Monday, December 22, 2025
Home Blog Page 698

नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला CISF गार्डने कानशिलात लगावली; नेमके काय घडले?

Kanagana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) एका CISF गार्डने कानशिलात मारली असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार आज चंदीगड विमानतळावर घडला आहे. यावेळी कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. याचवेळी CISF गार्ड कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानशिलात मारली. यानंतर पोलिसांनी कुलविंदर कौरला अटक केली आहे.

सांगितले जात आहे की, मध्यंतरी कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केले होते. तिने केलेल्या याच वक्तव्याबाबत आक्रोश व्यक्त करत CISF गार्ड कुलविंदर कौरने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. सर्वात प्रथम
कंगना रणावत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आली असताना तिचा गेटवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. यानंतर CISF गार्डने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाजूने उभी राहिली होती. या निवडणुकीत मंडीच्या जनतेने कंगनाला बहुमतांनी विजयी केले आहे. या विजयानंतर पुन्हा दिल्लीला रवाना होत असताना कंगना राणावतबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित गार्डवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Lakshadweep Tourism : जिवंतपणी स्वर्ग पहायचाय? तर देशातील ‘या’ सुंदर ठिकाणी जा; टेन्शन विसरून रिफ्रेश व्हाल

Lakshadweep Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lakshadweep Tourism) रोजच्या दगदगीतून आणि धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढून आपण कधीतरी एखादा फिरायचा प्लॅन करतो. त्यामुळे अशावेळी आपण एखाद्या सुंदर, नयनरम्य आणि शांत ठिकाणाचा शोध घेत असतो. पण शहराच्या गजबजाटात शांत निवांत ठिकाण मिळणे जरा कठीणच! त्यामुळे बरेच लोक मालदीव, बाली यांसारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. या ठिकाणी आपण आपल्या पार्टनरसोबत किंवा फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवू शकतो. शिवाय निसर्ग सौंदर्य इतके कमाल की, कुणीही हरवून जाईल.

पण मालदीव आणि बालीपेक्षाही सुंदर.. पृथ्वीवर स्वर्ग असल्याचे भासेल अशा ठिकाणाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हे ठिकाण म्हणजे लक्षद्वीप. देशातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून लक्षद्वीप ओळखले जाते. (Lakshadweep Tourism) इथे जाणारा पर्यटक पुन्हा मालदीव आणि बालीला जायचा विचारसुद्धा करत नाही. कारण लक्षद्वीपमध्ये फिरण्यासारखी इतकी सुंदर ठिकाणे आहेत. जी आपल्या मनाला नवी चेतना आणि ऊर्जा देऊ शकतात. चला तर लक्षद्वीपमधील सर्वात सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

नयनरम्य लक्षद्वीप

लक्षद्वीप हा अरबी समुद्रातील ३६ बेटांचा समूह आहे, जो भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले एक अत्यंत सुंदर, शांत आणि रोमॅंटिक डेस्टिनेशन म्हणून लक्षद्वीप प्रसिद्ध आहे. (Lakshadweep Tourism) त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. अनेक लोक या ठिकाणी केवळ मन शांत करण्यासाठी येतात. तर या ठिकाणी बरेच कपल्स हनिमूनसाठी येतात. लक्षद्वीपमध्ये फिरण्यासारखी आणि पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी प्रसिद्ध ठिकाणांची आज आपण माहिती घेत आहोत.

लक्षद्वीपमधील प्रसिद्ध ठिकाणे (Lakshadweep Tourism)

लक्षद्वीपमध्ये कल्पेनी बेट, कदमत बेट, अगत्ती बेट आणि बांगरम बेट ही अत्यंत प्रसिद्ध बेटे मानली जातात. (Lakshadweep Tourism) त्यामुळे या बेटांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. तसेच कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची राजधानी असून येथे वॉटर स्पोर्ट्ससाठी मोठी गर्दी असते. तर मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक मानले जाते. जिथे अनेक लक्झरी रिसॉर्ट्स आहेत.

