Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 717

जमिनीच्या वादात 22 वर्षीय मुलीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षाच्या तरुणीला जमिनीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावातील काही लोकांनी या 22 वर्षे मुलीसोबत हे नृशंस कृत्य केले आहे. या घटनेवेळी जमावासोबत पोलीसही घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार कोंढवळे गावात घडला आहे. न्यायप्रविष्ट जमीनीचा ताबा घेण्यासाठी काही लोक पोलिसांसह संबंधित कुटुंबाकडे आले होते. यावेळी या जमावाला रोखण्याचा बावीस वर्षीय तरुणीने प्रयत्न केला. मात्र जमावाने जेसीबीच्या मदतीने तिच्या अंगावर माती टाकली. यानंतर तिला जमीनीत गाठण्याचा प्रयत्न केला गेला. याचवेळी कुटुंबाला तिचा आवाज ऐकू आला ज्यामुळे त्यांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. यानंतर बरेच प्रयत्न करून त्यांनी मुलीला बाहेर काढले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर संबंधित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी कमरेपर्यंत मातीत गाडली गेल्याची दिसत आहे. यानंतर तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंब प्रयत्न करताना दिसत आहेत. या सर्व घटनेप्रकरणी संबंधित मुलीच्या बहिणीने सांगितले आहे की, आम्ही शेतात काम करत असताना तेथे दहा ते बारा गुंडा आले होते. त्यांनी शेतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला आम्ही तीव्र विरोध दर्शवला. मात्र त्यांनी आम्हाला बाजूला सारले. तसेच बहिणीच्या संपूर्ण अंगावर माती टाकून दिली. ज्यामुळे ती मातीच्या ढिगार्याखाली दबली गेली. ही गोष्ट लक्षात येतात आम्ही तिच्या मदतीसाठी धावलो आणि तिला त्यातून बाहेर काढले.

दुबईहून भारतामध्ये किती सोने आणता येते?? यासाठी कोणता कर भरावा लागतो का?? जाणून घ्या

Dubai Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला भारतामध्ये सोन्या -चांदीच्या भावात (Gold Price Today) लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. यामुळे सोने खरेदी करणेच सर्वसामान्यांना परवडण्याचा बाहेर गेले आहे. भारतात सोन्या चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी दुबईमध्ये सोनं स्वस्त दरात खरेदी करता येत आहे. ज्यामुळे अनेकजण भारतात सोने खरेदी करण्याऐवजी दुबई मधूनच होणे खरेदी करत आहेत. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही दुबईमध्ये सोने (Dubai Gold) खरेदी केले तरी ते भारतात किती आणू शकतो. तसेच दुबई मधले सोने भारतात आल्यानंतर कोणती कारवाई केली जाऊ शकते का?? जाणून घ्या या प्रश्नाची उत्तरे

भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त

दुबईला सोन्याचे शहराचे म्हटले जाते. त्यामुळेच भारतातील अनेक लोक दुबईला भेट देण्यासाठी जातात आणि तेथून परत येताना सोन्याचे दागिने, सोन्याच्या वस्तू घेऊन येतात. कारण भारतापेक्षा दुबईमध्ये सोने अधिक स्वस्त मिळते हा विश्वास लोकांचा आहे. खरे तर, ही बाब सत्य आहे की दुबईमध्ये भारतापेक्षा स्वस्त दरात सोने मिळते. हे आयात शुल्कामुळे स्वस्त बसते. भारतात सोने आयात करण्यासाठी शुल्क भरावे लागते, परंतु दुबईला हे आयात शुल्क भरावे लागत नाही. त्यामुळे दुबईमध्ये सोने भारतापेक्षा स्वस्त मिळते.

