Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 710

Disadvantages Of Sugar | गोड साखर ठरू शकते जीवघेणी; शरीराला होतात हे तोटे

Disadvantages Of Sugar

Disadvantages Of Sugar | साखर ही आपल्याला दैनंदिन आयुष्यात लागत असते. परंतु साखर ही आपल्या आरोग्यासाठी जितकी चांगली आहे, तितकीच वाईट देखील आहे. अनेक आजारांचे कारण साखर ठरते. त्यामुळे साखरेला व्हाईट पॉइजन असे देखील म्हटले जाते. वजन वाढणे, डिप्रेशन, हार्ट डिसीज, त्वचा खराब होणे, डायबिटीज, स्मृती कमी होणे यांसारख्या अनेक समस्या साखरेच्या अतिसेवनामुळे उद्भवतात.

साखरेच्या (Disadvantages Of Sugar) अति सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, आता राष्ट्रीय पोषण संस्था आणि भारतीय आयुर्वेदिक अनुसाधन परिषद यांनी सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, कुकीज, आईस्क्रीम सेरीअल्स आणि इतर पॅकेज फोर्समध्ये साखरेचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे.

बाजारामध्ये कोको कोला, ज्यूस, बिस्कीट यांवर 100 ग्रॅम साखरेचे प्रमाण आता 86 ग्रॅम पर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आता आयसीएमआरने शिफारस केली आहे की, गोड पदार्थांमध्ये पाच टक्के एनर्जी एडिट शुगर मिळते 10% टोटल शुगर या पदार्थांमध्ये दहा टक्के एडिट शुगर आणि तीस टक्के टोटल शुगर असते.

जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे डायबिटीस, लठ्ठपणा आणि कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपले वजन देखील वाढते आणि ब्लडप्रेशरची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचा वापर अतिशय कमी करण्याचा सल्ला देखील तज्ञांनी दिलेला आहे.

अमेरिकन हार्ड असोसिएशनच्या रिपोर्टनुसार महिलांनी दर दिवशी 100 कॅलरीस पेक्षा जास्त आणि पुरुषांनी 150 कॅलरीज पेक्षा जास्त साखर खाऊ नये. बॉलीवूडमधील कलाकार जॉन इब्राहिम आणि जॅकलीन फर्नांडिस हे दोघे जण साखर अजिबात खात नाही. जवळपास गेल्या 27 वर्षांमध्ये त्याने साखरेला हात देखील लावलेला नाही.

साखर (Disadvantages Of Sugar) हा वजन वाढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे ज्या लोकांचे वजन कमी आहे. त्या लोकांनी योग्य प्रमाणात साखरेचे जास्त सेवन केले तर त्याचा त्यांना फायदा होतो. त्यामुळे भरपूर कॅलरीज मिळतात आणि त्यांचे वजन वाढते. परंतु या साखरेचे सेवन करताना त्याचे योग्य आणि प्रमाणात सेवन करणे खूप गरजेचे असते. अन्यथा यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अन्यथा हीच गोड वाटणारी साखर एक दिवस तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते.

एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा; ठाकरे गटाचा हल्लाबोल

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. नुकतेच अनेक अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र हा एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

