Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 711

Vivo S19 सिरीज अंतर्गत लाँच झाले 2 नवे मोबाईल; 50MP कॅमेरा,16GB रॅमसह मिळतात भन्नाट फीचर्स

Vivo S19 AND Vivo S19 Pro (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड विवो ने आपल्या S19 सिरीज अंतर्गत २ नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo S19 आणि Vivo S19 Pro असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा,16GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. हे दोन्ही मोबाईल सध्या चिनी बाजारपेठेत लाँच करण्यात आले असून येत्या काळात ते भारतात सुद्धा दाखल होऊ शकतात. आज आपण या दोन्ही मॉडेलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

6.78-इंचाचा डिस्प्ले –

Vivo S19 आणि Vivo S19 Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 4500 Nits पीक ब्राईटनेस मिळतो. Vivo S19 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर बसवण्यात आलाय तर Vivo S19 Pro मध्ये Dimensity 9200+ प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही मोबाईलच्या कॅमेरामध्येही फरक पाहायला मिळतोय. Vivo S19 मध्ये 50MP + 8MP चा ड्युअल कॅमेरा आहे तर समोरील बाजूला 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे. दुसरीकडे Vivo S19 Pro मध्ये 50MP Sony IMX921 लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो लेन्ससह तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo ने दोन्ही मॉडेल्स प्रत्येकी चार कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केले आहेत. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम + 256GB स्टोरेज आहे. तर टॉप वेरिएंटमध्ये 16GB रॅम + 512GB स्टोरेज आहे. Vivo S19 मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे तर Vivo S19 Pro मध्ये 5500mAh बॅटरी मिळतेय. या दोन्ही मोबाईलच्या बॅटरी 80W चार्जिंला सपोर्ट करतात.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, Vivo S19 ची किंमत 2500 Yuan म्हणजेच अंदाजे 28,797 रुपयांपासून सुरु होते. तर Vivo S19 Pro ची किंमत 3300 युआन म्हणजेच जवळपास 38 हजार रुपयांपासून सुरु होते. Vivo S19 हा मोबाईल राखाडी, पीच आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे तर Vivo S19 Pro ग्रे, हिरवा आणि फिकट निळ्या रंगात तुम्ही खरेदी करू शकता.

BECIL Recruitment 2024 : 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी; BECIL अंतर्गत 393 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी सुवर्णसंधी आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत 393 जागांसाठी भरती (BECIL Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून “MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. तुम्हीही जर पात्र असाल तर या नोकरीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. अर्ज कुठे आणि कसा करावा याबाबत माहिती आम्ही खाली दिली आहे.

पदसंख्या – 393 जागा

पदाचे नाव – MTS, DEO, कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब अटेंडंट, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, विकासक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, PCM, EMT, ड्रायव्हर, MLT, PCC, सहाय्यक आहारतज्ज्ञ, फ्लेबोटोमिस्ट, नेत्र तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नेटवर्क प्रशासक/ नेटवर्क सपोर्ट अभियंता (BECIL Recruitment 2024)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ( त्यासाठी मूळ जाहिरात वाचा)

वयोमर्यादा – 25 – 55 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज फी
सामान्य/ओबीसी/माजी सैनिक/महिला उमेदवार: ८८५ रुपये
SC/ST/PH/ EWS उमेदवार: ५३१ रुपये

कोणत्या पोस्टसाठी किती जागा भरणार – BECIL Recruitment 2024

Technical Assistant ENT 2
Junior Physiotherapist 3
MTS 145
DEO 100
PCM 10
EMT 3
Driver 2
MLT 8
PCC 7
Radiographer 32
Lab Attendant 3
Technologist 37
Research Assistant 2
Developer 1
Junior Hindi Translator 1
Assistant Dietician 8
Phelbotomist 8
Opthalmic Technician 5
Pharmacist 15
Network Administrator/ Network Support Engineer 1

