Monday, December 22, 2025
Home Blog Page 701

Hero Xoom Combat Edition : Hero Xoom चे कॉम्बॅट एडिशन लाँच; पहा काय खास फीचर्स मिळतात

Hero Xoom Combat Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारात Hero Xoom चे नवीन व्हेरिएंट लाँच (Hero Xoom Combat Edition) केलं आहे. या नव्या मॉडेलला कॉम्बॅट एडिशन असं नाव देण्यात आलं असून तिची रचना फायटर जेट्सपासून प्रेरित आहे. ग्रे आणि काळ्या अशा मिक्स रंगात हिरो ची हि बाईक दिसतेय. तसेच तिचा लूक सुद्धा अतिशय स्पोर्टी आहे. देशभरातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारचा लूक देण्यात आल्याचे बोललं जात आहे. आज आपण हिरो Xoom च्या या नव्या मॉडेलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

Hero Xoom च्या कॉम्बॅट एडिशन मध्ये 110.9 cc, एअर-कूल्ड इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन CVT गिअरबॉक्सला जोडण्यात आले असून ते 7,250rpm वर 8.05bhp मॅक्सिमम पॉवर आणि 5,750rpm वर 8.7Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. आधीच्या ZX मॉडेलमध्ये जे काही फीचर्स देण्यात आले होते तेच सर्व फीचर्स कॉम्बॅट एडिशनमध्येही (Hero Xoom Combat Edition) ग्राहकांना मिळतात. यामध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एक संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कॉर्नरिंग लाइट्स, एल-आकाराचे एलईडी डीआरएल, 12-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट अशा काही फीचर्सचा समावेश आहे.

किंमत किती? Hero Xoom Combat Edition

Hero Xoom च्या कॉम्बॅट एडिशनची किंमत हि आधीच्या ZX व्हेरियंटपेक्षा थोडीशी जास्त आहे. या अपडेटेड स्कुटरची किंमत 80,967 रुपये आहे.तर Zoom ZX व्हेरिएंटची किंमत 79,967 रुपये होती. म्हणजेच किमतीत थोडाफार फरक पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात हिरोची ही स्कुटर Honda Dio, Honda Activa यासारख्या गाडयांना थेट टक्कर देईल.

Kailash Parvat Mystery : कैलास पर्वतावर का कुणी चढू शकलं नाही? रहस्य जाणून व्हाल अचंबित

Kailash Parvat Mystery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kailash Parvat Mystery) संपूर्ण जगभरात अनेक रहस्य दडलेली आहेत. यातील कित्येक रहस्य अशी आहेत ज्यांच्यासमोर विज्ञानही फेल ठरतं. ज्यामध्ये देवांचे देव महादेव यांचे स्थान असणाऱ्या कैलास पर्वताचा समावेश आहे. माहितीनुसार, माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. त्याच्यासमोर कैलास पर्वताची उंची सुमारे २ हजार मीटर कमी आहे. असे असूनही आजपर्यंत कोणताही मनुष्य कैलास पर्वत सर करू शकलेला नाही.

हिंदू तसेच बौद्ध धर्मात या पर्वताला पवित्र दर्जा आहे. त्यामुळे कैलास पर्वताबाबत प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत. आतापर्यंत अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येकाला अपयश आलं. असं का होत असेल? यामागे नेमकं काय रहस्य दडलंय? चला जाणून घेऊया.

रहस्यमयी कैलास पर्वत (Kailash Parvat Mystery)

कैलास पर्वत हा तिबेटच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे. बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या पर्वताकडे जाण्यासाठी भारतातून उत्तराखंडमार्गे जावे लागते. हिंदू पुराणे तसेच ग्रंथांनुसार कैलास पर्वतावर महादेव वास करतात. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. असे असूनही आजपर्यंत कोणतीही व्यक्ती ट्रेकर असली तरीही कैलास पर्वत सर करू शकलेली नाही, हे थोडे विशेष आहे. तसा अनेकांनी प्रयत्न केला होता.