लक्षद्विपची लोकसंख्या

लक्षद्वीप हा भारताचा एक छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. जो भारतापासून सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात स्थित आहे. एकूण ३६ बेटांचा समूह असलेला लक्षद्वीप ८ किमी परिसरात पसरलेला आहे. (Lakshadweep Tourism) येथील लोकसंख्या सुमारे ८ हजारच्या आसपास आहे. येथील लोकांचे पोट हे इथल्या पर्यटनावर आधारित आहे.

Side Effects Of Eating Eggs : रोज अंडी खाता? सावधान!! आरोग्याचे होईल मोठे नुकसान; जाणून घ्या दुष्परिणाम

Side Effects Of Eating Eggs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Eggs) अनेक लोकांच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये दररोज न चुकता अंड असतं. असे लोक, ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ या म्हणीचे तंतोतंत पालन करतात. अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत मानला जातो. शिवाय कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे काही पोषक घटकदेखील अंड्यामध्ये समाविष्ट असतात. त्यामुळे अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. असे असले तरीही अंडे खाणे प्रत्येकासाठी चांगले असेलच असे नाही. बऱ्याच लोकांना अंडी खाणे पचत नाही. शिवाय नियमित अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर हानिकारक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया दररोज अंडी खाण्याचे दुष्परिणाम.

आतड्यांचे नुकसान

अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा एक जीवाणू असतो. (Side Effects Of Eating Eggs) हा एक असा बॅक्टेरिया आहे, जो अंडी नीट शिजलेली नसतील तर व्यक्तीच्या शरीरात जाऊन पोटातील आतड्यांचे नुकसान करू शकतो.

किडनी फेलचा धोका (Side Effects Of Eating Eggs)

अंडी प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे. मात्र, यामध्ये आढळणारी प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने त्याचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होऊन किडनी फेल होऊ शकते. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्या रुग्णांना जास्त अंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो.

अपचनाची समस्या

अंडी पचायला जड असतात आणि यामुळे गॅस तसेच अपचनाची समस्या वाढू शकते. (Side Effects Of Eating Eggs) अंड्यातील प्रथिने आपल्या आतड्याचे आरोग्य खराब करू शकतात. त्यामुळे जर पचनाशी संबंधित आधीच समस्या असतील तर अशा लोकांनी अंडी खाऊच नये.

जुलाब होऊ शकतात

नियमित अंडी खाणाऱ्यांना पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. यामध्ये जुलाब किंवा पोटदुखीच्या समस्येचा समावेश आहे. अंड्याचा प्रभाव उष्ण असल्यामुळे अशा समस्या होऊ शकतात. (Side Effects Of Eating Eggs)

वजन वाढते

अंड्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. खास करून अंड्यातील पिवळ बलक जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढत जाते.

एलर्जीची समस्या

अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असतात. (Side Effects Of Eating Eggs) त्यामुळे नियमित अंडी खाल्ल्याने प्रथिनांचे अतिसेवन होते. ज्यामुळे एलर्जीचा धोका वाढतो. अंड्यांमध्ये असणारे प्रोटीनसुद्धा एलर्जीची समस्या वाढवू शकतात.

Vegan Diet : व्हीगन डाएट म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे

Vegan Diet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vegan Diet) निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही चांगल्या सवयी महत्वाच्या ठरतात. जसे की, नियमित व्यायाम करणे, सकस आणि संतुलित आहार घेणे, आवश्यक तितके पाणी पिणे. कोरोना महामारीनंतर लोक फिटनेसबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात व्हीगन डाएटचे मोठे क्रेझ निर्माण झाले आहे. बरेच सेलिब्रिटी कलाकार, क्रिकेटपटू आणि अनेक दिग्गज मंडळी या डाएटला फॉलो करतात. शिवाय तरुण वर्गातील बरेच लोक या डाएटचे फॅन आहेत. अशा या डाएटविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हीगन डाएट नेमका काय प्रकार आहे आणि त्याचे फायदे काय? चला जाणून घेऊया.

