Monday, December 22, 2025
Home Blog Page 702

फडणवीस मंत्रिपदाचा राजीनामा देणार; भाजपमध्ये मोठी उलथापालथ??

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Loksabha Election Result 2024) जाहीर झाला आहे. परंतु या निकालात भाजपला महाराष्ट्रामध्ये फारसे यश आलेले दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, फोडाफोडीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रातील जनतेने मूळ पक्षांना मतदान केले आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसला आहे. दरम्यान, लोकसभेतील या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आज म्हणजेच 5 जून 2024 रोजी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “मला सरकारमधून मोकळं करावं. अशी मी विंनती करणार आहे. मी महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतो. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.

पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो…

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. यातील भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो. भाजपला महाराष्ट्रामध्ये जो काही पराभव सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो. आणि मी पक्षाला विनंती करतो की मला विधानसभेसाठी पूर्ण वेळ उतरायचे आहे, त्यामुळे त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी”

शिंदेचे 7 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; राजकीय वर्तुळात पुन्हा भूकंप??

Uddhav Thackeray and Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 4 जून रोजी देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालातून महाराष्ट्राच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला पाठींबा दिला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या निकालानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींचा वेग वाढला आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सेनेतील अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात लवकरात मोठा भूकंप होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिंदे गटाला एकूण सात जागा मिळाल्या आहेत. यातील सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे भारतात आघाडी सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहेत. यात उद्धव ठाकरे गटाचा महाराष्ट्रातील निकाल पाहता शिंदे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पुढे जाऊन हे नेते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतील असे चर्चा रंगली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. यातील भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. परंतु शिवसेनेचे सातही खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीने महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडली असल्याचे चित्र कालच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

Satara Lok Sabha 2024 Results : सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पाहा एका क्लिकवर

satara total voting count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसायापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि ३०००० हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडलं. साताऱ्यात उदयनराजे नावाच असलेले वलय, भाजपचे मजबूत संघटन, मोदींची सभा, अजित पवारांच्या गटाने केलेलं काम यामुळे उदयराजेना फायदा झाला असं म्हंटल पाहिजे. राजेंच्या या विजयानंतर साताऱ्यातील कोणत्या भागात कोणाला कोणाला किती मताचे लीड मिळाले याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल.. चला तर मगवसाताऱ्यात विधासभा मतदारसंघनिहाय आकडेवारी सविस्तर जाणून घेऊयात..

तस म्हटलं तर सातारा लोकसभा हा एकूण ६ मतदार संघाच्या अंतर्गत येतो… यामध्ये सातारा, कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये सातारा मध्ये भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले, वाईमधून अजितदादा गटाचे मकरंद पाटील, कोरेगाव मध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे, कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तर मध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई आमदार आहेत. म्हणजेच काय तर महायुतीकडे ४ तर महाविकास आघाडीकडे २ आमदारांचं बळ होतं. महाविकास आघाडीची संपूर्ण भिस्त कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटणवर होती. मात्र या भागात अपेक्षित लीड शशिकांत शिंदेंना मिळालं नाही. याउलट सातारा, कोरेगाव आणि वाई मधील मताधिक्याने राजेंना विजयात हातभार लावला…

चला आता पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली….

सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना ११६९३८ मते मिळाली तर शशिकांत शिंदेंना अवघी ८०७०५ मते मिळाली… म्हणजेच ३६,२३३ मताची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात उदयनराजेंना १०३९२२ मते मिळाली तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचे होम ग्राउंड असूनही कोरेगावात त्यांना अवघी ९७०६७ मतदान झालं. म्हणजेच कोरेगावात सुद्धा शशिकांत शिंदे ६८५५ ने पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळालं. यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे वाई… वाई मतदारसंघात शिंदेंच्या तुतारीला ९७४२८ मते पडली तर उदयनराजेंना ९०६८५ मतदान झालं म्हणजे ६७४३ मतांची आघाडी शशिकांत शिंदेंना मिळाली. यानंतर आपण जाऊयात उत्तर कराडमध्ये …. तर याठिकाणी शशिकांत शिंदेंना ९०६५४ मते पडली तर उदयनराजेंना ८८९३० मते झाली म्हणजेच उत्तर कराड मध्ये अवघ्या १७२४ मतांची मामुली आघाडी शिंदेंना मिळाली.

