Thursday, December 25, 2025
Home Blog Page 724

Adani Group : डिजिटल पेमेंटच्या दुनियेत अदानी करणार एंट्री; Paytm, GPay ला देणार तगडी टक्कर

Adani Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adani Group) गेल्या काही काळात इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटच्या दुनियेत मोठी उलाढाल पहायला मिळाली. जो तो बँकेत जाऊन किंवा ATM चा वापर करून पैसे काढणे टाळू लागला आहे. स्कॅन करा आणि पे करा अशी सोयीस्कर सिस्टीम सुरु झाली आहे. तसेच शॉपिंगसाठी बाजारात जाण्यापेक्षा ऑनलाईन साईटवरून शॉपिंग करणे सगळ्यांना जास्त सोयीचे वाटू लागले आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, पेटीएम आणि गुगल पे यांसारख्या UPI कंपन्यांचं मार्केट वाढलं आहे. अशातच आता अदानी समूह इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यामुळे साहजिक आहे इतर UPI कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे.

अदानी ॲप पुरवणार ‘या’ सेवा (Adani Group)

एका वृत्तानुसार, अदानी ग्रुपला मान्यता मिळाली तर अदानी ॲपद्वारे बऱ्याच सुविधा प्रदान करण्यात येतील. अदानीचे ॲप २०२२ मध्ये लॉन्च झाले होते. सध्या या ॲपद्वारे तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग यासह गॅस, वीज बिल भरण्याची सुविधा प्रदान केली जात आहे. (Adani Group) यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पेमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर, कंपनीचे प्रारंभिक लक्ष हे ग्राहकांच्या सुविधा असणार आहे. त्यामुळे या ॲपद्वारे ग्राहक विविध प्रकारचे पेमेंट्स करू शकतील. जे करताना त्यांना लॉयल्टी पॉइंट्स दिले जातील आणि याचा वापर ते ऑनलाइन शॉपिंगमध्ये करू शकतील.

कुणाशी असेल स्पर्धा?

अदानी ग्रुपने इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बऱ्याच बड्या कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. ज्यामध्ये पेटीएम, फोनपे, गुगलपे अशा UPI आधारित पेमेंट ॲपचा समावेश आहे. (Adani Group) शिवाय इ कॉमर्सबद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, टाटा याना टक्कर द्यावी लागेल.

IPhone 15 | 44,250 रुपयात मिळणार IPhone 15; अमेझॉनवर मोठा सेल चालू

IPhone 15

IPhone 15 | आज-काल आयफोन घ्यायला सगळ्यांनाच आवडतो. अगदी प्रत्येक घराघरातही आजकाल कोणाकडे तरी आयफोन असतो. जर तुम्ही देखील आता IPhone 15 घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला या मोबाईलवर खूप मोठी सवलत मिळणार आहे. हा आयफोन तुम्हाला केवळ 44,255 रुपयाला मिळणार आहे. ही तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. त्यामुळे या संधीचा फायदा तुम्ही लवकरात लवकर घ्या.

Iphone 15 सवलत | IPhone 15

एप्पलने Iphone 15 चे अनावरण केले आहे. यामध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. त्यापैकी बेस्ट मॉडेल आयफोन 15 आता ॲमेझॉनवर स्वस्त किमतीमध्ये विकण्यासाठी आहे. तुम्हाला अत्यंत कमी किमतीमध्ये हा फोन खरेदी करता येईल.

कुठे खरेदी करायचे ?

या Iphone 15 च्या बेस्ट ऑफरचा लाभ तुम्हाला थेट ॲमेझॉनवरून घेता येईल. यामध्ये 128 GB ची मूळ किंमत ही 79,900 आहे, तर ॲमेझॉनवर यावर 11 टक्के सूट मिळवण्याची किंमत केवळ 71 हजार 290 रुपयांपर्यंत आहे.

सवलत कशी मिळवायची ?

