Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 704

Benefits of kiwi | प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी किवी आहे फायदेशीर; जाणून घ्या 5 आश्चर्यकारक फायदे

Benefits of kiwi

Benefits of kiwi | आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या विटामिनची गरज असते. त्यामुळेच आपले शरीर निरोगी राहते. यासाठी लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. परंतु किवी हे एक असे फळ आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक विटामिन्सची पूर्तता भरून निघते. आणि आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. किवीमध्ये विटामिन सी, विटामिन ई, पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनचा धोका सगळ्यात जास्त असतो. अशावेळी जर तुम्ही किवीचे सेवन केले, तर तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. त्याशिवाय शरीराला रोगांशी लढण्याची क्षमता देखील प्राप्त होते. हे किवी तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला किवी (Benefits of kiwi) खाण्याचे पाच जबरदस्त उपाय सांगणार आहोत.

प्लेटलेट्स वाढते | Benefits of kiwi

आजारपणामुळे शरीरात प्लेटलेट्सची तीव्र कमतरता असते तेव्हा डॉक्टर किवी खाण्याचा सल्ला देतात. आम्ही तुम्हाला सांगतो, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. हे रोज खाल्ल्याने प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने वाढवता येते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त

किवीच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारली जाते. तसेच किवी अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतेच, शिवाय बदलत्या हवामानात आणि या उष्णतेमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत करते.

बद्धकोष्ठतेपासून आराम | Benefits of kiwi

पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच किवीच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनाच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर उन्हाळ्यात तुम्ही या फळाचा आहारात नक्कीच समावेश करू शकता.

रक्तदाब नियंत्रित होते

उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी करणे असो, प्रत्येक बाबतीत किवीचे सेवन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ अवश्य खावे. याशिवाय हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंचे आरोग्य देखील सुधारते.

डोळ्यांसाठी फायदेशीर | Benefits of kiwi

आजच्या काळात लहान वयातच लोकांना डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. किवीच्या सेवनाने दृष्टीही सुधारते, त्यामुळे जर तुम्हालाही वाढत्या वयासोबत चष्म्याचा नंबर वाढवायचा नसेल तर तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश करू शकता.

नितीशकुमार- तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला? चर्चाना उधाण

nitish kumar tejaswi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपप्रणित NDA आला २९१ जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३४ जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. या एकूण राजकीय परिस्थितीत बिहारचे नितीशकुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूं नायडूंचे महत्व चांगलंच वाढल आहे. या दोन्ही नेत्याना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी करू शकते. आज दिल्लीत INDIA आणि NDA ची स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नितीशकुमार आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे दोघेही एकाच विमानाने जाणार असल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

आज पुढील रणनीती ठरवण्यासाठी INDIA आघाड़ीची ६ वाजता बैठक होणार आहे तर NDA ची ४ वाजता बैठक होईल. तेजस्वी यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जातील तर नितीशकुमार हे NDA चाय बैठकीसाठी जाणार आहे. मात्र दोन्ही नेते एकाच विमानाने जाणार असल्याने चर्चाना उधाण आलं आहे. बीहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU १२ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचे महत्व वाढलं आहे. इंडिया आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. नितीश कुमार यांचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे आताही राजकीय परिस्थिती पाहून नितीशकुमार पुनः एकदा इंडिया आघाडीसोबत जाणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.

नितीशकुमार यांच्याशिवाय चंद्राबाबू नायडू यांनाही इंडिया आघाडी सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे. हे दोन्ही नेते इंडिया आघाडीसोबत आले तर इंडिया आघाडीचा आकडा २३४ वरून थेट २६७ पर्यंत जाईल. मग बाकी इतर अपक्षांना सोबत घेऊन इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा सुद्धा करू शकते. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होणार असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे.

जनतेने मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखला; सामना अग्रलेखातून टीकेचा बाण

modi and raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा २०२४ च्या निकालावरून (Lok Sabha 2024 Results ) शिवसेना ठाकरे गटाने मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. सामना अग्रलेखातून मोदींवर घणाघात करण्यात आलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे, असे म्हणत मोदींवर (Narendra Modi) टीकेचा बाण सोडण्यात आला आहे. तसेच सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा, फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल असा इशाराही सामनातून देण्यात आला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

स्वतःला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर मिळवलेला विजय असेच म्हणावे लागेल. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशेपार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून द्या. नव्हे, चारशे जागा निवडून आणणारच या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. विरोधात बोलणान्यांना सरळ तुरुंगात टाकले गेले. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी- शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकांचे निकाल हाच जनादेश आहे.