या कारणामुळे जेव्हा जेव्हा कोणता नातेवाईक किंवा मित्र दुबईला जातो त्यावेळी भारतातील लोक त्या व्यक्तींना सोने आणण्यासाठी सांगतात. परंतु दुबईवरून सोने आणताना काही नियमही पाळावे लागतात. सध्याच्या घडीला पाहिला गेलो तर दुबईमध्ये सोन्याची किंमत 263.25 प्रति ग्रॅम सुरु आहे. जी भारतीय चलनात 5969 रुपये मोडते. भारतात 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये आहे. ज्यामुळे हे लक्षात येते की भारतापेक्षा दुबईमध्ये सोने किती पटीने स्वस्त आहे.

दुबईहून भारतात किती सोने आणता येते??

परंतु लक्षात घ्या की एक वर्षापेक्षा अरे काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय व्यक्तीला 50000 रुपये किमतीचे 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने कोणत्याही शुल्का व्यतिरिक्त भारतात आणता येतात. तसेच, 40 ग्रॅमपर्यंतचे 1,00,000 रुपये किंमतीचे दागिने आणण्याची परवानगी भारतीय व्यक्तीला असते. परंतु एखाद्या भारतीय प्रवाशाने मर्यादेपेक्षा अधिक सोने खरेदी केल्यास हे सोने भारतात आणण्यासाठी त्याला सीमा शुल्क भरावे लागते. कोणताही भारतीय व्यक्ती सोन्याची नाणी, बार किंवा बिस्किटे घेऊन भारतात येऊ शकत नाही.

Vodafone Idea Data Plan | वोडाफोन- आयडियाने आणले 2 भन्नाट प्लॅन, 70 दिवसांसाठी फ्रीमध्ये पाहता येणार Netflix

Vodafone Idea Data Plan

Vodafone Idea Data Plan | सध्या मार्केटमध्ये अनेक टेलिकॉम कंपन्या आलेल्या आहेत. ज्या त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. अशातच आता वोडाफोन आयडिया या कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेला आहे. वोडाफोन आयडियाने आता ग्लोबल स्ट्रेमींग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्ससोबत देखील पार्टनरशिप केलेली आहे. तसेच त्यांनी लवकरच त्यांच्या ग्राहकांना नेटफ्लिक्स सोबतचे पोस्टपेड प्लॅन लॉन्च करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहेत. त्यामुळे वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता त्यांना त्यांच्या रिचार्जसोबत (Vodafone Idea Data Plan) ओटीटीचा देखील अनुभव घेता येणार.

वोडाफोन आयडियाचा नवीन प्लॅन | Vodafone Idea Data Plan

वोडाफोन आयडियाने सांगितले आहे की, या पार्टनरशिप अंतर्गत युजर त्यांच्या आवडीच्या कोणत्याही डिवाइसवर म्हणजेच मोबाईल, टेलिव्हिजन किंवा टॅबलेटवर स्ट्रीमिंग अनुभवू शकतात. वोडाफोन आयडियाने सध्या त्यांच्या प्रीपेड ग्राहकांना नेटफ्लिस ऑफर करणे सुरू केलेले आहे. आणि लवकरच बंडल पोस्टपेड प्लॅन देखील लॉन्च करणार आहे. कंपनीने नवीन दोन प्रीपेड प्लॅन देखील सादर केलेले आहेत. या नेटफ्लिक्सच्या बेसिक सबस्क्रीप्शन शिवाय आता ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि डेटाचा अनुभव घेता येणार आहे. तसेच युजर त्यांच्या मोबाईलवर त्याचप्रमाणे टीव्हीवर देखील पाहू शकणार आहेत.

वोडाफोन आयडियाचा 998 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाने हा 998 रुपयांचा पहिला पॅक जारी केले आहे. यामध्ये 1.50 जीबी डेटा सोबत दर दिवशी 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉल्स आणि नेटफ्लिक्स बेसिक हे 70 दिवसांच्या वैद्यसह दिलेले आहे.