पदानुसार काय असावी पात्रता –

Technical Assistant ENT – B.Sc
Junior Physiotherapist-12th, Degree
MTS- 10th
DEO- 12th
PCM- Degree
EMT- As Per Norms
Driver- 10th
MLT – Degree
PCC- Degree
Radiographer- B.Sc
Lab Attendant -12th
Technologist- B.Sc
Research Assistant- M.Sc
Developer- BE/ B.Tech, ME/ M.Tech, M.Sc, MCA
Junior Hindi Translator- Degree, Masters Degree
Assistant Dietician- M.Sc
Phelbotomist- Degree
Opthalmic Technician-B.Sc
Pharmacist- Diploma
Network Administrator/ Network Support Engineer – ME/ M.Tech, M.Sc

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://becilregistration.in/ या वेबसाईटला भेट द्या
अधिकृत जाहिरात – पहा PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

अपक्ष का जिंकतोय आम्हाला माहितेय, आम्ही गोट्या खेळत नाही; राऊतांचा नाव न घेता कोणाला इशारा?

SANJAY RAUT ON SANGLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ५४३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर काल अनेक वृत्तवाहिनीनी एक्झिट पोल सादर केले. देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचचा बोलबाला राहील आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय ते आम्हाला माहित आहे. आम्ही काय गोट्या खेळात नाही असं संजय राऊतांनी म्हंटल.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी एक्झिट पोलबाबत भाष्य केलं. राऊत म्हणाले, मला माहितेय महाराष्ट्रात काय होणार आहे? पश्चिम महाराष्ट्रात काय होतंय? कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय ते आम्हाला माहित आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला माहितेय. आम्ही काय गोट्या खेळत नाही. आमचं आयुष्य सुद्धा राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेत गेलंय. मी यावर नंतर बोलणारच आहे असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षरीत्या विशाल पाटलांना आणि काँग्रेसला इशारा दिला आहे.

सांगलीत नेमकं काय घडलं?

सांगली हि तस बघितली तर काँग्रेसची हक्काची जागा…. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल करून महाविकास आघाडीलाच आव्हान दिले. एवढच नव्हे तर मी काँग्रेसचाच आहे असेही ते वारंवार सांगत होते. विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे सांगलीत संजय पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली. विशाल पाटलांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा हात आहे अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. त्यातच काल एक्झिट पोलमध्ये सांगलीत विशाल पाटील आघाडीवर राहिल्याने या चर्चाना आणखी बळ मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला.

मोदी पंतप्रधान झाल्यास मी मुंडन करेन; बड्या नेत्याची भीष्मप्रतिज्ञा

narendra modi sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जूनला निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी काल अनेक वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर करत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं एकूण चित्र दिसत आहे. मात्र तत्पूर्वी आप नेते सोमनाथ भारती (Somnath Bharti) यांनी एक मोठं विधान केलं आहे. जर मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन असं त्यांनी म्हंटल आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

काय आहे सोमनाथ भारती यांचे ट्विट??

माझे शब्द लिहून ठेवा, जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन. ४ जून रोजी सर्व एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील आणि मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत. दिल्लीत सातही जागा INDIA आघाडीकडे जाणार आहेत. मोदींच्या भीतीमुळे एक्झिट पोल त्यांना सैल दाखवू देत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी 4 जून रोजी होणाऱ्या निकालांची प्रतीक्षा करावी लागेल. लोकांनी प्रचंड विरोधात मतदान केले आहे असं ट्विट सोमनाथ भारती यांनी केलं.

दरम्यान, सोमनाथ भारती नवी दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांच्याविरोधात त्यांचा सामना आहे. यंदा आम आदमी पार्टीने दिल्लीतील चार जागांवर निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसने तीन जागांवर उमेदवार उभे केले होते. पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या जागांवर ‘आप’ने निवडणूक लढवली. तर काँग्रेस चांदणी चौक, उत्तर पश्चिम दिल्ली आणि ईशान्य दिल्लीत निवडणूक लढवत आहे.

