Monday, December 22, 2025
Home Blog Page 693

IBPS RRB Recruitment 2024 | ग्रामीण प्रादेशिक बँकेत नोकरीची मोठी संधी, तब्बल 9,995 पदांसाठी भरती सुरु

IBPS RRB Recruitment 2024

IBPS RRB Recruitment 2024 | आजकाल अनेक तरुणांना बँकेमध्ये नोकरी करायची असते. कारण बँकेतील नोकरीही त्यांना अत्यंत सुरक्षित वाटते. अशातच आता बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी हे खुशखबर आहे. कारण बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने आता विविध ग्रामीण बँकांमध्ये भरती करण्याची अधिसूचना देखील जारी केलेली आहे. या अधिसूचनेनुसार आता विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये गट A, अधिकारी स्केल 1, 2 आणि 3 आणि गट B ऑफिस असिस्टंट च्या पदांसाठी थेट भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी ही भरती मोहीम चालवली जाणार आहे. या भरतीची परीक्षा 22 जुलै ते 27 जुलै या कालावधी दरम्यान घेतली जाणार आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठातून बॅचलर पदवी घेतलेला असणे गरजेचे आहे.

पदांची संख्या | IBPS RRB Recruitment 2024

या भरती अंतर्गत 9995 पदे भरली जाणार आहेत ज्यामध्ये 5585 बहुउद्देशीय कार्यालय सहाय्यक पदांचा समावेश आहे.

वयोमर्यादा

अधिकारी स्केल lll साठी उमेदवारांचे वय हे 21 ते 40 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अधिकारी स्केल ll साठी व उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अधिकारी स्केल l साठी 18 ते 30 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

उमेदवारांना आयबीपीएस, आरआरबी, ऑफिस असिस्टंट आणि आयबीपीएस आरआरबी ऑफिसर या पदासाठी अर्ज शुल्क 850 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्ती या श्रेणीतील उमेदवारांना केवळ 175 रुपये शुल्क असणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

World Brain Tumor Day 2024 : तरुणांमध्ये वाढतोय ब्रेन ट्युमरचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

World Brain Tumor Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Brain Tumor Day 2024) आजची तरुण मंडळी पैसा आणि लॅव्हिश लाइफस्टाईलच्या मागे धावायच्या नादात स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करत आहेत. यामुळे न केवळ शारीरिक तर मानसिक आरोग्याची देखील मोठ्या प्रमाणावर हानी होते आहे. गेल्या काही काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅक, डायबेटीस, हाय बीपी आणि ब्रेन ट्युमरसारख्या गंभीर आजारांचे अनेक रुग्ण आढळणे आले आहेत. आज दिनांक ८ जून असून आज जागतिक स्तरावर ब्रेन ट्युमर दिवस साजरा केला जातो. जागतिक ब्रेन ट्युमर दिनाचे औचित्य साधून आज आपण हा आजार नेमका काय आहे? त्याची लक्षणे कोणती? आणि तरुणांमध्ये याचे रुग्ण का वाढत आहेत? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

ब्रेन ट्युमर म्हणजे काय? (World Brain Tumor Day 2024)

ब्रेन ट्युमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. मेंदूमध्ये असामान्य पेशी जमा झाल्याने हा आजार होतो. या गंभीर आजारात आपल्या मेंदूमध्ये गाठी तयार होतात आणि हळूहळू या गाठी मोठ्या प्रमाणात वाढतात. माहितीनुसार, ब्रेन ट्युमर झाल्यास तो व्यक्तीच्या कार्यावर आणि एकंदरच संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या ट्युमरला प्राथमिक ट्युमर म्हणतात. हा ट्युमर तुमच्या शरीराच्या वेगळ्या भागात तयार झाल्यानंतर जर तो मेंदूमध्ये पसरत असेल तर त्याला दुय्यम किंवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्युमर असे म्हटले जाते.

ब्रेन ट्यूमरची लक्षणे

ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णात सामान्यपणे दिसून येणारी काही लक्षणे वेळीच लक्षात आल्यावर उपचार घेणे सोपे जाते. (World Brain Tumor Day 2024) यामध्ये खालील लक्षणांचा समावेश आहे.

  • वारंवार डोकेदुखी होणे.
  • मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे.
  • सतत चक्कर येणे.
  • मानसिक संतुलन गमावणे.
  • अस्पष्ट दृष्टी.
  • पाठ आणि मणक्यात वेदना होणे.
  • चालताना समस्या येणे.
  • स्मृतीभ्रंश होणे.