मात्र, बऱ्याच लोकांना या पर्वतावर चढाई करताना नेव्हिगेशन करणे अवघड असल्याचे समजले. (Kailash Parvat Mystery) या पर्वतावर म्हणजे दिशा भरकटते, रस्ता चुकतो. अनेकांनी याबाबत अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा केला आहे.

अलौकिक शक्तींमुळे तयार झालेले स्थान

निसर्गातील अद्भुत आणि रहस्यमयी गोष्टींनी समृद्ध असणारा कैलाश पर्वत हा नैसर्गिक रचना नसून अलौकिक शक्तींमुळे तयार झालेला एक पिरॅमिड आहे, असे अनेक संशोधक तसेच तज्ञांचे म्हणणे आहे. हा अद्भुत कैलाश पर्वत १०० रहस्यमयी पिरॅमिड्सपासून बनल्याचा दावा एका रशियन तज्ञाने केला होता. (Kailash Parvat Mystery) आणखी एक खास बाब म्हणजे, कैलाश पर्वत हा इतर कोणत्याही पर्वतांप्रमाणे त्रिकोणी नसून हा पर्वत आकाराने चौकोनी आहे. पुराणानुसार, हा पर्वत सृष्टीचे केंद्र असून या ठिकाणी सोने, माणिक, स्फटिका आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा उल्लेख आहे.

कोणत्याही मनुष्यासाठी अवघड चढाई

कैलास पर्वताचा उतार हा ६५ अंशांपेक्षा जास्त असून हे ठिकाण अत्यंत किरणोत्सर्गी आहे. त्यामुळे सामान्य मनुष्य सोडा, गिर्यारोहकदेखील येथे चढाई करण्यासाठी घाबरतात. अनेकदा येथे हवामानात अचानक बदल होत असतो. त्यामुळे मानवाची प्रकृती बिघडू शकते. शिवाय वातावरणातील बदलांमूळे अनेकदा हेलीकॉप्टरसुद्धा भरकटतात. (Kailash Parvat Mystery) विशेष सांगायचे म्हणजे, हा पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे लागून दिशाभूल करणाऱ्या पायवाटा लागतात. अशा कारणांमुळे सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे.

कुणी केली होती शेवटची चढाई?

हिंदू तसेच बौद्ध धर्मीयांसाठी कैलास पर्वत हे एक पवित्र स्थान आहे. येथे अलौकिक शक्ती वास करते. त्यामुळे इथे कोणालाही चढाई करून दिली जात नाही. (Kailash Parvat Mystery) बौद्ध धर्मियांनी केलेल्या दाव्यानुसार, बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा यांनी ११ व्या शतकात कैलास पर्वतावर चढाई केली होती. या त्यांत पवित्र आणि रहस्यमयी पर्वतावर त्यांनी भेट दिल्यानंतर ते पुन्हा जिवंत परतले होते. या पर्वतावर जाऊन जिवंत परतणारे ते जगातील पहिले व्यक्ती असल्याचे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे.

इथे होते मोक्षप्राप्ती

हिंदू, बौद्ध तसेच जैन धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थान मानले जाते. हिंदू मान्यता लक्षात घेता कैलास पर्वत हे भगवान शिवशंभू महादेवाचे स्थान आहे. या ठिकाणी मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. (Kailash Parvat Mystery) तर तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचा केंद्रबिंदू मानतात. याशिवाय जैन धर्माचे संस्थापक, ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृती मिळाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे तिन्ही धर्मीयांच्या अध्यात्मिक भावना कैलास पर्वतांसोबत जोडलेल्या आहेत.

IGCAR Recruitment 2024 | केंद्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; 12 वी पास करू शकतात अर्ज

IGCAR Recruitment 2024

IGCAR Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक खास संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारद्वारे नोकरी लागणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. इंदिरा गांधी सेंटर फॉर ऍटोमिक रिसर्चकडून ही भरती प्रक्रिया राबवलेली आहे. या भरतीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. या भरतीचे अधिसूचना देखील जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे 30 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज करा. या भरती अंतर्गत एकूण 91 मध्ये भरली जाणार आहेत.