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हॅलो महाराष्ट्राचा Exit Poll पहाच

Exit Poll Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान पार पडलं असून आता ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे. देशात इंडिया आघाडी विरुद्व NDA असा सामना असताना महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार यांच्याकडे आधीपासूनच जनतेची सहानभूती होती तर दुसरीकडे भाजपकडे मोदींचा विकास, शिंदे- अजितदादा जोडगोळी याची साथ होती. एकूण सर्व ठिकाणी मतदान झाल्यानंतर हॅलो महाराष्ट्रने आपला Exit Poll समोर आणला आहे. हॅलो महाराष्ट्राच्या Exit Poll नुसार, राज्यात पवार- ठाकरेंचाच बोलबाला राहणार आहे नक्की आहे. तर शिंदे आणि अजितदादांच्या दांड्या गुल होताना दिसत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार बाजी मारेल. (Exit Poll Maharashtra)

पहिला टप्पा…

1) रामटेक – काँग्रेस – श्यामकुमार बर्वे

2) नागपूर – भाजपा – नितीन गडकरी (विद्यमान खासदार)

3) भंडारा-गोंदिया – भाजपा – सुनील मेंढे (विद्यमान खासदार)

4) चंद्रपूर – काँग्रेस – प्रतिभा धानोरकर

5) गडचिरोली-चिमूर (एसटीसाठी राखीव)- काँग्रेस – नामदेव किरसान

दुसरा टप्पा

6) बुलढाणा – शिवसेना (ठाकरे गट)- नरेंद्र खेडेकर

7) अमरावती – काँग्रेस – बळवंत वानखेडे

8) अकोला – वंचित बहुजन आघाडी- प्रकाश आंबेडकर

9) हिंगोली – शिवसेना (ठाकरे गट) – नागेश आष्टीकर

10) परभणी – शिवसेना (ठाकरे गट) – संजय जाधव (विद्यमान खासदार)

11) वर्धा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – अमर काळे

12) नांदेड – भाजपा – प्रतापराव चिखलीकर (विद्यमान खासदार)

13) यवतमाळ वाशीम – शिवसेना (ठाकरे गट)- संजय देशमुख

तिसरा टप्पा

14) रायगड- शिवसेना (ठाकरे गट) – अनंत गीते

15) बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – सुप्रिया सुळे

16) धाराशिव- शिवसेना (ठाकरे गट) – ओमराजे निंबाळकर (विद्यमान खासदार)

17) लातूर – काँग्रेस – शिवाजी काळगे

18) सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – शशिकांत शिंदे

19) माढा -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – धैर्यशील मोहिते पाटील

20) सोलापूर -काँग्रेस – प्रणिती शिंदे

21) सांगली – अपक्ष – विशाल पाटील

22) हातकणंगले- शिवसेना (ठाकरे गट) – सत्यजित पाटील सरुडकर

23) कोल्हापूर – काँग्रेस – शाहू महाराज छत्रपती

24) रत्नागिरी सिंधुदुर्ग – शिवसेना (ठाकरे गट) – विनायक राऊत (विद्यमान खासदार)

चौथा टप्पा

25) रावेर – भाजप – रक्षा खडसे (विद्यमान)

26) जळगाव – भाजप – स्मिता वाघ

27) संभाजीनगर – शिवसेना (ठाकरे गट) – चंद्रकांत खैरे

28) जालना – भाजपा – रावसाहेब दानवे (विद्यमान)

29) पुणे- भाजपा – मुरलीधर मोहोळ

30) मावळ – शिवसेना (शिंदे गट) – श्रीरंग बारणे (विद्यमान)

31) अहमदनगर – भाजपा – सुजय विखे (विद्यमान खासदार)

32) शिरूर- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – शिवाजीराव आढळराव पाटील

33) बीड – भाजप – पंकजा मुंडे

34) शिर्डी – शिवसेना (शिंदे गट) – सदाशिव लोखंडे (विद्यमान खासदार)

