Monday, December 22, 2025
Home Blog Page 694

Multivitamins Foods | आहारात करा ‘या’ 10 सुपरफूड्सचा समावेश, कधीही भासणार नाही मल्टीविटामिन्सची कमतरता

Multivitamins Foods

Multivitamins Foods | आपल्या शरीरात वेगवेगळे विटामिन्स असतात. ज्यांची आपल्या शरीराला खूप जास्त गरज असते. परंतु वाढत्या वयानुसार आपल्या शरीरातील विटामिन्सची कमतरता निर्माण होते. आणि त्यामुळे डॉक्टर अनेकवेळा मल्टी विटामिन्स घेण्यास सल्ला देत असतात. जर योग्य आहारातून विटामिनची पूर्तता झाली नाही, तर डॉक्टर ही विटामिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लीमेंट्सच्या स्वरूपात घ्यायला सांगतात जर तुमच्या शरीरामध्ये मल्टीविटामिनची कमतरता असेल, तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच ते घ्यावे. परंतु जर तुम्हाला मल्टीविटामिनची कमतरता भासू नये असे वाटत असेल, तर त्यासाठी तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला कधीच बाहेरून सप्लीमेंट घ्यावे लागणार नाहीत. आता आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन्सची पातळी नियंत्रणात राहील.

मध | Multivitamins Foods

हे अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण सुपरफूड आहे, ज्याचा प्रत्येकाने आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. हे एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, त्यामुळे मधुमेह देखील ते मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात.

गाजर

हे एक उत्कृष्ट अँटी-फंगल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल एजंट आहे. हे पचन सुधारते आणि व्हिटॅमिन ए समृद्ध आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

संत्री

अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी असण्यासोबतच संत्र्यामध्ये हेस्पेरिडिन नावाचे एक संयुग देखील आढळते, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात.

मशरूम

उकडलेले मशरूम हे नैसर्गिक प्रतिजैविक आहेत. हे अँटी-हिस्टामाइन आणि अँटी-सेरोटोनिन देखील आहे, त्यात तांबे आणि सेलेनियम सोबत डी आणि बी जीवनसत्त्वे आहेत.

पेरू

यामध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि वजन कमी करण्यासाठी, बद्धकोष्ठता, हृदय, रक्तातील साखरेची पातळी आणि मासिक पाळीच्या दरम्यान खूप फायदेशीर आहे.

अंडी

कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, प्रथिने, अंडी यांनी भरपूर प्रमाणात असलेले सर्व पोषक घटक हे सर्वांसाठी उर्जेचे केंद्र आहेत.

सुका मेवा

प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, फायबर, निरोगी चरबी आणि भरपूर जीवनसत्त्वे असलेले ड्राय फ्रूट्स हे झटपट ऊर्जेचा उत्तम स्रोत आहेत.

पालक

आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फोलेट आणि व्हिटॅमिन ए भरपूर असलेल्या पालकाचे सेवन केल्याने ॲनिमियापासून बचाव होतो आणि मुलांचा योग्य विकास होण्यास मदत होते.

रताळे

व्हिटॅमिन ए, सी, बी6, आयर्न, थायामिन, रिबोफ्लेविन, पोटॅशियम, कॉपर, मँगनीज, रताळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात आणि पचनक्रिया मजबूत करतात.

मांस | Multivitamins Foods

याला नैसर्गिक मल्टी व्हिटॅमिन म्हणता येईल. त्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे इतर कोणत्याही सुपरफूडशी तुलना करता येणार नाहीत. त्यात हेल्दी फॅट, लोह, व्हिटॅमिन बी, झिंक, कॉपर आणि फोलेट आढळतात.

Ramoji Rao Passed Away : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

Ramoji Rao Passed Away (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन (Ramoji Rao Passed Away) झालं आहे. 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याने ५ जूनला त्यांना हैद्राबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आणि रामोजी राव यांची प्राणज्योत मालवली. रामोजी राव यांच्या निधनाने दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना ‘आयकॉनिक मीडिया बॅरन’ आणि ‘फिल्म मोगल’ असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे ते मालक होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जातात.आत्तापर्यतच्या त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रॉडक्शन हाऊस देखील आहे- Ramoji Rao Passed Away

रामोजी राव यांचा एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. ज्याचं नाव ऊषाकिरण मूव्हिज आहे. ऊषाकिरण मूव्हिज बॅनरखाली त्यांनी अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे दिले आहेत. रामोजी यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी बांधलं. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स हे त्यांचे व्यवसाय होते. त्यांच्या निधनाने (Ramoji Rao Passed Away) कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Santosh Juvekar : संतोष जुवेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारतोय महत्वाची भूमिका

Santosh Juvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Santosh Juvekar) आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका इंदू साकारणारी बाल कलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरली आहे. प्रेक्षक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना थक्क करत आहेत. यांच्यासह आता मराठी सिनेविश्वाचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर या मालिकेत महत्वाची भूमिका साकारतो आहे.