त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत असलेल्या कराड दक्षिण मध्ये शशिकांत शिंदेंना ९२१९८ मते मिळाली तर उदयनराजेंना ९२८१४ मते मिळाली.. म्हणजेच महाविकास आघाडीची ताकद असूनही दक्षिण कराडात शिंदे ६१२ मतांनी मागे पडल्याचे दिसत आहे. आता आपण येउयात शेवटच्या पाटण मतदारसंघात…. पाटणमध्ये शशिकांत शिंदेंच्या तुतारीला ७८४०३ मते मिळाली तर उदयनराजेंना ७५४६० हजारांचे मतदान झाल्याने याठिकाणी २९७० मतांचे लीड मिळालं…. एकूण मतांची मांडणी केली तर शशिकांत शिंदेंच्या पारड्यात ५३८३६३ मते मिळाली तर उदयनराजेंच्या कमळाला ५७११३४ मते मिळाली… अशा पद्धतीने ३२७७१ मतांनी उदयनराजेंनी साताऱ्यात दणदणीत विजय मिळवला आणि शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला… सातारा मतदारसंघात उदयनराजेंना मिळालेलं एकगट्टा लीड शशिकांत शिंदेंसाठी धोक्याचं ठरलं…

New Marathi Film : मोठा गेम होणार!! 11 वर्षानंतर अंकुश, स्वप्नील, सई पुन्हा एकत्र झळकणार; नव्या सिनेमाचा मुहूर्त संपन्न

New Marathi Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Film) मराठी कलाविश्वात अत्यंत लाडके कलाकार अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा स्वतःचा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतो. अशातच या तिन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे तिघे तोडीचे कलाकार एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. लवकरच एका नव्या सिनेमातून हे जबरदस्त त्रिकुट आपल्या भेटीसाठी येत आहे.

मुहूर्त संपन्न (New Marathi Film)

ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत. असे असले तरीही एक गोष्ट निश्चित झाली आहे की, या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

इतकेच नव्हे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार असल्याचेही समोर आले आहे. या चौघांना एकत्र पाहून नक्कीच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड सुरु झाली असेल. नुकताच त्यांच्या आगामी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

११ वर्षानंतर पुन्हा एकत्र

या आगामी चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही जबरदस्त टीम तब्बल ११ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव करणार असल्यामुळे हा चित्रपट काहीतरी हटके कथानक घेऊन येतोय इतके लक्षात असते. (New Marathi Film) माहितीनुसर, या आगामी चित्रपटाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आणि यावेळी निर्मात्यांसह, चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

मोठा गेम तर नक्कीच होणार..

या चित्रपटाबाबत बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, ‘संजय जाधव यांच्यासंख्या धमाकेदार दिग्दर्शकासोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा 3’, ‘कलावती’ हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (New Marathi Film) या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!’

Mutual Funds | आता FD सोडा! या म्युच्युअल फंडात मिळतो 216 टक्केपर्यंत परतावा

Mutual Funds

Mutual Funds | अनेक लोक हे भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. गुंतवणूक करताना प्रत्येक व्यक्तीचा हाच उद्देश असतो की, त्यांचे पैसे सुरक्षित असावे आणि त्यातून त्यांना चांगला पैसा मिळावा. एफडी किंवा बँकेतील आरडी यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होण्यास खूप वेळ लागतो. परंतु शेअर बाजारात गुंतवलेला पैसा हा खूप झपाट्याने वाढतो. परंतु यामध्ये धोका देखील असतो. परंतु फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास यामध्ये धोका कमी असतो.

निकोन इंडिया यूपीएस बँक फंड | Mutual Funds

निकोन इंडिया यूपीएस बँक फंडावर तीन वर्षाचा पूर्ण परतावा आहे. यामध्ये 216 टक्के एवढा आहे. यामध्ये वार्षिक परतावा 46.1% एवढा आहे, तर 3 वर्षात 1 लाख गुंतवणुकीचे मूल्य आहे. 3 लाख 16 हजार 786 एवढे आहे.

कोटक निफ्टी पीएसयु बँक ईटीएफ फंड

या फंडाने देखील तीन वर्षात गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. या फंडावर तीन वर्षाचा परतावा हा 216, 27% एवढा आहे. यामध्ये 3 वर्षात 1 लाख रुपये वाढवून 3 लाख 16 हजार 265 रुपये झाले. फंडाचा आकार 1379. 35 कोटी रुपये खर्चाचे प्रमाण 0.49 टक्के आहे.

