Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 715

Potato Peels Benefits | बटाट्याच्या साली फेकून देत असाल तर थांबा ! फायदे वाचल्यास रोज कराल सेवन

Potato Peels Benefits

Potato Peels Benefits | बटाटा ही अशी भाजी आहे. जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. बटाट्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. परंतु अनेकदा आपण बटाट्याच्या साली काढून तो फेकून देतो. परंतु तुम्हाला माहित नसेल की, बटाट्याच्या सालीच्या सेवनाने तुम्हाला अनेक आवश्यक तत्त्व मिळतात. बटाट्याच्या सालीमध्ये विटामिन सी, विटामिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि शक्तिशाली ऑक्सिडंट असतात. जे तुमच्या शरीराला अनेक फायदे देतात. त्याचप्रमाणे पट्ट्याच्या सालीचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील कमी असते. त्याचप्रमाणे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. आता बटाट्याच्या सालींचे (Potato Peels Benefits) सेवन केल्यावर आपल्या आरोग्याला नक्की कोणकोणते फायदे होतात? हे आपण जाणून घेणार आहोत.

हाडे मजबूत होतात | Potato Peels Benefits

बटाट्याच्या साली खाल्ल्याने हाडांच्या आरोग्याला फायदा होतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि जस्त यांसारखे आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात, जे हाडांची घनता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

प्रतिकारशक्ती सुधारते

बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, जे एकत्रितपणे रोगप्रतिकारक शक्तीला फायदा देतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

बद्धकोष्ठता पासून आराम

जर तुम्हाला अनेकदा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर अशावेळी बटाट्याची साले खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचन सुधारतेच पण बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते.

त्वचेसाठी फायदेशीर

बटाट्याची साल देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यांच्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म डागांपासून मुक्त होतात आणि त्वचा चमकदार बनविण्यास मदत करतात.

कर्करोग प्रतिबंध | Potato Peels Benefits

बटाट्याच्या सालीमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. याशिवाय त्यात क्लोरोजेनिक ॲसिडही आढळते, जे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरते.

Splendor Plus XTEC 2.0 : नव्या अवतारात लाँच झाली Hero Splendor; देतेय 73 KM मायलेज

Splendor Plus XTEC 2.0 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero Splendor हि भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक आहे. अनेक घराघरात स्प्लेंडर बघायला मिळते. आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार Hero MotoCorp ने अपडेटेड फिंचर्ससह नव्या अवतारात हिरो स्प्लेंडर लाँच केली आहे. Splendor Plus XTEC 2.0 असं या नव्या बाईकचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत, तसेच गाडीच्या लूकमध्ये थोडाफार कॉस्मेटिक बदल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हिरो ची नवी स्प्लेंडर तब्बल 73 KM मायलेज देते.

बाईकच्या लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने पूर्वीप्रमाणेच क्लासिक डिझाइन दिले आहे. यामध्ये नवीन एलईडी हेडलाईट व्यतिरिक्त त्यात हाय इंटेन्सिटी पोझिशन लॅम्प (HIPL) बसवण्यात आला आहे. बाईकला देण्यात आलेला अनोखा ‘H’ आकाराचा टेल लॅम्प रात्रीच्या वेळी चांगल्या प्रकारे उठून दिसतो. पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, लांब सीट, मोठा ग्लॉव बॉक्स आणि यूएसबी चार्जिंग पोर्टने बाईक सुसज्ज आहे. इतर गाड्यांपेक्षा आपली बाईक उजळून दिसावी यासाठी स्टिल्थी ड्युअल-टोन कलर स्कीम देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन या बाईकशी कनेक्ट करू शकता, जेणेकरून सायकल चालवताना तुम्हाला एसएमएस, कॉल आणि बॅटरी अलर्ट मिळतील.

