Thursday, December 25, 2025
Home Blog Page 726

Dharavi Fire News: धारावीत भीषण आग!! 6 लोक गंभीर जखमी; अग्निशामकच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

Dharavi Fire News

Dharavi Fire News | मुंबईतील धारावीतून अत्यंत जीवाला चटका लागणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे धारावीत एका गोदामाला भीषण आग लागलेली आहे. आणि या आगीमध्ये एकूण सहा जण जखमी झालेले आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या एकूण दहा गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. आज पहाटे ही आग लागल्याची माहिती समोर आलेली आहे. धारावीत लागलेल्या या आगीच्या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत.

धारावीतील अशोक नील कंपाउंडर रोल कला येथे ही घटना घडलेली आहे. जमिनीपासून गोदामाच्या तिसऱ्या मजल्यांपर्यंत ही आग (Dharavi Fire News) पोचलेली आहे. या इमारतीमध्ये लाकडी साहित्य तसेच फर्निचर देखील होते. ते देखील जळलेले आहे. धारावीत अशोक नीलकंपाऊंडमध्ये कमर्शियल गारमेंट जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली आहे.

धारावीत लागलेल्या गोदामाची आग विझवण्यासाठी अग्निशमन दल हे पहाटेपासून बचाव काम करत आहे. त्याचप्रमाणे सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा देखील प्रयत्न आजकाल मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. या आहीमध्ये एकूण सहा जण होरपळले आहेत. त्यांना या आगीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आहे. या लोकांवर लगेच उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे काही उपचार करून काहींना उपचार करून घरी देखील सोडण्यात आल्याची माहिती आलेली आहे. परंतु ही आग का लागली याची माहिती अजून समोर आलेली नाही.

या आगीत एकूण सहा जण भाजले आहेत. यातील सलमान खान वय 26 वर्ष हे 8 ते 10 टक्के भाजलेले आहे. त्याचप्रमाणे मनोज वय 26 वर्ष हे देखील आठ ते दहा टक्के भाजलेले आहे. अहमद वय 22 वर्षे हे 40 ते 50 टक्के भाजलेल्याची माहिती मिळालेली आहे. सलाउद्दीन वय 40 वर्ष हे 40 ते 50 टक्के भाजलेले आहे. सदुल रहमान वय वर्ष 26 हे 30 ते 40 टक्के भाजलेले आहेत. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती मिळालेली आहे.

Benefits of Sprouted Ragi | मोड आलेली नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर, ‘हे’ 5 फायदे समजल्यावर तुम्हीही रोज खाल

Benefits of Sprouted Ragi

Benefits of Sprouted Ragi | मोड आलेले धान्य आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मोड आलेले कोणतेही धान्य खाल्ले तरी आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. कडधान्यांच्या सेवनाने आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहते. त्याचप्रमाणे वजन कमी कर्णयसाठी देखील हे कडधान्य खूप फायदेशीर ठरतात. त्यात मोड आलेली नाचणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आता हि मोड आलेली नाचणी खाल्याने आपल्या शरीराला आणखी कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

पचन सुधारते | Benefits of Sprouted Ragi

उन्हाळ्यात अन्न आणि पेये अनेकदा सहज पचत नाहीत आणि तळलेले किंवा जड काहीही खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीच्या तक्रारी होतात. अशा स्थितीत जर तुम्ही नाश्त्यामध्ये मोड आलेली नाचणी खाल्ल्यास तुमची पचनसंस्था मजबूत करते आणि संबंधित समस्यांपासूनही आराम देते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित

मोड आलेली नाचणी देखील एक उत्तम आहार पर्याय आहे. हे अमीनो ऍसिडमध्ये समृद्ध आहे, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. याशिवाय यकृतातील चरबी कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे खाणे देखील चांगले मानले जाते.

रक्त वाढीसाठी फायदेशीर

उन्हाळ्यात मोड आलेली नाचणी खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. अंकुरित स्वरूपात तुमच्या आहारात समावेश केल्याने तुम्ही हिमोग्लोबिनची पातळी वाढवू शकता.