वोडाफोन आयडियाचा 1399 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या दुसऱ्या पॅकची किंमत ही 1399 रुपये एवढी आहे. ज्या प्लॅनची वैद्यता 84 दिवस एवढी आहे. यामध्ये तुम्ही अमर्यादित कॉल्स, नेटफ्लिक्स तसेच दररोज 2.50 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता.

Bussiness Idea | आजच सुरु करा ‘हे’ जबरदस्त बिसनेस; महिन्याला होईल 50 हजार रुपयांचा नफा

Bussiness Idea

Bussiness Idea | असे अनेक लोक आहेत, ज्यांना नोकरी करण्याचा कंटाळा आला आहे. आणि त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. किंवा अनेक लोक नोकरी करता करता देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात. परंतु व्यवसाय करताना कोणता व्यवसाय करावा? त्यासाठी भांडवल किती लागेल? त्या व्यवसायाची बाजारामध्ये किती उपलब्धता आहे? या सगळ्या गोष्टींची माहिती घेणे खूप गरजेचे असते. अनेकांना कोणता व्यवसाय सुरू करावा हेच कळत नाही. तर आज आम्ही व्यवसायाच्या काही आयडिया (Bussiness Idea) सांगणार आहोत. ज्या तुम्ही अगदी गावात आणि शहरात देखील सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही दर महिन्याला 50,000 रुपयांपर्यंत नक्कीच नफा मिळू शकता. आता हे व्यवसाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया.

कपड्याचा व्यवसाय | Bussiness Idea

वस्त्र हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. कोणताही नवीन सण असो किंवा रोजही लोकांकडे खूप जास्त कपडे असतात. आणि बाजारात देखील या कपड्यांची खूप दुकानं उपलब्ध असतात. तरी देखील लोक नेहमीच नवनवीन स्टाईल आणि फॅशन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर तुमचे कपड्याचे एखादे दुकान सुरू केले आणि त्यात चांगले चांगले कलेक्शन ठेवले, तर तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होईल.

तेल व्यवसाय

सध्या खाद्यतेल मोठ्या प्रमाणात महागलेले आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे. तुम्ही अतिशय कमी जागेमध्ये ऑइल मिल सुरू करू शकता. यासाठी अगदी छोट्या छोट्या मशीन देखील उपलब्ध आहे. तुम्ही गाव असो वा शहर कोणत्याही ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च येईल. त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकता.

वेडिंग प्लॅनर किंवा इव्हेंट मॅनेजर

वेडिंग प्लॅनर किंवा इफेक्ट मॅनेजर म्हणून देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, हे खूप फायदेशीर आहे. आज काल या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विवाह सोहळा असो किंवा इतर मोठे कोणतेही कार्यक्रम असो इव्हेंट मॅनेजरची गरज लागते. तुम्ही हा व्यवसाय सुरू करून खूप चांगली कमाई करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही फोटोग्राफी, डेकोरेशन, केटरिंग, फूड यांसारख्या गोष्टी सुरू करून देखील चांगला नफा मिळवू शकता.

स्ट्रीट फूड स्टॉल | Bussiness Idea

तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीमध्ये स्ट्रीट फूड स्टॉलमधून चांगला व्यवसाय करू शकता. इतर कामांच्या तुलनेत हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्याचप्रमाणे अगदी परदेशातून येणारे लोक देखील रस्त्यावरचे जेवण पसंत करतात. तुम्ही मोमोज, न्यूडल्स, चाट पकोडी, पाणीपुरी, वडापाव यांसारख्या गोष्टी विकू शकता. यातून तुम्हाला खूप चांगला नफा होईल.

Pune Mhada Lottery | ‘पुणे म्हाडा’च्या अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ, ‘ही’ आहे अंतिम तारीख

Pune Mhada Lottery

Pune Mhada Lottery | पुण्यातील म्हाडा घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आता ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागातील 4877 घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ केलेली आहे. उमेदवारांना 6 जून 2024 पर्यंत या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना कागदपत्रे उपलब्ध व्हाव,m यासाठी ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या 26 जून रोजी या घरांची सोडती होणार आहे. तीन महिन्यात 30 हजार जणांनी अर्ज केले होते.

