Saturday, December 6, 2025
Home Blog Page 8

Supriya Sule Letter To Devendra Fadnavis : सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना पत्र; या नेत्यांना भाजपात घेऊ नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Supriya Sule Letter To Devendra Fadnavis । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग बघायला मिळतेय. फक्त विरोधी बाकावरीलच नव्हे तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. काल तुळजापूर येथील अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु यामध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश असल्याचा आरोप करत अशा लोकांना पक्षात घेऊ नका अशा आशयाचे पात्र शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.

सुप्रिया सुळे यांचं पत्र जसंच्या तसं Supriya Sule Letter To Devendra Fadnavis

प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई

विषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..

मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,

तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते,याबाबत आपणही सहमत असाल. Supriya Sule Letter To Devendra Fadnavis

आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.

तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.

धन्यवाद.

सुप्रिया सुळे
खासदार, बारामती लोकसभा

आता सुप्रिया सुळे यांच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय उत्तर देते ते पाहायला हवं. फडणविस या सर्व नेत्यांचा पक्षप्रवेश रोखतील कि भाजपवाले विरोधकांवरच उलटा आरोप करतात ते पाहायला हवं.

Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय!! आता या स्पर्धेत खेळणार

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा भाग व्हावंच लागेल असे फर्मान बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) काढल्यानंतर, मुंबईचा राजा, हिटमॅन रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसेल. आपला लाडका रोहित पुन्हा एकदा मैदानावर दिसणार असल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. परंतु दुसरीकडे विराट कोहलीची उपलब्धता अजूनही संशयास्पद आहे. तोविजय हजारे ट्रॉफी खेळेल कि नाही हे अजून स्पष्ट नाही.

कधीपासून सुरु होणार विजय हजारे ट्रॉफी ? Rohit Sharma

विजय हजारे ट्रॉफी २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारत ३ ते ९ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळेल आणि त्यानंतर ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळेल. विजय हजारे ट्रॉफी शिवाय रोहित शर्मा २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत सुद्धा खेळेल असं बोललं जात आहे. तो मुंबईतील शरद पवार इनडोअर अकादमीमध्ये सराव करत आहे.

खरं तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटला रामराम ठोकला आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू फक्त एकदिवसीय सामने खेळताना दिसतात. नुकतंच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही चांगली कामगिरी केली होती. रोहितने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले, तर कोहलीने दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ असलेले विराट आणि रोहित आगामी २०२७ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळावे अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.

बीसीसीआयचे फर्मान –

विराट आणि रोहितसाठी बीसीसीआयने मोठी अट ठेवल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. जर भारताच्या या दोन्ही अनमोल रत्नांना संघात राहायचे असेल तर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. जर ते देशांतर्गत क्रिकेट खेळले तरच त्यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळेल अशी अट बीसीसीआयने घातल्याचे समजते.

Pune E-Buses : मोदी सरकारची पुणेकरांना भेट; 1000 इलेक्ट्रिक बसला मंजुरी

Pune E-Buses

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने पुणेकरांना खास भेट दिली आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १,००० इलेक्ट्रिक बसेसना (Pune E-Buses) मंजुरी दिली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत या इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांना देण्यात येतील. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या नवीन इलेक्ट्रिक बसेस मुळे (Pune E-Buses) पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कला मोठा चालना मिळेल. नवीन ई-बसच्या समावेशामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या ताफ्याला बळकटी मिळेल, गर्दी कमी होईल आणि वाहनांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, मोहोळ यांनी एका निवेदनात म्हंटल. मोहोळ म्हणाले की, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत शहर, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या भागात बस सेवा चालवणाऱ्या पीएमपीएमएलने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अंतिम मान्यता दिली आहे.

पीएमपीएमएल २००० बसेस चालवते- Pune E-Buses

पीएमपीएमएल सध्या सुमारे २००० बसेस चालवते, त्यापैकी सुमारे ७५० बसेस त्यांच्या मालकीच्या आहेत आणि उर्वरित कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात. अधिकाऱ्यांच्या मते, शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाला किमान ३,००० बसेसची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारसह केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. यासाठी मोहोळ यांनी एच.डी. कुमारस्वामी यांच्या वेळोवेळी प्रयत्न भेटी घेऊन पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारने १००० इलेक्ट्रिक बसेसना (Pune E-Buses) मंजुरी दिली आहे.

यासाठी आर्थिक तयारी सुनिश्चित करण्यासाठी, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना आवश्यक पत्रव्यवहार भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठवण्याची विनंती केली होती. पीएमपीएमएलने नंतर हा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे पाठवला. मी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नवी दिल्लीत मंत्री कुमारस्वामी यांची भेट घेतली, त्यानंतर मंजुरी जलद करण्यात आली. याशिवाय पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा मजबूत करणे हे प्राधान्य आहे, पुणे मेट्रो ३२ किमीच्या नेटवर्कवर धावते आणि शिवाजीनगर-हिंजवडी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे, इतर विस्तारांनाही मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मोहोळ यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुमारस्वामी आणि फडणवीस यांचे आभार मानले.

