Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 703

साताऱ्यातील पराभवानंतर शशिकांत शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत; पवारांचा उल्लेख करत म्हंटल की…

shashikant shinde satara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत (Satara Lok Sabha 2024 Results) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी तब्बल ३२७७१ मतांनी शशिकांत शिंदेचा पराभव केला. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीने तब्बल ३० जागा जिंकल्या तर दुसरीकडे साताऱ्याची हक्काची जागा हरल्याने, गड आला पण सिंह गेला अशी भावना शरद पवारांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली होती . या पराभवनंतर शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण हार मानणार नाही अशी गर्जना केली आहे.

शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हंटल, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही! सातारा लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव मी खिलाडूवृत्तीने स्वीकारतो. शरदचंद्रजी पवार साहेबांचा शिलेदार म्हणून ही निवडणूक लढायला मी तयार झालो. झालेल्या पराभवाचे नक्कीच आत्मपरीक्षण करू. अनेक वेळा जय-पराजयाचे प्रसंग येत असतात. सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले अनेक दिवस महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचे रान करत प्रचार करत होते. यापुढील काळात देखील माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि समस्त सातारच्या जनतेच्या मी ऋणात राहील!

दरम्यान, निकालापूर्वीच्या सर्वच एक्झिट पोल मध्ये शशिकांत शिंदे याना आघाडी दाखवण्यात आली होती, मात्र अखेरच्या क्षणी उदयनराजेंनी ३२७७१ हजारांचे लीड घेत शशिकांत शिंदे याना पराभवाचा धक्का दिला. कराड दक्षिण आणि कराड उत्तर मधून जितकं लीड अपेक्षित होत तितकं लीड शशिकांत शिंदे याना न मिळाल्याचा फटका बसला. तसेच होमपीच असलेल्या कोरेगावात सुद्धा शशिकांत शिंदे याना आघाडी घेता आली नाही. तर अपक्ष उमेदवाराचे चिन्ह पिपाणी असल्याने अनेकांनी तुतारी समजून पिपाणीला मतदान केल्याचे निकालाच्या आकडेवारी वरून दिसलं.

Weather Update | राज्यात आज होणार मुसळधार पाऊस ! या 27 जिल्ह्यांना दिला येल्लो अलर्ट

Weather Update

Weather Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मुंबई पुण्यासह अनेक भागाला पावसाने झोडपले आहे. परंतु हा पाऊस मान्सून नसून पूर्व मान्सून असल्याचा अंदाज हवामान खात्याने लावलेला आहे.आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस वर्तवण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्रसह दक्षिण कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे.

राज्यातील (Weather Update) अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. तर पुणे, नंदुरबार आणि जळगावमध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नैऋत्य मोसमी वारे हे महाराष्ट्रच्या गोव्यामध्ये दाखल झालेले आहे. महाराष्ट्रात बुधवारी 5 जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यासाठी हवामान खात्याने अनेक ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला.

पूर्व मौसमी पावसाला पोषक असे वातावरण यामुळे कमाल तापमानात देखील वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ सोडून बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान 40° च्या खाली घसरलेले आहे. मंगळवारी जळगाव मध्ये 41° सेल्सिअस एवढी तापमानची तापमानाची नोंद झालेली आहे.

UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत 300 पदांसाठी मोठी भरती सुरु, थेट ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024 | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीमध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने स्पेशालिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक, उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि नागरी हायड्रोग्राफिक पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

UPSC च्या (UPSC Recruitment 2024) या भरती मोहिमेद्वारे एकूण 300 रिक्त जागा भरल्या जातील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 13 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेअगोदरच अर्ज करा.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

  • स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (फॉरेन्सिक मेडिसिन) – 6 पदे
  • असिस्टंट प्रोफेसर (यूरोलॉजी) – 1 जागा
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (मानसोपचार) – 1 पोस्ट
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (अनेस्थेसियोलॉजी) – 2 पदे
  • स्पेशलिस्ट ग्रेड III (मानसोपचार) – 1 पोस्ट
  • स्पेशालिस्ट ग्रेड III (पॅथॉलॉजी) – 4 पदे
  • स्पेशालिस्ट ग्रेड III (सामान्य शस्त्रक्रिया) – 39 पदे
  • स्पेशालिस्ट ग्रेड III (बाल नेफ्रोलॉजी) – ३ पदे
  • स्पेशालिस्ट ग्रेड III (नेत्ररोग) – 3 पदे
  • स्पेशालिस्ट ग्रेड III (त्वचाविज्ञान, वेनेरोलॉजी, कुष्ठरोग) – 2 पदे