एबीएसएल पीएसयु इक्विटी फंड

या फंडाचा तीन वर्षाचा सरासरी 42% एवढा आहे. तर तीन वर्षाचा पूर्ण परतावा 187% एवढा आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या फंडात 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला गुंतवणुकीचे मूल्य आता 2 लाख 87 हजार 381 रुपये झालेले आहे.

कॉट स्मॉल कॅप फंड | Mutual Funds

या फंडाने देखील गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. तीन वर्षात त्याचा सरासरी परतावा आहे 41.96% एवढा राहिलेला आहे. या फंडाने या कालावधीत 180.95% परतावा दिला आहे. तीन वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 2 लाख 86 हजार 936 रुपये झालेले आहे.

New Marathi Movie : महाराष्ट्राच्या मातीतला ‘रांगडा’ अनुभव; रुपेरी पडद्यावर दिसणार कुस्ती अन बैलगाडा शर्यतीचा थरार

New Marathi Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) आपल्या महाराष्ट्राची ओळख त्याला लाभलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, ऐतिहासिक वारसा, विविध प्रेक्षणीय स्थळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. अख्ख्या महाराष्ट्रात कुस्ती आणि बैलगाडा शर्यतप्रेमींची संख्या फार मोठी आहे. यातच आता महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव देणारा नवा चित्रपट येत आहे. ज्याचे नाव ‘रांगडा’ असे असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘रांगडा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज (New Marathi Movie)

‘रांगडा’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी ‘रांगडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. (New Marathi Movie)अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.

नव्या दमाचे कलाकार

‘रांगडा’ या आगामी मराठी चित्रपटातून नवोदित कलाकारांची मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. (New Marathi Movie) भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे, अतिक मुजावर, संदीप (बापु) रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद हे कलाकार या चित्रपटात दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

कधी रिलीज होणार?

मराठीत आजवर काही चित्रपटांतून बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचं दर्शन झालं आहे. पण याच दोन खेळांवर बेतलेली कथा रांगडा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे कथासूत्र आहे. (New Marathi Movie) त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही. त्यासाठी आता केवळ ५ जुलै २०२४ पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Gold Price Today : लोकसभा निकालानंतर सोने- चांदीच्या किमती घसरल्या; आजचे दर पहा

Gold Price Today 5 june

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना हि मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71667 रुपयांवर व्यवहार करत आहेत. मागील किमतीच्या तुलनेत या दरात 0.16% म्हणजेच 115 रुपयांनी घट झाली आहे तर दुसरीकडे चांदी 89022 रुपयांवर व्यवहार करत असून या किमतीत सुद्धा 0.63 % म्हणजेच 563 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज MCX वर सोन्याचा भाव ७१८९० रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात हि किंमत (Gold Price Today) अचानक वाढल्याचे पाहायला मिळालं. अर्ध्या तासांतच सोन्याने ७२४८० रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र नंतर हळू हळू सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 71667 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ७२,६५० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा ६६६०० रुपये आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 66,600 रुपये
मुंबई – 66,600 रुपये
नागपूर – 66,600 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 72,650 रूपये
मुंबई – 72,650 रूपये
नागपूर – 72,650 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Viral Video | निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या समर्थकाने रागात टीव्हीलाच लावली आग; व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | आपण बऱ्याचवेळा भारत आणि पाकिस्तान यांचा क्रिकेट सामना झाल्यानंतर टीव्ही फोडण्याच्या घटना ऐकल्या असतील. परंतु आता एक वेगळीच टीव्ही फोडल्याची घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी टीव्ही फोडण्याची घटना समोर आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 जागा पार पडू शकली नाही. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी थेट कार्यालयातील टीव्ही फोडून टाकला आहे. एवढंच नाही तर आग लावून तो टीव्ही पेटवून देखील दिलेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत.

ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले गेले आहे. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष आहे. समाजवादी पक्षाने राज्य 37 जागा जिंकल्या. आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केवळ 33 जागा जिंकाल्या. अशा वेळी राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर हे भाजपला घोषणा दिल्याप्रमाणे 400 जागा पार न करता आल्याने ते संतापले होते. त्यावेळी त्यांनी भिंतीवरील टीव्हीफोडून टाकला आणि नंतर त्याला आग देखील लावली.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर निकाल लागल्यानंतर निराश होते. टीव्हीवर निकाल पाहिल्यानंतर ते टीव्ही फोडताना दिसत आहे. त्यांनी भिंतीवरून टीव्ही सेट काढून थेट जमिनीवर फेकला त्यावेळी दोन लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी कोणाचेच ऐकले नाही त्यांनी भिंतीवरील टीव्ही फेटकाली खाली काढला आणि जमिनीवर आपटला आणि त्यानंतर त्याला आग देखील लावलेली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत.

Gas Lighter Repair : गॅस लायटर अचानक बंद पडला? तर फेकून देण्याआधी ‘या’ ट्रिक वापरून बघा

Gas Lighter Repair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gas Lighter Repair) बऱ्याच घरांमध्ये ऑटोमॅटिक गॅस शेगडी वापरली जाते. त्यामुळे गॅस सुरु करताना लायटरची गरज लागत नाही. पण अजूनही अनेक लोक लायटरचा वापर करून गॅस सुरु करतात आणि मग जेवण बनवतात. अशा लोकांनी बऱ्याचदा अचानक लायटर खराब झाल्याची समस्या अनुभवली असेल. काही केल्या गॅस लायटर सुरु होत नाही आणि मग अशावेळी लायटर फेकून द्यायची पाळी येते. तुमच्यासोबत असं कधी झालंच तर लायटर फेकून देऊ नका. त्याआधी आम्ही तुम्हाला सांगतोय ती ट्रिक एकदा तरी वापरून बघाच.

तज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, गॅस शेगडी पेटविण्यासाठी लायटर सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. बरेच लोक माचिसच्या काडीने गॅस पेटवतात किंवा ऑटोमॅटिक शेगडीचा वापर करतात. पण, हे काहीवेळा धोकादायक ठरु शकते. त्यापेक्षा नियमित लायटरचा वापर करून गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काझी कारणास्तव जर तुमचा लायटर अचानक खराब झाला तर? अशावेळी काय करायचे? लायटर फेकून द्यायचा? तर नाही. (Gas Lighter Repair) लायटर खराब होण्यामागे बरीच कारणे असतात. समजा तुमचा लायटर अचानक बंद झाला. तर तो फेकून देऊ नका. काहीवेळा तो वापरण्यायोग्य असतो. मात्र आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपण लायटर फेकून देतो. अशावेळी काही युक्त्या वापरून तुम्ही लायटर पुन्हा वापरण्यायोग्य बनवू शकता. चला याविषयी जाणून घेऊया.

1. लायटर उन्हात ठेवा (Gas Lighter Repair)

बऱ्याचदा थंडी किंवा आर्द्रतेमुळे लायटर अचानक बंद पडण्याची शक्यता असते. अशावेळी लायटर थंड पडल्यामूळे नीट काम करत नाही. अशा परिस्थितीत एकतर लायटर उन्हात ठेवा किंवा मग एखाद्या गरम वस्तूच्या शेजारी ठेवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लायटर गरम करण्यासाठी त्याला चुकूनही थेट आगीत ठेवून गरम करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.

2. लायटर स्वच्छ करा

लायटर आपण रोज वापरतो. अशा परिस्थितीत सततच्या वापरामुळे लायटरमध्ये खूप घाण साचलेली असते. जीच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे लायटर खराब होऊन तो नीट पेटत नाही. अशा स्थितीत लायटर एकदा नीट स्वच्छ करा. (Gas Lighter Repair) लायटरमध्ये साचलेली घाण काढल्यानंतर कदाचित तो पुन्हा सुरळीत चालेल. यासाठी तुम्ही इअरबड्स वापर करू शकता. म्हणजे लायटरचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करता येईल.

3. लायटर अडकवण्यासाठी जागा

स्वयंपाक घरात लायटरचा वापर झाल्यानंतर त्याला योग्य जागी ठेवल्यास लायटर खराब होण्याची शक्यता कमी असते. बऱ्याच घरांमध्ये लायटर वापरून झाल्यावर तसाच ओट्यावर ठेवला जातो किंवा शेगडीवर ठेवला जातो. (Gas Lighter Repair) ज्यामुळे त्यात घाण साचते किंवा पाणी लागून लायटर खराब होऊ शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात लायटर व्यवस्थित योग्य जागी ठेवा. असे केल्यास तो जास्त दिवस चांगला राहील आणि वापरण्यायोग्य टिकेल. त्यासाठी स्वयंपाकघरात लायटर अडकवण्यासाठी जागा करा. म्हणजे धूळ, घाण, पाणी, मसाले यापासून त्याचे रक्षण होईल.