35) नंदुरबार -काँग्रेस – गोवाल पडवी

पाचवा टप्पा

36) धुळे – भाजपा – सुभाष भामरे

37) पालघर – बिव्हीए – राजेश पाटील

38) नाशिक – शिवसेना (ठाकरे गट)- राजाभाऊ वाजे

39) दिंडोरी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – भास्कर भगरे

40) मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस – वर्षा गायकवाड

41) कल्याण – शिवसेना (शिंदे गट) – श्रीकांत शिंदे (विद्यमान खासदार)

42) ठाणे – शिवसेना (ठाकरे गट) – राजन विचारे (विद्यमान खासदार)

43) मुंबई दक्षिण शिवसेना- (ठाकरे गट) – अरविंद सावंत (विद्यमान खासदार)

44) मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना (ठाकरे गट) – अमोल किर्तीकर

45) मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य)- शिवसेना (ठाकरे गट) – संजय दीना पाटील

46) भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – बाळ्या मामा म्हात्रे

47) मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना (शिंदे गट) – राहुल शेवाळे (विद्यमान खासदार)

48) मुंबई उत्तर- भाजपा – पीयूष गोयल

मतदान संपताच मोदींचे खास ट्विट; INDIA आघाडीवरही साधला निशाणा

narendra modi tweet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी काल रात्रीच सर्वच चॅनेलवर वेगवेगळे एक्झिट पोल पाहायला मिळाले. जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपप्रणीत NDA ला बहुमत मिळताना दिसत आहे. त्याच दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi Tweet) यांनी सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट करत देशवासीयांचे आभार मानले तसेच विरोधी INDIA आघाडीवरही निशाणा साधला आहे.

काय आहे मोदींचे ट्विट –

या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. संपूर्ण निवडणूक सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या सुरक्षा व्यवस्था संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्ष होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे लोकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

INDIA आघाडीवरही निशाणा-

यावेळी मोदींनी INDIA आघाडीवरही निशाणा साधला. इंडिया आघाडी ही जातीवादी, भ्रष्ट आहे. घराणेशाहीला पोसण्यासाठी इंडिया आघाडी करणायात आली. इंडिया आघाडीला नेत्यांना आकर्षित करता आले नाही.इंडिया आघाडी भविष्यातील दृष्टीकोन सांगण्यात अपयशी ठरले. इंडिया आघाडीने संपर्ण प्रचारात मोदी यांना लक्ष केले. पण जनतेने त्यांच्या प्रतिगामी राजकारणाला नाकारले आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Viral Video : नजर हटी, दुर्घटना घटी!! बाईकस्वाराला पाहता पाहता स्कुटीवरून पडल्या तरुणी; पापा की परी ट्रोल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या आशयाचे व्हिडीओ पहायला मिळतात. कधी हसवणारे, कधी रडवणारे, कधी प्रेरणा देणारे तर कधी डोकं फिरवणारे हे व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये येत असतात. दररोज हजारो लाखो लोक असे व्हिडीओ बनवून निव्वळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये काही व्हिडीओ अपघाताचे देखील असतात. तर काही व्हिडीओ ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ या वाक्याला तंतोतंत जुळतील असे असतात आणि असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर दुचाकीवरून पडणाऱ्या चालकांचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हेल्मेटशिवाय गाडी चालवणे धोक्याचे आहे हे वारंवार सांगूनसुद्धा लोक काही ऐकत नाहीत. (Viral Video) यामुळे अत्यंत भीषण स्वरूपाचे अपघात होताना दिसतात. तरुण मंडळी तर केवळ स्टाईल मारण्यासाठी हेल्मेटशिवाय गाडी चालवतात. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या आणखी एक स्टाईल मारत गाडी चालवणाऱ्या तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या हेल्मेटविना गाडी चालवत होत्या. इतक्यात बाजूने जाणाऱ्या बाईकस्वाराला पहायच्या नादात त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्याचा हा व्हिडीओ आहे.