रिक्त पदे | IGCAR Recruitment 2024

या भरती अंतर्गत 91 पदांची भरती केली जाणार आहे

पदांची नावे

या भरती अंतर्गत वैज्ञानिक अधिकारी सहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी या पदांची भरती होणे होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार बारावी पास किंवा पदवीधर असणे गरजेचे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 50 दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवट

30 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अर्ज फी | IGCAR Recruitment 2024

पदानुसार 100 रुपये, 200 रुपये किंवा 300 रुपये फी भरावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Airtel Recharge Plan | 1 वर्षाच्या वैधतेसह ‘हे’ आहेत एअरटेलचे स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळणार जादा फायदे

Airtel Recharge Plan

Airtel Recharge Plan | एअरटेल ही देशातील सगळ्यात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना नेहमीच नवनवीन ऑफर देत असते. आता लोकसभा निवडणुकीनंतर या प्लॅनच्या किमती देखील वाढू शकतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या एक वर्षाच्या प्रीपेड प्लॅनची काही माहिती देणार आहोत. एअरटेल सध्या 3359 रुपये 2999 रुपये आणि 1799 रुपयाचे तीन प्रीपेड प्लॅन ऑफर करते. यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. आता या रिचार्ज प्लॅनबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

एअरटेलचा 1799 रुपयांचा प्लॅन | Airtel Recharge Plan

1799 रुपयांची योजना सध्या वार्षिक वैधतेसह Airtel ची सर्वात परवडणारी योजना आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस, अमर्यादित 5G डेटा, अपोलो 24|7 सर्कल, विनामूल्य HelloTunes आणि Wynk Music मध्ये प्रवेश यांचा समावेश आहे. हा प्लॅन 365 दिवसांसाठी वैध आहे.

एअरटेलचा 3359 रुपयांचा प्लॅन

Bharti Airtel चा 3,359 रुपयांचा प्लॅन केवळ फायदे आणि वैधतेच्या बाबतीत telco चा सर्वोत्तम नाही तर तो सर्वात महाग देखील आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS/दिवस आणि 2.5GB दैनिक डेटा समाविष्ट आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये 1 वर्षासाठी Disney+ Hotstar Mobile, अमर्यादित 5G डेटा, Apollo 24|7 Circle, मोफत HelloTunes आणि Wynk Music यांचा समावेश आहे. या प्लॅनची ​​सेवा वैधता 365 दिवसांची आहे.

एअरटेलचा 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन | Airtel Recharge Plan

2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवसाचा समावेश आहे. यामध्ये अमर्यादित 5G डेटा, Apollo 24|7 Circle मध्ये प्रवेश, मोफत HelloTunes आणि Wynk Music यांचाही समावेश आहे. हा प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध आहे.

Kitchen Tips : ‘हा’ पदार्थ मिसळा तेल पिणार नाहीत उडीद वडे ; जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

medu vada

Kitchen Tips : उडीद वडे हा दाक्षिणात्य खाद्यसंस्कृती मधील पदार्थ असला तरी देशभर उडीद वडा खवैय्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण उडीद वडे घरी बनवायचे असतील तर थोडे कठीण वाटतात कारण घरचे वडे खुच तेलकट बनतात. असे तेल पिणारे वडे नकोसे वाटतात म्हणूनच आम्ही आज उडीद वाद्यांची अशा खास रेसिपी तुमच्यासाटी घेऊन आलो आहोत की ज्यामुळे वडे तेलात होत नाहीत शिवाय ते जास्त काळ कुरकुरीत राहतात आणि चवीसाठी बनतात, चला तर मग जाणून घेउया परफेक्ट उडीद वडे बनवण्याची (Kitchen Tips) ही खास रेसिपी…

साहित्य (Kitchen Tips)