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

सहाय्यक संचालक (हॉर्टिकल्चर) – 4 पदे

इंटेलिजन्स ब्युरो

उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी (तांत्रिक) (DCIO/Tech) – 9 पदे

एकात्मिक मुख्यालय (नौदल), नागरी कार्मिक संचालनालय

सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर – 4 पदे

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय

प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण) ड्रेस मेकिंग – 5 पदे
प्रशिक्षण अधिकारी (महिला प्रशिक्षण) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 3 पदे

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय

सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (अन्न) – 19 पदे

पुरातत्व सर्वेक्षण विभाग

उपअधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ –4 पदे
उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ – 67 पदे

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय

सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (लेदर आणि शू) – 8 पदे
सहाय्यक संचालक ग्रेड-II (IEDS) (मेटल रिफायनिंग) – 2 पदे

अर्ज कसा करावा ?

  • सर्व प्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • पहिल्या पेजवर उपलब्ध हायलाइट केलेल्या लिंक टॅबवर क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन लॉगिन वर क्लिक करा.
  • नंतर अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • तसेच अर्ज फी भरा.

हिना गावित नेमक्या कशामुळे हरल्या; महत्वाची कारणे पहाच

heena gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिंकून यायचं पण दणक्यात… आणि सगळ्यांचे अंदाज चुकवत…महाराष्ट्राच्या आजच्या महा रिजल्ट मध्ये कधी नव्हे ती चर्चा झाली नंदुरबारच्या जागेची…सलग तिसऱ्यांदा भाजपच्या हिना गावित (Heena Gavit) खासदार होणारच याचा मतदानापासून ते एक्झिट पोल पर्यंत गवगवा झाला… पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा 440 चा करंट लागावा तसा गोवाल पाडवी यांनी मतांचा सुळका मारत मोठं लीड घेतलं… महाराष्ट्रात सर्वात फास्ट लाखांचं लीड घेऊन खासदार बनण्याचा बहुमानही त्यांना मिळाला…भाजपच्या 15 वर्षांच्या प्रस्थापित राजकारणाला अखेर पाडवी यांनी नख लावत उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा दणका दिलाय.. भाजपचा हा गावित फॅक्टर खानदेशात कसा गंडलाय? गोवाल पाडवी यांनी एकदम झटक्यात मतांचा सुळका कसा घेतला? त्याचीच ही इन साईड स्टोरी…

स्टॅंडिंग खासदार हिना गावित यांचं राजकारण संपण्यामागचं पाहिलं कारण ठरलं मतदारसंघात असलेली नाराजी

खर तर 2014 आणि 2019 मध्ये खासदार होऊनही हिना गावित यांच्याकडून नंदुरबारचा हवा तसा विकास न झाल्याने मतदारसंघात हिना गावित यांच्याविषयी आधीपासूनच नाराजी होती. नंदुरबारचा इतिहास बघितला तर 2014 ला पहिल्यांदा भाजपनं इथून खातं उघडलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने मतदार संघातील जनतेला मोठ्या विकासाची अपेक्षा होती, मात्र अपेक्षाभंग झाल्याचे मत जनमानसात होते. त्याचा फटका हिना गावित यांना बसला. याउलट गोवाल पाडवी यांच्यासारख्या राजकारणातील नव्या पिढीच्या चेहऱ्याकडून मतदारांच्या अपेक्षा वाढल्या….

भाजपचा गावित फॅक्टर खानदेशात गंडण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी

महायुतीत ट्रिपल इंजिन सरकारच्या नावाखाली एका छताखाली येत आपण किती गुण्या गोविंदाने राहतोय. असं दाखवत असले तरी नंदुरबारमध्ये युतीत गटातटाचं राजकारण बघायला मिळालं. शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यंदा उघडपणे काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांचा प्रचार केल्याने हिना गावित मायनस मध्ये गेल्या. चंद्रकांत रघुवंशी यांच्या या भूमिकेमुळे साक्री विधानसभा मतदारसंघात गोवाल पाडवी याना लीड मिळताना दिसलं. महायुतीतील गटातटाच्या या राजकारणामुळे हिना गावित यांच्याबद्दल मतदारसंघात चुकीचे नरेटिव्ह पसरलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र एकदिलाने गोवाल पाडवी यांचा प्रचार केला.