व्हीगन डाएट म्हणजे काय? (Vegan Diet)

शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार असतात. यांपैकी शाकाहारी लोक व्हीगन डाएट करत असल्याचे मानले जाते. मात्र, असे नसून व्हीगन डाएट ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. कारण व्हीगन डाएटमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस आणि मासे वर्ज्य आहेत. तसेच व्हीगन डाएटसाठी गाईचे किंवा म्हशीचे दूध नव्हे तर सोया मिल्कचे सेवन केले जाते.

एकंदरच व्हीगन डाएट (Vegan Diet) म्हणजे काय? तर वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे. प्राण्यांचे मांस, दूध आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ व्हीगन डाएटमध्ये खाल्ले जात नाहीत आणि त्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. चला तर व्हीगन डाएटचे फायदे जाणून घेऊया

हाय ब्लड प्रेशरवर कंट्रोल

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हीगन डाएटचे व्यवस्थित पालन केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी, रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. (Vegan Diet) मधुमेह आणि किडनीच्या आजारांमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी व्हीगन डाएट वरदान ठरते.

कॅन्सरपासून संरक्षण (Vegan Diet)

व्हीगन डाएटमध्ये आपण जे पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. या पदार्थांमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून आपले रक्षण होते.

वजनावर नियंत्रण

व्हीगन डाएट हा असा प्रकार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. (Vegan Diet) कारण, या डाएटमध्ये आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामध्ये चरबीचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी व्हीगन डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो.

Torna Fort : हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला; वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी जिंकला होता ‘हा’ गिरिदुर्ग

Torna Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Torna Fort) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. राज्यभरात अनेक गडकिल्ले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देतात. आज आपण हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. हा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग तोरणा. जो आज प्रचंडगड म्हणून ओळखला जातो.

कुठे आहे? (Torna Fort)

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात तोरणा हा किल्ला स्थित आहे. जो महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा अत्यंत महत्वाचा साक्षीदार मानला जातो. कारण, तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या १६ व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला आहे. त्यावेळी शिवरायांसोबत त्यांच्याच वयाचे मावळे होते. त्यामुळे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांमध्ये तोरणा किल्ल्याचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे १४०० मीटर उंचीवर हा किल्ला आहे. असा हा तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे.

प्रमुख आकर्षण

तोरणा किल्ला सर करायला अनेक शिवभक्त आणि ट्रेकर्स येत असतात. (Torna Fort) अशा पर्यटकांसाठी तोरणा किल्ल्यावरून दिसणारे इतर किल्ले आकर्षण ठरते. यामध्ये राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, रायगड किल्ला, पुरंदर किल्ला, लिंगाणा किल्ला या किल्ल्यांचा समावेश आहे. तोरणा किल्ल्याचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे ऐतिहासिक असा बिनी दरवाजा.

धनलक्ष्मी तोरणा

अनेक इतिहास संशोधक सांगतात की, तोरणा किल्ला हा त्या काळी महाराजांसाठी ‘धनलक्ष्मी’ ठरला होता. कारण या किल्ल्यावर गुप्तधनाच्या बऱ्याच राशी सापडल्या होत्या, असं उल्लेख आहे. (Torna Fort) इथे सापडलेले धन हे राजगड किल्ल्याच्या निर्मीतीसाठी उपयोगी पडल्याचे इतिहास संशोधक सांगतात.

धक्कादायक!! बर्ड फ्लू विषाणू माणसात पसरण्यास सुरुवात; एका व्यक्तीचा मृत्यू

Bird Flu Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी बर्ड फ्लूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीला एव्हियन इन्फ्लूएंझा ए (एच5एन2)ची लागण झाली होती. बर्ड फ्लूच्या(Bird Flu Death) विषाणूमुळे एका मानवाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात विषाणूबाबत भीती निर्माण झाली आहे. परंतु, WHO ने याबाबत माहिती देत म्हटले आहे की, सध्या लोकांना H5N2 विषाणूचा धोका खूप कमी आहे. तरीही त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी.

WHO च्या माहितीनूसार, बर्ड फ्लूची लागण झालेल्या 59 वर्षीय व्यक्तीचा मेक्सिको सिटीमधील रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला या व्यक्तीत ताप येणे, श्वास घेण्यास त्रास आणि जुलाब अशी लक्षणे दिसून आली होती. यामुळे त्याला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या व्यक्तीचा त्या दिवशी मृत्यू झाला. डॉक्टरांचे सांगितले की, या व्यक्तीला आधीच मूत्रपिंड निकामी होण्यासह अनेक वैद्यकीय समस्या होत्या. यात तो कोंबडी किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात आला नव्हता. असे असताना त्याला बर्ड फ्लू कसा झाला हे शोधणे कठीण आहे.

महत्वाचे म्हणजे, मृत्यू झालेल्या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण कुठे झाली हे मेक्सिकन सरकारला अजूनही सापडलेले नाही. दुसऱ्या बाजूला, WHO म्हणणे आहे की, सध्या H5N2 विषाणूचा धोका कमी आहे. या प्रकरणानंतर बर्ड फ्लू विषाणूच्या संसर्गाची इतर कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. कारण, मृत व्यक्तीच्या नमुन्यात बर्ड फ्लूचा विषाणू असल्याची पुष्टी केल्यानंतर मेक्सिकन सरकारने 23 मे रोजी याबाबतची माहिती WHO ला माहिती दिली.

दरम्यान, झारखंडची राजधानी रांचीमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याची प्रकरणे नुकतीच समोर आली आहेत. त्यामुळे सरकारने राज्यातील पोल्ट्री फार्मना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यापूर्वीही भारतात पशु-पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असल्याचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. परंतु मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीला या विषयाचे लागण झाली आहे.

Vivo X Fold 3 Pro : Vivo ने लाँच केला पहिलावाहिला फोल्डेबल मोबाईल; किंमत पाहून व्हाल हैराण

Vivo X Fold 3 Pro launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात आपला पहिलावहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo X Fold 3 Pro असे या मोबाईलचे नाव असून बाजारात हा मोबाईल Oppo आणि Samsung च्या फोल्डेबल मोबाईलला टक्कर देईल. खास बाब म्हणजे क्वालकॉम स्नैपड्रैगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर सह लाँच करण्यात आलेला हा देशातील पहिलाच मोबाईल आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर पण जाणून घेऊयात …..

Vivo X Fold 3 Pro मध्ये 8.03 इंचाचा AMOLED फोल्डेबल डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेला 2200 x 2480 पिक्सेल रिझोल्यूशन, 90.5 टक्के स्क्रीन बॉडी रेशो आणि 4500 nits पीक ब्राईटनेस मिळतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 (4 nm) प्रोसेसर बसवण्यात आलाय.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Vivo X Fold 3 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50 MP चा मुख्य कॅमेरा, 64 MP सेकंडरी कॅमेरा आणि 50MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5700 mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 100W वायर फास्ट चार्जरला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि अवघ्या 31 मिनिटांत ही बॅटरी 100% चार्ज होण्यास सक्षम आहे.

