Thursday, December 25, 2025
Home Blog Page 725

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पाहिला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; तरुणांना केले ‘हे’ आवाहन

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devendra Fadnavis) सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे, पण, त्यांचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोपा नव्हता. पुष्कळ चढ- उतार यादरम्यान आले. बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी या चित्रपटास पसंती दर्शवली आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा चित्रपट पाहिला असून तरुणांना महत्वाचे आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पाहिला बाबूजींचा बायोपिक (Devendra Fadnavis)

भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट तमाम मराठी प्रेक्षकांना, विशेषतः तरुणांनी हा चित्रपट हमखास चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटले की, ‘महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असले प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार सुधीर फडके(बाबूजी) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके आता जगभरात प्रदर्शित झाला आहे. बाबूजींचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळाळी या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास घेऊन आयुष्य सत्कारणी लावणाऱ्या बाबूजींना खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणून आपण सर्वानी हा चित्रपट पहावा’.

पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप – दिग्दर्शक योगेश देशपांडे

याबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘माझ्या मनाला खूप समाधान मिळतेय, आमच्या सर्वांची मेहनत फळाला आली आहे असे म्हणण्यात हरकत नाही. आज प्रेक्षकांकडून, इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे तसेच मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून देखील कलाकारांचे आणि चित्रपटाचे इतके कौतुक होत आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज, फोन येत आहेत. माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे. यासाठी सर्वांचे मनापासून आभार’.

Gela Madhav Kunikade : ‘… अन् 63चं कोडं उलगडलं’; प्रशांत दामलेंच ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा रंगभूमीवर अवतरणार

Gela Madhav Kunikade

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gela Madhav Kunikade) गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेता प्रशांत दामले यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही पोस्ट शेअर केल्या जात होत्या. ज्यामध्ये ६३ आकड्याचा वापर केल्याचे दिसत होते. आता हा आकडा नेमका का आणि कशासाठी वापरला जातोय? याचा काहीच कुणाला अंदाज येत नव्हता. अखेर या ६३ आकड्याचे कोडे उलगडले आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेले नाटक ‘गेला माधव कुणीकडे’ हे ६३ प्रयोगांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गेला माधव कुणीकडे पुन्हा रंगभूमीवर (Gela Madhav Kunikade)

वसंत सबनीस लिखित ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर परतत आहे. प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर अत्यंत आगळ्या पद्धतीने हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असल्याचे सांगितले. त्यांच्या पोस्ट भारी चर्चेचा विषयी ठरल्या होत्या.

प्रशांत दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक एकूण ६३ प्रयोगांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. त्यामुळे आता नाट्यगृहात ‘अरे हाय काय नी नाय काय?’ हा संवाद पुन्हा एकदा घुमणार आहे.

कधी होणार शुभारंभ?

माहितीनुसार, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक ७ डिसेंबर १९९२ रोजी रंगभूमीवर दाखल झाले होते. या नाटकाचे १८२२ प्रयोग झाले आहेत. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे.

(Gela Madhav Kunikade) गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा शुभारंभ १५ जून २०२४ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.०० वाजता होणार आहे. तर नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाची तिकीट विक्री १ जून २०२४ रोजी फक्त ‘तिकीटलाय’ अॅपवर सुरु होणार आहे.

प्रशांत दामलेंनी व्यक्त केला आनंद

अभिनेते प्रशांत दामले गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यरसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे रंगभूमीवरील त्यांचा वावर प्रेक्षकांना सुद्धा हवाहवासा वाटू लागला आहे. एकापेक्षा एक सर्रास कलाकृती आणि एकापेक्षा एक कमाल पात्र रंगवून त्यांनी कायम रंगभूमीची शान वाढवली आहे. (Gela Madhav Kunikade) अशातच, प्रशांत दामले यांचे अत्यंत गाजलेले ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरणार आहे. याबाबत बोलताना प्रशांत दामले म्हणाले, ‘काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ”गेला माधव कुणीकडे” हे नाटक त्यापैकीच एक. मायबाप रसिकांसाठी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत आहे’.

आता सातबाऱ्यावरही जोडावे लागणार आईचे नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय

mahabhumi abhilekh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आईच्या नावासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता
सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे. यासह 1 मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्याबाबतची प्रकिया पुढील सहा महिन्यांत सुरू होणार आहे.