भाजपचा गावित फॅक्टर खान्देशात गंडण्याचं तिसरं कारण म्हणजे गोवाल पाडवी यांची स्वच्छ प्रतिमा

गोवाल पाडवी (Goval Padvi) हे राजकारणात तसे नवखे असून प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उभे होते. के सी पाडवी यांचा मुलगा एवढीच त्यांची आत्तापर्यंत ओळख होती . बाकी राजकारणाची पाटी कोरी आहे. पण याचा त्यांना फायदाच झाला असं म्हणता येईल. कारण एकीकडे गावित कुटुंबीय हे भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. अशी चर्चा जनसामान्यात असताना गोवाळ पाडवी हे नवखे असल्याचे त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा कोणताही आरोप नाही. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे गोवल पाडवी हे हिना गावीत त्यांचा पराभव करू शकतात असं सुरुवातीपासूनच बोललं जात होत. अखेर गोवाल पाडवी यांनी ऐतिहासिक विजय मिळवत नंदुरबारमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. तुम्हाला काय वाटत? हिना गावित यांचा पराभव नेमका कसा झाला? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 | 10 वी उत्तीर्णांना महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

Mahavitaran Ahmednagar Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महावितरण अहमदनगर अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ पदांची भरती केली जाणार आहे. या पदाच्या एकूण 321 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मगविण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 6 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना आता लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही

महत्त्वाची माहिती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2024

  • पदाचे नाव – शिकाऊ
  • पदसंख्या – 321 जागा
  • नोकरीच्या ठिकाणी – अहमदनगर
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन किंवा ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता म.रा.वी. वी. क. मर्या मंडल कार्यालय विद्युत भवन स्टेशन रोड अहमदनगर 414001
  • शैक्षणिक पात्रता दहावी पास

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे..
  • 6 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक

राहुल द्रविडबद्दल बोलताना रोहित शर्मा भावुक; म्हणाला मी खूप प्रयत्न केले, पण …

rohit and dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मावळता प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) बद्दल बोलताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) भावुक झाला. मुख्य प्रशिक्षक म्हणून तुम्ही कायम राहा अशी विनंती मी राहुल सरांना केली मात्र त्यांचं मत बदलण्यात मी यशस्वी झालो नाही असं रोहित शर्मा म्हणाला. आज आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाची वर्ल्डकप मोहीम (T20 World Cup 2024) सुरु होत आहे. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा राहुल द्रविड बद्दल भरभरून बोलला.

रोहित शर्मा म्हणाला, राहुल द्रविड याना प्रशिक्षकपदावर राहण्यासाठी मी खूप समजवले परंतु ते तयार झाले नाहीत. खरं तर जेव्हा मी २००६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं त्यावेळी राहुल द्रविड हाच माझा पहिला कर्णधार होता, एवढच नव्हे तर जेव्हा मी भारताच्या कसोटी संघात सामील झालो तेव्हाही मी राहुल द्रविड याना अगदी जवळून खेळताना बघितलं होते. राहुल द्रविड यांचा खेळ बघत बघतच आम्ही लहानाचे मोठे झालोय. एक खेळाडू म्हणून त्याने जे काय मिळवले, भारतीय संघासाठी किती मोठे योगदान दिले ते आपल्या सर्वाना माहित आहे. राहुल द्रविड एक आदर्श खेळाडू आहे.

दरम्यान, द्रविडने सोमवारी स्पष्ट केलं होते कि भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ मागणार नाही, त्यामुळे बीसीसीआय आता नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर आणि भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर नव्या प्रशिक्षकाच्या शैर्यतीत आघाडीवर आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गंभीरसोबत याबाबत चर्चा सुद्धा केली असून त्याची निवड फिक्स मानली जात आहे. मात्र, गंभीरने या पदासाठी अर्ज केला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. बीसीसीआयनेही गंभीरच्या अर्जावर काहीही माहिती अजून तरी दिलेली नाही.

Vishal Patil : विशाल पाटलांनी मशाल विझवलीच पण काँग्रेसलाही धडा शिकवलाय

VISHAL PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाल मशाल विझवणार…सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय… महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडच पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते.. पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची… विशाल पाटलांचे (Vishal Patil) निवडून येण्याचे फुल चान्सेस असतानाही त्यांना डावलण्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचा मोठा हात होता…पण असं असतानाही विशाल पाटील शेवटपर्यंत म्हणत राहिले.. मी हाडाचा काँग्रेसी आहे…पक्षासोबत असणारी मी निष्ठा कधीच सोडणार नाही… पण या सगळ्या गेममध्ये महत्त्वाची होती ती प्रतिष्ठा… त्यामुळे निष्ठेला धक्का न लावता प्रतिष्ठा कशी मिळवायची? हे कुणाकडून शिकावं तर ते विशाल पाटलांकडून… विशाल पाटील यांनी दोन पाटलांना दिलेल्या धोबीपछाडाचा हा आढावा…