पहा व्हिडीओ (Viral Video)

आपल्यालाही हटके करायचंय म्हणून मुलीसुद्धा आजकाल विचित्र पद्धतीने गाड्या चालवताना दिसतात. कायतरी वेगळं करताना अनेकदा त्यांच्याकडून काहीतरी गडबड होते आणि मग काय मुलं ‘पापा की परी.. घरीच बरी’ चिडवायला मोकळे होतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून मुलांना पुन्हा एकदा जोर आलाय. (Viral Video) या व्हिडीओमध्ये दिसतंय, २ मुली स्कूटीवर आहेत. एक स्कुटी चालवतोय तर दुसरी तिच्यामागे फुटरेस्टवर उभी आहे. इतक्यात त्यांच्या बाजूने एक बाईकस्वार येतो आणि तो तरुण या दोघींना हात दाखवतो. त्या दोघीही तरुणाला हात दाखवतात आणि या नादात त्यांचा तोल जाऊन दोघीही पडतात.

या घटनेत एका तरुणीच्या हाताला खर्चटतं तर दुसरीला काही फारसं लागलेलं नाही असं दिसून येतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. (Viral Video) या व्हिडीओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून दोन्ही तरुणींना चांगलेच ट्रोल केले जात आहे. अनेक नेटिझन्स त्यांच्यावर हसत आहेत.

Mahila Samman Savings Scheme : महिलांना ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मिळते भरगोस व्याज; पहा कसा मिळतो लाभ?

Mahila Samman Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahila Samman Savings Scheme) आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी केंद्र सरकार कायम विविध योजना राबवत असते. प्रत्येकवेळी अर्थ संकल्पात महिलांना लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ‘महिला बचत सन्मान योजना’ असे आहे. ही योजना पोस्ट ऑफिस आणि काही सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीनंतर कमी कालावधीत चांगला परतावा मिळतो. चला तर या योजनेविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊया.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Scheme)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. जी केवळ महिलांसाठी काम करते. या योजनेत कोणतीही महिला २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर दिला जाणारा व्याजदर हा चक्रवाढ आधारावर दिला जातो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना कमीत कमी कालावधीत अधिक परतावा मिळवणे शक्य होते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची खासियत म्हणजे, यामध्ये तुम्हाला कोणताही धोका पत्करावा लागत नाही.

किती रक्कम जमा करता येते?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही सरकारी योजना महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी राबविली जाते. (Mahila Samman Savings Scheme) या योजनेअंतर्गत खाते उघडणारी महिला कमीत कमी १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपये इतकी रक्कम जमा करू शकते. तसेच या योजनेअंतर्गत एखाद्या महिलेस दुसरे खाते उघडायचे असेल तर ते खाते ३ महिन्यांच्या अंतराने उघडता येते.

किती व्याजदर मिळतो?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिला ग्राहकांना वार्षिक ७.५० टक्के व्याजदर दिला जातो. लक्षात घ्या, हे व्याज ३ महिन्यांच्या आधारावर जमा केले जाते. कारण ही योजना अवघ्या २ वर्षात परिपक्व होते आणि त्यामुळे ठेवीच्या तारखेपासून १ वर्षानंतर, उर्वरित रकमेपैकी जास्तीत जास्त ४०% रक्कम काढता येते. (Mahila Samman Savings Scheme)

कमी कालावधीत अधिक परतावा

समजा तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करताना जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले तर, तुम्हाला ७.५० टक्के दराने एकूण ३२,०४४ रुपये इतके व्याज मिळेल. (Mahila Samman Savings Scheme) आता नीट पाहिले असता तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह केवळ २ वर्षांत या योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्हाला २,३२,०४४ रुपये इतका परतावा मिळेल.

परीक्वतेच्या आधी पैसे काढता येतात?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या परिपक्वतेचा कालावधी हा एकूण २ वर्षांचा आहे. परंतु एखाद्यावेळी तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर अचानक पैशांची गरज भासली तर अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळते. अगदी १ वर्षानंतरही तुम्ही योजनेच्या खात्यातून पैसे काढू शकता. (Mahila Samman Savings Scheme) मात्र, कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला ७.५० टक्क्यांऐवजी केवळ ५.५०% दराने व्याज दिले जाईल.

FD Interest Rate : ‘या’ बँकांनी बदलले FD वरील व्याजदर; पहा किती दिवसांच्या ठेवीवर किती परतावा मिळणार?