म्हाडाच्या (Pune Mhada Lottery) वतीने मार्चमध्ये तब्बल 4877 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली होती. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तरी देखील लोकांनी घरांसाठी नोंदणी सुरू केली होती. अर्ज करताना ऑनलाईन आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतात. परंतु निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्याने आवश्यक कागदपत्र उमेदवारांना उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे आता म्हाडाकडून ही मुदत वाढ करण्यात आलेली आहे.

म्हाडाला निवडणुकीचा फटका | Pune Mhada Lottery

म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर केल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त होती. त्यामुळे ज्या उमेदवारांना म्हाडाचा अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल प्रमाणपत्र लागत होते. त्याची उपलब्धता वेळेवर झाली नाही. आणि लोकांना अर्ज देखील करता आलेला नाही. त्यामुळे म्हाडाला याबाबतचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु आता उमेदवारांना या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यामुळे 6 जून पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी वाढवलेला आहे.

Millets Farming | बाजरी लागवड शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि पेरणीची योग्य वेळ

Millets Farming

Millets Farming | बाजरी ही आपल्या जेवनातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. बाजरीमध्ये अनेक पोषकतत्व आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोरड्या प्रदेशात मुख्यतः बाजरीची लागवड केली जाते. तांदूळ आणि गव्हानंतर बाजरी हे भारतातील तिसरे महत्त्वाचे असते धान्य आहे. कमी पर्जन्यमान, कमी जमिनीची सुपीकता आणि उच्च तापमान हे बाजरीच्या पिकासाठी (Millets Farming) अनुकूल वातावरण असते. बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम फॉस्फरस, थायमिन यांसारखे पोषकतत्व असतात.

पेरणीची वेळ | Millets Farming

खरीप हंगामासाठी बाजरीची पेरणी ही पावसाळा सुरू झाल्यावर करावी. जेणेकरून पीक चांगले येईल. बाजरीची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिला पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी. रब्बी हंगामात तमिळनाडूमध्ये बाजरीच्या पेरणीसाठी योग्य वेळ आहे. जास्त उत्पादन घेण्यासाठी उन्हाळी बाजरीची पेरणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. जेणेकरून तुम्हाला बाजरीचे पीक चांगले येईल.

बाजरीमुळे शरीराला होणारे फायदे

फायबर समृद्ध: बाजरीमध्ये भरपूर फायबर असते, ते पचनास मदत करते, निरोगी आतडे वाढवते आणि कोलेस्टेरॉलची पातळी राखून हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते.

हृदयाचे आरोग्य: बाजरी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करते, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर करते आणि रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यास मदत करते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते: लोह, जस्त आणि व्हिटॅमिन बी 6 समृद्ध, बाजरी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीराच्या संरक्षण यंत्रणेस समर्थन देते.

पाचक आरोग्य: बाजरीमधील फायबर सामग्री पचन सुधारते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि आतड्याच्या मायक्रोबायोटाला पोषण देते, ज्यामुळे निरोगी पाचन तंत्राला चालना मिळते.

चयापचय: ​​बाजरीतील प्रथिने सामग्री स्नायूंच्या ताकद, ऊतींचे आरोग्य आणि चयापचय वाढवते, कॅलरी आणि चरबी बर्न करण्यास मदत करते.

हाडांची ताकद वाढते : बाजरीमध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे समृद्ध असतात, जे मजबूत हाडे तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक असतात, ऑस्टियोपोरोसिस आणि वय-संबंधित हाडांच्या समस्यांचा धोका कमी करतात.

वजन नियंत्रणात राहते: बाजरीमधील फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तृप्ततेला प्रोत्साहन देऊन आणि सतत ऊर्जा मुक्ती प्रदान करून, अस्वास्थ्यकर स्नॅकिंगपासून बचाव करून वजन नियंत्रणात मदत करतात.