इंजिन – Splendor Plus XTEC 2.0

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Hero Splendor ला पॉवर करण्यासाठी, नियमित मॉडेलप्रमाणे एअर-कूल्ड, 97.2cc, स्लोपर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून 8,000rpm वर 8.02 hp पॉवर आणि 6,000rpm वर 8.05Nm टॉर्क जनरेट करते. हे आयडियल स्टार्ट/स्टॉक सिस्टम (i3S) ने सुसज्ज आहे. जे बाईकचे मायलेज सुधारण्यास मदत करते. कंपनीचा दावा आहे कि १ लिटर पेट्रोलमध्ये हिरो ची नवी स्प्लेंडर ७३ किलोमीटर अंतर सहज पार करेल.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे बाईकच्या किमतीचा, तर Splendor Plus XTEC 2.0 ची किंमत 82,911 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. भारतीय बाजारात हि बाईक Honda Shine 100 आणि Bajaj Platina 100 ला तगडी टक्कर देईल.

High Blood Pressure | उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘या’ 5 सवयी आजच बदला

High Blood Pressure

High Blood Pressure | ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब ही आजकाल सगळ्यांनाच होणारी सामान्य समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे अनेक लोक पीडित आहेत. जेव्हा रक्ताची शक्ती धमनीच्या भिंतीवर जास्त प्रमाणात येऊ लागते. त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. उच्च रक्तदाब हा अनुवंशिककारणा व्यतिरिक्त आपल्या वाईट सवयींमुळे देखील वाढतो. जसे की बैठे जीवनशैली, आपला लठ्ठपणा, सोडियमचे जास्त सेवन किंवा मद्यपान यासारख्या सवयीमुळे रक्तदाबाची समस्या वाढते. त्यामुळे आपल्याला आपल्या या सवयीवर नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच आपण तंदुरुस्त राहू शकतो. आता कोणकोणत्या सवयींमुळे आपला रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात ठेवता येतो? हे जाणून घेणार आहोत.

वजन नियंत्रणात ठेवा | High Blood Pressure

ज्या लोकांचे वजन जास्त आहे किंवा लठ्ठ आहे त्यांना उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो. तुमच्या वाढलेल्या वजनाच्या 5 ते 10% कमी केल्याने रक्तदाबात लक्षणीय फरक पडतो.

नियमित व्यायाम करा

रोज नियमित व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. दिवसातून कमीतकमी 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा जसे की वेगवान चालणे, सायकल चालवणे, पोहणे इ. अशा व्यायामामुळे नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढते. नायट्रिक ऑक्साईड रक्त प्रवाह वाढवते आणि रक्तदाब कमी करते.

पूरक आहार घ्या

मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि फॉलिक ॲसिड यांसारख्या सप्लिमेंट्समुळे रक्तदाब कमी होतो. जरी, डॉक्टर दैनंदिन दिनचर्यामध्ये पूरक आहार घेण्याच्या सूचना देत नाहीत, परंतु विशेष परिस्थितीत ते पूरक आहार घेण्याच्या सूचना देऊ शकतात.

कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन करू नका

हे साखर आणि कॅलरीजमध्ये समृद्ध आहेत, ज्यामुळे लठ्ठपणा आणि नंतर उच्च रक्तदाब होऊ शकतो. यामुळे एथेरोस्क्लेरोसिस देखील होऊ शकते, म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने रक्तदाब कमी करण्यासाठी अल्कोहोलचे सेवन कमी करण्याची शिफारस केली आहे.

पुरेशी झोप घ्या | High Blood Pressure

सामान्य झोप घेतल्याने रक्तदाब संतुलित राहतो. पुरेशी झोप न मिळाल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. चांगली झोप कॉर्टिसॉल सारख्या तणाव संप्रेरकांवर नियंत्रण ठेवते आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Shivani Agrawal Arrested : पुणे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; अल्पवयीन आरोपीच्या आईला सुद्धा अटक

Shivani Agrawal Arrested

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी (Pune Porsche Car Accident)अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल (Shivani Agrawal Arrested) याना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी वडील, मग आजोबा आणि आता आईला अटक झाल्याने अग्रवाल कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते एका महिलेचं होतं. आता ते रक्त त्याची शिवानी अग्रवाल यांचं होतं का? हे आता चौकशीत समोर येईल. आधीच या रक्त बदलाच्या प्रकरणात ससून मधील २ डॉक्टरना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या पोराचा गुन्हा लपवण्याच्या नादात अख्खं कुटुंबच पोलिसांच्या चौकशीत अडकलं आहे. सर्वात आधी मुलाच्या वडिलांना म्हणजे विशाल अगरवाल याना अटक करण्यात आली होती. त्यानंतर चालकाचे अपहरण आणि चालकाला धमकावल्याच्या आरोपाखाली मुलाच्या आजोंबाना म्हणजे सुरेंद्रकुमार अगरवाल याना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. एकूणच काय तर मुलाच्या कारनाम्याचा फटका संपूर्ण अग्रवाल कुटुंबाला बसताना दिसत आहे.