ज्या उत्तर प्रदेशात राममंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपास सगळ्यात मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 40 जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडून मोदी-शहांनी घाणेरडे राजकारण केले. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. सत्तेचा अमर्याद वापर, पैशांचा ‘धो-धो पाऊस ‘मिंधे’ सेनेने पाडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केला. मोदी-शहांनी मिळून महाराष्ट्रात पन्नास सभा घेतल्या, पण हाती काहीच लागले नाही.

पक्ष गेला, चिन्ह गेले, आर्थिक ताकद नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने दोन आकड्यांत जागा जिंकल्या. महाविकास आघाडी म्हणून 30 जागा जिंकणे हा धनशक्ती व सरकारी यंत्रणेचा पराभव आहे. केरळ, प. बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ही राज्ये भाजपच्या पाठीशी राहिली नाहीत. तामीळनाडूने तोच मार्ग स्वीकारला. आंध्रात जगनमोहन रेड्डी व त्यांचा पक्ष पराभूत झाला. तेथे तेलुगू देसम व चंद्राबाबूंनी उसळी मारली. कर्नाटक, बिहारात ‘इंडिया’ आघाडीस अपेक्षित यश मिळाले नाही. ते मिळाले असते तर ‘इंडिया’ आघाडीला बहुमताचा आकडा सहज पार करता आला असता. तसे घडले नाही तरीही मोदींच्या अहंकाराचा रथ चिखलात अडकला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पन्नास जागाही मिळणार नाहीत अशा वल्गना करणाऱ्यांचे दात घशात गेले. मोदी यांचे तथाकथित देवत्वाचे पितळ उघडे पडले. दिल्लीत पुढे काय होणार, हा प्रश्न महत्त्वाचा. अल्पमतातल्या ‘एनडीए’चे नेतृत्व स्वीकारून मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घ्यायला पुढे जातील काय? सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे व ते टेकूही डळमळीत आहेत. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी व त्यांच्या अमित शहांना निरोप दिला आहे. त्यांच्या अहंकाराचा गाडा रोखला आहे. सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा भ्रष्ट मार्गाचा फोडाफोडीचा मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक रस्त्यावर येईल. देशातील लोकशाहीचा अफाट, अपूर्व, अलौकिक विजय झाला आहे. देशाच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, तो तसाच राहील.

NEET UG 2024 Result: NTA कडून NEET परीक्षेचा निकाल जाहीर; येथे पहा निकाल

NEET UG 2024 Result| राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होत असताना दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET 2024 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचे अधिकृत निकाल exam.nta.ac.in/NEET या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्वरित या वेबसाईटला भेट द्यावी. आता NTA ऑल इंडिया टॉपर्सची नावे देखील घोषित करेल. पुढे श्रेणीनुसार कट-ऑफ गुण आणि पर्सेंटाइल रँक प्रदान करेल.

निकाल कसा पहावा. (NEET UG 2024 Result)

1) सर्वात प्रथम निकाल पाहण्यासाठी exam.nta.ac.in/NEET वेबसाइटला भेट द्या

2) पुढे होमपेजवर NEET 2024 लिंक पहा आणि त्यावर क्लिक करा.

3) यानंतर तुमचे ID लॉगिन करा.

4) पुढे NEET 2024 स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.

5) नंतर स्कोअरकार्डचे पुनरावलोकन करा आणि डाउनलोड करण्यासाठी पुढे जावा. 6) शेवटी स्कोअरकार्डची हार्ड कॉपी प्रिंट करा.

आम्ही याठिकाणी थेट लिंक देत आहोत.
 
https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index

लोकसभा निवडणुकीत वंचितचा मोठा पराभव; प्रकाश आंबेडकरांकडून नाराजी व्यक्त

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) राज्यात किती जागा जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, या लोकसभा निवडणुकीत वंचितला यश मिळालेले नाही. तर खुद्द प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचाही अकोल्यातून पराभव झाला आहे. या पराभवानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक VBA कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. यासह ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला त्यांचेही मी आभार मानतो.”