महत्वाचे म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वीच महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक शासकीय कागदपत्रांवर आईच्या नावाचाही उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्यासह आईच्या नावाचा ही उल्लेख करावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.

ई-फेरफार प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणी वेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश केला जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आईच्या नावाचा नवा कॉलम तयार केला जाणार आहे. यासंदर्भातच संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला एकूण तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या कालावधीत जुन्या व्यक्तींच्या नावासमोर आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागेल. यानंतर त्या व्यक्तीच्या नावासमोर आईचे नाव जोडले जाईल.

Cardamom Cultivation | घरबसल्या अशाप्रकारे करा इलायचीची शेती; होईल लाखो रुपयांचा नफा

Cardamom Cultivation

Cardamom Cultivation | आजकाल शेतकरी विविध प्रकारचे शेती करायला लागलेले आहेत. शेतकरी आता पारंपारिक पद्धतीचा अवलंब न करता, नवनवीन पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत, त्याचप्रमाणे शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून ते चांगल्या प्रकारे पैसा देखील कमावू शकतात. अशातच आता इलायची या पिकाची लागवड देखील अनेक शेतकरी करत आहे. आणि त्यातून खूप चांगला पैसा देखील कामावत आहे. जर तुम्हाला इलायचीची शेती (Cardamom Cultivation) कशी करायची? ते माहीत नसेल, तर आज आपण या इलायचीच्या शेतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यातून तुम्हाला खूप चांगला आर्थिक फायदा होईल.

भारतीय मार्केटमध्ये इलायचीला खूप जास्त मागणी आहे. आजकाल प्रत्येक घरामध्ये इलायचीचा वापर केला जातो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील वापर केला जातो. इलायचीची शेती ही केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. इलायचीची शेती ही 10 ते 15 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये चांगल्या प्रकारे येते. इलायची लागवड करण्यासाठी तुम्हाला काळ्यामातीची गरज लागते. जर तुम्ही इलायचीची चांगल्या प्रकारे लागवड केली, तर त्यातून तुम्हाला खूप चांगला नफा मिळेल.

कशाप्रकारे कमवाल लाखो रुपये? | Cardamom Cultivation

इलायचीच्या शेतीसाठी माती आणि चांगले हवामान गरजेचे आहे. यामध्ये जवळपास एक हेक्टरमध्ये इलायची शेती केली जाते. याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 4000 मेट्रिक टन आहे. तुम्ही घरच्या घरी देखील एका भांड्यामध्ये इलायचीची लागवड करू शकता. यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा सेल्सिअस तापमान असणे गरजेचे आहे.

इलयची पिकासाठी खते

इलायची ज्या पिकासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचे सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड दिले पाहिजे. हे 20 मिनिटांसाठी पाण्यात झाकून ठेवा आणि वेळोवेळी ते पाणी इलायचीला द्या. त्यामुळे तुमच्या इलायचीचे पीक देखील चांगले येईल. अशा प्रकारे तुम्ही इलायचीची लागवड करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता.

Agniveer Recruitment 2024 | भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी, 12 वी पास उमेदवार देखील करू शकता अर्ज

Agniveer Recruitment 2024

Agniveer Recruitment 2024 | जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक अतिशय भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे आता उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. कारण एका विशेष भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ती म्हणजे आता भारतीय नौदलात अग्नीवीर (Agniveer Recruitment 2024) बनण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे आलेली आहे. या भरती अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 4 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदभरती | Agniveer Recruitment 2024

ही भरती प्रक्रिया भारतीय नौदलाकडून अग्नीवीर पदासाठी राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला या पदासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीचे अर्ज करण्यास थोडेच दिवस राहिलेले आहे. 4 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे बारावीमधून गणित आणि फिजिक्स या विषयात झाले असेल तर त्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे केनीकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल या तीन विषयांचा डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांना देखील अर्ज करता येणार आहे.

अर्ज फी

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रुपये एवढी फी असणार आहे.

भरती प्रक्रिया | Agniveer Recruitment 2024

या भरती अंतर्गत उमेदवारांना सगळ्यात आधी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांची फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट होईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. आणि नंतरच उमेदवारांची निवड करण्यात येईल.