सांगलीतील (Sangli Lok Sabha Election) तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…पण अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती विशाल पाटलांनी…मतदारांचा विशाल जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आला आणि दादा पाटील घराण्याची त्यांनी आब राखली… विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या… आणि आता विशाल खासदार होऊन त्यांनी समर्थकांचा शब्द खरा करून दाखवला.. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्ली वारी केल्यावर काँग्रेसचा हा बालेकिल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं तयार होता. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला. आणि सांगलीचा तिढा वाढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्मुला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने तिकिटासाठी ताकद लावली. पण त्याला यश काही आलं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला. निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा…

मतदानाच्या दिवशी लढत तीन पाटलांच्यात होती. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील. पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील… ठाकरे गटाची जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद, विश्वजीत कदमांचा मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकीआधीच साईडलाईन झाले. त्यामुळे कमळ विरुद्ध लिफाफा असंच वातावरण निकालाच्या दिवशीही पाहायला मिळालं. पण अखेर कमळाला लिफाफा जड गेला…

अर्थात या विजयात खारीचा वाटा द्यावा लागेल तो विश्वजीत कदमांना… विशाल पाटलांसाठी जीवाचं रान करत प्रसंगी आपल्या पक्षातील हायकमांडला अंगावर घेण्याची धमक कदमांनी दाखवली… काँग्रेसची प्रचार यंत्रणा अदृश्यपणे विशाल पाटलांच्या मागे लावली.. दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता. भरीस भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला. सुजात आंबेडकरांपासून वंचितची टीम संपूर्ण प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती. त्याचंच प्रतिबिंब आता निकालातही गोष्ट दिसतंय… विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झालंय. पलूस कडेगाव आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमछाक झालेली दिसते. त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढवताना दिसले. पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरलीच..

थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलं.. सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला, याचा ठाकरे गटाला नक्कीच पश्चाताप होईल. भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शह देत, शिवसेनेची मशाल विझवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरले… हे सगळं घडत असताना आपल्या काँग्रेसी असण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत, काँग्रेस वरिष्ठांचीही गोची केली. थोडक्यात निष्ठेसोबत प्रतिष्ठा कशी जपायची हे विशाल पाटलांकडून शिकावं, एवढं मात्र नक्की…

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांच्या नावाची जादू कमी झालीय; पुढे काय?

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा वंचितची ताकद दाखवत किमान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) तरी अकोल्यातून लोकसभेवर जातील, असं वाटतं होतं. पण आंबेडकर निवडणूक हरतायत हे तर आता क्लिअर झालंय. वंचितसाठी हा धक्का न सहन होणार आहेच, पण प्रकाश आंबेडकरांकडून घडलेल्या त्या पाच चुकांमध्ये त्यांचा पराभव दडला होता, असं आता म्हणता येऊ शकतं. वंचितला खासदारकीसाठी वंचित राहावं लागलेल्या त्या पाच चुका नेमक्या कोणत्या आहेत? 2024 च्या निकालामुळे वंचितच्या राजकारणाचा शेवट होऊ शकतो का? अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर शोधूयात

आंबेडकरांकडून घडलेली पहिली चूक ती म्हणजे मविआसोबत जुळवून घेता न येणं…

अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत वंचित आणि मविआतील नेत्यांचा जागा वाटपाचा काथ्यकूट सुरू होता. मविआच्या आघाडीसोबत गेल्यावर आपल्याला 3 ते 4 खासदार निवडून आणता आले असते, याची आंबेडकरांनाही जाणीव होती. पण जास्त पोलिटीकल फोर्स न लागल्याने अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली… यामुळे झालं असं की आघाडी आणि वंचित यांच्यात पुन्हा एकदा मत विभाजन होऊन आंबेडकर बॅकफुटला गेले…

दुसरी चूक म्हणजे विरोधक एकच असल्याचा…

2019 च्या निवडणुकीत वंचित तिसरा पर्याय म्हणून समोर आला. पण यंदा वंचितच्याही टार्गेटवर फक्त आणि फक्त भाजपाच होती. त्यामुळे अकोल्यासह इतर मतदार संघातही वंचितकडे एक तिसरा पर्याय म्हणून पाहिलं गेलंय तसं होताना काही दिसलं नाही. कदाचित आपल्यावर भाजपची बी टीम म्हणून होत असलेल्या आरोपांमुळे आंबेडकर सेफ खेळले असतीलही, पण यामुळे ते निवडणूक हरलेत, हे नाकारता येणार नाही…

तिसरी चूक म्हणजे अकोल्यात न मिळवू शकलेले काँग्रेसचा मदतीचा हात..