रक्तातील साखर नियंत्रित करते

मोड आलेली नाचणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. यात हाय पॉलीफेनॉल आणि डायटरी फायबर असते, ज्यामुळे ते ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर | Benefits of Sprouted Ragi

मोड आलेल्या नाचणीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन नियंत्रित ठेवता येते. हे खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळता आणि वजन वाढण्याची समस्या येत नाही.

ही बँक घरबसल्या देत आहे 10 लाखांपर्यंत कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रोसेस पहा

Bank Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही कामासाठी बँकेचे लोन घ्यायचे असले की, त्याला खूप मोठी प्रोसेस पूर्ण करावी लागते. तसेच सतत बँकेच्या चक्रारी माराव्या लागतात. मात्र आता तुम्हाला घरबसल्या दहा लाख रुपयांपर्यंतचे लोन घेता येणार आहे. हॅलो तुम्हाला अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांमध्ये मिळून जाईल. हे लोन घेत असताना तुम्हाला कोणतीही जोखीम पत्करावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही लोन घेण्यास इच्छुक असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा.

कॅनरा बँक 10.65 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे लोन देत आहे. या कर्जाची रक्कम बँक 11.99 टक्के दराने प्रदान करत आहे. या कर्जासाठी सरकारी विभाग, बँका किंवा इतर शेतकरी पात्र आहेत. ही बँक वैयक्तिक कर्ज सहज उपलब्ध करून देत आहेत. या कर्जात तुम्ही टॉप-अप कर्जाची निवड करू शकता. तसेच, प्री-क्लोज करू शकता. यासह अतिरिक्त शुल्काशिवाय थकबाकीची रक्कम ही भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
पत्त्याचा पुरावा
व्यवसायाचा पत्ता पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
3 महिन्यांची पगार स्लिप
फॉर्म क्रमांक 16

घरबसल्या लोन कसे मिळवावे??

सर्वात प्रथम कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर www.canarabank.com जावा.

या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला कर्ज विभाग दिसेल त्यावर क्लिक करा.

लोन पर्यायांमध्ये कर्जाचे सर्व पर्याय दिसतील. यात तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.

यानंतर समोर एक नवीन पेज उघडेल.

त्यावर ऑनलाइन अर्जाचा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज भरून सबमिट करा. तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर असेल तर सहज कर्ज मिळून जाईल.

Job Requirement: मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू; पगार, पात्रता आणि अर्जाची माहिती वाचा

job Recruitment

Job Requirement| मुंबईमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्जही मागवले जात आहेत. या भरतीअंतर्गत सेवानिवृत्त MbPA कर्मचारी पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुणांनी येत्या 18 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळा भेट द्यावी.

पदाचे नाव आणि रिक्त जागा – सेवानिवृत्त MbPA कर्मचारी (15 रिक्त जागा)

शैक्षणिक पात्रता – रिक्त पदासाठी विशिष्ट विषयात पदवीधर असावे. (उमेदवाराने भरती जाहिरात पहावी)

वयोमर्यादा – वयोमर्यादा 63 वर्षे आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन आहे.

अर्जाची अंतिम तारीख – 18 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ – https://mumbaiport.gov.in/

वेतन – निवडलेल्या उमेदवाराला 22,000 ते 25,000/- वेतन मिळेल.

अर्जाची पद्धत (Job Requirement)

  • रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या लिंक ला भेट द्यावी
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्जाची अंतिम तारीख 18 जून आहे ही बाब लक्षात ठेवावी.

Weird Food Fusion : हिंमत कशी झाली? बर्गर आईस्क्रीम रोलचा व्हिडीओ पाहून भडकले Foodie

Weird Food Fusion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Food Fusion) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये अनेक व्हिडीओ विचित्र फूड फ्युजनचे असतात. जे पाहून आयुष्यात पुन्हा तो पदार्थ खाण्याची ईच्छा आणि हिंमत दोन्ही होत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमचं डोकंच फिरेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे दोन पदार्थ एकत्र करून बनवलेली ही मिठाई तुम्ही खाऊ शकाल का? हे तुम्हीच व्हिडीओ पाहून ठरवा.