यावर उपचार काय?

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रेन ट्युमर जितका लवकर समजेल तितक्या लवकर त्यावर उपचार करणे शक्य आहे. या उपचारामध्ये ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. (World Brain Tumor Day 2024) त्यानंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी वापरतात.

तरुणांमध्ये का वाढतेय रुग्णांची संख्या?

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, तरुणांमध्ये ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढण्याचे कारण अनुवांशिक आजार आहेत. आतापर्यंत अनेक तरुण रुग्णांमध्ये मेडुलोब्लास्टोमा आणि एपेंडिमोमा हे सर्वात सामान्य कर्करोग आढळून आले आहेत. न केवळ अनुवांशिक तर ब्रेन ट्युमर होण्याचे मुख्य कारण मोबाईल फोन किंवा डिजिटल स्क्रीनचा अधिक वापर मानले जात आहे. (World Brain Tumor Day 2024) कारण अशा डिजिटल उपकरणांच्या संपर्कात आल्याने डोक्यातील कवटीचे हाड कमकुवत होते. फोनच्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदूच्या नसांचे नुकसान होऊन ट्यूमर होण्याची शक्यता वाढते.

Rose Water For Face : रोझ वॉटर लावा रोज रोज; उन्हाळा असो किंवा पावसाळा.. त्वचा राहील एकदम सॉफ्ट

Rose Water For Face

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Water For Face) बिघडती जीवनशैली जशी शारीरिक आरोग्यावर परिणाम करते. अगदी तशीच आपल्या त्वचेच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम करत असते. शिवाय वाढते प्रदूषण, धूळ, माती यामुळे त्वचेच्या पोअर्सचे आतून नुकसान होत असते. ज्यामुळे तुमची त्वचा रखरखीत आणि निस्तेज दिसू लागते. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर नियमित स्वरूपात रोझ वॉटर म्हणजेच गुलाब जलचा वापर करा. गुलाब जलमध्ये असे अनेक घटक आहेत जे आपल्या त्वचेला सुंदर आणि नितळ होण्यासाठी मदत करू शकतात.

त्यामुळे बरेच लोक आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये आवर्जून गुलाब जलचा वापर करतात. मुख्य म्हणजे, गुलाब जलमध्ये अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. (Rose Water For Face) जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर सिद्ध होतात. म्हणूनच, उन्हाळा असो किंवा पावसाळा.. तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मऊ हवी असेल तर नियमित चेहरा धुतल्यानंतर त्यावर गुलाब जल लावा. आता रिफ्रेशिंग त्वचा मिळावी म्हणून नेमका गुलाब जलचा वापर कसा करावा? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.

फेस टोनर (Rose Water For Face)

तुमच्या नियमित स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब जलचा समावेश करा. चांगल्या परिणामांसाठी तुमच्या रेग्युलर क्लींजरने चेहरा धुतल्यानंतर एका कॉटन बॉलवर गुलाब पाणी घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावर टॅप करत लावा. यामुळे पोअर्सेसमधील तेल निघून जाईल. यामुळे त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसेल.

फेस पॅक

तुम्ही तुमच्या रोजच्या फेसपॅकमध्ये गुलाब जलचा वापर करून चेहऱ्याला लावू शकता. (Rose Water For Face) यामुळे त्वचा मुलायम, तेजस्वी आणि चमकदार होईल. याशिवाय एका वाटीत बेसन, हळद आणि चंदन पावडरसोबत गुलाब जल मिसळून तयार केलेला फेसपॅक वापरला तर त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळेल.

मेकअप रिमूव्हर

मेकअप रिमूव्ह करण्यासाठी कोणतेही केमिकलयुक्त क्लींजर वापरण्यापेक्षा गुलाब जलचा वापर करा. यासाठी एका कॉटन बॉलवर गुलाब जल घेऊन न घासता चेहऱ्यावरील मेकअप काढा. (Rose Water For Face) यामुळे तुमच्या स्किन पोअर्समध्ये मेकअपचे कण जाणार नाहीत आणि यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड राहील.

मिस्ट

दिवसभर तुमचा चेहरा फ्रेश दिसण्यासाठी नियमित गुलाब जलचा वापर करता येईल. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाब जल टाका आणि दिवसभर थोड्या थोड्या वेळाने हे गुलाब जल चेहऱ्यावर स्प्रे करा. (Rose Water For Face) ज्यामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार राहील.