सामना अग्रलेखात काय म्हंटल –

सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील हेसुद्धा सांगून टाकले. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालसारख्या मोठया राज्यांच्या मतदानासंदर्भात संपूर्ण ‘डाटा’ बाहेर आलेला नाही. त्यामुळे या राज्यांत काय निकाल लागतील, त्याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही, पण या सगळया राज्यांतील मतदानाची सारासार माहिती न घेता ‘एक्झिट पोल’वाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बिनधास्त ठोकून दिले की, पुन्हा एकदा मोदीच येत आहेत व भाजपला आणि त्यांच्या आघाडीस 350 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. भाजपला 350 जागा मिळाव्यात असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवले आहे ? 2014 आणि 2019 पेक्षा मोदींना लोक भरभरून मते देत आहेत व मोदी तिसऱ्यांदा विजयी होत असल्याचे चित्र निर्माण करणे हा फक्त पैशांचा कॉर्पोरेट खेळ आहे. 1 तारखेस प. बंगाल, उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. प. बंगालातील 10 जागांसाठी साधारण 59.15 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोग चार – पाच दिवसांनी या आकडय़ा आणखी पाच-दहा टक्क्यांची भर टाकेल. मग एक्झिट पोलवाल्यांनी प. बंगालमधील निकाल कोणत्या आधारावर लावले? हरयाणात एकूण 10 लोकसभेच्या जागा आहेत. आता गोंधळ समजून घ्या. 10 लोकसभा जागा असताना तेथे भाजपप्रणीत एनडीएला 16 ते 19 जागा मिळतील असे ‘झी न्यूज’च्या एक्झिट पोलमध्ये दाखवले. हिमाचल प्रदेशात फक्त चार जागा असताना या राज्यात एनडीए सहा ते आठ जागा जिंकेल असा निकाल दिला आहे. बिहारमध्येदेखील लोक जनशक्ती पार्टी प्रत्यक्षात पाच जागांवर लढलेली असताना एक्झिट पोलमध्ये तो पक्ष सहा जागा जिंकू शकेल.

झारखंडमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकच जागा लढवत असताना त्या पक्षाला तीन ठिकाणी विजय मिळेल, असा ‘चमत्कार’ एक्झिट पोलवाल्यांनी केला आहे. हा सर्व आकड्यांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या ‘पोल’ कंपन्यांनी स्वतःचीच बेअबू करून घेतली. काँग्रेसने तामीळनाडूत फक्त 9 जागांवर निवडणुका लढवल्या, पण ‘आज तक’च्या एक्झिट पोलने तामीळनाडूत काँग्रेसला 13-15 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. हे सर्व आकडे पाहिले तर एक्झिट पोलवाल्यांनी भाजपला 350 या जागा कमीच दिल्या. लोकसभा 543 जागांची असली तरी भाजपला साधारण 800 ते 900 जागा मिळायला काहीच हरकत नव्हती. दिल्लीत काँग्रेस व आप यांच्यातील युती फलदायी ठरत आहे, पण दिल्लीतील सर्वच्या सर्व 7 जागा भाजपला मिळतील असे अंदाजी निकाल एक्झिट पोलवाल्यांनी जाहीर करून टाकले. सत्य असे आहे की, भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षांत प्रत्येक निवडणूक ही बनवाबनवी करून जिंकली. त्यात या एक्झिट पोलचाही वाटा आहे. या वेळी एक्झिट पोलचे आकडे व 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल यात जमीन अस्मानाचा फरक राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही.

भाजपच्या हाती सत्तेची सूत्रे गेल्यापासून हवे ते आकडे आणि निकाल सरळ विकत घेतले जातात. हे त्यांचे धोरण ठरलेलेच आहे. अमित शहा यांनी गेल्या 48 तासांत देशातील दीडशेच्या वर जिल्हाधिकाऱ्यांना व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना फोन करून ‘दम’ भरल्याची माहिती समोर आली. मतगणनेत भाजपला मदत करा, विरोधकांनी आक्षेप घेतले तर लक्ष देऊ नका असे म्हणे अमित शहांनी अनेक जिल्हाधिकाऱ्यांना धमकावले. हे सत्य असेल तर निवडणूक आयोग हासुद्धा एक कठपुतली बनून फक्त तमाशाच पाहत आहे असेच म्हणावे लागेल. मोदी ध्यानाला बसले तसा आपला निवडणूक आयोगही डोळे मिटून बगळ्याप्रमाणे ध्यानाला बसला आहे. अर्थात, लोकशाहीत जनता सर्वोपरी व मतदार हाच राजा आहे. 4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे. भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही व इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे असं सामनातून म्हंटल आहे.

Amul Milk Price Hike : दुधाच्या किंमतीत मोठी दरवाढ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार

Amul Milk Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुका पार पडताच देशातील सर्वसामान्य जनतेला एकमागुन एक झटके बसत आहे. आजपासून एकीकडे टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे दुधाच्या किंमतीत सुद्धा मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांचे आवडते असलेले अमूल दूध महागले (Amul Milk Price Hike) आहे. अमूल दूधाच्या किमतीत एक लिटरमागे प्रत्येकी 2 रूपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे. आजपासूनचे हे नवीन दर लागू होणार असून या निर्णयामुळे जनतेच्या खिशाला आणखी झळ बसत आहे.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्ती या तिन्ही कंपन्यांच्या दुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. एकूणच कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हंटल आहे. अमूलने दूधाच्या किमतीतील ही वाढ (Amul Milk Price Hike) फक्त एका राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशभरात केली आहे. दुधाच्या या वाढलेल्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या.