पोहे, तांदळाचे पीठ, आलं, हिरवी मिरची, कडीपत्ता, जिरं, पाणी आणि तेल

कृती

ही कृती बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये दोन कप उडीद डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. त्यानंतर उडीद डाळीमध्ये पुन्हा दोन कप पाणी घालून त्यावर झाकण ठेवा. पाच ते सहा तासांसाठी ही डाळ तुम्हाला भिजत घालायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्या. त्यात थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यामध्ये थंड पाणी घाला. डाळीची पेस्ट तयार झाल्यानंतर परातीत काढून घ्या. एका बाऊलमध्ये एक कप पोहे घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. पोहे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या व त्याची पेस्ट तयार करा. आता तयार पोह्याची पेस्ट उडीद डाळीच्या पेस्ट (Kitchen Tips) मध्ये घालून मिक्स करा. त्यानंतर एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करा आता त्यामध्ये किसलेलं आलं, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरे आणि कढीपत्ता घालून साहित्य हाताने मिक्स करा.

आता आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. हातावर बॅटर घेऊन मेंदू वाड्याचा (Kitchen Tips) आकार द्या. गरम तेलात सोडून दोन्ही बाजूला खरपूस भाजून घ्या अशा प्रकारे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी तयार होतील.

(टीप : वडे बनवत असताना हातावर पाणी घ्यायला विसरू नका. त्यामुळे वेळेचा आकार छान बनवता येतो.)

“बारामतीचे दादा” शरद पवारच; अशाप्रकारे अजित पवारांना केलं चेकमेट

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगून आली.. तुतारी आली.. बारामतीत, आता सगळ्यांचा मनावरचं ओझं कमी झालंय.. काकाचा पक्ष फोडून, महायुती सोबत घरोबा केलेल्या अजितदादांचा, शरद पवारांनी (Sharad Pawar) ठरवून कार्यक्रम केलाय.. काकांचं वय जास्त झालंय म्हणून, त्यांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या पुतण्याला, म्हातारं किती खमकं हाय.. हे दाखवून दिलय.. बारामतीचा निकाल क्लिअर कट सांगतोय.. की साहेबांच्या नादी लागायचं नाय.. पण अजितदादांनी, मोदींपासून स्थानिक नेत्यांपर्यंत, सगळ्यांची ताकद लावूनही, सुनेत्रा वहिनींना निवडून का आणू शकले नाहीत?, बारामतीत तुतारीच का चालली?, हेच पाहूयात

अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत जाऊन , बारामतीत , सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली, आणि थेट सुप्रिया सुळेंना आव्हान दिले.. अजित पवारांनी साम, दाम, दंड, भेद वापरून, मतदारसंघातील सर्व बड्या नेत्यांना , आणि प्रमुख कार्यकर्त्यांना, आपल्याकडे वळवळ होते, त्यामुळे सुरुवातीपासूनच बारामतीत , सुप्रियाताई बॅकफूटवर दिसत होत्या.. मात्र शरद पवारांनी टॉप गिअर टाकत , सुप्रिया सुळेंसाठी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ, पिंजून काढला , आणि जुन्या जाणत्या नेत्यांच्या, गाठीभेटी घेत , बेरजेचे राजकारण केलं.. शरद पवारांनी अनंतराव थोपटे, चंद्रराव तावरे, सतीशराव काकडे, यांची भेट घेतली होती.. पवारांची हि शिष्ठायी, सुप्रिया सुळेंच्या कामी आली, असं बोललं पाहिजे..

दुसरा मुद्दा म्हणजे, नेतेमंडळी जरी दादांसोबत असली, तरी सर्वसामान्य मतदार मात्र , शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या मागे उभा राहिलेला दिसला.. खडकवासला या भाजपच्या बालेकिल्ल्यात, अवघे ५० टक्के मतदान झाल्याने, आधीच दादा गटात, अस्वस्थता निर्माण झाली होती.. भोर मधून, संग्राम थोपटे आणि पुरंदर मधून, संजय जगताप, यांनी सुप्रियताईंसाठी लावलेला जोर, फळाला आला.. तर दुसरीकडे, इंदापूरमधून दत्ता भरणे, आणि हर्षवर्धन पाटील, यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही, ज्या एकगठ्ठा मताची अपेक्षा, अजितदादांना होती, ती एकगठ्ठा मते, सुनेत्रा पवारांना मिळाली नाहीत.. या नेत्यांनी , अजितदादांचा गेम केल्याची चर्चा, मतदारसंघात सुरु आहे..