तुम्ही ईएमआय पर्यायसह एक्सचेंज डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवर सूट यासह ऑफर घेऊ शकता. तुम्ही जर एक्सचेंज ऑफर निवडली, तर त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. म्हणजे 44,250 रुपयांना तुम्हाला हा फोन मिळू शकतो. त्याचप्रमाणे एसबीआय क्रेडिट कार्ड आयसीआयसीआय किंवा ॲमेझॉन पे आयसीआयसीआयचे तुम्ही जर यूजर असाल, तर 47 हजार 940 पेक्षा जास्त पेमेंटवर तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळेल.

IPhone 15 ची माहिती | IPhone 15

  • डिस्प्ले: 6.61-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले
  • डिझाइन: कलर-इन्फ्युज्ड बॅक ग्लाससह ॲल्युमिनियम बॉडी
  • जाडी: 15.54 सेमी
  • रीफ्रेश दर: 120Hz
  • ब्राइटनेस: 1,000 nits, 1,600 nits, 2,000 nits
  • कॅमेरा: 48MP मुख्य कॅमेरा, 4x रिझोल्यूशन, 2x टेलीफोटो
  • स्टोरेज: 128GB, 256GB, 512GB
  • प्रोसेसर: 5-कोर GPU सह A16 बायोनिक चिप
  • बॅटरी: 3,349mAh
  • वॉटर रेसिस्टन्स : EP 68

वस्त्रोद्योग समिती मुंबईतर्फे या रिक्त पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीतून होणार निवड

Textile Committee Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. नुकतीच वस्त्रोद्योग समिती (Textile Committee Mumbai) मुंबईच्यावतीने भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सल्लागार, तांत्रिक अधिकारी ही रिक्त पदे भरली जाणार आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी अजिबात वेळ न वाया घालवता नोकरीसाठी अर्ज करावा.

प्रसिद्ध जाहिरातीनुसार, वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई अंतर्गत सल्लागार, तांत्रिक अधिकारी ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये तांत्रिक अधिकारी पदासाठी 45 हजार रूपये पगार दिला जाणार आहे. तर सल्लागार पदासाठी 65 हजार पगार रुपये पगार दिला जाणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्यामुळे शिक्षणाची अट पदानुसार लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक माहिती वाचण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

यासह ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1PaoIyQ-yDiZduYKGHnSkZE4dHWFSfHC_/view या लिंकला भेट द्यावी. तर भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1kWhaYQ0Sg2mLoOZtc-HgVUFXLeI6f7GO/view ही लिंक पहावी. लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेअंतर्गत वॉक इन मुलाखतीमधूच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे, 7 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून येत्या वस्त्रोद्योग समिती, दुसरा मजला, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई याठिकाणी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुणांनी त्वरित अर्ज करावा आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

BSNL Best Offer | BSNL ने आणला 150 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, प्रतिस्पर्धी कंपन्यांचे वाजणार बारा

BSNL Best Offer

BSNL Best Offer | सध्या अनेक दिवसांनी टेलिकॉम कंपन्या उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु त्यातील बीएसएनएल ही एक सरकारी मालकीची आणि एक जुनी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएलने एक रिचार्ज प्लॅन सादर केलेला आहे. ज्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाची घसरण होताना पाहायला मिळत आहे. बीएसएनएलने एक रिचार्ज प्लॅन सादर केलेला आहे. या अंतर्गत युजरला मर्यादित मोफत वॉईस कॉल आणि डेटा सह 150 दिवसांची वैद्यता ही ऑफर देण्यात आलेली आहे. बीएसएनएलकडे (BSNL Best Offer) इतर देखील अनेक प्रीपेड योजना आहे. या योजनांची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

बीएसएनएलच्या प्रीपेड रिचार्ज योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये | BSNL Best Offer

दीर्घ वैधता

बीएसएनएलच्या प्रीपेड रिचार्ज प्लानचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची वैधता 150 दिवसांची असते
त्यामुळे युजर्स वारंवार रिचार्ज न करता दीडशे दिवसांसाठी हा प्लॅन वापरू शकतात.

अमर्यादित व्हॉइस कॉल

बीएसएनएलचे युजर पहिल्या 30 दिवसांसाठी देशभरात कुठेही अमर्यादित विनामूल्य व्हॉइस कॉल करू शकतात. हे त्यांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.

