Monday, December 22, 2025
Home Blog Page 699

Konkan Railway Corporation Recruitment 2024 : कोकण रेल्वेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Konkan Railway Corporation Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून काही पदांसाठी भरती (Konkan Railway Corporation Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेला सामोरं जाव लागणार नाही, तर थेट मुलाखती द्वारेच उमेदवारांची निवड करण्यात येईल. या भरती अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार? पात्रता काय आहे? आणि मुलाखत कुठे द्यावी लागेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

एकूण पदसंख्या – ११ जागा

भरली जाणारी पदे –

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक- १
प्रकल्प अभियंता – ८
ड्राफ्ट्समन – १
सहाय्यक अभियंता – १

पात्रता काय आहे ?

सदर भरतीसाठी (Konkan Railway Corporation Recruitment 2024) उमेदवार हा सिव्हिल इंजिनीअरिंग, डिप्लोमा, आयटीआय किंवा मान्यताप्राप्त विद्यापाठीतून पदवी घेतलेला असावा. वयाची अट ही पदानुसार लागू असेल.

कुठे आहे मुलाखत ? Konkan Railway Corporation Recruitment 2024

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, नवी मुंबई येथे जावं. 15 जून 2024 ते 27 जून 2024 यादरम्यान मुलाखती पार पडणार आहेत. सकाळी ९ ते १२ या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच यावेळी काही महत्वाचे कागदपत्रेही घेऊन जावं.

मुलाखतीच्या तारखा –

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक- २५ जून २०२४
प्रकल्प अभियंता – २७ जून २०२४
ड्राफ्ट्समन – १५ जून २०२४
सहाय्यक अभियंता – २४ जून २०२४

अधिकृत PDF – इथे Click करा

Lok Sabha 2024 Results : महायुतीच्या दिग्गजांना ‘या’ नेत्यांनी घरचा रस्ता दाखवलाय

lok sabha result giant killers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात अबकी बार चारसो पार… तर महाराष्ट्रात 35 प्लसचं मिशन डोक्यात ठेवून मैदानात उतरलेल्या भाजपचा निकालात पुरता बाजार उठलाय… महाराष्ट्रात तर फोडाफोडी आणि दिल्लीतल्या नेत्यांची प्रचारात फौज लावूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दणका उडवून लावला… अनेक मतदारसंघातल्या निवडणुका घासून झाल्या… निकालही घासून लागले… पण खरे जायंट किलर ठरले ते 6 चेहरे… महायुतीतील मोठा भाऊ म्हणून तब्बल 28 जागांवर भाजपने निवडणूक लढवली… यातल्या फक्त नऊ जागांवर त्यांचा विजय झाला… आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर भाजपचा स्ट्राईक रेट हा 33.33 टक्क्यांचा राहिला… पण भाजपची ही पाचर बसवली ती 6 नेत्यांनी… भाजपच्या दिग्गज नेत्यांना डोळे पांढरे करायला लावणारे हे सहा जायंट किलर नेमके कोण आहेत? महाराष्ट्रात भाजपचा आवाज सायलेंट मोडवर जाण्यामागे जे काही प्रमुख चेहरे आहेत त्यात यांचं नाव कसं येतंय? तेच पाहुयात

भाजपचा गेम करत सर्वात मोठे जायंट किलर ठरले ते बजरंग बाप्पा सोनवणे

धनुभाऊ सोबत असताना… भाजपने फुल टू ताकद लागलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या प्रस्थापित राजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांना अस्मान दाखवत भाजपला मोठा झटका दिला… दोन जातींच्या संघर्षावर लढल्या गेलेल्या निवडणुकीत मुंडे कुटुंबानं आपलं सारं सर्वस्व पणाला लावलं होतं. सगळे फॅक्टर प्लसमध्ये असताना देखील मुंडे यांचा पराभव होणं म्हणजे बीडच्या राजकारणातून मुंडे घराणं संपल्यात जमा आहे, असं म्हणता येऊ शकतं. शेवटी सतत पराभवाचे चटके सहन करून बाप्पांच्या अंगाला गुलाल लागलाच…

पश्चिम महाराष्ट्रात जायंट किलर ठरलेलं दुसरं नाव म्हणजे निलेश लंके

प्रस्थापित विरुद्ध विस्थापित…या लाईनवर घासून झालेल्या दक्षिण नगरच्या निकालात बाजी मारली ती निलेश लंके यांनीच…राजकारण कुठेही जावो पण विखेंच्या बालेकिल्लाला कधीच धक्का पोहोचत नाही.. असं बोललं जायचं.. पण अगदी लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटातून शरद पवार गटात उडी घेतलेल्या… आमदारकीची एकही टर्म पूर्ण न झालेल्या निलेश लंके यांच्या खासदारकीवर काल मोहोर उमटली… मतदारसंघात आमदारांचा सरप्लस आकडा आणि हक्काची निर्णायक वोट बँक असतानाही सुजय विखेंचा गेम केला तो साध्यासुध्या निलेश लंके यांनी… बाकी विखेंना या धक्क्यातून उभारी यायला अजून बराच वेळ लागेल…

जायंट किलरच्या यादीतील तिसरं नाव येतं ते बाळ्यामामा म्हात्रे यांचं..

भाजपचे सलग दोन टर्मचे खासदार आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावर असणाऱ्या दिग्गज कपिल पाटील यांचा आश्चर्यकारक पराभव करत शरद पवारांच्या बाळ्यामामाने खासदारकीचं मैदान मारलंच… एका मागून एक पक्ष बदलण्याचा शिक्का पडलेल्या बाळ्यामामांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर शरद पवारांसाठी ही जागा रेसमध्ये आली खरी, पण कपिल पाटील पडतील, असं कुणाला वाटलं नव्हतं. पण या सगळ्या राजकीय विश्लेषकांना तोंडावर पाडून जायंट किलर बाळ्यामामा आता दिल्लीत गेलेत..

440 चा करंट देत जायंट किलर ठरलेलं पुढचं नाव आहे ते कल्याण काळे यांचं…

1999 पासून सलग पाच टर्म खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्यासाठी जालन्याची खासदारकी म्हणजे डाव्या हाताचा मळ होता की काय अशी परिस्थिती होती…त्यामुळे खासदारकीचा सिक्सर मारून दिल्लीत जाण्यासाठी घोड्यावर बसलेल्या आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या दानवेंना कल्याण काळे यांनी घरचा रस्ता दाखवला.. तसं पाहायला गेलं तर काळे जरी जायंट किलर ठरले असले तरी यामागचे खरे सूत्रधार होते ते मनोज जरांगे पाटील…मराठा आरक्षणाचं वादळ जरांगेंनी ज्या आंतरवाली सराटी मधून पेटवलं होतं त्याच भागात जालना येत असल्यामुळे दानवे मोक्कार जरांगेंच्या तावडीत सापडले, असं म्हणायला इथं स्कोप उरतो…

यानंतरचं पुढचं नाव येतं ते प्रतिभा धानोरकर यांचं…

तसं पाहायला गेलं तर चंद्रपुरात हाताचा पंजाच येणार अशी चर्चा होती. पण भाजपच्या पहिल्या फळीतील मोठं नाव असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीमागे पक्ष मोठी ताकद लावेल असा एक अंदाज होता… पण असं काहीही न घडता धानोरकर यांनी अगदी वन साईड खासदारकी मारली…त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकारणावर तुळशीपात्र ठेवल्यामुळे धानोरकर आता चंद्रपुरात जायंट किलर ठरले आहेत, असं म्हणायला हरकत नाही..

यातलं शेवटचं नाव येतं ते भास्कर भगरे यांचं…

प्रचाराच्या दिवसापासून ते एक्झिट पोलपर्यंत दिंडोरीत चर्चा होती ती फक्त भास्कर भगरे यांचीच… हीच गोष्ट निकालातही कायम ठेवत भाजपच्या सलग दोन टर्मच्या खासदार राहिलेल्या भारती पवार यांना भगरेंच्या तुतारीने शेवटी मात दिलीच… भगरेंनी गुलाल लावल्यामुळे शरद पवारांची तुतारी पश्चिम महाराष्ट्रसोबत खानदेशातही वाजली…

बॉटम लाईन काय तर महाविकास आघाडीच्या या सहा शिलेदारांनी अगदी मतदानाच्या दिवशीच जायंट किलर ठरत भाजपाच्या पायाखालची वाळू सरकवलीय…ह्याचाच परिणाम म्हणून की काय आता भाजपात मोठी उलथापालथ होऊन फडणवीसांचं उपमुख्यमंत्रीपदही धोक्यात आलय…असो बाकी आघाडीच्या या सहा जायंट किलर बद्धल तुमचं काय मत आहे? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

Mansoon Update: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता!! अखेर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन

Southwest monsoon

Mansoon Update| राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. अखेर 6 जूनपासून महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. याची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसाळीकर यांनी एक ट्विट केले आहे ज्यात, नैर्ऋत्य मोसमी पाऊस हा रत्नागिरी, सोलापूर आणि मेडक, यासह भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहचेल, अशी माहिती दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील जनता उष्णतेमुळे हैराण झाली होती. यात उष्णतेच्या लाटेने नागरिकांना घराच्या बाहेर पडणे ही मुश्कील करून ठेवले होते. परंतु आता पावसाचे आगमन झाल्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. तसेच, शेतकऱ्यांना आणि राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मधल्या काळात राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. या वातावरणातील बदलानंतर च राज्यात 6 जूनला मान्सूनचे आगमन झाले आहे.

आज आणि उद्या या भागात कोसळणार पाऊस (Mansoon Update)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळेल. यासह दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पाऊस बरसेल. उद्या म्हणजेच शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. महत्वाचे म्हणजे, आज मुंबई, पुणे, ठाणे अशा इतर भागातही पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये तर गेल्या दोन दिवसांपासून पाऊसाच्या सरी बरसत आहेत.

दरम्यान, मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या भागात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिक खराब झाले. यासह इतर भागात केळीच्या बागा उध्वस्त झाल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.

Ather 450 Apex Price Hike : Ather ची Electric Scooter 6000 रुपयांनी महागली; खरेदीदारांना धक्का

Ather 450 Apex Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मागील १-२ वर्षांपासून इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. देशात बजाज, Ather, TVS, OLA या कंपन्यांच्या स्कुटर मोठ्या प्रमाणात विकल्या जातायत.. त्यातही Ather च्या स्कुटरला ग्राहकांची चांगली पसंती पाहायला मिळतेय. मात्र आता Ather ची इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे. कारण कंपनीने जानेवारी महिन्यात लाँच केलेल्या Ather 450 Apex ची किंमत वाढवली (Ather 450 Apex Price Hike) आहे. या स्कुटरच्या किमतीत 6 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

खरेदीदारांना धक्का – Ather 450 Apex Price Hike

Ather 450 Apex ही इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारी 2024 मध्ये 1 लाख 89 हजार (एक्स-शोरूम) रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आली होती. मात्र आता या किमतीत 6 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने ग्राहकांना ती 1 लाख 94 हजार 945 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) खर्च करून खरेदी करावी लागेल . त्यामुळे ग्राहकांचा खिशाला कात्री बसणार आहे. आधीच बाकी वस्तू महाग झाल्यात, त्यात आता इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत वाढल्याने (Ather 450 Apex Price Hike) खरेदीदारांना धक्का बसला आहे.

काय फीचर्स मिळतात?

Ather 450 Apex 7kW इलेक्ट्रिक मोटर आणि 3.7kWh बॅटरी पर्यायासह लाँच करण्यात आली आहे. कंपनी या बॅटरीला 5 वर्षे/60,000 किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते. हि इलेक्ट्रिक स्कुटर फुल्ल चार्ज करण्यासाठी 5 तास 45 मिनिटांचा कालावधी लागतो, मात्र एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 157 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करण्याची क्षमता या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये आहे. कंपनीचा दावा आहे कि अथरची हि स्कुटर 100 किमी/तास टॉप स्पीड वेगाने धावू शकते तसेच अवघ्या 2.9 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग वाढवण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये ग्राहकांना स्मार्ट इको, राइड, इको, वार्प, स्पोर्ट आणि वार्प प्लस असे 6 रायडींग मोड मिळतात

सांगलीतील वाद मिटला!! राऊत म्हणाले, विशाल पाटलांचं अभिनंदन…

sanjay raut vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील आणि भाजपच्या संजयकाका पाटील याना आस्मान दाखवलं. सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत विशाल पाटलांना मदत केल्याचे निकालानंतर स्पष्ट झालं होते. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता होती, मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र विजयी उमेदवार विशाल पाटील यांचे अभिनंदन करत या सर्व वादावर पडदा टाकला आहे. तसेच विशाल पाटील हे महाविकास आघाडीसोबत राहतील अशी आम्हाला सुरुवातीपासूनच खात्री होती असं सांगायलाही राऊत विसरले नाहीत.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, विशाल पाटील यांच्या विरोधात आम्ही सांगलीत निवडणूक लढलो. शिवसेनेला अपयश आलं आणि विशाल पाटील जिंकले. लोकशाहीत जो जिंकून येतो त्याच स्वागत करायचं असत. वसंतदादा पाटील आणि विशाल पाटील यांच्याशी आमचं व्यक्तिगत भांडण कधीच नव्हतं आणि नसेल. विशाल पाटील हे जिंकलेले असून आम्ही त्यांचं स्वागत करतो.. अभिनंदन करतो. विशाल पाटील हे महाविकास आघाडी सोबतच राहतील याची आम्हाला सुरुवातीपासूनच खात्री होती. लोकांनी विशाल पाटलांना मतदान केलं असून या लोकभावनेचा आदर केला पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी विशाल पाटलांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, सांगली लोकसभेत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये विशाल पाटील यांनी १ लाख हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. विशाल पाटील यांच्या विजयात आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा सिंहाचा वाटा होता. महाविकास आघाडी एकत्र असतानाही काँग्रेस नेत्यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार न करता विशाल पाटील यांच्यामागे आपली ताकद उभी केली.

फ्री मध्ये पहा T20 वर्ल्डकप; Airtel ने लाँच केले 3 खास प्लॅन

airtel cricket pack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या T20 वर्ल्डकपचा (T20 Cricket World Cup) थरार सर्वत्र पाहायला मिळायला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट हा खेळ आपल्या भारत तर एखाद्या धर्माप्रमाणे मानला जातो, त्यामुळे या खेळाचं वलय जरा वेगळंच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आणली आहे. क्रिकेटप्रेमींना मोबाईल वरून टी-२० विश्वचषक फ्री मध्ये पाहता यावा यासाठी कंपनीने ३ नवीन प्लॅन लाँच केले आहेत. आज आपण हे तिन्ही प्लॅन सविस्तरपणे जाणून घेऊयात…

499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे 499 रुपयांचा…. हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज 3GB इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल. महत्वाची बाब म्हणजे डिस्ने प्लस हॉटस्टारचे ग्राहकांना ३ महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळत असल्याने तुम्ही फ्री मध्ये विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहू शकता. याशिवाय एअरटेल स्ट्रीम प्लेसह 20 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मवर फ्री ऍक्सेस मिळवू शकता.

869 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

आता दुसरा प्लॅन आहे तो म्हणजे 869 रुपयांचा रिचार्ज प्लान.. एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनसह, वापरकर्त्यांना 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते.

3359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

क्रिकेटप्रेमींना वर्षभर खेळाचा आनंद लुटता यावा म्हणून एअरटेलने वार्षिक प्लॅन सुद्धा लाँच केला आहे. एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन ३३५९ रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. या रिचार्ज प्लॅनसह,यूजर्सना दररोज 2.5 GB डेटासह एका वर्षासाठी Disney Plus Hotstar चे मोफत सब्स्क्रिबशन मिळतेय. त्यामुळे एकदा रिचार्ज केल्यानंतर क्रिकेटप्रेमींना वर्षभर कोणतेही टेन्शन नाही.

Weather Update : मुंबई- ठाण्यासह ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Update 6 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ -३ दिवसापासून महाराष्ट्रात जवळपास सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आजही हा पाऊस असाच कायम राहणार असून राज्यातील मुंबई, ठाण्यासह पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, रत्नागिरी, सातारा रायगडसह पश्चिम घाटात पुढील दोन दिवसांत वादळी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा आज स्थिर आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अनुकुल परिस्थिती असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आहे.

आज महाराष्ट्राच्या जवळपास संपूर्ण भागात, उद्या काही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासोबत मध्यम पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ८ तारखेला कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा व विदर्भामध्ये ८ तारखेपासून पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट दिलाय.

मान्सून पुढील 3 ते 4 दिवसात दाखल होण्याची शक्यता- Weather Update

महाराष्ट्रामध्ये ८ ते १० जून दरम्यान मान्सून दाखल होतो. यावर्षीही मान्सून पुढील तीन ते चार दिवसात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, त्या आधीच राज्यातील बहुतांश भागात पूर्वमौसमी पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मान्सूनच्या आधीच जनजीवन विस्कळीत झाल आहे. काही ठिकाणी तर सकाळी ऊन आणि दुपारनंतर वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.

योग्य वेळी सत्तास्थापन करणार; राऊतांनी वाढवली मोदींची धाकधूक

Sanjay Raut Narendra Modi (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपप्रणीत NDA सत्तास्थापन करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीची सुद्धा काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली. मात्र यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका विधानाने मोदींची धाकधूक वाढवली आहे. येत्या काळात योग्य वेळी आम्ही सत्तास्थापन करणार असं संजय राऊतांनी म्हंटल आहे.

संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनादेश इंडिया आघाडीकडे आहे. हा जनादेश झुगारून भाजपवाले सरकार बनवत आहेत. परंतु लोकांच्या मनात इच्छा आहे आहे, त्यानुसार योग्य वेळी आम्ही पाऊल उचलू. आज भलेही आकडा आमच्याकडे नाही, पण पुढे त्यावर विचार करू. NDA आघाडी यशस्वी झाली की नाही हे पुढच्या सहा महिन्यात समजेल, एनडीएला समर्थन देणारे अनेक पक्ष आमच्या संपर्कात असून त्यांची नावे आत्ताच घेणार नाही, पण हे पुढच्या सहा महिन्यात समजेल असा सूचक इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, काल नवी दिल्लीत INDIA आघाडीच्या सर्व नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत सध्या तरी इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे समजत आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, नतेने मोदींच्या विरोधात कौल दिला. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय पराभवच नाही, तर नैतिक पराभवही आहे. भाजपच्या द्वेष आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा जनादेश भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी, महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाहीच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या फॅसिस्ट शासनाविरुद्ध इंडिया ब्लॉक लढत राहील. आम्ही योग्य वेळी योग्य ती पावले उचलू असं खर्गे यांनी म्हंटल.

मोदींचा पक्ष मित्रांनाच संपवतो, चंद्राबाबूनी सावध रहावे

modi chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर NDA नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा करत आहे. या दोन्ही नेत्यांच्या सोबतीशिवाय सत्तास्थापन भाजपला शक्य नाही. मात्र इंडिया आघाडीत न जाता भाजपलाच या दोन्ही नेत्यांनी आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून चंद्राबाबू नायडू याना खास सल्ला देण्यात आलाय. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा शत्रुत्व केले तर ते फायद्याचं ठरतं. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो, त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात काय म्हंटल?

नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले. ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही असं सामनातून म्हंटल आहे.

आता मोदींचे सरकार नाही, तर एनडीएचे सरकार बनवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाले तर मोदी यांना अनेक कुबडय़ांच्या अटी-शर्तीवर काम करावे लागेल. मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा ‘मोदी’ ब्रॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला. मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाचा ‘आरोप’ होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला. उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात ‘मोदी मोदी’ करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला.

मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्षे दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक व बिजू जनता दलास भाजपने संपवून टाकले. पटनायक हे वनवासातच गेले. देशभरात भाजपने हेच आणि हेच केले. भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना तिसरयांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी- भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे.

Flipkart : लेटेस्ट iPhones ची जत्रा, iPhone 14 ते iPhone 15 Pro Max वर ऑफर्सचा पाऊस

iPhone 14

iPhone

Flipkart : प्रसिद्ध ई कॉमर्स वेबसाईट Flipkart चा सध्या सेल सुरु आहे. त्यामुळे अनेक वस्तूंवर ५०-८० टक्क्यांपर्यंत डिसकाऊन्ट मिळत आहे. एवढेच नाही तर मोबाईलवर सुद्धा चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. बँक ऑफर्स व्यतिरिक्त iPhone 14 Plus, iPhone 15, iPhone 15 Pro आणि इतर उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. हा सेल 8 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया डीलमध्ये काय खास आहे ?

भारी डिल्स

फ्लिपकार्ट एंड ऑफ सीझन सेल दरम्यान, iPhone 14 Plus ची सुरुवातीची किंमत 61,999 रुपये आहे. ही किंमत 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. ही किंमत मूळ विक्री किंमत रु. 79,900 आहे मात्र सेलमध्ये याची किंमत कमी झाली आहे. म्हणजेच Flipkart : वर हा फोन 17,901 रुपयांनी स्वस्त उपलब्ध आहे. ज्यांना iPhone 14 Plus मॉडेल डिव्हाइस विकत घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे.

iPhone 15 (Flipkart)

जे लोक iPhone 14 खरेदी करतात ते थोडे अधिक खर्च करून iPhone 15 खरेदी करू शकतात. आयफोन 14 च्या तुलनेत, आयफोन 15 चांगले काम करतो. अर्थात, तुम्हाला iPhone 15 Pro मॉडेलसह प्रत्येक गोष्टीचा उत्तम अनुभव मिळेल.iPhone 15 Pro स्मार्टफोन ची मूळ किंमत 1,34,900 रुपये आहे. पण सेलमध्ये हा फोन तुम्हाला 1,27,990 रुपयांना मिळेल. iPhone 15 Pro Max Flipkart वर 1,48,900 रुपयांना विकला जात आहे, जो 1,59,900 रुपयांच्या लॉन्च किमतीपेक्षा कमी आहे. तुम्ही नियमित प्रो मॉडेल खरेदी करण्याचा विचार करू शकता कारण तुम्हाला दोन्हीवर समान परफॉर्मन्स मिळेल. प्रो मॅक्समध्ये फक्त थोडी मोठी बॅटरी आणि डिस्प्ले आहे. यात 5x ऑप्टिकल झूम आहे आणि नियमित प्रो आवृत्तीमध्ये 3x ऑप्टिकल झूम आहे. दोन्ही उपकरणांचे उर्वरित स्पेक्स (Flipkart) जवळजवळ समान आहेत.