LPG Price Cut : LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त; जनतेला मोठा दिलासा

LPG Price Cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमती कमी (LPG Price Cut) झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ७२ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळेच हॉटेलचे जेवण आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती कायम ठेवल्या आहेत.

कोणत्या शहरात किती रुपये दर? LPG Price Cut

नवीन दरानुसार, आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 69.50 रुपयांनी स्वस्त झाला (LPG Price Cut) असून तो आता 1676 रुपयांना मिळेल. मुंबईत सिलिंडर 69.50 रुपयांनी कमी होऊन 1629 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये सिलिंडरचे दर ७२ रुपयांनी कमी झाले असून त्याची किंमत आता 1840.50 रुपये झाली आहे. चंदीगडमध्ये 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 1697 रुपयांना, चेन्नईमध्ये 1840.50 रुपये, मध्य प्रदेशमध्ये 1704 रुपयांना आणि लखनऊमध्ये 2050 रुपयांना उपलब्ध होईल.

दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी करण्यात (LPG Price Cut) आले आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. 1 मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर आता जून महिन्यात सुद्धा जवळपास ७० रुपयांनी स्वस्त झाल्याने जनतेला सध्याच्या महागाईच्या काळात थोडाफार तरी दिलासा मिळाला असं म्हणता येईल.

विस्तारा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; प्रवाशांमध्ये भीतीच्या वातावरण

Vistara flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शुक्रवारी दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या विस्तारा विमानात (Vistara Flight) बॉम्बची धमकी मिळाली होती. या विमानात 177 लोक आणि एक लहान मूल प्रवास करत होते. ही धमकी मिळताच विमान कंपनी आणि सुरक्षा दलांनी यावर तातडीने कारवाई केली. यानंतर फ्लाइट UK-611 ला दुपारी ठीक 12:10 वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. मात्र या प्रकारामुळे सुरक्षा दलात गोंधळ उडाला. तसेच, प्रवाशांमध्ये ही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, “विस्तारा फ्लाइट UK611 नवी दिल्लीहून येत होती. याचवेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल श्रीनगरला एक धमकीचा फोन आला. ज्यात विस्तारा UK611 विमानाला बॉम्बे उडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. या धमकी नंतर ताबडतोब विमान श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. पुढे विमानातील सर्व प्रवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यानंतर या विमानाची एका निर्जन स्थळी नेऊन तपासणी करण्यात आली. मात्र विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

दरम्यान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) तात्काळ तपासणी केल्यानंतर या विमानामध्ये कोणताही बॉम्ब सापडला नाही. ज्यामुळे काही वेळातच उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. आता पोलीस यंत्रणा हा फोन नेमका कुठून आला होता आणि कोणी केला होता याचा शोध घेत आहे.

Dry Lemon Uses : सुकलेल्या लिंबाचा ‘असा’ करा वापर; काळी पडलेली भांडी होतील एकदम चकाचक

Dry Lemon Uses

हॅलो महाराष्ट्रात ऑनलाईन। (Dry Lemon Uses) उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरात आवर्जून लिंबू पहायला मिळतो. कारण या दिवसात लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण बऱ्याचदा इतर कामाच्या व्यापात आपल्याला घरात लिंबू आहेत याचा विसर पडतो. त्यामुळे होत काय? लिंबू सुकून जातात आणि टणक होतात. असे लिंबू काय वापरायचे? म्हणून आपण सर्रास ही लिंब उचलतो आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तूम्हीहीह असेच करत असाल तर जरा थांबा. सुकलेल लिंबू फेकण्याआधी हा व्हिडीओ पहा. सुकलेल्या लिंबाचा असाही वापर होऊ शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल.