नव्या दरानुसार कशी असेल दुधाची किंमत ? Amul Milk Price Hike

अमूल गोल्ड 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 33 रुपयांवरून 34 रुपये, तर एक लिटर दुधाची किंमत 64 रुपयांवरून 66 रुपये करण्यात आली आहे.

अमूल ताजा 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 27 रुपयांवरून 28 रुपये, तर 1 लिटरची दुधाची किंमत 54 रुपयांवरून 56 रुपये करण्यात आली आहे.

अमूल गायीच्या 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 28 रुपयांवरून 29 रुपये, तर 1 लिटरची दुधाची किंमत 56 रुपयांवरून 57 रुपये करण्यात आली आहे.

अमूल म्हशीच्या दुधाच्या अर्ध्या लिटर दुधाच्या पाकिटाची पाकिटाची किंमत 35 रुपयांवरून 37 रुपये, तर 1 लिटरच्या पाकिटाची किंमत 70 रुपयांवरून 73 रुपये करण्यात आली आहे.

अमूल स्लिम अँड ट्रिम (एसएनटी) 500 एमएल दुधाच्या पाकिटाची किंमत 24 रुपयांवरून 25 रुपये आणि 1 लिटरची किंमत 48 रुपयांवरून 49 रुपये करण्यात आली आहे.

World Bicycle Day 2024 | सायकल चालविल्याने शरीर राहते तंदुरुस्त; जागतिक सायकल दिनानिमित्त जाणून घ्या फायदे

World Bicycle Day 2024

World Bicycle Day 2024 | आज-काल अनेक लोकांचे चालणे बंद झाले आहे. पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती. त्यामुळे लोक चालत जायचे किंवा सायकलचा वापर करत प्रवास करायचे. त्यामुळे त्यांचे शारीरिक संतुलन देखील चांगले राहायचे. परंतु जसजसे शहरीकरण होत गेले, तंत्रज्ञानाचा विकास झाला, तसतसा सायकलचा वापर कमी होऊ लागला. मग त्या सायकलची जागा तुमच्या दुचाकी आणि चारचाकीने घेतली.

आज काल प्रत्येक घरामध्ये आपल्याला बाईक, स्कूटर किंवा कार दिसते. अगदी जवळ जायचे असले तरी लोक बाईकचाच वापर करतात. वाहनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे नुकसान तर झालेले आहे. परंतु त्यासोबत आपल्या आरोग्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते आणि श्वसनाचा अनेक समस्या आपल्याला उद्भवतात. त्याचप्रमाणे आपल्या शारीरिक व्यायाम देखील होत नाही.

तुम्ही जर जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा (World Bicycle Day 2024) वापर केला, तर त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे रक्षण होईल आणि आपले आरोग्य देखील चांगले राहील. आज सर्वत्र जागतिक सायकल दिन साजरा करत आहे. याच दिनानिमित्त आपण सायकल चालवण्याचे आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात. हे जाणून घेणार आहोत.

स्नायू मजबूत होतात | World Bicycle Day 2024

तुम्ही जर दररोज सायकल चालवली तर तुमच्या आरोग्य तंदुरुस्त राहील. आणि पायांचे, हातांचे आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतील.

मानसिक आरोग्य उत्तम राहते

सायकल चालवल्याने नैराश्याची चिंता आणि तणावाच्या समस्या देखील दूर होतात. त्याचप्रमाणे सायकल चालवल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे आपला मूड देखील चांगला होतो. आणि आपल्याला चांगली झोप देखील लागते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी सायकल चालवणे, हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. ज्यांना व्यायाम करायचा कंटाळा येतो, त्यांनी जर रोज अर्धा किंवा एक तास जरी सायकल चालवली, तर महिन्याभरातच वजन कमी होईल.

