Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 716

SBI FD | SBI च्या ‘या’ FD योजनेच्या व्याजदरात झाली वाढ; आजच घ्या लाभ

SBI FD

SBI FD | तुम्ही जर SBI बँकेचे ग्राहक असाल किंवा SBI बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता बँकेने त्यांच्या FD वरील व्याजदर वाढवलेले आहे. त्यामुळे आता किरकोळ गुंतवणुकीवर किंवा मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीवर देखील गुंतवणूकदारांना सुधारित व्याजाचा फायदा होणार आहे. हे व्याज वाढल्यानंतर ही योजना कमी कालावधीत गुंतवणूकदारांना चांगले व्याज देणार आहे. बँकेने या FD चे व्याजदर हे 15 मे 2024 पासून लागू केली आहे

SBI बँक (SBI FD) ही गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. गुंतवणूकदारांना अधिक लाभ मिळावा. यासाठी ही बँक नवनवीन योजना आणत असते. आणि आता SBI ने त्यांच्या स्पेशल FD वर व्याजदर वाढवलेला आहे. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांना नक्कीच याचा फायदा होणार आहे.

व्याज किती वाढले? | SBI FD

SBI ने यांचा FD योजनेअंतर्गत या व्याजामध्ये 75 BPS ने वाढ केलेली आहे. म्हणजेच ही बँक दोन वर्षाच्या कालावधीसाठी 7.4% दराने व्याज देत आहे, तर एका वर्षाच्या कालावधीसाठी 7.10% दराने व्याज देत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना किती नफा मिळेल?

SBI च्या या सर्वोत्तम मुदत ठेव योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षाच्या कालावधीनंतर 7.9% व्याज मिळणार आहे, तर एक वर्षाच्या कालावधी नंतर 7.6% व्याज मिळणार आहे.

या योजनेमध्ये जर तुम्ही दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली, तर या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 7.30% व्याज मिळेल तर 2 वर्षाच्या कालावधीसाठी 7.40 टक्के व्याज मिळेल. जेष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत 7.80 टक्के व्याजदर मिळेल, तर 2 वर्षाच्या कालावधीसाठी 7.90% व्याजदर मिळणार आहे.

Kondeshwar Temple : विदर्भातील जागृत शिवमंदिर; जिथे शतकांपासून तपश्चर्या करतोय नंदी

Kondeshwar Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kondeshwar Temple) संपूर्ण जगभरात अनेक प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराची काही ना काही वैशिट्य आहेत. यांपैकी बरीच खास, अद्भुत आणि अलौकिक मंदिरे महाराष्ट्रात पहायला मिळतात. अशाच एक अद्भुत मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते मंदिर म्हणजे, विदर्भातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कोंडेश्वर. हे मंदिर सुमारे ५००० हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे, सांगितले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात महादेवासमोर नंदी गेली अनेक शतके तपश्चर्या करताना दिसतोय. चला या मंदिराविषयी अधिक माहिती घेऊया.

कोंडेश्वर मंदिराचा इतिहास (Kondeshwar Temple)

अमरावती शहरापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या मध्यात श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर उभारलेले आहे. अनेक राज्यसत्तांच्या काळात श्रीक्षेत्र कोंडेश्वराचा उत्कर्ष झाला. वाकाटक आणि गुप्तकाळात या मंदिराची प्रतिष्ठा वाढली. प्राचीन काळी या ठिकाणी काशी, प्रयागराज, ओमकारेश्वर आणि अन्य स्थानावरून ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, साधुसंत, भाविक आणि शिवभक्त येत असत. रामदेवराव यादव आणि कृष्णदेवराव यादव या घराण्यातील राज्य सत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमांद्रीपंत यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. त्यापैकी एक म्हणजे श्री क्षेत्र कोंडेश्वर. या मूळ मंदिराला लावलेले शिलाखंड व त्यावरील कोरीव काम पाहता हे मंदिर सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी बांधले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे

कोंडेश्वर मंदिराचे बांधकाम

श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर हे काळ्याभोर पाषाणाचे चिरे एकावर एक रचून बांधण्यात आलेले अत्यंत सुंदर असे शिव मंदिर आहे. हेमाडपंथी स्वरूपात उभारण्यात आलेल्या या मंदिराची उंची पूर्वी १२ फूट इतकीच होती. मात्र, पुढील काही वर्षात या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी पूर्वी असणाऱ्या काळा पाषाणच वापरून या मंदिराची उंची ७५ फूट इतकी करण्यात आली. या मंदिराच्या बाहेर बसविलेल्या दगडी चिऱ्यांच्या पायथ्याशी हत्ती कोरलेले आहेत. (Kondeshwar Temple) या हत्तींच्या दोन शरीरांना एक मुख तर काही ठिकाणी दोन मुखांना एका हत्तीचा देह दिसून येतो. विशेष म्हणजे, एका बाजूने हे हाती मोजल्यास जितकी संख्या होते तितकी संख्या दुसऱ्या बाजूने मोजल्यास होत नाही. यामुळे कोरलेल्या हत्तींची निश्चित संख्या किती आहे? हे सांगणे कठीण.