Delhi Red Fort Blast : देशभरात दहशतवादी हल्ल्याचा कट? तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता या स्फोटानंतर डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते.

कोण आहे शाहीन शाहिद – Delhi Red Fort Blast

डॉक्टर शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र शाहिन शाहिदीच्या कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. शाहीनने 2013 साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात राहत होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाहिन महाराष्ट्रात नेमकी कुणाच्या संपर्कात होती याची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की, देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत.

दरम्यान, दिल्ली स्फोटादरम्यान (Delhi Red Fort Blast) वापरण्यात आलेली कार हा डॉ मोहम्मद उमर हाच चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र उमरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता. डॉ. उमर तपास यंत्रणांच्या सर्तकतेमुळे घाबरला होता त्यामुळं पॅनिक अटॅकमुळं त्याने लाल किल्ल्याजवळचा स्फोट घडवला असल्याचे समोर येत आहे. मात्र त्याच टार्गेट लाल किल्ला नव्हताच, असा संशय तपास यंत्रणांना आहे. उमरला कार घेऊन दुसरीकडे जायचे होते. मात्र एका अपूर्ण आयडीमुळं चालत्या गाडीत स्फोट झाला अशी माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंचा राऊतांना फोन; तब्ब्येतीची विचारपूस केली

Eknath Shinde Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत याना फोन करत संजय राऊत यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. संजय राऊत हे मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत, ते लोकांपासून दूर आहेत,. काही दिवसांपूर्वी त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. काल त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी फोन वरून संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि लवकर बरे व्हा अशा शुभेच्या दिल्या. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी राऊतांच्या तब्ब्येतीची विचारपूस करत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपली.

उदय सामंत यांचे ट्विट –

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा विडिओ सोशल मीडियावर ट्विट करत माहिती दिली. त्यांनी म्हंटल, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मा. खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली. साहेबांची ही सहृदयता आणि सर्वांप्रती असलेली आपुलकी हीच त्यांची खरी ओळख आहे.

राऊत vs शिंदे

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊत विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना असा थेट ‘सामना’ नेहमीच पाहायला मिळाला आहे. संजय राऊत हे नेहमीच शिंदेंच्या शिवसेनेवर आणि खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. मिंधे गट, गद्दार, अशा शब्दात संजय राऊत शिंदे गटावर टीका करत असतात. अतिशय कडवट शब्दांत टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही राऊतांना जशास तसं उत्तर दिलं जातं. मात्र आता संजय राऊत आजारी पडल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा प्रार्थना केल्या जात आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पुढील दोन महिने सामाजिक आणि राजकीय जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मिडीया ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांनी म्हंटल होते, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.

Cabinet Meeting Decision : फडणवीस सरकारचे 5 मोठे निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाची घोषणा

Cabinet Meeting Decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting Decision) आज ५ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. वित्त विभाग, सहकार विभाग, विधी व न्याय विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे – Cabinet Meeting Decision

१) नाशिक, नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना ८२७ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल (सहकार विभाग)

२) न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधिशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षारक्षक उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता खर्च तरतुदीस मान्यता (विधि व न्याय विभाग) (Cabinet Meeting Decision)

३) पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढविण्यास मान्यता. अंमलबजावणीचा कालावधी १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार (वित्त विभाग)

४) हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता (जलसंपदा विभाग)

५) हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तलाव (ता. सेनगाव) प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी (जलसंपदा विभाग)

या बैठकीत (Cabinet Meeting Decision) पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण पार पडले. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Vande Bharat Express : महाराष्ट्राला मिळणार नवी वंदे भारत एक्सप्रेस; कुठून कुठे धावणार?

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा विकास झाला आहे. देशातील अनेक मार्गावर नवनवीन रेल्वे धावत आहेत. खास करून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या (Vande Bharat Express) संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवास अनुभवता येत असल्याने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मागणीही वाढतच चालली आहे. सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता राज्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. हि ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हीटी वाढवेल.

कसा असेल वंदे भारत एक्सप्रेसचा रूट ?

आम्ही तुम्हाला ज्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल सांगतोय ती आहे पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस. पुण्याला मिळणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन राहणार आहे. ही प्रस्तावित वंदे भारत डिसेंबर 2025 अखेर किंवा जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे ते नांदेड हे अंतर 550 किलोमीटर इतके आहे. सध्या या मार्गावर ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरु आहेत त्या गाडीने जायचं म्हंटल तर १० ते १२ तासांचा वेळ लागतो. परंतु एकदा का हि वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली कि हेच अंतर अवघ्या ७ तासांवर येईल. म्हणजेच काय तर प्रवाशांचा वेळ ३ तासाने वाचेल. या प्रस्तावित वंदे भारत ट्रेनला पुणे, कुर्डूवाडी, धाराशिव आणि नांदेड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे या शहरातील प्रवाशाना या वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेष लाभ होईल यात शंकाच नाही.

तिकीट किती असेल? Vande Bharat Express

पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांची किंमत अधिकृतपणे जाहीर झाली नसली तरी अंदाजे या ट्रेनचे तिकीट दर हे साधारणतः 1200 रुपयांपासून सुरू होईल आणि जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत जाऊ शकते असे बोललं जातंय.