सांध्यांसाठी उपयोगी | World Bicycle Day 2024

जिममध्ये जास्त वर्कआउट केल्याने तुमच्या सांध्यांवर ताण होते. त्यामुळे सांध्यांना आणि गुडघ्यांना दुखापत होण्याचा धोका निर्माण होतो. तुम्ही जर सायकल चालवली तर गुडघ्यावर जास्त ताण येणार नाही. आणि शरीराचा देखील व्यायाम होईल.

Toll Tax Hike : आजपासून टोलच्या किंमतीत वाढ; प्रवाशांच्या खिशाला कात्री

Toll Tax Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रवाशांसाठी निराशाजनक बातमी आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून टोल टॅक्स मध्ये वाढ (Toll Tax Hike) करण्यात आली आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने देशभरातील टोल टॅक्समध्ये वाढ केली आहे. खरं तर टोलच्या किमतीमधील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली. अखेर आजपासून वाहनचालकांनाअनेक टोल प्लाझांवर 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

आजपासून देशभरातील सुमारे 1,100 टोल प्लाझांवरील टोल दरात 3 ते 5 टक्के वाढ (Toll Tax Hike) होणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिघातघात राहाणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढले आहेत. खरं तर टोल प्लाझा दरवाढ हा गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा बनला आहे.रस्ते प्रकल्पांच्या विकासासाठी हे महत्वाचे असल्याचा दावा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे करण्यात येतो तर विरोधक तर आता या दरवाढीनंतर सरकार विरोधात रान उठवण्याची शक्यता आहे.

कोणत्या वाहनासाठी किती टोल भरावा लागेल? Toll Tax Hike

कार/जीप/हलकी वाहने – जुने दर – 105, नवीन दर – 110 ह

लके कमर्शियल/लगेज वाहन/मिनी बस – जुने दर – 170, नवीन दर – 175

बस/ट्रक – जुने दर – 355, नवीन दर – 365

थ्री एक्सल कमर्शियल व्हेईकल – जुने दर – रु. 385, नवीन दर – रु. 395

चार ते सहा एक्सल वाहने – जुने दर – 555, नवीन दर – 570

7 एक्सल किंवा मोठ्या आकाराचे वाहन – जुने दर – 680, नवीन दर – 695

महाराष्ट्रातील 48 जागांवर Exit Poll काय सांगतायत? साधं सोपं विश्लेषण

exit poll lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला.. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलय, पण दोन महत्वाच्या पक्षांमध्ये पडलेल्या फुटी आणि राजकारणाची झालेली भेसळ यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य होतं.. महायुती की महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच. पण त्याआधीच निकालाआधीचा महानिकाल समोर आलाय. देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज समोर आलाय… महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व 48 जागांवर वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या आहेत. हे आपण अगदी साध्या सोप्या आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत…

पहिला आहे तो एबीपी सी वोटरचा एक्झिट पोल…

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आलीये. म्हणजेच मविआ आणि महायुतीला महाराष्ट्रात 50-50 चांसेस असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा तर अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारेल असं जे चित्र रंगवलं जात होतं तसं मात्र न होता भाजप आणि शिंदे गट त्यातल्या काही जागा गेन करताना दिसतोय. पण सर्वात विशेष म्हणजे तुतारीच्या दहापैकी 6 जागांवर विजय होत असल्याचा एबीपी सी व्होटरचा दावा असल्याने शरद पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक फायद्याचीच म्हणावी लागेल…

यासोबत टॉप ऍनॅलिटीकाच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला 26 ते 29 आणि महायुतीला 22 ते 24 जागा मिळतील असा निकाल देत दोघांच्यात क्लोज फाईट असल्याचं त्यांनी दाखवलंय. विशेष म्हणजे पार्टी वाईज बघायचं झालं तर बीजेपी ला 13 ते 17, शिवसेनेला अवघ्या 2 ते 3, अजित पवार गटाला शून्य ते एक तर दुसरीकडे काँग्रेसला 9 ते 11 शिवसेना ठाकरे गटाला 15 ते 17 आणि शरद पवार गटाला 6 ते 7 जागा मिळतील असा निकाल एक्झिट पोल मधून देण्यात आलाय. तर अपक्षाच्या खात्यात 1 जागा देण्यात आलीय. शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाराष्ट्रात मोठा फटका बसत असल्याचं या एक्झिट पोलमधुन समोर येतंय…