शिवतारेंनी डाव साधला?
पुरंदरचे विजय शिवतारे, हे अजित पवारांचे, पारंपरिक विरोधक.. २०१९ च्या पराभवाचा बदला म्हणून, शिवतारे यांनी सुरुवातीला, बारामतीत अजित पवारांना विरोधकही केला.. अजित पवार विंचू आहे., त्याची दादागिरी खपवून घेणार नाही, पवारांच्या विरोधात, ५ लाख मते असून, त्या मतदारांना, मी न्याय देणार, अशा वलग्ना करणाऱ्या शिवतारेंनी, शिंदे – फडणवीसांच्या सांगण्यावरून, तलवार म्यांन केली खरी, आणि सूत्रेनं ताईंच्या प्रचारातही उतरले, मात्र शिवतारेंची हि भूमिका, पुरंदरमधील जनतेला पटल्याचे दिसत नाही… त्यामुळे पुरंदरमधूनही, सुप्रियाताईंच्या तुतारीने आघाडी घेतली.. हीच गोष्ट दौंड मध्ये पाहायला मिळाली.. पूर्वीपासूनच कट्टर विरोधक असलेल्या अजितदादांना, राहुल कुल यांच्या मतदारसंघातील जनतेनं नाकारत, सुप्रिया ताईंच्या पारड्यात भरगोस मतदान केलं..

आता खरा प्रश्न राहिला होता तो बारामतीचा.. सुरुवातीपासूनच, बारामतीचे राजकारण कोळून प्यायल्याने, याठिकाणी अजितदादाना मानणारा मोठा गट होता.. अनेक संस्थांवर दादांनी, आपल्या मर्जीतील माणसे पेरल्याने, सुप्रियाताई बारामती शहरात, पिछाडीवर जातील, असं सुरुवातीला बोललं जात होते.. मात्र अजितदादांच्या विरोधात, संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरल्याने, दादा एकटेच एका साईडला पडले.. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी, रोहित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, यांनी बारामतीत अक्षरशः रान उठवलं.. दादा एकीकडे ,आणि संपूर्ण कुटुंब एकीकडे असल्याने, जनतेमध्ये अजित पवारांबद्दल, वेगळं नॅरेटिव्ह तयार झालं.. अजित पवारांनी या वयात, शरद पवारांची साथ सोडायला नको होत , अशी भावना बारामतीकरांची झाली.. याचाच फटका , निवडणुकीत सुनेत्रा पवारांना होऊन , सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर पडला.. साहेबांनी मोठ्या कष्टानं वाढवलेल्या घड्याळाचेच काटे, बारामतीत बंद करून, तुतारी वाजवण्याची वेळ, साहेबांवर आली.. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती..असं म्हणतात, तसं खरं ठरत, वयाचे 85 मध्येही, या तेल लावलेल्या पैलवानाने ,आपली ताकद दाखवून दिलीच..

Small Savings Scheme : ‘या’ 10 अल्पबचत योजनांसोबत करा गुंतवणुकीची सुरुवात; मिळेल सुरक्षा अन निश्चित परतावा

Small Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Savings Scheme) आजकाल प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व कळून चुकले आहे. त्यामुळे आजच्या जगात पैसा कमावणेच नव्हे तर योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचे आहे, हे अनेकांनी मान्य केले आहे. गेल्या काही काळात गुंतवणुकीच्या जगात अनेक लोकांनी प्रवेश केला आहे. तर अद्याप बरेच लोक गुंतवणुक करताना पर्यायांची निवड करताना संभ्रमित होऊन माघार घेतात. अशा लोकांसाठी आजची बातमी महत्वाची ठरेल. कारण आज आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवात करताना कोणत्या योजनांची मदत घ्यावी, याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