विदर्भातील जागृत देवस्थान

श्री क्षेत्र कोंडेश्वर हे विदर्भातील अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. आजपर्यंत अनेक भाविकांनी कोंडेश्वराचा गाभारा जलामृताने भरण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच काय तर, कोंडेश्वरावर पाण्याची सतत धार सुरू असते. तरीसुद्धा, कोंडेश्वराचे लिंग पूर्णपणे पाण्यात कधीच बुडत नाही. (Kondeshwar Temple) मंदिरातील पाणी बाहेर जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊनही हजारो लिटर पाणी नेमके कुठे जाते वा मुरते? याचा आजवर शोध लागलेला नाही. या गाभाऱ्यात एकूण बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांचीदेखील स्थापना करण्यात आली असून, हे देवस्थान जागृर आहे अशी मान्यता आहे.

तपश्चर्या करणारा नंदी

श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिराची एक खासियत सांगायची म्हणजे इतर शिव मंदिरांप्रमाणे या मंदिरातही नंदीची मूर्ती आहे. कोंडेश्वराच्या गाभाऱ्याकडे जाताना एक भला मोठा नंदी गाभाऱ्याच्या खाली उतरणाऱ्या द्वारासमोर बैठक मांडून बसलेला दिसतो. (Kondeshwar Temple) या नंदीला अग्र पूजेचा मान असून त्याची बैठक नीट पाहिल्यास तो तपश्चर्या करीत असल्याचा भास होतो. त्यामुळे असे म्हटले जाते की, या शिवमंदिरात नंदी गेल्या अनेक शतकांपासून तपश्चर्येत लीन आहे.

Pension Schemes : निवृत्तीनंतरही जगा बिनधास्त!! ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवल्यास मिळेल दरमहा पेन्शनचा लाभ

Pension Schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pension Schemes) सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच लोकांना आर्थिक भविष्याची चिंता सतावत राहते. त्यामुळे सेवा निवृत्त होऊनही त्यांच्या आयुष्यात शांतता राहत नाही. कारण ऑफिसला जाणे जरी थांबले असले तरी रोजचे आर्थिक व्यवहार संपणार नाहीत याची प्रत्येकाला माहिती असते. त्यामुळे रोजचा दिवस आणि रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा याचे टेन्शन राहते. असे टेन्शन नको असेल तर ही बातमी पूर्ण वाचा. कारण आज आम्ही तुम्हाला काही सरकारी आणि खाजगी योजनांविषयी माहिती देणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळू शकतो. चला तर या योजनांविषयी माहिती घेऊया.

1. मुदत ठेव (FD)

विविध बँका तसेच पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या आणि विशिष्ट कालावधीसाठी मुदत ठेव सुविधा प्रदान करतात. ही FD ची सुविधा मासिक, त्रैमासिक, वर्षातून दोनदा किंवा वार्षिक स्वरूपात असू शकते. (Pension Schemes) यात जमा केलेल्या रकमेवर आधारावर व्याज प्रदान केले जाते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा ०.२५% जास्त व्याजदर दिले जाते.

2. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

पोस्टाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक योजना सादर केल्या जातात. त्यापैकी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही वार्षिक ८.२०% व्याज दर देणारी योजना आहे. जी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. (Pension Schemes) यामध्ये किमान गुंतवणुकीची रक्कम ही १ हजार रुपये असून यात जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करता येतात. यामध्ये ही रक्कम एकाच वेळी जमा केली जाते. जी ५ वर्षांच्या कालावधीत मासिक उत्पन्न व्याजाच्या स्वरूपात मिळते. मुख्य बाब अशी की, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर १.५ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाते.

3. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS)

पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजनादेखील अत्यंत लाभदायी आहे. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. या योजनेत जमा केलेली रक्कम तुम्हाला थेट ५ वर्षांनी मिळते. ही योजना दरवर्षी ७.४% व्याज देते. (Pension Schemes) यामध्ये एका व्यक्तीसाठी जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि जोडप्यासाठी १५ लाख रुपये गुंतवता येतात. ज्यातून एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५,५५० रुपये तर जोडप्याला जास्तीत जास्त ९२५० रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.

4. म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP)

म्युच्युअल फंड सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन हीदेखील मासिक उत्पन्न योजना आहे. (Pension Schemes) गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात एकत्र गुंतवणूक करून या फंडच्या माध्यमातून निश्चित स्वरूपातील मासिक पेन्शन मिळवू शकतो.

5. अटल पेन्शन योजना (Pension Schemes)

अटल पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे. जी खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर अवलंबून असणाऱ्या ६० वर्षांच्या वयानंतर १ हजार ते ५ हजार रुपये मासिक पेन्शन उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वयवर्षे गटातील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.

Birth Certificate | तुमचाही जन्म 2000 पूर्वी झाला असेल, तर ‘या’ तारखेपर्यंत काढा जन्म प्रमाणपत्र; सरकारने केली अधिसूचना जारी

Birth Certificate

जन्माचा दाखला हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा कागदपत्र आहे. जन्मानंतर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे कागदपत्र हा आपला जन्म दाखला असतो. अनेक सरकारी काम किंवा इतर कामांमध्ये देखील जन्माचा दाखला खूप आवश्यक मानला जातो. त्यामुळे लहान मुलाचा जन्मानंतर लवकरात लवकर हा दाखला बनवून घ्यावा. नाहीतर जन्म प्रमाणपत्र नाही, या कारणाने अनेक समस्या उद्भवू शकतात. जन्माचा दाखला मिळवण्यासाठी पालकांना अनेक आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानंतरच आता जन्माचा दाखला मिळतो. परंतु तमिळनाडू सरकारने जन्म प्रमाणपत्राच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.

तमिळनाडूमधील टेंकासी जानेवारी 2019 जन्मलेल्या लोकांसाठी जन्म प्रमाणपत्र बनवण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. आता 2000 पूर्वी जन्मलेल्या लोकांच्या जन्म प्रमाणपत्र हे डिसेंबर 2024 पर्यंत बनवता येणार आहे. त्यानंतर बनवता येणार नाही. अशी माहिती जिल्हाधिकारी कमल किशोर यांनी दिलेली आहे. जन्म नोंदणी कोणत्याही व्यक्तीसाठी ओळखपत्र म्हणून काम करते. जनगणनेत देखील याची खूप गरज असते.

जन्म प्रमाणपत्र डिसेंबर 2024 पर्यंत बनवता येईल | Birth Certificate

टेंकासीचे जिल्हा अधिकारी कमल किशोर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 1 जानेवारी 2000 पूर्वी जन्मलेल्या आणि 15 जानेवारी 2000 नंतर जन्मलेल्या मुलांसाठी जन्म प्रमाणपत्र मिळविण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही तुमचे जन्म प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2024 पर्यंत मिळवू शकता. नियमांनुसार, मुलाच्या जन्मानंतर 21 दिवसांच्या आत जन्म प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. जर एखाद्या मुलाच्या जन्माची नोंदणी नावाशिवाय झाली असेल, तर पालक मुलाच्या जन्माच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत लेखी प्रतिज्ञापत्र देऊन मुलाची नोंदणी करून घेऊ शकतात. यासाठी पैसे देण्याची गरज नाही.

जन्मानंतर 15 वर्षांनी नोंदणी करता येत नाही | Birth Certificate

12 महिन्यांनंतर 200 रुपये विलंब शुल्क भरून 15 वर्षांच्या आत नाव नोंदणी करता येते. मात्र, 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे नाव नोंदवता येणार नाही. ज्यांनी अजूनही आपल्या मुलांचे जन्म दाखले घेतलेले नाहीत. ते या संधीचा लाभ घेऊ शकतात, असे जिल्हा अधिकारी कमल किशोर यांनी सांगितले.

Mumbai Mega Block Update : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक, काय आहे बॅकअपची व्यवस्था ?

mumbai megablock 63

Mumbai Mega Block Update : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स बद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे (Mumbai Mega Block Update) जावे लागणार आहे.

