ रोहितच्या दुखापतीबाबत अपडेट घेतले. या सर्व प्रकारामुळे रोहितच्या फलंदाजीच्या सरावावरही काही काळ परिणाम झाला, पण नंतर रोहितने पुन्हा सराव सुरू ठेवला. खरं तर रोहितच्या हाताला दुखापत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाल्याने भारतीयांचा जीव भांड्यात पडला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.पहिल्या सामन्यात अमेरिका सारख्या नवख्या संघाने पाकिस्तानला पराभूत केल्याने नक्कीच पाकिस्तान बॅकफूटवर असेल तर भारताने आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा दणदणीत प्रभाव केल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. आता पाकिस्तानला पराभूत करत नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न रोहित सेनेचा असेल. उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य असणार आहे.

Falgu River : जमिनीच्या आतून वाहणारी शापित नदी; जिचा रामायणाशी आहे जवळचा संबंध

Falgu River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Falgu River) आपल्या देशात अनेक रहस्य दडलेली आहेत. ज्यांपैकी काही रहस्यांची टोटल अद्याप विज्ञानाला सुद्धा लागलेली नाही. अशाच एका अनोख्या आणि अद्भुत नदीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. देशात अनेक नद्या आहेत. ज्यांच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याने अनेक राज्य, जिल्हे आणि लहान मोठी गावं समृद्ध आहेत. मात्र, आपल्या देशात एक अशीही नदी आहे जी वर्षभर कोरडी असते आणि तरीही वाहते. होय. कारण या नदीचा प्रवाह जमिनीच्या आतून जातो. शिवाय या नदीचा रामायणाशी संबंध सांगितला जातो. अशी ही अद्भुत नदी कोणती आणि तीचे स्थान कोठे आहे? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

रहस्यमयी नदी (Falgu River)

या रहस्यमयी आणि अद्भुत नदीचे नाव फाल्गु नदी असे आहे. जी बिहारमधील गया येथे वाहते. ही नदी वर वर कोरडी दिसते. मात्र, या नदीचा प्रवाह जमिनीच्या आतून वाहतो. येथे येणारे भाविक जमीनीच्या आतून वाळू उखरून नदीचे पाणी काढतात आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांना प्रार्थना करतात. ही पूर्वीपारची मान्यता आहे. जी आजही जशीच्या तशी आहे. ही नदी जमीनीच्या आतून वाहत असल्याने तिला ‘अंत सलिला’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे या अंता सलीलावर लोकांची अढळ श्रद्धा आहे. या नदीचा इतिहास सांगणारे जाणकार सांगतात की, या नदीचा रामायणाशी खास संबंध आहे. याविषयी जाणून घेऊ.

रामायणाशी काय संबंध?

मोक्षनगरी अशी ओळख असलेल्या बिहारमधील गया जिल्ह्यात विष्णुपद मंदिराच्या काठी ही नदी वाहते. मात्र, तरीही या नदीत पाण्याचा साठा राहत नाही. याचे कारण, देवी सीतेचा शाप सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचे पिता राजा दशरथ यांच्या निधनानंतर पिंडदान करण्यासाठी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह गयाधामला गेले होते. (Falgu River) त्यावेळी प्रभू श्रीराम हे बंधु लक्ष्मणासह काही साहित्य गोळा करण्यासाठी निघाले असताना आकाशातून एक आकाशवाणी झाली. ज्यात त्यांना पिंड दान करण्याची वेळ सांगितली गेली. आकाशवाणी ऐकून देवी सीतेने सासऱ्यांचे पिंड दान अर्पण करीत गाय, कावळा, पंडित आणि फाल्गु नदीला साक्षी मानले.

जेव्हा प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणसोबत परतले तेव्हा पिंडदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली होती. ते पाहून प्रभू श्रीरामांनी घडलेल्या प्रकाराबाबत देवी सीतेला विचारणा केली. तेव्हा देवी सीतेने पंडित, गाय, कावळा आणि फाल्गु नदीला साक्षीदार म्हणून संबोधले आणि घडलेली कथा सांगितली. (Falgu River) मात्र, प्रभू श्री रामांनी जेव्हा पित्याच्या पिंड दानाबद्दल महत्वाचे ४ प्रश्न विचारले तेव्हा फाल्गु नदीने खोटे सांगितले की, माता सीतेने पिंड दान केले नाही. हे ऐकून देवी सीतेला राग अनावर झाला आणि त्यांनी फाल्गु नदीला शाप दिला. तेव्हापासून फाल्गु नदी आटली आणि त्यानंतर भूगर्भातून वाहू लागली, अशी ही आख्यायिका आहे.

फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान केल्यास होतो सात पिढ्यांचा उद्धार

फाल्गु नदीला देवी सीतेचा शाप असला तरीही पिंड दानासाठी या नदीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे जो कुणी फाल्गु नदीच्या तीरावर पिंडदान आणि तर्पण अर्पण करेल त्याच्या पूर्वजांना गतीने मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. तसेच या ठिकाणी पिंडदान अर्पण केल्याने कुटुंबातील सात पिढ्यांचा उद्धार होतो आणि पिंड दान करणारा स्वतः परम स्थिती प्राप्त करतो. (Falgu River) त्यामुळे संपूर्ण देशभरात श्राद्धासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ५५ स्थळांमध्ये बिहारमधील गया हे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते.

Tata Altroz ​​Racer 9.49 लाख रुपयांत लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Tata Altroz Racer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने भारतीय बाजारात Tata Altroz ​​Racer हि कार लाँच केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये या कारचे अनावरण झालं होते. अखेर आता ती मार्केट मध्ये दाखल झाली असून यामध्ये ग्राहकांना अनेक खास फीचर्स मिळत आहेत. Tata Altroz ​​Racer, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच करण्यात आली असून तिची सुरुवातीची किंमत 9,49,000 रुपये आहे. गाडीचा लूक सुद्धा अतिशय स्पोर्टी असल्याने ग्राहकांना नक्कीच हि कार पसंतीस उतरेल असं बोललं जातंय.

इंजिन –

टाटा अल्ट्रोझ रेसरमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडलेलं असून 20 पीएस पॉवर आणि 170 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा असा दावा आहे कि हि कार खूपच मजबूत आणि शक्तिशाली आहे. ग्लोबल NCAP कडून या कार्ल 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे.

फीचर्स – Tata Altroz ​​Racer

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, टाटा अल्ट्रोझ रेसरमध्ये (Tata Altroz ​​Racer) R16 अलॉय व्हील, आयआरए कनेक्टेड कार तंत्रज्ञान, 7-इंच TFT डिजिटल क्लस्टर, 6 एअरबॅग्ज, व्हॉईस असिस्टसह इलेक्ट्रिक सनरूफ, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लेदरेट सीट यांचा समावेश आहे. याशिवाय, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 360 डिग्री कॅमेरा, स्टीयरिंग माउंटेड क्लस्टर कंट्रोल्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, पॅसिव्ह एंट्री पॅसिव्ह स्टार्ट सिस्टम, एक्सप्रेस कूल, रीअर आर्मरेस्ट, रीअर वायपर्स आणि वॉश आणि रेन सेन्सिंग वायपर्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

किंमत किती?

Tata Altroz ​​Racer च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, R1 व्हेरिएंटची पेट्रोल मॅन्युअल इंजिन-ट्रांसमिशन पर्यायातील एक्स-शोरूम किंमत 9,49,000 रुपये आहे. तर Altroz ​​R2 ची एक्स-शोरूम किंमत 10,49,000 रुपये आहे आणि R3 च्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 10,99,000 रुपये आहे. Altroz ​​च्या 3 नवीन व्हेरियंटच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर XZ lux व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8,99,900 रुपये आहे, नवीन XZ+S लक्स व्हेरिएंटची किंमत 9,64,990 रुपये आहे . हि कार ॲटॉमिक ऑरेंज, ॲव्हेन्यू व्हाइट आणि प्युअर ग्रे रंगात उपलब्ध आहे.

दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार? त्या ट्विटने चर्चाना उधाण

Walse patil and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे हात मिळवणी केल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला असल्याचे दिसत आहे. यात राज्यामध्ये अजित पवार गटाचे मोजून एकच सीट निवडून आल्यामुळे तर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या घडामोडींमध्ये दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात (Sharad Pawar Group) येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना फुंकर मारलीये ती दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी केलेल्या ट्विटने

शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा विजय झाल्यानंतर पूर्वा वळसे पाटील यांनी अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करत, “डॉ अमोल कोल्हे साहेब यांचा दणदणीत विजय; मनःपूर्वक अभिनंदन” असे म्हणले आहे. यासह त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाल्यामुळे त्यांना देखील भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमुळे, पूर्वा पाटील या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या बाजूने विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरताना दिसतील, असे तर्क लावले जात आहेत.

त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील देखील शरद पवारांच्या गटात येण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन असे पाटील याबाबत नेमकी काय भूमिका घेतील, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला होता. ज्यात, “अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल” असे म्हटले होते.