कधीही गुंतवणुक करतेवेळी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करत आहात ती योजना सुरक्षित आणि खात्रीची आहे का? याची आधी खात्री करून घ्या. (Small Savings Scheme) अशा सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात चांगला गुंतवणूकीचा पर्याय कोणता असू शकतो? याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर सुरक्षा आणि निश्चित परतावा देणाऱ्या टॉप १० लहान बचत योजनांविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

1. मासिक उत्पन्न खाते

मासिक उत्पन्न खात्यात गुंतवणूक करताना किमान मासिक स्वरूपात १ हजार रुपये गुंतवावे लागतात. (Small Savings Scheme) या खात्यात कमाल गुंतवणुकीची मर्यादा एकल खात्यात १ लाख आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये इतकी आहे.

2. पोस्ट ऑफिस बचत योजना

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजना सादर केल्या जातात. यातील पोस्ट ऑफिस बचत योजना ही नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकते. (Small Savings Scheme) या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपये जमा करावे लागतात. मुख्य म्हणजे या योजनेत ठेव रकमेवर कमाल मर्यादा नाही.

3. टाईम डिपॉझिट (Small Savings Scheme)

नवीन गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना देखील एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष किंवा ५ वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेच्या खात्यात किमान १ हजार रुपये रक्कम जमा करावी लागते. यातही गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नाही.

4. रिकरिंग डिपॉझिट योजना (५ वर्षे)

रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणजेच आवर्ती ठेव योजना हा देखील नव्या गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. (Small Savings Scheme) या योजनेच्या खात्यात किमान १०० रुपये प्रति महिना जमा करावे लागतात. तसेच या योजनेत कमाल मर्यादा नाही.

5. ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यात किमान ठेव ही १ हजार रुपये असणे बंधनकारक आहे. (Small Savings Scheme) तर या योजनेच्या खात्यात ३० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच गुंतवणूक करता येते.

6. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपये रक्कम जमा करावी लागते. तसेच या योजनेत कमाल १.५ लाख रुपये गुंतवणुकीची मर्यादा आहे. (Small Savings Scheme) या योजनेतील ठेव ही एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते.

7. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSC योजनेत गुंतवणूक करताना किमान १ हजार रुपये गुंतवावे लागतात. तर या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादानिश्चित केलेली नाही, हे लक्षात घ्या.

8. किसान विकास पत्र (KVP)

किसान विकास पत्र म्हणजेच KVP या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १ हजार रुपये रक्कम जमा करावी लागते. (Small Savings Scheme) तर, कमाल गुंतवणुकीची यात कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

9. सुकन्या समृद्धी खाते योजना (SSY)

सुकन्या समृद्धी खाते योजना अर्थात SSY योजनेच्या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारास किमान २५० रुपये रक्कम जमा करावी लागते. तसेच यामध्ये कमाल रक्कम १.५ लाख रुपये भरण्याची मर्यादा आहे. यामध्ये एकाच वेळी ठेवी करता येतात. त्यामुळे एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात जमा केलेल्या रकमेवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.

10. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही सरकारी योजना केवळ महिलांसाठी काम करते. (Small Savings Scheme) यामध्ये खाते सुरु करताना गुंतवणूकदार महिलांना किमान १ हजार रुपये गुंतवावे लागतात.

फक्त 5 रुपयांत 1 GB इंटरनेट; Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन

jio recharge plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे प्लॅन खूप कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा जिओकडे आकर्षिला जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्ज बद्दल सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही अवघ्या 5 रुपयांचाय खर्चात 1 GB इंटरनेट वापरू शकता, होय विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल बघायला मिळतो, मोबाईल म्हंटल कि इंटरनेट आलंच…. इंटरनेटच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी मोबाईल वर बघत असतो. मात्र जास्त वापराने इंटरनेट डेटा संपला तर यूजर्सला अडचण निर्माण होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला ज्या प्लॅन बद्दल सांगत आहोत तो म्हणजे जिओ टॉप-अप डेटा प्लॅन आहे. Jio च्या 222 रुपयांच्या डेटा बूस्टर प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना 50GB इंटरनेटचा लाभ घेता येईल.