पहा व्हिडीओ(Dry Lemon Uses)

जर तुमच्याकडे सुकलेलं लिंबू असेल तर ते फेकून देऊ नका. या व्हायरल व्हिडिओत सांगितलेला जुगाड करून बघा. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, यामध्ये काही सुकलेली लिंब घ्या. (Dry Lemon Uses) या सुकलेल्या लिंबाच्या उभ्या फोडी कापून एका मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर यामध्ये ३ चमचे मीठ, १ चमचा बेकींग पावडर, २ चमचे व्हिनेगर आणि २ चमचे डिटर्जंट पावडर टाका. हे मिश्रण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बारीक केलेली पेस्ट एका वाटीत काढून घ्या.

ही तयार पेस्ट कोणतेही भांडे लखलखीत स्वच्छ करण्यासाठी वापरा. अॅल्युमिनियम, पितळ, तांबे अशा विविध धातूंची भांडी घासण्यासाठी या पेस्टचा वापर करता येईल. (Dry Lemon Uses) व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पेस्ट अगदी हलक्या हाताने भांड्यावर लावून घ्या. हळू हळू ही पेस्ट भांड्यावर घासा. असे केल्यास भांड्यावरील सर्व काळवटपणा निघून जाईल आणि तुमचे भांडे अगदी नवीन असल्यासारखे चमकू लागेल. ही पेस्ट एकापेक्षा जास्त दिवस साठवून तुम्हाला भांडी घासतेवेळी वापरता येईल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डल diplakshmi123 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुकलेले लिंबू फेकून देता तर थांबा..’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला असून यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे की, ‘लिंबू महाग आहे, त्यापेक्षा पितांबरी बरी’. (Dry Lemon Uses) तर आणखी एकाने लिहिले आहे, ‘एव्हढं कशाला करायचं? मी तर सरळ कुकरमध्ये असे लिंबू टाकून संपवते. यामुळे कुकरसुद्धा आतून चांगला स्वच्छ होतो’. तर अन्य एकाने लिहिलंय, ‘छान उपयोगी व्हिडीओ आहे. धन्यवाद ताई’.

Pandharpur Temple : ‘दगडी बांधकाम, रेखीव कलाकुसर..’; 700 वर्षांपूर्वी असं दिसायचं पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीचं मंदिर

Pandharpur Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandharpur Temple) माझे माहेर पंढरी.. आहे भीवरेच्या तीरी… अशा या गोड शब्दांनी रचलेल्या अनेक भक्ती गीतामध्ये तसेच संतवाणींमध्ये उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे विशेष वर्णन केले गेले आहे. या वर्णनातून दाखवलेली पंढरी खुल्या डोळ्यांनी पाहता आली असती तर डोळ्याचं पारणं फिटलं असतं, असं प्रत्येकाला वाटत. त्या काळी संतांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिलेले पंढरपूर आणि मंदिराचे रूप आता आपल्यालाही पाहता येणार आहे. ७०० वर्षांपूर्वी हे मंदिर कसे दिसत होते त्याची एक झलक आता समोर आली आहे.

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल (Pandharpur Temple)

पंढरपुरातील पुरातन विठ्ठल मंदिराचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरता सध्या ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे. ज्या अंतर्गत या मंदिराला प्राचीन अन पुरातन रूप देण्यात आले आहे. अर्थात नव्याने तयार होणारे हे मंदिर आता भाविकांना ७०० वर्ष मागे घेऊन जाईल. त्यासोबत संतांनी आपल्या डोळ्याने पाहिलेली पंढरी आताच्या काळातील भाविक उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहेत.

‘असे’ आहे बांधकाम

पंढरपुरात नव्याने तयार करण्यात आलेल्या या मंदिरा चे बांधकाम जरी नवीन असले तरी ७०० वर्ष जुन्या मंदिराचे स्वरूप साकारण्यात आले आहे. (Pandharpur Temple) त्यामुळे जुन्या काळी हे विठ्ठल मंदिर जसे होते तसे रूप देण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी प्राचीन पाषाणात असणारे नक्षीकाम, खांबावरील विविध मूर्ती, तसेच देवता, यांच्यावर असणारे नक्षीकाम आणि त्यासोबत विठ्ठलाचा चौखांबी आणि सोळखांबी मंडप पुरातन व प्राचीन रूपांत साकारण्यात आला आहे.