मधुमेह नियंत्रण: कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर सामग्रीसह, बाजरी रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन प्रतिरोधनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक फायदेशीर पर्याय बनतो.

गर्भधारणेचे पोषण: बाजरीमध्ये फॉलीक ऍसिड, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक पोषक घटक असतात, जे गर्भाच्या विकासासाठी, न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी आणि गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान सामान्य आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

अशक्तपणा प्रतिबंध आणि ऊर्जा बूस्ट: बाजरीचे लोह सामग्री ॲनिमिया टाळण्यास आणि उपचार करण्यास मदत करते, तर बी जीवनसत्त्वे ऊर्जा चयापचय, संज्ञानात्मक कार्य आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतात.

MVNPL Bharti 2024 | महाराष्ट्र विद्युत निगम प्रायव्हेट लिमिटेड नोकरीची मोठी संधी; थेट मेलद्वारे करा अर्ज

MVNPL Bharti 2024

MVNPL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता महाराष्ट्र विद्युत निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. ही अर्ज पद्धती ऑनलाईन म्हणजे ईमेलच्या पद्धतीने होणार आहे. अर्ज निघाल्यापासून 7 दिवसाच्या आत तुम्हाला ईमेलद्वारे अर्ज करायचे आहेत. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | MVNPL Bharti 2024

  • पदाचे नाव – शिफ्ट इनचार्ज, बॉयलर/टर्बाइन डेस्क इनचार्ज, मॅनेजर/प्रभारी, इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, सीनियर इंजिनीअर, फायर अँड सेफ्टी ऑफिसर, टेक्निशियन, फिटर, वेल्डर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – जाहिरातीत दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ दिवसांच्या आत

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • अर्ज निघाल्यापासून 7 दिवसांच्या तुम्हाला हे अर्ज करायचे आहे.
  • त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

MRVC Bharti 2024 | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरु, असा करा अर्ज

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ज्या अंतर्गत तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. कारण आता मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना हे अर्ज ऑनलाईन म्हणजेच ईमेलच्या पद्धतीने भरायचे आहेत. त्याचप्रमाणे 19 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखेच्या आधीच अर्ज करा. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | MRVC Bharti 2024

  • पदाचे नाव – महाव्यवस्थापक / अतिरिक्त महाव्यवस्थापक
  • पदसंख्या – 01 जागा
  • वयोमर्यादा – 55 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected].
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जून 2024

अर्ज कसा करावा? | MRVC Bharti 2024

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • हा अर्ज तुम्हाला दिलेल्या मेल आयडीवर पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र पाठवणे गरजेचे आहे.
  • 19 जून 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर उमेदवारांना अर्ज करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Benefits Of Coconut Water | किडनी स्टोनसाठी नारळ पाणी खूप फायदेशीर, दररोज सेवन केल्याने होतात ‘हे’ फायदे

Benefits Of Coconut Water

Benefits Of Coconut Water | नारळ पाणी हे खूप पौष्टिक असते. डॉक्टर देखील आजारी असणाऱ्या लोकांना त्याचप्रमाणे सामान्य लोकांना देखील नारळ पाणी पिण्याचा नेहमी सल्ला देतात. नारळ पाण्याला पोषक तत्वाचे पॉवर हाऊस म्हंटले जाते. कारण यामध्ये सगळ्या प्रकारचे पोषक तत्वे आढळतात. नारळ पाणी हे चवीला देखील खूप चांगले असते. आणि शरीराला देखील यामुळे अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात शरीरातील हायड्रेशन राखण्यासाठी नारळाचे पाणी सगळ्यात चांगले मानले जाते. आपल्याला नारळ पाणी पिल्याने हे सगळे फायदे होतात हे माहीतच आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? की नारळ पाणी पिल्याने (Benefits Of Coconut Water) तुम्हाला किडनी स्टोनपासून देखील आराम मिळतो.