व्हायरल व्हिडीओ (Weird Food Fusion)

एका बाजूला बर्गर आणि दुसऱ्या बाजूला आईस्क्रीम.. हे दोन पदार्थ एकत्र केले तर..? ज्याचा तुम्हाला विचारसुद्धा करवत नाही असा पदार्थ या व्हिडिओतील व्यक्तीने बनवला आहे. बर्गरचा आईस्क्रीम रोल बनवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. स्ट्रीट फूड लव्हर्सची काही कमी नाही. त्यामुळे बरेच स्ट्रीट फूड विक्रेते अजब गजब प्रयोग करत असतात. आताही असाच एक वेगळा फूड फ्युजनचा प्रयोग या व्हिडिओतून तुम्हाला पहायला मिळेल. बर्गर आणि आईस्क्रीम वेगवेगळे तर तुम्ही खाल्ले असेल. पण बर्गर आईस्क्रीम रोल अत्यंत वेगळी डिश सध्या चर्चेत आली आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सगळ्यात आधी एक बर्गर घेतो. त्यानंतर बर्गरवर दूध घालून बर्गरचे तुकडे करू लागतो. बराच वेळ बर्गरचे तुकडे केल्यानंतर हे दोन्ही पदार्थ एकमेकांत मिसळून घेतो. (Weird Food Fusion) त्यानंतर अगदी काही सेकंदातच आईस्क्रीम रोल तयार होतो. शेवटी एका कपमध्ये याचे छोटे छोटे रोल आणि त्यावर टोमॅटो तसेच कांद्याच्या चकत्या ठेवून सर्व्ह करतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर mumbaikarfoodie__ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘बर्गर आईस्क्रीम रोल्स’. ही रील प्रचंड ट्रेंडिंग असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिली आहे. (Weird Food Fusion) हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फुडी लोकांनी मात्र संताप व्यक्त करत बर्गरला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. एकाने लिहिलंय, ‘बर्गरची वाट लावायची हिंमत कशी झाली तुझी?’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘हे करण्याआधी तू मेला का नाहीस?’

मेलेली व्यक्ती भविष्यात पुन्हा होणार जीवंत ! ‘या’ कंपनीने मृतदेह गोठवून केला प्रयोग

Death

हॅलो महाराष्ट्र | विज्ञान-तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मृत्यू हे आपल्या आयुष्यातील एक अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा कधी ना कधी मृत्यू होतो. यातून कोणाचीही सुटका होत नाही. परंतु काही काही लोक हे 20 ते 30 वर्षात मरतात. तर काही लोक शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात. शास्त्रज्ञांनी किती प्रगती असली तरी मृत्यूचे रहस्य त्यांना समजले नाही. परंतु शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, मृत व्यक्तीला ते भविष्यात जाऊन नक्कीच जिवंत करू शकतात. अशातच आता एका क्रायोनिक कंपनीने आपल्या पहिल्या ग्राहकाचा मृतदेह भविष्यात पुन्हा जिवंत करता येईल या आशेने गोठवला आहे.

सदर क्रायोनिक्सचे फिलिप रोडस यांनी जाहीर केलेली आहे की, कंपनीने सिडनीतील एका माणसाला क्रायोजेनिक पद्धतीने पद्धत वापरून यशस्वीरित्या गोठवले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला या व्यक्तीच्या वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले फिलिपने दिलेल्या माहितीनुसार ते खूप तणावपूर्वक होते. हीच गोष्ट त्याला अनेक दिवस झोपू देत नव्हती. कारण वेगवेगळ्या दिवशी अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया त्यांना करायच्या होत्या.