मालिकेत उत्कंठावर्धक वळण

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी लागली आहे. (Santosh Juvekar) एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल. येत्या १० जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार. साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते. पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही.

पाठीराखा म्हणून संतोष जुवेकरची एंट्री (Santosh Juvekar)

पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना इंदूचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल? याशिवाय तिचा हा खडतर प्रवास पूर्ण होईल का? याची उत्तरे आगामी भागात मिळणार आहेत. कारण या प्रवासात आता इंदूचा पाठीराखा म्हणून तिला साथ देण्यासाठी एक दमदार एंट्री झाली आहे. ही एंट्री संतोष जुवेकरची असून तो साकारत असलेली भूमिका मालिकेत विशेष वळण देणारी ठरणार आहे. त्याच्या एंट्रीचा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत? याची उत्सुकता लागली आहे.

प्रोमो झाला व्हायरल

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर कलर्स मराठीच्या अधिकृत हँडलवर ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये संतोष जुवेकरची (Santosh Juvekar) एंट्री पहायला मिळतेय. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘संजीवनीसाठी इंदूचा आळंदी प्रवास.. पाठीराखा होणार सोबती, भेट ठरणार खास…’.

आता ‘इंद्रायणी’ मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास … इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील? हे पाहायला मालिकेचे पुढील भाग पहावे लागतील.

‘झाड’ चित्रपटातून उलगडणार वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष; ट्रेलर रिलीज

Zaad Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असलेल्या या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कैज तालुक्यात असणाऱ्या माउली थिएटर येथे हा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

ट्रेलर लॉन्चवेळी १००० वृक्षांची केली लागवड

येत्या २१ जून २०२४ रोजी सर्वत्र महाराष्ट्रात ‘झाड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर लॉन्च सोहळा बीड जिल्ह्यातील माउली थिएटरमध्ये पार पडला. याप्रसंगी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, पीएस आय राजेश पाटील, दिलीप गीते यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळी आवर्जून उपस्थित होती. यावेळी एक खास उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये १००० वृक्षांची लागवड करण्यात आली.

‘अशी’ असेल स्टारकास्ट

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या झाड या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे. गणेश मोरे आणि प्रशांत मुरकुटे सहदिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, शरद ठोंबरे, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास मोरे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबस, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आयन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

झाडे तोडणारे आणि झाडे वाचवणारे यांच्यातील संघर्ष मोठ्या पडद्यावर

विकास आणि निसर्ग हे आजच्या काळातील दोन कळीचे मुद्दे आहेत. मात्र विकास साध्य करण्यासाठी निसर्गाची हानी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच वन्यजीव आणि मानव असा संघर्ष निर्माण होत आहे. तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. अशा काळात झाडे लावणे, झाडे जपण्याची गोष्ट झाड हा चित्रपट उलगडतो. एका गावात झाडे तोडणारे आणि झाडे वाचवणारे यांच्यातील संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसते. त्यामुळे झाडांचं जतन-संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड हा चित्रपट करतो. चित्रपटाच्या टीजरनंतर आता ट्रेलर समोल आला आहे. त्यातून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Picnic Spots For Kids : मुंबईतील ‘ही’ प्रसिद्ध पर्यटस्थळे लहान मुलांसाठी ठरतात आकर्षण; नक्की जा

Picnic Spots For Kids

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Picnic Spots For Kids) येत्या आठ्वड्याभरात मुलांच्या शाळांची उन्हाळी सुट्टी संपून जाईल. मग मुलांचं रोजचं रुटीन सुरु होईल. शाळा, क्लास आणि अभ्यास. या सगळ्यासाठी मुलांनी फ्रेश असायला हवं. म्हणजे मुलांचं शाळेत मन लागेल आणि अभ्यासातही ते एकाग्र होऊ शकतील. शिवाय, शाळा सुरु झाली की, सगळी वर्गावर्गात मुलांमध्ये कुठे फिरायला गेला होतास? सुट्टीत काय काय केलस? अशी चर्चा असते.

त्यामुळे मुलांना पूर्ण उन्हाळी सुट्टी कुठे ना कुठे फिरायचं असत. यासाठी कित्येकदा मुलं हट्ट करतात. पण आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मुलांना रोज फिरायला नेणं काही शक्य होत नाही. (Picnic Spots For Kids) मग, कुठे लांब फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करण्यापेक्षा जवळच्या जवळ फिरता येईल असे स्पॉट्स विझिट करा. अशाच काही मस्त ठिकाणांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला जाणून घेऊया.