Post Office Recruitment 2024 | पोस्ट ऑफिसमध्ये 40,000 पदांसाठी मेगा भरती सुरु; थेट ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज

Post Office Recruitment 2024

Post Office Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे अनेक तरुणांना फायदा झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. विशेष म्हणजे तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ती म्हणजे आता पोस्ट ऑफिसकडून लवकरच एक भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीबद्दलची अधिसूचना देखील जारी करण्यात येणार आहे. आता या भरती प्रक्रियाबद्दल आणि अर्ज प्रक्रियेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

रिक्त पदे | Post Office Recruitment 2024

पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत.

पदसंख्या

ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिसकडून राबविण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत 40 हजार रिक्त पदांसाठी भरती राबवण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात येईल.

अर्ज पद्धती

पोस्ट ऑफिसकडून राबवण्यात येणारी ही भरती ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 40 या वयोगटातील उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. इतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

शैक्षणिक पात्रता

पोस्ट ऑफिसच्या या भरती अंतर्गत दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची सी देखील घेतली जाणार नाही.

अर्ज प्रक्रिया | Post Office Recruitment 2024

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय डाक विभागाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, आणि तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.

Asteroid | 24 सप्टेंबर रोजी होणार जगाचा अंत ! या लघुग्रहाची पृथ्वीशी होणार धडक; NASA ने दिली माहिती

Asteroid

Asteroid | आपली आकाशगंगा खूप मोठी आहे. तसेच अनेक रहस्यांनी देखील भरलेली आहे. परंतु त्यासोबत अनेक धोक्याचे संकेत देखील वेळोवेळी पृथ्वीवर येत असतात. अशातच एका भयानक संकटाची चाहूल लागलेली आहे. हे एक मोठे संकट 24 सप्टेंबर 2182 मध्ये येणार असल्याची माहिती आलेली आहे. हे संकट एका लघुग्रहाच्या रुपाने पृथ्वीवर येणार आहे. त्यामुळे सगळे वैज्ञानिक काळजीत आहेत.

पृथ्वीला कसे वाचवता येईल? | Asteroid

हाती आलेल्या माहितीनुसार पृथ्वीला एका मोठ्या लघुग्रहापासून धोका आहे. अशाच एका लघुग्रहामुळे पृथ्वीवरील संपूर्ण डायनासोरच्या प्रजाती नष्ट झालेल्या होत्या. येत्या काळात हा लघुग्रह जर पृथ्वीवर धडकला, तर सजीवाच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. असे देखील सांगण्यात आलेले आहे. पृथ्वीवर महाप्रयलकारी त्सुनामी येईल अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे.

हा लघुग्रह 169 वर्षानंतर पृथ्वीला धडकणार आहे. पण तरी देखील त्याचा धोका कसा टाळता येईल? याबाबतची संशोधन नासामध्ये चालू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार नासाने पृथ्वीला कितपत धोका होऊ शकतो? त्यामुळे काय होईल? याबाबतची शंका व्यक्त केलेली आहे. दर सहा वर्षांनी बेनू हा लघुग्रह पृथ्वीच्या अत्यंत जवळून जातो. परंतु येणाऱ्या काही काळामध्ये हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार असल्याची माहिती आलेली आहे.

22 अणुबॉम्बप्रमाणे शक्तिशाली

बेनू हे या लघुग्रहाचे (Asteroid) नाव आहे. 169 वर्षानंतर हा लघुग्रह पृथ्वीला धडकणार आहे. त्यामुळे पृथ्वीचा अंत होण्याचे संकेत देखील येत आहेत. हा लघु ग्रह 22 अणुबॉम्बच्या शक्तीप्रमाणे महाभयंकर असणार आहे. जो पृथ्वीचा विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. हे संशोधन झाल्यापासून सगळेच नासाचे संशोधक याबाबत काळजी व्यक्त करत आहे..आणि पृथ्वीला या महाभयानक संकटातून कसे वाचवता येईल? याबाबतचे संशोधन देखील चालू आहे.

Home Loan : 50 लाखांचे घर घ्या तेही फुकटात! गृहकर्जासोबत वापरा ‘हा’ फॉर्म्युला

home loan

Home Loan : घर बघावं बांधून …! अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी आजच्या काळात घर घेणे म्हणजे अगदी लहानसं घर जरी घ्यायचं झालं तरी त्याला आज लाखो रुपये खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये एक घर जरी खायचं म्हटलं तरी आयुष्यभर त्याचे ईएमआय फडावे लागतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत. ज्यामुळे अगदी 50 लाखांचं (Home Loan) घर फुकट घेणे शक्य आहे चला तर मग जाणून घेऊया हे कसं शक्य आहे….