त्याचबरोबर, “पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे. पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू. वंचित बहुजन आघाडी विजय असो” असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 35 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यातील 7 ठिकाणी वंचितने इतरांना पाठिंबा दिला होता. यामध्ये, कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा मतदारसंघांचा समावेश होता. मधल्या काळात वंचित आघाडी महाआघाडीसोबत आली नाही तर त्याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुकीचा निकाल आल्यानंतर ही शक्यता फोल ठरली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का!! पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडून रवींद्र धंगेकरांचा पराभव

Mohol And Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वांचे लक्ष पुणे मतदारसंघाकडे लागून राहिले होते. कारण की, या मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar);यांना भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना आणि वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरेंना (Vasant More) उमेदवारी जाहीर केले होती. अखेर आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.

यंदा पुणे मतदार संघामध्ये या तिन्ही पक्षाकडून चांगलीच लढत पाहिला मिळाली. महत्वाचे म्हणजे, याच लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून वसंत मोरे यांना तिकीट न देण्यात आल्यामुळे त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वंचितकडून पुणे मतदारसंघासाठी वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच गेल्या निवडणूकीत पुणे मतदारसंघात गिरीश बापट यांनी विषय मिळाल्यामुळे त्यांची जागा राखण्याचे काम भाजपच्या हाती होते. यामुळे त्यांनी या मतदारसंघातून मोहोळ यांना तिकीट दिले.

तर दुसऱ्या बाजूला कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ सर्वात चर्चेत राहिला होता. अखेर आज मतमोजणी झाल्यानंतर पुणे मतदारसंघावर मोहोळ यांचा शिका उमटला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विजय भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आणि काँग्रेससाठी धक्कादाय ठरला आहे.

Foods to Avoid Kidney Stones | किडनी स्टोन होऊ नये म्हणून टाळा हे पदार्थ; डॉक्टरांनी दिली माहिती

Foods to Avoid Kidney Stones

Foods to Avoid Kidney Stones | आजकाल किडनी स्टोन होणे ही एक सामान्य समस्या बनत चाललेली आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार स्टोनचे रूप धारण करतात. तेव्हा त्याला मुतखडा म्हणतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त क्षार आपल्याला लघवीद्वारे बाहेर काढता येत नाही. त्यावेळी ते मूत्रपिंडात जमा होते आणि त्या ठिकाणी एक दगड तयार होतो. खाण्यापिण्यातील अनियमता, आवश्यक तेवढे पाणी न पिणे ही मुतखडा होण्याची मुख्य कारणे आहेत. काही लोकांच्या किडनीमधील स्टोन सहज बाहेर पडतो. परंतु काहींचा हा स्टोन सहज बाहेर पडत नाही. त्यावेळी लोकांना खूप त्रास सहन करावा.

किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी हे पदार्थ टाळा | Foods to Avoid Kidney Stones

प्रोटीन युक्त पदार्थ

जर तुम्हाला किडनी स्टोन असेल, तर काही गोष्टींचे सेवन न करणे तुमच्यासाठी फायदेशीर असते. ज्यात प्रथिने अधिक प्रमाणात असतात चिकन, मासे, चिज, अंडी, दही इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करू नये. कारण त्यामध्ये जास्त प्रथिने असतात. आणि त्यामुळे किडनीवर वाईट परिणाम होतो.

फॉस्फरस असलेले पदार्थ

फास्ट फूड, टॉकी, जंक फूड, चिप्स,चॉकलेट कार्बोनेटेड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे.

शीतपेय

मुतखडा असताना कोल्ड्रिंकचे सेवन करणे, आरोग्यासाठी घातक आहे. कारण यामध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस ऍसिडचा वापर होतो. त्यामुळे मुतखडा असल्यावर याचे सेवन करणे टाळावे.

जास्त मीठ खाणे टाळावे | Foods to Avoid Kidney Stones

ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे, त्यांनी जास्त मीठ खाणे टाळावे. मिठामध्ये असणारा सोडियमचे शरीरात गेल्यावर कॅल्शियममध्ये रूपांतर होते. आणि त्याचे खडे तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे.

त्याचप्रमाणे मुतखड्याचा त्रास होऊ नये, यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ खाणे गरजेचे आहे. तुमचा आहार संतुलित केल्याने किडनीचा स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

राहुल गांधींची कमाल!! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून घवघवीत मतांनी विजयी

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातून लोकसभा निवडणुकीचे निकाल (Loksabha Elections Result) समोर येऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. हा विजय त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधींनी भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांचा सुमारे तीन लाख 90 हजार मतांनी पराभव केला आहे. तर वाराणासीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अजय राय यांना पराभव केला आहे.