Shweta Shinde : अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरात चोरी; ‘इतकं’ तोळं सोनं अन रोख लंपास

Shweta Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shweta Shinde) मराठी अभिनय विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे कायम चर्चेत असते. कधी आगामी मालिका तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा रंगते. दरम्यान, श्वेता शिंदे यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या साताऱ्यातील घरात चोरी झाली आहे. सदर घटना दिनांक ३ जून २०२४ रोजी घडली असून घरफोडीमध्ये काही तोळे सोनं आणि पैसे चोरी झाल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्रीच्या साताऱ्यातील घरात चोरी (Shweta Shinde)

मराठी मनोरंजनविश्वात स्वबळावर नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री श्वेता शिंदे ही मूळची साताऱ्याची आहे. गेल्या काही काळात केवळ अभिनय नव्हे तर निर्मिती विश्वात देखील श्वेता शिंदे झळकली आहे. आताच्या घडीला बऱ्याच आघाडीच्या मालिकांची निर्मिती श्वेता शिंदेने केली आहे. साताऱ्यात काही मालिकांचे शूटिंग देखील सुरु आहे. अशातच त्यांच्या साताऱ्यातील घरावर दरोडा पडल्याचे समोर आले आहे. काही चोरांनी श्वेताच्या घरात चोरी करून तिच्या घरातून तब्बल १० तोळे सोनं आणि काही रोख रक्कम चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली असून तपास सुरु आहे.

पोलिसांत केली तक्रार

अभिनेत्री श्वेता शिंदे ही साताऱ्यात पिरवाडी येथील घरी आपल्या आईसोबत राहते. ज्या दिवशी घरफोडी झाली त्यादिवशी काही कामानिमित्त श्वेता मुंबईत आली होती आणि तिची आईदेखील घरात नव्हती. (Shweta Shinde) त्यामुळे घरात कुणी नाही याची संधी साधून चोरांनी तिच्या घरावर दरोडा टाकला. या प्रकरणी अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने आईच्या लक्षात असल्याप्रमाणे, घरातून १० तोळे सोने आणि काही रक्कम चोरी झाल्याचे नमूद केले आहे. अजूनही किती मालमत्ता चोरी झाली हे नक्की सांगता येणार नाही, असेही म्हटले आहे. अभिनेत्रीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाबाबत तपास करत असल्याचे समजत आहे.

श्वेता शिंदेची कारकीर्द

अभिनेत्री श्वेता शिंदे ही मराठी कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबत तिने निर्मिती क्षेत्रात देखील चांगला जम बसवला आहे. (Shweta Shinde) झी मराठीच्या ‘लागीर झालं जी’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ अशा मालिकांची निर्माती म्हणून तिने काम पाहिले आहे.

यानंतर आता श्वेताची ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवी मालिका देखील लवकरच सुरु होते आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अयोध्येतील पराभवानंतर भीष्म पितामहांनी भाजपला सुनावले खडेबोल; म्हणाले, श्रद्धेच्या ठिकाणाला….

mukesh khanna narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींची लाट, हिंदुत्त्वाचा नारा आणि महत्वाची बाब म्हणजे राम मंदिर बांधूनही भाजपला अयोध्येत धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांनी भाजप उमेदवार लल्लू सिंग यांचा पराभव केला. भाजपच्या या पराभवानंतर महाभारतातील पितामह भीष्म म्हणजेच अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या सुनावलं आहे. श्रद्धेच्या ठिकाणाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका असं मुकेश खन्ना यांनी म्हंटल आहे. मुकेश खन्ना यांनी सोशल मीडिया वरील हि पोस्ट देशभरात चर्चेचा विषय बनली आहे.

मुकेश खन्ना यांनी पोस्ट काय आहे?

मुकेश खन्ना यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हंटल, अयोध्या निवडणुकीतील पराभवातून हे शिकायला हवे की, भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचे जीवनही भव्य बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोटींच्या बजेटमध्ये तेथील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही कोटी रुपये ठेवणे आवश्यक आहे. राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूर जवळील खातू शाम मंदिर असो. श्रद्धेच्या ठिकाणाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. लोकही तिथे राहतात, त्यांचीही काळजी घ्यायला हवी अस म्हणत मुकेश खन्ना यांनी एक प्रकारे नाव न घेता भाजपवर टीका केली आहे.