मृतदेह गोठवण्यासाठी 92 लाख रुपये खर्च

फिलिपने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबाने आम्हाला अचानक कॉल केला. अशा स्थितीत सर्व तयारी करण्यासाठी आमच्याकडे अगदी आठवडाभराचा वेळ होता. 12 मे रोजी सिडनीच्या रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर कंपनीने ताबडतोब त्याचे शरीर गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी सांगितले की, या प्रक्रियेसाठी एकूण 88 हजार पौंड म्हणजेच भारतीय 92 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे.

मृत देह गोठला होता

वृत्तानुसार हा मृतदेह सगळ्यात आधी रुग्णालयात तिच्या शीतगृहात नेण्यात आला. आणि बर्फानी बांधण्यात आला. त्यानंतर तज्ञांनी त्याच्या पेशी टिकवण्यासाठी ती शरीरातून द्रव पंप केला. त्यानंतर शरीर कोरड्या बर्फात भरले होते. आणि तापमान 80° c पर्यंत खाली आणले. दुसऱ्या दिवशीचे वातावरण माणसाचा मृत्यू दिवस सर्जन क्रायोनिकच्या ग्रुप सुविधा त्याला तेव्हा त्यांचे तापमान उणे 28°c पर्यंत खाली आणले गेले. आणि नंतर व्याक्युम स्टोरेज म्हणून काम करणाऱ्या एका विशिष्ट टाकीमध्ये ठेवले.

असे तंत्रज्ञान 250 वर्षानंतर येऊ शकते

हाती आलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेला दहा तास लागले आणि यामुळे या वृद्ध व्यक्तीच्या भविष्यात पुन्हा जिवंत करता येऊ शकते यामुळे केलेली आहे. फिलिप्सने दावा आहे की, तुमची इच्छा असल्यास तुमच्या मेंदूला खर्‍या जगात निरोगी तरुण क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी वैद्यकीय तंत्रज्ञान पुढील अडीचशे वर्षात उपलब्ध होईल.

जय शाह यांची मोठी घोषणा!! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनना 25 लाखांचे बक्षीस

groundsmen and pitch curators (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL अखेर संपली. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. BCCI कडून विजेत्या- उपविजेत्या संघासह दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे सुद्धा जाहीर केली. त्यानंतर आता BCCI चे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या 10 होम टीमच्या ग्राऊंड्समन आणि पिच क्यूरेटर यांनी प्रत्येकी 25 लाख आणि अतिरिक्त तीन ठिकाणांवरील प्रत्येकाला 10 लाख रूपये देण्याचे जय शाह यांनी जाहीर केलं आहे.

खरं तर मैदानावर क्रिकेटपटू खेळत असतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात मात्र पडद्यामागचे खरे कलाकार तर ग्राउंडमन आणि पीच क्युरेटर असतात. यावर्षीच्या आयपीएल मध्ये अनेक सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशावेळी पाऊस पडून गेल्यावर सामना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी ग्राऊंड्समन आपली सर्व ताकद पणाला लावत होते. ग्राऊंड्समनची धडपड संपूर्ण जगाने उभ्या डोळ्याने बघितली आहे. बीसीसीयआयने सुद्धा त्यांच्या कष्टाची दखल घेत या खऱ्या हिरोंसाठी बक्षिसे जाहीर केली आहे.

याबाबत जय शाह यांनी ट्विट करत म्हंटल, आमच्या यशस्वी T20 हंगामाचे अनसिंग हिरो हे ग्राउंड स्टाफ आहेत ज्यांनी चमकदार खेळपट्ट्या देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तुमच्या या कामाचे कौतुक म्हणून आयपीएलच्या 10 नियमित ठिकाणांवरील ग्राउंड्समन आणि क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 3 अतिरिक्त स्थळांवर प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील. आपल्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद!

यंदाची आयपीएल मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, चंदीगड, हैदराबाद, बेंगळुरू, लखनौ, अहमदाबाद आणि जयपूर या १० शहरातील स्टेडियमवर खेळवण्यात आली होती तर या वर्षी अतिरिक्त ठिकाणे गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाला अशी होती. राजस्थान रॉयल्ससाठी गुवाहाटी हे दुसरे होम ग्राउंड होते तर विशाखापट्टणमने दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या सामन्यांच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन केले होते.