घर घ्यायचं म्हटलं तर सर्वात आधी आपण होमलोन (Home Loan) चा पर्याय निवडतो मग एखाद्या बँकेकडून आपण होम लोन घेतो. मात्र घेतलेल्या कर्जा पेक्षा जास्त रक्कम आपण व्याजासहित बँकेला देत असतो. हा पर्याय सोपा वाटत असला तरी यात घर मालकाचे कित्येक लाख रुपये फक्त व्याजामध्येच जातात. दुसरीकडे जर तुमच्याजवळ असणारे पैसे योग्य ठिकाणी तुम्ही गुंतवले तर तुम्ही फुकटात घर घेऊ शकता.

फुकटात घर घेण्यासाठी एसआयपी फायद्याची (Home Loan)

आता फुकटात घर घेण्याची ही संकल्पना नेमकी काय आहे तर एसआयपी हा त्यासाठीचा योग्य पर्याय ठरू शकतो कारण एसआयपी मध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो या चक्रवाढ व्याजामुळे तुम्ही गुंतवलेल्या रकमेतून तुम्हाला भरपूर नफा मिळतो त्यामुळे तुम्ही एसआयपीच्या (SIP) माध्यमातून घरासाठी केलेले व्याज तसंच घराची किंमत परत मिळवू शकता.

आता समजा की तुम्ही जे घर घेताय त्याची किंमत 50 लाख रुपये आहे. आणि त्यासाठी तुम्ही ग्रह कर्जाचा पर्याय निवडला आहात. आज घडीला गृह कर्जावर आठ ते नऊ टक्के व्याज बँकांकडून घेतलं जातं. समजा तुम्हाला गृह कर्ज 8.5% दराने मिळाला आहे आणि या कर्जाची तुम्हाला 25 वर्षांमध्ये परतफेड करायची आहे असे आपण उदाहरणादाखल (Home Loan) गृहीत धरूया

50 लाख रुपयांच्या गृह कर्जावर तुम्हाला प्रतिवर्षी 8.5% या दराने प्रत्येक महिन्याला 40,261 रुपये ईएमआय 25 वर्ष सलग भरल्यानंतर तुम्ही एकूण 70 लाख 78,406रुपये व्याज द्याल. म्हणजेच 25 वर्षात 50 लाखांच्या गृह कर्जासाठी तुम्ही बँकेला एकूण 1 कोटी 20 लाख 78 हजार रुपये देत असता.

गृहकराजासोबत SIP सुरु केल्यास (Home Loan)

आता ज्या दिवसापासून तुम्हाला गृह कर्जाचा हप्ता सुरू झाला आहे त्याच दिवसापासून तुम्ही एसआयपी केल्यास गृह कर्जाच्या रुपात गेलेली तुमची सर्व रक्कम तुम्हाला परत मिळू शकते. तुम्हाला 40,261 रुपयांचा गृह कर्जाचा हप्ता चालू झालेला असताना त्याच महिन्यात तुम्ही सात हजार रुपयांची एसआयपी करायची. ही एसआयपी तुमचा गृह कर्जाचा कालावधी संपेपर्यंत तुम्हाला चालू ठेवायची आहे म्हणजेच तुम्ही सतत 25 वर्ष सात हजार रुपयांची SIP केली असेल तर तुमचे बँकेला गेलेले 1 कोटी 20 लाख 76,406 रुपये परत मिळते

कशी करायची गुंतवणूक?

आता एसआयपी ही भांडवली बाजाराशी जोडली गेली असल्यामुळे यामध्ये पैसे बुडण्याची जोखीम असते पण एसआयपी वर केलेल्या गुंतवणुकीवर साधारण 12 टक्के दराने परतावा मिळतो असं गृहीत धरले जाते. (Home Loan) या हिशोबाने तुम्ही प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये एसआरपी सलग 25 वर्षांसाठी केल्यास तुम्हाला एकूण 21 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्ही करता आणि या गुंतवणुकीतून तुम्हाला 25 वर्षानंतर एक कोटी अकरा लाख 83 हजार 446 रुपये व्याज मिळते.