दुसरा एक्झिट पोल आहे तो न्यूज 18 चा…

न्युज 18 चा हा पोल पाहिला तर महायुतीला 25 ते 32 जागा आणि महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. थोडक्यात महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने निकाल झुकतोय असं या पोलचं म्हणणं आहे. भाजप 23, शिवसेना शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाला 2 जागा असं विभाजन करण्यात आलंय. तर ठाकरे गटाला 7, काँग्रेसला 5, शरद पवार गटाला 4 जागा एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्यात. थोडक्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला समसमान तर शरद पवार गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील.

तिसरा एक्झिट पोल आहे रुद्र रिसर्च ॲनालिटिक्स रिसर्च या संस्थेचा…

महाविकास आघाडीला तब्बल 34 च्या आसपास तर महायुतीला केवळ 13 जागा मिळतील असा अंदाज रुद्र संस्थेनं देत महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार विरोधात वातावरण असल्याचं दाखवून दिलय. त्यातही पार्टी वाईज जागा पाहिल्या तर भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 3 तर अजित पवार गटाला अवघी 1 जागा मिळेल. तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14, काँग्रेसला 12 तर शरद पवार गट तब्बल 8 जागांवर विजयी होईल, असाही अंदाज सांगतोय. काही महत्त्वाच्या लढतींबद्दल बोलायचं झालं तर बारामतीतून सुप्रिया सुळे ह्या मोठे लीडने तर पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि नगर मधून निलेश लंके दहा ते बारा हजारच्या निसटत्या लिडने जिंकत असल्याचंही दाखवण्यात आलंय.

आता बोलुयात टिव्ही 9 पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोल बद्दल…

पोलस्ट्रेटच्या पोलमध्ये महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागांचा कौल देण्यात आला आहे. तर अपक्ष म्हणून 1 खासदार निवडून येईल, असा थोडा वेगळा अंदाज वर्तवण्यात आलाय. यात भाजपला तब्बल 18, शिंदे गटाला 4 तर अजितदादा गटाला शून्य जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14 तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 6 जागांवर यश येईल असं सांगण्यात आलय.

टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल मात्र महाविकास आघाडीची झोप उडवणार आहे. या संस्थेनं महायुतीच्या खात्यात 33 तर महाविकास आघाडीला अवघ्या 15 जागा मिळतील असा अंदाज बांधलाय… एक्झिट पोलच्या स्पर्धेतील महाराष्ट्रातील आणखीन एक नाव म्हणजे द स्ट्रेलेमाचं…या संस्थेनही महायुतीला 24 ते 27 जागा, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा तर अपक्षां9 ते 11,च्या वाट्याला 1 जागा येईल, सांगितलंय. व्होट शेअर बद्दल बोलायचं झालं तर महायुतीला 46% तर महाविकास आघाडीला 45% मत मिळतील असा अंदाज आहे. म्हणजेच मतदान घासून झालं असलं तरी द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारड जड दाखवण्यात आलय.

आता पाहूयात दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात नेमकं कोण आघाडीवर आहे ते? दैनिक भास्करच्या पोलनुसार महायुतीला 28 ते 30 जागा तर महाविकास आघाडीला 16 ते 20 जागांचा कौल देण्यात आलाय. पार्टी वाईज याची विभागणी केली तर भाजपला तब्बल 20 ते 23 जागा, शिवसेना शिंदे गटाला 6 ते 7 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन ते तीन जागा मिळतील. दुसरीकडे काँग्रेसला केवळ 1 ते 2 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 5 ते 6 जागा मिळतील असा अंदाज सांगितलाय. थोडक्यात दैनिक भास्करने काँग्रेसला 1 ते 2 जागांवर गुंडाळल्याने हा आघाडीसाठी मोठा लॉस ठरू शकतो…