यानंतर मुकेश खन्ना यांनी आणखी एक पोस्ट केली. त्यात ते म्हणतात. ‘सबका साथ सबका विकास’ – मोदीजींनी दिलेला त्यांचा आवडता नारा आहे. मात्र जनतेबरोबरच त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले खासदार, आमदार, नगरसेवक यांनाही हे लागू व्हायला हवे. दोन चेहऱ्यांशिवाय टीव्ही आणि प्रसिद्धीमध्ये कोणाचाच चेहरा दिसत नाही. का ? तेही आपल्यासोबत असले पाहिजेत, देशाचा विकास करायचा असेल तर तो दिसला पाहिजे. यावेळी निवडणूक निकाल अपेक्षेविरुद्ध लागण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे. पक्षाने एकत्र काम केल्यास विजय निश्चित आहे. पण प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वोत्तम कामगिरी केली नाही तर पराभव निश्चित आहे. मला आशा आहे की मोदीजी आणि अमितजी माझ्या या सल्ल्याकडे थोडे लक्ष देतील.

Hamare Baarah : कर्नाटकात ‘हमारे बारह’ सिनेमावर बंदी; काँग्रेस सरकारला वाटतेय ‘दंगली’ भडकण्याची भीती

Hamare Baarah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hamare Baarah) गेल्या काही महिन्यांपासून ‘हमारे बारह’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगळे, आक्रमक आणि लक्षवेधी आहे. या सिनेमात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर मध्यवर्ती भूमिकेत असून त्याचे चाहते या सिनेमाबाबत उत्सुक आहेत. असे असताना नुकतीच कर्नाटक राज्यात ‘हमारे बारह’ या सिनेमावर बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. या सिनेमावर काँग्रेस सरकारकडून बंदी घालण्यात आली असून याबाबत बोलताना सरकारने एक भीती व्यक्त केली आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

का घातली बंदी? (Hamare Baarah)

‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे. याबाबत सांगताना सरकारने हा सिनेमा सांप्रदायिक तणाव वाढवू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने पुढील २ आठवड्यापर्यंत या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचे समोर आले आहे. हा सिनेमा प्रदर्शित करायचा असेल तर त्यासाठी आधी चर्चा करावी लागेल, असेही सरकारने म्हटले आहे.

कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, १९६४ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अल्पसंख्याक संघटनांनी आणि शिष्टमंडळांनीसुद्धा या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याबाबत आक्षेप नोंदविला होता. (Hamare Baarah) दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र, रिलीजच्या दोन दिवस आधीच ही बंदी मागे घेतली गेली.

अन्नू कपूर यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

‘हमारे बारह’ या सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर सिनेमातील मुख्य कलाकार अभिनेते अन्नू कपूर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. (Hamare Baarah) दिनांक ३ जून २०२४ रोजी त्यांनी शिंदेंची भेट घेतली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना सांगितले, ‘आमचा आगामी सिनेमा ”हमारे बारह”वरून वाद निर्माण झाला असून काही लोकांनी आमच्या दिग्दर्शक व निर्मात्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्हा कलाकारांनाही धमकी मिळाली आहे.

आमचे निर्माते कमल चंद्रा, निर्माते रवी गुप्ता आणि इतर निर्मात्यांना शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली आहे. आमचा हा चित्रपट ७ जून रोजी संपूर्ण देशात आणि इतर १५ देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे’.

https://www.youtube.com/watch?v=gJ8RARIkUb8

कथानकात आहे तरी काय?

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर समजतंय की, ‘अभिनेते अन्नू कपूर यांनी हमारे बारह चित्रपटात मन्सूर अली खान नावाचे पात्र साकारले आहे. या पात्राची पहिली पत्नी बाळंतपणातच दगावते. (Hamare Baarah) तर दुसरी पत्नी सहाव्यांदा गर्भवती असताना डॉक्टर तिचा जीव जाऊ शकतो असे सांगतात. अशावेळी, मन्सूर मात्र पत्नीचा गर्भपात करण्यास स्पष्ट नकार देतात. यामुळे पहिल्या पत्नीची मोठी मुलगी आपल्या सावत्र आईला वाचविण्यासाठी मन्सूरला कोर्टात ओढते.