वंचितने अनेक मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला… तर कुठे उमेदवारी मागे घेऊन अप्रत्यक्ष मदत केली… पण याबदल्यात काँग्रेसकडून अशी मदत मिळवण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आलं नाही. त्यातही काँग्रेसने इथून तगडी उमेदवारी दिल्यामुळे अप्रत्यक्ष का होईना पण काँग्रेस आंबेडकरांना मदत करतीये, असं कुठेच दिसलं नाही.

आंबेडकरांच्या अडचणीची ठरलेली चौथी चूक म्हणजे मतदार संघात दिलेला कमी वेळ.

अकोल्यात वंचितचा जरी प्रभाव असला तरी देखील आंबेडकर मतदारसंघात जास्त प्रभावी दिसले नाहीत. म्हणाव्या अशा वादळी सभा, आरोप प्रत्यारोप आणि कट टू कट केलेल्या प्रचारातही आंबेडकर बॅकफुटला दिसले. हेच त्यांना अकोल्यातून मायनसमध्ये घेऊन गेलं असं म्हणता येऊ शकतं…

पाचवी आणि शेवटची चूक सांगता येऊ शकते ती म्हणजे मराठा मतांचं करता न आलेलं कन्वर्जन

अकोल्यात मराठा 25%, तर कुणबी 12 टक्के मतदार आहे. काँग्रेसच्या मराठा उमेदवारीमुळे हा टक्का तुमच्याकडे शिफ्ट होणार, हे तर फिक्स होतं. म्हणूनच मनोज जरांगेंना सोबत घेऊन इथून जातीय ध्रुवीकरण करण्याचा फारसा विचार आंबेडकरांनी केला नाही. याउलट एमआयएमच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे काठावरचा अनेक मराठा मतदार वंचितपासून लांब गेला. एकूणच मतांचं गणित जुळून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक पातळ्यांवर यश न आल्यानं आंबेडकर यांना यंदाही निकालात म्हणावा असा करिष्मा दाखवता आला नाही, असं म्हणायला नक्कीच स्कोप उरतो… लोकसभेच्या निकालामुळे वंचितच्या राजकारणावर अनेक मर्यादा येतील पण त्यांचं संपूर्ण राजकारणच संपेल, असं म्हणणं जरा अती धाडसाचं होईल. अकोल्यात वंचितला खासदारकीसाठी वंचित का राहावं लागलं? तुमचं विश्लेषण काय सांगतय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Watermelon Peels | कलिंगडाच्या साली फेकून न देता बनवा हे चविष्ट पदार्थ; जाणून घ्या रेसिपी

Watermelon Peels

Watermelon Peels | यावर्षी उन्हाचा तडाका जास्त प्रमाणात वाढलेला आहे. यावर्षी तापमानाने अनेक विक्रम मोडलेले आहेत. त्यामुळे या उन्हाळ्यात सगळेजण शरीराला हायड्रेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त हंगामी फळे देखील खातात. या फळांमध्ये कलिंगड हे सगळ्यात जास्त खाल्ले जाते. कारण कलिंगडामध्ये 90% पाणी असते. त्यामुळे शरीराला चांगले हायड्रेशन पुरवते. अनेकवेळा आपण कलिंगडाचा गर खातो आणि त्याची साल फेकून देतो. परंतु कलिंगडाच्या सालीचा देखील तेवढाच उपयोग होतो. आज आम्ही या लेखांमध्ये तुम्हाला कलिंगडाच्या सालीपासून काही नवीन पदार्थ सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही इथून पुढे कलिंगडाच्या सालीचा (Watermelon Peels) उपयोग करून देखील चांगले पदार्थ बनवू शकता.