Viral Photo : मन कि बात!! भररस्त्यात उभ्या युवकाच्या हातातील ‘पाटी’वरचा संदेश वेधतोय तरुणांचं लक्ष

Viral Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Photo) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसतात. डान्स, स्टंट, जुगाड हे तर रोजच झालं आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असतात त्या पुणेरी पाट्या, जाहिरातींचे फोटो आणि हटके डायलॉगबाजी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील पाट्यांचे नेटकऱ्यांनासुद्धा विशेष आकर्षण वाटते. कारण, यावर लिहिलेला आशय हा अत्यंत लक्षवेधी असतो. आताही सोशल मीडियावर एका तरुणाचा फोटो व्हायरल होतो आहे. भररस्त्यात उभ्या असलेल्या या तरुणाच्या हातात एक पाटी आहे आणि यावर लिहिलेला मजकूर वाचून बऱ्याच तरुण मुलांना मन की बात बोलल्याचं फिलिंग येणार आहे.

काय आहे मजकूर? (Viral Photo)

सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एक तरुण मुलगा भररस्त्यात हातामध्ये पाटी घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातातील पाटीवर एक मजकूर लिहिला आहे. तो मजकूर असा आहे की, ‘भावा, तू तिला कितीही रंग लाव, पण एक दिवस ती तुझं आयुष्य बेरंग करणार’. हा तरुण या मजकुरातून अनेक तरुण मुलांना मोफत सल्ला देताना दिसतोय. बऱ्याचदा तारुण्यात झालेलं प्रेम वचनांचा पलीकडे जात. बरेच लोक अगदी झोकून प्रेम करतात आणि ८ – १० वर्ष रिलेशनशिपमध्ये राहतात.



इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर अचानक त्यांना हे नातं टिकणार नाही याची उपरती होते. त्यामुळे कस्मे- वादे अपूर्णच राहतात. यात चूक दोघांची किंवा एका कुणाची असू शकते. पण नातं तुटतं हे महत्वाचं. अशा ब्रेकअप्सवर बरीच हिंदी, मराठी गाणीसुद्धा आहेत. पण तरीही अशा व्हायरल पाट्या कायम लक्षवेधी ठरतात. (Viral Photo) आताही सोशल मीडियावर या तरुणाच्या मोफतर सल्ला पाटीचा फोटो तुफान व्हायरल होतो आहे. जो पाहून काहींना हसू थांबवता येत नसेल तर काहींना अचानक अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची आठवण झाली असेल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल फोटो सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर ag_creation_004 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोबत कॅप्शनमध्ये, ‘भाऊ जरा जास्तच खरं बोलला’ असं लिहिलं आहे. या फोटोला आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा फोटो शेअर सुद्धा केला आहे. (Viral Photo) यावर बऱ्याच तरुण मंडळींनी विविध मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, ‘रंग नाही चुना लावणार..’. तर आणखी एकाने लिहिलंय, ‘मन कि बात.. खरंच.. बेरंग करून गेली यार!!’ तर आणखी एकाने लिहिलंय, ‘तिने पाहिलं तर ब्रेकअप होईल रे..’

मोठी बातमी!! INDIA आघाडीची नितीशकुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर

nitish kumar kc tyagi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला काठावरच बहुमत मिळाल्याने एकेकाळचे इंडिया आघाडीचे मित्र असलले नितीशकुमार आणि चंद्रबाबु नायडू यांचं महत्व वाढलं आहे. या नेत्यांनी पुन्हा आपल्याकडे यावं म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तरीही या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं समर्थन दिले. याच दरम्यान, जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी एक मोठं विधान करत खळबळ उडवुन दिली आहे. इंडिया आघाडीने नितीशकुमार याना पंतप्रधान पदाची ऑफर (Nitishkumar PM Offer By INDIA Alliance) दिली होती. मात्र त्यांनी ती धुडकावून लावल्याचे केसी त्यागी यांनी म्हंटल आहे.

एका वृत्तपत्राशी बोलताना केसी त्यागी म्हणाले, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नितीश कुमारांना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. इंडिया आघाडीचे संयोजक पद देण्यासाठी काँग्रेसने कुरकुर केली आणि आता नितीश कुमार यांना पंतप्रधान पद द्यायला निघालेत. खरं तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमार यांना दिलेल्या वाईट वागणुकीमुळे त्यांनी विरोधकांशी संबंध तोडले आहेत. तर दुसरीकडे मात्र भाजप जेडीयूला मान देत आहे असं त्यांनी म्हंटल.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. नितीशकुमार यांचं जेडीयूचे 12 आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या १६ खासदारांच्या पाठिंब्यावर मोदी सरकार तरल आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना इंडिया आघाडीकडे खेचून मोदी सरकार पाडण्याचा इंडिया आघाडीचा डाव होता. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी मात्र मोदींना आपला जाहीर पाठिंबा दिल्याने इंडिया आघाडीचे मनसुबे धुळीला मिळाले. या दोन्ही नेत्यांनी भाजपला समर्थन दिल्याने इंडिया आघाडीला पुनः एकदा विरोधात बसावं लागणार आहे.