श्री मीडियाच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा महायुती तब्बल 31 तर महाविकास आघाडी केवळ 16 जागांवर जिंकेल असा दावा करण्यात आलाय. यातही भाजप 20, शिंदे गट 8 तर अजित पवार गटाला 3 जागांचा कौल देण्यात आलाय. तर दुसरीकडे काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 8 तर शरद पवार गटाला फक्त 2 जागांवर गुंडाळण्यात आलय…थोडक्यात पोल ऑफ पोल काढायचा झाला तर 8 पैकी 5 कौल हे महायुतीच्या बाजूने झुकतायत… प्रत्येक पक्षाच्या जागांचा आकडाही पोलनुसार बदलताना दिसतोय. त्यामुळे महाराष्ट्राची हवा नेमकी कुठे आहे यावर अचूक भाष्य करण एक्झिट पोलनाही जमत नाहीये असं म्हणायला हरकत नाही. बाकी यातल्या नेमका कुठला पोल तुम्हाला 4 तारखेच्या निकालाच्या जवळ जाणारा वाटतोय? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; राज्यात महाविकास आघाडीला इतक्या जागा मिळणार

prithviraj chavan (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. नुकतेच अनेक अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं एकूण चित्र दिसत आहे. मात्र काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी हा एक्झिट पोल फेटाळून लावला आहे. 2014 मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्याच्या उलटे झाले. आताही निकालाबाबत सांगायचे झाले तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३२ जागा मिळतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

कराड येथे आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? या प्रश्नावर उत्तर दिले. देशात सध्या लोकसभा निवडणूक पार पडल्या असून काही लोकसभा मतदार संघाचे निकाल हाती येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात देखील ४८ जागांसाठी लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला साधारण ३२ जागा मिळतील असा विश्वास आहे. प्रत्यक्षात किती जागा मिळतील हे येणाऱ्या ४ तारखेला सर्वांना समजेल. जो काही माध्यमांकडून एक्झिट पोल जातो त्यातून केवळ त्यांचा टीआरपी वाढवण्यावर भर असतो. यातून फक्त लोकांची करमणूक होते. यामुळे एक्झिट पोलवर विश्वासार्हता राहत नाही.

यावेळी पृथ्वीराजबाबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांवर सूड घेण्यासारखे काम केले आहे. देशातील तीन कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केल्याचा राग मोदींनी त्यांच्यावर काढला आहे. निर्यात बंदी उठवून 40 टक्के निर्यात कर बसवल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे दाट धोके

निवडणूक आयोग हा निपक्षपाती असायला हवा. लोकांच्या मनात ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची भूमिका यांवर शंका असेल तर लोकांनाच लढाई हातात घ्यावी लागेल. काँग्रेसने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली. एकूणच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशयाचे दाट धोके असल्याचे चव्हाण यांनी यावेळी म्हटले.

काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिला ‘हा’ मोठा निर्णय घेणार

निवडणूक आयोगाची भूमिका समस्यास्पद आहे. निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्य असतात. त्या निवडप्रक्रियेत पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता अशी व्यवस्था होती. मात्र, याच वर्षाच्या सुरुवातीला ती व्यवस्था बदलून मोदींनी त्यातून सरन्यायाधीशांना काढून टाकत त्यामध्ये पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढेच पद ठेवले. मग एकटा विरोधीपक्षनेता काय करणार? या व्यवस्थेतून त्यांची दोन निवडणूक आयुक्त नेमले. ते कोणला फॉर राहणार हे माहीत नाही. यामुळे आमचे सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

दादांच्या राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशात 3 आमदार विजयी, 2 थोडक्यात पडले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Assembly Election) आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Ajit Pawar) मोठं यश मिळालं आहे. अजितपवारांचे ३ आमदार अरुणाचल प्रदेशातून निवडून आले आहेत तर २ उमेदवार अवघ्या २ आणि २०० मतांनी पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल विधानसभेच्या एकूण १५ जागा लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अजित पवारांकडे गेल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राबाहेर पक्षाला यश मिळालं आहे.