सध्या महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस

सध्या महाराष्ट्रात १२ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) धावत आहेत. यामध्ये मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, CSMT ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या गाड्यांचा समावेश आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचा त्या 4 डॉक्टरांशी संबंध? AK-47 रायफल, स्फोटकं सगळंच सापडलं

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Bomb Blast Photos) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यादरम्यान हरियाणा येथील एकाच हॉस्पिटल मधील ४ डॉक्टर चर्चेत आले आहेत.

स्फोटाच्या दिवशीच म्हणजेच सोमवारी सकाळी, जम्मू आणि काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून २,९०० किलो आयईडी बनवणारे रसायने, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचे थेट कनेक्शन हे डॉक्टरांशी जोडलं जातंय. या स्फोटाशी संबंधित कोणताही धागा व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीपर्यंत घेऊन जातोय.

डॉ. आदिल अहमद राठर

दिल्लीत स्फोट (Delhi Red Fort Blast) होण्याआधी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी असल्याचे स्पष्ट झालं.

महिला डॉक्टर Delhi Red Fort Blast

7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.

अहमद मोहियुद्दीन सैयद

7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे.हा डॉक्टर रिसिन नावाचं एक खतरनाक विष बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.

डॉ. मुझमिल शकील

10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला असता तिथेही 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.

Delhi Bomb Blast Photos : गाड्यांच्या चिंधड्या, अनेकांचा मृत्यू, हातपाय गमावले, दिल्ली स्फोटाचे हादरवणारे Photos पहाच

Delhi Bomb Blast Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Bomb Blast Photos) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचे हादरवणारे फोटो समोर आले असून तुमचंही हृदय पिळवळून निघेल. दिल्ली स्फोटात तब्बल 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या, अनेकांचे हात-पाय गेले..९ जणांना जीव गमवावा लागला. संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि आक्रोश पाहायला मिळाला.

दिल्ली कार स्फोट हा इतका भीषण होता कि, मेट्रो स्टेशनच्या गेट आणि आजूबाजूच्या काचाही फुटल्या. जवळपास 32 गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या. स्फोटानंतर आग भडकली व परिसरातील अनेक वाहनांनी पेट घेतला. यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. सर्वत्र आक्रोश पाहायला मिळाला. Delhi Bomb Blast Photos

हा स्फोट म्हणजे दहशतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती i20 कार होती. कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. फरीदाबाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील स्फोटाच्या स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.

घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही हे स्पष्ट होईल. यामागचे कारण म्हणजे गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद आय-२० कारमधील प्रवासी होता.

दिल्ली पोलिसांनी पार्किंगमध्ये गाडी येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत आहे. तीन तास तो कारमध्येच बसलेला होता. ज्यामध्ये त्याने काळा मास्क घातला आहे.

फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मद याचा शोध घेत होते. त्यामुळे घाईगडबडीत उमरने हा आत्मघातकी स्फोट घडवून तर आणला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. Delhi Red Fort Blast

म्बस्फोटांच्या तपासात जम्मू आणि काश्मीरमधील तारिक आणि मोहम्मद उमर ही दोन नावं समोर आली आहेत. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला ती सलमान नावाच्या व्यक्तीचा होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान त्याने ती कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड केलं. पोलिस तपासात ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे.

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटप्रकरणी धक्कादायक माहिती!! 3 तास कारमध्ये बसून….

Delhi Red Fort Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट म्हणजे दहशतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती i20 कार होती. कारचा चालक डॉ. मोहम्मद उमर फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

3 तास तो कारमध्येच- Delhi Red Fort Blast

घटनास्थळावरून जप्त केलेल्या कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, जेणेकरून कारमधील व्यक्ती डॉ. उमर मोहम्मद आहे की नाही हे स्पष्ट होईल. यामागचे कारण म्हणजे गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की डॉ. उमर मोहम्मद आय-२० कारमधील प्रवासी होता. दिल्ली पोलिसांनी पार्किंगमध्ये गाडी येताना आणि जातानाचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. या फुटेजमध्ये संशयित एकटाच दिसत आहे. तीन तास तो कारमध्येच बसलेला होता. ज्यामध्ये त्याने काळा मास्क घातला आहे. फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सी डॉ. उमर मोहम्मद याचा शोध घेत होते. त्यामुळे घाईगडबडीत उमरने हा आत्मघातकी स्फोट घडवून तर आणला नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. Delhi Red Fort Blast

जेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये एकामागून एक अटक होऊ लागली, तेव्हा डॉ. उमरला अटकेची भीती वाटू लागली आणि घाबरून त्याने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने त्याच्या साथीदारांसह कारमध्ये डिटोनेटर ठेवले आणि स्फोट घडवून आणला. बॉम्बस्फोटांच्या तपासात जम्मू आणि काश्मीरमधील तारिक आणि मोहम्मद उमर ही दोन नावं समोर आली आहेत. ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला ती सलमान नावाच्या व्यक्तीचा होती. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान त्याने ती कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड केलं. पोलिस तपासात ही कार तारिक नावाच्या व्यक्तीला विकल्याचे समोर आले आहे.