एकंदरच हे संपूर्ण बांधकाम अत्यंत रमणीय आणि मनमोहक झालेले दिसत आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी रंगरंगोटी करून, अनावश्यक गोष्टी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता हे मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे जसे होते तसे म्हणजेच त्याच्या मूळ रूपात साकारण्यात आले आहे. (Pandharpur Temple) दरम्यान, मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या १५ मार्च २०२४ पासून विठ्ठल मंदिराचे पदस्पर्श दर्शन बंद केले गेले होते. तसेच दिवसातून केवळ ५ तास विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होते. आता या विठ्ठल मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने येत्या २ जून २०२४ पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

Best Bus Mumbai : लोकलचा 3 दिवस मेगाब्लॉक ! मुंबईकरांना ‘बेस्ट’ ची साथ, 486 अतिरिक्त बसफेऱ्या

best mumbai

Best Bus Mumbai : मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र असे असताना बेस्ट (Best Bus Mumbai) कडून प्रवाशांचे हाल होऊ नये करिता खास नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता बेस्ट कडून शुक्रवारी तसंच शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नियमित बस फेऱ्यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त बस सेवा (Best Bus Mumbai) चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच अतिरिक्त 55 बसच्या 486 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कडून देण्यात आली आहे.

सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे प्रवाशांची मागणी लक्षात घेता आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागा कडून देण्यात आलेली आहे. तर ब्लॉकमुळे (Best Bus Mumbai) राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळांना मुंबईतील कुर्ला नेहरूनगर परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी पन्नास जादा गाड्या चालवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

1 जून रात्री साडे बारा ते 2 जून दुपारी 12.30 वाजेपर्यंत सेवा

बसमार्ग क्र. 1 सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व
बसमार्ग क्र. 2 लिमिटेड- कुलाबा आगार ते भायखळा स्थानक पश्चिम
एसी बस क्र. 10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक पश्चिम

  • एकूण 12 बसच्या (Best Bus Mumbai) 232 फेऱ्या

31 मे, 1 जून ते 2 जून दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सेवा

बसमार्ग क्र. एसी 10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. 11 लि. सीएसएमटी ते धारावी आगार
बसमार्ग क्र. 12 डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षानगर
बसमार्ग क्र. ए 45 बॅकबे आगार ते एमएमआरडीए वसाहत, माहुल
बसमार्ग क्र. 1 कुलाबा आगार ते खोदादाद सर्कल
बसमार्ग क्र. 2 लि. सीएसएमटी ते भायखळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. सी 42 राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क
बसमार्ग क्र. 2 लि. सीएसएमटी ते भायखळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. ए-174 अँन्टॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान (प्लाझा)
एकूण 43 बसच्या (Best Bus Mumbai)254 बसफेऱ्या

अखेर मनोज जरांगेंच्या विरोधातील वॉरंट रद्द; पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबरोबर न्यायालयाने मनोज जरांगेंना पाचशे रुपयांचा ठोठावत एक जमीनदार ही द्यायला सांगितला आहे. या निर्णयानंतर “मी न्यायालयाचा आदर करतो, न्याय सर्वांसाठी समान आहे” अशी प्रतिक्रिया म्हणून मनोज जरांगे यांनी दिली आहे. 2013 साली जरांगेंविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांची मुक्तता झाली आहे.

आज दुपारी ठीक 12 वाजता मनोज जरांगे पुणे न्यायालयात पोहचले होते. यानंतर पुणे न्यायालयात संबंधित प्रकरणाची सुनावणी पार पडली. ज्यात न्यायालयाने जरांगे यांचा वॉरंट रद्द केला. यासह त्यांना 500 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. या निर्णयामुळेच आता जरांगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2013 साली न्यायालयाने जरांगे यांना एका फसवणुकीचा गुन्ह्यात वॉरंट बजावले होते. या प्रकरणाचीच आज न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यात न्यायलयाने जरांगे यांच्या बाजूने निकाल दिला.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेने 2013 साली एक नाटक आयोजित केले होते. या नाटकाचा प्रयोग झाल्यानंतरही संघटनेकडून पैसे देण्यात आले नाहीत असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणामुळेच न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तर कोथरूड पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुढे न्यायलयाने त्यांच्या विरोधात वॉरंट बजावले होते. हेच वॉरंट आज मागे घेण्यात आले.