या बूस्टर प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळणार नाहीत. याद्वारे फक्त इंटरनेट डेटाचा लाभ मिळणार आहे. जेव्हा यूजर्सना अतिरिक्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल तेव्हा ते हा प्लॅन खरेदी करू शकतात. हा डेटा प्लॅन ची वैधता केवळ तुमच्या सक्रिय रिचार्ज योजनेवर अवलंबून आहे. तुम्ही 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह किंवा 56 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज केले असल्यास, हा डेटा बूस्टर प्लॅन तुमच्या सध्याच्या सुरु असलेल्या रिचार्जच्या व्हॅलिडिटीसह समाप्त होईल.

Garlic Farming | लसणाची शेती करून व्हाल मालामाल, अशी करा लागवड

Garlic Farming

Garlic Farming | अनेक शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घ्यायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती सोडून शेतकरी आता पैसे कमवण्याच्या दृष्टीने चांगले पिकत घेत आहेत. अशातच आम्ही तुम्हाला आज एका अशा शेतीबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला लसणाच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत. या पिकाच्या लागवडीतून सहा महिन्यातच तुम्हाला दहा लाख रुपयांचे उत्पन्न होईल.

लसूण(Garlic Farming) हे एक नगदी पीक आहे. लसणाला भारतामध्ये वर्षभर मागणी असते. मसाला आणि औषधांमध्ये देखील लसणाचा वापर केला जातो. भारतीय स्वयंपाक घरात प्रत्येक पदार्थांमध्ये लसणाचा वापर केले जातो. अशाप्रकारे तुम्ही आता शेतात लसणाची लागवड करून चांगली कमाई करू शकता.

लसणाची लागवड कशी करावी? | Garlic Farming

पावसाळा संपल्यानंतरच लसणाची लागवड सुरू करा. यानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने ठीक आहेत. लसणाची लागवड त्याच्या कळ्यापासून केली जाते. पेरणी 10 सेमी अंतरावर केली जाते, जेणेकरून ढेकूळ व्यवस्थित बसेल. त्याची लागवड कड्या करून करावी. कोणत्याही जमिनीत त्याची लागवड करता येते. परंतु ते फक्त त्या शेतातच केले पाहिजे जेथे पाणी साचणार नाही. हे पीक ५ ते ६ महिन्यांत पूर्णपणे तयार होते.

लसणाचा वापर

लसणाचा वापर लोणची, भाजी, चटणी आणि मसाला म्हणून केला जातो. लसणाचा उपयोग उच्च रक्तदाब, पोटाचे आजार, पाचन समस्या, फुफ्फुसाच्या समस्या, कर्करोग, संधिवात, नपुंसकता आणि रक्ताच्या आजारांवरही होतो. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कॅन्सर गुणधर्मांमुळे रोगांमध्ये याचा वापर केला जातो. आजच्या काळात लसणाचा वापर केवळ मसाल्यांपुरता मर्यादित नाही. आता पावडर, पेस्ट आणि चिप्ससह अनेक उत्पादने प्रक्रियेद्वारे तयार केली जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत आहे.

लसणापासून कमाई | Garlic Farming

लसणाच्या अनेक जाती आहेत. एक एकर शेतात लसणाचे सुमारे ५० क्विंटल उत्पादन मिळते. हा लसूण 10000 ते 21000 रुपये प्रतिक्विंटल दराने उपलब्ध आहे. तर एकरी 40000 रुपयांपर्यंत खर्च येतो. अशा परिस्थितीत रिया वान जातीच्या लसणाची एक एकरात लागवड करून शेतकऱ्यांना 5 लाख ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. रिया वान हा लसणाचा एक प्रकार आहे. रिया वनची गुणवत्ता लसणाच्या इतर जातींपेक्षा चांगली मानली जाते. एका गुठळ्याचे वजन 100 ग्रॅमपर्यंत असू शकते. एका नोडमध्ये 6 ते 13 कळ्या असतात.