यानंतर कोर्टात तिच्या सावत्र आईच्या गर्भपातासाठी मंजूरी मिळावी म्हणून खटला दाखल केला जातो. या केसच्या सुनावणीभोवती या सिनेमाचे कथानक फिरते. एकंदरच काय तर हा सिनेमा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करतो आहे. (Hamare Baarah) मात्र, समाजातून याकडे धर्मावर टीका केल्याचे पाहिले जात असल्याने वाद निर्माण झाला आहे.

मोदी 100% व्यापारी, सत्तेसाठी सोनिया गांधींच्याही दारात जातील- सामनातून टीकास्त्र

narendra modi (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शंभर टक्के व्यापारी आहेत. व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. त्यामुळे मोदी हे पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडयांवर लटकला आहे असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

पहा काय म्हंटल सामना अग्रलेखात ?

नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘कॉंग्रेसमुक्त भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही. तामीळनाडूसारख्या मोठया राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही. (अर्थात मध्य प्रदेशसह बारा राज्यांत काँग्रेसची हीच दयनीय अवस्था आहे.) उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने मिळून भाजपला ‘अर्ध्या राज्यातून साफ केले. महाराष्ट्रातील भाजपवर तर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आणली.

भाजपने बहुमत गमावले व नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान वगैरे प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊनच मोदी यांना कडबोळे किंवा खिचडी सरकार बनवावे लागले. मोदी हे कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसला संपवायला निघाले होते, पण मोदींना ते जमले नाही व हे पक्ष अधिक मजबुतीने उभारी घेऊन पुढे आले. शरद पवार हे भटकती आत्मा व उद्धव ठाकरे नकली संतान असल्याची भाषा मोदी यांनी प्रचारात वापरली, पण त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे. चिराग पासवान यांचा ‘लोजपा’ अमित शहांनी फोडला व चिराग यांच्या काकांच्या हाती दिला. चिन्ह व पक्षही गमावून चिराग उभे राहिले. आज त्याच चिराग यांच्या टेकूवर मोदी सत्ता स्थापन करीत आहेत. मोदी यांचे धोरण हे असे आहे. उद्या ते काँगेस पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील.

मोदी हे शंभर टक्के व्यापारी आहेत व व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. अमित शहा यांनी आंध्रात जाऊन तेलुगू देसमला संपविण्याची भाषा केली होती. चंद्राबाबूंना कधीच ‘एनडीए’मध्ये घेणार नाही, असेही सांगितले होते. नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न अमित शहा करीत असल्याचा आरोप स्वतः नितीशबाबूंनीच केला होता. आज सत्तेसाठी त्याच नितीश कुमारांचे चरणतीर्थ मोदी-शहांना प्राशन करावे लागले, कॉंगेस सत्तेवर आली तर मुसलमानांना आरक्षण देईल, असा बागुलबुवा मोदी यांनी प्रचारात उभा केला, पण चंद्राबाबू हे स्वतः मुसलमान समुदायास आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत व तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे मोदी यांनी चंद्राबाबूंची मागणी मान्य केली काय? असा प्रश्न पडतो. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी- शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडयांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!

अफगाणिस्तानचा न्यूझीलंडवर विजय; फिरकीपुढे किवींनी टेकले गुडघे

AFG Vs NZ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत आज मोठा उलटफेर पाहायला मिळायला. तुलनेनं हलक्या असलेल्या अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का (AFG Vs NZ) दिला दिला आहे. तब्बल ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेट विश्वास अफगाणिस्तानने खळबळ उडवून दिली आहे. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी नांग्या टाकल्या. विकेटकिपर फलंदाज रहमतुल्लाह गुरबाज मन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. सलामीवीर रहमतुल्लाह गुरबाजने सार्वधिक ८० धावा केल्या. गुरबाजने अवघ्या ५६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने किवी गोलंदाजांवर हल्ला केला. गुरबाज शिवाय सलामीवर इब्राहिम झाद्रनने ४४ आणि ओमरझईने २२ धावा केल्या. तर न्यूझीलंड कडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय लॉकी फर्ग्युसनला एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पहिल्याच चेंडूवर फझल फारुकीने फिन अलेनचा त्रिफळा उडवला. डेवोन कॉन्वे सुद्धा ८ धावांवर माघारी परतला. या धक्क्यातून न्यूझीलंडचा संघ सावरलाच नाही. केन विलियम्सन, डार्लि मिचेल, ग्लेन फिलिप, चॅपमॅन, ब्रेसवेल हे फलंदाज सपशेल फेल गेले. अफगाणी फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. राशीद खान आणि फझल फारुकीने प्रत्येकी ४ बळी घेतले तर मोहम्मद नबीने २ विकेट्स घेतल्या. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानचे मनोबल चांगलेच उंचावलं असेल तर न्यूझीलंडला मात्र हा पराभव म्हणजे मोठा धक्का आहे.