JioCinema Premium Annual Plan : Jio Cinema ने लॉन्च केला नवा प्रिमिअम प्लॅन; 299 रुपयांत वर्षभर मजा

JioCinema Premium Annual Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (JioCinema Premium Annual Plan) देशभरात अनेक लोक मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म वापरतात. त्यामुळे गेल्या काही काळात नवनवीन कलाकृती घेऊन येणारा जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युजर्सची संख्या चांगलीच वाढली आहे. जर तुम्हीही जिओ युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. नुकताच रिलायन्स जिओने आपल्या प्रिय ग्राहकांसाठी एक नवा प्रिमिअम प्लॅन लॉन्च केला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही जाहिरातीशिवाय हा सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. जो प्रीमियम कन्टेन्टसाठी सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचे समजत आहे.

माहितीनुसार, जीओचा हा नवा प्रीमियम प्लॅन सर्वात स्वस्त असून वर्षभरासाठीचा जबरदस्त प्लॅन आहे. प्रीमियम अॅन्युअल नावाने सुरु करण्यात आलेली ही ऑफर जिओ युजर्सला चांगला फायदा देईल. (JioCinema Premium Annual Plan) कारण यामध्ये अॅड-फ्री कन्टेन्ट पाहता येणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, पूर्ण १२ महिने म्हणजेच वर्षभराच्या कालावधीसाठी तुम्हाला केवळ २९९ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हा प्लॅन आनंद पर्वणी ठरणार, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चला या प्लॅनविषयी पूर्ण माहिती घेऊया.

Jio चा प्रीमियम वार्षिक प्लॅन (JioCinema Premium Annual Plan)

जिओच्या या नव्या प्रीमियम वार्षिक प्लॅनमुळे तुम्हाला पूर्ण १ वर्षासाठी कोणत्याही जाहिरातीशिवाय ‘प्रीमियम’सह सगळ्या कन्टेंटचा अॅक्सेस दिला जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला ४के क्वालिटी कन्टेंट पाहता येईल. शिवाय मोबाइलमध्ये अॅप वापरतेवेळी तुम्ही ऑफलाइन मोडमध्येसुद्धा कन्टेंट पाहू शकाल. तसेच टीव्ही कनेक्शनसोबत इतर कोणत्याही डिव्हाइसवर तुम्ही सीरिज, सिनेमा, शो पाहू शकणार आहात.

वर्षभर होईल मनोरंजन

जिओ सिनेमाने लॉन्च केलेल्या या नव्या प्रीमियम प्लॅनची वैधता पूर्ण १ वर्षाची अर्थात १२ महिन्याची आहे. या प्लॅनमध्ये एचबीओ, पॅरामाउंट आणि इतर प्रदात्यांकडून प्रीमियम कन्टेंटचा समावेश करण्यात आला आहे. जिओ सिनेमाने दिलेला हा वार्षिक प्लॅन कोणत्याही मासिक प्लॅनपेक्षा उत्तम आणि स्वस्त असल्याचे दिसून येत आहे. (JioCinema Premium Annual Plan) जाहिरात करून मंथली सिंगल स्क्रीन प्लॅनची किंमत दरमहा २९ रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे सबस्क्रायबर्स वाढले. पण नीट पाहिले तर समजेल की, वार्षिक स्वरूपात हा प्लॅन ३४८ रुपयांना पडेल. त्यामुळे तुलना केली असता नवा लॉन्च झालेला प्रिमिअम प्लॅन अधिक सोयीस्कर आहे.