1. राणीबाग

मुंबईतील भायखळा विभागात असणारी राणीची बाग ही प्रत्येक लहान मुलाची पहिली पसंत असते. (Picnic Spots For Kids) लहान मुलांचे हे अत्यंत आवडते पर्यटन स्थळ आहे. इथे असलेले प्राणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळतो.

2. नॅशनल पार्क (Picnic Spots For Kids)

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क हे मुलांना फिरायला न्यायला एक मस्त ठिकाण आहे. या ठिकाणी आवर्जून मुलांना वनराणी जंगल सफारी घडवा. ही एक टॉयट्रेन आहे. ज्यामधून जंगल सफारी करताना मुलं एकदम खुश होऊन जातात. याशिवाय नॅशनल पार्कमध्येच असणारी कान्हेरी गुंफा हे मुलांना इतिहासाची ओळख करुन देण्यासाठी एक चांगले ठिकाण मानले जाते. त्यामुळे नॅशनल पार्क फिरताना मुलांना आवर्जून या ठिकाणी न्या. तसेच येथे तुम्ही मुलांना लायन सफारीसुद्धा घडवू शकता. एका बसमधूल ही सफारी घडवली जाते. ज्या दरम्यान वाघ आणि सिंह असे प्राणी पहायला मिळतात.

3. बॉटनिकल गार्डन

मुलांना एखाद छान गार्डन दाखवायचं असेल तर त्यांना सायनमधील बॉटनिकल गार्डनमध्ये घेऊन जा. (Picnic Spots For Kids) या गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे पाहताना मूल कधी रमतील समजणार सुद्धा नाही.

4. नेहरु सायन्स सेंटर

मुंबईत वरळी येथे असणाऱ्या नेहरु सायन्स सेंटरमध्ये मुलांना विज्ञासाशी संबंधित अनेक प्रयोग पहायला मिळतात. जे मुलांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल वाढवते. त्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे.

5. नेहरु तारांगण

जर तुमच्या मुलांना अंतराळ तसेच ग्रह, ताऱ्यांच्या निरीक्षणाची आवड असेल तर मुंबईतील वरळी भागात असणाऱ्या नेहरु तारांगण येथे मुलांना जरूर घेऊन जा. इथे मुलांना आकाशाचे आभासी भ्रमण करता येते. (Picnic Spots For Kids) हा अनुभव अत्यंत वेगळा आणि आनंददायी असतो.

6. तारापोरवाला मत्स्यालय

मुंबईतील मरीन लाईन्स येथे असेलेले तारापोरवाला मत्स्यालय हा देखल एक चांगला पर्याय आहे. इथे मुलांना विविध प्रकारचे मासे तसेच सागरी जीव पहायला मिळतील. (Picnic Spots For Kids)

White Hair Remedy : छोटी लवंग मोठ्या कामाची!! पांढरे केस काळे होण्यास मदत करेल ‘हा’ घरगुती हेअरपॅक; कसा बनवाल?

White Hair Remedy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (White Hair Remedy) बिघडती जीवनशैली वृद्ध, तरुण ते अगदी लहान मुलांच्या आरोग्यावरसुद्धा अत्यंत वाईट परिणाम करत असते. कामाचा ताण, घरगुती व्याप आणि अभ्यासाचे टेंशन यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. केस कितीही लांबसडक, घनदाट असले तरीही त्यातून एखादा पांढरा केस डोकावू लागला की, लूक खराब होतो. मग अशावेळी बरेच लोक केसांना कृत्रिम कलर लावून केस काळे करतात. असे रंग आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

यावर सगळ्यात उत्तम असा घरगुती उपाय आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात खडा मसाला हा असतोच. ज्यामध्ये आढळणारी छोटीशी लवंग अत्यंत बहुगुणी मानली जाते. (White Hair Remedy) आकाराने अतिशय लहान दिसणारी लवंग विविध प्रकारे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. तीच लवंग तुमचे पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करू शकते. आता यासाठी लवंगचा वापर कसा करायचा? ते तुम्हाला माहित असायला हवे. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी लवंग कशी वापराल?

जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील तर तुमच्यासाठी छोटीशी लवंग खु फायद्याची ठरू शकते. (White Hair Remedy) यासाठी तुम्हाला लवंगापासून एक खास हेअर पॅक तयार करायचा आहे. ही प्रक्रिया मेहंदी लावण्यासारखीच सोपी आहे. पण जराशी वेगळी आहे. आता हा हेअर पॅक कसा बनवायचा आणि कसा वापरायचा ते जाणून घेऊया.