Multivitamins Foods | आहारात करा ‘या’ 10 सुपरफूड्सचा समावेश, कधीही भासणार नाही मल्टीविटामिन्सची कमतरता

Multivitamins Foods

Multivitamins Foods | आपल्या शरीरात वेगवेगळे विटामिन्स असतात. ज्यांची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. परंतु वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील विटामिन्सची कमतरता निर्माण होते. आणि त्यामुळे डॉक्टर अनेकवेळा मल्टी विटामिन्स घेण्यास सल्ला देत असतात. जर योग्य आहारातून विटामिनची पूर्तता झाली नाही, तर डॉक्टर ही विटामिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट्सच्या स्वरूपात घ्यायला सांगतात जर तुमच्या शरीरामध्ये मल्टीविटामिनची कमतरता असेल, तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच ते घ्यावे. परंतु जर तुम्हाला मल्टीविटामिनची कमतरता भासू नये असे वाटत असेल, तर त्यासाठी तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला कधीच बाहेरून सप्लीमेंट घ्यावे लागणार नाहीत. आता आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन्सची पातळी नियंत्रणात राहील.

मध | Multivitamins Foods

हे अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण सुपरफूड आहे, ज्याचा प्रत्येकाने आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. हे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, त्यामुळे मधुमेह देखील ते मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात.

गाजर

हे एक उत्कृष्ट अँटी-फंगल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल एजंट आहे. हे पचन सुधारते आणि व्हिटॅमिन ए समृद्ध आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

संत्री

अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी असण्यासोबतच संत्र्यामध्ये हेस्पेरिडिन नावाचे एक संयुग देखील आढळते, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

मशरूम

उकडलेले मशरूम हे नैसर्गिक प्रतिजैविक आहेत. हे अँटी-हिस्टामाइन आणि अँटी-सेरोटोनिन देखील आहे, त्यात तांबे आणि सेलेनियम सोबत डी आणि बी जीवनसत्त्वे आहेत.

पेरू

यामध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि वजन कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता, हृदय, रक्तातील साखरेची पातळी आणि मासिक पाळीच्या दरम्यान खूप फायदेशीर आहे.

अंडी

कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, प्रथिने, अंडी यांनी भरपूर प्रमाणात असलेले सर्व पोषक घटक हे सर्वांसाठी उर्जेचे केंद्र आहेत.

सुका मेवा

प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फायबर, निरोगी चरबी आणि भरपूर जीवनसत्त्वे असलेले ड्राय फ्रूट्स हे झटपट ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत.

पालक

आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट आणि व्हिटॅमिन ए भरपूर असलेल्या पालकाचे सेवन केल्याने ॲनिमियापासून बचाव होतो आणि मुलांचा योग्य विकास होण्यास मदत होते.

रताळे

व्हिटॅमिन ए, सी, बी6, आयर्न, थायामिन, रिबोफ्लेविन, पोटॅशियम, कॉपर, मँगनीज, रताळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि पचनक्रिया मजबूत करतात.

मांस | Multivitamins Foods

याला नैसर्गिक मल्टी व्हिटॅमिन म्हणता येईल. त्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे इतर कोणत्याही सुपरफूडशी तुलना करता येणार नाहीत. त्यात हेल्दी फॅट, लोह, व्हिटॅमिन बी, झिंक, कॉपर आणि फोलेट आढळतात.

Ramoji Rao Passed Away : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Ramoji Rao Passed Away (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन (Ramoji Rao Passed Away) झालं आहे. 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांच्या निधनाने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना ‘आयकॉनिक मीडिया बॅरन’ आणि ‘फिल्म मोगल’ असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात.आत्तापर्यतच्या त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रॉडक्शन हाऊस देखील आहे- Ramoji Rao Passed Away

रामोजी राव यांचा एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. ज्याचं नाव ऊषाकिरण मूव्हिज आहे. ऊषाकिरण मूव्हिज बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे दिले आहेत. रामोजी यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी बांधलं. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स हे त्यांचे व्यवसाय होते. त्यांच्या निधनाने (Ramoji Rao Passed Away) कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.