डेटा लाभ

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये पहिल्या 30 दिवसांसाठी दिवसाला 2 जीबीची मर्यादा आहे. म्हणजेच युजर्सला 60 gb चा नेट वापरता येते.

मोफत एसएमएस | BSNL Best Offer

व्हॉइस आणि डेटा फायद्यांव्यतिरिक्त, प्लॅन पहिल्या 30 दिवसांसाठी दररोज 100 विनामूल्य एसएमएस देखील प्रदान करते. जे अजूनही संप्रेषणासाठी एसएमएस वापरतात त्यांच्यासाठी ही एक मौल्यवान जोड आहे.

STV_397 योजनेचे तपशीलवार ब्रेकडाउन

BSNL ची परवडणारी प्रीपेड रिचार्ज योजना, ज्याची किंमत३९7 रुपये आहे, अधिकृतपणे BSNL वेबसाइटवर STV_397 म्हणून सूचीबद्ध आहे.

  • वैधता: 150 दिवस
  • व्हॉईस कॉलिंग: पहिल्या 30 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉल
  • डेटा: 30 दिवसांसाठी दररोज 2GB हाय-स्पीड डेटा (एकूण 60GB)
  • SMS: 30 दिवसांसाठी दररोज 100 मोफत समस

३० दिवसांनंतरचे फायदे

सुरुवातीच्या 30-दिवसांच्या कालावधीनंतरही, वापरकर्ते इनकमिंग कॉल प्राप्त करणे सुरू ठेवतील, त्यांचे सिम कार्ड पूर्ण 150 दिवस सक्रिय राहतील याची खात्री करून. पहिल्या ३० दिवसांनंतर आउटगोइंग कॉल करण्यासाठी किंवा डेटा वापरण्यासाठी, वापरकर्ते बीएसएनएलचे टॉप-अप व्हाउचर वापरून त्यांचा नंबर रिचार्ज करू शकतात.

अतिरिक्त योजना

STV_397 प्लॅन व्यतिरिक्त, BSNL समान 150-दिवसांच्या वैधतेसह आणखी एक योजना ऑफर करते:

  • BSNL 699 ची योजना
  • वैधता: 130 दिवस (एकूण 150 दिवसांसाठी 20 दिवसांनी वाढवलेला)
  • व्हॉइस कॉलिंग: अमर्यादित
  • डेटा: दररोज 0.5GB
  • एसएमएस: दररोज १०० मोफत एसएमएस

BSNL चे प्लॅन का निवडायचे?

BSNL च्या प्रीपेड योजना केवळ किफायतशीर नसून दीर्घ वैधता कालावधी देखील देतात, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास कमी होतो. उदार डेटा आणि कॉलिंग फायदे या योजना उच्च संप्रेषण आवश्यकता असलेल्या वापरकर्त्यांसाठी आदर्श बनवतात.

AI In Health Insurance : हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI मदत करणार; फक्त 1 तासात क्लेम सेटल होणार

AI In Health Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (AI In Health Insurance) हेल्थ इंश्युरन्स किती महत्वाचा आहे हे आपण सगळेच जाणतो. पण त्यामध्ये लपलेल्या अटी आणि शर्तींविषयी आपल्याला पूर्ण माहिती नसते. त्यामुळे हेल्थ इंश्युरन्स क्लेम करतेवेळी बऱ्याचदा अडचणी येतात. या अडचणी अशा असतात की, वेळेला जिथे हेल्थ विमाचा उपयोग होईल तिथेसुद्धा आपल्याला आपल्याच खिशातून उपचाराचा खर्च करावा लागतो. पण आता अशा अडचणी येणार नाहीत. कारण, आरोग्य विमा विश्वात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेश करत आहे. ज्यामुळे आता हेल्थ इंश्युरन्स घेणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल. इतकंच नव्हे तर फक्त एका तासात क्लेमसुद्धा सेटल होतील. चला याविषयी अजून माहिती घेऊया.

हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI सुविधेचा वापर

माहितीनुसार, हेल्थ इंश्युरन्स विश्वात AI सुविधेचा वापर केला जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हेल्थ इंश्युरन्स घेणाऱ्यास होईल. मुख्य म्हणजे, यामुळे दावे निकाली काढणे सोपे जाईल. (AI In Health Insurance) शिवाय हेल्थ इंश्युरन्समध्ये लपलेल्या अटी आणि शर्ती ज्यांची ग्राहकांना माहिती नसते अशी माहिती देखील ग्राहकांना या माध्यमातून मिळणार आहे. अनेकदा ग्राहकांना इंश्युरन्स क्लेम नाकारला जातो किंवा सेटलमेंटसाठी बराच कालावधी जातो. अशा समस्या देखील AI च्या वापराने सोडवता येतील. NHA च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे AI टूल येत्या एक- दोन महिन्यांत काम करण्यास सुरवात करेल.

कसे करेल काम? (AI In Health Insurance)

हेल्थ इंश्युरन्समध्ये AI टूलचा वापर सुरु झाल्यानंतर हे टूल ग्राहकाला त्याच्या विम्याच्या अटींबद्दल सर्व माहिती प्रदान करेल. यासाठी ग्राहकाला त्याची विमा कागदपत्रे स्कॅन करावी लागतील आणि ती नॅशनल हेल्थ क्लेम फोरमच्या पोर्टलवर अपलोड करावी लागतील. असे केल्यानंतर पोर्टलमध्ये वापरात असलेले AI टूल त्या कागदपत्रांना स्कॅन करेल. (AI In Health Insurance) पुढे हे टूल विम्यामध्ये लपवलेल्या सर्व अटी तसेच शर्तींची माहिती ग्राहकांना प्रदान करेल. इतकेच नव्हे तर, विम्याशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवण्यास मदत करेल.

Konkan News : ‘या’ कालावधीपर्यंत कोकणात वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येणार नाही ; काय आहे कारण ?

konkan news

Konkan News : उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पर्यटनासाठी कोकणात (Konkan News) जाणाऱ्यांची रीघ लागते. रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील समुद्र किनाऱ्यांवर भेटीदेण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. याबरोबरच याठिकाणाचे जलपर्यटन सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र काही दिवसात मान्सूनला सुरुवात होत आहे म्हणूनच खवळलेल्या समुद्रामुळे कोकणातील जलपर्यटन हे 31 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला असून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वॉटर स्पोर्ट्स आनंद घेता येणार नाही (Konkan News)

कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायविंग बनाना राईट जेट्स की पॅरासरी अशा साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सध्या अद्यापही उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्यामुळे अजूनही कोकणामध्ये (Konkan News) येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्तच आहे. मात्र यावर्षी पाऊस सुद्धा लवकर सुरू होत आहे त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही कोकणात पर्यटनासाठी जाणार असाल तर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स आनंद मात्र घेता येणार नाही.

‘या’ कारणांमुळे जल पर्यटन राहणार बंद (Konkan News)

येत्या काही दिवसात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होत आहे.
खवळलेलया समुद्रामुळे कोकणातील (Konkan News) समुद्री किनारे धोकादायक बनतात.
पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने हे आदेश जारी केले आहेत.

मान्सूनची कोकणात हजेरी (Konkan News)

दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ तारखेला अंदमानात मान्सून दाखल झाला असून आता 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 10 जून दरम्यान मुंबई आणि कोकणात मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. 15 जून पर्यंत मान्सूनचे आगमन हे नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा, विदर्भात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे!! सोनिया दुहान यांच्या गौप्यस्फोटांमुळे खळबळ

Sonial Doohan And Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी पक्षाला रामराम ठेवला आहे. यामागे त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कारण असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. “सध्या पक्षात सर्व काही सुरळीत नाही. मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडत आहे” असे सोनिया दुहान यांनी म्हणले आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर दुसऱ्या बाजूला सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्यामुळे शरद पवार गटाला याचा मोठा धक्का बसला आहे.

पक्ष सोडल्याच्या चर्चांना उत्तर देत सोनिया दुहान यांनी म्हटले आहे की, “मी शरद पवार यांना सोडलेले नाही आणि मी पक्ष सोडलेला नाही. या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही. मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही. शरद पवार यांच्याशी अनेक दशके जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत. याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा. Aपक्षात सर्व काही सुरळीत चालत नाही… सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागत आहे.”