असा बनवा हेअरपॅक (White Hair Remedy)

यासाठी तुम्हाला १० ग्रॅम लवंग पुरेशी आहे. ही लवंग ३ चमचे एरंडेल तेलात मिसळा. दुसरीकडे एका छोट्या भांड्यात पाणी उकल आणि यामध्ये लवंग, एरंडेल तेल टाका. हे हॅन्ड किमान १० मिनिटे झाकून पाणी उकळून घ्या. आता यामध्ये १ लहान वाटी आवळा पावडर घाला आणि त्यात थोडे पाणी घालून याची स्मूथ पेस्ट बनवा.

असा करा वापर

तयार झालेली पेस्ट केसाला हाताने व्यवस्थित लावा. किमान ४० मिनिटे हा हेअरपॅक असाच सुकू द्या. (White Hair Remedy) त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. एका महिन्यात सुमारे ३ वेळा हा हेअरपॅक लावा.

कसे करते काम?

लवंगमध्ये असणारे उच्च युजेनॉल नैसर्गिकरित्या केस वाढवण्यासाठी फायदेशरीररित्या काम करतात. (White Hair Remedy) या युजेनॉलमध्ये असणारे अँटि ऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेशनच्या नुकसानापासून केसाच्या मुळांचे आणि फॉलिकल्सचे संरक्षण करत. ज्यामुळे अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत मिळते.

Pune Metro : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेला पुणेकरांची पसंती ; स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी ?

pune metro update

Pune Metro : पुणे मेट्रोला पसंती मिळती आहे. मेट्रोच्या प्रवासी संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी स्थानक मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकडेवारीबाबत माहिती समोर आली आहे. त्यामुळे आकडेवारीवरून रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवासी संख्येच्या बाबतीत जानेवारी आणि मे महिन्याची तुलना केल्यास तब्बल नऊ लाखांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या आता नव्वद हजारांपर्यंत पोहोचली आहे. आता मेट्रो ही स्वारगेट पर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न असेल तर त्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्वारगेट पर्यंत मेट्रो (Pune Metro) धावण्यासाठी सप्टेंबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

६ मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो (Pune Metro) मार्गीकेचे उद्घाटन दूरदृष्टी प्रणाली द्वारे केलं होतं. त्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू होण्याआधी मेट्रोची प्रवासी संख्या जानेवारी महिन्यामध्ये 17 लाख 55 हजार, फेब्रुवारी महिन्यात 17 लाख 76 हजार आणि विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर मात्र प्रवासी संख्या 22 लाख 58 हजार वर गेली आहे. तर एप्रिलमध्ये 23 लाख 81 हजार आणि मे महिन्यात 26 लाख 16 हजारांवर ही संख्या गेली आहे.

मेट्रोला 4 कोटींचे उत्पन्न

तर दैनंदिन प्रवासी संख्येच्या बाबतीत सांगायचे झाल्यास जानेवारी महिन्यात ही संख्या जवळपास 60,000 होती आणि रामवाडी पर्यंत विस्तारित मार्ग सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या हे 90 हजारांवर पोहोचली विस्तारीत मार्ग सुरू होण्यापूर्वी मेट्रोची (Pune Metro) दैनंदिन उत्पन्न हे सुमारे दहा लाखांपर्यंत होते. तर विस्तारीकरण झाल्यानंतर मेट्रोचे दैनंदिन प्रवासी उत्पन्न हे 14 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर मे महिन्याच्या बाबतीत मिळालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यामध्ये 4 कोटी 24 लाख 76 हजार 480 रुपयांचे भरगोस उत्पन्न मिळाले आहे.

येरवडा स्थानक जुलैमध्ये सुरू होणार

येरवडा स्थानक जुलैमध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे. वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जिना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो हलवण्यासाठी सांगितलं होतं. महामेट्रोकडून जिना दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू झाले त्यामुळे या मार्गिकेवरील वरील सेवेतून येरवडा स्थानक सध्या वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानक जुलै महिन्याच्या आखेरीस सुरू होणार आहे. हे स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ (Pune Metro) होईल.

Drumstick Benefits : शेवग्याची शेंग अत्यंत गुणकारी; मोठमोठे आजार ठेवते दूर

Drumstick Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drumstick Benefits) बरेच लोक आवडीने शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शिवाय शेवग्याच्या शेंगा विविध पदार्थांमध्येदेखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. खायला चविष्ट अशा या शेंगा आरोग्यासाठी बऱ्याच फायदेशीर असतात. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगाना विशेष स्थान आहे. कारण शेवग्याच्या भाजीतील बरेच घटक हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात. तज्ञ सांगतात की, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने ३०० पेक्षा जास्त आजरांपासून संररक्षण मिळते.