FD Interest Rate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (FD Interest Rate) आजच्या काळात नुसता पैसा कमावून उपयोग नाही. तर कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवता आला पाहिजे. तरच पैसा कमावल्याचे समाधान राहील. गुंतवणूक ही काळाची गरज आहे हे काही नव्याने सांगायला नको. आज प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व लक्षात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. यात अनेक गुंतवणूकदार मुदत ठेवीमध्ये गुंतवताना दिसत आहेत. जर तुम्हीही यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्वाची आहे.

कारण, अनेक बँकांनी मे महिन्यात FD वरील व्याजदर सुधारले आहेत. (FD Interest Rate) यानुसार काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केल्याचे समोर आले आहे. या यादीमध्ये मोठमोठ्या बँकांच्या नावाचा समावेश आहे. एसबीआय (SBI), डिसीबी (DCB) बँक आणि आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँकेने नुकतेच एफडीवरील व्याजदर बदलले आहेत. चला तर या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेऊ आणि त्याचा फायदा कसा होईल? हे देखील जाणून घेऊ.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI बँक)

माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ ठराविक कालावधीसाठी FD वरील व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवे सुधारित दर १५ मे २०२४ पासून लागू करण्यात आले आहेत.
यानुसार, १८० ते २१० दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर २५ बेस पॉईंट्सने ६% इतका वाढवण्यात आला आहे. याआधी ५.७५% इतका व्याजदर दिला जात होता. (FD Interest Rate)
तसेच २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी व्याजदर ६% होता. तोच आता ६.२५% इतका करण्यात आला आहे.
शिवाय १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी ६.८% इतका व्याजदर लागू करण्यात आला आहे.
तर २ वर्षांपेक्षा जास्त आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FDवर ७% इतका व्याजदार दिला जात आहे.

DCB बँक (FD Interest Rate)

माहितीनुसार, व्याजदर बदलणाऱ्या बँकांच्या यादीत DCB बँकेच्या नावाचा देखील समावेश आहे. या बँकेने २२ मे २०२४ पासून नवे सुधारित दर लागू केले आहेत.
दरम्यान, DCB बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर सुधारित केल्याचे समजत आहे.
सध्या ही बँक १९ महिने ते २० महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. सर्वसामान्यांना ८.०५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५५% व्याजदर प्रदान केला जात आहे.

IDFC फर्स्ट बँक

आईडीएफसी फर्स्ट बँकेनेसुद्धा नवे सुधारित दर लागू केले आहेत. माहितीनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी हे दर लागू करण्यात आले आहेत. दैनिक १५ मे २०२४ पासून हे नवे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत.
सध्या IDFC फर्स्ट बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीतील FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना ३% ते ७.९% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अतिरिक्त दिला जात आहे. (FD Interest Rate)
तसेच ५०० दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध असून सामान्य ग्राहकांना ७.९% व्याजदर दिला जातोय. तर ज्येष्ठ नागरिकांना ८.४% व्याजदर मिळत आहे.

अरविंद केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार; जमिनाबाबत कोर्टाकडून दिलासा नाहीच

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना 2 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृतीचा आणि वैद्यकीय चाचणीचा दाखला देत अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची विनंती केली होती. याचं याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र या सुनावणी दरम्यान कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही.

महत्वाचे म्हणजे, आजच्या सुनावणीमध्ये केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. या सुनावणीवेळी ईडीने आरोप लावला की, अरविंद केजरीवाल आरोग्याबाबत खोटी विधाने करत आहेत. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने अंतरिम जामिनावरील निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळेच केजरीवाल यांना 2 जून रोजी शरण जावे लागणार आहे.

दरम्यान, मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने 21 मार्चला अटक केली होती. या अटकेनंतर केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. पुढे निवडणुकीच्या काळात कोर्टाने प्रचारासाठी केजरीवाल यांची 21 दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. याचं जामिनाची मुदत 2 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा शरण जावे लागणार आहे.