त्याचबरोबर, “आता नंतर राजकारण नंतर बघू, करिअर नंतर बघू, पक्षात राहावे, अशी परिस्थितीच सध्या नाही आहे. सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागले. मी पक्ष सोडत आहे, मी जाहीरपणे सांगतो की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. धिरज शर्मानेही सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडला” असा दावा सोनिया दुहान यांनी केला आहे.

दरम्यान, “सेल्फी काढून पक्ष चालत नाही. पक्षाला पक्षाच्या नियमानुसार चालवावे लागते. ही गोष्टी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजुबाजुच्या नेत्यांना समजून घ्यावी लागले. मी पक्ष सोडत आहे, मी जाहीरपणे सांगतो की सुप्रिया सुळे यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. धिरज शर्माने देखील सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडला” अशी टीका दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

Side Effects Of Eating Rice : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका भात; अन्यथा, होतील ‘या’ गंभीर समस्या

Side Effects Of Eating Rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Rice) आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात भाजी, पोळी, डाळ आणि भात हे पदार्थ तर १००% असतात. यानुसार समजते की, भात हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक मुख्य भाग आहे. भात खाणे नक्कीच आपल्या आरोग्यसाठ चांगले आहे. पण तो कधी खायचा याचे काही नियम आहेत. ते पाळणे गरजेचे आहे. बरेच लोक जेवणाच्या दोन्ही वेळेत भाताचे सेवन करतात. पण तज्ञ सांगतात की, आहारात भात घ्यायचा असेल तर तो केवळ सकाळच्या जेवणात घ्यावा. रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश केल्यास आरोग्यविषयक काही तक्रारी जाणवू शकतात. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

पचनक्रियेशी संबंधित समस्या

भात अर्थात तांदूळ पचायला जड असतो. (Side Effects Of Eating Rice) त्यामुळे जर रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश केला तर पचनसंस्थेवर त्याचा भार येतो. मुख्य म्हणजे रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी जर त्यावर ताण आला तर साहजिक आहे पचनक्रियेशी संबंधित विविध समस्या जाणवू शकतात. यामध्ये बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि इतर काही समस्यांचा समावेश आहे.

संधिवाताचा त्रास (Side Effects Of Eating Rice)

तज्ञ सांगतात की, सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात रात्रीच्या वेळी चुकूनही भात खाऊ नये. तांदळातील काही घटक अशा रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. रात्रीच्या वेळी भात खाल्ल्याने शरीरात जळजळ वाढू शकते आणि यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.

मधुमेहींसाठी हानिकारक

बऱ्याच लोकांना जेवणात भात नसेल तर जेवल्यासारखं वाटत नाही. पण, असे असले तरीही काही सवयी आरोग्याची वाट लावू शकतात. खास करून मधुमेहींनी रात्रीच्या जेवणात भात खाणे हानिकारक ठरू शकते. (Side Effects Of Eating Rice) कारण, तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. जो रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतो. ज्यामुळे मधुमेहींच्या आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

अनिद्रेचा त्रास

रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्यास शरीरात ट्रिप्टोफॅनचे प्रमाण वाढू शकते. यामुळे खरतर चांगली झोप लागते. पण काही लोकांमध्ये या उलट पहायला मिळते. रात्री भात खाल्ल्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो आणि त्यामुळे झोप लागत नाही. (Side Effects Of Eating Rice) अशा लोकांनी किंवा ज्यांना आधीपासूनच झोपेची समस्या आहे त्यांनी रात्री भात खाणे टाळा.

लठ्ठपणाचा धोका

रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने वेगाने वजन वाढू शकते. त्यामुळे येणार लठ्ठपणा कमी करणे फार अवघड होऊ शकते. कारण, तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जे शरीरात चरबीच्या रूपात साठवले जाते. परिणामी वेगाने वजन वाढते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात शक्यतो भात टाळण्याचा सल्ला दिला जातो.

रात्रीच्या जेवणात काय खाता येईल?