श्रीकांत शिंदेंची मंत्रीपदी नियुक्ती करावी; शिवसेनेच्या सर्व खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Eknath Shinde and Shrikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीत NDA ला बहुमत मेल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी केंद्रात हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये नेमके कोणाकोणाला स्थान देण्यात येईल, याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमध्येच शिवसेनेच्या बाजूने श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व खासदारांनी केली आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घेण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या NDA तील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असावे, अशी चर्चा सुरू आहेत. यात मंत्रीपद कोणाच्या वाट्याला येईल याबाबत कोणतीही स्पष्टता झालेली नाही. दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदेंची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एका तरूण खासदाराला मंत्रीपद देण्यात यावे, अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत आग्रह केला.

दरम्यान, एनडीए सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये मंत्रीपदावरून कोणताही वाद नको म्हणून एका तरुण खासदारालाच मंत्रीपद देण्यात यावे अशी भूमिका सर्व खासदारांनी घेतली आहे. आताच्या घडीला शिंदे गटात प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, रविंद्र वायकर हे सर्व वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे आता मंत्रीपद नेमके कोणाच्या वाट्याला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Viral Video : आनंदी आनंद गडे!! पावसात आनंदाने नाचू लागला उंदीर मामा; व्हिडीओ पाहून वाटेल मजा

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) यंदाचा उन्हाळा इतका कडक होता की, प्रत्येकाच्या जीवाचे हाल झाले. घामाच्या धारा आणि सतत लागणाऱ्या उष्ण वाफांमुळे सगळेच वैतागले होते. फक्त माणूस नाही तर इतर सजीवही उकाड्याने अक्षरशः हैराण झाले होते. दरम्यान, नुकत्याच देशभरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. ज्यामुळे सर्वत्र आल्हाददायी वातावरण निर्माण झालं आहे. चातकासारखी वाट पाहणारा प्रत्येक सजीव आता सुखावला आहे. यातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक उंदीर पाऊस आल्याच्या आनंदात चक्क नाचताना दिसतोय.

पाऊस आला.. म्हणून नाचू लागला उंदीर मामा (Viral Video)

पाऊस आला की, आनंदाला उधाण येतं. मनाला सुखावणाऱ्या या सरी बरसू लागताच आपोआप मन प्रसन्न होतं. आतापर्यंत तुम्ही पाऊस आला म्हणून आनंदाने नाचणारा मोर पाहिला असेल. पण कधी पाऊस आल्याच्या आनंदात नाचणारा उंदीर पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पहा. (Viral Video) यामध्ये पाऊस सुरू होताच चक्क उड्या मारत नाचणारा उंदीर दिसतो आहे. या उंदराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून बरेच लोक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक छोटासा उंदीर रस्त्याच्या मधोमध उद्या मारत मारत नाचताना दिसतोय. गरमीने सगळेच हैराण झाले होते. अशावेळी पावसाने लावलेली हजेरी खरोखर आनंदोत्सव साजरा करावा अशीच ठरली आहे. त्यामुळे पहिल्या सरीचा आनंद हा फक्त माणसाला नव्हे तर प्राण्यांना सुद्धा झाला आहे. ज्याचा प्रत्यय हा (Viral Video) व्हिडीओ पाहून येतोय. आतापर्यंत पावसात नाचणारी आणि चिंब भिजणारी लहान मुले आपण पाहिली आहेत. पण, पहिल्यांदाच पावसात लहान मुलांसारखा उंदीर मामा नाचताना पहायला मिळतोय.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या उंदराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. छोट्याशा उंदाराचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या मजेशीर व्हिडीओवर अनेक युजर्सच्या भन्नाट भन्नाट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. (Viral Video) एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले आहे की, ‘हा व्हिडीओ पाहून वाटतंय की उंदराला सुद्धा पावसात नाचायला आवडतं’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘व्वा, क्या बात है!! याआधी मी मोर नाचताना पाहिला होता. पण उंदीर नाचताना मी पहिल्यांदाच पाहतोय’.

CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत मोठी भरती सुरु; येथे करा अर्ज

CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या तब्बल 1526 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. 9 जून 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 8 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आधीच अर्ज करा. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही.

महत्त्वाची माहिती | CAPF Bharti 2024

  • पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल
  • पदसंख्या – 1526जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 9 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 जुलै 2024

रिक्त पदांची संख्या

  • सहाय्यक उपनिरीक्षक – 243 जागा
  • हेड कॉन्स्टेबल – 1283 जागा.

अर्ज कसा करावा ? | CAPF Bharti 2024

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • 8जुलै 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा