Monday, December 22, 2025
Home Blog Page 697

शिंदे गटात भूकंप!! 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात; लवकरच पक्षप्रवेश करणार

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिंदे गटात (Shinde Group) बंडाची चाहूल आहे. एकनाथ शिंदे यांचे ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असून लवकरच ते ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र आहे. हे ६ आमदार नेमके कोण आहेत ते मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. उद्धव ठाकरेंना लोकांची प्रचंड सहानभूती मिळाल्याचे पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचे ९ खासदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे ७ खासदार जिंकले, मात्र निवडणुकीत महायुतीची पूरती वाताहत झाली. अवघ्या १७ जागाच महायुती जिंकता आल्याने युतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढील धोका ओळखून शिंदे गटातील ६ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील असं बोललं जात आहे.

कोणाकोणाला पक्षात घेणार ?

शिंदे गटात जाऊनही ज्या आमदारांनी आत्तापर्यंत तटस्थ भूमिका घेतली, ठाकरेंवर टीका केली नाही अशा आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात. असं झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरेल.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना म्हंटल कि, अनेक लोक दिवाळीपासून आमच्याशी संपर्क करत आहेत. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत. परंतु त्यांच्याशी किती संपर्क ठेवायचा? नाही ठेवायचा हा नंतरचा भाग आहे. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आम्ही आमच्याच लोकांना घेऊन विधानसभा लढणार आहोत, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु, 10 वी उमेदवार करू शकतात अर्ज

Naval Dockyard Mumbai Bharti 2024

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता डोक्यार्ड अप्रेंटिस स्कूल नेव्हल डोक्यार्ड मुंबई यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड ll, मल्टीटास्किंग स्टाफ इत्यादी पदांचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 7 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 3 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Naval Dockyard Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – वरिष्ठ स्टोअर कीपर, स्टेनोग्राफर ग्रेड ll मल्टी टास्किंग स्टाफ
  • पदसंख्या – 7 जागा
  • नोकरीच्या ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य गुणवत्ता ऍश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट नोबल स्टोअर DQAN कॉम्प्लेक्स आठवा मजला नेव्हल डोक्यार्ड टायगर गेट मुंबई – 400023

रिक्त जागा

  • वरिष्ठ स्टोअर कीपर – 2 जागा
  • स्टेनोग्राफर ग्रेड ll – 1 जागा
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 4 जागा

वेतनश्रेणी

  • वरिष्ठ स्टोअर कीपर – 25,500 ते 81100 रुपये
  • स्टेनोग्राफर ग्रेड ll – 25,500 ते 81100
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18000 ते 56900 रुपये

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्र जोडायचे आहेत.
  • 3 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

RBI Repo Rate : रेपो रेटबाबत RBI चा मोठा निर्णय; तुमच्या कर्जावर काय परिणाम होणार?

RBI Repo Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटबाबत (RBI Repo Rate) निर्णय जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल कऱण्यात आला नसल्याचे जाहीर केलं आहे. देशात सध्या रेपो रेट 6.5% वर असून हाच रेट कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या 6-सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने 4:2 च्या बहुमताने व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्जाचे EMI सुद्धा जैसे थे राहणार आहेत. कर्जाचा ईएमआय कमी होण्याची प्रतीक्षा पाहणाऱ्या ग्राहकांना यामुळे कोणताही दिलासा मिळाला नाही.

शक्तिकांत दास म्हणाले की यावेळीही बैठकीत उपस्थित सदस्यांनी रेपो रेट स्थिर (RBI Repo Rate) ठेवण्याचा निर्णय घेतला असून आता एक वर्षांनंतरही आरबीआयचा मुख्य कर्ज दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे. आमची नजर विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांवर आहे. यासह, आम्ही मुख्य घटक देखील लक्षात ठेवत आहोत. व्याजदराबाबत कोणताही निर्णय या गोष्टी लक्षात घेऊनच घेतला जाईल. यापूर्वी RBI ने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो रेट 2.50 टक्क्यांनी वाढवला होता आणि तो 6.5 टक्क्यांवर नेला होता. तेव्हापासून, चलनविषयक धोरण समितीने सलग ८ बैठकांमध्ये या रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

रेपो रेट कधी कमी जास्त होतो ? RBI Repo Rate

जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा RBI अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते आणि रेपो दर वाढवते. सहसा 0.50 किंवा त्यापेक्षा कमी वाढ केली जाते.याहून जास्त वाढ किंवा घट होत नाही. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था वाईट काळातून जात असते तेव्हा रिकव्हरी साठी पैशाचा ओघ वाढवावा लागतो आणि अशा परिस्थितीत RBI रेपो रेट कमी करते.

बारामतीत अजित पवारांची आमदारकी धोक्यात; योगेंद्र पवार दंड थोपटणार?

ajit Pawar Yugendra Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा बघतोच तू कसा खासदार होतो ते.. असा भर लोकसभेच्या प्रचारात विरोधकांना दम भरणाऱ्या अजितदादांना (Ajit Pawar) आपल्या पत्नीलाच बारामतीतून निवडून आणता आलं नाही.. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाल्यानंतरचा अजितदादांच्या घरातील हा सलग दुसरा पराभव… लोकसभेत झालेल्या या पराभवातून अजितदादा सावरलेले नसताना आता चर्चा सुरु झालीय अजितदादांना पाडण्याची… होय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतूनच दस्तुरखुद्द अजितदादांची आमदारकी धोक्यात आलीय… नणंद विरुद्ध भावजयी हा बारामतीतल्या महानाट्याचा पहिला अध्याय आटोपल्यावर आता काका विरुद्ध पुतण्या हा नवा अंक बारामतीत रंगणार आहे.. पण यावेळेस काका असतील अजित पवार तर पुतण्या असेल युगेंद्र पवार.. पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीत पक्षफुटीनंतर लोकसभेच्या निकालानंतर जनतेचा कौल तुतारीच्या बाजूने असल्याचं क्लिअर झालंय. पण आता आमदारकीच्या निवडणुकीत थेट पवारच पवारांना नडणार आहेत…महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री, अनेक खात्यांची मंत्रीपदं, विरोधी पक्षनेते आणि पक्षफुटीनंतर आता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या याच दादांचा विधानसभेला पराभव होतोय, अशी चिन्हं दिसतायत… युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी विधानसभेला लढत झालीच तर कोअर बारामतीकरांचा कौल कुणाच्या बाजूने राहील? मुलगा, बायको यांचा पराभव झाल्यावर आता दादांचा नंबर लागेल??

तर राष्ट्रवादी पक्ष फोडल्यावर मातब्बर नेत्यांना स्वत:च्या पक्षात घेतल्यावर दादा चांगले फॉर्मात आले…घड्याळ, चिन्हं आणि नाव त्यांना मिळाल्यावर तर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही… लोकसभेच्या मिळालेल्या चारही जागा म्हणूनच अजितदादांनी प्रतिष्ठेच्या बनवल्या… बारामतीतून तर अजितदादांनी बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करत विरोधाच्या ठिणग्या घरात नेऊन पोहचवल्या.. सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी अजितदादांनी स्थानिक नेत्यांच्या विरोधापुढे नमतं घेतलं… हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे यांना हाताशी धरत मोट बांधली.. मोदी, फडणवीस, स्वत: अजितदादा आणि पक्षातील बहुतांश नेते हे मतदानापर्यंत बारामतीत तळ ठोकून होते. मतदानानंतरची दादांची बॉडी लेग्वेंज पाहिली तर बारामतीची सीट कन्फर्म येतेय, असं बोललं जात होतं. पण निकाल लागला आणि सगळ्यांच्याच बत्त्या गुल झाल्या… कुणाचीही सीट आली तरी फारपार हजारांच्या घरात लागेल असा अंदाज बांधणाऱ्या विश्लेषकांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई चक्क दिड लाखाच्या लीडने दणक्यात निवडून आल्या.. हे कमी होतं की काय म्हणून आकडवारीचं डिकोडींग केल्यावर समजलं की बारामतीतल्या सहापैकी पाच मतदारसंघात तुतारी लीडला दिसली… त्यात अजितदादा आमदार असणाऱ्या बारामती विधानसभेचाही समावेश होता… त्यामुळेच मुलगा आणि बायको पडल्यावर चर्चा सुरू झाली ती अजितदादांना पाडण्याची…

आणि याला कारण ठरलं ते एक नाव ते म्हणजे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) . अजितदादांनी पक्ष फोडल्यावर पवार कुटूंब शरद पवारांच्या बाजूने एकवटलं. यात आणखीन एका नव्या चेहऱ्याची भर झाली ते नाव म्हणजे युगेंद्र पवार.. अजितदादांच्या प्रत्येक संकटात त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते सुपुत्र… अजितदादांच्या विरोधात बारामतीतून सुप्रियाताईंच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी युगेंद्र पवार यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती.. बारामती शहर आणि ग्रामीण पट्टा युगेंद्र पवारांनी पिंजून काढला.. प्रत्येक गावात जाऊन सभा घेतल्या… घोंगडी बैठका घेतल्या.. सुप्रियाताई आणि शरद पवारांनी हा पट्टा युगेंद्र पवारांच्या खांद्यावर सोडला होता.. बारामती – निरा या पट्ट्यात रेवती सुळे आणि युगेंद्र पवार हे दोनच चेहरे प्रचार करत होते… त्यातल्या त्यात अजितदादा आणि त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनाही खांद्यावर घेण्यात युगेंद्र पवारांनी कोणतीच कसर सोडली नाही… याचाच इम्पॅक्ट म्हणून बारामतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांवर युगेंद्र पवार यांच्यावर भरसभेत टीका करण्याची वेळ आली…निकालानंतर बघून घेतो, असा सज्जड दमही भरला.. पण निकाल तुतारीच्या बाजूने लागला.. हा एक धक्का पचवताना अजितदादांना दुसरा धक्का बसला तो म्हणजे ते ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या बारामती विधानसभेतूनच ते ४५ हजारांनी पिछाडीवर गेले… हा आकडा स्पष्ट सांगतोय की अजितदादांची आमदारकी धोक्यात आलीय…

खासदारकीला पवार कुटुंबातले दोन्ही उमेदवार अटीतटीचे होते.. पण शरद पवार विधानसभेला दादांच्या विरोधात कुणाला उभं करायचं, याचा आधीच बंदोबस्त करुन आहेत… अजितदादांच्या बंडाळीला उत्तर म्हणून शरद पवार आता बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवार करतील, हे आता जवळपास फिक्स आहे.. बारामतीतील स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात आमदारकीच्या प्रचाराचा नारळही फोडला आहे..त्यामुळे बारामतीत आता काका विरुद्ध पुतण्या या नाट्याचा आता नवा अंक बघायला मिळणार आहे.. बारामतीतील जगताप, तावरे, काकडे, गायकवाड या मातब्बर घराण्यांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्यासाठी प्रचारात जंग जंग पछाडलं.. पण यांच्याच प्रभावक्षेत्रातल्या मतदान केंद्रावर घड्याळ बॅकफूटला जाऊन तुतारी जोरदार वाजलीय… यावरुन आपण अंदाज बांधू शकतो की शरद पवारांनी या पट्ट्यात आपली किती फिल्डींग लावली असेल… लोकसभेचं हेच चित्र विधानसभेलाही रिपीट झालं तर मुलगा, बायको यानंतर स्वत: दादांनाही पराभवाचा सर्वात मोठा धक्का बसू शकतो… बॉटम लाईन काय तर काकांना नडणं पुतण्याला भविष्यातही जड जाणार आहे असं दिसतंय…

Jio Recharge Plan : Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन; रोज 2GB डेटासह मिळतात ‘या’ सुविधा

Jio Recharge Plan 3227 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन लाँच (Jio Recharge Plan) करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे रिचार्ज कमी पैशात उपलब्ध असल्याने जिओने अल्पावधीतच मोठा ग्राहकवर्ग कमावला आहे. आजही आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्जबद्दल सांगणार आहोत, जो संपूर्ण वर्षभराचा असून तुम्हाला यामध्ये दररोज 2GB इंटरनेटसह भरपूर फायदे मिळतील… चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात ….

आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) बद्दल सांगत आहोत तो आहे Jio चा 3227 रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल म्हणेजच संपूर्ण वर्षभरात ग्राहक सुमारे 730GB डेटा वापरू शकतात. इंटरनेट सोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस दिले जातायत. महत्वाची बाब म्हणजे एकदा तुम्ही हा रिचार्ज प्लॅन मारला कि तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी, जिओ ॲपचे फ्री सबस्क्रिप्शन सुद्धा देण्यात येतेय. त्यामुळे सुविधांनी युक्त असा हा रिचार्ज प्लॅन आहे.

1,947 रुपये वाचू शकाल – Jio Recharge Plan

तुम्हाला अंदाज नसेल, परंतु या 3227 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहक तब्बल 1,947 रुपयांची बचत करू शकतात. कारण समजा जर तुम्ही दर महिन्याला 2 जीबी इंटरनेट डेटाचा रिचार्ज केल्यास तुम्हाला महिन्याला 398 रुपये खर्च करावे लागतील आणि त्याची व्हॅलिडिटी फक्त 28 दिवस असेल. अशाप्रकारे हिशोब केल्यास संपूर्ण ३६५ दिवसांसाठी तुमचा खर्च ५,१७४ रुपये इतका होईल. मात्र जर तुम्ही 3227 रुपयांचा प्लान रिचार्ज केला तर तुमची सुमारे 1,947 रुपयांची बचत होईल.

बारामतीतील पराभवानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; कोणावर फोडलं खापर ?

ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का देत बारामती मधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय बोलणार?? कोणावर खापर फोडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होते. अखेर दादांनी मौन सोडत अगदी स्पष्ट शब्दातच याविषयी भाष्य केलं. आतापर्यंत बारामतीकरांनी साथ दिली, पण यावेळच्या निकालाने मात्र मी आश्चर्यकारक झालो. आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्यच करायला हवं असं अजितदादा म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीबाबतच्या निकालावरून मी आश्चर्यचकित झालो. बारामतीकरांचा आजपर्यंत पाठिंबा मिळत होता. मात्र यंदा हा पाठिंबा का मिळाला नाही तेच कळत नाही. गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करतोय मात्र तरीही मला पाठिंबा मिळाला नाही. मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला, त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला. मागासवर्गीय समाजात तसा प्रचार बिंबवण्यात विरोधक यशस्वी झाले. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात संभाजीनगर सोडलं तर एकही जागा आली नाही असं म्हणत अजित पवारांनी पराभवाची कारणे सांगितली.

अजित पवार पुढे म्हणाले, शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा नाउमेद न होता लोकांसमोर जायचं असतं. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं तर किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. त्यामुळे जनतेने दिलेला विनम्र कौल आम्ही स्वीकारलेला आहे. त्यांच्या आमच्याबद्दलचा जो विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करु आणि पुन्हा नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाऊ असं अजित पवार म्हणाले.

पाकिस्तानला अमेरिकेने लोळवलं; सुपर ओव्हरमध्ये पराभवाची नामुष्की

USA Vs Pak

हॅलो महारष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत आज सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. बलाढ्य पाकिस्तानच्या संघाला नवख्या अमेरिकेने पराभूत केलं आहे. या सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला, यामध्ये पाकिस्तानचा संघ कमी पडला आणि अमेरिकेने नवा इतिहास रचला. मराठमोळा सौरभ नेत्रवाळकर अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सुपर ओव्हर मध्ये टिच्चून गोलंदाजी करत सौरभने पाकिस्तानला रोखल…

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १५९ धावा केल्या, बाबर आझमने ४४ आणि शादाब खानने ४० धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या अमेरिकेच्या संघानेही चांगली सुरुवात केली. मोहन्क पटेल, अँडी गॉस, आरोन जोन्स यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ पोचवले. शेवटच्या चेंडूवर यूएसएला विजयासाठी 5 धावांची गरज असताना नितीश कुमारने चौकार ठोकल्याने सामना टाय झाला.

यानंतर सुपर ओव्हर मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेचा संघ प्रथम उतरला. ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंह या जोडीने सुपर ओव्हरमध्ये 18 धावा केल्या, समोर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज मोहम्म्मद अमीर होता, मात्र त्याने या ओव्हर मध्ये तब्बल ३ वाईड बॉल टाकले. त्यामुळे अमेरिकेने आव्हानात्मक धावा केल्या. यानंतर १९ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेला पाकिस्तानचा संघ १३ धावाच करू शकला. मराठमोळ्या सौरभ नेत्रवाळकरने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर मोठी नामुष्की ओढवली आहे.

Kitchen Hacks : चहा गाळल्यानंतर चहापत्ती फेकू नका; ‘असा’ करा पुनर्वापर

Kitchen Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्वाचा भाग असतो. कित्येक लोक अगदी बेडवरच चहा पिणे पसंत करतात. तर काही लोक दिवसभरात तीन ते चार वेळा तरी चहाचे सेवन करतात. प्रत्येक चहा बनवताना वापरली जाणारी चहापत्ती ही चहा गाळून झाला की, फेकून दिली जाते. साहजिक आहे तुम्हीही हेच करत असाल. पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही चहापत्ती फेकून देणार नाही याची आम्ही तुम्हाला पूर्ण खात्री देतो. होय. कारण गाळून वेगळी केलेली चहापत्ती तुम्ही भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. कशी? चला जाणून घेऊया.

उरलेल्या चहापत्तीचा वापर (Kitchen Hacks)

चहा गाळून झाल्यानंतर गाळणीत उरलेली चहापत्ती पुन्हा काय उपयोगी पडणार? म्हणून आपण ती कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. पण गाळणीत उरलेली चहापत्ती फेकून न देता तिचा वापर काचेची भांडी वापरण्यासाठी करता येतो, हे फार कमी लोकांना माहित आहे. बऱ्याचदा काचेच्या भांड्यांवर पडलेले काळे, पिवळे डाग कालांतराने आणखी हट्टी झालेले दिसतात. हे डाग काही केल्या जाण्याचे नाव घेत नाहीत. अशावेळी तुम्ही चहा गाळून उरणारी चहापत्ती असते तिचा वापर करून हे डाग नक्कीच काढू शकता.

काचेची भांडी होतील चकाचक

काचेची भांडी घासण्यासाठी चहापत्तीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी चहाचा गाळ पाण्याने धुवून घ्या आणि त्यातून निघालेले पाणी टाकून द्या. (Kitchen Hacks) त्यानंतर ही चहापत्ती काचेच्या भांड्यावर घासा. असे केल्याने काचेच्या भांड्यावरील सर्व डाग निघून जातील.

आरसा होईल लख्ख

फक्त काचेची भांडी नव्हे तर चहापत्तीचा वापर तुम्हाला आरसा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा होईल. (Kitchen Hacks) बऱ्याचवेळा आरशावर पाण्याचे किंवा धुळीचे डाग पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही चहापत्तीचा वापर करू शकता.

बेसिन सिंक होईल स्वच्छ

जर तुमच्या बेसिन सिंकमध्ये लिंबाचे किंवा इतर कोणतेही डाग पडले असतील तर त्या ठिकाणी चहापत्ती घासा. असे केल्यास कितीही घट्ट डाग असले तरीही झटक्यात निघून जातील. (Kitchen Hacks)

करदात्यांनो लक्ष द्या!! या अंतिम मुदतीपर्यंत ITR न भरल्यास होईल मोठे नुकसान

Income tax return

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 1961 च्या आयकर कायद्यानुसार, ज्या करदात्याचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त अधिक आहे, अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार, 2024-25 साठी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. परंतु या तारखेच्या आत रिटर्न भरल्यास करदात्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे करदात्यांना मुदतीपूर्वी रिटर्न भरणे फायदेशीर ठरेल.

कोणाला रिटर्न भरावे लागतील??

जर तुमचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 31 जुलैपर्यंत रिटर्न भरावे लागेल. आयकर विभागाने रिटर्न भरण्यासाठी ITR फॉर्म जारी केला आहे. नोकरदार करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 घ्यावा लागेल. तर, नियोक्त्यानी 15 जूनपर्यंत फॉर्म 16 जारी करणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही जर पगारदार करदाते असाल तर तुमच्या कंपनीने फॉर्म 16 जारी केला आहे की नाही ते तपासून घ्या.

अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न भरला नाही तर??

जर तुम्ही अंतिम तारखेपर्यंत आयकर रिटर्न भरले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. परंतु, विभागाकडून अंतिम मुदतीनंतर रिटर्न भरण्याची सुविधा प्रदान केली जाते. त्यापूर्वी तुम्हाला दंड ही भरावा लागतो. जर एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याच्याकडून 1,000 रुपये दंड आकारला जाईल. तर वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच, करदात्यांना कराच्या रकमेवर दरमहा 1 टक्के व्याज द्यावे लागेल.

नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला CISF गार्डने कानशिलात लगावली; नेमके काय घडले?

Kanagana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला (Kangana Ranaut) एका CISF गार्डने कानशिलात मारली असल्याची बातमी समोर आली आहे. हा प्रकार आज चंदीगड विमानतळावर घडला आहे. यावेळी कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. याचवेळी CISF गार्ड कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानशिलात मारली. यानंतर पोलिसांनी कुलविंदर कौरला अटक केली आहे.

सांगितले जात आहे की, मध्यंतरी कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केले होते. तिने केलेल्या याच वक्तव्याबाबत आक्रोश व्यक्त करत CISF गार्ड कुलविंदर कौरने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. सर्वात प्रथम
कंगना रणावत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आली असताना तिचा गेटवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. यानंतर CISF गार्डने कंगना राणावतच्या कानशिलात वाजवली. या प्रकारामुळे विमानतळावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या बाजूने उभी राहिली होती. या निवडणुकीत मंडीच्या जनतेने कंगनाला बहुमतांनी विजयी केले आहे. या विजयानंतर पुन्हा दिल्लीला रवाना होत असताना कंगना राणावतबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित गार्डवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.