Indian Railways: कौतुकास्पद ! 11 वर्षांच्या मुलाने रेल्वेला लाल रूमाल दाखवून वाचवले 1500 प्रवाशांचे प्राण

indian railways

Indian Railways: लहान मुलं कधीकधी एवढे मोठे धाडस करतात की त्यांचे हे धाडस चर्चेचा विषय बनतो. अशीच एक घटना बिहार मध्ये घडली आहे. एका 11 वर्षाच्या मुलाने लाल रुमाल दाखवून ट्रेन थांबवली आणि 1500 प्रवाशांचे प्राण वाचवले. या धाडसी मुलाचे नाव आहे शाहबाज. शाहबाजच्या या धाडसामुळे रेल्वे खात्याकडूनही त्याचा सन्मान (Indian Railways) केला जाणार आहे.

स्वतः जखमी होऊनही वाचवले प्राण (Indian Railways)

शनिवारी समस्तीपूर मुझफ्फरपूर रेल्वे विभागातील भोला टॉकीज गुमती क्रमांक 53A पासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकला तडा गेला होता. याचवेळी न्यू कॉलनी वॉर्ड नंबर 27 येथील रहिवासी असलेले मोहम्मद शकील यांचा मुलगा सहवास आपल्या वडिलांना नाश्ता देऊन रेल्वे ट्रॅकच्या इकडून घरी परतत होता. तेव्हा त्याची नजर ही रेल्वे ट्रॅक वर पडली. रेल्वे ट्रॅकला क्रॅक गेल्याचे दिसले. आणि त्याच्या लक्षात आलं की येणाऱ्या रेल्वेला आपण थांबवलं पाहिजे. आपल्या चौकस बुद्धीचा वापर करत या मुलाने समस्तीपुर ते मुजफ्फरपुर जाणारी रेल्वे (Indian Railways) क्रमांक 13019 काठगोदाम एक्सप्रेसला लाल रंगाचा रुमाल दाखवत थांबण्याचा इशारा केला. हे सर्व करत असताना शहबाजला दुखापत ही झाली. मात्र शहबाज आपल्या अतुलनीय धाडसामुळे रेल्वेला थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर ट्रेनच्या ड्रायव्हरने लाल रुमाल पाहिल्यानंतर असं करण्याचं कारण विचारलं. शहबाजने रेल्वेचे ट्रॅकला क्रॅक गेल्याच्या बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर याबाबतची माहिती लगेचच ड्रायव्हरने कंट्रोल रूमला दिली. त्यानंतर रेल्वे ट्रॅक ठीक करण्यात आला आणि 45 मिनिटांनंतर ट्रेन पुढे रवाना झाली.

शहबाज बनला चर्चेचा विषय (Indian Railways)

केवळ 11 वर्षाच्या शहबाज ने पंधराशे लोकांचे प्राण वाचवले त्यामुळे शहबाजच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून शहाबाज हा चर्चेचा विषय बनला आहे. एवढेच नाहीतर शहबाच्या घरी पोहोचून लोकांनी त्याचं कौतुक केलं. तेथील रहिवासी असलेले समाजसेवक रणजीत निर्गुणी यांनी शाहबाजला पुस्तक पेन, चॉकलेट अशा गोष्टी देऊन त्याचा सन्मानही केलाय. याशिवाय रेल्वेने देखील शहबाच्या या धाडसाबद्दल (Indian Railways) त्याचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

समस्तीपूर रेल्वे विभागाचे डीआरएम विनय श्रीवास्तव यांनी सांगितले की मुलाने खूप चांगले काम केले आहे. अशी जाणीव (Indian Railways) प्रत्येक लहान मुलामध्ये यावी अशी आमची आशा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. त्यामुळे बुधवारी या मुलाला बोलावून प्रमाणपत्र व अभ्यासाचे साहित्य देऊन त्याचा गौरव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.