याशिवाय पंचवीस वर्षानंतर तुमचे गृह कर्ज (Home Loan) संपेल तेव्हा तुम्हाला एसआयपी मधून तब्बल एक कोटी 32 लाख 83 हजार 446 रुपये मिळतील 25 वर्षांसाठीच्या गृह कर्जासाठी तुम्ही जेवढे पैसे देत आहात तेवढेच पैसे तुम्हाला एसआयपी मुळे परत मिळतील. म्हणजेच तुम्हाला तुमचे घर फुकटात मिळेल. आणि याच पद्धतीने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला एक रुपये आहे न देता तुमचे घर तुमच्या मालकीचे होईल तसंच 25 वर्षानंतर तुमच्या घराची किंमत ही कित्येक पटीने वाढलेली असेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे.)

Bomb Threat | इंडिगो फ्लाईटमध्ये मिळाली बॉम्ब असल्याची धमकी; प्रवाशांनी घाबरून खिडकीतूनच मारल्या उड्या

Bomb Threat

Bomb Threat | दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे या प्रवासी विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर या विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये देखील पाठवण्यात आलेले होते. विमान सुरक्षा आणि फॉर्म निकामी करणारे पथक सध्या या ठिकाणी आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे.

हे विमान पहाटे साडेपाच वाजता दिल्लीहून (Bomb Threat) वाराणसीला जाणार होते. याच वेळी या फ्लाईडमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून देखील बाहेर काढण्यात आलेले आहे. या ठिकाणी सर्व प्रवासी सुरक्षित आहे. त्यानंतर विमानाची तपासणी देखील केली जात.

विमानामध्ये बॉम्ब (Bomb Threat) असल्याची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने अलर्ट चालू केला. आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. प्रवाशांना ही माहिती समजताच, सगळे प्रवासी खूप घाबरले आणि काही प्रवासी आपत्कालीन गेटमधून, तर काही प्रवाशांनी थेट फ्लाईटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली. याबाबतचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2211 ला दिल्ली विमानतळावर बॉम्बची धमकी देण्यात आलेली होती. त्यानंतर सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन देखील करण्यात आलेले. आणि विमान सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमान दूरच्या खाडीत नेण्यात आले. आणि प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले.

पीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिली विमानतळावर इंडिगो फ्लाईट 6E2211 यांच्यामध्ये बॉम्ब असा शब्द लिहिलेला टिशू पेपर सापडला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी सुरुवात केली.

Vitamin D Side Effects | ‘व्हिटॅमिन डी’च्या ओव्हर डोसमुळे शरीराला होतील तोटे, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Vitamin D Side Effects

Vitamin D Side Effects |शारीरिक क्रिया करण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. आपल्या व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. हे एक चरबी विरघळणारे व्हिटॅमिन आहे. शरीरात कॅल्शिअम टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी मदत करते. व्हिटॅमिन डी जरी शरीरासाठी महत्वाचे असले तरी देखील त्याचे गरजेपेक्षा जास्त सेवन झाले तर आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आज आपण व्हिटॅमिन डीचे (Vitamin D Side Effects) सेवन जास्त प्रमाणात झाले तर आपल्या आरोग्याला कोणते तोटे सहन करावे लागणार आहेत. याची आपण माहिती जाणून घेणार आहोत.

हाडांची घनता कमी होते | Vitamin D Side Effects

व्हिटॅमिन डीच्या जास्त प्रमाणात हाडांची घनता खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला फ्रॅक्चर किंवा ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच्या अतिसेवनामुळे हाडे कमकुवत आणि पोकळ होतात. त्यामुळे किरकोळ दुखापत किंवा किंचित दाबानेही हाडे तुटण्याची भीती असते. त्यामुळे, व्हिटॅमिन डी पूरक आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

पचनक्रिया ठप्प होऊ शकते

शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढले तर पचनसंस्थाही ठप्प होऊ शकते. त्याच्या ओव्हरडोजमुळे रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते, कारण तुमचे खाणे आणि पेय पचत नाही आणि उलट्याद्वारे बाहेर येते. अशा परिस्थितीत, अति मळमळ दुर्लक्ष करण्याऐवजी, आपण ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हायपरकॅल्सेमिया | Vitamin D Side Effects

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी असल्यास हायपरविटामिनोसिस डीची समस्या देखील होऊ शकते. क्वचित प्रसंगी असे घडत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. यावेळी रक्तामध्ये कॅल्शियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोग तुम्हाला प्रभावित करू शकतात आणि शरीरातील रक्त परिसंचरण देखील प्रभावित होऊ शकतात.