930 लोकल सेवा रद्द केल्यामुळे लोक रस्त्याने सीएसएमटी गाठण्याचा प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणारे अनेक प्रवासी त्यांची वैयक्तिक वाहने, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करतील. त्याचबरोबर 63 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Mega Block Update) लक्षात घेता बेस्ट, एसटी, टीएमटीने सुमारे 350 जादा बसफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ब्लॉकचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

CSMT ला पोहचण्याचे पर्याय ? (Mumbai Mega Block Update)

ब्लॉक दरम्यान कर्जत किंवा कसारा येथून येणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकात उतरून पश्चिम रेल्वेने सीएसएमटी गाठता येईल. पनवेल दिशेकडून येणाऱ्या प्रवाशांना वडाळा स्थानकात उतरून रस्त्याने सीएमएसटी गाठण्याचा पर्याय असेल. विरार, डहाणू येथून येणारे प्रवासी चर्चगेट स्थानकात उतरून रस्त्याने सीएसएमटीला पोहोचू शकतात.

कसा असेल ब्लॉक ? (Mumbai Mega Block Update)

ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 च्या रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक 30 मे रोजी सकाळी 12.30 वाजता सुरू होईल. हा ब्लॉक 2 जून रोजी दुपारी 15.30 वाजेपर्यंत असेल. तर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारासाठी 31 मेच्या रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 31 मे रोजी सकाळी 12.30 ते 2 जून रोजी दुपारी 12.30 वाजेपर्यंत 36 तासांचा ब्लॉक असेल.

धावणार बेस्ट आणि एसटीच्या जादा बसेस

लोकल सेवा रद्द करताना प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी बेस्ट आणि एसटीने उचलली आहे. बेस्ट आणि एसटीने ब्लॉकदरम्यान 305 अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टने (Mumbai Mega Block Update) जास्तीत जास्त 254 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली असून एसटीने 50 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Investment Strategy : Value Investment की Growth Investment? लॉंगटर्म इन्व्हेस्टर्ससाठी कोणती Strategy ठरेल बेस्ट?

Investment Strategy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Strategy) शेअर बाजारात कायम चढ उतार होत असतो. त्यामुळे कधी भरपूर फायदा तर कधी तोटा सहन करावा लागतो. एकंदरच काय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगल्या किंवा वाईट बातम्यांवर लक्ष ठेवावे लागते. बरेच लोक लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्यात इंटरेस्टेड असतात. अशावेळी भविष्यातील संभाव्य नफ्यासाठी नेमकी कोणती रणनीती वापरावी याचे योग्य ज्ञान असायला हवे. तर नुकसान होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला व्हॅल्यू इन्वेस्टींग आणि ग्रोथ इन्वेस्टींग या दोन महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती देणार आहोत. ज्याच्या सहाय्याने लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स कोणत्याही चिंतेशिवाय गुंतवणूक करण्यासाठी योग्य पर्याय निवडू शकतील.

‘या’ आर्थिक बाबी लक्षात घ्या (Investment Strategy)

किंमत ते कमाई (P/E गुणोत्तर) – P/E गुणोत्तर हे कोणत्याही कंपनीच्या मूळ कमाईची सापेक्ष बाजारातील किंमत निर्धारित करते. कंपनीच्या बाजारभावाला तिच्या प्रति शेअर कमाईने भागून हे गुणोत्तर मिळते. ज्यातून शेअरची किंमत वाजवी आहे, कमी आहे की जास्त आहे हे सांगितले जाते.

किंमत ते बुक (P/B गुणोत्तर) – P/B गुणोत्तर हे कंपनीच्या शेअरची जितकी किंमत आहे त्याच्या मालमत्तेच्या मूल्याशी तुलना करते. (Investment Strategy) त्यामुळे जर कंपनीच्या शेअर्सची किंमत त्याच्या मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षा कमी असेल, तर शेअर अंडर रेटेड केलेला आहे असे मानले जाते.

फ्री कॅश फ्लो (FCF) – FCF हे एक मेट्रिक आहे. ज्यामध्ये कंपनीच्या ऑपरेशन्समधून येणारी रोख रक्कम आणि ऑपरेटिंग खर्च तसेच भांडवली खर्च यांचा समावेश आहे.

ग्रोथ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?

ग्रोथ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे वाढवून देणारी गुंतवणूक. सामान्यतः, गुंतवणूकदार त्यांचे पैसे ग्रोथ स्टॉकमध्ये ठेवतात. यातून त्यांच्या उद्योगातील इतर कंपन्यांची किंवा संपूर्ण बाजाराच्या तुलनेत सरासरीपेक्षा जास्त कमाई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नावाप्रमाणे ग्रोथ करून देते. (Investment Strategy) वाढत्या स्टॉक्सच्या बाबतीत, P/E गुणोत्तर प्रमाण साधारणपणे सरासरीपेक्षा जास्त असते. तसेच, कंपनीच्या EV/EBITDA चे विश्लेषण करणे आवश्यक असते आणि तसे केल्यास समजते की, हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.