शेवग्याच्या शेंगांमधील आरोग्यदायी गुणधर्म

शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्फोरस, जिंक यांसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक समाविष्ट आहेत. (Drumstick Benefits) शिवाय या शेंगांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B१, व्हिटॅमिन B२, व्हिटॅमिन B३, व्हिटॅमिन B४, व्हिटॅमिन B६, व्हिटॅमिन B९ आणि व्हिटॅमिन C देखील बऱ्याच प्रमाणात आढळते. चला तर शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास कोणकोणते आरोग्यदायी फायदे मिळतात ते जाणून घेऊया.

1. रक्त शुद्धीकरण (Drumstick Benefits)

शेवग्याच्या भाजीप्रमाणे त्याच्या पानांमध्ये देखील असे अनेक गुणकारी घटक असतात. जे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करते. यातील काही घटक अँटी बायोटीक एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ वाढून होणारे सर्व त्रास दूर होतात.

2. मधुमेहींसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा खाणे बरेच फायदेशीर मानले जाते. (Drumstick Benefits) या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहींचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

3. उच्च रक्तदाब

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांसाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणे वरदान मानले जाते. त्यामुळे अशा लोकांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा सूप याचा समावेश चांगला मानला जातो.

4. श्वासासंबंधीत समस्या होतील दूर कार

ज्या लोकांना श्वसन संदर्भात कोणतीही समस्या असेल त्यांनी आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगाचे सेवन करावे. (Drumstick Benefits) यामुळे कफ, श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या दूर होतील आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल.

5. इन्फेक्शनपासून संरक्षण

शेवग्याच्या भाजीची पाने आणि फुले अँटी बॅक्टेरियल घटकांनी परिपूर्ण असतात. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो आणि इन्फेक्शन तसेच आजारांपासून बचाव होतो.

6. हाडं होतील मजबूत

शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. (Drumstick Benefits) ज्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी ही भाजी खाणे फायदेशीर ठरते.

7. लठ्ठपणावर नियंत्रण

शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अत्यंत फायदेशीर आहेत. या भाजीतील फॉस्फोरस शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी करतात आणि लठ्ठपणा दूर करायला मदत करतात.

फडणवीसांनंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असणार?? राजकारणात चर्चांना उधाण

Mahajan and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा जिंकण्यास यश आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वीकारली आहे. या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. भाजपकडून फडणवीसांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न होत असतानाही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पण नेमके कोणाकडे जाईल याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री पद नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. कारण की, गिरीश महाजन हे भाजपमधील एक संयमी नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध देखील आहेत. त्यामुळे पुढे जाऊन गिरीश महाजनांना उपमुख्यमंत्री बनवले तर इतर पक्षांसोबत देखील भाजपला चांगले संबंध राखून ठेवता येतील. असे काही झाल्यास याचा मोठा फायदा निवडणुकीमध्ये भाजपला होईल.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याबाबत वक्तव्य केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीला बैठकीसाठी बोलवले होते. या बैठकीमध्ये बराच वेळ आम्ही शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट ही त्यांना दाखवली. त्यानुसार, विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप लवकरच जनादेश यात्रा काढणार आहे. या यात्रेचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करताना दिसतील. पुढील काळात फडणवीस यांनी विधानसभेची कामे हाती घेतली तर त्यांची ही जागा गिरीश महाजन भरून काढतील.

Police Recruitment 2024 | पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ; सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

Police Recruitment 2024

Police Recruitment 2024 | यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया मंदावले होती. परंतु आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता येत्या सोमवारी म्हणजेच 10 जूनपासून शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलीस भरतीसाठीची उमेदवारांची चाचणी परीक्षा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहर पोलीस आयुक्तालयातील 118 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी डिसेंबर महिन्यांपासून उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. परंतु मुदतवाढ करून फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करून घेतले होते. परंतु त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आणि ही भरती प्रक्रिया थांबली.

परंतु या पोलीस भरती (Police Recruitment 2024)संदर्भात शेवटचे नियोजन सुरू झालेले आहे. येता 10 तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट मेसेज आणि ई-मेल मोबाईलद्वारे कळवलेले आहे. त्यानुसार आता उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणी | Police Recruitment 2024

धावणे, गोळा फेक, शारीरिक पात्रता मोजणी, पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर तर फुगून 84 सेंटीमीटर, महिला उमेदवारांना 155 सेंटिमीटर