रात्रीच्या जेवणात तुम्ही भाताला पर्याय म्हणून काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Side Effects Of Eating Rice) यामध्ये संपूर्ण धान्य, ओट्स, क्विनोआ किंवा इतर हलके तसेच पौष्टिक पदार्थ यांचा समावेश करता येईल.

Revas Reddy Coastal Highway: 93 पर्यटनस्थळांना जोडेल रेवस ते रेड्डी महामार्ग; प्रवाशांसाठी कधी खुला होणार?

Revas Reddy Coastal Highway

Revas Reddy Coastal Highway: कोकणवासीयांचे समुद्राशी अतूट नाते आहे. गोवा किंवा इतर फॉरेन बीचेसला आहे मागे सारेल अशी समुद्रकिनारे कोकणाला लाभली आहेत. यात समुद्र किनाऱ्याने प्रवास करता यावा अशी इच्छा कोकण पर्यटकांनी अनेकवेळा व्यक्त करून दाखवली आहे. आता पर्यटकांची हीच इच्छा पूर्ण होणार आहे. कारण की, कोकणातील 93 पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या सागरी किनारी मार्गाचे काम पूर्णत्वाला आले आहे. महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि मार्ग पर्यटकांना वापरण्यासाठी खुला व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कामाचा वेग वाढवला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासादरम्यान किनारपट्टीच्या जवळ महामार्गाची योजना आखली आहे रेवस ते रेड्डी या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटनाला चालना मिळेल. तसेच प्रवासाचा वेग वाढेल आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या महामार्गामुळे पर्यटकांना कोकणातील वैभव ही अनुभवता येईल. रेवस ते रेड्डी प्रकल्पासाठी राज्य सरकारने निविदा मागवून घेतल्या आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यातच या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेवस-रेड्डी सागरी किनारा (Revas Reddy Coastal Highway)

कोकण किनारपट्टीचे दर्शन घडवणारा हा महामार्ग अंदाजे 447 किमी लांबीचा आहे. परंतु मूळ रेवस- रेड्डी मार्ग सलग नसणार आहे. हा महामार्ग आठ खाडीपुल बांधून तयार केला जाणार आहे. रेवस, दिघी, बाणकोट, केळशी, दाभोळ, भाट्ये, वाडातिवरे अशा ठिकाणी खाडीपुल बांधण्यात येईल. हा महामार्ग उभारण्यासाठी 10 हजार कोटी रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाचे म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडला जाणार आहे.

महामार्ग खुला कधी होणार??

रेवस-रेड्डी सागरी किनारा महामार्गाचे काम पुढील पाच वर्षात होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2023 पर्यंत हा महामार्ग प्रवासासाठी खुला होईल. परंतु या मार्गावरून वेगवान प्रवास करता येणार नाही. वळणदार मार्ग आणि खाडी पुल असल्यामुळे गती कमी ठेवावी लागेल.

North Sentinel Island : भारतातील ‘या’ रहस्यमयी बेटावर जायला घाबरतात लोक; काय असेल कारण?

North Sentinel Island

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (North Sentinel Island) संपूर्ण जगभरात रहस्यमयी आणि गुदमयी गोष्टी खूप आहेत. मात्र त्याबद्दल आपल्याला माहित असेलच असं नाही. आपल्या देशातही अशाच काही पुरातन, प्राचीन वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी दिसायला सुंदर असली तरीही त्यांच्या सौंदर्यात दडलेली रहस्य फारच रोमांचकारी आहेत. त्यापैकी एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते बेट म्हणजे अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट. हे बेट न केवळ देशासाठी तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य ठरले आहे. चला तर या बेटाविषयी काही महत्वाची माहिती घेऊया.

नॉर्थ सेंटीनल बेट (North Sentinel Island)

नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी एक रहस्यमयी ठिकाण ठरले आहे. या बेटावर राहणाऱ्या विशिष्ट आदीवासी जमातीतील लोक संपूर्ण जगापासून अलिप्त आहेत आणि त्यांचा जगाशी काहीच संबंध नाही. मुख्य म्हणजे कुणी त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते संबंधित व्यक्तीचा खात्मा करतात. त्यामुळे लोक इथे जायलाच घाबरतात. अमेरिकन नागरिकांच्या हत्येमुळे अंदमान निकोबार बेटं चर्चेत आली होती. मात्र, हे बेट त्याच्या १४५ वर्ष जुन्या एका रहस्यासाठी ओळखले जाते.