व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट की ग्रोथ इन्व्हेस्टमेंट?

बिगुलचे सीईओ अतुल पारख याचे म्हणणे आहे की, ‘आजच्या बाजारातील गतिशीलता लक्षात घ्या. असे केल्यास तुम्हाला समजेल की, मूल्य गुंतवणूक अर्थात व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट सर्व बाजूने अधिक अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. या गुंतवणुकीत मजबूत मूलभूत घटक कमी किमतीच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करतात. (Investment Strategy) त्यामुळे सुरक्षित मार्जिन मिळू शकते. त्यामुळे व्हॅल्यू आणि ग्रोथमध्ये एक निवड करायची असेल तर व्हॅल्यू म्हणजेच मूल्य गुंतवणूक फायदेशीर आहे.

MPSC Exam Update | कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! MPSC ने नागरी सेवा परीक्षेची तारीख ढकलली पुढे

MPSC Exam Update

MPSC Exam Update | MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य पत्रिका नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची नवी तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे कुणबी नोंदीच्या आधारे ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या उमेदवारांना आता इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज करण्याची संधी देखील दिलेली आहे. याबाबतची माहिती अधिकृत वेबसाईटवर देखील जारी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा 21 जुलै 2024 रोजी आयोजित केलेली.

अर्ज कधी सादर करायचे ? | MPSC Exam Update

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 मे ते 7 जून
  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम निकाल तारीख – 7 जून
  • स्टेट बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी प्रत – 09 जून
  • चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 10 जून

रिक्त पदे

यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पहिल्यांदाच 274 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात राज्य विधिमंडळाचा एक विशेष अधिवेशन घेतले गेले. त्यावेळी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा देखील मंजूर केलेला होता. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले होते. आता याच आधारे लोकसेवा आयोगाने शुद्धपत्रक जारी करत मूळ जाहिरातीत बदल केलेला आहे. यामध्ये नव्याने 250 जागांचा समावेश देखील केलेला आहे. आता ही परीक्षा एकूण 524 जागांसाठी आयोजित करण्यात.

परीक्षा कधी होणार ? | MPSC Exam Update

डिसेंबर 2023 मध्ये जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार एमपीएससी पूर्व परीक्षा ही 28 एप्रिल रोजी होणार होती. परंतु आता नव्या शुद्ध पत्रकानुसार ही परीक्षा 21 जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या पदांसाठी 431 जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा अंतर्गत 48 जागांची भरती होणार आहे. तसेच सहाय्यक वनसंरक्षक गट अ 32 पदे तर वनक्षेत्रपाल गट ब साठी 16 पदे भरली जाणार आहेत.

Vande Bharat Express : पुण्याहून लवकरच सुरु होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन; पहा कसा असेल रूट?

pune vande bhart

Vande Bharat Express : संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयी करता रेल्वे कडूनही खास उपाययोजना केल्या जातात. रेल्वेचा प्रवास हा अधिक सुखकारक कमी वेळेत आणि आरामदायी व्हावा म्हणूनच रेल्वे कडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वंदे भारत ट्रेन. वंदे भारतला कमी वेळामध्ये खूप लोकप्रियता मिळाली आहे. आता पुण्याहून वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदची बातमी आहे. पुणे ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद ते पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्याच्या सूचना भारतीय रेल्वे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या वर्षाच्या शेवटीपर्यंत या गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.

प्रवासाचा कालावधी 2 तासांनी कमी (Vande Bharat Express)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे या वर्षाच्या अखेरीस वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे. जी गाडी राजधानी एक्सप्रेसच्या तोडीची असेल उल्लेखनीय म्हणजे, वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Express) देखील सिकंदराबाद-पुणे मार्गावरील जुन्या वर्कहॉर्स शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेण्याची शक्यता आहे. सध्या, शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद-पुणे मार्गावर धावते आणि दोन शहरांमधील प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 8 तास 30 मिनिटे लागतात. सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभव देण्यासोबतच या प्रवासाचा कालावधी किमान दोन तासांनी कमी करेल.