शरद पवार खोटं बोलत आहेत; मुख्यमंत्रीपदाबाबत अजितदादांचा वेगळाच दावा

Ajit Pawar And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| “2004 साली मी नेते नवखे असल्यामुळे मुख्यमंत्रीपद नाकारले होते” असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. मात्र त्यांचे हे वक्तव्यं अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावले आहे. “शरद पवार धादंत खोटं बोलत आहेत, 2004 ला कुणीच नवखं, अननुभवी नव्हतं” असं अजित पवार यांनी सांगितले आहे. यासह “1991 साली पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार होते, परंतु सुधाकरराव नाईक शरद पवारांचं ऐकत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आपलं ऐकणार नाहीत अशी भीती पवारांना होती” असेही अजित पवारांनी सांगितले आहे.

अजित पवार नेमके काय म्हणाले??

शरद पवार यांनी केलेले वक्तव्य फेटाळून लावताना अजित पवार म्हणाले की, “शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितलं ते धादांत खोट आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टड नव्हतो. आपण 2004 साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. 2004 साली प्रफुल पटेल आणि शरद पवार यांना वाटलं असेल की, आपलं यापूर्वीही कोणी ऐकलं नव्हतं त्यामुळं आता पुन्हा मुख्यमंत्री केलं तर आपलं कोणी ऐकणार नाही.”

शरद पवारांचे वक्तव्यं

एका मुलाखतीत शरद पवारांनी सांगितले होते की, “2004 मध्ये मुख्यमंत्री पदाबाबत फार विचापूर्वक निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, ते फारच नवखे होते.मुख्यमंत्रिपदासाठी कोणी योग्य उमेदवार आमच्याकडे नव्हता. छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो. मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही, ही अजित पवार यांची ओरळ निरर्थक आहे”

Bike Accident : भरधाव बाईकवरून पडला, थेट चाकाखाली डोकं..; चित्तथरारक अपघाताचा VIDEO व्हायरल

Bike Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bike Accident) सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये रस्ते अपघाताच्या व्हिडिओंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अर्थात रस्ते अपघाताची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. अनेकदा वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. अशा अपघातांच्या प्रकरणात सर्वाधिक मृत्यू हे तरुण दुचाकीस्वारांचे झाले आहेत. असे अपघात टाळता यावेत म्हणून वारंवार हेल्मेट घालून दुचाकी चालवण्याचे सल्ले दिले जातात. मात्र, तरीही लोक या सूचनेचे पालन करत नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हेल्मेट घातल्यामुळे प्राण वाचल्याचे समोर आले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Bike Accident)

प्रत्येक दिवशी रस्ते अपघाताची किमान एक बातमी तरी आपण वाचत असतो. प्रतिवर्षी अशा अपघातांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश असल्याने हेल्मेट घालून गाड्या चालवण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावर असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये केवळ हेल्मेट घातल्यामुळे जीव बचावल्याचे समोर आले आहे. आताही असाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, नागमोडी वळणाच्या रस्त्यावर काही तरुण रस्त्यावर रेसिंग करत आहेत. यावेळी एक बाईकचालक एका सायकल स्वाराला धडकतो आणि त्यानंतर तो स्वत: घसरत पुढे. दरम्यान, त्या बाईक चालकाचं डोकं बाईकखाली येत. मात्र, सुदैवाने त्याने हेल्मेट परिधान केल्यामुळे तो बचावतो. (Bike Accident) बाईकचं वजन पाहता तरुणाचा जीव काही सेकंदात जागेवर जाऊ शकला असता. मात्र, हेल्मेट परिधान केल्यामुळे त्याचा जीव बचावला. हा व्हिडीओ हेल्मेट घालणे किती सुरक्षित आहे आणि गाडी चालवताना किती सतर्क असायला हवे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर इंस्टाग्राम हॅण्डल maharashtra_trending_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, ‘असं वाटतंय.. हा हेल्मेटच्या क्वालिटीचा प्रचार करतोय, किंवा असं म्हणूया त्याचा दिवस चांगला होता’. (Bike Accident) तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ‘हेल्मेटनं रोखला मृत्यू’. तसेच आणखी एकाने लिहिले आहे, ‘हेल्मेट गेल *** ..त्या म्हाताऱ्या काकाना किती लागल ते पहा, अश्या बाईक राईडमुळे सामान्य जनतेला त्रास होतो’.