.. आणि तो जीवानिशी गेला

अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील नॉर्थ सेंटिनल द्वीप हे अत्यंत शांत, सुंदर असे बेट आहे. मात्र या शांततेत दडलेलं भयावह रहस्य लोकांना इथे जाण्यापासून अडवते. नॉर्थ सेंटीनल बेटं कितीही आकर्षक असले तरीही या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हणतात, इथे गेलेला माणूस आजपर्यंत कधीच परत आलेला नाही. (North Sentinel Island) खूप वर्षांपूर्वी एका २७ वर्षीय अमेरिकन नागरिक जॉन अॅलनसोबत असं घडलं होत. ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जॉन अॅलन इथे स्थायिक असलेल्या आदिवासी लोकांना भेटायला गेला होता.

त्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर त्याने ५ मच्छिमारांसह पुन्हा या बेटांवर येऊन प्रसार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने भेटवस्तूसुद्धा आणल्या होत्या. पण त्याच काहीही ऐकून न घेता इथल्या आदिवासींनी त्याला बाण मारून ठार केले. त्याचा मृतदेह सुद्धा समुद्र किनारी वाळूत पुरून टाकला, असे म्हटले जाते. (North Sentinel Island) या बेटांवर जाण्याआधी जॉनने त्याच्या कुटुंबियांसाठी एक चिट्ठी लिहीली होती. ज्यात त्याने लिहिलं होत, ‘मी वेडा आहे असा तुमचा समज होऊ शकतो. पण इथल्या लोकांना जीजसबाबत सांगणं गैर होणार नाही असं मला वाटतं. मला ठार केलं तर आदिवांसींवर राग काढू नका, पण हे देवा मी मरू इच्छित नाही’.

इथे जाण्यास सक्त मनाई

नॉर्थ सेंटीनल बेट हे राजधानी पोर्ट ब्लेअरपासून केवळ ५० किलोमीटर दूर आहेत. अतिशय सुंदर आणि शांत असे हे बेट पर्यटकांना फार आकर्षित करते. पण तरीसुद्धा या बेटांवर जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कारण या बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना जगाशी संबंध ठेवायला आवडत नाही. या आदिवासींना सेंटीनल आदिवासी म्हटलं जातं. (North Sentinel Island) त्यांचा आजवर कोणत्याही मानवी समुहाशी संपर्क आलेला नाही आणि त्यांना कुणाशी संबंध ठेवायचा देखील नाही. इथे फक्त १०० आदिवासी राहतात, असे म्हटले जाते. पण त्यांना मानवी जगाशी संबंध ठेवण्यात कोणतीही रुची नाही. जर कुणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला जीवानिशी मारतात.

१४५ वर्ष जुनं रहस्य

या बेटावरील सेंटीनल आदिवासी मानवी जगाला घाबरतात. यामागे एक विशिष्ट कारण आहे. त्यांच्या भीतीचा संबंध थेट इंग्रजांशी जोडलेला आहे. हे रहस्य १४५ वर्ष जुनं आहे. माहितीनुसार, १८७९ मध्ये ब्रिटीश नौदल अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमन यांना अंदमानचे प्रभारी अधिकारी बनवण्यात आला होता. त्याने १८८० मध्ये या बेटावरील काही लोकांना प्रयोगासाठी नेले होते. (North Sentinel Island) त्यावेळी हे लोकल बेटावर परतले असता एक विचित्र प्रकारचा संसर्ग पसरला आणि याची बाधा झाल्याने अनेकांचं मृत्यू झाला. त्यामुळे या बेटावरील आदिवासी घाबरले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाशी संबंध तोडून टाकला. हेच कारण आहे की, कुणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर हल्ला करून हे लोक त्यांना जीवानिशी मारतात.