हलवा बनवा | Watermelon Peels

कलिंगडाच्या सालीपासून तुम्ही अतिशय चवदार खीर तयार करू शकता. यासाठी तुम्हाला त्यातील हिरवा भाग काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेचून घ्यायचे आहेत आणि नंतर कढईत तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. यानंतर, तुम्हाला कलिंगडाच्या सालीची पेस्ट बनवावी लागेल आणि ती घालावी लागेल आणि तूप स्वतःच वेगळे होईपर्यंत शिजवावे लागेल. यानंतर त्यात साखर घाला आणि नंतर कलिंगडाचा रस घाला. जरा अजून शिजू द्या आणि जेव्हा ते घट्ट होईल आणि तूप वेगळे व्हायला लागेल, तेव्हा समजून घ्या की अप्रतिम हलवा तयार आहे.

चवदार जाम तयार करा

टरबूजाच्या सालीच्या मदतीने चविष्ट जाम देखील तयार केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांचे छोटे तुकडे करावे लागतील आणि नंतर एका पॅनमध्ये चिरलेले सफरचंद, साखर, लिंबाचा रस आणि व्हॅनिला अर्क घालून शिजवून घ्या. ते जाम सारखे होईपर्यंत शिजवायचे आहे, नंतर ते बाहेर काढा आणि एअर टाईट जारमध्ये ठेवा आणि ते ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

स्वादिष्ट चटणी बनवा

कलिंगडाच्या सालीच्या मदतीनेही स्वादिष्ट चटणी बनवता येते. यासाठी तुम्हाला बारीक चिरलेली कलिंगडाची साल लागेल, ज्यातून हिरवा भाग काढून टाकला गेला आहे. नंतर एका पॅनमध्ये साखर, मीठ, काळी मिरी आणि थोडे आले घालून शिजवा. चटणी खालून जळणार नाही आणि चिकटणार नाही म्हणून आग मंद ठेवावी हे लक्षात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आणि इतर मसालेही घालू शकता. यानंतर, अधूनमधून ढवळून आणि झाकून सुमारे एक तास शिजवा. यानंतर तुमची चटणी तयार होईल आणि मग तुम्ही ती फ्रिजमध्ये आठवडाभर ठेवू शकता.

Sharad Pawar : शरद पवार ठरणार किंगमेकर; नितीशकुमार- चंद्राबाबूचं मन वळवणार??

sharad pawar nitishkumar chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. भाजपप्रणित NDA ला 291 जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 234 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी सुद्धा सत्तास्थापनेचा दावा करणार असून यासाठी बिहारच्या नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांची गरज लागणार आहे. मात्र त्यांची मने वळवण्यासाठी इंडिया आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशावेळी शरद पवार (Sharad Pawar) किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळू शकतात. नितीशकुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना इंडिया आघाडीत आणण्यात शरद पवार महत्वाची भूमिका बजावू शकतात.

शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सर्वात वरिष्ठ नेते आहेत. ५० हुन अधिक वर्ष देशाचे राजकारण जवळून बघितल्याने आणि अनुभवल्याने देशातील सर्वच राज्यातील दिग्गज नेत्यांचा पवारांशी थेट संपर्क आहे. एका फोनवरून शरद पवार देशातील सूत्रे हलवू शकतात हा इतिहास सर्वानाच माहित आहे. शरद पवार कधीही काहीही करू शकतात या भितीपोटी भाजपही पवारांना दचकून असते. म्हणूनच तर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बोटाने मोजण्याएवढे असले तरी शरद पवारांचं महत्व दिल्लीच्या राजकरणात नेहमी मोठं राहील आहे. आताही इंडिया आघाडीला नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची गरज असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचे काम शरद पवार करू शकतात. आत्तापर्यंत या दोन्ही नेत्यांसोबत पवारांनी केलेलं काम, समविचारी पक्ष, आणि मूळचा मोदीविरोधी हि कारणे पटवून देऊन शरद पवार हे नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडू याना इंडिया आघाडीकडे खेचू शकतात.

महाराष्ट्रात २०१९ साली उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन शरद पवारांनी महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला होता, आणि भाजपला संख्याबळ जास्त असूनही सत्तेपासून दूर ठेवलं होते. तोच प्रयोग आता देशपातळीवर करण्याची ताकद शरद पवार यांच्यात अजूनही आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार किंगमेकर ठरतील असं बोललं जातंय.

दरम्यान, नितिंशकुमार यांच्या JDU चे १२ आणि चंद्राबाबू नायडू यांच्या TDP चे १६ खासदार आहेत. सध्या इंडिया आघाडीकडे २३४ खासदारांचे बळ आहे. मात्र नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यानंतर हाच आकडा २६२ वर जातोय… यानंतर काही अपक्षांच्या मदतीने इंडिया आघाडी २७२ पर्यंत जाऊन सरकार स्थापन करू शकते. नितीश कुमार यांचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.