किडनी स्टोनचा उपचार करण्यासाठी नारळ पाणी हा एक नैसर्गिक पर्याय मानला जातो. कारण नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यात आणि ट्रायग्लिसराईड्स कमी करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे नारळाच्या पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढते. आणि किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते. आता आपण नारळ पाणी पिल्याने इतर कोणते फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.

हायड्रेशन राखते | Benefits Of Coconut Water

नारळाचे पाणी तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. योग्य हायड्रेशनमुळे लघवीचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे लहान दगड निघून जाण्यास मदत होते. उन्हाळ्यात ते तुम्हाला दिवसभर ऊर्जा आणि ताजेपणा देण्यासही मदत करते.

पोटॅशियमचा स्रोत

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे लघवीतील खनिज संतुलन राखण्यास मदत करते आणि दगड तयार होण्याची शक्यता कमी करते.

लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ गुणधर्म

नारळाच्या पाण्यात सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात, जे लघवीचे उत्पादन वाढवतात आणि त्यामुळे किडनी स्टोन फ्लश करण्यास मदत करतात.

सायट्रेटचा चांगला स्रोत | Benefits Of Coconut Water

काही अभ्यासांनी असे सांगितले आहे की, नारळाच्या पाण्यात सायट्रेट असते, जे कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल्स तयार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी कॅल्शियमसह एकत्रित होते, जे किडनी स्टोनचे प्रमुख कारण आहे.

Benefits Of Tej Patta Water | सकाळी रिकाम्या पोटी प्या तेजपत्याचे पाणी; शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Benefits Of Tej Patta Water

Benefits Of Tej Patta Water | तमालपत्र हा आपल्या मसाल्यातील एक पदार्थ आहे. ज्यामुळे आपल्या अन्नाला चव येते. यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे देखील होत असतात. या तमालपत्राला बे लिव्ह असे देखील म्हणतात. तमालपत्रमध्ये अनेक जीवनसत्व, खनिजे, अँटीऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे आपले आरोग्य नीट राहते. तमालपत्राचे पाणी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तमालपत्राच्या पाण्याचे सेवन केले, तर तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांच्या मधुमेहावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी तमालपत्राचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. तमालपत्राच्या पाण्यामुळे (Benefits Of Tej Patta Water) आपल्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात. आपली त्वचा देखील निरोगी राहते. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली होते. आता या तमालपत्राचे पाणी सकाळी उपाशीपोटी पिल्याने आपल्या आरोग्याला नक्की कोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

रिकाम्या पोटी तमालपत्राचे पाणी पिण्याचे फायदे | Benefits Of Tej Patta Water

किडनीचे आरोग्य सुधारते

तमालपत्राच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ किडनी डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात, ज्यामुळे मूत्रपिंड नेहमी निरोगी राहतात आणि चांगले कार्य करतात.

पचनसंस्था सुधारते

याच्या सेवनाने पचनक्रिया उत्तेजित होऊन अन्न पचण्यास मदत होते, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्या कमी होतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

रक्तातील साखर नियंत्रण

तमालपत्रामध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

दाहक-विरोधी गुणधर्म

तमालपत्राच्या पाण्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सूज कमी करतात, ज्यामुळे इतर शारीरिक समस्याही दूर होतात.

अँटिऑक्सिडंट गुणधर्म

यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती स्वतःला आजारांपासून चांगल्या प्रकारे वाचवण्यास सक्षम असते.

तमालपत्राचे पाणी कसे तयार करावे ? | Benefits Of Tej Patta Water

एका कढईत एक ग्लास पाणी गरम करून त्यात 2-3 तमालपत्र टाकून काही वेळ चांगले उकळा. चांगले उकळल्यानंतर गाळणीतून गाळून गरम गरम प्यावे.