१९ एप्रिलला अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. आज याबाबत निकाल जाहीर करण्यात आले. एकूण 60 जागांपैकी १५ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या होत्या. यातील ३ ठिकाणे त्यांचे आमदार निवडून आले. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन असे या ३ उमेदवारांची नावे आहेत. तर अजित पवारांच्या ३ जागा अगदी थोडक्यात गेल्या. दादांचा एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे तर दुसऱ्या उमेदवाराचा अवघ्या 200 मतांनी पराभव झाला. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने १० टक्के मते मिळवली.

दरम्यान, अरुणाचल विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप सरकार आलं आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ४६ जागा जिंकत आपली सत्ता राखली. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता तोच आकडा 47 वर आला आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपची ताकद आणखी वाढली असं म्हणायला हवं. भाजपशिवाय नॅशनल पीपल्स पार्टी – 5, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 3, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल – 2, काँग्रेस – 1 आणि 3 अपक्ष निवडून आले.

धक्कादायक!! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरातील कळंबा कारागृहात खून

murder in Kalamba jail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून करण्यात आला आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे सदर मृत आरोपीचे नाव असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दोन गटातील मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. या एकूण प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मोहम्मद अली खान आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळ करण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी आरोप प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार , सौरभ विकास सिद्ध या पाचजणांसोबत त्याचा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झालं. सदर ५ आरोपींची ड्रेनेज वरील लोखंडी झाकणाने मुन्नाला मारहाण केली होती. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला. कारागृहातच कैद्याचा खून झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या एकूण संपूर्ण प्रकारानंतर जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना कारागृहात घडत आहेत. कारागृहात वर्चस्व राहावं त्यामुळं वारंवार अशाप्रकारच्या हाणामारी होत असतात. मात्र, त्याकडे कारागृहाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सुमारे दीड महिन्यापूर्वी कळंबा कारागृहात कैदी मोबाईल वापरत असल्याची टीप तुरुंग अधिकाऱ्यांना दिल्यानं गुंडाला १४ जणांनी मारहाण केली होती. यावेळी तुरुंगातील सुभेदार उमेश शामू चव्हाण जखमी झाले होते. आता तर थेट तुरुंगात 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Jio 895 Rupees Recharge Plan : Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; फक्त 895 रुपयांत 11 महिन्यांची व्हॅलिडिटी

Jio 895 Rupees Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तास्त मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओचे रिचार्ज कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा जिओकडे आकर्षित होत असतो. जिओकडे एकापेक्षा एक असे सरस रिचार्ज प्लॅन आहेत. मात्र यातील बहुतांश रिचार्ज प्लॅन आणि त्याचे फायदे तुम्हाला माहितीही नसतील. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका परवडणाऱ्या आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या प्लॅनबाबत (Jio 895 Rupees Recharge Plan) सांगणार आहोत, जो एकदा मारला कि 11 महिन्यांची व्हॅलिडिटी तुम्हाला मिळते. चला तर जाणून घेऊया….

Jio चा 895 रिचार्ज प्लॅन- Jio 895 Rupees Recharge Plan

आम्ही तुम्हाला ज्या प्लॅनबाबत सांगत आहोत तो आहे Jio चा 895 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.. एकदा हा रिचार्ज केला कि ग्राहकांना तब्बल 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओ यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह 2 GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. महत्वाची बाब म्हणजे एकदा नाही तर 12 वेळा तुम्हाला 28 दिवसांची वैधता आणि 2 GB डेटा दिला जाईल. तसेच तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएस मोफत मिळतात. एकूणच, काय तर जिओचा हा रिचार्ज प्लॅन तुमच्या बजेटनुसार परवडणाऱ्या आहेत. 895 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये Jio TV व्यतिरिक्त, तुम्हाला Jio Cinema आणि Jio Cloud वर देखील फ्री ऍक्सेस दिला जाईल.

जिओचा हा रिचार्ज प्लॅन (Jio 895 Rupees Recharge Plan) अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक फायदे हवे आहेत. त्यामुळेच कि काय जिओच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या गणनेत 895 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश होतो. ज्यांच्याकडे २ सिमकार्ड आहेत. परंतु त्यांच्याकडे असलेले दुसरे सिम जिओचे आहे आणि त्यांना ते वर्षभर स्वस्तात वापरायचे आहे. अशा ग्राहकांसाटी ही योजना अत्यंत किफायतशीर ठरणार आहे.