किंमत किती? Vivo X Fold 3 Pro

विवोच्या या पहिल्यावहिल्या फोल्डेबल मोबाईलची किंमत 1,59,999 रुपये आहे. येत्या १३ जूनपासून स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात होणार असून मोबाईल खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर सुद्धा देण्यात आल्यात. मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांनी HDFC बँक किंवा SBI कार्डचा वापर केल्यास 15,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळतो. याशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस सुद्धा कंपनीने जाहीर केला आहे

Shivrajyabhishek Din 2024: व्हायरल होतीये छत्रपतींची आभाळमय प्रतिमा…! AI ची कमाल एकदा पहाच

chatrapati

Shivrajyabhishek Din 2024: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…! आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रत्येकची एक वेगळी संकल्पना असते. कुणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. त्यांच्या कार्याचे स्मरण करतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर कुणी गीत आणि पोवाड्यातून महाराजांना वंदन करतात. सध्याच्या डिजिटल युगात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराजांची प्रतिमा (Shivrajyabhishek Din 2024) तयार करून महाराजांना एक अनोखे अभिवादन केले आहे. ही प्रतिमा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महाराजांची आभाळमय प्रतिमा… (Shivrajyabhishek Din 2024)

सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रतिमा ही आभाळात तयार झालेली प्रतिमा दिसते आहे. जेव्हा पाऊस येणार असतो तेव्हा दाटून येणारे काळे ढग आणि संध्याकाळच्या वेळेला केशरी रंगाने भरलेले आभाळ या दोन्हीचं कॉम्बिनेशन या प्रतिमेमध्ये दिसत असून यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा तयार (Shivrajyabhishek Din 2024) झाली आहे. ही प्रतिमा AI च्या मदतीने तयार केली आहे. मात्र पाहताक्षणी तुम्हाला ही प्रतिमा नक्की आवडेल यात शंका नाही. यापूर्वी देखील शेतामध्ये तयार केलेली भव्य प्रतिमा, धान्यांपासून तयार केलेली प्रतिमा खिळ्यांपासून तयार केलेली प्रतिमा आपण पाहली असेल पण AI द्वारे तयार केलेली ही प्रतिमा सोशल मीडियावर लक्षवेधी ठरत आहे.

shivaji_maharaj_history या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की “आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे. हरहर महादेव ” शिवाय या पोस्ट वर अनेक कमेंट्सही आल्या आहेत एका युजर ने लिहले आहे. “खूप गरज आहे आम्हाला तुमची महाराज” दुसऱ्या एका युजरने दिलेला आहे की “हा फोटो आर्टिफिशल इंटेलिजन्स चा टूल वापरून बनवलाय (Shivrajyabhishek Din 2024) पण काय फरक पडतो आपले राजे सगळीकडे आहेत”. अनेकांना हा फोटो आवडला असून अनेकांनी “जय शिवराय” व “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोष कमेंट बॉक्समध्ये केला आहे.

निलेश लंकेंच्या PA वर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरांमध्ये सुजय विखेंच्या समर्थकांचा समावेश

Rahul Zaware

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीनंतर पारनेर येथे निलेश लंके (Nilesh Lanke) आणि सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला असल्याची बातमी समोर आली आहे. आज निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक (PA) राहुल झावरे याच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांचा विजय झाला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके यांचे समर्थक आमने-सामने भिडले. तसेच निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला सुजय विखे यांच्या आठ ते नऊ समर्थकांनी केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांमध्ये सुजय विखे यांच्या समर्थकांनी राहुल झावरे यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. या मारहाणी मध्येच झावरे जखमी झाले आहेत. यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या घटनेनंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निलेश लंके यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. तसेच, या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण ही पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फडणवीस अमित शहांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय होणार??

Shah and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, महायुती सरकारला राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वीकारली आहे. यासह त्यांनी आपल्याला पदातून मुक्त करण्यात यावे अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे. त्यामुळे भाजपला आणि फडणवीस यांच्या समर्थकांना याचा मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळातून मुक्तता करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी त्यांना फोन केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. तसेच याबाबत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असेही त्यांना सांगितले. त्यामुळे या भेटीसाठी लवकरच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, निकालानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी “मला सरकारमधून मोकळं करावं. अशी मी विंनती करणार आहे. मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतो. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन.” असे वक्तव्यं केले आहे. या वक्तव्यामुळेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमके काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.