4. लायटरला पाणी लागून देऊ नका

बऱ्याचदा लायटरचा वापर करून झाल्यानंतर त्याला इकडे तिकडे ठेवलं जातं. (Gas Lighter Repair) ज्यामुळे लायटरला पाणी लागण्याची शक्यता असते. परिणामी लायटर लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे लायटरला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या.

Cleaning Tips For Home : नियमित स्वच्छतेसाठी ‘या’ टिप्स येतील कामी; फॉलो केल्यास घर राहील टकाटक

Cleaning Tips For Home

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cleaning Tips For Home) आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे रोजच्या धावपळीतही आपलं घर व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सतत धडपड करत असतात. असे असूनही रोजच्या कामाच्या व्यापात घराला द्यायला हवा तितका वेळ काही देता येत नाही. मग कधीतरी घरात इकडे तिकडे पसारा दिसतो. कधी फर्निचरवर लागलेली धूळ दिसते. तर कधी अस्थव्यस्थ झालेलं घर पाहून कुठून आवरायला सुरुवात करू असं होतं.

आजकाल घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही वर्किंग असतात. त्यामुळे साहजिक आहे घराकडे वेळ द्यायला दोघांनाही नीट जमत नाही. अशावेळी दोन दिवस जरी घर स्वच्छ करता आलं नाही तरी घरात ठिकठिकाणी धूळ जमा होते. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Cleaning Tips For Home) मग अशावेळी नियमित घर स्वच्छ कसं ठेवता येईल? यावर तोडगा कसा काढता येईल? असा सामान्य प्रश्न समोर येऊन उभा राहतो. तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. काही सोप्प्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं घर अगदी रोजच्या रोज स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवू शकाल. चला जाणून घेऊया.

कुटुंबातील इतर व्यक्तींची मदत घ्या

तुमचे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे ही केवळ तुमची नव्हे तर कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. (Cleaning Tips For Home) त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने तुम्ही रोजच्या रोज घर स्वच्छ ठेऊ शकाल. यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या वयोमानानुसार एकेक काम सोपवा. म्हणजे घर नीट ठेवणं तुमच्यासाठीही सोप्प जाईल.

निवड महत्वाची (Cleaning Tips For Home)

तुम्ही तुमचं घर स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसण्यासाठी ज्या काही सजावटीच्या वस्तू किंवा फर्निचर घ्याल त्याची निवड योग्य करा. जेणेकरून घरात एकतर पसारा वाटणार नाही आणि दुसरं म्हणजे ते स्वच्छ करणं सोप्प असेल.

घेतलेली वस्तू लगेच जागेवर ठेवा

बऱ्याच लोकांनी एखादी वस्तू जागेवरून उचलली की, भलतीकडेच नेऊन ठेवायची सवय असते. याशिवाय अंघोळीचा टॉवेल, कपडे इकडे तिकडे फेकणे अशा सवयींमुळेसुद्धा घरात पसारा होतो. (Cleaning Tips For Home) जो नंतर आवरू म्हणून असाच राहतो. त्यापेक्षा वेळीच एखादी वस्तू उचलली असता जागेवर ठेवा. म्हणजे पसारा होणार नाही आणि नंतर आवरायला ढीग वाढणार नाही.

वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा

तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी योग्य जागा असेल तर शक्यतो वस्तू इकडे तिकडे टाकल्या जात नाहीत. (Cleaning Tips For Home) जसे की, बास्केट, डब्बे आणि शेल्फसारखी सुविधा असेल तर घरातील इकडे तिकडे दिसणाऱ्या वस्तू त्यांच्या जागेवर ठेवता येतील.

नको असलेल्या वस्तू लगेच फेकून द्या

घरातला पसारा कमी करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला नको असलेल्या आणि उपयोगी न पडणाऱ्या वस्तू फेकून द्या. विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा. (Cleaning Tips For Home) ज्यामुळे अडगळ होणार नाही आणि साफसफाई करताना नाकी नऊ येणार नाहीत.