दरम्यान बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Express) ट्रेनच्या रोलआउटच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात रेल्वे अजूनही असल्याने, सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेनची वेळ आणि थांबा अद्याप ठरलेला नाही. सेवा सुरू होताच हे उघड होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सिकंदराबाद मार्गावरील वंदे भारत गाड्या (Vande Bharat Express)

सिकंदराबाद मार्गावर सध्या पाच वंदे भारत गाड्या धावतात; सिकंदराबाद – विशाखापट्टणम, सिकंदराबाद – तिरुपती, तिरुपती – सिकंदराबाद, काचेगुडा – यशवंतपूर (हैदराबाद – बेंगळुरू) आणि विजयवाडा – MGR चेन्नई सेंट्रल.

ASOs च्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी मोफत करण्यात यावी; UGC कडून निर्देश जारी

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरी असिस्टंट सेक्शन अधिकाऱ्यांकडून (ASOs) शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी काही शैक्षणिक संस्थांनी शुल्काची मागणी केली असल्याचे समोर आले होते. आता या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत यूजीसीचे काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. ज्यात “स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे घेतलेल्या संयुक्त ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेद्वारे (CGLE) भरती झालेल्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स (ASOs) च्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उच्च शिक्षण संस्थांनी (HEIs) शुल्क आकारू नये” असे सांगितले आहे.

यूजीसीने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, “शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या पुष्टीकरणासाठी शैक्षणिक पात्रतेची पडताळणी ही पूर्व – आवश्यकता आहे. उमेदवारांच्या प्रामाणिकपणाची खात्री करण्यासाठी हे सरकारच्या हितासाठी महत्वाचे आहे. त्यामुळेच खाजगी/मान्य विद्यापीठांसह प्रत्येक शैक्षणिक संस्थेने ही पडताळणी मोफत करावी”

त्याचबरोबर, “जेव्हाही कोणतेही मंत्रालय/विभाग अशी पडताळणी करण्यासाठी विनंती करते तेव्हा उच्च शिक्षण संस्थांना SSC मध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ASOs च्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्याची विनंती केली जाते,” असेही या परिपत्रकात म्हणले आहे. दरम्यान, यूजीसीने जारी केलेल्या या निर्देशांमुळे आता शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी अधिकाऱ्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही पडताळणी मोफत केली जाईल.

तुमचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक आहे का?? त्वरीत SMS द्वारे तपासा

PAN card linked to Aadhaar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच आयकर विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात येत्या 31 मे 2024 पूर्वी सर्व करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड (PAN Card) आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्यास सांगितले आहे. हे काम 31 मेपर्यंत पूर्ण न केल्यास करदात्यांना त्याचा फटका बसू शकतो. तसे पाहायला गेले तर, आजवर अनेकांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्याचा फटका बसला आहे. कारण, रोजच्या धावपळीत अशी शिल्लक कामे करणे बरेचजण विसरून जातात. म्हणूनच आम्ही सांगू इच्छितो की, तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही एसएमएसद्वारे तपासू शकता.

आयकर विभागाच्या सूचनानुसार, जे लोक अनिवासी आहेत किंवा ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यांना पॅन कार्ड लिंक करण्याचीही गरज नाही. मात्र, इतर करदात्यांना आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी पॅन आधारशी लिंक केलेले नाही अशा अनेकांचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. त्यामुळेच ही वेळ तुमच्यावर ही येऊ नये म्हणून सर्वात प्रथम पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करून घ्या. यासह एसएमएसद्वारे तपासा की आधारकार्ड पॅनशी लिंक आहे की नाही??

तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

1 – सर्वात प्रथम SMS मध्ये UIDPAN टाईप करा आणि त्यानंतर स्पेस द्या.

2 – पुढे 12 अंकी आधार क्रमांक लिहा.

3 – त्यानंतर 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.

4- तुम्हाला SMS UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन खाते क्रमांक> असा दिसेल.

5 : शेवटी SMS 567678 किंवा 56161 वर पाठवा.

6 – त्यानंतर थोडा वेळ थांबा. जर तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक असेल तर तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक झाल्याचा संदेश मिळेल.

आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा

1 – प्रथम तुमच्या मोबाइलवरून UIDPAN (स्पेस) 12 अंकी आधार क्रमांक (स्पेस) पॅन क्रमांक टाइप करा.

2 – तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.

3- तुम्हाला एक मेसेज मिळेल जो पॅनशी आधार लिंक केल्याची पुष्टी करेल.