खरे तर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर केवळ वायनाडची जागा वाचवण्याची जबाबदारी नव्हती, तर रायबरेलीला सुरक्षित ठेवण्याचेही मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. कारण की, 2019 मध्ये अमेठीमधून पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला होता. त्यानंतर जनतेचा पुन्हा विश्वास जिंकण्याची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर होती. हीच जबाबदारी राहुल गांधी यांनी व्यवस्थित पार पाडली असल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय मिळवला आहे. मोदी यांनी अवघ्या दीड लाख मतांनी काँग्रेसचे अजय राय यांचा पराभव केला आहे. तर, रायबरेली येथून राहुल गांधी विजयी झाले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे. या निकालातून स्पष्ट होईल की, देशात इंडिया आघाडीने सरकार येईल की पुन्हा पंतप्रधान मोदी सत्ता गाजवतील.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास व्हाल लखपती, जाणून घ्या योजना

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतात. परंतु गुंतवणूक करताना त्यांना नेहमी सुरक्षिततेची हमी पाहिजे असते. त्याचबरोबर पैशाची सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळण्यासाठी लोक नवनवीन योजना शोधत असतात. पोस्ट ऑफिस देखील अशाच योजना तुम्हाला देत असते. ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. आणि तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो

आज आपण पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही चांगले श्रीमंत होऊ शकता. तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकता.

या योजनेमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. आणि त्याचा त्यांना चांगला परतावा देखील मिळालेला आहे. या पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. या आरडीवर तुम्हाला 6.7 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. याआधी 5 वर्षाच्या आरडीवर तुम्हाला 6.50% दराने व्याज मिळत होते. परंतु आता सरकार या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 20 बेसिस पॉईंट्सने वाढ केलेली आहे. ही वाढ डिसेंबर 2023 च्या मध्यात करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये (Post Office Scheme) तुम्हाला दर महिन्याला काही ठराविक रक्कम जमा करावी लागते. आणि पाच वर्षांनी मॅच्युरिटी वर तुम्हाला एक रकमी रक्कम मिळते. जर तुम्ही दर महिन्याला 4 हजार रुपयांची आरडी केली तर पाच वर्षांमध्ये तुम्ही एकूण 2,40,000 रुपयांची गुंतवणूक करायला आणि 6.7% व्याज दिला नुसार तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 2 लाख 85 हजार 463 रुपये मिळतील. त्यातून 45 हजार 45463 रुपये फक्त व्याजातून मिळतील

केंद्र सरकार सर्व लहान बचत योजनेचे नेहमी व्याजदर बदलत असते. तुम्ही आवृत्ती ठेवीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आरडीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जातो. या व्याजावर 10 टक्के टीडीएस असतो. एका महिन्यासाठी आरडी वरील व्याज 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो.

महाराष्ट्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू!! लेकीच्या विजयानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar and supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निकालानुसार, बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा घवघवीत मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे सध्या बारामती जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. यासह शरद पवार गटाचे कार्यकर्ते गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देताना दिसत आहे. या विजयानंतरच शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात सर्वात प्रथम त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे.

शरद पवार काय म्हणाले??

सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. महाराष्ट्रात एक प्रकारची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रात निवडणुकीचा जो निकाल समोर आला आहे. तो इतर ठिकाणच्या परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. सुदैवाने देशपातळीवरचं चित्रही आशादायी आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये जे निकालाचे दावे केले जात होते, त्यापेक्षा वेगळा निकाल लागला आहे.”

त्याचबरोबर, “या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेश आणि इतर भागात जे यश मिळायचं, त्याचं मताधिक्य जास्त असायचं. पण आज त्यांना ज्या काही जागा मिळाल्यात, त्या मर्यादित अशा मताधिक्याने मिळाल्या आहेत. याचा अर्थ देश पातळीवर आम्ही व आमच्या सहकाऱ्यांनी अधिक लक्ष दिलं, तर आज उत्तरेकडचा चेहरा बदलायला अनुकूल चित्र दिसतंय. त्यासाठी आम्हा लोकांकडून काळजी घेतली जाईल” असे शरद पवार यांनी म्हणले आहे.